पोस्ट्स

महाकाल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

महाकाल १०

इमेज
महाकाल १०     दुसऱ्या दिवशी खरोखरच सौंदर्या घर सोडून आपल्या आईच्या घरी निघून गेली तेव्हा तिच्या आईने तिला विचारले की , सौंदर्या , तू आज अचानक ....?"        " मला माहित आहे,तुला काय विचारायचं आहे ते. पण आता मी काही सांगण्याच्या मनस्थितीत नाहीये. थोडा मला रेस्ट घेऊ दे, मग सांगते तुला सर्वकाही !" त्यावर तिची आई तिला काहीच बोलली नाही. ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली. तश्या त्या समजल्या की हिच्या सासरी नक्कीच काहीतरी झाले असावे. लगेच काही सांगणार नाही. थोडा वेळ जाऊ दे, मग विचारू तिला काय झालं ते. असा विचार करून त्या गप्प राहिल्या. सौंदर्या सरळ आपल्या बेडरूम मध्ये गेली नि बेडवर पडून बिस्तर मध्ये नाक खुपसून मुसमुसत होती. थोड्या वेळाने तिची आई सुशीला बाई तिच्या खोलीत आल्या नि बेडवर तिच्या शेजारी बसल्या नि वात्सल्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारू लागल्या की काय झालं बाळ ? " तशी ती उठली नि आपल्या आईला बिलगली. थोड्या वेळाने तिने आपल्या आईला संपूर्ण सविस्तर हकीकत सांगितली. ते ऐकून त्या म्हणाली,    " त्याची ही हिंम्मत ? त्याला...

महाकाल ९

इमेज
महाकाल ९         राधाबाई इतक्या घाबरल्या होत्या की त्यांची हिंम्मत झाली नाही. आपल्या मुलाच्या बेडरूम मधून रडण्याचा आवाज कोणाचा येत आहे, परंतु तिची पूर्ण खात्री होती की तो आवाज सूनबाईचाच असावा. म्हणजे आपण स्वप्नात जे पाहिले ते खरे झाले की काय ? झाले तर बरेच आहे म्हणा. आपल्या मुलाची सुटका तरी होईल. असा विचार करून त्या झोपण्याचा प्रयत्न करत होत्या. शेवटी एकदाची झोप लागली. त्यामुळे सकाळी फार उशिरा उठले. तेव्हा त्यांनी घडाळ्यात पाहिले तर सकाळ चे आठ वाजले तरी सर्व शांत कसं ? इतक्यात सूनबाईंनी रडून सारे घर डोक्यावर घ्यायला हवे होते. परंतु असं काही घडल्याचे दिसत नाहीये काय कारण असावे ? सुनबाई ते भयानक दृश्य बेशुद्ध तर झाली नसेल ना ? पण छे बेशुध्द व्हायची असती तर रात्रीच झाली नसती का बेशुध्द ? असा विचार करून त्या किचनमध्ये जाऊन पाहतात तर किचनमध्ये सौंदर्या सकाळच्या नाश्ताची तयारी करत होती. ते पाहून त्याना आश्चर्य वाटले नि मनातल्या मनात त्या म्हणाल्या,    " अरे ही तर सहीसलामत आहे, हिला काहीच नाही,म्हणजे आपण रात्री जे पाहिलं ते सारं खोटं होतं का...

महाकाल ८

इमेज
महाकाल ८        राधाबाईंची आता पूर्ण खात्री झाली की भुताने आपल्या सूनबाईला पछाडले नाहीये तर आपल्या मुलाला पछाडले आहे. काय करावे ? कुणाकडे जावे नि आपल्या मुलाची त्या महाकालच्या आत्म्यापासून सुटका कशी करावी हे त्याना कळत नव्हते. गोपाळरावाना तर काहीही सांगून उपयोग नव्हता. कारण त्यांचे म्हणणे असे होते की त्या आत्म्यापासून जर आपल्याला काही त्रास नाही तर त्याच्या वाटेला आपण जायचंच कशाला ? तसे पण ते विवेकला  आपला मुलगा मानत नव्हते. त्याना वाटायचं की आपल्या समोर जो उभा आहे तो आपला मुलगा नसून महाकाल चा आत्मा आहे. परंतु राधाबाई एक आई होत्या. त्याचं मन काही ते मान्य करायला तयार नव्हते. म्हणून त्या यातून काहीतरी  मार्ग मिळतो का ? याचा त्या प्रयत्न करत होत्या. त्या शिवाय त्यांच्या मनात अजून एक भीती निर्माण झाली होती की आपल्या सुनेच्या पोटी जन्माला येणार मूल कोणाचे असेल ? वगैरे....   एके दिवशी  त्या आपल्या मैत्रिणी सोबत चर्चा करत असताना एका शेजारीण बाईची गावात राहणारी भावजय त्यांच्या कडे आलेली होती. गप्पा गोष्टी करताना सहजच म्हणून भुतांचा विषय न...

महाकाल ७

इमेज
महाकाल ७        राधाबाईना काही कळेना की कोणाचे खरे मानावे ? खरंच का माझ्या महाकाल ने झपाटले आहे का ? का ? झोपेत चालायची सवय आहे त्याला ? छे छे छे ! असं कसं होईल त्याला जर झोपेत चालायची असती तर त्यापूर्वी झोपेत चालला नसता का ? झोपेत जर चालायची सवय नसेल तर हा सासुरवाडीला कसा पोहोचला ? सुशीला बाईला त्या तांत्रिकाने सांगितले की माझ्या मुलाला महाकाल नावाच्या तांत्रिकाच्या भुताने झपाटले. असे जर असेल तर त्याने मला असं का सांगितले की तुमच्या सुनेला समंधाने झपाटले आहे. मला एक कळत नाहीये की तांत्रिक आमची दिशाभूल का करतोय ? त्या मागचा उद्देश काय असावा ? असं तर नाही ना ? त्या तांत्रिका च्या तोंडून दुसराच कोणी वदवतोय. नाहीतर आम्हां दोघींची दिशाभूल करतोय ? खरे काय आहे तेच  कळेनासे झालंय. काय केलं म्हणजे सर्वकाही ठीक होईल ? " असे म्हणून त्या किंचित विचारमग्न झाल्या. दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात एक विचार आला की आपण असं केलं तर ! म्हणजे दुसऱ्या एखाद्या तांत्रिका कडे चौकशी करू ? म्हणजे खरे काय आहे ते कळेल. असा विचार करून त्यांनी गोपाळरावांशी चर्चा  केली तेव्हा गो...

महाकाल ६

इमेज
महाकाल ६         रात्रीची जेवणे झाली नि सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. तशी सौंदर्या सुध्दा आपल्या खोलीत झोपायला गेली तेव्हा तिला राहून राहून एकच गोष्टीची चिंता होती की तांत्रिक महाराज जे म्हणाला ते खरंच खरं होईल का ? विवेक खरंच येईल का आपल्या घरी ? असा विचार करत सौंदर्या पलंगावर पडून विचार करत होती. विचार करता करता तिचा डोळा लागला. आणि थोड्या वेळाने खट्ट असा आवाज आला नि दरवाजा उघडला. तशी सौंदर्या ला पण जाग आली. भीतभित तिने हळूच डोळे उघडले. बेडरूम मध्ये काळोख असल्याने   एक काळी आकृती तिच्या जवळ येत असलेली तिला दिसली. त्या आकृती ला पाहून तिच्या पोटात  एक भीतीने गोळा उठला. काय करावे ते तिला सुचेना. इथून पळून जावे का इथंच थांबावे ? पण पळणार तरी कसं ? ती आकृती तिच्या अगदी जवळ आली होती. तशी तिच्या हृदयाची धडधड अधिक वाढली. तिला वाटले की आपण मोठ्या ने ओरडावे म्हणजे कोणीतरी मदतीला पळत येईल असा विचार करून  ती मोठ्या ने ओरडणार होती. पण त्या अगोदरच त्या काळ्या आकृतीने  तिच्या तोंडावर आपला एक हात ठेवला नि ती काळी आकृती उद्गारली , ...

महाकाल ५

इमेज
महाकाल ५             विवेक आपल्या बेडरूम जवळ गेला तसा दरवाजा आपोआपच उघडला. त्याने आंत प्रवेश करताच त्याचे पाय जागीच स्थिरावले. कारण समोरील दृश्य पाहून त्याच्या मनात अनेक विचार येऊन गेले ते असे,   " सौंदर्या कोणाशी तरी बोलतेय , पण कोणाशी ? कदाचित त्या समंधाशीच ती बोलत असावी. असं त्याला वाटलं, तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला की  पण समंध कसा असेल बरं ? तो तर तिच्या शरीरावर ताबा मिळवून बसला आहे ना, मग हा दुसरा कोण ? काही कळत नाही. मी जातो माघारी असा मनात विचार करून मागे वळला तसा त्याच्या कानावर एक आवाज पडला ," थांब चाललास कुठं ?"  तसा विवेक दचकला. कारण आवाज पुरुषाचा होता. त्याने झट्कन मागे वळून पाहिले. तर सौंदर्या चट्कन उठून बसत म्हणाली," अरे विवेक तू कधी आलास ?" विवेक पुरता गोंधळला. क्षणापूर्वी पुरुषी आवाज आला तो कोणाचा होता ? सौंदर्या च्या मुखातून तो बोलला का ? असेल ही कुणी सांगावे ? काही कळत नाही बुवा !" इतका विचार त्याच्या मनात येईपर्यंत सौंदर्या ने लगेच दुसरा प्रश्न केलाच. त्यांनी विचारले की, अरे असं का पाहतोस वेड्यासारखा !" विव...

महाकाल ४

इमेज
      महाकाल ४     सकाळी लवकर उठली नि बाजूला पडलेली आपली वस्त्रे उचलली नि आपले नग्न शरीर झाकले. नि प्रथ बाथरूम मध्ये गेली नि मनसोक्त  स्नान करून बाहेर आली आणि आरशासमोर उभी राहिली नि स्वतःच स्मित हास्य करत स्वतःच स्वतःचं अंग न्याहाळू लागली. देवाने अगदी सौंदर्याची मुक्त हस्ताने उघळण केली होती तिच्यावर.गोऱ्यापान नितळ रंगावर केवळ तिळाचेच गालबोट.बाकी  तिचे सौंदर्य म्हणजे निसर्गाने केलेले कोरीव काम. प्रत्येक अवयव साचेबद्ध होता. स्वतःच रूप न्याहाळत तिने स्वतःच आपला हात हळुवार आपल्या सर्वांगावरून फिरविला. इतक्यात तिच्यास मानेवर गरम उसासे जाणवले. तशी ती दचकली आणि तिने मागे वळून पाहिले तर विवेक अजून झोपलेला होता. तिच्या कमरेत कुणीतरी हात घातल्या सारखे जाणवले.तशी ती भयभीत होऊन विचार करू लागली की, म्हणजे त्याने अजून माझा पाठलाग सोडला नाहीतर  " तसा तिच्या कानात आवाज पडला," कसा सोडणार तू फक्त माझी आहेस !"     " म्हणजे रात्री सुध्दा....?"     " मीच होतो फक्त शरीर तुझ्या नवऱ्याचं."     " बाप रे , हे तर फार भयंकर...