पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

हे सारे तुझ्यासाठीच ८

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ८             पोलिसांनी विवेकला पोलीस कोठडीत बंद करून वाट पाहत बसले की विवेक पोलीस कोठडीतून बाहेर कसा जातो ते. जागता पहारा बसला. परंतु त्यांच्या योजने वर पाणी पडले. विवेक आपल्या जाग्यावरुन हललाच नाही. बसल्या जागीच झोपी गेला. त्याच वेळी राजेश आपल्या घरी भीतभित होऊन झोपला होता खरा. तेवढ्यातच त्याच्या कमरड्यात कोणीतरी घातली . म्हणून दचकून तो उठला. समोर सीमाला पाहताच त्याला कापरे भरले आणि तोंडून आवाज ही फुटत नव्हता. तसा सीमाचा आत्मा म्हणाला," काय झालं रे तुझी बोलती बंद का झाली ? तुझी वाच्या गेली की काय ?"      " तू...तू इथं का आली ?"     " तुला न्यायला आली."     " कुठं ?"     " स्मशानात."     " काय स्मशानात ?"     " माणूस मेल्यानंतर कुठं नेतात स्मशानातच ना ?"     " पण मी अजून मेलो नाहीये."     " मेला नाहीस तर आता मरशीलच त्यात काय ?"     " पण मला मरायचं नाहीये."     " मरायचं कुणालाच नसतं रे, पण मरावं लागतं ना ? जसं की मला मरायचं नव्हतं. पण तुम्ही लोकांन

हे सारे तुझ्यासाठीच ७

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ७        इन्स्पेक्टर विजय कदम पोलीस स्टेशनला आले. परंतु त्यांच्या डोक्यात तांत्रिक महाकाल ने म्हटलेलं शेवटचे वक्तव्य अजून ही त्यांच्या मनात घोळत होतं की तांत्रिक असं का म्हणाला असेल की आता तरी तुमची खात्री झाली ना ? ह्या प्रकरणात मी नाहीये. याचा अर्थ काय ? नाही म्हणजे  आम्ही त्याच्याकडे कोणत्या कारणासाठी  गेलो होतो हे त्याला कसे कळले ? नक्कीच काहीतरी इथं गोम आहे , पण कळणार कशी ? " किंचित विचारमग्न झाल्यानंतर एक उपाय सुचला. तो उपाय हा होता की तांत्रिक महाकाल वर नजर ठेवणे. तो रोज कुठे जातो नि  कोणाला भेटतो ? किंवा त्याला कुणी भेटायला येतात का ? आले तरी ती कोण माणसं असतात. ह्याची बारीक चौकशी करावी लागेल. असा विचार मनात येताच  त्यानी लगेच हा उपाय अमलात आणला. एका कॉन्स्टेबल ला साध्या वेषा मध्ये महाकाल च्या गुहेच्या बाहेर पहारा देण्यासाठी ठेवले आणि विनयच्या आई-वडिलांना फक्त दिलासा देऊन घरी पाठविले. परंतु अजून एक सुद्धा पुरावा सापडला नाही आणि ह्या केश चा छडा लावणार कसा ? परंतु सध्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते त्याच्याकडे. परंतु कुठून ना कुठून सुरुवात तर करावीच

हे सारे तुझ्यासाठीच ६

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ६            विलास चे आई-वडील पोलीस स्टेशनला पोहोचले नि त्यांनी आपला मुलगा अचानक बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली. इन्स्पेक्टर विजय ने त्याना विचारले की तुमचा मुलगा कुणा सोबत गेलास हे तुम्हाला  आठवते का काही ?" तेव्हा त्याची आई म्हणाली,     " हां काल त्याच्या एका मित्राचा फोन आला होता तो त्याच्या सोबत गेला."      " त्याच्या त्या मित्राचे तुम्हांला नाव वगैरे माहीत आहे का ?"      " हो आहे ना !"      " काय नाव त्या मुलाचे ?"      "  राजेश त्या मुलाचे नाव." तसे लगेच विजय कदम ने कॉन्स्टेबल हरीश ला इशारा केला की राजेश ला फोन लाव नि ताबडतोब पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांग." कॉन्स्टेबल हरीश ने राजेश ला फोन लावून त्याला ताबडतोब पोलीस स्टेशनला यायला सांगितले. आणि थोड्याच वेळात राजेश पोलीस स्टेशनला हजर झाला. तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने त्याला विचारले की, काल कुठं गेला होता तुम्ही दोघे ?" राजेशच्या आई-वडिलांना पाहून तो समजला. त्याने घडलेली सविस्तर हकीकत पोलिसांना सांगितली. ते ऐकून सर्वांच

महाकाल २

इमेज
महाकाल  २             कुणीतरी सुशीला बाईला माहिती दिली की बाजूच्या गुहे मध्ये कोणीतरी नवीन तांत्रिक बाबा आलाय तो दुखयारी लोकांचे दुःख दूर करतो. सुशीला बाईंनी विचार केला की जाऊन पाहायला काय हरकत आहे ? एके दिवशी सौंदर्याला घेऊन त्या त्या तांत्रिक बाबा कडे गेल्या. पाहतात तर काय पांढरी दाढी पंढरे केस, परंतु चेहऱ्या वरून तो म्हातारा आहे असं वाटत नव्हतं म्हणा. जाऊ दे कोणी का असेना, आपल्याला काय करायचंय ? असं विचार करून त्या बोलणार ,पण त्या अगोदर तो म्हणाला,    " बसा आई साहेब,चिंता करू नका. तुमची मुलगी सौदर्याला आम्ही लवकरच त्या आत्म्याच्या तावडीतून तिची मुक्तता करू ? मला माहित आहे तिला कोणत्या भुताने झपाटले आहे."     " कोणत्या भुताने झपाटले आहे महाराज ?"      " महाकाल ?"      " पण तो तर मेला ना ?"     " हो; पण मनुष्य मेल्यानंतरच भूत बनतं ना ?"     " पण तो आत्मा तर स्वतःचं नाव समंध सांगत होता."     " हां मग बरोबर आहे ना, समंध कोण बनतो तर ज्याच्या आत्मा अतृप्त असतो. आणि महाकाल चा आत्मा अतृप्त आहे, कारण तो तुमच्य

महाकाल १

इमेज
महाकाल १              हे सारं तुझ्यासाठी ह्या कथेचा शेवटचं थोडेसे जेणे करून ही कथा कोठे संपली होती हे कळण्यासाठीशीच बस्स !"    अजय ने महाकाल च्या   तोंडून ऐकले की तो स्वतः सौंदर्याशी लग्न करणार आहे, तर तो स्वतःवर काबू ठेवू शकला नाही आणि महाकाल चा गळा कापून त्याने महाकाल ची हत्या केली. त्यावर इन्स्पेक्टर विजय म्हणाले ," परंतु मला एक कळत नाही की त्याला मारायचेच होते तर एवढा उशीर का लावला ? म्हणजे मला म्हणायचंय की जरा अगोदर मारले असते तर धनराज आणि त्याच्या साऱ्या मित्रांचा प्राण वाचला असता ना " त्यावर अजय म्हणाला," त्याना या साठी वाचविले नाही की त्यांनी माझ्या ह्या (सीमा) मैत्रिणीवर बलात्कार केला नि तिला जीवानिशी ठार ही मारले. ते सारे गुन्हेगार होते. त्याना जगण्याचा काही अधिकार नव्हता. म्हणून त्याना मी वाचविले नाही." पोलीस सर्वजण आंत आले नि त्या सर्व मृतदेहाचे पोलीस पंचनामे केले नि सर्वांचे मृतदेह पोष्टमार्टम साठी सिव्हिल इस्पितळात पाठविण्यात आले. सौंदर्याला आणि  विवेक ला मुक्त करण्यात आले. त्यानंतर सर्वजण पोलीस स्टेशनला आले. विवेक आणि सौंदर्या ने अजयचे आभार मान

हे सारं तुझ्यासाठीच ५

इमेज
हे सारं तुझ्यासाठीच ५            सौंदर्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय चार दिशेला बांधून घातले होते. त्यामुळे तिला स्वतःचा बचाव करताच येणार नव्हता. थोड्या वेळाने तिच्या खोलीत धनराज च्या मित्राला जायला सांगितले. तेव्हा एकजण गेला ही आंत आणि थोड्याच वेळात एक जोरदार किंकाळी बाहेर पडली. तसे सर्वजण  त्या रूमच्या दिशेने धावले. आंत जाऊन पाहतात तर आंत ना सौंदर्या होती. ना तो धनराज चा मित्र विलास होता. दोघेही कुठं गायब झाली कुणास ठाऊक ? फार्म हाऊस चा कोणा कोपरा शोधला. पण त्या दोघांचा काहीच पत्ता लागला नाही. नेमके काय घडलं म्हणून सी सी टीव्ही कॉमेऱ्यातील फुटेज तपासून पाहिले. परंतु त्यातही काहीच आले नाही. हा काय चमत्कार आहे हे कुणाला कळेना. हे सर्व विवेक ने केले असे म्हणायचे तर विवेक अध्याप बांधलेल्या अवस्थेत होता. तेव्हा त्याला विश्वासराव देशमुखांनी दरडावून विचारले ," खरं सांग हा सारा  प्रकार काय आहे ? " विवेक म्हणाला ," मला खरंच माहीत नाहीये. हा सारा काय प्रकार आहे तो."      " तू असा सांगणार नाहीस. थांब तुझा आता मी खेळच संपवितो. " असे म्हणून  त्यांनी त्याच्या अंग

हे सारे तुझ्यासाठीच ४

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ४        " नाही हो साहेब , हे सर्व खोटं आहे."       " मग खरं काय आहे, ते तू मला सांग."       " मला खरंच काही माहीत नाही."       " साहेब हा असा बोलणार नाही, ह्याला पोलिसांचा खास ख्याका दाखविल्या शिवाय हा तसा बोलणार नाही." कॉन्स्टेबल हरीश बोलला.      " मग जा ह्याला घेऊन." त्यानंतर त्याला आंत घेऊन जातात आणि त्याची चांगलीच धुलाई करतात. परंतु त्याच्या तोंडून एकच वक्तव्य निघत असतं आणि ते म्हणजे मला मारू नका. मी खरंच निर्दोष आहे. परंतु पोलीस कुठलं ऐकून घेतात. तो मार खाऊन खाऊन बेशुध्द झाला. तसा कॉन्स्टेबल हरीश पोलीस कोठडीचा दरवाजा बंद करून बाहेर येतात नि इन्स्पेक्टर विजयला माहिती देत असतात. तेवढ्यातच विवेकचे वडील एका वकीलाला घेऊन आले सोबत जामीन चे कागदपत्र सुध्दा आणले. आणि ते कागदपत्र इन्स्पेक्टर विजय ला दाखविले. तसे इन्स्पेक्टर विजय ने ते जामीन चे कागदपत्र तपासून पाहिले नि कॉन्स्टेबल हरीश ला आदेश दिला की हरीश जा  आणि त्या विवेक ला घेऊन ये बाहेर . त्याची जमाणत झाली आहे."       "  पण साहेब विवेक .....पुढे बो