पोस्ट्स

रहस्य/रोमांचक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षड्यंत्र ३०

इमेज
षड्यंत्र ३०      " बरं ठीक आहे .थोडी विश्रांती घेऊ नि मग पळू." म्हणून थोड्या वेळ विश्रांती साठी एका दगडावर बसले.पण तेवढ्यात चंदन चे साथीदार तिथपर्यंत येऊन पोहोचले. पळण्याचा प्रयत्न करत असताना त्या लोकांनी त्या तिघांना घेरले. मग ठरविले की आता ह्यांच्या शी लढायचेच.असा विचार करून त्यांच्याशी मारामारी सुरू केली.पण एकटा किती जनाशी टक्कर घेणार. शेवटी त्या तिघांना ही पकडकेच. तेवढ्यात तिथं चंदन मोटार घेऊन तेथे आला. त्या तिघांना मोटारीत घालून आपल्या घरी आणले. पूढ़े     बाबूराव चा एक साथीदार बाहेर उभा होता. त्याने पाहिले की चंदन त्या दोघांनाही सोबत घेऊन आलाय तेव्हा तो आंत मध्ये गेला नि त्याने बाबुराव ला चंदन त्या तिघांना घेऊन माहिती दिली तसा बाबुराव चंदनच्या आई ला नि बहिणीला घेऊन बाहेर आला. तिकडून चंदन ने मधुराबाई  प्रेम आणि लीला ला पाठवून दिले  नि इकडून बाबुराव ने चंदनच्या आईला नि बहिणीला त्याच्या कडे पाठविले . कोणी चलाखी करू नये म्हणून  दोघांच्या ही साथीदारांनी एकमेकांवर बंदुका रोखून धरल्या होत्या. प्रेम आणि मधुरा बाई बाबुराव जवळ येताच बाबुराव ने त्या तिघांना मोटारीत बसल

षड्यंत्र २९

इमेज
षड्यंत्र २९      " पोलिस शोधताहेत ना, शोधू दे त्यांना. तू इथच रहा.कारण मालकांनी मला तशी ऑर्डर दिली आहे.चल आंत हो मला बाहेरून दरवाजा बंद करायचा आहे." असे म्हणून त्याने प्रेम ला जबरदस्तीने आंत ढकलून दिले नि बाहेरून दरवाजा बंद करून घेतला. पूढ़े     बाबुराव तुरुंगात सुंदर रावांना भेटायला गेला आणि घडलेली सविस्तर माहिती त्यांना दिली तेव्हा सुंदर राव म्हणाले की,   " म्हणजे माधवी चे तू अपहरण केले नाहीस ?"   " नाही साहेब, माझ्या अगोदर दुसऱ्या कुणी पोहोचला तिथं आणि त्याने तिचे अपहरण केले."    " म्हणजे चोरावर मोर निघाला म्हण की !"    " हो तसेच काहीसे.पण आता पुढे काय करायचे ?"    " पुढे काय माधवरावा चां गेम करायचा. दुसरा काही पर्याय नाही आपल्या कडे."     " पण मालकीण बाई आणि प्रेम बाबू त्यांच्या कैदेत आहेत त्यांची सुटका केल्या शिवाय काय करू शकतो आपण ?"    " तू एक काम कर, त्याचा एक खास माणूस आहे,चंदन त्याच्या वर पाळत ठेव.तेव्हाच त्याचा अड्डा सापडेल."    " ठीक आहे , येतो मी !" असे म्हणून बाबुर

षडयंत्र २८

इमेज
षडयंत्र २८      " पप्पा माझ्या सासरच्या माणसांना कशापायी पकडले तुम्ही ? माझे अपहरण करणारा  दुसरा कोणीतरी आहे."    " काय म्हणतेस काय पोरी ?"पण तेवढ्यात पलीकडून संपर्क च तुटला.माधवराव फक्त हॅलो ss हॅलो च करत राहिले थोड्यावेळ. पण क्षणभर वेळाने एक भारदस्त आवाज कानी पडला की,   पुढे "  जे ऐकले तेच खरं आहे." त्यावर माधवराव चिडून म्हणजे की, तू आहेस तरी कोण ?" त्यावर तो म्हणाला," तेही लवकरच कळेल.चिंता करू नका, तुमची मुलगी एकदम सेफ आहे, मी तिला काहीही केलेलं नाहीये, उलट मी तिची फार काळजी घेतो तुमच्या पेक्षाही !" त्यावर माधवराव चिडून म्हणाले," अरे हे हिम्मत असेल तर समोर ये, नाही तुझे बोटी बोटी एवढे तुकडे करून कुत्र्याला  खाऊ नाही घातले तर नावाचा माधवराव नाही मी "    " कोणी सांगितले की तुम्ही नुसते माधवराव राहणार आहात म्हणून ? तुम्ही तर आमचे सासरे बुवा होणार आहात , मग तुम्ही आमचे कसे बरे तुकडे करणार , नाही म्हणजे तुमचीच मुलगी विधवा होईल ना हो, आणि जवान मुलीला कुणी विधवा करतं का ? नाही ना ? बघा हां आताच काय तो नीट विचार करा, आयु

षड्यंत्र २७

इमेज
षड्यंत्र २७      " तिला जिवानिशी मारू नकोस.तिला एका सुरक्षित ठिकाणी ठेव." तेव्हा अपहरण कर्त्या ने विचारले की, पण का ?" तेव्हा पलीकडून आवाज आला की आपली माधवी आपल्या दुश्मनाच्या ताब्यात आहे, तिला जर सहिसलामत ठेवायचे असेल तर लीला ला जिवंत ठेवायला लागेल." मग काय नाईलाजाने लीला चे डोळे बांधले नि पुन्हा मोटारीत कोबले नि निघाले. पूढ़े       माधवी मी अंधाऱ्या खोलीत फार वैतागली होती पण करणार काय ? मला कोणी kidnap केले होते हेच कळत नव्हते. आणि मी कोठे आहे तेही कळत नव्हते. मोबाईल सुध्दा नाही स्वतः जवळ आता पप्पा ना सूचना तरी कशी देणार मी कुठं आहे ते. काय करू ? कशी सुटका करून घेऊ स्वतःची तेही कळत  नाहीये. आणि ज्याने आपल्याला kidnap केलंय त्याचा ही  पत्ता नाही. भूक पण फार लागली आहे, पण काय करणार इथून बाहेर पडण्याचा मार्ग ही दिसत नाही. आपण शहराच्या कोणत्या स्थानी आहोत तेही कळत नाहीये. हा कधी येतोय मेला कुणास ठाऊक भुकेने जीव माझा खासाविस झाला आहे पण करू काय ? इथून बाहेर पडण्याचा मार्ग पण दिसत नाहीये. अश्या परिस्थिती मध्ये त्या हरामखोराची वाट पाहण्या व्यतिरिक्त दुसरं काय

षडयंत्र २६

इमेज
षडयंत्र २६        मधुराबाई तर नुसत्या भांबाहून  जाऊन सारे दृश्य पाहत होत्या. क्षणभर त्यांना कळलेच नाही काय करावं ते. पण नंतर भानावर आल्या तसे त्यांना जाणवले की आपला मुलगा इथं बेशुद्ध होऊन पडलाय नि सूनबाईचे अपहरण झाले आहे.पण हे सारे कोणी केले हे त्यांच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. प्रथम त्यांनी तिथे बघे म्हणून उभे असलेल्या लोकांच्या मदतीने प्रेम ला मोटारीत मागच्या सीट वर बसविले नि स्वतः ड्रायव्हिग सीट वर बसून मोटार रुग्णालयाच्या दिशेने पळविली. पुढे       इस्पितळात घेऊन जाई पर्यंत प्रेम शुद्धीवर पण आला. शुद्धीवर येताच तो इकडे तिकडे पाहू   लागला तसे त्याला जाणवले की आपण मोटारी मध्ये आहोत. तसे त्याला काही वेळा पूर्वीचे सारे दृश्य डोळ्या समोर दिसले तसे त्याने विचारले की लीला कुठं आहे ?" तेव्हा त्याची आई म्हणाली,"लीला चे कुणीतरी अपहरण केले आहे."  त्यावर प्रेम पटकन म्हणाला की, असं एकच व्यक्ती करू शकतो आणि तो म्हणजे माधवी बाप माधवराव ?"    " पण तुला असं का वाटतं की हे काम त्यांचेच असेल."    " दुसरा कोण आहे आपला दुश्मन ?"    " तेही खरंच

षडयंत्र २५

इमेज
षडयंत्र २५      " असा काय उपाय आहे,मला सांगा बरं." मधुरा बाईने विचारले.तेव्हा त्यांनी थोडक्यात आपलं प्लॅन सांगितले ; परंतु मधुरा बाईना ते प्लॅन जरा रिस्की वाटले शिवाय आपल्या सूनबाई ने का पलायन करावं ? आपल्या मुलाचं माधवी वर प्रेम नाहीये. तीचं आपल्या मुलावर प्रेम आहे. त्यात माझ्या मुलांचा दोष थोडीच आहे ? पहिलं तर वेगळे कारण सांगितले आणि आता वेगळेच काही सांगताहेत. ह्यांच्या वर विश्वास तरी कसा करावा ? आपली पत्नी सहमत नाही हे पाहून सुंदर राव गयावया करत म्हणाले," मधुरा कसं पण करून मला तुरुंगात जाण्यापासून वाचव गं, मला तुरुंगाची फार भीती वाटते गं , हे कसं कळत नाहीये तुला ?"    " हा विचार गुन्हा करण्या अगोदर करायचा असतो. अपराध केला आहे तर त्याची शिक्षा तर भोगायला लागणार ना ?"   पुढे   " म्हणजे तू निश्चय केला आहेस तर मला तुरुंगात पाठविण्याचा."    " मी तर म्हणते तुम्ही तुरुंगात जावून आपल्या पापाची शिक्षा भोगावीच , कारण माणसाला एक पाप पचविण्याची दुसरं पाप करावं लागतं त्यापेक्षा पहिल्या पापाच्या वेळी माणसाने आपल्या कर्माची शिक्षा भोगली

षड्यंत्र २४

इमेज
षड्यंत्र २४          वकील ने सुंदर रावांच्या  जमानत चे पेपर आणले होते. ते इन्स्पेक्टर तानाजी कडे दिले. इन्स्पेक्टर तानाजी ने जमानत पेपर नीट तपासले नि गृहमंत्र्यांच फोन आला होता, आम्ही आता त्यांना सोडणार च होतो. पण बरे झाले तुम्ही त्यांच्या जमानत चे कागदपत्र घेऊन आला ते. त्या पेपरवर सुंदर रावांच्या सह्या घेतल्या नि त्यांना सोडले.   पुढे         सुंदरराव ना माधवरावांनी आपल्या घरी बोलविले होते. म्हणून सुंदर राव सरळ त्यांच्या घरी पोहोचले. त्याना पाहून माधवराव म्हणाले," या सुंदर राव आम्ही तुमचीच वाट पाहत होतो." त्यावर सुंदर राव म्हणाले," हो म्हणून निरोप मिळताच ताबडतोब निघून आलो इकडे. अजून घरी देखील गेलो नाही."    " आता घरी जाऊन काय करणार आहात घरच्यांना कळले आहेत तुमचे कारनामे ."     " पण तुम्हाला माहित आहे ना, ते सर्व खोटे आरोप आहेत."     " असं तुम्ही म्हणता जग थोडी म्हणणार आहे? जगाने जे ऐकलं तेच खरे मानणार ना ?"     " पण लोकांना कसं कळलं ? नाही म्हणजे खटला अजून कोर्टात दाखल नाही झाला आहे."    " तो काय आज नाहीतर

षडयंत्र २३

इमेज
षडयंत्र २३        स्मिता ने ती डायरी  इन्स्पेक्टर तानाजी ला नेऊन दिली असता त्यांनी ती वाचून काढली नी मग इन्स्पेक्टर तानाजी ने पोलीस पथक घेऊन सुंदरराव सावंत च्या घरी गेले असता सुंदर राव सावंत ने विचारले की, इन्स्पेक्टर माझा अपराध काय तो तर कळू दे मला ." त्यावर इन्स्पेक्टर तानाजी हसून म्हणाले, " तुम्हाला माहित नाही की, तुम्ही काय अपराध केला आहे तो." असे सुंदर राव समजून गेले की, हा इन्स्पेक्टर आपल्या का शारदा बाईच्या खुना बद्दलच विचारत असावा. पण त्यांना हे माहित होतं की त्यांच्या विरुध्द ह्यांच्या जवळ कोणताही पुरावा नाहीये. परंतु पोलिसांना सवयच आहे की, अंधारात तीर मारायचा लागला तर लागला नाही तर नाही. बहुधा हाच प्रयत्न असावा ह्याचा . परंतु शारदा बाईंचा खून तर आपण केलेला नाहीये. मग आपल्याला घबरण्याचे काय कारण आहे ? असा विचार करून म्हणाले," म्हणजे अजूनही तुमचा संशय आमच्यावरच आहे  असं म्हणा की ! नाही म्हणजे तुमच्या मनाची अजून खात्री झाली नसेल तर मी येतो पोलीस स्टेशन ला बापडा ! पण मला माहित आहे की, ह्या वेळी सुद्धा तुमची निराशाच होणार आहे.  " त्यावर इन्स्पेक्टर