पोस्ट्स

दुनिया ना माने लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

दुनिया ना माने २९

इमेज
दुनिया ना माने २९                       काहीतरी गडबड जरूर आहे, आपल्या पासून काहीतरी लपविले जात आहे ; परंतु काय ? बाबा एक सांगताहेत तर दादा दुसरंच काहीतरी सांगतोय. खरं काय आहे ,हे जर शोधवयाचे असेल तर आपल्याला कळलंय हे दाखवून न देता अजून काय काय बाबा सांगताहेत ते ऐकू नि त्यानंतर आपल्याला पडलेले प्रश्न विचारू असा मनात विचार सुरू असतानाच  बाबा पुढे म्हणाले ,"  आता तुझ्या साऱ्या शंका दूर झाल्या असतील तर मी जाऊ ?"       " अजून एका प्रश्नाचे उत्तर द्या मला."       " कोणत्या ?"       "  दादाने तुमच्या नावाच्या ऐवजी आपले नाव का लावले?"      "  त्याला पण एक कारण आहे ."      " कोणतं ?"      " कालांतराने तुझ्या वहिनीला कळलं असतं की तू तिचा बाळ नाही आहेस  तर तिच्या मनावर विपरीत परिणाम झाला असता. म्हणून जन्म दाखल्यावरचे माझे नाव त्याने बदलले . पण ते माझ्या सांगण्यावरून. अजून काही प्रश्न विचारायचं असेल तर विचार." असे सुधाकरने विचारताच त्याने नकारात्मक मान डोला वली. तसा सुधाकर पुढे म्हणाला ,     "  आता तुझ्या मनातील

दुनिया ना माने -२८

इमेज
दुनिया ना माने -२८       मग त्याने स्वतःचा जन्माचा दाखला तपासून पाहिला. त्यात जन्मतारीख आणि जन्मवेळ सारख्याच ; परंतु आई वडिलांचे नाव वेगवेगळे, शिवाय जन्मस्थ ही वेगळे , हे पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले .ते असे की हा जन्माचा दाखला कुणाचा ?  आपल्या वडिलांचा एक भाऊ होता का ? जर होता तर तो आता कुठे आहे ? शिवाय त्याची नि माझी जन्मतारीख सारखी कशी ? शिवाय दोघांचे नावं पण  एकच ! फक्त दोघांच्या आई वडिलांचे नाव वेगवेगळे. शिवाय लहानपणापासून मी  त्याला कधी पाहिले नाही. ना आजीला ना त्याला ?  बाबांना सोडून गेले का ते ? पण असं कसं होईल बरं ? आता या प्रश्नांची उत्तरे आपल्याला बाबांकडून मिळतील कदाचित. चला बाबानाच विचारू.  असा विचार करून तो सुधाकरच्या खोलीत आला नि  त्यांना स्टोअर रूममध्ये जुन्या पडलेल्या फाईल्स मध्ये सापडलेला दाखला दाखवत म्हणाला ," बाबा हा कोणाचा दाखला ?" सुधाकरने तो दाखला आपल्या हातात घेतला नि वाचला. आणि मागचा पुढचा विचार न करता पटकन बोलला ,"       "  तुझाच की रे हा दाखला."       " अच्छा हा माझा तर हा कुणाचा ? " दुसरा जन्माचा दाखला त्

दुनिया ना माने २७

इमेज
दुनिया ना माने २७          कांचन ने समजून विचारले , " कशाबद्दल ?"      " माझ्या मुलांना तू आपली मुलं मानल्या बद्दल."      " आज म्हटलतात ते म्हटलतात पुन्हा असं कधी म्हणू नका. का माहितेय ?"       " का ? "       " अहो,ती मुलं फक्त तुमचीच राहिली नाहीत आता . माझा पण आता तितकाच अधिकार आहे त्यांच्यावर. बहुधा तुमच्या पेक्षा जास्तच ." विराज हसून म्हणाला ," खरंय."         " आहे ना खरं ,मग यापुढे माझे आभार अजिबात मानावयाचे नाहीत. कारण माझ्यावर तुम्ही जे उपकार केलेत त्या उपकाराची फेड मी ह्या जन्मतःच काय असे अनेक जन्म घेऊन सुध्दा फेडता येणार नाहीत."        " असे मी काय केलंय तुझ्यासाठी ?"        " तुम्ही जे केलेत माझ्यासाठी ते कदापि दुसऱ्या माणसाने  केले नसते."        " असं तुला वाटतं ; पण खरं सांगायचं तर तूच माझ्यावर उपकार केलेस. माझ्या मुलांना आपले करून."       " बस्स ! यापुढे कोणी कोणाचे  उपकार मानावयाचे नाहीत. जे काय आपण करतो किंवा करणार आहोत ते आपल्या दोघांचे कर्तव्यच आहे.&quo

दुनिया ना माने -२६

इमेज
दुनिया ना माने -२६        प्रीती स्वतःशीच प्रश्न करते की, म्हणजे मी माझ्या मुलांचे भविष्य पार बिघडवून टाकले तर ! पण याला उपाय ? किंचित थांबून दिर्ग श्वास सोडून ती स्वत:शीच म्हणाली , उपाय आहे ना, नाही कसा ? मी माझ्या कर्माची शिक्षा मुलांना भोगू देणार नाही. तर मी भोंगेन ती शिक्षा ! असे म्हणून ती पळतच स्वयंपाक घरात गेली नि स्वयंपाक घराचा दरवाजा आतून बंद केला. आणि किचनमध्ये असलेलं पाच लिटर रॉकेल चे कॅन स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. नि माचीस ची कांडी पेटवून स्वतःच्या साडीला लावली. रॉकेल ने भिजविलेल्या साडीने लगेच पेट घेतला. स्वयंपाक घरातून धूर कसा येऊ लागला , म्हणून सुधाकर ने स्वयंपाक  खोलीच्या दिशेने धाव घेतली ; पण दरवाजा आतून बंद होता ; म्हणून ते मोठ्याने आरडाओरडा करू लागले. शेजारी-पाजारी धावून आले आणि धक्के मारून दरवाजा तोडला. दरवाजा तुटताच सुधाकरने घरातून ब्लँकेट आणले  नि तिच्या अंगाला लपेटले. तशी थोड्याच वेळात आग विजली. पण तोपर्यंत प्रीती  नव्वद टक्के भाजलेली होती. तिला ताबडतोब  रिक्षे मध्ये घालून  इस्पितळात नेण्यात आले. आत्महत्येची केस म्हणून डॉक्टर केस घ्यायला तयार नव्हते. परंतु

दुनिया ना माने -२५

इमेज
दुनिया ना माने -२५        आपल्या आईवडिलांच्या प्रश्नांना कसे उत्तर द्यायचे असा विचार करत होती तेवढ्यात तिची आई तिला म्हणाली," नीच ! नालायक ! बेशर्म !  कार्टे असे ते कृत्य करताना तुला लाज कशी नाही वाटली ? " असे म्हणून तिच्या कानशिलावर दोन तीन थप्पड मारत  त्या पुढे म्हणाल्या ," असे नीच कृत्य करण्यापूर्वी विष खाऊन मेलीस का नाही ?" प्रीतीला ते सहन झाल्याने ती म्हणाली ," का विष खाऊन मरु मी ? काय अपराध आहे माझा ? फक्त माझ्या वयाला शोभेल अशा मुलाशी प्रेम केलं इतकेच ना ? "       " नालायक ,बेशर्म ,पाप करूंनच्या  करून  वर विचारतेस मी काय केलं म्हणून ?"        " हां ,कारण मी कोणतेही पाप केलेले नाहीये."        " सावत्र मुलाशी अनैतिक संबंध करणे हे पाप नव्हे का ?"       " मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले तोच पुढे माझा सावत्र मुलगा निघाला तर त्यात माझा काय दोष ?"        " म्हणजे हे प्रेम प्रकरण कधीपासून सुरू आहे म्हणनायचे ?"       " शाळेत असल्यापासून चे प्रेम आहे आमचे एकमेकांवर."       " ओह ! आल

दुनिया ना माने - २४

इमेज
दुनिया ना माने - २४           प्रीती आपल्या खोलीत गेल्यानंतर कावेरीबाई स्वयंपाक घरात येऊन पाणी प्याल्या आणि मग आपल्या खोलीत येऊन अंथरूणावर पहुडल्या. पण त्याना झोप अशी काय येत नव्हती. जणू त्यांची झोप कोणीतरी चोरली होती. त्या सारख्या ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होत्या. त्यांच्या विचारांचे काहूर मांजले होते. ते दोघे एकांतात काय बोलत असावेत ? म्हणजे त्याना आतील बोलणे अस्पष्टपणे ऐकू आले होते ; परंतु नीट काय ते समजले नव्हते. परंतु त्यांच्या मनात एक शंका निर्माण जरूर झाली. की ह्या दोघां मध्ये काही ना काही खिचडी जरूर शिजते आहे. परंतु कोणती ते कळत नाहीये. विचार करता करता एक विचार मनात आला की ,ह्या दोघां मध्ये अनैतिक संबंध तर नसतील ना ? छे ,छे,छे ! मी काहीतरीच अभद्र विचार करतंय,  असे म्हणून त्या स्वतःच स्वतःच्या थोबाडीत मारून घेतात.       खूप विचार करून ही त्या योग्य निर्णयावर पोहोचू शकल्या नाहीत. तश्या त्या स्वतःशीच पुटपुटल्या , आपण उगाचच संशय घेत नाही ना त्या दोघावर ? नाहीतर दोघां मध्ये समजतो तसे काही नसायचे. जाळ शिवाय आग नाही आणि आगी शिवाय धूर नाही. काही ना काहीतरी दोघां मध्य

दुनिया ना माने -२३

इमेज
दुनिया ना माने -२३         आपली मुलगी ऐकत हे पाहून ते सुधाकर कडे पाहत बोलले," अहो,जावई बापू ! तुम्हीच समजावा आता हिला. ती मुकगी स्वभावाने कशी असेल कोण जाणे ? पण आमची अनुसया स्वभावाने इतकी गोड आहे ना, शिवाय नात्यातली आहे. प्रीती बरोबर चांगले जुळेल तिचं."      " ते सारं खरं ,पण विराज अजिबात तयार होणार नाही."      " हां बाबा विराज अजिबात मान्य करणार नाही."      " अहो, मग तुम्ही समजावा ना त्याला."      " माझ्या समजविण्याने तो जर समजला असता तर मग कशाला हवं होतं ?" सुधाकर हताशपणे बोलला.       " म्हणजे नाहीच जमणार असं म्हणा की !"       " अहो ,बाबा आता तुम्हांला कसं समजावू ?"       " काहीही समजविण्याची गरज नाहीये. आम्हांला आपलं वाटलं की तू आपली आहेस भाची साठी काहीतरी खटाटोप करशील ; पण तुझ्या बोलण्यावरून असं वाटत नाही की तू आपल्या भाची साठी काय करशील ? खरं तर आमचंच चुकलं ,आम्हांला इथं यायला नको हवं होतं ."       " बाबा तुम्ही उगाच गैरसमज करून घेत आहात. तुमच्या काळातला जमाना राहिला नाही आता. तुमच्

दुनिया ना माने २२

इमेज
दुनिया ना माने २२          दुसऱ्या दिवशी तिचे वडील महिपतराव सकाळच्या गाडीने गावाला निघून गेले. प्रीती त्यांच्याच येण्याची वाट पहात होती. कारण तिचे मन भीतीने ग्रासले होते. नेमके काय घडले आहे पुण्याला ,ते कुणास ठाऊक ? आपले सत्य उघडकिस तर आले  नसेल ना ? कसं कळेल बरं हे ?  तेथे नेमके काय घडलंय तेच कळत नाहीये. देवा माझे गुपित सर्वा समोर आणू नकोस . नाहीतर मला  गावाला कोणाला तोंड सुध्दा दाखविण्याची जागा शिल्लक राहणार नाही. असे म्हणून लगेच मनात एक विचार आला की,  नेमके काय घडलं असेल पुण्याला ? पण  त्याचा काही अंदाज लागत नव्हता. त्यामुळेच की काय ती मनातल्या मनात देवा जवळ धावा करीत   होती की, परमेश्वराला वाचव मला यातून." काय गंमत आहे पहा. पाप करणारा सुध्दा म्हणतोय की देवा, मला वाचव यातून. आणि पुण्यवाण सुध्दा  देवा जवळ तेच बोलतो. मग देवाने ऐकावे तरी कोणाचे ? फर जटिल प्रश्न आहे हा , पण आपल्याला काय त्याचं ?  जे जे होईल ते ते पहावे."       महिपतराव पुण्यावरून जसे परतले तसे तिच्या आईने प्रथम चौकशी केली. त्या म्हणाल्या ," काय हो , जावई बापू काय म्हणाले ? म्हणजे लग्नाला येणार आहेस ना ?

दुनिया ना माने - २१

इमेज
दुनिया ना माने - २१      " तुझी मुलं कुठं आहे गं ? बाबांनी ,प्रीती कडे पाहत विचारले. तेव्हा प्रीती उत्तरली," ती काय मामासंग खेळताहेत ? " बाबा बोलले ," मामा काय त्यांच्या सारखा लहान झालाय त्यांच्या सोबत खेळायला ?"      " लहान  मुला सोबत होऊ लागतं "  आई उत्तरली.          त्यानंतर दुपारची जेवणे  झाली आणि  इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. शांती प्रत्येक शब्द तोलून मापून बोलत होती. जणू चुकुन आपल्याकडून काही  बोलले जाऊ नये, हीच भीती तिच्या मनात सतत येत होती. तरी बरं मुलांना आजोबा म्हणण्याऐवजी बाबा म्हणाला शिकविले होते. म्हणून  थोडीशी चिंता  दूर झाली होती. समजा उद्या जर आपल्या वडिलांनी पुण्याला जाऊन विराजच्या वडिलांना सोबत आणालच तरी काही भीती नव्हती. ती उगाच आपली घाबरत होती. होऊन होऊन दुसरं काय होणार ? चार दिवस विराज च्या वडीला सोबत नवरा बायकोचे होते नाटक करावे लागेल ना ? त्यात काय विशेष आणि ते आपल्याला नवीन का आहे ? असे तिचे मन तिला सांगू लागले होते , तेव्हा कुठे तिच्या मनावरील दडपण कमी झाले . मग तिने मनात द्वड निश्चय केला की येईल त्या प्रसंगाला तोंड द