महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu. |
दु:शासन एकदम घाईघाईने दुर्योधनाच्या कक्षेत प्रवेश
केला. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित हास्य पाहून
दुर्योधनाने विचारले ," अनुज दु:शासन आज फार खुश दिसतोस अर्थात निश्चितच काही खुशखबर आणली असणार ?"
" हो खुशखबरच आहे भ्राताश्री अभिनंदन !"
" काय खुशखबर आहे ?"
" आपला सर्वांचा चिंतेचा विषय जो बनला होता. मोर्वीचा
पुत्र बर्बरीक ....?"
" हां काय झालं त्याचं ?"
" आपल्या मार्गातून कायमचा दूर झाला."
" तो कसा काय ?"
" त्याचा वध झाला."
" त्याचा वध झाला ....पण कुणी केला ?"
" स्वतः वासुदेव कृष्णा ने ."
" पण का ?" कर्णा ने विचारले.
" ऐकायला असं मिळालं आहे की त्याने आपल्या गुरू
विजयसिद्धीसेंन ला वचन दिले होते की जो पक्ष निर्बल असेल त्यांच्या बाजूने तो युध्द करणार ? त्यामुळे पांडवांना
चिंता पडली की कुरुसेना निर्बल झाली तर तो आमच्या
पक्षात येईल म्हणून वासुदेव ने त्याचे मस्तक धडा वेगळे
करून पांडवांची चिंता दूर केली."
" ऐकलेस मित्र कुरुसेना निर्बल होईल असे पांडवांना वाटले नि त्यांनी आपल्याच वंशाचा बळी घेतला नि तू म्हणत
होतास की मी करत होतो ते चुकीचे होते."
" हो ते चुकीचेच होते. पूजा मध्ये लिन असलेल्या निःशस्त्र
व्यक्तीचा वध करणे एकदम नीच कार्य होते ते. म्हणून मी
तुला ते करू दिलं नाही."
" हो बरोबर आहे तुझे. त्याबद्दल मी तुझा आभारी आहे.
परंतु एक गोष्ट चांगली झाली आणि ती म्हणजे बर्बरीकचा वध त्यांनी स्वतःच केला. त्यामुळे नवजात शिशुच्या रक्तात माझे हात रंगले नाहीत."
" स्वतः वासुदेव ने त्याचा वध केला म्हणजे तो सामान्य
वीर नव्हताच हे सिद्ध होते यावरून." अंगराज कर्ण उद्गारला.
मोर्वी कुरुक्षेत्रावर वर आली जिथे बर्बरीक चे मस्तक
ठेवले होते. तिने रडतच विचारले ," असे का केले वासुदेव ?
माझा पुत्राने काय अपराध होता तुझा ? हत्यारे , अन्यायी मी
तुझे तुकडे तुकडे करून टाकीन."
" पुत्रवधू sss भीमसेन मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला
तेव्हा वासुदेव त्याना रोखत म्हणाले ," थांबा.बोलू दे तिला
पुत्राच्या वधाने क्रोधीत झालेली माता बोलत आहे."
" मोर्वी मी तुझ्या पुत्राचा वध नाही केला."
" खोटे बोलताय तुम्ही ....तुम्ही नाही मारले तर कोणी
मारले माझ्या पुत्राला ?"
" मी तुझ्या पुत्राला नाही मारले. मी फक्त त्यांच्या कडे गुरुदक्षिणा म्हणून त्याचे मस्तक मागितले आणि त्याने ते स्वतःच दिले. तुला खोटे वाटत असेल तर तू स्वतःच विचार
त्याला."
" हां मातोश्री ! मी स्वतःच माझ्या हातानी माझे मस्तक कापून आजोबांना गुरुदक्षिणा म्हणून देऊन टाकले."
" ह्या मध्ये सुध्दा ह्यांचीच काहीतरी चाल असेल. हे छलिया आहेत. काहीतरी युक्ती करून तुझे मस्तक धडा वेगळे केले असणार."
" परंतु मातोश्री मी मेलो कुठं आहे, मी तर जिवंत आहे.
कारण मृत व्यक्ती कधी बोलते का ? आजोबां माझा
प्राण पण मागू शकत होते. परंतु त्यांनी असे केले नाही."
" परंतु हे सर्व काय आहे ? तुझे मस्तक धडापासून वेगळे
का आहे ?"
" ती तर मी गुरुदक्षिणा दिली आहे. उलट तुला तर
अभिमान वाटायला पाहिजे की तू अश्या पुत्राला जन्म दिलास जो श्रीकृष्णा सारख्या गुरुला गुरुदक्षिणा देऊ शकला."
" परंतु एवढी कठोर गुरुदक्षिणा मागायची श्रीकृष्णाला
गरज काय पडली ?"
" आजोबांनी तर आपल्या सर्वांच्या कुंकूची रक्षा केली."
" कुलवधू मोर्वी तू महान आहेस , म्हणून तुझ्या पोटी असा महावीर पुत्र जन्मला आला. ह्याने महान त्याग केला.
धर्म आणि अधर्माच्या विरुद्ध होणाऱ्या युद्धात ह्याने धर्माची मदत केली आहे,ह्याचे नाव सदैव आदर सहित घेतले जाईल. उद्या येणारे युग तुझ्या पुत्राची बर्बरीकाची महात्मा म्हणून पूजा केली जाईल." हे ऐकून मोर्वी ने आपले दोन्ही हात जोडून वासुदेवाची क्षमा मागितली आणि आपल्या सासाऱ्यांची पण क्षमा मागितली नि सर्वाना उद्देशून म्हणाली ," मला आपण सर्वांनी माफ करा, रागाच्या भरात मी नकळत काही काही बोलून गेले." तेव्हा वासुदेव म्हणाले ," तुला क्षमा मागायची गरज नाहीये. तुझ्या पुत्राने युद्धात भाग न घेऊन आम्हां सर्वांवर उपकार केले आहेत. उलट आम्हीच तुझी माफी.मागतो, आम्हाला हे नाईलाजाने करणे भाग पडले."
तेवढ्यात तेथे हिडींबा पण आली. तसे बर्बरीकाने आपल्या आजीला प्रणाम केला. ती रडतच वासुदेव कृष्णा कडे पाहत म्हणाली ," केशव हे काय केलंत तुम्ही ? माझ्या
नातवाचा जीवन घेतलात तुम्ही जर तुम्हांला असं करायचंच
होते तर मोर्वी आणि घटोत्कचा विवाह का करविला ? शिवाय
त्याचे जीवन घ्यायचेच होते ते त्याला या जगात पाठविलेच
कशाला ?" वासुदेव केशव तिच्या प्रश्नाचे उत्तर देणारच होते
इतक्यात तेथे महर्षी व्यास प्रगट झाले. सर्वांनी त्याना प्रणाम
केला. तेव्हा ते म्हणाले ," कुलवधू हिडींबा तुला आठवतंय
जेव्हा तू मला ह्याच्या युवावस्था विषयी विचारले होतेस."
" हो चांगलेच आठवतंय."
" तेव्हा मी गप्प राहिलो होतो त्याला कारण हेच होते.
ह्याचे श्रीकृष्णाच्या हाताने बलिदान होणार आहे, हे विधीचे
विधान आहे त्याला स्वत: श्रीकृष्ण सुद्धा बदलू शकत नव्हते.
शिवाय तुला मी असंही म्हणालो होतो की ह्याच्या युवावस्था मध्ये अशी काही घटना होणार आहे की त्यामुळे ह्याला वासुदेव महान बनविणार आहेत की ह्याची सारा संसार पूजा
करील. तुझ्या नातवाला महान बनविले.
त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी
रणभूमीवर आपल्या साऱ्या संगेसबंधीना पाहून अर्जुनाच्या
मनात त्यांच्या विषयी प्रेम भावना निर्माण झाली. युध्द न
करण्याचा विचार आला. परंतु वासुदेव कृष्णा ने गीता उपदेश
करून त्याच्या मनातील युध्द न करण्याची भावना काढून टाकली. पहिले दहा दिवस तर पितामहा भीष्मांनी कुरुक्षेत्र
गाजविले. त्यांच्या शौर्याचे वर्णन करावं तेवढे कमीच आहे.
शेवटी श्रीकृष्णाच्या सुचने वरून पांडवांनी पितामहांना आपल्या मार्गातून बाजूला हटविण्याचा उपाय विचारावा लागला. आणि त्यांनी तो सांगितला देखील की माझ्या समोर
जर कोणी स्त्री आली तर मी शस्त्र खाली ठेवीन.त्यावेळीच
अर्जुन ने माझ्यावर शस्त्र प्रहार करावा. दुसऱ्या दिवशी शिखंडीच्या मदतीने पितामहा भीष्मां वर अर्जुनाने शस्त्र
प्रहार केला. शिखंडी राजकुमार जरी असला तरी जन्माला
स्त्री म्हणून आला. म्हणून तो पितामहा भीष्मां साठी स्त्री च
होता. त्यानंतर आचार्य द्रोण युवराज दुर्योधनाच्या सांगण्यावरून युधिष्ठिरला बंदी बनविण्याची योजना बनविण्यात आली. परंतु अर्जुनाच्या उपस्थितीत युधिष्ठिर
बंदी बसनविणे शक्य नव्हते. म्हणून अर्जुनाला युधिष्ठिर पासून दूर घेऊन जाण्याची दुसरी योजना बनविण्यात आली. आणि अर्जुनाला गाफील ठेवून त्या दिवशी चक्रव्यूहाची योजना बनविण्यात आली. अर्जुन आणि वासुदेव व्यतिरिक्त अन्य कोणालाही चक्रव्यूहाचे भेदन कसे करायचे हे माहीत नव्हते. त्यावेळी अभिमन्यू पुढे सरसावला .आपल्या आईच्या गर्भात असताना त्याने आपल्या वडिलांकडून ऐकले होते. ते त्याच्या आईला सांगत होते. आणि सुभद्रा ऐकता ऐकता मध्येच झोपली त्यामुळे चक्रव्यूहात प्रवेश कसा करायचा एवढाच फक्त अभिमन्यू शिकला. त्यातून बाहेर कसे पडायचे हे त्याने ऐकले नव्हते. म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. आणि त्यात संधीचा फायदा उचलून सात महारथीनी त्याची हत्या केली. त्यानंतर जयंद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली. परंतु त्याचा वध कसा करता येईल या बद्दलची सारी माहिती श्रीकृष्णाने त्याला दिली आणि ऐनवेळी सूर्यास्त भासवून अर्जुनाची मदतही केली. त्यानंतर आचार्य द्रोणाना युध्द भूमीवरून कसे हटवायचे या बद्दलची युक्ती देखील श्रीकृष्णाने , अर्जुनाला सांगितली. परंतु ती गोष्ट करण्यास अर्जुन तयार झाला नाही, म्हणून मग ते काम भीमाला करायला सांगितले. भीमाने आपल्या गदेने अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा वध केला नि खोटी अफवा फसरविली की मी अश्वत्थामाचा वध केला. त्यामुळे आचार्य द्रोणानी हे खरे की खोटे हे जाणून घेण्यासाठी सत्यवादी युधिष्ठिराकडे गेले. तेव्हा युधिष्ठिर ने अर्धसत्य बोलून त्यांची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांनी आपली शस्त्र खाली ठेवली नि ध्यानस्थ बसले, त्याच संधीचा फायदा धृष्टद्युम्नाने घेतला नि त्यांचा वध केला. त्यानंतर भीमाने दु:शासनाचा हात त्याच्या सांध्यातून उखडून त्याची छाती फाडली नि त्याचे रक्त पिऊन आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. अंगराज कर्णाला तो निःशस्त्र असताना अर्जुनाने त्याचा वध केला. कारण अंगराज कर्णाने सुद्धा अर्जुनाच्या पुत्राला अर्थात अभिमन्यूला निःशस्त्र असताना वध केला होता. आता राहिला दुर्योधन तर त्याला गदा युध्द मध्ये दुर्योधनाची मांडी भीमाने फोडल्या नंतर दुर्योधन तेथेच रणभूमीवर पडला. त्यावेळी मात्र हस्तिनापूरात संजय कडून युद्धाचे वर्णन ऐकून महाराज धृतराष्ट्र एकदम विव्हल होऊन म्हणाले ," युद्धात आमची पराजय झाला. हे सर्व कसे झाले संजय ? दुर्योधन तर म्हणत होता की त्याला कोणीही पराजित करू शकणार नाही. कारण त्याच्या सोबत
तातश्री भीष्म होते, आचर्य द्रोण होते, कृपाचार्य , अंगराज
कर्ण , अश्वत्थामा असे अनेक महावीर होते तरी सुद्धा आमच्या सैन्येची पराजय झाली. कसे झाले हे सर्व ?"
" मी सांगू आर्यपूत्र , आपल्या दुर्योधनाकडे सर्वकाही होते
परंतु त्याच्या जवळ धर्म नव्हता. वासुदेव कृष्ण नव्हते."
" पण त्यांची सैन्या तर होती." महाराज धृतराष्ट्र उद्गारले.
त्यावर संजय म्हणाला ," नायक विना सैन्या काय कामाची
नायक तर दुसऱ्या पक्षात आपला चमत्कार दाखवत होता."
" मी तर युध्दा पूर्वीच युद्धाचा निर्णय काय असेल तो
सांगितला होता. परंतु आपण माझं एक ऐकले नाही हा त्याचा परिणाम आहे."
" परंतु संजय माझा पुत्र कसा आहे , तो जिवंत तर आहे
ना ? सांग संजय सांग मला ." परंतु संजय काहीच बोलत
नाही. तसे महाराज म्हणाले ," संजय मौन धरू नकोस. सांग
मला माझा पुत्र कसा आहे ?" तेव्हा संजय म्हणाला ," हां
युवराज अजून जिवंत तर आहेत. परंतु भरपूर घायाळ आहेत, तडफडत आहे, मृत्यूची वाट पाहत आहेत. परंतु मृत्यू त्याना येत नाहीये. फक्त हुलकावणी देत आहे."
" असं का होत माझ्या पुत्रा सोबत ?"
" कदाचित आपल्या दर्शनाची ते वाट पाहत असावेत."
" मी जाणार नाही त्याला पाहायला कारण मला त्याची
ती दुर्दशा पाहवणार नाहीये."
" परंतु त्याच्यावर ही पाळी कोणी आणली आपणच ना ? जर पुत्र मोहाची सीमा निर्धारित केली असती तर आज आपल्या पुत्राची ही अवस्था झाली नसती. संजय मला घेऊन चल तू माझ्या पुत्राकडे , कारण मी त्याची आई आहे, मला त्याचे अंतिम दर्शन घेऊ दे. चल."
" गांधारी मी पण येतो. संजय आम्हां दोघाना पण घेऊन
चल." तसा संजय त्या दोघांना घेऊन निघाला. आणि थोड्याच वेळात कुरुक्षेत्रावर पोहोचले. जिथे दुर्योधन विव्हळत पडला होता. संजय ने त्या दोघांना सुरक्षा रक्षक
उभे होते तिथपर्यंत आणून सोडत तो म्हणाला ," माझी सीमा
इथं समाप्त होते. इथून पुढे आपण जावे." तेव्हा मग त्या दोघांनीही एकमेकांचा हात पकडून दुर्योधनाच्या आवाजाच्या
दिशेने निघाले. महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," पुत्र दुर्योधन कुठं
आहेस तू ?" तेव्हा दुर्योधन उद्गारला ," पिताश्री मी इथं आहे."
ते दोघेही चाचपडत कसेतरी दुर्योधन जवळ येऊन पोहोचले.
तेव्हा महाराज धृतराष्ट्रानी विचारले ," पुत्र दुर्योधन जास्त
त्रास होतोय का तुला ?" त्यावर दुर्योधन म्हणाला ," माझ्या
साऱ्या शरीरावर घावच घाव आहेत पिताश्री !"
" पुत्र दुर्योधन हे काय झालं बरं ?" गांधारी ने विचारले.
" तेच झाले जे व्हायला हवं होतं. आपण तर मला युध्द
सुरू होण्यापूर्वी विजयीश्री चा आशीर्वाद दिला नव्हता. फक्त
आयुष्यमान भव असे म्हटले होते. म्हणून मी अजून जिवंत
आहे, मृत्यूची वाट पाहतोय परंतु तो मृत्यू सुद्धा आपल्या
प्रमाणेच रुसला आहे माझ्यावर, फक्त हुलकावणी देतोय."
" आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला काय वाटतं मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही.
तुला पोटात नऊ महिने पाळले नाही का तुझ्या जन्माच्या
वेळी प्रसूतीच्या यातना सहन केल्या नाहीत. तुला काय माहीत आपल्या आईचे दुःख कोणतीही माता जेव्हा तिच्या पुत्रांचा अकस्मात मृत्यू होतो तेव्हा तिच्या मनावर काय परिणाम होतो ते. मी माझ्या नव्यांनव पुत्रासाठी रडली आहे, आणि आता शंभरव्या वेळी मी रडू इच्छित नाही. म्हणून मी
तुला मरु देणार नाहीये पुत्र मी तुला मरु देणार नाहीये." अश्या त्या रडत रडत म्हणाल्या. त्याच क्षणी दुर्योधन म्हणाला, " नाही मातोश्री असा अनर्थ कदापि करू नकोस.
तुझा हा पुत्र पराजय नि जीवन दोन्ही एकसाथ जगू शकत
नाहीये. पांडवांची विजयी पताका आकाशात फडफडत आहे, आणि करुवंशचा अभिमान मातीत मिसळला आहे, माझा अभिमान चकनाचूर झाला आहे. पांडवांचा सर्वत्र जयजयकार सुरू आहे, नि माझा झालेला पराजय मला जगू देणार नाहीये. तेव्हा मला जगायला सांगू नकोस माते. हां तुझ्या मनात आपल्या पुत्रा विषयी थोडासा जरी प्रेम आहे तर ईश्वर कडे प्रार्थना कर की मला मरण यावे लवकरी ! आणि पिताश्री ना पण सांग दोघांनी मिळून प्रार्थना करा की माझ्यावर मृत्यू ने लवकरात लवकर आपला अधिकार गाजवावा." तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," तिला काय सांगतो आहेस पुत्र ? तिच्या सोबत तर सर्वांनीच कपट केलं आहे, विद्यात्याने सुध्दा आणि आपल्या नि परक्या दोन्ही लोकांनी कपट केले आहे आणि आता तू देखील आमच्याशी कपट करून आम्हाला सोडून जात आहेस. आता आम्ही कोणासाठी जगावे ? आणि खरे सांगू पुत्र तुला पांडवांनी नाही मारले तर माझ्या उच्चकांक्षा ने मारलंय तुला. " किंचित थांबून लगेच पुढे म्हणाले ," गांधारी चल आपल्याला इथून निघायला हवं. कारण माझ्या पुत्राचे प्राण निघण्याचे दृश्य मला पाहवणार नाहीये. गांधारी चल इथून." असे म्हणून ते तिला रापायला लागले -- कुठं आहेस तू गांधारी ?" त्यावर गांधारी स्फुंदत स्फुंदत म्हणाली ," मी इथं आहे आर्यपूत्र !" तिचा हात त्यांच्या हातात येताच ते तिला खेचू लागले. नि म्हणू लागले की , चल गांधारी ! " तेव्हा गांधारी उद्गारली ," मी नाही येणार माझ्या पुत्राला एकट्याला सोडून." तेव्हा दुर्योधन म्हणाला, " मातोश्री पिताश्री योग्य तेच बोलत आहेत, माझ्या अखेरच्या क्षणी मला एकट्यालाच राहू द्या. कारण माझा
पराजय नि मी एकटेच राहू इच्छितोय. आणि हां मातोश्री माझी एक शेवंतची इच्छा आहे की तू माझे मस्तक आपल्या मांडीवर घ्यावे. बस्स ! एवढीच एक इच्छा !" असे म्हणताच
गांधारी ने त्याचे मस्तक आपल्या मांडीवर उचलून घेतले.
नि म्हणाली ," सर्वांत माझा लाडका पुत्र तू आहेस ." पण ते
ऐकायला दुर्योधन जागा होता कुठं ? त्याला आपल्या आईच्या मांडीवर शांत झोप लागली होती. बराच वेळ झाला तरी दुर्योधन बोलेना म्हणून महाराज धृतराष्ट्रानी विचारले ," तू बोलायचं बंद का झालास ? बोल पुत्रा बोल. काहीतरी बोल." तेव्हा गांधारी म्हणाली ," मोठ्या ने ओरडू नका माझा पुत्र शांत झोपला आहे, त्याची झोपमोड करू नका आर्यपूत्र !" तसे महाराज धृतराष्ट्र खाली बसले नि आपल्या हाताच्या स्पर्शानी त्याला चाचपून पाहू लागले. जेव्हा त्यांचा हात दुर्योधनाच्या डोळ्यावर गेला तेव्हा त्याना जाणवले की दुर्योधनाने आपले डोळे मिटले आहेत. तेव्हा गांधारी ने दुर्योधनाचे मस्तक अलगद भूमीवर ठेवून देत म्हणाली," चला आर्यपूत्र आपला पुत्र शांत झोपला आहे , त्याची झोपमोड करू नका." असे म्हणून त्या उठून उभ्या राहिल्या नि महाराज धृतराष्ट्राचा हात पकडून तेथून प्रस्थान केले.
. क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा