पोस्ट्स

यह इश्क नहीं आसान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

यह इश्क नहीं आसान १४ ( अमर प्रेम )

इमेज
यह इश्क नहीं आसान १४       सलीम दुसरे लग्न करणार हे समजल्यावर निलोफर खुश होते की आता आपल्याला तलाक मिळणार, परंतु सलीम तसे करत नाही हे पाहून निलोफर एके दिवशी सलीम ला म्हणाली," तू जर दुसरे लग्न करणार आहेस तर मला तलाक का देत नाहीस ?"     " तुला तलाक दिला तर ते तुझ्यासाठी फायद्याचे ठरेल. कारण तुला रुद्राशी निकाह करण्याचा मार्ग खुलेल.त्यामुळे तुझा फायदा होईल असे मी कोणतेच कार्य करणार नाहीये."     " अरे पण त्यात तुझं काय नुकसान आहे ? असं पण तू दुसरा निकाह करणारच आहेस ना, मग मला का बंधनात अडकवून ठेवू पाहतो आहेस ?"     " कारण तू माझी बेगम आहेस. आणि तुला तर माहीत असेलच की इस्लाम धर्मामध्ये आम्हां पुरुषांना चार निकाह करण्याचा अधिकार दिलेला आहे. असे पाक कुराण मध्ये लिहिलं आहे."     " हो, बरोबर आहे तुझं ; परंतु ते कोणाला ज्या पुरुषांमध्ये चार पत्नीचा खर्च उचण्याची क्षमता आहे, अश्याच पुरुषांना तो अधिकार दिलेला आहे. आणि ज्या पुरुषांना एकाच पत्नीचे पोट भरता येत  नाही त्यांनी दुसरा निकाह करू नये अर्थात एकाच ...

यह इश्क नहीं आसांन १३ ( अमर प्रेम )

इमेज
यह इश्क नहीं आसांन १३           सलीम फार खुशीत होता. त्याला वाटत असते की निलोफरला एकदा बाळ झालं की तिला आपला स्वीकार करावाच लागेल. तिच्या घरचेही सर्वजण खुश असतात. पण त्याना माहीत नाहीये की पुढे काय वाढून ठेवलं आहे ते. निलोफर प्रेग्नेंट आहे असे समजून तिला काही काम करायला देत नाहीत. निलोफर ला तेच हवं होतं. दिवसभर आपल्या खोलीतून बाहेर पडत नाही. फक्त आपल्या आईच्या घरी जाऊन आपल्या आई-बाबांना भेटून येते बस्स ! त्याप्रमाणे आज पण ती आपल्या आईला भेटायला आईच्या घरी गेली तेव्हा तिच्या आई ने विचारले की,  आम्ही जे ऐकलं ते खरं आहे का ? "     " काय ऐकलं आहेस तू ?"     " हेच की तू सलीम ला माफ केलेस नि आता त्याच्या बाळाची आई होणार आहेस."     " आई, तू ऐकलं आहेस ते खरं आहे, पण अर्ध्यसत्य आहे ते."     " म्हणजे ?"    " मी सलीम ला माफ केलेले नाहीये, फक्त तसे नाटक करते. राहिला प्रश्न त्याच्या मुलाची आई होण्याचा तर ह्या जन्मात तर ते शक्य नाहीये."     " म्हणजे तू प्र...

यह इश्क नहीं आसान १२ ( अमर प्रेम )

इमेज
     यह इश्क नहीं आसान १२        सलीम ला वाटले की , आपण जे केलं ते योग्यच केलं भले थोडे दिवस निलोफर आपल्याशी राग राग करेल परंतु एक ना एक दिवस  तिला माझा स्वीकार करावाच  लागेल.पण निलोफर ने कोर्टात आपल्या विरुद्ध खटला दाखल केला तर ! असा विचार मनात  येताच त्याचे मन एक अनामिक भयाने थरथर कापले. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर कोर्ट आणि आरोपी  पिंजऱ्यात स्वतः उभा आहे, नि सरकारी वकीलाने आपल्याला अपराधी ठरवून सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.हे ऐकताच त्याचे मन एकदम भीती ने थरथर कापले.नाही नाही मी काही नाही केलं.असा मोठ्या ने ओरडला तसा तो भानावर आला की आपण  स्वप्न पाहत आहोत ह्याची त्याला जाणीव झाली.तसा तो स्वतःशीच उद्गारला," नुसत्या स्वप्नाने आपली ही अवस्था झाली तर प्रत्यक्षात जर असं घडलं तर आपलं काय होईल.असा विचार मनात येताच तो स्वतःशीच उद्गारला," छे छे छे असं कदापि होता कामा नये.मग त्या साठी आपल्याला काय करावे लागेल.? क्षणभर विचारमग्न झाला. लगेच त्याच्या  दुसऱ्या मनाने उत्तर दिलं की तिची तू माफी माग. कारण माफी हा शब्द फार छोटा ...

यह इश्क नहीं आसान ११( अमर प्रेम)

इमेज
यह इश्क नहीं आसान ११         सलीम कुत्सित पणे हसत रुद्रा जवळ आला नि म्हणाला,    " आखिर तुम्हारे बीवी को मैंने अपना बेगम बना ही दिया अब वह तेरे पास कभी नहीं आएगी, जानते है क्यों ? नहीं मालूम है तो मैं बताता हूँ हमारे मुस्लिम समाज में तलाक देने का हक सिर्फ शौहर को है  बीवी को तलाक देने का हक नहीं है,  इसलिए निलोफर चाहकर भी मुझसे तलाक नहीं दे सकती , समझे इसलिए निलोफर को अब हमेशा के लिए भूल जाओ  !" त्यावर रुद्र म्हणाला," तुने भले ही निलोफर शी लग्न केलेस परंतु लवकरच  तुला प्रश्चात्ताप होणार आहे त्याचा. म्हणशील उगाचच लग्न केलं मी निलोफर शी !"     " असं होय मग बघतोच मी कोण प्रश्चात्ताप करतोय ते. मी का तू ?" असे म्हणून निलोफर चा त्याने हात पकडला नि तिला ओढतच घेऊन गेला. त्यानंतर सलीम च्या त्या भाडोत्री गुंडानी त्या सर्वाना सोडले. तेव्हा इब्राहिम म्हणाला," रुद्र बेटा, चिंता करू नकोस. निलोफर शी निकाह जोर जबरदस्तीने केला.अर्थात त्या निकाह ला समाज बिलकुल मान्यता नाहीये. मी हा प्रश्न जमातीत मांडणार आहे."     रुद्र आ...

यह इश्क नहीं आसान १० (अमर प्रेम)

इमेज
यह इश्क नहीं आसान १०          हा भाग वाचून तुम्ही नाराज व्हाल पण हा भाग लिहिणे गरजेचं होता कारण त्या शिवाय का त्या दोघांचे प्रेम अमर होतं हे सिध्द कसे करणार ना ? पण पुढे कथा वाचत जाल तशी ती तुम्हाला नक्की आवडेल. पुढ-      दुर्गाबाईंनी आंतून दरवाजा बंद करून घेतला .तो काही केल्या उघडत नव्हत्या. सर्वांनी आपापल्या परी ने समजावून पाहिले. पण त्या कोणाचेच ऐकायला तयार नव्हत्या. शिवाय त्यांनी अन्न पाण्याचा ही त्याग केला होता. त्यांच्या. मुलाने अर्थात विद्याधरपंतांनी त्यांना खूप विनवण्या केल्या. पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांचे म्हणणे एकच होतं आणि ते म्हणजे जोपर्यंत ह्या दुसऱ्या धर्माच्या  सुनेला  तू घरातून बाहेर काढत नाही. तोपर्यंत मी अन्न पाणी काहीच ग्रहण करणार नाही. " असे स्पष्ट शब्दात सांगितले आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मण समाजाने  सुध्दा त्यांच्या घरावर बहिष्कार टाकला. त्यांचं ही तेच म्हणणे ही तेच होते की तुम्ही दुसऱ्या धर्माची मुलगी सून करून घेतली नि धर्म बाटविला. असे सांगून त्यांनी मंदिरात पूजा करण्याचा अधिकार ही त्...

यह इश्क नहीं आसान ९ (अमर प्रेम)

इमेज
यह इश्क नहीं आसान ९            निलोफर चे लग्न रुद्र बरोबर ठरले. तेव्हा रुद्राला विचारण्यात आले की तुझ्या घरचे कोणी येणार आहेत का लग्नाला ?" तेव्हा रुद्र म्हणाला," माझा फक्त धाकटा भाऊ येईल लग्नाला." कारण रुद्राला माहीत असते की आपल्या घरचे कुणी येणार नाही. म्हणून घरच्यांना न सांगताच लग्न करायचं ठरलं. तेव्हा जफर खान ने विचारले ," तुझा निलोफरशी निकाह झाल्यानंतर तू राहणार कोठे ?" तसा इब्राहिम म्हणाला," माझ्याच घरी राहील, मी त्याला घर जावई करून घ्यायचा विचार केला आहे." तसा जफर खान म्हणाला," तू निर्णय घेऊन पण झालास मला न विचारता ?"      " त्यात विचारायचे काय ? मुलगी माझी आहे.आणि एकुलती एक आहे, तिचं लग्न झाल्यावर आम्हाला तरी दुसरे कोण आहे, म्हणून मी विचार केला की रुद्राला मी घर जावई करून घेतो." तेव्हा रुद्र म्हणाला," नाही पापा आम्ही दुसरीकडे कुठे तरी जाऊन राहू !"     " काय गरज आहे दुसरीकडे जाण्याची ? आपलं घर खूप मोठं आहे." इब्राहिम उद्गारला.     " पापा रुद्र योग्य तेच बोलतोय. मला रुद्र घर जावई झालेला नाही...

यह इश्क नहीं आसान ८ (अमर प्रेम)

इमेज
यह इश्क नहीं आसान ८         निलोफर म्हणाली," अगं माझ्या आजोबांनी माझं कॉलेज बंद केलं होतं ."     " का बरं ?" माली ने विचारले.     " माझं एका हिंदू मुलाशी प्रेम आहे म्हणून."     " मग आता कसं पाठविलं तुला कॉलेज ला ? म्हणजे आदि नकार होता तो आता होकार मध्ये बदली झाला का ?"     " त्याबद्दल मला माहित नाही, पण पप्पानी रुद्र ला आमच्या घरी बोलविले आहे."     " अगं याचा अर्थ त्यांचा होकार आहे." मीना उद्गारली     " ते काही माहीत नाही; पण पाहू ! खरं काय ते समजेलच संध्याकाळी." तेवढ्यात समोरून रुद्र पण येताना दिसला रुद्राला पाहून ती एकदम खुश झाली. मात्र रुद्राच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले होते. तो तिच्या जवळ आला तश्या तिच्या मैत्रिणी म्हणाल्या," बोला तुम्ही दोघे आम्ही वाट पाहतो तुझी वर्गामध्ये." तिच्या मैत्रिणी त्या दोघांना सोडून तिथून निघून गेल्या. तसा रुद्र तिला म्हणाला," तू कशी काय आज आलीस कॉलेज ला ? म्हणजे मला म्हणायचंय की तुझ्या आजोबांनी तुला मनाई केली होती ना, कॉलेज ला यायला." ...