Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

![]() |
महाभारत १३५ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu. |
महाभारत १३५
तेवढ्यात तेथे राज्यवैध आला नि मोठ्या ने महाराज महाराज म्हणून हांक मारली. तेव्हा दुर्योधनाने विचारले ," कोण आहे ?"
" मी राज्यवैध !"
" इथं कशाला आलास ?"
" मी आपल्या साठी औषधी वनस्पती आणल्या आहेत."
" कशासाठी ?"
" आपण फार जखमी आहात ना ? म्हणून त्या जखमावर
स्नेहलेप लावण्यासाठी !"
" अर्थात तू सुद्धा त्या पांडवांना जाऊन मिळालास तर !"
" हे काय बोलत आहात आपण ? मी आपला वैध आहे,
मी आपल्या जखमांना ठीक करू इच्छितोय नि अनेक वर्षे
आपण जगावे अशी माझी इच्छा आहे."
" त्या पांडवांची पण हीच इच्छा आहे, मी ठीक व्हावे
आणि मी खूप जगावे , परंतु त्यांच्या दयेवर लाचारीचे जीवन
जगावे लागेल, म्हणून मला ते कदापि मान्य नाही. म्हणून तू माझा इलाज करू नकोस. मी दुसऱ्यांच्या दया कर्मावर जिवंत राहू इच्छित नाहीये. तुला माहितेय भीमसेनचे अजूनही समाधान झाले नसेल तो स्वतः प्रमानेच मला सुद्धा तसाच लाचार पाहू इच्छित असेल जसा तो त्यावेळी लाचार होता. ज्यावेळी मी द्रौपदीचे चिरहरण करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून मला हे लाचारी जीवन जगायचे नाहीये."
" परंतु महाराज मी आपल्या साठी दुर्मिळ संजीवनी आणली आहे."
" तुला एकदा सांगितलेले कळत नाही का ? मला संजीवनी नकोय ती. "
" पण महाराज....?"
" तू जर अजूनही मला महाराज समजत असशील तर
माझ्या आदेशाचे पालन करशील. नको आहे ती मला संजीवनी !"
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून राजवैध तेथून निघून
गेला. तेव्हा दुर्योधन स्वतःशीच उद्गारला ," मला जी संजीवनी
पाहिजे ती कोणी आणून देऊ शकणार नाहीये." तेवढ्यात
तेथे अश्वत्थामा आला. त्याने कदाचित दोघांचे संभाषण ऐकले असावे. तो म्हणाला ," कोणती संजीवनी मित्र ? सात
समुद्र पलीकडे असली तरी ती मी घेऊन येईन." तेव्हा दुर्योधनाने विचारले ," कोण आहे ?"
" मी अश्वत्थामा तुझा प्रिय मित्र !"
" तू अद्याप जीवंत आहेस ? मला वाटले होते की एक
एक करून कुरुसैन्याचे सर्व महारथी संपले."
" नाही मी अजून जिवंत आहे, काय इच्छा आहे तुझी ते
मला सांग."
" मला त्या पाच पांडवांची मस्तके पाहिजे बोल आणून
देशील का मला ?"
" अवश्य ! पांडव माझे पण शत्रू आहेत, पितामहा भीष्म
आचार्य द्रोण यांच्या वधाचा सूड मी घेतल्या शिवाय राहणार
नाहीये. मी वचन देता तुला उद्याचा सूर्योदय होण्यापूर्वी मी
त्या पाची पांडवांची मस्तके तुला आणून देईल आता मला
जाण्याची आज्ञा दे."
" जा मित्र माझा तुझ्यावर पूर्ण भरवसा आहे." असे बोलून
अश्वत्थामा तेथून चालता झाला,आणि सूर्योदय होण्याची
वाट न पाहता रात्रीच पांडवांच्या शिबिरात शिरून पांडव समजून त्याने धृष्टद्युम्नाची नि द्रौपदीच्या पाच पुत्रांची हत्या केली नि त्यांची मस्तके कापून रातोरात आपल्या मित्राकडे जायला निघाला. दुर्योधन त्याची वाट पाहून थकला नि स्वतःशीच म्हणाला ," अजून अश्वत्थामा आला नाही याचा अर्थ अश्वत्थामा पांडवांचा वध करू शकला नाही. कदाचित पांडवांची कापलेली मस्तके पाहण्यासाठी मी जिवंत राहू
शकणार नाहीये. तेवढ्यात तेथे अश्वत्थामा आला नि म्हणाला, " मी आलो मित्र पांडवांची मस्तके घेऊन."
" वा ! शाब्बास ! सर्वात प्रथम मला महा अभिमानी भिमाचे
मस्तक दे मला मी त्या मस्तकाचा माझ्या या दोन्ही हातानी
त्या मस्तकाचा चुराडा करेन." त्यानंतर अश्वत्थामा ने वस्त्रात
गुंडाळी करून आणलेल्या मस्तका मधून एक मस्तक
दुर्योधनाच्या हातात देत म्हणाला ," हे घे भिमाचे मस्तक."
दुर्योधनाने त्याने दिलेले मस्तक आपल्या हातात घेतले
नि मोठ्या ने भीम असे म्हणून जोराने आवळले. त्या मस्तकाचा चेंदामेंदा झाला ते पाहुन दुर्योधन म्हणाला ," धोका ! माझ्याशी धोका झाला." त्यावर न समजून अश्वत्थामा ने विचारले, " कसला धोका झाला मित्र ?"
" ह्याला विश्वासघात ही म्हणतात. माझ्या सोबत सगळ्यांनीच विश्वासघात केला. परंतु तुझ्या कडून मला ही
अपेक्षा नव्हती."
" हे काय बोलत आहेस तू मित्र ?"
" खरं तेच बोलतोय. जे मस्तक तू महाबली भिमाचे म्हणून माझ्याकडे दिलेस ना , ते महाबली भिमाचे असू शकत नाहीये. कारण इतक्या सहज पणे त्याच्या मस्तकाचा चेंदामेंदा होऊच शकत नाहीये. बोल खरे सांग हे कोणाचे मस्तक आहेत ?"
त्यावर अश्वत्थामा म्हणाला ," मी जेव्हा त्यांच्या शिबिरा
जवळ पोहोचलो तेव्हा पांडव निघून गेले होते. मी जरी
त्यांचा पाठलाग केला असता तरी मी त्याचा वध करू शकलो
नसतो. कारण त्यांच्या सोबत वासुदेव पण होते. म्हणून मी त्या पाची पांडवांच्या पुत्रांची मस्तके कापून आणली."
" नाही ss हे काय केलेस तू ? तू एक असे पाप केलेस
ते भीमाने माझी मांडी फोडून ही केले नव्हते मित्र माझी
शत्रूता त्या पाच पांडव बंधूनशी होती. म्हणून त्यांच्या सोबत
मी जे काय केले त्या बद्दल ना मला खेद आहे ना पश्चात्ताप,
परंतु त्यांच्या पुत्रांशी माझे वैर नव्हते. तू त्या पाच पुत्रांची हत्या करून भरतवंश नष्ट केलास . हे तू चांगले कार्य केले नाहीस."
" मी फक्त माझ्या वडिलांना कपटाने मारल्याचा बदला
घेतला."
" तुला बदलाच घ्यायचा होता तर त्या पांडवा चा वध
करून घ्यायचा होता. परंतु तू त्या निरपराध बालकांचा
वध करून तू घोर अपराध केला आहे, उद्याच्या इतिहासाला
फक्त हे माहीत असेल की दुर्योधनाचा वध भीमाने माझी
मांडी फोडून केला, परंतु तुझ्या नि माझ्या व्यतिरिक्त अन्य
कोणाला माहीत नसेल की दुर्योधनाची हत्या भीमाने नाही
तर तू केलीस. माझे हे डोळे दोन अश्रूच्या थेंबासाठी तडफडत होते परंतु आज त्यातून अश्रूंचा पूर निघेल ,कारण
आज तू कार्यच असे केलेस." असे म्हणून त्याने आपला प्राण सोडला. अश्वत्थामा ला फार वाईट वाटले. परंतु त्याला त्याच्या कृत्या बद्दल अजिबात पश्चात्ताप झाला नाही. मनात
सूड भावना असलेल्या व्यक्ती ला उचित अनुचित काहीही
कळत नाहीये.
दुसऱ्या दिवशी पांडवांना ही गोष्ट कळली तेव्हा त्याला त्याचा दंड देण्यासाठी भीम आणि अर्जुन गेले. मग त्यांच्या पाठोपाठ युधिष्ठिर आणि वासुदेव ही गेले. परंतु सुडाने पेटलेल्या अश्वत्थामा ने पांडवांचा विनाश करण्यासाठी पांडवावर ब्रम्हंस्त्राचा प्रयोग केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अर्जुनाने सुध्दा ब्रम्हंस्त्राचा प्रयोग केला. शेवटी महर्षी व्यास दोन्ही शस्त्रांच्या मध्ये जाऊन उभे राहिले नि दोघांनाही आपापली शस्त्रे मागे घ्यायला सांगितली. महर्षी व्यासांचा आदेश शिरसावंद्य मानून अर्जुना ने आपले ब्रम्हंस्त्र मागे घेतले. परंतु अश्वत्थामा ने परत माघारी घेतले नाही. कारण शस्त्र मागे घेण्याची कला त्याला माहित नव्हती. म्हणून मग महर्षी व्यासांनी शस्त्राची दिशा बदलायला सांगितली. त्याने दिशा बदलली परंतु शेवटी पांडवांच्या वंश अर्थात उत्तरेच्या पोटात वाढत असलेल्या अभिमन्यूच्या बाळाचा वध केला. परंतु वासुदेव कृष्णाने आपल्या शक्तीने बाळाला पुनर्जीवित केले नि अश्वत्थामा ला शाप दिला तू कायमस्वरूपी रानोमाळ
भटकत राहशील नि तुला मुक्ती ही मिळणार नाही. आणि
त्यांच्या कपाळावर असलेला दिव्यमनीही काढून घेतला.
पुढे युधिष्ठिरचा राज्यभिषेक पण झाला परंतु या युद्धाचा
खरा नायक कोण ? हे अजून ठरायचे आहे. युध्द समाप्त
झाल्यानंतर सर्व पांडव श्रीकृष्णासह अर्थात सोबत महर्षी
व्यास पण होते. सर्वजण बर्बरीक जवळ गेले. तेव्हा बर्बरीक
ने प्रथम महर्षी व्यासांना प्रणाम केला. त्यांनी आयुष्यमान चा
आशीर्वाद दिला. त्यानंतर एका पाठोपाठ सर्व आजोबा ना
बर्बरीक ने प्रणाम केला. त्यानंतर महर्षी व्यास म्हणाले,
" बर्बरीक आज आम्ही तुझ्या कडे एक उद्देशाने आलो आहे, कारण इथं घडलेली प्रत्येक घटना तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलीस अर्थात तूच सांगू शकतोस की या युद्धात
कोणाचे काय योगदान आहे,आणि या युद्धाचा मुख्य नायक
कोण आहे ?"
" युध्दा मध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक योध्याचे योगदान आहे. त्या मध्ये कोणी योध्दा कोणाचे प्राण घेतो तर कोणी
योध्दा स्वतःचे प्राण देतो. त्यामुळे प्रत्येकाचे योगदान असते
त्यात. मग एक साधारण सैनिक असो वा महारथी असो. परंतु
नायक एकच असतो. मग तो सेनापती वा सैनिक असो."
" म्हणूनच मी म्हणतोय आपण काय पाहिलंय ?"
त्यावर बर्बरीक म्हणाला," मला कुरुक्षेत्रावर वासुदेव कृष्ण
आणि त्यांच्या सुदर्शनचक्र व्यतिरिक्त अन्य कोणी दिसलाच
नाही. प्रत्येक सैनिका समोर वासुदेव आणि त्यांचे ते सुदर्शनचक्र कुणाची गदा कापत आहे, तर कुणाची तलवार,
कुणाचा गळा, सर्वत्र कुरुक्षेत्रावर सुदर्शनचक्र फिरताना दिसत
होते. आणखीन एक दृश्य मी पाहिले."
" कोणते दृश्य पाहिलेस तू ?"
" मी पाहिले की माता द्रौपदी रक्त पीत आहे, मला अगोदर विश्वास नाही झाला म्हणून मी नीट पाहिले असता
मला जाणवले की ती माता द्रौपदी नसून समस्त नारी जात
त्यांचा अपमान झाला आहे, त्यांचा तिरस्कार केला गेला
आहे अश्या नारी ते रक्त पीत होत्या. ह्या व्यतिरिक्त मी अन्य
काही पाहिलं नाहीये." तेवढ्यात तेथे हिडींबा आणि मोर्वी
आल्या. तेव्हा बर्बरीक म्हणाला," प्रणाम आजी आणि प्रणाम
मातोश्री !" तेव्हा मोर्वी वासुदेव कृष्णाला उद्देशून म्हणाली,
" वासुदेव माझा पुत्र सदैव ह्याच स्थितीत राहील का ?"
" नाही. कुलवधू मोर्वी तुझा पुत्र महापराक्रमी आहे, सत्य
आणि असत्याच्या युद्धात भाग न घेऊन महान कार्य केले
आहे, आपल्या शक्तीला त्याने अंकुश लावले. त्याचे ऋण
तर उतरावेच लागेल ना ? " असे म्हणून वासुदेव ने योगमायाचे स्मरण करताच ती हात जोडून वासुदेव पुढे
प्रगट होत म्हणाली ," आपण मला बोलविलेत."
" हां देवी महात्मा बर्बरीकाचे धड आणले जावे."
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून बर्बरीक चे सुरक्षित
ठिकाणी ठेवलेले धड आणले गेले नि त्यावर बर्बरीकाचे मस्तक लागले. तसे वासुदेव उद्गारले ," आम्ही सर्व तुझे आभारी आहोत बर्बरीक. आता तू आपल्या मूळ अवस्था
मध्ये ये." असे म्हणताच ते धड पुन्हा जिवंत झाले. तशी मोर्वी खुश होऊन म्हणाली ," बर्बरीक माझ्या पुत्रा तुझ्या विना
माझे जीवन अपुरे होते.आता घरी चल."
" नाही मातोश्री ! मी आता घरी येणार नाही."
" का बरं घरी येणार नाहीस ?"
" हे युद्ध पाहिल्यानंतर काहीच पाहण्याची आता इच्छा
नाही. आता राहिलेले माझे शेष जीवन तपश्चर्या करण्यात
घालवींन. आणि ईश्वर जवळ प्रार्थना करीन की असं युध्द
पुन्हा कोणत्याही युगात होऊ नये. कारण मी जे पाहिले ते
फार भयानक होतं. एकाच परिवारातील सदस्य एकमेकांच्या
रक्तात स्नान करत आहेत. असे पाहण्याची वेळ कुणावर ही
येऊ नये. मातोश्री आता तू घरी जा माझा मार्ग आता वेगळा
आहे." असे म्हणताच मोर्वी म्हणाली ," असं का म्हणतोहेस ? " त्यावर वासुदेव म्हणाले ," ह्याने बोलले एक एक शब्द
सत्य आहे, ह्याला तू आता अडवू नकोस मोर्वी , जाऊ दे त्याला. उलट त्याला आशीर्वाद दे की त्याची तपस्या सफल
होऊ दे, आणि भविष्यात असं महायुद्ध होऊ नये की ज्यामुळे
भाऊच भावाचा काटा काढण्यास कारणीभूत ठरू नये."
त्यानंतर बर्बरीक ने आपल्या धाकट्या भवाकडे पाहिले
नि त्याला हांक मारून स्वतः जवळ बोलवून घेत पुढे म्हणाला," अनुज तुझं वय लहान आहे ,परंतु मी तुझ्यावर एक फार मोठी जबाबदारी सोपवून जात आहे, तू मातोश्रीला
काही कष्ट होऊ देणार नाहीस असे मला वचन दे."
" मी आपल्याला वचन देतो दादा, मातोश्रीला मी कोणतेही
कष्ट होऊ देणार नाहीये." असे वचन देताच बर्बरीक आपल्या
आजी जवळ म्हणजेच हिडींबा जवळ गेला नि म्हणाला,
" आजी तू मला धनुर्विद्या चे ज्ञान दिलेस.त्याबद्दल मी
आपला आभारी आहे.परंतु मी आपली काही सेवा करू
शकलो नाही त्याबद्दल मला क्षमा करा." त्यावर हिडीबा
उद्गारली ," माझ्या नि माझ्या कुळासाठी तू महात्मा बनलास
हे माझ्या साठी सौभाग्याची गोष्ट आहे पुत्र मला त्या बद्दल
तुझा अभिमान आहे." त्यानंतर बर्बरीक भीमसेनची माफी
मागत म्हणाला ," आजोबा मी आपल्याला सुद्धा एकदा त्रास
दिला होता, परंतु तो जर दिला नसता तर मला ज्ञान कसे
मिळाले असते की माझ्या शक्तीचा उपयोग उचित कसा
करता येईल. त्याबद्दल मला क्षमा करा."
" क्षमा कसली पुत्र उलट तुझा मला अभिमान आहे, आज
तुझ्या त्यागामुळे च आमचा सारा परिवार सुरक्षित आहे, मला
तुझा नि घटोत्कच पुत्राचा अभिमान आहे, तुम्ही दोघांनी
आपल्या कुलाची लाज राखलीत." त्यानंतर बर्बरीक अर्जुनला वंदन करत म्हणाला ," प्रणाम आजोबा अर्जुन."
" आयुष्यमान भव पुत्र !" त्यानंतर नकुल सहदेव या
दोघांनाही बर्बरीक ने प्रणाम केला. आणि शेवटी सर्वांना
उद्देशून म्हणाला ," पितामहाजनो , नि आपल्या सर्वांच्या
आशीर्वाद घेऊन निघालोय. परंतु जाता जाता मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितोय. "
" आपण विनंती नाही आज्ञा करू शकता कारण आपण
महात्मा आहात. बोला काय म्हणणे आहे आपले ?"
" पितामहा जनो मी आपल्याला विनंती करतो की, आपण पाचजण आहात. पांचाचे विचार वेगळे असू शकतील, परंतु
विचारात मतभेद असले तरी घाबरून जाऊ नये.मुख्यतः
आपले सर्वांचे लक्ष एकच असायला पाहिजे. आता युध्द संपले. विनाश ही संपला. यापुढे आपण सर्वांनी एक मताने नि एक दिलाने राज्य करा आणि प्रजेला ते देण्याचा प्रयत्न करा जे त्याना अद्याप मिळाले नाहीये. आपण सारे भाग्यवान
आहात. कारण आपल्या मध्ये वासुदेव सारखे आजोबा मार्गदर्शक आहेत. वासुदेव आजोबांच्या सल्याने सर्वकाही करा." असे म्हणून वासुदेव कृष्णाला हात जोडून बर्बरीक म्हणाला , " आजोबा मागे आपण एकदा मार्गदर्शन केले होते. तसेच पुन्हा एकदा माझे मार्गदर्शन करा. आपल्या विचारांचे अमृताने मी आपली तहान भागवू इच्छितोय. आपला
संदेश मी माझ्या मनात साठवून ठेवीन." त्यावर वासुदेव कृष्ण म्हणाले ," या मध्ये काहीही संशय नाहीये. मला माहीत आहे तुझा निश्चय अटळ असतो. या पूर्वी सुद्धा तू केलेला निश्चय केला होतास आणि ते प्राप्तही केलेस, मला खात्री आहे यावेळी देखील तू आपला उद्देश पूर्णत्वास नेशील.
आणखीन एक महत्वाचे सांगतो ते ऐक. कधीही कोणाला
वचन अथवा प्रतिज्ञा करताना त्याचा परिणाम विषयी अगोदर
विचार कर.पितामहा भीष्मांनी परिणामाचा विचार न करता
एक प्रतिज्ञा केली होती.त्या प्रतिज्ञाचा परिणाम महाभयंकर
विनाश झाला असता. तू सुद्धा एक परिणाचा विचार न करता
प्रतिज्ञा केली होतीस त्याचा परिणाम आम्हाला जे करायला
नको होते ते करायला लागले. म्हणून परिणामाचा अगोदर
विचार करायचा नि मगच प्रतिज्ञा करायची. वचनाचे ही तसेच
आहे आपण देत असलेले वचन उद्या आपल्याला संकटात
टाकणार नाही याचा अगोदर विचार करायचा आणि मगच
कोणाही वचन द्यायचे. जा वत्स हा संदेश साऱ्या संसार ला दे." बर्बरीक ने पुन्हा एकदा वासुदेवाचे चरणस्पर्श केले नि
त्यानंतर सर्वांचा निरोप घेतला. तो जायला निघाला. तेवढ्यात
राजमाता कुंती आणि महारानी द्रौपदी तेथे आल्या. तेव्हा
दोघींचे पण त्याने चरणस्पर्श केले नि त्यांचा ही आशीर्वाद
घेतला आणि मग जायला निघाला.
रात्र झाली होती परंतु अर्जुनला झोप येत नव्हती.म्हणून
उठून तो कुरुक्षेत्रावर गेला.जिथे त्याने कर्णाचा वध केला होता. भूमीत रुतलेल्या रथाचे चाक पाहून अंतिम क्षणी
कर्णाने उद्गारलेले शब्द आठवले- हे अर्जुन माझ्या रथाचे
चाक भूमीत रुतले आहे, ते काढी पर्यंत जरा थांब.त्यानंतर
त्याला आपण मारलेला बाण आठवला नि त्याच वेळी
कर्णाचे मस्तक धडा वेगळे झालेले दृश्य जेव्हा दिसले तेव्हा
अर्जुन कर्णाला उद्देशून म्हणाला ," फार मोठा अत्याचार
माझ्या हातून घडविलास दादा तू. मला माहित नव्हते की
तू माझा मोठा भाऊ आहेस, परंतु तुला माहीत होते ना की
मी तुझा अनुज आहे ,मग का सांगितले नाहीस मला. का
माझ्या कडून स्वतःचा अपमान करून घेत होतास सदा.
एकदा सांगून तरी पहायचे होतेस तू दादा. हा तुझा भाऊ
आपले धनुष्य तुझ्या चरणावर ठेवून तुझ्या गळ्याला
लागलो असतो दादा. का सत्य लपविलेस आमच्या पासून
कोणी तुझे ओठ शिवले होते दादा कोणी शिवले होते ?"
" अनुज sss ? " असा आवाज ऐकताच अर्जुन ने आवाजाच्या दिशेने पाहिले. तेव्हा आकाशातून कर्णाचा आत्मा खाली उतरताना अर्जुनला दिसला. पुढे कर्णाचा
आत्मा म्हणाला ," माझा नाईलाज होता अनुज.मला क्षमा
कर.मी वचन दिले होते."
" वचन कसले वचन ?"
" मी मातोश्री ला वचन दिले होते की मी मरेपर्यंत हा भेद
खोलणार नाही की मी कौंतेय आहे, तुम्हां सर्वांचा मोठा भाऊ,
जेव्हा मातोश्री ने मला सांगितले की तू ह्या संसार मध्ये एकटा
नाहीस अजून तुझे पाच भाऊ आहे, तेव्हा विचार कर माझी
काय दशा झाली असेल ती. मी मातोश्री ला वचन दिले होते
की युद्ध समाप्ती नंतर आपले पाच पुत्र अवश्य जिवंत राहतील. त्यांचा एक पुत्र कमी होईल.आणि मला माहित होते त्यांच्या सहा पुत्रातून कमी होणारा पुत्र मीच असेन."
" हा निर्णय घ्यायला आपल्याला कोणी अधिकार दिला ?
वीरगतीला प्राप्त होणारा पुत्र आपणच का ? मी का नाही ?"
दुसरा का नाही ?"
" हा निर्णय मी घेतला नव्हता तर विधी ने घेतला होता
की माताच्या सहा पुत्रा मधून मीच कमी होणार , कारण हे आहे की त्यांच्या सहा पुत्रा पैकी मी एकच पुत्र आहे जो असत्याच्या पक्षात होतो. आणि मी असत्याचा पक्षात आहे
हे माहीत असूनही मी त्याचा साथ सोडू शकलो नाही.कारण
मी मजबूर होतो ."
" मजबूर ....का होतास मजबूर ? आणि असत्याचा का साथ देत होतास ? दुसरीकडे सत्य बाहू पसरून तुझी वाट होते."
" त्या सत्याची बाहू माझ्यापासून इतकी दूर होतो की मी
त्याना पाहू सुद्धा शकत नव्हतो.मी दुर्योधनाच्या निष्ठतेची दोरी पकडून त्याच्या मैत्रीचे बोट पकडून मी त्याच्या मागे डोळे
मिटून चाललो होतो. मी दुर्योधनाचा ऋणी होतो त्याचे ऋण फेडल्या शिवाय मी तुमच्याकडे येऊ शकत नव्हतो. माझा
मृत्यूच त्यातून सुटका करू शकत होता. म्हणून मी अति
प्रसन्न आहे, की माझे शरीर तर त्या नरकातून बाहेर पडू शकले नाही.परंतु आत्मा त्या नरकातून बाहेर पडला."
" मोठा स्वार्थी आहेस तू दादा.स्वतःची सुटका करून
घेतलीस नि मला ठेवतेस तीळ तीळ मरायला. मला दिवस
रात्र एकच गोष्ट सतावते की मी माझ्या मोठ्या भावाचा हत्यारा आहे. मी माझ्या जेष्ठ बधुंची हत्या केली हे पाप मला
आयुष्यभर सतावत राहणार दादा. सतावत राहणार."
" अनुज तू दुःखी होऊ नकोस.तू माझा वध नाही केलास.
तर मी तो करवून घेतला. कारण तुझ्या हातून मृत्यूच माझे
मुक्तीचे द्वार खोलू शकत होती. म्हणून आज मी एकदम
प्रसन्न आहे की माझा मृत्यू तुझ्या हातून नि केशव च्या समोर
झाला. मी धन्य झालो. माझा मृत्यू संसार च्या सर्वात महान
योद्धाच्या हातून झाला. जर तुझ्या ऐवजी दुसऱ्या कुणाच्या
हातून माझा मृत्यू झाला असता तर जिवणाचा शोक झाला
असता नि मारण्याचा ही शोक झाला असता. ये अनुज माझ्या गळ्याला लाग. जिवंत पणी ही इच्छा पूर्ण हाऊ शकली नाही
परंतु आता कोणतेही बंधन नाहीये. ये माझ्या गळ्याला लाग." असे म्हणताच अर्जुन पळतच जाऊन कर्णाच्या गळ्याला लागतो. परंतु क्षणभरच. दुसऱ्या क्षणी कर्णाची आत्मा अदृश्य होते. अर्जुन किती वेळ दादा ss दादा ss करत किती वेळ तरी रडत बसला होता.
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा