पोस्ट्स

पंखरूपी मानव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

पंखरूपी मानव ११

इमेज
पंखरूपी मानव ११               मग इतर देशांच्या वैज्ञानिकानी पण तसा प्रयत्न करून पाहिला परंतु ते लोक सुध्दा त्याच्या शस्त्र सामुग्री सहित पकडले गेले. मग सर्व देशातील वैज्ञानिकाना प्रश्न पडला की हमला करण्या पूर्वीच आपल्या शत्रू देशाला कसे कळते ? तेव्हा त्यांच्या द्यानात येते की ही कमाल डॉ. विश्वजितच्या रिपोर्टर मशीनची असणार , त्यांनी पुन्हा दुसरी रिपोर्टर मशीन नक्कीच बनविली असणार. कारण  त्यात ते प्रवीण आहेत. शिवाय डॉ. विश्वजित  पंखरूपी मानवांच्या  देशात जे गेलेत ते अजून माघारी म्हणजे  भारतात परतलेले नाहीत. म्हणूनच की भारताने या युद्धात भाग घेतलेला नाहीये. हे जसे द्यानात आले तसे त्यांच्या द्यानात हे देखील यायला वेळ लागला नाही की हे सारे काम जरूर बॉडीलेसचेच असणार. आता याला एकच उपाय आणि तो म्हणजे सर्व राष्टानी एकदम चोहीकडून पंखरूपी मानवाच्या देशावर हल्ला करावा. म्हणजे एकटा बॉडीलेस काय करणार ? सर्वाना त्यांचे म्हणणे पटले नि मग सर्वांनी एकदम हल्ला केला ; परंतु वार खाली गेला. उलट तेच सर्व जायबंदी झाले. कारण डॉ. विश्वजित ने अनेक बॉडीलेसची पूर्ण फौज उभी केली होती. त्यामुळे सर्वांचा प्र

पंखरूपी मानव १०

इमेज
पंखरूपी मानव  १०          त्यावर डॉ. विश्वजित बोलले ," तुम्ही माझ्या वडिलांना जिवंत ठेवले त्या बद्दल मी आपला आभारी आहे, आणि त्या उपकाराची जाणीव ठेवून मी आपली ऑपर स्वीकारत आहे, परंतु मला भारतातून काही माणसांना म्हणजे माझे असिस्टंट आहेत त्यांना आणण्याची परवानगी मिळावी."      चंद्रसेन महाराज म्हणाले," तुम्हांला ज्याला कोणाला आणावयाचे त्याला आणा. परंतु ती माणसं प्रामाणिक असणे जरुरीचे आहे."       " त्या बद्दल चिंता नसावी. ती माणसं एकदम विश्वासू आहेत. याची ग्वाही मी देतो."     " ठीक आहे, त्यासाठी आमची तुम्हाला पूर्ण अनुमती आहे."     " महाराज ,एक विचारू ?"     " अवश्य."     " पृथ्वीवर सर्वत्र लोकशाही सुरू झाली तरी तुमच्याकडे अजून राज्यशाहीच सुरू आहे."      " होय. कारण लोकशाही मध्ये फक्त निवडणूकी पुरताच लोकांचा विचार केला जातो आणि  त्यानंतर निवडून आणलेली माणसेच म्हणजेच राज्यकर्ते त्यांच्या वर शासन करतात. काय अर्थ आहे अश्या लोकशाहीचा ? त्या पेक्षा आमची राज्यशाहीच चांगली. असे आम्हाला वाटते. आणि आमच्या जनतेला

पंखरूपी मानव - ९

इमेज
पंखरूपी मानव - ९                 त्याच्या केविलवाणा चेहरा पाहून बॉडीलेस बोलला , झालं समाधान ? का अजून बाकी आहे ? " त्यावर डॉ. डेव्हिड काय बोलणार ? तो गप्पच झाला. तसा बॉडीलेस बोलला ," अभी कुछ काम की बात करे ? या अभी कुछ शेष है ? तो बोलो ." परंतु डॉ डेव्हिड काहीच बोलला नाही. बॉडीलेस बोलला ," आता डॉ. विश्वजित जवळ घेऊन जाणार आहेस ? तुझ्या या साऱ्या सैनिकांचा बळी तुला बक्षिसाच्या रुपात देवू ? का एक नमुना पाहायचाय का तुला ? असे म्हटले नि एका बंदूकधारी माणसाकडे फक्त हाताचे बोट केले त्याच्या अंगाला चिटकलेली गोळी सरळ निघाली नि त्याने ज्याच्या वर निशाणा साधला होता त्याला जाऊन ती लागली. तसे सर्वजण घाबरले नि आपल्या हातातल्या ए के ४७ खाली टाकल्या. आणि भयभीत चेहऱ्याने ते बॉडीलेस कडे पाहू लागले. तसा बॉडीलेस डॉ. डेव्हिड कडे पाहत बोलला , " आता स्वतः घेऊन जाणार आहेस का ? मी स्वतः जाऊ ?"    तसा डॉ. डेव्हिड स्वतः घेऊन गेला त्या तळघरा मध्ये जिथे डॉ. विश्वजित ला कोंडून ठेवले होते. त्या कोठडी चा दरवाजा उघडताच डॉ. विश्वजित हसून म्हणाला ," डॉ. डेव्हिड ,पाहिलंत माझा

पंखरूपी मानव -८

इमेज
पंखरूपी मानव -८                                              बॉडीलेस आणि डॉ . विश्वजित मध्ये सुरू असलेले संभाषण त्या कैद खाण्याच्या बाहेर सर्वाना ऐकू येत असते. परंतु पाहणाऱ्याला फक्त एकच व्यक्ती बोलतो आहे,असे दिसत असते. अर्थात डॉ. विश्वजितच दिसत असतात. याचे आश्चर्य डॉ. डेव्हिड नाच नाहीतर डॉ. डाबर आणि इतर लोक ही  करत असतात. छोट्यात छोटी वस्तू म्हणजे हवेत तरंगत असणारे कण जे सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत. ते कण सुध्दा त्या कॅमेरा मध्ये दिसत असतात. त्याच कॅमेरात बॉडीलेस का दिसत नाही ? याचेच घोर आश्चर्य सर्वाना  पडलेले असते. तेव्हा डॉ. डेव्हिड कैद खाण्याचा दरवाजा उघडून आंत प्रवेश करतात नि डॉ. विश्वजित च्या अवती भवती सर्वत्र फिरून बॉडीलेस ला शोधतात. परंतु बॉडीलेस कोणाचा दिसत नाही. शेवटी डॉ. डेव्हिड डॉ. विश्वजित ना विनंती करतात की एकवेळ आम्हाला त्याचे दर्शन घडवा. आम्हाला पाहायचे आहे तो दिसतो कसा ?"  तेव्हा डॉ. विश्वजित ने बॉडीलेसला आदेश दिला की , एक मिनिटं साठी सर्वा समोर प्रगट हो."        असे म्हणताच बॉडीलेस सर्वा समोर प्रगट झाला. सेम टू  सेम दुसरे डॉ. विश्वजित  फक्त दोघां

पंखरूपी मानव ७

इमेज
पंखरूपी मानव ७                आपल्या कारावासातून कैदी पळाला ही खबर वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली. ही खबर जेव्हा पंखरूपी मानवाच्या राजाला समजली. तसा राजा चंद्रसेन भयंकर चिडला. नि त्याने लगेच सैन्याला हुकूम सोडला की, तो जिथं मिळेल तेथून त्याला पकडून आणा. " सैन्य सर्वत्र त्याचा शोध घेऊ लागले ; परंतु त्याना बॉडीलेस सापडला नाही. शेवटी राजाने त्या कैदी सोबत असलेल्या कैद्याला माझ्या समोर हजर करा." असा आदेश सोडला.     " पण महाराज ,तो त्या बाहेर जगू शकणार नाही."     " मग तो कैदी कसा पळाला ? त्या कैद्याला ऑक्सिजन ची गरज नव्हती का ?" महाराज चंद्रसेन ने विचारले.      "  ते काही माहीत नाही महाराज." एक सैनिक बोलला.      " ठीक आहे, आम्हीच येतो कैद खाण्यात ." असे बोलून चंद्रसेन महाराज जिथे कैद खाना आहे ,तेथे येतात. नि डॉ. विश्वनाथ जवळ त्या फरार झालेल्या कैद्याची चौकशी केली. डॉ. विश्वनाथ ला विचारण्यात आले की, तुमच्या सोबत जो कैदी होता तो कुठे गायब झाला नि कसा झाला ? " त्यावर डॉ. विश्वनाथ म्हणाले," तो मानव नव्हता."      "

पंखरूपी मानव ६

इमेज
पंखरूपी मानव ६                    बॉडीलेसला त्याच रुम मध्ये घेऊन जातात. ज्या रुम मध्ये वीस वर्षांपूर्वी डॉ. विश्वनाथ यांना पकडून कैद करून ठेवले होते. शिपाई जसे बॉडीलेस त्या रुम मध्ये बंद करून जातात तसे लगेच बॉडीलेस डोळे उघडून समोर पाहतो. त्याला एक पन्नासच्या आसपास वय असलेला एका मनुष्य दिसतो. त्याची फार दाढी वाढलेली असते. तरी सुध्दा त्याच्या चेहरा डॉ. विश्वजितच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असतो. त्यावरून त्याने अंदाज बांधला की हा मनुष्य दुसरा कोणी नसून डॉ. विश्वजित चे वडीलच असावेत. असा विचार बॉडीलेच्या मनात सुरू होता अगदी तसाच विचार डॉ. विश्वनाथ च्या मनात आला तर त्यात नवल ते काय ?      परंतु मनात शंका निर्माण झाली की आपल्या सारखा दिसणारा पंखरूपी मानव कोण ? त्याच्या वेषभूषा वरून तर हा इथला तर वाटत नाही. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसारखे ह्यांचे वेषांतर आहे,परंतु पृथ्वी वर पंखरूपी मानव तर अजिबात नाहीत मग हा कोठून आणि कसा आला ? आणि ह्या पंखरूपी मानव लोकांच्या तावडीत सापडला ? काही कळत नाही ? विचारू का ह्याला ? पण कसं विचारू नि काय विचारू असा विचार त्यांच्या मनात सुरू असतानाच बॉडीलेस ने वि

पंखरूपी मानव ५

इमेज
पंखरूपी मानव ५           डॉ. विश्वजित आणि त्यांचे दोन असिस्टंट जॉन आणि सलीम या सर्वाना गराडा घातला. त्यामुळे त्याना पळता आले नाही. परंतु डॉ. डेव्हिड यांनी त्यांच्या समोर मोठी ऑफर ठेविली की आम्हांला पण तुम्ही बनविला तसा बॉडीलेस बनवून द्या. नाही पेक्षा तुम्ही आमच्या सोबत अमेरिकेत चला." तेव्हा डॉ. विश्वजित ने दोन्ही गोष्टी नाकारल्या. तसे डॉ. डेव्हिड च्या ध्यानात आले की ,डॉ. विश्वजित चा जीव या गावच्या लोकां मध्ये अडकलेला आहे, जर ह्या गाववाल्याना पकडून डॉ. विश्वजित समोर आले तर हा नकीच आपले काम करील. असा करून त्याने पूर्ण गावाला वेठीस धरले. आणि डॉ. विश्वजित ला धमकावले की, तू जर आमचे ऐकलं नाहीस तर सारा गाव स्मशानवटी बनेल. तेव्हा तुला काय मंजूर आहे बोल ?" तेव्हा डॉ. विश्वजित  म्हणाले ," मी तुमच्या सोबत यायला तयार आहे,परंतु माझ्या गावाला नाहक त्रास देऊ नका."     " ठीक आहे,सोडा रे त्याना ?' " तसे त्यांने गाववाल्या ना सोडण्याचा आदेश दिला. त्यांनी गाववाल्याना  मुक्त केले. आणि डॉ. विश्वजित ला घेऊन अमेरिकेत गेले. सोबत डॉ. विश्वजित ने बनविलेली रिपोर्टर मशी

पंखरूपी मानव ४

इमेज
पंखरूपी मानव ४           गावकऱ्यांनी डॉ. विश्वजित आणि त्यांचे असिस्टंट जॉन आणि सलीम या सर्वांचा सत्कार करायचा ठराव केला. डॉ. विश्वजित नको म्हणत असताना ही त्यांनी  जिल्हा प्रमुख मुख्य अतिथी म्हणून बोलविण्यात आले. त्यांच्या हस्ते त्या सर्वांचा सत्कार समारंभ झाला. आणि ही वार्ता सर्व वर्तमान पत्रात छापून आल्या होत्या. त्यामुळे डॉ. डेव्हिड नि डॉ. डांबर यांना खबर लागली की डॉ. विश्वजित आणि त्यांचे असिस्टंट सध्या कोठे आहेत. तसे ते नाणार गावाला जायला रवाना झाले.          रिपोर्टर मशीन झाली नि बॉडीलेस चंद्रावर जाऊन वापस आला. तिकडून मातीचे नमुने आणले नि फोटोज आणले. शिवाय चंद्रावर गुरुत्वाकर्षण नसल्या मुळे उड्या मारत चालावे लागते, म्हणजे अगोदरच्या वैज्ञानिका जी माहिती आणली होती तीच माहिती बॉडीलेस ने आणली होती. नवीन काहींचे नव्हते. म्हणून डॉ. विश्वजित म्हणाले ," बस्स ! आता मंगळ, बुध,  गुरू,शनी,  या ग्रहावर जायची गरज नाही. कारण या ग्रहांची माहिती, या पूर्वीच आणली आहे वैज्ञानिकानी तेव्हा आता अजून खूप इंच अंतराळात जावे नि नवीन ग्रहांचा नि तारेंचा शोध घ्यावयाचा आहे, कारण माझा असा आत्मवि

पंखरूपी मानव -३

इमेज
पंखरूपी मानव -३             डॉक्टर विश्वजित गावाला पोहोचले नि आपल्या असिस्टंट ना बोलले ," आपल्याला लवकरात लवकर बॉडीलेस तयार करून अंतराळात पाठवायला हवे. नाहीतर आपले शत्रू आपल्या पर्यंत पोहोचतील. असे म्हणून घडलेली घटना सविस्तर पणे ऐकविली. ते ऐकून जॉन म्हणाला ," पण बॉस त्याना इथला पत्ता कोण देईल ? कारण कोणालाच माहीत की हे तुमचे गाव आहे." डॉ. विश्वजित : इन्स्पेक्टर राणे ना ठाऊक आहे. तसे मी त्याना रिक्वेस्ट केली आहे,की कोणाला माझा पत्ता सांगू नकोस म्हणून. परंतु पण कोणाचा काय भरवसा द्यावा. थोड्याशा पैशासाठी इमान विकणारे लोक या भारत देशात फार पूर्वी पासून आहेत. आणि इतिहासात त्याचा दाखला सुध्दा आहे. आपला भारत देश फितुरी मुळे आज मागे आहे, नाहीतर साऱ्या जगावर भारी पडेल असे भारताकडे ज्ञान आहे,पण त्याचा फायदा इतर देश घेताहेत. आणि फितुरी ची कीड भारताला पहिल्या पासून लागलेली आहे, म्हणून अनेक युध्दे भारतातील राजे त्यामुळे च हरले. शिवाय त्या गब्बर ला पण तर ठाऊक असण्याची शक्यता आहे." सलीम : पण बॉस तो तर जेल मध्ये आहे ना ?" डॉ. विश्वजित :  पण ते लोक तर त्याला जाऊन भेटू श

पंखरूपी मानव २

इमेज
पंखरूपी मानव २            पाटील : वा ! छान , बरं वाटलं तुझ्यातला नम्रपणा आणि मनात वडीलधाऱ्या माणसा विषयी नि आपल्या गुरुजना विषयी आदर भाव पाहून. खूप मोठा होईल पोरा खूप मोठा होशील. तुझं नाव  साऱ्या जगात तुझं नाव होईल." डॉ. विश्वजित : बस्स असाच आशिर्वाद तुमचा असू दे माझ्या पाठीशी !" पाटील : तो तर राहणारच. आमच्या गावाचे नाव मोठे केलेस." डॉ. विश्वजित : पाटील काका , अजून एक मदत हवी आहे मला तुमच्या कडून." पाटील: मदत ना, अवश्य मिळेल. सांग काय मदत हवीय तुला." डॉ. विश्वजित : थांबा. अगोदर माझ्या ह्या दोघांची आणि तुमची ओळख करून देतो. हा सलींम, आणि हा जॉन हे दोघे माझे असिस्टंट आहेत." आणि त्या दोघांकडे पाहून तो पुढे म्हणाला," जॉन आणि सलीम , हे काका आमच्या गावाचे पोलीस पाटील. " त्या दोघांनी पाटीलना नमस्कार केला. पाटील काका नि त्याना पण आशिर्वाद दिला," दिर्घआयुष व्हा पोरानो. त्यानंतर डॉ. विश्वजित बोलला,"    मला ना , प्रयोगशाळा बांधायसाठी थोडीशी जमीन पाहिजे ? मिळेल का ?" पाटील : बस्स इतकेच ना , चल दिली तुला जमीन. शाळा कुठे बांधणार आहेस,ते

पंखरूपी मानव १

इमेज
पंखरूपी मानव १        ( ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे , तंत्रज्ञान वर आधारित. केवळ वाचकांच्या मनोरंजनासाठी लिहिली आहे. ह्या कथेतील पात्र ,स्थळ, घटना ,सर्वकाही काल्पनिक ह्या कथेचा वास्तव्याशी काही संबंध नाही.  या पूर्वीचे दोन भाग म्हणजे बॉडीलेस नंबर १ व २ वाचले असेलच ते वाचकांना फार आवडलले म्हणून हा तिसरा भाग लिहीत आहे.  नम्र विनंती आहे की केवळ रेेटिंग न देता समीक्षा जरूर लिहावी चांगली वाईट जी काय द्यायची असेल ती द्या. एक गोष्ट द्यानात असावी  की ही केवळ कल्पना आहे. त्यात वास्तविकता शोधू नका. )        ( एक विज्ञान कथा )       डॉ. विश्वजित आणि त्यांचे दोन असिस्टंट जॉन आणि सलीम ह्यांना कोर्टाने निर्दोष करार देऊन भारत देशाचे थोर वैज्ञानिक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. वृत्तपत्रा नी त्यांचा जास्तच उदो उदो केला. त्यामुळे साऱ्या जगात त्यांची आणि त्यांनी बनविलेल्या बॉडीलेसच्या करनाम्याची सर्वत्र खबर पोहोचली. त्यामुळे त्यांना सर्व देशातून आमंत्रित करण्यात आले. कारण त्यांनी बनविलेला फर्म्युला त्यांना ही पहायचा होता. आणि त्याना तसाच फर्म्युला बनहून पाहिजे होता. त्यासाठी लागेल तेवढी किंमत मो