पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

पाऊले चालती पंढरीची वाट

इमेज
  पाऊले चालती पंढरीची वाट                  पाऊले चालती पंढरीची वाट राजाराम हे एक किराणा मालाचे व्यापारी होते.त्याना दोन भाऊ होते,एकाचे नाव शिवराम होते तर दुसऱ्याचे नाव सखाराम होते.शिवराम हा आपल्या मोठ्या भावाच्या पावलांवर पाऊल ठेऊन चालणारा होता,तर धाकटा भाऊ सखाराम हा आतल्या गाठीचा होता.आपल्या मनातील गोष्ट कुणाला सांगत नसे,परंतु दुसऱ्याच्या मनातील गोष्ट गोड बोलून कशी काढून घ्यावी हे त्याला चांगले जमायचे.राजाराम च्या पोटी पुत्र संतान नव्हतें,म्हणून ते फार दुःखी कष्टी होते. सर्व उपाय करून झाले, परंतु त्यांना काही मुलं झालं नाही, शेवटी कंटाळून त्यांनी संन्यास घ्यायचा ठरविले.आणि ही गोष्ट सर्वात प्रथम त्यांनी आपल्या आईला सांगितली.त्यावर त्यांची आई,म्हणाली," अरे,मुलच ना, होईल आज ना उद्या , एवढ्यात म्हातारा झालास का तू ? " त्यावर राजाराम बोलला," आई ,तू आता खोटी आस देऊ नकोस मला.मला आता कळून चुकले की मी आता बाप होऊ शकणार नाही. म्हणून मी संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे." " अरे,पण संन्यास घेऊन जाणार कुठं तू " त्यावर राजाराम बोलला, सर्व तीर्थ स्थानावर जाणार "

अपराधी कोण ? 4

इमेज
अपराधी कोण ? 4                       अपराधी कोण ?      पोलीस स्टेशनची बेल वाजली नि तसा खुर्चीवर बसून पेंगत असलेला इन्स्पेक्टर विशाल खडबडून जागा झाला नि रिसिव्हर उचलून कानाला लावत म्हंटले," हॅलो कोण बोलत आहे ?" त्यावर पलिकडून आवाज आला , की, कोण बोलत आहे हे फार महत्वाचे नाहीये. फक्त मी काय सांगतो. त्याकडे नीट लक्ष द्या. " त्यावर इन्स्पेक्टर विशाल बोलला,       " ठीक आहे सांगा."      " इथं कुण्या अज्ञात माणसाचा खून झाला आहे."      " इथं म्हणजे कुठं , तिथलं लोकेशन सांगा ."      " इथं एक रेल्वे स्टेशन आहे बघा."      " कोणतं रेल्वे स्टेशन ?"      " माहीत नाही. " असे बोलून लगेच फोन कट केला.       " डँमीट काय माणूस आहे हा ,अर्धवट माहिती देतो. असे स्वतःशीच बोलून ते कॉन्स्टेबल अजय कांबळे कडे पाहत बोलले,' अजय , ह्या नंबर वरून तिथलं लोकेशन काढ."      कॉन्स्टेबल अजय मोबाईल नंबर घेऊन सिमकार्ड कंपनीशी  संपर्क साधला. तेव्हा सिमकार्ड कंपनी कडून कळलं की आपल्या पोलीस स्टेशनच्या समोरच तर रेल्वे स्टेशन आहे

अपराधी कोण ? 3

इमेज
  अपराधी कोण ? 3      इन्सपेक्टर विशाल ने विचारले की, तू बेशुध्द कसा झालास ? तेव्हा कॉस्टेबल अजय कांबळे म्हणाला मी घरून निघालो आणि बाईक वर बसत होतो, तेव्हा पाठीमागून कुणीतरी माझ्या नाकाला क्लोरोफार्म लावला आणि मी लगेच बेशुद्ध झालो . त्या पुढचं मला काही माहीत नाही. इन्स्पेक्टर विशाल विचारात पडतात. की कोण असावा हा बरं ? तेवढ्यात पोलीस स्टेशनच्या समोर कुणीतरी बाईकवाला सीडी कॅसेट फेकून गेला. बाईकवाल्याचा चेहरा काही दिसू शकला नाही. कारण त्याने डोक्यात हेल्मेट घातलेली होती. परंतु त्या बाईकचा नंबर घायला मात्र तो कॉन्स्टेबल घ्यायला विसरला नहीं. आरटीओ ऑफिस ला फोन करून चौकशी केली असता असे समजले की तो नंबर अस्तित्वात ही नाही. त्यानंतर ती सीडी कॅसेट म्युझिक स्पेअरला लावली असता त्या सीडी कॅसेट मध्ये खुन्याने आपला आवाज रेकॉर्डिंग करून पाठविला होता. तो असा ," इन्स्पेक्टर विशाल तू व्यर्थच आपला अमूल्य वेळ वाया घालवितो आहेस. आणि तू ज्यां लोकांना  संशयी आरोपी म्हणून पकडले आहेस ते सर्वजण निर्दोषी आहेत. त्यांनी खून केलेला नाही. असली खुनी मी आहे. अर्थात  यमराज माझे नाव आहे. आणि हां  माझा उद्देश पूर्ण

अपराधी कोण ? 2

इमेज
अपराधी कोण ? 2         दुसऱ्या दिवशी दिवाकररावांचा मृतदेह त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला. परंतु त्यांच्या खुनाचे गूढ अजून उकलले नाही. कोण असेल बरं हा खुनी ? प्रत्येक अपराधी काही ना काही पुरावा मागे सोडतोच परंतु ह्या खुन्या ने एक पण पुरावा कसा सोडला नाही. इन्स्पेक्टर विशाल म्हणाले ," अजय त्या मोबाईल वर मिळलालेल्या ठशांचा रिपोर्ट आला का ? "     " आला ना साहेब ."     " कुणाच्या हाताच्या ठसे सापडले ?"     " साहेब , दिवाकरच्या हाताचेच ठसे आहेत."     " असं कसं होऊ शकते ? काहीतरी गडबड घोटाळा आहे."     " मला काय वाटतं माहिती आहे साहेब ?  खुन्याने हात मौजे वापरले असावेत."     " शक्यता आहे. तुम्ही एक करा. त्याचे बाकीचे जे पार्टनर आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलवून घ्या. आणि त्यांच्या कडून काही माहिती मिळते का बघा. म्हणजे एकट्या विनायकरावणाच मिटिंग बद्दल सांगण्यात आले ?  म्हणजे इतरांना का नाही सांगण्यात आले ?"     " मला काय वाटतं साहेब , तो त्या दिवशी गैरहजर असेल. आणि बाकीचे ऑफिसमध्ये हजर असती

अपराधी कोण ?

इमेज
अपराधी कोण ?       पोलीस स्टेशनची बेल वाजली नि तसा खुर्चीवर बसून पेंगत असलेला इन्स्पेक्टर विशाल खडबडून जागा झाला नि रिसिव्हर उचलून कानाला लावत म्हंटले," हॅलो कोण बोलत आहे ?" त्यावर पलिकडून आवाज आला , की, कोण बोलत आहे हे फार महत्वाचे नाहीये. फक्त मी काय सांगतो. त्याकडे नीट लक्ष द्या. " त्यावर इन्स्पेक्टर विशाल बोलला,       " ठीक आहे सांगा."      " इथं कुण्या अज्ञात माणसाचा खून झाला आहे."      " इथं म्हणजे कुठं , तिथलं लोकेशन सांगा ."      " इथं एक रेल्वे स्टेशन आहे बघा."      " कोणतं रेल्वे स्टेशन ?"      " माहीत नाही. " असे बोलून लगेच फोन कट केला.       " डँमीट काय माणूस आहे हा ,अर्धवट माहिती देतो. असे स्वतःशीच बोलून ते कॉन्स्टेबल अजय कांबळे कडे पाहत बोलले,' अजय , ह्या नंबर वरून तिथलं लोकेशन काढ."      कॉन्स्टेबल अजय मोबाईल नंबर घेऊन सिमकार्ड कंपनीशी  संपर्क साधला. तेव्हा सिमकार्ड कंपनी कडून कळलं की आपल्या पोलीस स्टेशनच्या समोरच तर रेल्वे स्टेशन आहे. तसे लगेच पोलीस रेल्वे स्टेशनच्या जव

यह इश्क नहीं आसान ४ (अमर प्रेम )

इमेज
यह इश्क नहीं आसान ४       " मग तुला तो होणारी बायको का म्हणाला ?"    " तो आणि त्याचा बाप तशी स्वप्न पाहतोय."    " पण चुलत भावाशी कसं लग्न ?"    " आमच्यात करतात. फक्त सख्खा बहिणी शी करत नाहीत."     " अरे बाप रे ! फार विचित्र प्रकार आहे हा !"     " विचित्र तर आहेच पण आपल्याला काय त्याच्याशी !"    " अग पण आपलं लग्न होऊ देतील का ते ?"    " निश्चितच नाही आणि तसं पण प्रेम करणाऱ्यांचे लग्न आई-वडिलांच्या समत्ती ने झाले आहे का ? नाही ना ? आणि झालं असलं तर क्वचितच ! आणि आपल्या दोघांचा तर धर्मच वेगळा आहे म्हटल्यावर इथं तर धर्मयुध्द सुरू होईल."     " याचा विचार मी केलाच नाही आधी !"     " नाही केलास ना, ते उत्तम झालं. आता आपण दोघांनी मिळून लढायचं आहे हे युध्द !"     " ते ठीक आहे, पण घरच्यांना कसं समजवायचं ?"     " आणि तुला काय वाटतं घरचे समजून घेतील आपल्याला ? कदापि नाही."      " मग काय करायचं म्हणतेस ?"      " समजावून पाहायचं समजले तर ठीक नाहीतर शे

यह इश्क नहीं आसान ३ (अमर प्रेम )

इमेज
  यह इश्क नहीं आसान ३     ते लोक निघून पण रुद्र बांधलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याला बाळाकडे पण धाऊन जाता आलं नाही. हळूहळू अंधार दाटू लागला होता. कोठेतरी लहान मुलांचा रडण्याचा आवाज त्याला ऐकू येत होता.तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला की ते रडणारे बाळ आपले तर नसेल ना ? पण क्षणभरच.लगेच दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात विचार आला की कसं शक्य असेल ? इतक्या उंचावरून खाली पडल्यानंतर बाळ वाचण्याची शक्यता तरी आहे का ? मग हे रडंतय ते बाळ कोणाचे असेल बरं ? असेल कोणाचे तरी किंवा आपल्याला तसा भास होत असावा. भास वरून त्याला चटकन आठवलं म्हणजे मनात एक शंका आली ह्या इमारतीत भूत बित तर नसेल ना ? कारण या कंत्राटदार लोकांचा काही नेम नाही. त्यांचे कोणी ऐकलं नाही तर एखाद्या बिगारी माणसाची हत्या करून गाडून पण टाकतात. त्यांचा काही नेम नाही.कारण अश्या घटना बऱ्याच ठिकाणी घडतात. बिल्डर आपली बिल्डिंग बांधून विकून मोकळा होतो नि मग रुम घेणारा मग पस्तावतोय. कारण ज्या माणसाची त्या रुम मध्ये हत्या झालेली असते. त्याचा आत्मा त्याच खोलीत भटकत असतो. आणि मग त्या रुम मध्ये राहायला येणाऱ्या ला माणसाला तो त्रास देऊ लाग