पोस्ट्स

स्त्रीविशेष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

बेवफा १२ | Unfaithful 12

इमेज
बेवफा १२        पुन्हा जर सुरभीच्या आसपास जरी दिसलास तर आपल्या पायावरून जाणार नाही घराला सरळ तिरडी वरून स्मशानात जाशील." असे बोलून त्यांनी मला सोडून दिले. पुढे प्रकाश     सुरभी च्या बॉडीगार्ड ने माझीही कंपलेट केली की मी सूर्भीच्या प्रियकराला भेटू दिले म्हणून. त्यामुळे सुरभीच्यां वडिलांनी म्हणजेच क्रांतीलाल शहा नि मला बोलावणे पाठविले. मी समजून गेलो की मला कशाला बोलविले असेल ते. मी गेलो त्यांच्या घरी तर त्यांनी मला भरपूर काही सूनविले. तेव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगून टाकले की जसे तुमच्या मुलीचे महाराष्ट्रीयन मुलाशी प्रेम आहे तसेच माझे एका महाराष्ट्रीयन मुलीवर प्रेम आहे, त्यामुळे मी तुमच्या मुलीचा पत्नी म्हणून मी कदापि स्वीकार करणार नाही." तेव्हा ते रागवत म्हणाले,    " हे अगोदर सांगायचं नव्हतं का ?"    " मी सांगितले होते माझ्या वडिलांना परंतु माझे वडील ही तुमच्या प्रमाणे पक्के बिजनेसमेन निघाले. त्यांनी फक्त व्यवहार पाहिला. आमच्या मनाचा कधी विचारच केला नाही. मग आम्ही का विचार करावा तुमच्या प्रतिष्ठेचा ? तुम्ही आम्हाला तुमची मुलं म्हणून जबरदस्तीने ल

बेवफा ११

इमेज
  बेवफा ११     " म्हणायला कशाला हवे , मला दिसत नाहीये का ? कसा वागतो आहेस तो आपल्या बायकोशी ? थोडीशी जरी शरम असेल ना, तुझ्याजवळ तर आत्ताच आपली सासरी जा तुझ्या मेहुण्याचे अक्सिडंट झालंय. चांगलेच निमित्त मिळालंय. सासुरवाडीला जा , मेहुण्याला पण बघून ये नि बायकोला पण भेटून ये, जमल्यास स्वता सोबत घेऊनच ये."असं आईने मला फर्मावले म्हणून मी बाईक घेऊन आलो तुला भेटायला."    " मग आलं तर  चांगलच झालं ना ? तुम्ही स्वतः मला भेटायला आल्यामुळे माझ्या आईच्या मनात ही आता संशय येणार नाहीये."   " मला अजूनही कळत नाहीये की मी जे केलं ते योग्य का अयोग्य ?" पुढे. ऋषी मी घरी जाण्याचा विचार करीतच होतो इतक्यात प्राचीच्या मॉम चां फोन आला नि त्यांनी मला आजची रात्री इथंच राहण्याचा आग्रह केला.मी नकार पण देवू शकलो नाही. आता राहणे भागच होते.मी मनात म्हटलं की आज ची रात्र तर इथं राहायचं आहे, त्यात राहू इतके दिवस सोबत होतोच ना, एका खोलीत मग तेव्हा काही झालं नाही आम्हा दोघां मध्ये तर एका रात्री ने काय होणार आहे ? असा विचार करून मनावर आलेले दडपण क्षणात दूर झालं.थोड्या

बेवफा १०

इमेज
बेवफा १०      " अगं मग एक फोन तरी करायचा होतास, मी किती घाबरले होते काय झालं नि काय नाही."    " चुकलं खरं आमचं. पण खरं सांगू मला काही सुचेनासे झालं होतं बघ. म्हणून तुला फोन करायचे विसरून गेले."     पुढे      मग मॉम ला एकदम आपल्या जावयाची आठवण आली तसे तिने विचारले," काय गं तू एकटीच आली ती ? नाही म्हणजे जावई सोबत आले नाहीत म्हणून म्हटलं." तेव्हा मी मनात म्हटलं की, मॉम आता तुला मी कसं सांगू की तुझ्या जावयाचे माझ्यावर नाही तर दुसऱ्या मुलीवर अफेर सुरू आहे. खरं तर मी त्या दोघांच्या मध्ये भिंत म्हणून उभी आहे, काही करून मला त्या दोघांच्या जीवनापासून दूर जायला हवं. अर्थात मला ऋषी सोबत घटस्फोट घ्यावा लागणार. परंतु हे तुला कसं सांगू ? कारण तुम्हा दोघांना दुःख तर होणारच आहे, आम्हा दोघी बहिणीच्या नशिबी असं का आलं ? काही कळत नाहीये. मी माझ्याच विचारात गुंग असलेली पाहून मॉम च्या मनात शंका आली तिने मला विचारलेच की, अगं मी काय विचारते आहे  ? कोणत्या विचारात गर्क झाली आहेस एवढी ?" मॉम च्या अचूक प्रश्नाने मी पूर्ती भांबावली म्हणजे काय उत्तर द्यावे हे मला चटकन स

बेवफा ९

इमेज
बेवफा ९             सर्वांना चहा नाश्ता दिल्या नंतर प्राची आपल्या सासू-सासऱ्यांची परवानगी घेऊन आपल्या आईच्या घरी निघून गेली. पनवेलच्या लोकल मध्ये बसली नि खिडकी जवळ बसली नि खिडकीतून बाहेर पळणाऱ्या झाडाकडे पाहत आपल्या गत जीवना विषयी विचार करू लागली.  की कॉलेज मध्ये असतांना मला एका मुलाने  प्रपोच केलं होतं पण मी त्याला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करत नाही तेव्हा माझा विचार तू आपल्या मनातून काढून टाक." त्यावर त्याने मला विचारले," पण तू का माझ्यावर प्रेम करत नाहीस ? माझ्यात काय कमी आहे."     " तुझ्यात काही कमी नाही रे, पण मला प्रेम करायला आवडत नाही."     " आश्चर्य आहे,तुला  प्रेम करायला आवडत नाही म्हटल्यावर."     " आश्चर्य तुझ्यासाठी आहे ते. माझ्यासाठी नाही."     " काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का ?"     " हो चांगलंच. मुलं अगोदर पूस लावतात आपल्या प्रेमात ओढतात नि आपलं काम झालं की होतात मोकळे. ती बसते नंतर रडत नाहीतर आत्महत्या तरी करते." आपण असं मी का म्हटलं ते त्यावेळी कळलं नसेल  त्याला. आपल्याला तरी तेव्हा कुठं

बेवफा ८

इमेज
बेवफा ८        ओशाळून म्हणाला ," सॉरी मला माफ कर, मी तुला सुरभी समजलो." बस हे त्याचे शब्द त्याला इगळी डसल्यावणी भासले. म्हणजे मघापासून तुम्ही मला सुरभी समजत होता की काय ?"  तेवढ्यातच समोरून रिक्षा आली त्या रिक्षेला हात दाखवून ती रिक्षा थांबविली नि त्यात दोघेही बसले नि रिक्षा निघाली खरे ! परंतु प्राची साठी मात्र कुठंतरी हरवल्यागत एकदम गुपचूप बसली होती. ती कळत नव्हतं की हसावे की रडावे ?" पुढे       रिक्षा थांबली. तेव्हा दोघेही रिक्षेतून खाली उतरले पण त्यांना आता प्रश्न पडला होता की घरी काय सांगायचे म्हणजे पावसात भिजले कसे म्हणून विचारले तर ? रात्रीचे अकरा वाजले होते. दरवाजा वरील बेल वाजताच ऋषींच्या आई ने दरवाजा उघडला. दोघांनाही  भिजलेले पाहून त्याच्या आई ने विचारले , अरे तुम्ही दोघेही भिजले कसे ?" त्यावर ऋषी म्हणाला," छत्री सोबत नेली नव्हती. अचानक पाऊस आला नि  भिजलो आम्ही त्यात काय ." " अरे मग कुठं तरी थांबायचं होतं आसऱ्याला. पाऊस जाईपर्यंत वाट पहायची होती. एवढी काय घाई होती येण्याची !"    " अगं आई , भर रस्त्यावर थांबणार कुठं

बेवफा ७

इमेज
बेवफा ७   " पण त्यासाठी बाहेर जाण्याची काय गरज आहे ?"    " कारण त्यांना कोणाकडून तरी असं समजलं आहे की आपल्या दोघांमध्ये पती पत्नी सारखे नाते नाहीये."   आता इथून पुढे    " काय सांगतेस ?"    " खरं तेच सांगतेय." प्राची उद्गारली. ऋषी ला एकदम टेंशन आलं की,   " मग आता काय करायचं ?" प्राची पण मुद्दामच म्हणाली, " त्यांच्या समोर नाटक तर करावं लागेल की आम्ही दोघेही आदर्श पती- पत्नी आहोत, तुम्ही समजता तसं नाहीये. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे." ऋषी शेवटी नाईलाजाने म्हणाला की ," ठीक आहे, चल जाऊ चित्रपट पाहायला." प्राची एकदम खुश झाली. तिच्या मना सारखे झाले. खरे तर ही आयडिया तिच्या सासू ने तिला दिली होती. काही वेळा पूर्वी म्हणजे तिचा नवरा ऋषी कामावरून येण्याच्या अगोदर तिच्या बेडरूम मध्ये तिची सासूबाई आल्या होत्या. त्या तिला म्हणाल्या," सुनबाई, जर तुला असं वाटत असेल की तुझा नवरा त्या सटवी ला विसरून तुझ्या जवळ यायला हवा असेल तर तुलाच  त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. " त्यावर प्राची ने न समजून विचारले,

बेवफा ६

इमेज
बेवफा ६           " निर्णय चुकला खरा, पण या पुढे तो सुधारायचा मी प्रयत्न करीन. अर्थात प्रकाश ला मी आपलासा करण्याचा प्रयत्न अवश्य करीन." सुरभी असं मुद्दाम म्हणाली. कारण तिला माहीत होतं प्रकाश चं दुसऱ्या मुलीवर अफेर सुरू आहे ते. आणि तिला पण त्याच्याशी कुठं संसार करायचा आहे,माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे माझं ऋषी ! मी दुसऱ्या कोणाची होऊ इच्छित नाही. परंतु ती हे ऋषी ला सांगू शकत नव्हती , म्हणून ती तशी बोलली.     " मग मीही प्रयत्न जरूर करीन. प्राची ला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा "    " व्हेरी गुड ! मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून." आता इथून पुढे    असे त्याने सुरभी ला आश्वासन दिलं खरं , पण त्याच्या मनात एकच विचार घोळत होता की प्रकाश सुरभी च्या भावनांशी खेळत आहे, त्याचं अफेर दुसऱ्या कुण्या मुलाशी आहे, पण हे सुरभी ला का कळत नाहीये. अचानक त्याच्या मनात एक विचार आला की, असं तर नाही ना ? सुरभी ने केवळ माझा प्राण वाचविण्यासाठी प्रकाश शी लग्न केलं असेल. हो असेच आहे, म्हणून तर तिच्या नवऱ्याचे अफेर दुसरीकडे सुरू असतानाही ती त्याच्या सोबत राहू इच्छित आह

बेवफा ५

इमेज
बेवफा ५     " बा, तुम्ही दोघांनी एकाचंच नाहीतर तीन तीन व्यक्तींचे जीवन उद्ध्वस्त केलात. केवळ आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी ! काय मिळालं तुम्हां लोकांना हे सगळं करून. कायमचं दुःखी करून टाकतात आम्हां साऱ्यांना. म्हणून आम्ही ठरविले आहे, तुमच्या इच्छेनुसार जगायचं. स्वतःची इच्छा नसताना." त्यावर त्या दोघी खजील झाल्या. कदाचित त्यांना वाटत असावे की खरंच आपलं काही चुकलं का ?"     आता इथून पुढे          सकाळी ऋषी घरी आला तर त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या बेडरूममध्ये जाण्यास रोखले नि विचारले,     " ऋषी , आपल्या खोलीत जाण्या अगोदर माझ्या प्रश्नःचे उत्तर दे."    " विचारा काय  विचारायचे आहे ते."    " तू रात्रभर होतास कुठं ?" त्याने सत्य सांगायचे टाळत म्हणाला," माझ्या एका मित्राने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला पाहायला इस्पितळात गेलो होतो." त्याच्या वडिलांना त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता. म्हणूनच की काय त्यांनी विचारले की , मित्राने आत्महत्या केली होती का मैत्रिणी ने ?"     " बाबा , तुम्हांला न

बेवफा ४

इमेज
बेवफा ४         मी ते नाईलाजाने मान्य केलं. ऋषी ला जीवदान तर मिळालं. पण अर्धमेला करून त्याला सोडून दिलं. म्हणून मग त्याला भेटायला इस्पितळात गेली ना तेव्हा मी त्याला खोटं खोटं सांगितले की माझं तुझ्यावर प्रेम कधीच नव्हते. वगैरे आणि त्याला ही ते खरे वाटले. हे विशेष. भले तो मला बेवफा समजेल. परंतु मी बेवफा नाहीये.     आता इथून पुढे       माझं तुझ्यावरच प्रेम आहे रे, परंतु तुझी मी होऊ शकत नाही. कारण माझ्या आई-वडिलांना ते मान्य नाही. म्हणून तुझा प्राण वाचविण्यासाठी त्यांनी पसंद केलेल्या मुलाशी लग्न करायला तयार झाले. खरं सांगायचं तर मला त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी त्याला एकांत मध्ये भेटून सांगितले की , माझं एका मुलावर प्रेम आहे तर तू माझ्याशी लग्न नकार दे म्हणून. पण तो निघाला पक्का बिजनेसमन त्याला फक्त आपला फायदा कसा होईल हेच पाहायचं असल्याने त्याने मला नकार दिला नाही तर उलट मला म्हणाला की , मला तुझा प्रामाणिकपणा फार आवडला. त्यामुळे मी तुझ्याशिच लग्न करणार, आणि डोन्ट व्हरी काही चिंता करू नकोस जोपर्यंत तू मला स्वीकारत नाहीस तोपर्यंत मी तुला स्पर्श देखील करणार नाही.