पोस्ट्स

रोबोट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

रोबोट १४

इमेज
रोबोट १४           तेव्हा सरकारी वकिलाने विचारले की, त्या स्वाप्टस्वेअर चा माणसाला उपयोग काय ?" त्यावर जॉन म्हणाला," उपयोग आहे  तर  मला फारसं माहीत नाही. परंतु एवढं माहीत पडले होते की त्या स्वाप्टस्वेअर च्या मदतीनेच डॉक्टराना समजले होते की आपल्या भारतात कुठल्या दिशेने शत्रू येतोय नि त्याच्या कडे विनाशकारी कोणते हत्यारे आहेत ? कारण त्या मुळेच तर डॉक्टरांनी मुंबईला येणारे दहशतवाद्यांचे विमान त्यांनी  समुद्रात पाडीले होते. हे तुम्हांला ठाऊक तर आहेच. शिवाय काल पर्वा आलेले दहशतवादी  कुठे उतरले आणि कुठे कुठल्या शहरात त्याना बॉम्ब स्फोट घडवावचा आहे हे त्याना त्या रिपोर्टर स्वाप्टस्वेअर मार्फत समजले मग त्यांनी योजना आखली. मला बँकेत पाठविले आणि स्वतः सलीमला सोबत घेऊन ज्या ज्या ठिकाणी बॉम्ब लावले होते ते त्या ठिकाणी जाऊन शोधले नि तेच बॉम्ब पाकिस्तानच्या शहरात स्फोट घडवून आणले. बाकीचे सर्व तुम्हांला माहीतच आहे."     " मग आता डॉ. विश्वजित कुठे आहेत ?"     " ते आता कुठे असतील माहीत नाही."     " कसं माहीत नाही तुम्ही त्यांच्या सोबतच होता ना ?"  

रोबोट -१३

इमेज
रोबोट -१३                 त्यानंतर कोर्टात खटला दाखल करणयात आला आणि आरोपीला अपराधी पिंजऱ्यात उभे करण्यात आले. तेव्हा साबाजी ने गब्बरच्या विरोधात साक्ष दिली. तेव्हा गब्बर चिडून बोलला," अरे ,सांबा का खोटं बोलतो आहेस तू ?" त्यावर साबाजी म्हणाला," मी सांबा नाहीतर डॉ. विश्वजितचा  असिस्टंट जॉन आहे." असे बोलून तो आपल्या चेहऱ्यावरील नकली मुखवटा काढला तर खरोखरच नकली चेहऱ्याच्या आंत असली चेहरा जॉनचा होता."  ते पाहून गब्बर ओरडून म्हणाला," तू जॉन आहेस तर माझा भाऊ कुठे आहे ?" तेवढ्यात पो. इन्स्पेक्टर राणे एका कैदी ला कोर्टात हजर करत  म्हणाले , " न्यायमूर्ती महाराज हा बघा साबाजी उर्फ सांबा ." सर्वांच्या नजरा इन्स्पेक्टर राणेकडे वळतात." गब्बर त्याला विचारले की, तू कुठं होतास ? " तेव्हा पो. इन्स्पेक्टर राणे उत्तर देणार असतात. पण न्यायमूर्ती महाशय त्याना व्हीटनेस बॉक्स मध्ये येऊन बोलायला सांगतात. तेव्हा पो. इन्स्पेक्टर विरेंद्र राणे व्हिटनेस बॉक्स मध्ये येऊन सांगितले  की, ह्याला बॉडीलेसने माझ्या स्वाधीन केले नि सांगितले की हा गब्बरचा लहान भाऊ सा

रोबोट-१२

इमेज
रोबोट-१२              तोतया बॉडीलेस पुरता गोंधळला.  त्याला कळेना हा बॉडीलेस तर इथं आहे तर मग त्या दहशतवाद्याना अडविणार कोण ? शिवाय एकच माणूस  चार ही ठिकाणी कसा काय पोहोचू शकतो आणि हा जाहीर पणे कसे काय सांगू शक्यतो ? काही कळत नाही. आता उद्याच काय तर कळेल. चला आपलं इथलं काम संपलं.  खरं तर आपली पण हीच जफर खान यशव्ही होऊ नये आणि एकदा का जफर खानचा निकाल कागला की आपण पण सिंगापूरला जायला मोकळे. असा विचार करून तेथून सटकला. अचानक पणे आवाज बंद झाल्याने पोलीस सुध्दा कैद्यांना घेऊन पोलीस स्टेशनला निघाले.      दुसऱ्या दिवशी खरोखर वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या की पाकिस्तान च्या मुख्य चार शहरात बॉम्ब स्फोट झाले त्यात लाखोंच्या संख्येने मृत्यू मुखी पडले आणि  तेवढेच जखमी देखील झाले. त्यामुळे पाकिस्तान सरकारने दहशतवाद्याना दिसता क्षणीच शूट करण्याची ऑर्डर दिली. त्यामुळे आतंकवाद्याना पाकिस्तानातून पळ काढण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय उरला नाही.  काहीनी तर पाकिस्तातुन पळ काढून अफगाणिस्तान मध्ये आश्रय मिळविला तर काहींनी चीन मध्ये आश्रय घेतला. परंतु भारतात येण्याची हिंम्मत मात्र  कुणी करू शकले नाहीत

रोबोट -११

इमेज
रोबोट -११        " काय झाले , कुणाचा  आहे फोन ?"      " जफर खांनचा ?"      " मग बोल ना, त्याच्याशी ! फोन कट का करतोयस ?"      " पण काय बोलू ?"      " आधी फोन कशासाठी केलाय ते तर विचार."       होकारार्थी मान डोलवून फोन रिसिव्ह केला आणि म्हटले , "  हँलो sss ?      " हँलो के बच्चे सुनाई नहीं देता है क्या ? कब से फोन कर रहा हूं ?"      " क्यों कर रहे हो फोन ?"      " झक मारने के  लिए  साला बेवखुप कहिका ।"      " जफर भाय जुबान संभालकर बात करो।"      " सुन ."      " हाँ कहो ।"      " जितना जल्दी हो सके उतना जल्दी चले आना ।"      " क्यों ? और किस लिए ?"      " वो सब यहाँ आने के बाद बता दूँगा ।"      " कुछ धोका तो नहीं करोगे ना, हमारे साथ ?"      " अगर इतना डर लग रहा हैं, बॉडीलेस बन के आ जा ।"      " कोई जरूरी काम है क्या ?"      "  अगर जरूरी काम न होता तो तुम्हें  बुलाता क्या मैं  ?"      &q

रोबोट-१०

इमेज
रोबोट-१०           शेवटी मार खाणारा म्हणाला , " मला माफ कर मी चुकलो." तसा दुसरा म्हणाला," असं नेहमी म्हणायचं पण सुधरायचं मात्र नाव नाही. मी अनेक वेळा बजावून सांगितले होते ना तुला  की, तुझा भांडा फोड करायला मला फार वेळ लागणार नाही. तू कोण आहेस आणि कोणाच्या सांगण्यावरून हे तू करतोयस हे देखील मला माहितेय. परंतु  माहीत असूनही मी गप्प बसलोय का माहितेय . त्याला कारण एकच आहे आणि ते कारण म्हणजे  तुझ्या बॉस च्या ताब्यात असलेल्या डॉ. विश्वजित चा पत्ता  जोपर्यंत मला लागत नाही. तोपर्यंतच  मजा कर जेवढी करायची असेल तेवढी . बाद में रो ना ही है मरते दम तक ! चलो छोड दिया जाओ भागो यहां से और जाकर कहो अपने बुझदिल बाप से कि यह चूहा बिल्ली का खेल अब बंद करो  और जल्द से जल्द अपने बिल से बाहर आओ और हमसे मुकाबला करो और जितना हो सके  उतना आतंकवादियोंसे दूर रहो चूँकि वो तो न घर के होते है न घाट के उन हरामजादो को यह भी नही पता  हैं कि मरने के बाद मनुष्य को जन्नत नशीब होती हैं जहन्नुम यह किसे पता है  चूँकि मरने वाले कभी भी वापस नहीं आते है यह बताने कि मैं कहा हूँ ? और क्या कर रहा हूँ ,इसलिए मनुष्

रोबोट- ९

इमेज
रोबोट- ९           अगोदर रेणू निघून गेली नि आता बॉडीलेस ही धमकी देऊन निघून गेला. पण मला एक गोष्ट कळत नाही की , बॉडीलेस म्हणून हा जो कुणी आहे  त्याला मी दिसतो पण तो मला का दिसत नाहीये  हे कसं काय बुवा ? खरंच का पासवर्ड असतो का , प्रत्येक स्वाप्टस्वेअर ला ? असेल ही ! पण माझा पासवर्ड मला माहित नाही परंतु त्याला माहित आहे , हे कसं काय बुवा ? याचं खरं उत्तर जर कुणी देऊ शकेल तर आहे डॉ. विश्वजित कोल्हे , त्यांनाच विचारायला हवं .हो असंच करतो. आज आपल्याला आपला पासवर्ड माहीत नसल्याने  आपली फजेती झाली. पण हरकत नाही. पुन्हा नाही होणार अशी चूक. असा विचार करून आपल्या गुप्त स्थानी ज्यायला निघाला.           मंदिरातुन  रेणू  तेथून घरी जायला निघाली खरी. परंतु  मनात अनेक विचारांचे काहूर मांजले होते. त्यातील काही प्रश्न असे होते की, खरंच का ह्या भामट्या बॉडीलेस ने अनेक तरुणींना फसविले. आपल्याला तर वाटलं की हा फक्त नि फक्त आपल्यावरच प्रेम करतोय. परंतु ती आपली खोटी समजूत होती.  तरी बरं तो खऱ्या बॉडीलेसने त्याचे भांडे फोडले म्हणून बरे झाले. नाहीतर त्या भामट्याने अजून किती दिवस आपल्याला अंधारात ठेवले असते

रोबोट-८

इमेज
रोबोट-८       " पण का ऐकू मी तुझं ?    "  ऐकायला नाहीस तर तुझं खरं स्वरूप मी लोकां समोर आणीन. मग बैस तुरुंगात खडी फोडत ?"     " माझं काय काय  माहित आहे तुला ?"     " सर्वकाही. म्हणजे , तुझं नाव काय , काम काय , कुठून आलास ? आणि कशासाठी आलास ? हे सर्व माहीत आहे मला."     " पण तरी सुद्धा तू माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीस."     " पाहायचंय ?" असे विचारताच तो समजला की ह्याला जास्त आपण राग दिला तर कदाचित हा आपले खरे स्वरूप सर्वां समोर आणेल. छे ,छे ,छे !  असं होता कामा नये. नाहीतर जफर खान आपल्याला जो आता भाव देतोय तो या पुढे देणार नाही. त्या पेक्षा झाकली मूठ सव्वा  लाखाची उघडली की फुकाची म्हणतात ते खरंय." असा मनात विचार करून बोलला," मला हे कळत नाहीये. की , तुझा प्रॉब्लेम काय आहे ? का माझ्या मागे लागला आहेस तू ?" एकदम भाषा बदलेली पाहून बॉडीलेस उद्गारला," का मागे लागलोय ते सांगू ?"      " हो, सांग. " त्रागाने  बोलला .      " मग ऐक. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे , बॉडीलेस  हे नाव धारण करून जे लो

रोबोट-७

इमेज
रोबोट-७               बब्बर  जेव्हा  गुप्त स्थानावर  पोहोचला. तेव्हा त्याने पाहिले की, डॉ.  विश्वजित स्वाप्टस्वेअर बनविण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याना हवा तसा स्वाप्टस्वेअर बनत नाहीये. तसा बब्बर त्याना उद्देशून बोलला," डॉक्टर , या जन्मात तरी बनेल का बॉडीलेस." प्रयत्न तर सुरू आहेत. पण बनत नाहीये म्हणून तुला सांगितले होते की, त्या दोघांना शोधून आण म्हणून. पण तुला ते जमलं नाही त्याला मी काय करू ?" त्यावर तो बोलला," डॉक्टर , तुम्हांला खरंच काही आठवत नाहीये . का आठवत नसल्याचा बहाना करताय ?" तेव्हा डॉ. विश्वजित बोलले," असं वाटायचं कारण ? " बब्बर बोलला ," कारण असल्याशिवाय बोलत नाही मी ." तेव्हा डॉ. विश्वजित बोलला ," कारण तर सांग ."      " मला अगोदर हे सांगा की,  मागच्या वेळी तुम्ही किती बॉडीलेस बनविले होते ?"      " फक्त एक . "      " पण मला असं कळलं आहे की दोन रोबट होते. एक अड्यावर च कायम असायचा नि एक बळी च्या रुपात सर्व साथीदारां सोबतच असायचा."      " त्या बद्दल मला काहीच माहीत नाही. आय