पोस्ट्स

बॉडीलेस लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

बॉडीलेस १६

इमेज
बॉडीलेस १६            बॉडीलेसच्या नुसत्या आवाजाने तो घाबरला होता आणि तो समजून चुकला की,जर आपण बॉडीलेसचाआदेश मानला नाही तर तो आपला जीवच घेईल. म्हणून मुकाट्याने मोटार चालवत होता. तुरूंगातून दोन कैदी पळाले. ही खबर वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. खास करून विश्वजीत अचानक गायब झाला. ही खबर सर्वांना विस्मय चकीत करून सोडणारी होती. सोबत जफर खानच्या साथीदाराला नेले. त्यामुळे पो. इन्स्पेक्टर राणे समजून चुकले की बॉडीलेस नक्कीच जफर खानच्या अड्डयावर गेला असावा. हे  जसे ध्यानात आले तसे स्वतःच एक पोलीस पथक घेऊन जफर खानच्या अड्डयावर निघाला.     जफर  खान सेंट्रल जेल मधून जो पळाला तो थेट आपल्या अड्डयावर पोहोचला. जेव्हा त्याने सर्वांना सुरक्षित पाहीलं. तेव्हा त्याचा जीव भाड्यात पडला. त्याचा चेहरा भीतीने काळवटला होता. अजूनही त्याच्या चेहऱ्यावर भीती जाणवत होती. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या लहान भावाने त्याला विचारले," क्या हूआ भाईजान आप इतने डरे हुए से क्यों लगते है ?" तब जफर खान बोलला," कुछ नही छोटे जरासा डर गया था ?" न समजल्याने पाशा खानने विचारले," डर गये थे ?.......मगर किससे ?&qu

बॉडीलेस १५

इमेज
बॉडीलेस १५                             कोर्टात खटला उभा राहीला. कोर्टासमोर थोर सायटिंस्ट डॉ. विश्वजीत कोल्हे आणि त्याचा साथीदार जयचंद या दोघांना कोर्टासमोर उभे केले.        दोन्हीकडच्या वकीलानी आपापला परीने युक्तीवाद माडंला. कोर्टा समोर सादर केलेले पुरावे ते नीट तपासून पाहत न्यायाधिश म्हणाले," मि. विश्वजीत कोल्हे तुम्हांला तुमचा गुन्हा कबूल आहे का ?       " अजिबात नाही सर. "       " तुम्हाला कोर्टा समोर काही सांगायचं आहे का?"       " येस मिलार्ड !'       " परवानगी आहे. परंतु तुम्हांला जे काय सांगायचं आहे थोडक्यात सांगा. "        असे न्यायाधीशानी म्हटल्यानंतर विश्वजीत थोडक्यात सविस्तर वर्णन केले. ते ऐकल्यानंतर न्यायाधीश महाशय म्हणाले," मि. विश्वजीत कोल्हे बालपणी तुमच्यावर फार अन्याय झालाय, हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. परंतु याचा अर्थ असा मात्र कदापी होत नाही की स्वतःवर झालेल्या अन्याची शिक्षा इतर निर्दोष लोकांना द्यावी. कायदा आणि प्रशासन  ह्याना वेठीस धरावे  हे कदापी न्यायाचे नाहीये. तेव्हा तुम्हांला तुमच्या अपराधाची शिक्षा कोर्ट

बॉडीलेस १४

इमेज
बॉडीलेस १४              आपल्या खिशात टॅब नाही हे जसे समजले तसा बळीला एकदम धक्काच बसला. पण त्याचा आनंद मात्र त्या लोकांना फार झाला. पाशा एकदम खूष होत बोलला, " अरे ह्याच्या  खिशात टॅब नाही, म्हणजे ह्याच्या मदतीला बॉडीलेस येणार नाही. याचा अर्थ हा आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही. सच पुछो तो अब आयेगा मजा . बता, तेरा बॉस बॉडीलेस कहाँ है ?"         " मुझे नही पता. " बळी बोलला.         " और पता होगा भी कैसे ? जब कभी तुमने देखाही नही उसे ? और आज के बाद तो तुम उसे देखोगे भी नही क्योंकी तुम्हारे पास अब टॅब जो नही है ."असे म्हणून पाशा खान मोठ्याने हसला. " लेकीन छोटे .....यह कैसे पता चलेगा की अखिरकार  बॉडीलेस है  कौन  ?  और उस फार्म्युले का क्या  जो  हर किंमत  में हमे चाहिये था.  जफर खान ने खंत  व्यक्त केली. त्यावर सर्वजण विचारमग्न झाले. संधीचा फायदा घेत सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे हळूच बळीला बोलला," लवकर आठव ना टॅब कुठं ठेवलास ते ?"        " ठेवला नाही कुठे, खिशातून पडला मघाशी हाणामारी करत असताना . "        " म्हणजे इथंच कुठ

बॉडीलेस १३

इमेज
बॉडीलेस १३                      ठरल्या प्रमाणे पाशा आणि जफर खानची माणसं ठीक -ठिकाणी दबा धरून बसली होती. त्याच प्रमाणे बॉडीलेस गैंगची माणसं देखील त्यांच्यावर नजर ठेवून होती आणि त्या सर्वावर पोलीस पथकाची नजर होती. प्रत्येकाला वाटत असते की, आपणच सर्वांवर मात करू. असो-         सर्वजण समुद्र मार्गावरून येणाऱ्या दहशतवांद्याच्या जहाजाची वाट पाहत होते. पण जहाज येण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. वाट पाहून पाहून सर्वजण कंटाळलेच होते जणू ! एवढ्यात समुद्र किणाऱ्यापासून खूप दूरवर एक जहाज किणाऱ्याच्या दिशेने येताना दिसले. बहुधा ते जहाज दहशतवाद्यांचेच असावे. असा तर्क सर्वांनी केला असावा म्हणूनच की काय सर्वांनी पवित्रा घेतला. ते जहाज जसे जवळ आले. तेव्हा एक माणूस जहाजावरून टेळहणी करत असल्याचा दिसला. बहुधा किणाऱ्याला आपल्याला धोका तर नाही याचा अंदाज तो घेत असावा. असे त्याच्या हावभावा वरून वाटत होते. थोड्याच वेळात चार माणसं उतरताना दिसली. त्या लोकांना घेण्यासाठी काही माणसं पुढे सरसावली. त्याचक्षणी पोलिसांनी त्या सर्वांना गराडा घातला. पोलिसांना पाहून ते चारीजण पुन्हा जहाजाच्या दिशेने पळू लागले होते.  पण

बॉडीलेस १२

इमेज
बॉडीलेस १२             बॉडीलेसचा राईट हॅन्ड बळीला पकडण्याचा प्लॅन एका बाजूला पोलिसांनी बनविलेले असते तर दुसऱ्या बाजूला तेच प्लॅन पाशा आणि जफर खानच्या माणसानी केलेले असते आणि  तिसरीकडे बॉडीलेसने सुध्दा त्या दोघांच्या विरोधात प्लॅन केलेले असते की, पाशा आणि जफर खानच्या  माणसांकडून दहशत वाद्याची गोपनिय माहिती मिळवायची होती. त्यासाठी त्यानं आपली माणसं त्यांच्या मागे लावली होती. शेवटी सर्वांची गाठ मयुरबार मध्ये पडली. सर्वजण मद्यपान करण्यासाठी मयुरबार मध्ये शिरले. तेव्हा त्यांनी एकमेकांना पाहीले आणि खुष झाले. प्रत्येकला वाटत असते. की आपण आपल्या वैऱ्यावर मात करू या उद्देशानेच पाशाचा राईट हॅन्ड विक्रम लोहार उर्फ विकीदादा तो नावाप्रमाणे शरीराने मजबूत एखाद्या पहिलवाना सारखा ! पिळदार शरीर हनुवटीवर बारीकशीच पण कोरीव केलीली दाढी , मिशा , मात्र पल्लेदार किचिंत वरती वळलेल्या , राकट डोळे , त्याच्या डोळ्यांत पाहणाऱ्यालाच भिती वाटत असे. डोक्यावर मात्र एकपण केस नाही. अशी एकंदरीत त्याची वेशभूषा असते. तो उठून उभा राहात म्हणाला," या महाशय आम्ही आपलीच वाट पाहत होतो. " तेव्हा आपल्याला काहीच माहित ना