पोस्ट्स

प्रेमासाठी काहीही लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

प्रेमासाठी काहीही ७| मराठी ❤ स्टोरी, मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी

इमेज
प्रेमासाठी काहीही ७          मला माझ्या पहिल्या जीवना विषयी काहीच आठवत नाही. तेव्हा पोलिसांच्या द्यानात आले की मिराचा खरोखरच स्मृतिभ्रंश झाला आहे, मग त्यांनी तिला फार काहीही न विचारता. सोडून दिले. मग पोलिसांनी मोहन निर्दोष असल्याची सरकार ला दिली त्याची सुटका व्हावी अशी विनंती ही केली. आणि त्या  प्रमाणे मोहन ची निर्दोष म्हणून सुटका पण झाली. सूंदर आणि त्याचा मित्र मदन ह्या दोघांना पोलिसांची दिशाभूल केली म्हणून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा त्या मिळालेल्या मृतदेह वळविला. त्या बाईचा खून कोणी आणि का केला ?   आता इथून पुढे      तुरुंगातुन सुटून जसा मोहन बाहेर आला तर त्याच्या आई-वडिलांच्या सोबत राधा सुध्दा होती. राधाला पाहून त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला की ही इथं कशी ? मागे तर तुरुंगात मला भेटायला म्हणून आली नि भरपूर काही ऐकवून गेली आणि आता मी निर्दोष आहे हे समजल्यावर मला भेटायला आली आहे. जे नाते स्वतःच तोडून गेली ते नाते पुन्हा कशासाठी जोडायला आली आहे. ज्यांना आपल्या प्रेमावर अजिबात विश्वास नाही त्यानी प्रेम तरी का करावे कुणावर ?  असा मनात

प्रेमासाठी काहीही ६ | मराठी स्टोरी, मराठी कथा,मराठी शॉट स्टोरी, मराठी ❤ स्टोरी

इमेज
प्रेमासाठी काहीही ६         परंतु तिने पाण्यात उडी मारल्यानंतर तिचे डोके खरोखरच एका शिळेवर आपटले.ठरल्या प्रमाणे मदन ने तिला वाचवले.परंतु तिचा खरोखरच स्मृतिभ्रंश झाला. तिचा भाऊ जेव्हा तिला भेटायला आला तेव्हा तिने त्याला ओळखले नाही.उलट तिने विचारले ," आपण  कोण ? मी आपल्याला ओळखत नाही." हे ऐकून सूंदर तर दुःखी झाला. परंतु मदन मात्र खुश झाला. कारण ती पहिल्या जीवना विषयी सारे काही विसरली होती. पण गोष्ट मात्र  विचित्र घडली आणि  ती गोष्ट  म्हणजे मीराच्याच वयाच्या एका  मुलीचा मृतदेह मु नदीच्या तीरावर सापडला. परंतु त्या मृतदेवाच्या तोंडावर अनेक जखमा झाल्याने तो मृतदेह कोणाचा आहे हे कळायला  काही  मार्ग नव्हता. म्हणून पोलिसांनी मीरा च्या घरच्यांना बोलविले तेव्हा सुंदर ने त्या गोष्टींचा फायदा घायचा  ठरविला आणि तो मृतदेह मीरा चाच आहे, असे सुंदर ने सांगितले. परंतु पोष्टमार्टम मध्ये तिचा गळा घोटून तिला ठार मारल्याचे सिध्द होताच सूंदर खुश तर झाला. परंतु तिच्या गळ्यावर कोणाच्याही हाताचे ठसे न सापडल्याने मोहन निर्दोष सुटेल असे वाटले सुंदरला. परंतु ती मुलगी तीन महिन्यांनी प्रेग्नेंट असल्याचे

प्रेमासाठी काहीही ५

इमेज
प्रेमासाठी काहीही ५     " अरे देवा , आता तूच काहीतरी चमत्कार कर बाबा.आणि कसं ही करून माझ्या मुलाची निर्दोष सुटका कर. पांढुरंगा तूच आमचा वाली रे आता !"     माणूस पण फार विचित्र प्राणी आहे पहा ! म्हणजे सुखात कधी देव आठवत नाही त्याला.पण दुःख आले की देवा धाव ! जणू देव त्यांच्या नोकरच आहे.दिवसातून एकदा तरी श्रद्धेने देवाचे नाव घेतलं तरी पुरेसे आहे.परंतु तेवढा ही वेळ नाही लोकां जवळ.हां मोबाईल वर गेम खेळण्यासाठी मात्र  खूप वेळ आहे.मग तो भूक तहान देखील विसरतो. एवढा मग्न होतो तो खेळामध्ये ! तेवढा मग्न ईश्वर नामात मग्न झाला तर कल्याणच होईल को त्याचे ! असो आता पुढे काय ते पुढच्या भागात वाचा मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.आपल्या कमेंट म्हणजेच आपल्या सारख्या वाचकांकडून आम्हाला मिळालेले पारितोषिक आहे.     आता मात्र मोहनच्या द्यानात आलं की आपल्याला मुद्दामहून ह्या केस मध्ये अडकवू पाहतोय पण कोण? मी कोणाचेच काही वाईट केलेलं नाही. आणि माझं कोणाशी वैर ही नाही मग माझ्याशी असं कोण आणि का वागतोय. काही कळत नाही.मोहन एकदम चिंतेत होता. तर दुसऱ्या सूंदर फार खुश होता. लवकरच त्यांच्य

प्रेमासाठी काहीही ४

इमेज
प्रेमासाठी काहीही ४     राधा निघून गेल्यानंतर मोहन स्वतःशीच विचार करू लागला की ती डेटबॉडी मीराचीच तर नसेल ना ? म्हणजे मी समजतोय तसं नसेल तर ? म्हणजे मीरा खरंच प्रेग्नेंट होती का ? जर प्रेग्नेंट होती तर तिने मला तसं सांगितले कसे नाही ? शिवाय  ती प्रेग्नेंट झाली कशी ? मी तिला स्पर्शच केला नाही तर ! छे, छे , छे ! मी  भलताच काहीतरीच विचार करतोय आपला ? ती प्रेग्नेंट कदापि नसेल ? मग तिने स्वतःच्या भावाला  खोटं का सांगितलं ? ती प्रेग्नेंट आहे आणि ती पण माझ्यापासून.तिचा भाऊ म्हणजे सूंदर खोटं तर बोलत नाहीये ना ? छे छे छे ! तो खोटं का बोलेल ? जर तो खोटं बोलत नाहीये आणि मीही खोटं बोलत नाहीये. मग खोटं कोण बोलतेय ? " किंचित विचारमग्न झाला. तशी त्याच्या डोक्याची ट्यूब पेटली. तसा तो स्वतःशीच बोलला की मग मीराच खोटी बोलत आहे. पण प्रश्न असा पडतोय ती का खोटं बोलत आहे नि कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे ? असं तर नसेल तिचा कुणीतरी बॉयफ्रेंड असावा आणि त्याने तिला धोका दिला असावा. तिच्याशी  लग्न करावे लागेल म्हणून तो पळून गेला असावा. आणि तिच्या पुढे दुसरा काही पर्याय नसल्याने आणि आपला भा

प्रेमासाठी काहीही ३

इमेज
प्रेमासाठी काहीही ३      पोलीस पथकाने नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी लोकांकडे चौकशी केली; परंतु मिराच्या कुठंच सुगाव लागला नाही.मोहन ने अगदी बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगितले की मी काहीच केलं नाही. परंतु पोलिसांनी त्याचे काहीच ऐकून घेतले नाही. त्याला पोलीस कोठडीत डांबून ठेवले. पोलिसांनी नदीच्या किनाऱ्यावर कोळीवाडा मध्ये चौकशी केली.परंतु कोणालाही नदीत वाहणारे प्रेत दिसले नाही किनाऱ्याला लागलेले दिसले. आणि एक दिवस अचानकपणे नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी लोकांना पोलिसांना खबर दिली की एका स्त्री चा मृतदेह किनाऱ्यावर सापडला. पोलिसांचे एक पथक खबर दिलेल्या ठिकाणी पोहोचले. मृतदेह पाण्याने फुगला होता. आणि त्या मृतदेहाला कुबट वास सुटला होता. शरीर फुगल्यामुळे कळत नव्हते.तो मृतदेह महिलेचा आहे का मुलीचा ? चेहऱ्यावर अनेक जखम झाल्या होत्या. त्यामुळे चेहरा ही नीट ओळखू येत नव्हता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला नि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. पण त्या अगोदर मृतदेहाची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी मीरा च्या घरच्यांना इस्पितळात बोलविले. सुंदर आणि त्याचे आई-वडील रुग्णालयात आले त्यांनी

प्रेमासाठी काहीही २

इमेज
प्रेमासाठी काहीही २      एके दिवशी हिंम्मत करून मीरा ने मोहन ला ठीक पांच वाजता बीच वर भेटायला बोलविले.तेव्हा मोहन ला प्रश्न पडला की, मीरा ने त्याला बीच पर कशाला बोलविले असेल ? कारण बीच वर जास्त करून प्रेमी युगल जातात. तिच्या मनात तरी काय आहे ? माझ्यावर ती प्रेम तर करत नसेल ? असेल ही कुणी सांगावे. छे छे छे ! असं कसं होईल ? मी कधी त्याला त्या नजरेने पहिलंच नाही.आणि तसं पण आपलं प्रेम राधा वर आहे. राधा व्यतिरिक्त आपल्या जीवनात अन्य कुणी येऊ शकणार नाही. पण तिच्या मनात असं काही असेल असं आपल्याला का वाटतंय  बरं ? असं पण तर असू शकतं ना ? म्हणजे ती गावातील कुठल्या तरी तरुणावर प्रेम करत असेल परंतु ती गोष्ट सुंदर समोर सांगायला घाबरत असेल. कदाचित ते सांगण्यासाठीच तर तिने आपली निवड केली नसेल ना ? हां असं पण असू शकतं. म्हणून अगोदर तिला भेटून तिच्या मनात काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. हा विचार करून मोहन तिला भेटायला नदीवर गेला. तेव्हा येण्यापूर्वीच मीरा वरती पुलावर उभी होती म्हणून मोहन सुध्दा पुलावर गेला. तेव्हा त्याने मीरा ला नदीच्या पाण्यावर पडलेल्या सुर्यकिरणावर गेले. संध्याकाळ ची व