पोस्ट्स

वंशवेल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

वंशवेल ७

इमेज
वंशवेल ७             मिराबाई ना डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्या दीपक ला म्हणाल्या," तू आमचा मुलगा आहेस तर आमच्या सोबत चल."त्यावर दीपक म्हणाला , " आई , जरी तू माझी जन्मदाती आई असलीस तरी ती माझी पालनकर्ती  आई आहे, तेव्हा त्या दोघांना त्यांच्या  या वृद्ध अवस्थेत सोडून मी तुझ्याकडे कसा येऊ ?"      " म्हणजे तू आमच्याकडे कधी येणारच नाहीस का ?"      " येणार  ना ? तुझ्याकडे पण येईन परंतु कायमस्वरूपी तुझ्या कडे राहायला येणार नाही. वाटल्यास मी तुमच्याकडे येऊन जाऊन राहीन."      " म्हणजे जन्मदात्या आई-वडीला पेक्षा पाळणारे आई-वडील तुझ्यासाठी फार मोलाचे आहेत असेच म्हण की !"       " मी नदीत पडलो तेव्हा आई त्यांनीच माझा प्राण वाचविला ना अर्थात ते माझ्यासाठी मोलाचे राहणारच ना ? मी नदीत बुडून मेलो असतो तर आज तुला मी इथं दिसलो असतो का ? नाही ना ?" त्यावर पुरुषोत्तम उद्गारले ," बरोबर बोलतोय तो त्या माणसाने ह्याचा प्राण वाचविला म्हणूनच हा आज आपल्याला दिसतोय अर्थात आपल्या पेक्षा त्या लोकांचाच अधिकार जास्त आहे ह्याच्यावर ,जन्म देणाऱ्या पेक

वंशवेल ६

इमेज
वंशवेल ६           घरी आल्यानंतर त्याने आपल्या आईला सांगितले की आज मी एका मित्राच्या आईला ब्लडग्रुप ची गरज होती नि माझा ब्लडग्रुप त्याच्या आईच्या ब्लडग्रुप शी मँच करत होता म्हणून मी त्याच्या आईला माझं ब्लड दिलं परंतु मला हे कळत नाही की त्याची जर ती आई आहे तर त्याचा ब्लडग्रुप त्याच्या आईच्या ब्लडग्रुपशी मँच व्हायला हवाय ना ?"       " त्यात काय विशेष नाही. त्याचा ब्लडग्रुप त्याच्या बापाच्या ब्लडग्रुपशी मँच होणारा असेल. आईचा नि बापाचा सेम ब्लडग्रुप असणार नाहीये."                " अरे हां ,बरी आठवण केलीस. "        " कशाची आठवण ?"        " तुला एक सांगायचे राहिले. "        " काय ?"        " मी ज्याच्या आईला ब्लड  द्यायला गेलो ना तो सेम बाबा सारखाच दिसत होता. जणू तो बाबांचाच मुलगा."       तशी ती विचारात पडली. तेव्हा तिला आठवलं की तिचा सवतीचा मुलगा त्यांच्या मोटारला अपघात झाला तेव्हा तो नदीत पडला नि वाहून गेला होता. त्याचा मृतदेह सुध्दा सापडला नव्हता. अर्थात तोच तर हा मुलगा असेल ना ? नाहीतर सेम चेहरा कसा असेल ?

वंशवेल - ५

इमेज
वंशवेल - ५           पुरुषोत्तम आता दुसऱ्या पत्नीकडे जाण्याचे टाळत असत. परंतु  प्रत्येक महिन्याला लागणारा किराणा माल दोन्ही ठिकाणी सारखाच भरून देत असत. पैशांची गरज लागली की त्यांचा तो दत्तक पुत्र या घरी येई आणि बापाला चाकूचा धाक दाखवून पैसे घेऊन जाई ! स्वता मात्र काहीच करत नव्हता. फक्त उनाडक्या करणं आणि घरी येऊन दोन वेळचे जेवण गिळत असे. तो सरळ सांगायचा की तुम्हाला माझी गरज होती म्हणून तुम्ही मला आणलात मग आता पोसा मला आयुष्यभर ! " त्यावर कांताबाई त्याला समजविण्याच्या स्वरात म्हणे, अरे, पण आम्ही तुला लहानाचे मोठे केले याची तरी जाणीव ठेव." त्यावर बेधडक बोले की, काही उपकार नाही केले तुम्ही माझ्यावर , तुम्हालाच गरज होती म्हणून तुम्ही आणलेत मला. शिवाय तुमच्या अर्ध्या प्रॉपर्टीचा मालक आहे मी ! जसे म्हाताऱ्या ला काढलं ना घरातून तसे तुला ही काढेन. तेव्हा माझ्या कामात अजिबात दख्खल देऊ नकोस. काय म्हणतोय मी ?" कांताबाई मुकाट्याने हां म्हणाली.     त्यानंतर बरेच दिवसांनंतर मिराबाई आपल्या नवऱ्या सोबत कुठंतरी जात असताना मागून एका मोटारीने त्याना धडक दिली. नि मागे न पाहता तो सरळ पळून

वंशवेल -४

इमेज
वंशवेल -४          कांताबाई जेव्हा जास्तच हट्टाला पेटली तेव्हा पुरुषोत्तम उद्गारले ," प्रतीक्षा जेव्हा उपवर होऊन तिचे लग्न होईल तेव्हाच दत्तक मुलाचा मी विचार करीन. तोपर्यंत धीर धर." जशी प्रतीक्षा मोठी झली तशी ती त्यांच्या मागे लागली.की आता प्रतीक्षा उपवर झाली. तिचे आता लग्न करा. "       कारण प्रतीक्षा आता २२ वर्षाची झाली. पदवीधर पर्यंत शिक्षण झाले होते तिचे. त्यामुळे तिच्या शिक्षणानुसार तिला पदवीधर झालेलाच मुलगा हवा असा तिचा हट्ट होता. आणि आज काल क्वचितच मुलं पदवीधर होतात. नाहीतर H.H.c. झाली की लगेच टेक्निकल डिप्लोमा करून सरळ नोकरी पकडतात. त्यामुळे पदवीधर होण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. त्यामुळे लग्नाच्या वेळी प्रॉब्लेम होतो. कारण आजकाल मुलीचे शिक्षण जास्त असते. साहजिकच त्यांची इच्छा असते. आपल्या पेक्षा जास्त अथवा आपल्या एवढा तरी नवरा मुलगा शिकलेला असावा. त्यामुळे होते काय पदवीधर झालेला मुलगा मिळत नाही मग मुलीचे लग्न रकडते. आणि वय होऊन गेले की तिला स्थळं यायची बंद होतात. मग घोड नवरी होते. आणि एकदा का वय वाढलं की मग ती कुणा बरोबर पण लग्न करायला तयार  असली तरी नवरा

वंशवेल -३

इमेज
  वंशवेल -३                वंशवेल ३      पुरुषोत्तम सासरी जाण्याचा विचार करत होता ; तेवढ्यात ती स्वतःच येऊन थडकली. पुरुषोत्तम ने सुध्दा काही एक प्रश्न न करता घेतलं. परंतु कांताबाईला मात्र प्रश्न पडला की आपल्या नवऱ्या ने जर असे विचारले की शेवटी आलीसच नाक मुठीत घेऊन तर काय उत्तर द्यायचं वगैरे ? असा विचार करत होती. परंतु तिला योग्य कारण सुचत नव्हतं. पण पुरुषोत्तम तिला काही बोललाच नाही. तसा तिची धीर वाढला. आणि स्वतःहूनच म्हणाली ," मी स्वतः आली जास्त भाऊ नका. खरं म्हटलं तर मी येणारच नव्हती. परंतु आईच म्हणाली , जाऊ दे. पहिला अपराध  समजून माफ कर."     तसा पुरुषोत्तम उद्गारला ," हो , तुला काय स्वतःला हिटलर समजते. मनात येईल तसे वागायला ?"       " हो, हिटलरच आहे मी !"      " परंतु इथं हिटलरचे इथं कामच नाहीये. त्याने जर्मनीत जायला हवं."      " पुरे झाला हां हा फाजीलपणा . ऐकून घेते याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही पण बोलाल."      " त्यात फाजिलपणा कसला ? खरं आहे ते सांगितले."     " पुरे पुरे ! एवढं हिंनवायचं  कारण ना

वंशवेल -२

इमेज
वंशवेल -२                             वंशवेल २          दुसऱ्या पत्नीला वाटलं की आता सर्वस्व आपलाच नवरा ,परंतु तसे मात्र घडले नाही. पुरुषोत्तम संध्याकाळी कामावरून सुटला की सरळ पहिल्या पत्नीच्या घरी जाई. त्यामुळे त्याचे चहा-पाणी सारे काही तिथेच होई कधी कधी रात्रीचा डिनर सुध्दा पत्नीकडे होई. झोपायला मात्र दुसरीकडे जाई . तेव्हा त्याला विचारी की आज उशीर का घरी यायला तर काहीतरी थातुरमातुर कारण सांगून वेळ मारून नेई. असे करता करता कधी कधी रात्रीचा मुक्काम सुध्दा पहिल्या पत्नीच्या घरी होई. त्यामुळे तिला आता आपल्या नवऱ्याचा दाट संशय येऊ लागला. मग ते खरे आहे का खोटे हे पाहण्यासाठी मुद्दाम तिने पाळत ठेवली. म्हणजे घरी यायला उशीर झाला तसा ती आपल्या घरून निघाली मोठीच्या घरी यायला. पाहते तर काय खरंच आपला नवरा आपल्या सवती कडे आहे ,हे पाहून तिच्या तळ पायाची आग मस्तकाला भिडली. ती तशीच घरात शिरली. नि म्हणाली,     " हे तुमच्या मित्राचे घर आहे ना ?"     "  माझं जरा ऐकून तर घे."     " काही ऐकायचं नाही मला तुमचं. माझ्याशी खोटे बोलून माझ्या सवतीकडे येता तुम्ही !"

वंशवेल १

इमेज
वंशवेल १                              वंशवेल १     ( ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे फक्त त्यात थोडा बदल केला आहे,  त्याना फक्त एक मुलगीच होती मुलगा नव्हता. म्हणून त्यांनी अनाथालय मधून एक दत्तक मुलगा घेतला परंतु तो मुलगा इतका त्रासदायक ठरला की त्याना असं वाटू लागलं की का घेतला मी दत्तक पुत्र )      पुरुषोत्तम आंबेरकर हे एका बँकेचे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नीचे नाव मिराबाई होते. त्याना एक कन्या होती. मुलीचे नाव प्रतीक्षा असे होते. त्यानंतर त्याना एक मुलगा झाला.परंतु ते गणपतीच्या सणाच्या निमित्ताने ते आपल्या गावाला जात होते.मोटार स्वतः पुरुषोत्तम चालवत होते. पहाटेची वेळ होती नि त्याना झोप येत होती. झोप येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या तोंडावर पाणी मारले. तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली ,की झोप येत असेल तर मोटार कुठंतरी चांगल्या ठिकाणी उभी करा नि जरा झोप काढा." परंतु ते म्हणाले ," तोंड धुतले ना, उडेल ती आता ! " असे म्हणून ते मोटार पळवत होते. पुढे नदीचा पूल सुरू झाला. नदीच्या पुलावरून मोटार  जात असताना त्यांच्या डोळ्यांवर झापड आली नि स्टेरींग वरील ताब