पोस्ट्स

हे सारे तुझ्यासाठीच लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

हे सारे तुझ्यासाठीच ९

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ९                      दुसऱ्या दिवशी सौंदर्या आपल्या घरातून गायब झाली नि विवेक आपल्या घरातून गायब झाला. विवेकच्या आई- वडिलांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविली. तेवढ्यात सौंदर्या चे आई-वडील सुद्धा आपली मुलगी गायब झाल्याची तक्रार करायला आले. तेव्हा इन्स्पेक्टर विजय कदम च्या द्यानात आले की कालच्या रात्री सीमाचा आत्मा पोलिसांना सांगून गेला होता की सौंदर्याला नि विवेक ला धोका आहे. परंतु कोणापासून ते मात्र सांगण्यास तिचा आत्मा तयार नाहीये. परंतु त्या आत्म्याचे कथन सत्य ठरलं. परंतु त्यांच्या घराच्या बाहेर पाहारा करायला ठेवलेल्या पोलिसांना कशी खबर लागली नाही की रात्री त्यांच्या फ्लॅट मध्ये काय घडलं ते. त्यांनी फोन करून त्या दोघांना ही पोलिसांना पोलीस स्टेशनला यायला सांगितले नि फोन कट केला. त्यानंतर त्या दोघांच्याही आई -वडिलांकडूनत्या दोघांच्या मोबाईल चे फोन नंबर घेतले नि नंबर डायल केले असता दोघांचेही मोबाईल स्वीच ऑफ असल्याचा मेसेज येत होता. म्हणून लास्ट लोकेशन चेक केले असता. त्या दोघांच्या घरातले निघाले. रात्री १२ वाजता याचा अर्थ रात्री ब

हे सारे तुझ्यासाठीच ८

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ८             पोलिसांनी विवेकला पोलीस कोठडीत बंद करून वाट पाहत बसले की विवेक पोलीस कोठडीतून बाहेर कसा जातो ते. जागता पहारा बसला. परंतु त्यांच्या योजने वर पाणी पडले. विवेक आपल्या जाग्यावरुन हललाच नाही. बसल्या जागीच झोपी गेला. त्याच वेळी राजेश आपल्या घरी भीतभित होऊन झोपला होता खरा. तेवढ्यातच त्याच्या कमरड्यात कोणीतरी घातली . म्हणून दचकून तो उठला. समोर सीमाला पाहताच त्याला कापरे भरले आणि तोंडून आवाज ही फुटत नव्हता. तसा सीमाचा आत्मा म्हणाला," काय झालं रे तुझी बोलती बंद का झाली ? तुझी वाच्या गेली की काय ?"      " तू...तू इथं का आली ?"     " तुला न्यायला आली."     " कुठं ?"     " स्मशानात."     " काय स्मशानात ?"     " माणूस मेल्यानंतर कुठं नेतात स्मशानातच ना ?"     " पण मी अजून मेलो नाहीये."     " मेला नाहीस तर आता मरशीलच त्यात काय ?"     " पण मला मरायचं नाहीये."     " मरायचं कुणालाच नसतं रे, पण मरावं लागतं ना ? जसं की मला मरायचं नव्हतं. पण तुम्ही लोकांन

हे सारे तुझ्यासाठीच ७

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ७        इन्स्पेक्टर विजय कदम पोलीस स्टेशनला आले. परंतु त्यांच्या डोक्यात तांत्रिक महाकाल ने म्हटलेलं शेवटचे वक्तव्य अजून ही त्यांच्या मनात घोळत होतं की तांत्रिक असं का म्हणाला असेल की आता तरी तुमची खात्री झाली ना ? ह्या प्रकरणात मी नाहीये. याचा अर्थ काय ? नाही म्हणजे  आम्ही त्याच्याकडे कोणत्या कारणासाठी  गेलो होतो हे त्याला कसे कळले ? नक्कीच काहीतरी इथं गोम आहे , पण कळणार कशी ? " किंचित विचारमग्न झाल्यानंतर एक उपाय सुचला. तो उपाय हा होता की तांत्रिक महाकाल वर नजर ठेवणे. तो रोज कुठे जातो नि  कोणाला भेटतो ? किंवा त्याला कुणी भेटायला येतात का ? आले तरी ती कोण माणसं असतात. ह्याची बारीक चौकशी करावी लागेल. असा विचार मनात येताच  त्यानी लगेच हा उपाय अमलात आणला. एका कॉन्स्टेबल ला साध्या वेषा मध्ये महाकाल च्या गुहेच्या बाहेर पहारा देण्यासाठी ठेवले आणि विनयच्या आई-वडिलांना फक्त दिलासा देऊन घरी पाठविले. परंतु अजून एक सुद्धा पुरावा सापडला नाही आणि ह्या केश चा छडा लावणार कसा ? परंतु सध्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते त्याच्याकडे. परंतु कुठून ना कुठून सुरुवात तर करावीच

हे सारे तुझ्यासाठीच ६

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ६            विलास चे आई-वडील पोलीस स्टेशनला पोहोचले नि त्यांनी आपला मुलगा अचानक बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली. इन्स्पेक्टर विजय ने त्याना विचारले की तुमचा मुलगा कुणा सोबत गेलास हे तुम्हाला  आठवते का काही ?" तेव्हा त्याची आई म्हणाली,     " हां काल त्याच्या एका मित्राचा फोन आला होता तो त्याच्या सोबत गेला."      " त्याच्या त्या मित्राचे तुम्हांला नाव वगैरे माहीत आहे का ?"      " हो आहे ना !"      " काय नाव त्या मुलाचे ?"      "  राजेश त्या मुलाचे नाव." तसे लगेच विजय कदम ने कॉन्स्टेबल हरीश ला इशारा केला की राजेश ला फोन लाव नि ताबडतोब पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांग." कॉन्स्टेबल हरीश ने राजेश ला फोन लावून त्याला ताबडतोब पोलीस स्टेशनला यायला सांगितले. आणि थोड्याच वेळात राजेश पोलीस स्टेशनला हजर झाला. तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने त्याला विचारले की, काल कुठं गेला होता तुम्ही दोघे ?" राजेशच्या आई-वडिलांना पाहून तो समजला. त्याने घडलेली सविस्तर हकीकत पोलिसांना सांगितली. ते ऐकून सर्वांच

हे सारं तुझ्यासाठीच ५

इमेज
हे सारं तुझ्यासाठीच ५            सौंदर्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय चार दिशेला बांधून घातले होते. त्यामुळे तिला स्वतःचा बचाव करताच येणार नव्हता. थोड्या वेळाने तिच्या खोलीत धनराज च्या मित्राला जायला सांगितले. तेव्हा एकजण गेला ही आंत आणि थोड्याच वेळात एक जोरदार किंकाळी बाहेर पडली. तसे सर्वजण  त्या रूमच्या दिशेने धावले. आंत जाऊन पाहतात तर आंत ना सौंदर्या होती. ना तो धनराज चा मित्र विलास होता. दोघेही कुठं गायब झाली कुणास ठाऊक ? फार्म हाऊस चा कोणा कोपरा शोधला. पण त्या दोघांचा काहीच पत्ता लागला नाही. नेमके काय घडलं म्हणून सी सी टीव्ही कॉमेऱ्यातील फुटेज तपासून पाहिले. परंतु त्यातही काहीच आले नाही. हा काय चमत्कार आहे हे कुणाला कळेना. हे सर्व विवेक ने केले असे म्हणायचे तर विवेक अध्याप बांधलेल्या अवस्थेत होता. तेव्हा त्याला विश्वासराव देशमुखांनी दरडावून विचारले ," खरं सांग हा सारा  प्रकार काय आहे ? " विवेक म्हणाला ," मला खरंच माहीत नाहीये. हा सारा काय प्रकार आहे तो."      " तू असा सांगणार नाहीस. थांब तुझा आता मी खेळच संपवितो. " असे म्हणून  त्यांनी त्याच्या अंग

हे सारे तुझ्यासाठीच ४

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ४        " नाही हो साहेब , हे सर्व खोटं आहे."       " मग खरं काय आहे, ते तू मला सांग."       " मला खरंच काही माहीत नाही."       " साहेब हा असा बोलणार नाही, ह्याला पोलिसांचा खास ख्याका दाखविल्या शिवाय हा तसा बोलणार नाही." कॉन्स्टेबल हरीश बोलला.      " मग जा ह्याला घेऊन." त्यानंतर त्याला आंत घेऊन जातात आणि त्याची चांगलीच धुलाई करतात. परंतु त्याच्या तोंडून एकच वक्तव्य निघत असतं आणि ते म्हणजे मला मारू नका. मी खरंच निर्दोष आहे. परंतु पोलीस कुठलं ऐकून घेतात. तो मार खाऊन खाऊन बेशुध्द झाला. तसा कॉन्स्टेबल हरीश पोलीस कोठडीचा दरवाजा बंद करून बाहेर येतात नि इन्स्पेक्टर विजयला माहिती देत असतात. तेवढ्यातच विवेकचे वडील एका वकीलाला घेऊन आले सोबत जामीन चे कागदपत्र सुध्दा आणले. आणि ते कागदपत्र इन्स्पेक्टर विजय ला दाखविले. तसे इन्स्पेक्टर विजय ने ते जामीन चे कागदपत्र तपासून पाहिले नि कॉन्स्टेबल हरीश ला आदेश दिला की हरीश जा  आणि त्या विवेक ला घेऊन ये बाहेर . त्याची जमाणत झाली आहे."       "  पण साहेब विवेक .....पुढे बो

हे सारे तुझ्यासाठीच ३

इमेज
हे सारे तुझ्यासाठीच ३           इन्स्पेक्टर विजय पोलीस स्टेशनला निघाले. जेव्हा पोलीस स्टेशनला पोहोचले. तेव्हा त्यांनी कॉन्स्टेबल हरीशला विचारले ," कुठं आहे ती मुलगी ? तिला घेऊन या इथं."     तेवढ्यात तिचे आई-वडील देखील पोलीस स्टेशनला हजर झाले. तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने त्याना विचारले की आपण कोण ?" तेव्हा मोहनराव म्हणाले ," ज्या मुलीला पोलिसांनी पकडून पोलीस स्टेशनला आणले आहे ना त्या मुलीचा  मी बाप !" तशी लगेच त्यांची पत्नी सुशीला बाई म्हणाल्या ," आणि मी तिची आई !" इन्स्पेक्टर विजय म्हणाले," ठीक आहे बसून घ्या."      " इन्स्पेक्टर साहेब , आमच्या मुलीने खरंच काही केलं नाही हो." इन्स्पेक्टर विजय म्हणाला ," मग चिंता कशाला करताय ? तुमच्या मुलीला आम्ही फक्त चौकशी साठी पोलीस स्टेशनला आणलं आहे, बस्स !" तेवढ्यात पोलीस कॉन्स्टेबल सुधा त्यांच्या मुलीला घेऊन येतात. तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने  तिला काही वाजवी प्रश्न विचारले. त्यानंतर तिला स्केच चित्र दाखवत म्हणाले ," या तरुणाला आपण ओळखता का ?" तिने ते स्केच चित्र पाहताच ल

हे सारे तुझ्यासाठीच -२

इमेज
   हे सारे तुझ्यासाठीच -२                         धनराजशी तिने चांगली दोस्ती केली. फक्त धनराजशी नाही तर त्याच्या मित्राशी ही तिने दोस्ती त्या सर्वांना अद्दल जी घडवायची होती. परंतु विवेक शी ती बोलत असताना  त्या लोकांनी तिला पाहिले. तेव्हा ते समजले की ही आपल्याशी नाटक करते. हिला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे. असा विचार करून ते खंडाळ्याला पिकनिक काढतात. गेल्या वर्षी एका मुलीला तिथे  नेऊन तिची इज्जत लुटून तिला खून करून फेकून दिले. तसे हिला ही गायब करण्याचा विचार होता त्याचा. परंतु घडले मात्र विपरीत. तिच्या ऐवजी तो स्वतःच गायब झाला. पोलीस तपास करत आहेत.   आता पुढे-   धनराज गायब होऊन दोन दिवस झाले तरी त्याचा पत्ता काही लागेना, मंत्री विश्वासराव ने पोलिसांना आदेश दिला होता की लवकरात लवकर माझ्या मुलाचा शोध घ्या. जर माझा मुलगा सापडला नाही तर तुमचंही काही खरं नाहीये. एकेकाची अश्या ठिकाणी ट्रान्सफर करीन की तिथून परत येणार नाहीत तुम्ही लोक." इन्स्पेक्टर विजय म्हणाला," साहेब तपास सुरू आहे." त्यावर मंत्री महोदय म्हणाले," ही उत्तरे तुम्ही दुसऱ्या ना द्या. मला नका देवू !&q