महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu. |
दु.शासन आला तसा दुर्योधन आणि कर्णा ने आपला
वार्तालाप थांबविला. कारण त्या दोघांनाही माहीत होते की
दु.शासन इतक्या तातडीने आला म्हणजे काही ना काही
खबर घेऊन आलाच असेल , म्हणूनच की काय ते दोघांनी ही त्यांनी आणलेली खबर ऐकण्यासाठी उत्सुकतेने आपले कान
टवकारले. परंतु दु.शासन मात्र त्याचा अर्थ वेगळाच समजला.
म्हणूनच की काय त्याने विचारले ," तुम्हां दोघं कोणत्यातरी गंभीर विषयावर चर्चा करत होता की काय ? जे मी मध्येच
येऊन त्यात व्यथय आणलंय ?" त्यावर दुर्योधन उद्गारला," छे
छे छे ! तसं मुळीच नाहीये." तेव्हा दु.शासनाने विचारले, " तसे
जर नाहीये तर मी आल्यावर तुम्ही दोघे गप्प का झालेत ?"
त्यावर दुर्योधन हसून म्हणाला ," ते होय ? तू काय नवीन
खबर आणली असशील म्हणून आम्ही आमचं बोलणे थांबवून तू काय खबर आणलीस ते ऐकण्यासाठी कान टवकारले बस्स ! तुला काय वाटलं की आम्ही तुझ्या पासून
काही लपवीत आहोत ?"
" असं कसं मी म्हणेन ?"
" मग सांग बरं काय नवीन खबर आणलीस ?"
" नवीन खबर ही आहे की बर्बरीक आल्यामुळे आमच्यासाठी चिंता करण्याचा विषय बनला आहे, हे तर
आपल्या सर्वांना माहीत आहेच. परंतु पांडव पक्षा मध्ये ही
खळबळ मांजली आहे. त्या मागे काहीतरी रहस्य लपले आहे." तेव्हा दुर्योधन ने ना समजून विचारले ," पांडव पक्षात
खळबळ मांजण्याचे काय कारण ?" दु.शासन उद्गारला ," तेच
तर माहीत नाहीये ना ?" तेव्हा कर्ण उद्गारला ," मग त्या
रहस्याचा शोध घे अगोदर , कारण ते राहस्यच आमच्या
समस्या चे समाधान असेल."
दुसरीकडे बर्बरीक पितामहा भीष्मांना भेटायला त्यांच्या
कक्षेत गेला असता पितामहांची पाठ त्याच्याकडे होती.
तेव्हा बर्बरीक ने त्याना प्रणाम केला नि त्याना आपला परिचय देण्याचा प्रयत्न करणार एवढ्यात पितामहांच म्हणाले," तुला आपला परिचय देण्याची गरज नाहीये. तुझ्या चेहऱ्यावरचे चमकच सांगतेय की तू माझा सितु आहेस, भरतवंशीचा अभिमान भीमसेन चा नातू आणि महावीर घटोत्कचा पुत्र बर्बरीक आहेस. बरोबर ना ?" त्यावर बर्बरीक म्हणाला ," आपण अगदी बरोबर ओळखलेत मला."
" ये अगोदर मला आलिंगन दे पुत्र !" असे म्हणताच बर्बरीक ने त्याना अलींगन दिले. त्यानंतर बर्बरीक म्हणाला ,
" आपल्याला भेटून मला जो आनंद झाला आहे, त्याचे मी शब्दात वर्णन करू शकत नाहीये. आपल्या सारख्या महापुरुषांची भेट व्हायला पण सौभाग्य असावे लागते. आज मला वाटते पितामहां की मी प्रत्यक्षात ईश्वराचे दर्शन घेतोय."
" मी असं ऐकलं आहे की तुझी शक्ती समुद्रा सारखी विशाल आणि हिमालयासारखी उंच प्रतीची आहे."
" म्हणूनच मी आपल्याला भेटायला आलोय."
" अच्छा मला भेटायला येण्याचा उद्देश माझे दर्शन घेणे नसून काही उद्देश घेऊन आलाय."
" उद्देश तर आहेच परंतु आपले दर्शन घेतल्या शिवाय
मी धन्य झालो नसतो. आपल्या सारख्या महापुरुषांचे दर्शन
घेणे म्हणजे आपले जीवन कृतार्थ झाल्या सारखे आहे. परंतु
माझी आपल्याला एक विनंती आहे पितामहां !"
" विनंती कसली वत्स ?"
" मी असं ऐकलं आहे की ह्या महायुद्धा मध्ये कुरुसैन्याचे
नेतृत्व आपण करणार आहात म्हणून."
" योग्य तेच ऐकले आहेस तू "
" परंतु माझी अशी इछा आहे की आपण या युद्धात
भाग घेऊ नये."
" का बरं ?"
" माझी इच्छा नाही की माझ्या शक्तीचा प्रयोग अश्या
महापुरुषावर केला जावा.जो महापुरुष या युगातच नाही तर येणाऱ्या प्रत्येक युगा मध्ये त्यांचे वर्णन वीरता मध्ये तर घेतले
जाईलच. परंतु वचन पूर्ण करण्या मध्ये सुद्धा आपल्या सारखा दुसरा कोणी होऊ शकणार नाहीये."
" अजून एक मार्ग आहे."
" कोणता पितामहा ?"
" ह्या युध्यात तू भाग घेऊ नकोस."
" ते कसे शक्य आहे पितामहा ? मी आपल्या परिवारासाठी वचन बध्द आहे."
" मग जे तू करू शकत नाहीस ते मला का करायला
सांगतोस ?"
" मी आपल्या कडे भिक्षा मागत आहे."
" भिक्षे मध्ये कुणाचा धर्म मागितला जात नाहीये पुत्र. मी कुरुसैन्याचा प्रधान सेनापती म्हणून मला या युद्धात भाग घेणे अनिवार्य आहे. आणि माझा तो धर्म ही आहे."
" मला चिंता ह्याची आहे की मला मिळालेले वरदान आणि शक्ती आपल्याला हानी पोहोचू नये."
" कदाचित तुला हे माहीत नसेल की मला मिळालेल्या
वरदाना पुढे कोणतेही वरदान जास्त वेळ ठिकू शकत नाहीये.
वत्स मला इच्छा मृत्यूचे वरदान मिळालेले आहे, म्हणून माझा
कुणी वध ही करू शकणार नाही, आणि पराजित ही करू शकणार नाहीये."
" मग पितामहा मी काय करू ?"
" तुही तेच कर जे करायचा निश्चय केला आहेस, आणि
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतः शोधण्याचा प्रयत्न करू नकोस.
सर्वकाही नियती वर सोडून दे."
" माझी अशी कदापि इच्छा नाही की माझा नि आपला
सामना रणभूमीवर होवो !"
" इथं आपल्या इच्छेनुसार काही होत नसते पुत्र कारण तसं जर झालं असतं तर माझी इच्छा होती की हे युध्द होऊ नये. परंतु युध्द आता टळणार नाही हे मला कळून चुकलं म्हणून आता आपली भेट रणभूमीवरच होईल." पितामहा भीष्म म्हणाले. त्यानंतर बर्बरीक ने त्यांचे चरणस्पर्श केले. त्यांनी त्याला आयुष्यमान भव चा आशीर्वाद दिला. त्यानंतर बर्बरीक तेथून चालता झाला.
पांडव एकत्र बसून बर्बरीक विषयी आपसात विचार विनिमय करत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला ," मोठ्या दादा काही करून बर्बरीकाला युद्धात भाग घेण्यापासून रोखायलाच हवं आहे."
" हां परंतु कसे ?" युधिष्ठिर ने प्रश्न केला. तेव्हा नकुल
म्हणाला ," अशी पण कुरुसेना फार विशाल आहे, त्यात
आणखीन बर्बरीक जाऊन मिळाला तर आमचा पराजय
निश्चितच आहे." त्यावर युधिष्ठिर म्हणाला ," अनुज वैध्य सर्व
रुग्णाच्या रोगाचे निदान करतो .परंतु त्याला स्वतःच्या रोगाचे
निदान करता येत नाही. तसाच बर्बरीक आपला अंश त्याच्या
विषयी विचार करताना आपल्याला शंभर वेळा विचार करायला हवे आहे." तेव्हा अर्जुन म्हणाला ," परंतु मोठ्या दादा , सत्य नि असत्य, धर्म नि अधर्म , न्याय नि अन्याय या
सर्वांचा या महायुद्धात धर्म, नीती, सत्याचा जर पराजय झाला तर नवीन येणारी प्रत्येक पिढी या अपराधा बद्दल
आपल्याला कधी क्षमा करणार नाही." तेव्हा भीमसेन उठून उभा राहत म्हणाला, " जर रोगावरचे औषध विषच असेल तर ते विष प्यावेच लागणार, म्हणून बर्बरीक जर आपल्या कुल आणि परिवार साठी संकट बनत असेल तर मीच त्याला समाप्त करून टाकतो. मी माझ्या हाताने त्याचा वध करतो." तेवढ्यात तेथे महर्षी व्यास आले नि भीमसेन ला उद्देशून म्हणाले ," बर्बरीकाला मारणे एवढं सोपे नाहीये भीमसेन तुझ्या शक्तीच्या पलीकडचे आहे ते. तिथं तू पोहोचू पण शकत नाहीस. बर्बरीकाची सीमा तोच पार करू शकेल जो प्रत्येक सीमेचे अंत ही आहे नि आरंभ सुध्दा आहे. जो शक्ती प्रदान करतो तोच ती शक्ती परत घेऊ शकतो. अशी एकच व्यक्ती आहे संसार मध्ये आणि ती व्यक्ती दुसरी व्यक्ती कुणी नसून देवकीनंदन श्रीकृष्ण आहे, तेच बर्बरीक या समस्यांचे समाधान करू शकतात. अन्य कुणी नाहीये." वासुदेवाचे नाव
काढताच तेथे वासुदेव हजर होतात." प्रणाम ऋषींवर "
वासुदेव कृष्ण उद्गारले. तेव्हा महर्षी व्यासांनी आशीर्वाद देत
म्हंटले ," चिरंजीवी भव !" तेव्हा वासुदेव कृष्णा ने विचारले,
" कोणत्या विषयावर चर्चा सुरू होती ?" तसा भीमसेन
म्हणाला ," बर्बरीकाला रोखा वासुदेव नाहीतर अनर्थ होईल."
" यासाठी वासुदेवाला मोठा कठोर निर्णय घ्यावा लागेल."
" निर्णय कठोर वा विनम्र नसतो महर्षी ! त्याचा संबंध न्याय
आणि अन्यायाशी असतो . जर निर्णय न्यायच्या पक्षात
असेल तर तो न्याय समजला जातो आणि ज्याच्या विरुध्दात जातो तो त्याला अन्याय समजतो. प्रश्न असा की आम्ही
कोणता निर्णय घेतला तर तो आपल्या सर्वांना मान्य असेल
का ?" त्यावर अर्जुन म्हणाले ," आपल्या हाताने कोणतेही
अनुचित कार्य होऊ शकत नाहीये."
" आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. म्हणून लवकरात लवकर निर्णय काय तो घ्या नि आम्हाला
या संकटातून मुक्त करा." त्यावर महर्षी व्यास म्हणाले ," जे
विधीने आपल्या लेखणीने लिहिले आहे ते आपण पण बदलू
शकत नाहीयेत."
बर्बरीक एका झाडाखाली ध्यानस्थ बसला होता, तेवढ्यात तेथे वासुदेव कृष्ण येतात.तेव्हा त्यांच्या पावलांच्या आवाजाने बर्बरीका ने आपले डोळे उघडले. तेव्हा वासुदेव
म्हणाले ," तुझ्या ध्यानात मी व्यथय तर नाही आणलं ना ?"
" व्यथय तर जरूर आणलं. परंतु व्यथय जर आलं नसतं
तर मला आपले दर्शन कसे झाले असते आजोबा ! ज्या फुलाचा सुगधं सर्वत्र पसरतो तेच फुल जर आपल्या समोर कुणी आणून ठेवले तर आपले डोळे बंद कसे राहतील बरं ? त्याला पाहण्याचा मोह टाळता येणार आहे का ? आणि खरे सांगायचे तर मी आपलेच ध्यान करत होतो आजोबा. परंतु आपण इथं येण्याचा त्रास का घेतला ? मला बोलवायचं होते ना ?"
" अवश्य बोलविले असते वत्स ! परंतु विधीचे विधान आहे की तहान लागलेल्या माणसाने स्वत: विहिरीकडे जायचं असतं. विहीर तहान लागलेल्या माणसाकडे येत नाही कधी !"
" याचा अर्थ माझ्या सेवेची गरज आहे आपल्याला."
" होय ."
" हे मी आपले भाग्य समजतो की आपली काही सेवा करू शकेन. फक्त आज्ञा करा आजोबा."
" तुला गुरू विजयसिद्धीसेंन दिलेल्या तीन बाणांचा महिमा तर सांगितलंस, परंतु अद्याप बाण दाखविलेस नाही मला."
" आता दाखवितो." असे म्हणून बर्बरीक झाडाच्या खोडापाशी गेला नि वृक्षाखाली ठेवलेले बाण घेऊन आला आणि दाखवू लागला. तसे वासुदेव कृष्ण म्हणाले ," ह्या बाणांच्या चमत्कारा विषयी माहिती सांग वत्स !" तेव्हा बर्बरीक म्हणाला ," हा पहिला बाण ह्याला सिंधुर लावून ज्या शत्रूवर सोडला जाईल तो शत्रू कुठंही जरी लपला असेल त्याला शोधून काढील , आणि हा दुसरा बाण त्या सर्व
शत्रूंना समाप्त करील."
" आणि हा तिसरा ?"
" त्याची गरजच भासणार नाहीये."
" मग ह्यांचा चमत्कार पाहण्याची इच्छा पण तेवढीच झाली
आहे, जरा दाखवितोस का ह्यांचा प्रयोग करून."
" परंतु इथं कोणावर करू ? इथं तर कुणी शत्रू नाहीये."
" असे समज की हे झाड ज्या झाडाखाली तू ध्यान लावून
बसला होतास. ते झाडच तुझे शत्रू आहे, त्या झाडावर असलेले प्रत्येक पान शत्रू सैनिक आहे , त्यांचा तुला वध करायचा आहे. असे समज." वासुदेव कृष्ण उद्गारले.
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून दोन्ही हात जोडून
नमस्कार केला आणि डोळे मिटून घेतले नि तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटू लागला असतानाच वासुदेव कृष्णा ने त्या वृक्षाचे एक पान तोडून आपल्या पायाखाली लपविले. आणि थोड्याच वेळात एक सिंधुर ची छोटीशी डबी त्याच्या हातात आली. त्यानंतर बर्बरीक ने पहिला बाण उचलला नि त्याचे टोक सिंधुर मध्ये बुडवून बाण धनुष्यावर चढवून वृक्षाच्या दिशेने सोडला. तो बाण वृक्षावरील पानांना एकत्र करत गेला, तसा लगेच दुसरा बाण बर्बरीक ने सोडला.तो बाण वृक्षावरील प्रत्येक पानाचा छेद करत शेवटी खाली आला नि श्रीकृष्णाच्या पायात शिरून पायाखाली लपलेल्या पानाचा ही छेद केला. हे जेव्हा बर्बरीक पाहिले तसा तो पळतच वासुदेव जवळ आला नि म्हणाले ," हे पान इथं कसं आले ?"
" स्वताहून आले नाही ते. मीच ते गुपचुप आपल्या पायाखाली लपवून ठेवलं होतं. ह्यातून काही बचण्याचा मार्ग आहे का हे पाहत होतो. परंतु तुझी सिध्दी अद्भुत आहे. ह्या बाणांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे, तुझे बाण अचूक आहेत."
" आजोबा ,आपल्या ह्या पायाला आता फार सांभाळा.
कारण माझा बाण लागल्याने तो आता कमजोर झाला आहे."
" अच्छा वत्स हे तर सांग की तुझ्या गुरुला तू वचन काय
दिलं होतेस ?"
" हेच की मी सदैव निर्बलांची मदत करेन म्हणून."
" म्हणून पांडव सैन्यात सामील झालास ,कारण पांडव
सैन्या निर्बल आहे,त्यांच्या पेक्षा कुरुसैना विशाल आहे.
शिवाय त्यांच्या सैन्यात मोठं मोठे महावीर आहेत म्हणून ना ?"
" हां आजोबा !"
" पण समज उद्या त्यांचा पक्ष निर्बल झाला तर !"
" तर वचना प्रमाणे मी कुरुसैन्यात जाऊन सामील होईन."
" वचन देताना अजिबात विचार केला नाहीस ?"
" विचार करून जे वचन देतात त्याला वचन नाही व्यापार
म्हटलं जातं."
" आणि जे वचन काही विचार न करता दिलं जातं त्याला
आंधळे जुगार म्हटलं जातं कारण त्यात विजय पण होऊ
शकतो नि पराजय सुद्धा !"
" परंतु माझ्या वचनात असं काहीही नाहीये आजोबा."
" आहे असेच आहे."
" मग सांगा बरं."
" पहिल्यांदा तू पांडव पक्षा कडून युध्द करणार तुझ्या
बाणांनी कुरुसैन्या अस्तव्यस्त होईल. कुरुसेना दुर्बल झाली
की तू तुझ्या वचनांनुसार तू कौरवांच्याच सामील होशील नि
आपल्याच परिवराशी युध्द करशील. मग पुन्हा पांडव पक्षात
पुन्हा कुरुसैन्यात जाऊन सामील होशील हा क्रम चालूच राहील .जोपर्यंत दोन्ही सैन्यातील एक एक योध्दा जिवंत आहे तोपर्यंत युध्द सुरूच राहील. शेवटी केवळ तू शिल्लक राहशील अजेय म्हणून. कौरव ,पाडव कथा बनून राहतील. अश्या परिस्थितीत तू स्वतःला काय म्हणशील ? युध्द जिंकल्याचे समाधान मिळेल का तुला ?" ह्या प्रश्नाने मात्र बर्बरीकाचा मनात फार खळबळ मांजली. तो विचारमग्न झाला. थोड्या वेळ विचार केल्या नंतर म्हणाला ," मी या संदर्भात कधी विचारच केला नाही. नाही आजोबा असं नाही होऊ शकत."
" असेच होईल आणि तुझी विद्या तुझ्यासाठी शाप बनून
राहिल."
" छे छे छे ! असं अजिबात होता कामा नये. आजोबा ह्यावर काही उपाय नाहीये का ?"
" आहे."
" काय उपाय आहे ?"
" तू युद्धात भाग घेऊ नकोस."
" हे कसे शक्य आहे आजोबा ? माझे युधिष्ठिर आजोबा
ज्यांना धर्माचे प्रतीक मानले जाते. त्याना काही झाले तर
धर्मावरील लोकांचा विश्वासच उडेल. परत दुसरे अर्जुन आजोबा धनुर्धर म्हणून सारा संसार ओळखणार आहे त्याना
शिवाय माझे आजोबा भीमसेन , नकुल, सहदेव हे सर्व आजोबा आपला प्राण पणाला लावणार आहेत. यापैकी
एकाला जरी थोडेसे खरचटले तरी माझ्या विध्येवर धिक्कार
आहे, शिवाय मी स्वतःला रोखू शकणार नाहीये. म्हणून
आजोबा दुसरा काही उपाय शोधून काढा."
" तर मग एकच उपाय आहे."
" उपाय सांगा मी करायला तयार आहे, कारण आपण माझे
आजोबा तर आहातच शिवाय मार्गदर्शक सुध्दा आणि शास्त्रांच्या नियमानुसार मार्गदर्शक ही प्रथम गुरू असतो."
" मग तर तुला गुरुदक्षिणा द्यावी लागेल."
" दिली बोला काय देवू मी तुम्हांला गुरुदक्षिणा ? माझा प्राण मागीतलात तरी मी तो देईन. असे मी आपणास वचन देतो." तेवढ्यात तेथे सर्व पांडव येतात नि त्याला वचन देण्यास मनाई करतात. तेव्हा बर्बरीक म्हणाला ," एकदा वचन
दिलं ते दिलं ते परत घेता येत नाही. जसा धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून निघालेले शब्द परत घेता येत नाही तसेच वचनचे सुध्दा आहे मी वचन देऊन मोकळा झालो."
तेव्हा भीम म्हणाला ," धन्य आहेस तू. मला अभिमान
आहे तुझा आजोबा असण्याचा. तू सुद्धा आपल्या आजीसारखा अर्थात हिडींबा सारखाच वचन पाळणारा आहेस." तसा लगेच अर्जुन म्हणाला ," पुत्र मला फक्त वहिनीचाच नाही तर पितामहा भीष्मां सारख्या वचन बध्दतांचा खरा उत्तराधिकारी तू आहेस , मला अभिमान वाटतो आपल्या कुलाचा नि त्या कुळात तुझ्या सारख्या पराक्रमी नि वचनबद्ध महायोध्या ने जन्म घेतल्याचा." असे म्हणून अर्जुन ने बर्बरीकाचा माथा चुंबला.
त्यानंतर बर्बरीक वासुदेव कृष्णा जवळ गेला नि म्हणाला,
" आजोबा सांगा काय गुरुदक्षिणा देऊ मी आपल्याला ?"
वासुदेव कृष्ण म्हणाले ," मला.... " ते पुढे बोलणारच असतात. तेवढ्यात युधिष्ठिर उद्गारला ," नाही वासुदेव नाही." त्यामुळे वासुदेव पुढे बोललेच नाहीत. तसा बर्बरीक म्हणाले,
" आजोबा आपण काही बोलणार होता ? बोला ना ? गप्प का झाले ?" क्षणभर स्तब्दता कोणीच काही बोलले नाही. क्षणभर वेळाने वासुदेव कृष्ण म्हणाले," मला तुझं मस्तक पाहिजे." असे म्हणताच बर्बरीक किंचित विचारमग्न झाला. ते पाहून वासुदेव कृष्णाने विचारले," मौन का झालास ? गुरुदक्षिणा देवू इच्छित नाहीस ? "
" छे छे छे ! तसे नाही आपल्याला गुरुदक्षिणा देणे मी माझं भाग्य समजतो."
" मग मी काही जास्त मागितले का ?"
" छे छे छे ! आपल्या सारख्या गुरूला या पेक्षा कमी गुरुदक्षिणा देणे म्हणजे गुरुदक्षिणाचा अपमान आहे परंतु ..?"
" परंतु काय ?"
" परंतु मी हा विचार करत होतो की कुरुक्षेत्रावर होणारे महायुद्ध या आधी कधी झाले नव्हते आणि नाही या नंतर
सुद्धा होणार नाहीये, असे महायुध्द पाहण्यास मी उतावळा झालो होतो. परंतु आता मला वाटते माझी इच्छा मनातच राहून गेली." तेव्हा वासुदेव म्हणाले," नाही वत्स ! हे महायुद्ध तू पाहू शकशील
हे वचन मी तुला देतो."
" पण कसं शक्य आहे ?"
" तुझे मस्तक धडा पासून वेगळे झाले तरी ते जिवंत
राहील आणि कुरुक्षेत्रावर होणारे संपूर्ण युध्द तू आपल्या
डोळ्याने पाहशील."
" मग उशीर कशाला करताय माझं मस्तक आपल्या समोर
झुकले आहे, करा त्याला धडा वेगळे."
" वत्स गुरुदक्षिणा घेतली जात नाही वत्स ! तर दिली जाते. तू तुझ्या हाताने आपले मस्तक धडा वेगळे करून दे."
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून बर्बरीक आपल्या
आजूबाजूला पाहिले कुठं तलवार दिसते का ?मस्तक धडापासून वेगळे करण्यासाठी तलवार पाहिजे हे भीमाने ओळखले तसा भीम म्हणाला ," थांब." असे म्हणून महर्षी व्यासाना त्याने प्रथम प्रणाम केला नंतर सहदेव कडून तलवार घेतली नि बर्बरीकाच्या समोर धरत भीमसेन म्हणाला," घे पुत्रा नि तुझ्या धर्माचे तू पालन कर." बर्बरीकाने आपल्या आजोबांच्या हातून तलवार घेतली नि आपले मस्तक धडा वेगळे करून वासुदेव कृष्णाच्या स्वाधीन केले. तेव्हा वासुदेव म्हणाले ," आजपासून तुझी ओळख महावीर बर्बरीक नाहीतर महात्मा बर्बरीक म्हणून सारा संसार तुला ओळखेल. आज तू आपले मस्तक देऊन आपल्या कुळाचे नाव रोशन केलेस." असे म्हणून भीमसेनाच्या हाती ते मस्तक देत वासुदेव कृष्ण पुढे म्हणाले , " मजले दादा हे मस्तक कुरुक्षेत्रा जवळ उंच पहाडावर ठेवण्याची व्यवस्था करावी."
घटोत्कच आपल्या शस्त्राना धार लावतच होता. एवढ्यात
मोर्वी रडतच पळत तेथे आली नि म्हणाली ," मोठा अनर्थ झाला स्वामी !" तेव्हा घटोत्कचा ने विचारले ," अनर्थ कसला अनर्थ झाला ? ते सांग ना !" तशी रडतच म्हणाली ," आपल्या पुत्राचा वध झाला." त्यावर एकदम हडबडून घटोत्कच
म्हणाला ," काय बोलतेस तू ? बर्बरीकाचा वध कोण करू
शकेल ? तुला चुकीची सूचना मिळाली असेल."
" नाही हो मी खरं तेच सांगतेय."
" पण कसं शक्य आहे ? त्याला सिध्दी प्राप्त आहे, त्याचा
वध कोण करू शकेल ? पण तरी देखील त्याचा वध कोणी
केला ते सांग. मी आताच जातो नि त्याचे मस्तक धडा वेगळे
करून आणतो." त्यावर मोर्वी म्हणाली ," ज्यांना आपण
वासुदेव कृष्ण म्हणता, केशव म्हणता, श्रीकृष्ण म्हणता !"
" छे छे छे ! हे शक्य नाही. वासुदेव मुळेच तर आपला मिलाप झाला. बर्बरीक सारखा महावीर पुत्र झाला. त्यांनी
तर त्याला मार्गदर्शन केले. विजयसिद्धीसेंन कडे पाठविले
होते ते कसे त्याचा वध करतील ? माझा विश्वास बसत नाही
यावर." तशी मोर्वी चिडून म्हणाली ," मग काय मी खोटी बोलते ?" त्यावर घटोत्कच उद्गारला ," मी असं तर नाही म्हटलं. परंतु मला अजूनही वाटते की तुला सूचना चुकीची
मिळाली आहे." त्यावर मोर्वी ठाम पणे म्हणाली ," अजिबात
नाही. मला मिळालेली सूचना एकदम सत्य आहे."
" जर खरेच वासुदेव ने त्याचा वध केला असेल तर त्याला
तसे कारण ही असेल. चुकीचे कार्य कधी त्यांच्या कडून घडणार नाही."
" आपण जोपर्यंत माझ्या पुत्राच्या वधाचा बदला घेणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाहीये."
" अगं काय बोलतेस तू हे ?"
" आपण हे का नाही सांगत की आपण वासुदेवाचा सामना
करू शकत नाही म्हणून."
" मोर्वी ssss "
" माझ्या पुत्राचा वध पांडवांच्या अनुमतीने झालाय. जर
आपल्याला आपला वंशज प्यारा असेल तर आपण रहा इथंच मी जाते आपल्या पुत्राच्या वधाचा बदला घ्यायला."
असे म्हणून घटोत्कच्या उत्तराची प्रतीक्षा न करता रागाने
तेथून निघून गेली. घटोत्कच फक्त मोर्वी थांब.... मोर्वी .…करतच राहिला. तर दुसरीकडे भीमसेन ने आपल्या नातवाचे
मस्तक कुरुक्षेत्रा जवळ एक उंच भाग पाहून तीन काट्या
जमिनीत रोवल्या नि त्यावर बर्बरीकाचे मस्तक ठेवले.त्यानंतर
वासुदेव कृष्णाने त्याच्या कपाळावर टिळा लाविला नि प्रणाम
केला. त्यानंतर एक एक करून सर्व पांडवांनी त्यांचे अनुकरण केले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा