पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र - २१

इमेज
कुरुक्षेत्र - २१                                  योगी निघून गेला. तो पुन्हा पाच वर्षानंतर आला आणि आपल्या आईला म्हणाला ," आई , तू आता चल माझ्याबरोबर ."      "  कुठं ? "      " आश्रमात."      "  कशाला ?"      "  पापाचे परिमार्जन करायला."      " पाप...    मी कुठे केले केलंय  पाप ?" मानसी आईने न समजून गोंधळून विचारले.      " देव दादाचे जीवन उद्ध्वस्त केलेस ते पाप नव्हे का ?" योगीने विचारले. तेव्हा मानसी आई दुःखभऱ्या स्वरात बोलली ," खरंय तुझं. मी तुझ्या बरोबर आश्रमात यायला तयार आहे. परंतु इथल्या सुरक्षा बद्दल काय ?कोण पाळत ठेवणार मोठीवर ? तुझ्या म्हणण्या प्रमाणे तिने अनेकदा धाकटी वर विष प्रयोग केला. मी सावध असल्यामुळे ती वाचली. त्यावर योगी म्हणाला ," बाळ जन्माला आलंय. तेव्हा आता इतक्यात काही होणार नाही. परंतु जे होणार आहे ते महाभयंकर होणार आहे." तेव्हा मानसी आई घाबरून म्हणाली," म्हणजे काय होणार आहे पुढे ?"      " ते इतक्यात सांगणे इष्ट नाहीये."      " का इष्ट नाहीये

कुरुक्षेत्र -२०

इमेज
कुरुक्षेत्र -२०          एवढ्या वर्षांची मक्तेदारी मोडीत निघते की काय अशी ही त्याच्या मनात भीती निर्माण झाली असावी. कारण आज एका मुलीने आपली टिंगल टवाळी केली. उद्या दुसरा कोणी तरी करेल आणि मग हळूहळू कॉलेज करू लागेल. नाही नाही.  काही करून त्या चेतनला धडा शिकवावा च लागेल. असा विचार करून तो  योग्य संधीची वाट पाहू लागला. चेतन ला रस्टिकेट करण्यासाठी त्यांनी वरून कॉलेज वर दबाव आणून पाहिला. परंतु कॉलेज मधील अत्यन्त हुशार विद्यार्थी असल्याने कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांच्या चेतनला पूर्ण  पाठींबा असल्याने  महेश चा  प्रयत्न फसला. म्हणून मग त्यांनी वेगळाच डाव रचला.     शालेय निवडणुकीत चेतन जिंकल्याने तो आपल्या मित्रांना हॉटेलमध्ये जंगी पार्टी देत होता. त्या हॉटेलमध्ये महेश ने आपल्या मित्रांसोबत येऊन राडा केला. चेतनच्या कानशीलावर पिस्तुल   ठेवून म्हणाला ,"  ज्याला कुणाला आपला जीव प्यारा नसेल त्यांनीच थांबायचे. बाकीच्यांनी इथून फुटायचे. "  असे त्यांनी म्हणताक्षणीच चेतन चे सारे मित्र त्याला  एकट्याला सोडून पळाले. कारण  कोणालाही लवकर मरायची   इच्छा नव्हती. तसा माया  खोचकपणे हसत म्हणाला ,

कुरुक्षेत्र -१९

इमेज
कुरुक्षेत्र -१९        मला  हुंदका आवरता आला नाही. मनात साठवलेले दुःख अश्रुधारा  माझ्या डोळ्यातून वाहू लागले.  माझ्या  डोक्यावरून हात फिरवत बाबा मला  म्हणाले  ," बाळ असे वेड्यासारखे नाही करायचे बरे.असे दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येत असते बरे.असे कुणी कुणासोबत जात नसतं बरं , म्हणूनच माणूस येतो ही एकटाच आणि जातो ही एकटाच. त्याच्यासोबत कोणी जात नाही. " किंचित थांबून दीर्घ श्वास घेत ते पुढे म्हणाले  ," पोरी , असे अविचाराने वागू नकोस. एवढेच सांगू शकतो मी तुला. येतो मी."  असे बोलुन ते निघुन ही गेले. तसा माझा पुत्र देव माझ्या जवळ येत म्हणाला ," आई , स्वतःला सांभाळ बरं.  अगं आई तू असे जर करू लागलीस तर आम्ही कुणाकडे  पहायचे  गं ? माझी आई तर माझ्या लहानपणीच मला सोडून  देवा घरी गेली. आईची माया काय असते ते मी अनुभवले नाही गं आणि कित्येक वर्षांनी तू माझ्या आईच्या रुपात या घरात आलीस. मला वाटलं की माझी आई मला पुन्हा मिळाली आणि आता तू ही मला सोडून जायची वार्ता करतेस. " देवाच्या या करुणामय  शब्दांचा माझ्या हृदयावर खोल  परिणाम झाला. माझं हृदय एकदम घायाळ झाले. मी आवेगा

कुरुक्षेत्र - १८

इमेज
कुरुक्षेत्र - १८          एके दिवशी काय झाले. त्यांच्या कुण्या जिवलग मित्राचा लग्नाचा वाढदिवस होता. पूर्ण परिवारासह येण्याचे आमंत्रण होते. परंतु देव ने काहीतरी निमित्त पुढे करून लग्नाला न  येण्याचे टाळत होते ; मी कसे टाळू शकणार होती. अर्थात लग्नाला जाणे भागच होते. आम्ही दोघेही जाण्याची तयारी करू लागलो होतो मी एक गुलाबी रंगाचा साडी नेसली आणि  चेहऱ्यावर मेकअप  करायचा होता म्हणून  मी आरश्या समोर बसून साज शुंगार  करत होती. तेवढ्यात तेथे देवचे बाबा आले नि माझ्या सूंदर रुपाला न्याहाळत म्हणाले,     " वाव ! आज काय फार सूंदर दिसतेस तू ,स्वर्गातल्या अप्सरा वाणी !" तशी मी हर्षभरित होत म्हणाली ," खरंच ?"     " हो ; पण एक कमी आहे."    " काय ?" मी न समजून विचारले. तेव्हा ते हसून म्हणाले,    " ह्या कपड्यावर डायमंड नेकलेस हार फार छान दिसेल."    " मग घेऊन या ना जरा. प्लिज !" मी एकदम हर्षभराने बोलली. तेव्हा त्यांनी मला विचारले ," कुठं ठेवला आहेस ?"     " तो काय माझ्या कपाटात सुरक्षित ठेवला आहे."     " त्याची

कुरुक्षेत्र १७

इमेज
कुरुक्षेत्र १७          बाबा दाखवतील तेवढ्या मुली नापसंतच करायच्या काही ना काही खोट काढायचीच त्यांच्यात. माझ्या प्रश्नाचे जसे मला  उत्तर मिळाले ,तशी मला झोप पण लागली.  सकाळी आईच्या हांकेने मी जागा झालो. डोळे किलकिले करून मी उघडले, तर समोर मानसी आई दिसली. ती माझ्याजवळ उभी होती. तिने मला विचारले ," आज ऑफिसला जायचा तुझा विचार नाही  का देव ? "  तेव्हा मी उत्तरलो ," जायचंय ना ? " तसे मानसी आईने विचारले ," मग केव्हा जाणार ? घड्याळात बघ किती वाजले ते ." मी समोर भिंतीवरच्या घड्याळात  पाहिले. सकाळ चे नऊ वाजून गेले होते. इतक्या उशिरापर्यंत मी कसा  झोपून मी राहिलो. याचाच  मला प्रश्न पडला ; परंतु लवकरच ध्यानात आले की रात्र फार उशिरापर्यंत जागल्याने सकाळी जाग आली नाही. मी लगेच अंगावरील पांघरून  एका बाजूला फेकले आणि घाईघाईने बाथरूम मध्ये शिरलो. स्नान आटोपताच अंगावर कपडे चढवले आणि बाहेर आलो. तोपर्यंत मानसी आईने डायनिंग टेबलवर नाश्ता आणून झाकून ठेवले होते. मी झटपट नाश्ता उरखले आणि लगेच ऑफिसला जायला निघालो . हॉल मध्ये बाबा वृत्तपत्र वाचत बसले होते . मला पाहताच ते म्हणाल

कुरुक्षेत्र १६

इमेज
कुरुक्षेत्र १६      कारण की पापाची  निशाणी होती. त्या हरामखोर धनंजय बीज होतं ते. त्याचा नाश झाला, हे एका अर्थाने चांगले झाले म्हणायचे. या नि:ष्पाप पापभिरू माणसाना फसविणे माझ्या जीवावरच आले  होते ;  पण त्याला नाईलाज होता माझा. आपला  मुख्य ध्येय साध्य करायचे म्हटले तर कुणाला ना कुणाला सुळावर चढविणे फार जरुरीचे होते आणि मी ते केले. त्यात माझा काय दोष आहे, असे मला तरी वाटत नाहीये. परंतु  माझे हे नाटक फार दिवस चालले नाही. त्यांना सत्य माहित पडलेच. कारण मला नमाज पडता येत नव्हते आणि त्यांचा धर्मग्रंथ मला वाचता ही येत नव्हता. कारण मी उर्दू शिकलेली नव्हती. मग त्याना माझा संशय आला असावा. मग मला ते लोक खोदून खोदून विचारू लागले. की ,तू कोण आहेस का आणखीन कुणी आहेस ते आम्हाला खरं काय ते सांग. आम्ही तुझ्यावर मुळीच रागावणार नाही."        मला  त्यांच्या समोर खोटे ही बोलता येईना. मग  मी त्यांना खरे काय आणि कसे घडले  ते सारे सांगून टाकले. तेव्हा सलीम चे वडील म्हणाले," म्हणजे इन्स्पेक्टर म्हणत होता तेच खरे होते तर ! ती बॉडी  दुसऱ्या कुण्या स्त्री ची नसून आमच्या सुनबाईची होती. अरेरे फार मोठा

कुरुक्षेत्र -१५

इमेज
कुरुक्षेत्र -१५          जेव्हा मला शुध्दीवर आली.  त्यावेळी मला पूर्वायुष्यातील काहीच आठवत नव्हते. मी इस्पितळात होते. माझ्या डोक्याला बँडेज केलेले होते. नि माझ्या समोर एक मुसलमान पेहराव केलेले एक मुसलमान जोडपे होते.  ४५ ते ५० वर्षांमध्य ले असावे.  त्यांचे म्हणणे होते की, मी त्यांची सून आहे . आणि मी माझ्या नवऱ्या बरोबर पुण्याला  आपल्या माहेरी गेली होती. तिथून येत असताना आमच्या गाडीला अपघात झाला. त्यात माझे पती आणि ड्रायव्हर दोघे ठार झाले .  फक्त मी तेवढी वाचली. पण मला कसे आठवत नाही. माझा स्मृतीभ्रश झाला होता का ?  मला माझे स्वतःचे नाव सुध्दा आठवत नव्हते . ते लोक मला सलमा या नावाने संबोधत होते. पुण्यावरून  माझे आई वडील , भाऊ ,बहिण, भावजय सर्वजण आले होते. पण मी कोणालाच ओळखत नव्हती. माझ्या सासऱ्यांचे नाव इब्राहिम शेख असे होते. त्यांच्या मुंबई मज्जीत बंदरला घाऊक कपड्याचे दुकान होते. आणि  स्वतःचा मोठा फ्लॅट होता. मला मुंबईतल्या मोठ्या प्रायव्हेट रुग्णालयात दाखल केले होते . अपघातात माझा पूर्ण चेहरा खराब झाला होता. म्हणून त्यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली. मला माझाच  म्हणजे सलमाचा चेहरा देण