पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

रामायण भाग २१| Ramayana episode 21| Author : Mahendranath prabhu

इमेज
रामायण भाग २१| Ramayana episode 21| Author : Mahendranath prabhu          महाराणी कैकेयी आपल्या महालात बसली आहे. आणि तिच्या सोबत तिची दासी मंथरा आहे नि महाराणीचे ती कान भरत आहे. मंथरा म्हणाली ," राणी हातावर हात घेऊन बसून राहण्यात काही अर्थ नाही. तुला काय वाटतं राजा भरतला त्याच्या आजोळी वरून बोलवून घेईल असं तुला तसं वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. म्हणून आपणच एखादा गुप्तचर कैकेयी देशाला पाठवून भरत ला बोलवून घेऊ.कसं ?"   " ठीक आहे बोलवून घेऊ परंतु मंथरा अजून त्याची वेळ आलेली नाहीये. कारण आर्यसुमन्त त्या तिघांना वनात सोडून वापस आलेला नाहीये. माहीत नाही  काय षड्यंत्र सुरू आहे ते . त्याला प्रथम येऊ दे मगच आमची खात्री होईल की राम खरोखरच चौदा वर्षांसाठी वनवासाला गेला मग मनात कोणतीच आशंका राहणार नाही.    " हुं sss तू बरोबर बोलत आहेस." मंथरा म्हणाली.     निषादराज  नावेतून खाली उतरला तेव्हा एका सेवकाने विचारले," काय महाराज सर्व कुशल मंगल तर आहे ना ?"      निषादराज म्हणाला," कसले कुशल मंगल ? स्वामींनी मला वापस घरी पाठविले. मला असे जाणवते की माझं शर

रामायण भाग २० | Ramayana episode 20 | Author : Mahendranath prabhu.

इमेज
रामायण भाग २० | Ramayana episode 20 | Author : Mahendranath prabhu.      निषदराज त्याना गंगेच्या काठावर घेऊन आला.परंतु तेथे नावाडी नव्हता. म्हणून निषादराज मोठ्या ने ओरडून त्याला हाक मारू लागला.      " ए sss नावाडी दादा कुठं आहेस रे ?" नावाडी माणसाचे घर तिथं जवळच असल्याने तो आपल्या अंगणातून पाहू लागला कोण  आलंय ते. पण दुरून त्याला काही ओळखले नाही म्हणून तो पाहतच तिथं उभा राहिला. ते पाहून निषादराज म्हणाला," अरे पाहतो काय ये कडे ." असे म्हणताच तो नावाडी आपल्या पत्नीस म्हणाला ,' कोण आलंय कोण जाणे जाऊन पाहतो." असे बोलून पतवार ( व्हले ) उचलून गंगेच्या काठावर जायला निघाला. तोपर्यंत श्रीराम गंगेच्या पात्रात शिरले नि ओंजळभर पाणी हातात घेऊन गंगे मातेचे नाव घेऊन  गंगेचे पाणी गंगेलाच अर्पण केले नि गंगेला प्रणाम केला नि पुन्हा काठावर आले जिथे सीता लक्ष्मण आणि  निषादराज उभे होते तेथे आले नि निषादराज ला म्हणाले ," मित्र आमच्या मागे अजून किती पळापळ करणार आहेस ? आतापर्यंत आमच्यासाठी खुप कष्ट केलेस . आता आम्हाला निरोप द्या."     " कष्ट उलट आपण

रामायण भाग १९ | Ramayana episode 19 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग १९ | Ramayana episode 19 | Author : Mahendranath Prabhu.         निषादराज लक्ष्मण ला म्हणाला ," धन्य आहे तू आणि धन्य आहे तुझी माता जिने तुझ्या सारख्या करमवीर पुत्राला जन्म दिला. माझं तर हृदय फाटत आहे हे सारे ऐकून. कुठे ते चक्रवर्ती राजा दशरथ आणि मिथिला नरेश जनक नदंनीं सीता आणि लक्ष्मण सारखा दीर एका चक्रवर्ती राजाचे पुत्र आज वनात भटकत आहेत. गवताच्या बिछान्यावर झोपत आहेत. आपल्या सारख्या लोका सोबत असं घडू शकतं तर आम्ही तर एकदम सामान्य आहोत. आमचे काय हाल होतील याची कल्पना देखील करता येत नाही. हाय रे महाराणी कैकेयी हा तू काय अनर्थ करून बसलीस ? " तेव्हा लक्ष्मण म्हणाला,     " मित्र कोणालाही दोष देणे योग्य नाहीये. कारण भाग्यात जे लिहिलं असतं मनुष्या सोबत तेच घडतं."      " नाही लक्ष्मण दादा आम्हाला नाही कळत या साऱ्या गोष्टी ! आम्ही कदापि माफ नाही करणार महाराणी कैकेयीला." त्यावर लक्ष्मण काहीच बोलला नाही.     सकाळ होताच श्रीराम नदीत स्थान करून पूर्वेकडे तोंड सुरदेवला ओंजळीने पुष्प वाहतात. आणि लक्ष्मण श्रीरामाच्या पादुका ना आपल्या शेलाने पु

रामायण भाग १८ | Ramayana episode 18 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग १८ | Ramayana episode 18 | Author : Mahendranath Prabhu          श्रीरामांचा रथ जस जसा पुढे सरकत होता. तस तशी अयोध्येतील प्रजा देखील पुढे पुढे सरकत होती. आणि सतत श्रीरामाना विनंती करत होती. की आम्हाला सोडून जाऊ नका. जी अवस्था लोकांची झाली त्याच्या ही पेक्षा वाईट स्थिती महाराज दशरथांची झाली होती. आपल्या भवनात महाराणी कौशल्या सोबत बसल्या होत्या. महाराज दशरथ दुःखी अंतकरणाने  श्रीरामाचा जप करत होते. महाराणी कौशल्या ह्यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वहात होत्या. तीच अवस्था लक्ष्मणाच्या पत्नीची अर्थात उर्मिला नि माता सुमित्रांची होती. कोणीही कोणाशी बोलत नव्हते. श्रीरामाचा रथ नदीच्या किनाऱ्यावर येताच आर्यसुमन्त ने रथ थांबविला. आणि तशी पण संध्याकाळ झाली होती म्हणून श्रीराम सर्वांना उद्देशून म्हणाले," लोक हो , आता संध्याकाळ होत आली आहे तेव्हा तुम्ही आता इथून माघारी जा." त्यावर कोणीतरी म्हणाले ," आम्ही जाण्यासाठी आलेलो नाही. तेव्हा श्रीरामानी न समजून विचारले," म्हणजे ? तुम्ही आमच्या सोबत कुठपर्यंत येणार बरं ?" त्यावर कोणीतरी म्हणाले,"

छत्रपती शिवाजी महाराज ३७ | chhatrapati shivaji maharaj episode 37 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ३७ | chhatrapati shivaji maharaj episode 37 | Author :- Mahendranath prabhu         शरीफ जी राजे म्हणाले," आम्ही म्हणत होतो की लखुजी राजे आणि एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर काय करणार ? म्हणजे तशी वेळ येणार नाही म्हणा. कारण लखुजी राजे मोहीमे वरच नाहीत." शहाजी राजे म्हणाले," ते आताच कसं सांगता येईल ? मोहीमे चे काही सांगता येतं का ? कधी पण फर्मान निघू शकतं. आणि सामोरा समोर आल्यानंतर लढणे भागच आहे ना ?" पुढे     शहाजी राजे आणि लखुजी राजे समोरासमोर जसे आले तसे शहाजी राजे म्हणाले," संभाजी दादाच्या वेळी माझ्या हातात तलवार नव्हती म्हणून मारू शकलात संभाजी दादांना. आता पाहू या कोण वाचवायला येतो ते तुम्हाला." त्यावर लखुजी राजे म्हणाले," आम्ही पण हातात काही चुडा भरलेला नाही." असे म्हणून दोघांचे  तुंबळ युद्ध जुंपले. कोण कुणाला कमी पडत नव्हता. तश्या दोघीही माय लेकी किंचाळून उठल्या. अर्थात ते स्वप्न होतं. वेरूळ मध्ये जिजाबाई आणि सिंदखेड मध्ये म्हाळसा बाई दोघींना ही एकच स्वप्न पडले. झोपते वेळी दोघींच्या ही मनात एकच विचार सुरू होत

रामायण भाग १७ | Ramayana episode 17 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग १७ | Ramayana episode 17 | Author : Mahendranath Prabhu.                सीता महाराणी कैकेयी जवळ गेली नि म्हणाली, " माता मला वस्त्रे द्या आणि परिधान कशी करायची तेही शिकवा. महाराणी कैकेयी ने सीताला वस्त्रे दिली. तेव्हा मंथरा म्हणाली ," या सुनबाई , मी शिकविते तुम्हाला वस्त्रे परिधान करायची ती." असे तिला बाजूला घेऊन जात पुढे म्हणाली ," सुनबाई या मी तुम्हाला वस्त्रे घालायला शिकविते. सर्वात प्रथम तू ही राजवस्त्रे आणि अंगावरील अलंकार उतरवून ठेव." असे म्हणताच गुरुमाता म्हणाली ," सीता भले तू मुनिवेष धारण कर , परंतु आपल्या अंगावरील आभूषणे उतरू नकोस . एक स्त्री.साठी आभूषणे उतरविणे अपशकुन मानला जातो." त्यावर सीता म्हणाली ," जशी आपली आज्ञा गुरुमाता !" सीता त्या मंथरा सोबत गेली , तर दुसरीकडे अयोध्येतील सारी प्रजा राजभवनच्या द्वारावर एकत्रित पणे उभे असतात. प्रेजेचे म्हणणे होते की रामावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. कारण राम विना ही अयोध्या उजाडलेल्या बागे सारखी भकास दिसत आहे. तेव्हा आम्ही हा अनर्थ होऊ देणार नाही. आणि  जर का विरोध करू