छत्रपती शिवाजी महाराज ४३ | chhatrapati shivaji maharaj episode 43 | Author :- Mahendranath prabhu
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज ४३ | chhatrapati shivaji maharaj episode 43 | Author :- Mahendranath prabhu |
पण ते सध्या ते दोन्ही मुलुख निजामशाहीत आहेत, ते परत आपल्या ताब्यात घेणे आवश्यक आहे, म्हणून आम्ही आदिलशहा सैन्य वापरून ते दोन्ही मुलुख जिंकून घेतले.
आता ते आपले झाले. अर्थात त्यावर भोसल्यांचा झंडा फडकवला. आता पासून तो मुलुख आपला.तुम्हाला हवे असलेले स्वराज निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे." असे
म्हणताच जिजाबाईंना इतका आनंद झाला की त्याचे वर्णन
शब्दात करता येणार नाही.त्या पळतच शहाजी राजांना बिलगल्या. तेव्हा शहाजी राजांनी त्यांना आपल्या मिठीत घेतले.
पुढे
त्यानंतर शहाजी राजे त्यांना शंभू महादेवाच्या मंदिरात आणतात. जिजाबाई इतक्या खुश होत्या की त्यांना वाटत
असते की शहाजी राजे अजून काही खुश खबर देतात की काय
म्हणून त्या शहाजी राजांना इथं घेऊन येण्याचे कारण विचारतात. तेव्हा शहाजी राजे म्हणाले," आता शंभू महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून संकल्प करू की, या पुढे आमचे विचार बदलणार नाहीत.असे बोलून शंभू महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून संकल्प ही केला की या पुढे आम्हाला स्वराज निर्माण करण्यात यश द्यावे. हीच आपल्या चरणी प्रार्थना." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," भीमा गोदावरी च्या मुलुखात स्वारी नी भोसल्यांचे निशाण फडकावले आहे. आता भीमा,गोदावरी मग भीमा नर्मदा,मग नर्मदा चंबळ अशी चढ्या अंगाने सरशी व्हावी. मग पूर्वीच्या काळी जो जो मुलुख आपलाच होता तो तो मुलुख स्वराज्यात असायला हवा." शहाजी राजे म्हणाले," रक्त आणि घाम गाळून स्वराज्याची ठायी सेवा रुजू करायची शपथ आम्ही म्हणजेच शहाजी राजे भोसले बिन मालोजी राजे भोसले आणि सकल सौभाग्यवती पंडिता जिजाबाई शहाजी भोसले उभय बेलपत्र वाहून घेत आहोत." असे बोलून बेलपत्र हाती घेतले नि मग जिजाबाई म्हणाल्या," हिम्मत बुलंद केली आहे, तुमच्या आशीर्वादाने हे कार्य सिद्धीस न्यावे " असे बोलून दोघांनीही बेलपत्र वाहिली.त्यावेळी गोमाजीनी मंदिरातील घंटा वाजून त्यांना साथ दिली.
विजापूर
शहाजी राजांनी पुणे आणि पाटस जिंकले म्हणून आदिलशहा
मोहम्मद एकदम खुश होतो. त्याला वाटत असते की शहाजी राजांनी निजामशाहीत असलेला मुलुख जिंकून आदिलशाहीत आणला. म्हणून तो बाजी राजे घोरपडे ना म्हणाला की, तुमचं ऐकले असते तर शहाजी राजांना मी उगाच नाराज केले असते." तेव्हा बाजी राजे घोरपडे यांनी आदिलशहा मोहम्मद यास
खरी वस्तुस्थिती काय आहे याची कल्पना दिली तेव्हा मात्र बादशहा हजरत भयंकर चिडला नि त्याने लगेच शहाजी राजांना पकडुन दरबारात हजर करण्याचे त्याने फर्मान सोडले. आणि ती कामगिरी त्याने बाजी राजे घोरपडे यांच्या कडे सोपविली.
दौलताबाद
खंडागळे सरदार ने जेव्हा ही खबर वजीरे आलम फतेह खान ला दिली की पुणे आणि पाटस या मुलुखावर शहाजी राजांनी भोसल्यांचा झेंडा फडकवला. ही बातमी ऐकून फतेह खान भयंकर चिडला. त्याने सरळ खंडागळे सरदार च्या श्रीमुखात एक चपराक ठेवून दिली. आणि त्याला चांगलीच खरी खोटी सुनावली. त्यानंतर ती कामगिरी लखुजी राजे वर सोपविली. गेलेला मुलुख पुन्हा जिंकून निजामशाहीत आणा असे फर्मावले. हो सकता है, उसकी जहागिरी हम आपको देंगे । बस शाहजी राजा को रोकिए जहां शाहजी राजे वहां लखुजी राजे यही होना चाहिए । शाहजी राजे को सिर्फ आप ही रोक सकते है।"
भोसले गढी वेरुळ
जिजाबाई बाळ राजांना एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण मधील बाल कांड अध्याय बारावा मधील एक प्रसंग सांगत असतात. की प्रभू श्रीरामांनी तारका राक्षासिनीचा जेव्हा
वध केला तेव्हा प्रभू श्रीराम फार मोठे नव्हते.पण इतक्यात काही मारेकरी वाड्यात घुसले. जिजाबाईंना त्याची चाहूल लागताच त्या हाती शमशेर घेऊन त्यांच्या वर तुटून पडल्या त्यांच्या मदतीला गोमाजी आणि गोदा धाऊन आल्या.तिघांनी मिळून त्या मारकऱ्याना पळवून लावले. आणि हे सारे दृश्य उमाबाई दूर उभ्या राहून पाहत होत्या. मारेकरी पळून गेल्यावर जिजाबाई म्हणाल्या," असाच प्रत्येक माणूस पेटून उठला पाहिजे. अंगातील रक्त ससळले पाहिजे. स्त्रियांना स्वतःचे रक्षण करण्या करता त्यांना देखील युद्ध कला शिकवावी लागेल. मग कुणीही हिम्मत करणार नाही स्त्रीच्या अंगावर हात टाकायला."
खंडागळे सरदार ने शहाजी राजांना मारण्यासाठी जे मारेकरी
पाठविले होते. पण ते स्वतःच जिजाबाईंच्या हातून मार खाऊन
परतले होते. त्यामुळेच खंडागळे सरदार भयंकर चिडला होता. नि त्यांना चाबकाने फोडून काढथोटा.पण मार खात असताना एकजण म्हणाला की, शहाजी राजे वाड्यात नव्हते . "त्यावर खंडागळे सरदार ने विचारले की, मग कोणाकडून मार खाऊन आलेत." तेव्हा दुसरा एकजण म्हणाला," राणी साहेब होते, त्यांच्यानीच आमची ही दशा केली." हे ऐकून खंडागळे सरदार अजूनच चिडला. नि म्हणाला की, राणी साहेबांनी तुम्हाला धुतले. लाज नाही वाटत हे सांगायला. मग विचार करा शहाजी राजे जर तिथं असते तर त्यांनी तुमचं काय केलं असतं हे ठाऊक आहे का तुम्हाला ? स्वतःला पुरुष म्हणविता पण तुमच्यात जरा तरी पुरुषार्थ आहे का ? निमकहराम कुठले ?" असे म्हणून चाबूक एकीकडे फेकून तिकडून निघून गेले.
भोसले गढी वेरुळ
त्यानंतर रात्री जिजाबाई झोपल्या असताना मध्येच त्यांना जाग आली. बाजूला पाहतात तर बाळ राजे नाहीत. कुठे गेले असतील म्हणून शोध घ्यायला सुरुवात केली.पण ते काही सापडले नाहीत. म्हणून त्या बाहेर आल्या आणि त्यांनी गोमाजी काका ना विचारले. तर गोमाजीनी सांगितले की मी इथंच बसलो आहे. बाळ राजे बाहेर आलेले नाहीत. आंत मध्येच शोधा." म्हणून जिजाबाई शेवटी उमाबाईच्या दालनात आल्या त्यांना
सांगायला की बाळराजे सापडत नाहीत म्हणून. पण बाळ
राजे तिथंच झोपले आहेत. हे त्यांना नंतर समजले. तेव्हा त्यांनी
विचारले की बाळ राजांना इथं कोणी आणले ? तेव्हा उमा बाईंनी सांगितले की त्यांना आम्हीच इथं आणले. "पण हे
सांगत असताना त्यांच्या चेऱ्यावरचा राग जिजा बाईंच्या ध्यानात आल्या वाचून राहिला नाही. म्हणून त्यांनी विचारले," सासूबाई , आपल्याला राग आलाय का ? आमचं काही चुकलं का ?" परंतु उभाबाईंनी त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. उलट त्या म्हणाल्या,' मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही." असे म्हणून त्या निघून गेल्या. जिजाबाईंना समजण्यास किंचित ही वेळ लागला नाही की कधी न रागवणाऱ्या सासूबाई आज नक्कीच रागावल्या आहेत. पण रागवण्याचे कारण नाही समजले. जेव्हा शहाजी राजे आले आणि त्यांनी जिजाबाईंचा उदास चेहरा पाहिला तेव्हा त्यांनी विचारले," तुमचा चेहरा का उतरला ? काही घडलंय का आज ?" तेव्हा जिजा बाईंनी आपली मान होकारार्थी
डोलावली. आणि त्यानंतर जिजाबाईंनी घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करून सांगितले. तेव्हा शहाजी राजे जिजाबाई सोबत उमाबाई च्या दालनात जातात. पण त्या आपला निर्णय सांगून मोकळ्या होतात की आज पासून बाळ राजे आमच्या कडेच राहतील. का ते सांगितले नाही. उमाबाईचे हे रुद्र रूप
जिजाबाई आज प्रथमच पाहत होत्या. पण शहाजी राजे समजून
गेले की आऊ साहेबांच्या रागावण्याचे कारण काय असावे ?
म्हणून मग ते म्हणाले," आऊ साहेब आपला काहीतरी गैरसमज होतोय." त्यावर उमाबाई म्हणाल्या," अच्छा म्हणजे स्वराज्य म्हणजे काय हे समजावून द्यायला तुम्ही स्वतः आला आहात ? होय ना ?" उमाबाई उद्गारल्या. त्यावर शहाजी राजे म्हणाले,
" स्वराज्य म्हणजे आपलं राज्य ? आपले स्वतंत्र राज्य." त्यावर उमाबाई म्हणाल्या," स्वराज्य म्हणजे काय हे देखील तुम्हाला नीट सांगता नाही आलं ! सूनबाई ना विचारा काल
रात्री शस्त्र चालवत असताना किती सहज पने स्वराज्य म्हणजे
काय हे त्यांनी सांगितले." असे म्हंटल्यावर जिजाबाईंना काल चा प्रसंग आठवला. जिजाबाई गोमाजी ला सांगताना त्या म्हणाल्या होत्या की, आपल्या स्वराज्यातील प्रत्येक माणूस असाच पेटून उठला पाहिजे. त्यांच्या अंगातील रक्त असेच सळसळायला हवं. इतकंच नाहीतर त्यांनी आपल्या पोरा बाळा ना पण हेच संस्कार द्यायला हवे. त्यांच्यात स्वराज्याची आस
आणि अभिमान त्यांच्यात रुजवायला हवी." हे आठवले. उमा
बाई पुढे म्हणाल्या," काय सूनबाई बरोबर ना ?" त्यावर
जिजाबाई म्हणाल्या," हे काय आज जिजा नाही की जिजाबाई नाही थेट सूनबाई तुम्ही परके का करताय आम्हाला ?"
" कारण खूळ लागल्यागत वागणाऱ्याना आम्ही आपले म्हणणारच नाही." किंचित थांबून त्या पुढे म्हणाल्या," आमच्या
लेकाला सर लष्कर हे पद मिळाला. त्यांचा आदिलशाहीत
दरबारात इतका मान वाढला की त्यांनी आदिलशाहीत आपल्या
साठी शब्द टाकावा या साठी लोकांची रिघ लागली. आणि त्यांना असे भिकेचे डोहाळे लागलेत ,गरज काय आहे ?"
" आऊ साहेब हे खूळ नाहीये."
" अहो,राजे त्या तीन बादशहांचे आपसात वैर आहे,त्यामुळे
आपली कित्येक माणसे बळी गेली हे सारे माहित असताना
पण त्या तिन्ही बादशहाचा सामना कसा करणार तुम्ही ? म्हणून
ते काही नाही , तुमच्या या उद्योगात आम्ही बाळ राजांना पडू देणार नाही, म्हणून आज पासून बाळ राजे आमच्या पाशीच
राहतील."उमाबाईंनी आपला निर्णय सांगून टाकला.
गोमाजी हिराजी ला विचारले की काल तू राजा सोबत देऊळ
गावाला गेला होतास ना, तिथं काय घडलं ते सांग की. " पण
हिराजी सांगायला काही तयार होईना, शेवटी गोमाजीनी आपली
तलवार उपसून हिराजी च्या गळ्याला लावली तसा तो पोपटा
वाणी बोलू लागला. त्यांनी सांगितले की राजांनी मंबाजी राजे
आणि खेलोजी राजांना आपल्या स्वराज्यात सामील व्हायला
सांगितले. पण स्वराज्यात सामील व्हायचे तर दूरच राहिले पण
ते ऐकून घेण्यास ही तयार नव्हते. मग काय राजांना नाईलाजाने
यावे लागले." त्यावर गोमाजी म्हणाला," बस्स इतकंच ना ?
हे सांगायला पण तुला जड जात होतं ?"
" नाही . त्याचं काय आहे, स्वतः राजांनी कोणालाही सांगण्यास मनाई केली आहे." हिराजी उद्गारला.
" अरे कोणाला सांगू नकोस म्हणजे दंवडी पिटू नकोस असे
म्हणाले राजे. अरे गड्या मी जिजा अक्कांचा माणूस आहे,
जिजा अक्कानी मला अगोदरच सांगितले आहे, आता आपलं
स्वराज्य बस!"
जिजाबाई आपल्या सासूबाईंना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्या ऐकून घेण्यास तयार नाहीत. तेव्हा जिजाबाई म्हणाल्या की, आम्हाला इतकं परके करू नका. स्वराज्य हे स्वप्न आज परवा नाही पाहिले आम्ही तर जन्मापासूनच ते स्वप्न आम्ही पाहत आलो आहोत. आमची पहिली भेट रंगपंचमी
दिवशी झाली. तेव्हाच आम्ही ठरवलं की हे सर्व बदलायचे."
त्यानंतर शहाजी राजे म्हणाले,"आणि आम्हाला आमच्या लग्ना दिवशी समजून आले." असे म्हणून लग्नाच्या वेळी झालेल्या घटनेची इत्यभूत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर ते पुढे म्हणाले," आम्हाला ते खूप आधीपासूनच वाटत होते. बालपणी आबा साहेबांनीं आम्हाला विचारले होते की, शहाजी राजे तुम्हाला कोण व्हावे से वाटते तेव्हा आम्ही नकळत पण हेच उत्तर दिले होते." त्यावर उमाबाई म्हणाल्या," बरं, तुम्हाला हे फार पूर्वी पासूनच वाटत होतं असे आपण धरून चालू पण त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केला आहे का ? याला सगळ्यांच्या विरोधात बंड केलं असे म्हणतील. निजामशाही असो वा आदिलशाही ते ह्या बंडा ला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतील. सर्वस्वावर कधी वरवंटा फिरविला जाईल हे समजणार ही नाही. सर्व स्वप्न प्रत्यक्षात उतरायलाच हवीत काय ? सर्व स्वप्न खरी होत नाहीत म्हणून तर त्यांना आपण स्वप्न म्हणतो ना ?" शहाजी राजे म्हणाले," तसे पाहायला गेले तर धोका सर्व ठिकाणी आहेच. आणि खरं सांगायचं तर लायकी नसलेल्या लोकांच्या चरणी आपले मस्तक ठेवणे आम्हाला आता पटेनासे झाले आहे." त्यानंतर जिजाबाई म्हणाल्या," स्वराज्य म्हणजे काही आमचा स्वार्थी विचार नाहीये. स्वराज्य म्हणजे आपल्या मुलुखाचा विचार आहे रयतेचे विचार आहे , जिकडे पाहाल तिकडे रयत पिचलेली आहे , त्यांचा काही दोष नसताना कोणी पण येते नि त्यांना मारून जाते. त्यांना लुटतात ही कापतात ही आणि त्यांचासाठी काही करता येत नाही. आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच चाकाऱ्या सारखे राबायचे आणि पिढ्यान् पिढ्या तिथंच संपवायच्या ह्याच्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही म्हणून आपण देखील आवाज उठवायचा नाही ? असा विचार जर प्रत्येकाने केला तर या गुलामीच्या चक्रातून आपण कधीच बाहेर पडणार नाही. कोणीतरी हे धाडस करायलाच हवं."
" आणि आऊ साहेब आम्ही तिन्ही बादशाहीत पाहिलं तिथं
ही आपली माणसं आहेत की,आपल्याच माणसांच्या जोरावर
त्यांची बादशाही ठीकून आहे,तिकडे मोगलाई मध्ये राजपूत
आणि इथं मराठे या पलीकडे ह्यांच्या कडे आहे कोण ? म्हणून
त्यांना पटवून देणे आवश्यक आहे की आपल्या मातीशी एकनिष्ठ
व्हा ! आज सुरुवात केली तर हळूहळू पटेल त्यांनाही ! आपल्या माती साठी ते एकत्र येतील. हे पण तर होऊ शकतं ना ?" उमा बाईंनी दोघांचे ही म्हणणे ऐकून घेतले नि मग उठून उभ्या राहत म्हणाल्या की, जे काही कराल ते जपून करा. दुसरं काय सांगणार आम्ही ?" तेव्हा जिजाबाई म्हणाल्या," आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. आणखीन काही नको." त्यावर उमाबाई म्हणाल्या," तो न मागता ही सदैव मिळणारच आहे." असे म्हणताच जिजाबाई खुश होऊन त्यांचा पाया पडतात. तेव्हा उमाबाई त्यांच्या खांद्याना पकडुन वर उठवून आपल्या हृदयाशी धरले. त्यानंतर शहाजी राजे आपल्या दालनात आले तेव्हा म्हणाले," आऊ साहेबांना पटवून देणे फार अवघड काम होतं पण ते पार पडलं." जिजाबाई म्हणाल्या की, सासूबाईंना समजावत असताना अनेक गोष्टींचा उलगडा झाला." शहाजी राजे दुजोरा देत म्हणाले," हो ना , या आधी आम्ही मंबाजी राजे आणि खेलोजी राजे दादा साहेबांना आमचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला; परंतु तेवढं जमलं नाही."
" पण काही जणांना आपली ही कल्पना नक्कीच आवडली
असेल."
" हो. आवडली बाजी पासलकर आहेत, अजूनही काही
मनसबदार आहेत."
" मनसबदार आहेत तर चांगलीच गोष्ट आहे. पण मुख्य
म्हणजे आपण आपल्या रयतेला अगोदर विश्वासात घेऊ
आणि त्यांचे हित आपल्या स्वराज्यात कसे सामावले आहे ते पटवून देवू. माणसाला माणूस जोडला जाईल. जसे की थेंब
थेंब जमा झाल्याने त्याचा सागर कसा बनतो हे पटवून देवू."
" तुमचा हा उत्साह पाहून आमची उमेद वाढते. अखेर आपण
आपल्या मना सारखे केलेत तेव्हाच थांबलेत हो ना ?" त्यावर
जिजाबाई म्हणाल्या ," आपलं काही वेगळं स्वप्न आहे का ?
नाही ना ? आपलं दोघांचे ही स्वप्न एकच तेच सत्यत्वात
उतरविले. हो की नाही ?" दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य
उमटले.
दुसऱ्या दिवशी स्वराज्याचा दरबार भरविला. बाजी पासलकर
मोठ्या उत्साहाने त्यात भाग घेत होते. फुलांचा सडा टाकला. आणि थोड्याच वेळात शहाजी राजे जिजाबाई सहित दरबारात प्रवेश करतात. बाळ राजे ही सोबत असतात. तख्त वर बसून शहाजी राजे म्हणाले," आजपासून आमचे स्वराज म्हणजे आपल्या सर्वांचे राज्य सुरू होत आहे, सध्या आपल्या कडे पुणे , सुपे पाटस एवढ्याच मुलुख जरी असला तरी भविष्यात एवढाच मुलुख राहणार नाही तो वाढतच जाईल. आमच्या स्वराज्यात आमच्या सोबत बाजी पासलकर, गोमाजी काका आहेत, हिराजी आहेत. आणि ह्या माती ज्यांच्या मनगटात शौर्य आणि छाताडात धैर्य आहे त्या सर्वांनी आमच्या एकत्र या.आणि हे स्वराज्य तुमचंच आहे असे समजून ते वाढवा." उमाबाई आणि जिजाबाई एकदम खूश दिसत आहेत.
देऊळगाव
खेलोजी राजे आणि मंबाजी राजे मात्र शहाजी राजांच्या
स्वराज्यात सामील झाले नाहीच पण निंदा नालस्ती कण्यात
मात्र कसूर केली नाही. खेलोजी राजे म्हणाले की , शहाजी
राजांनी स्वराज्य स्थापन केलं. ही धक्का दायक बातमी आहे."
मंबाजी राजे म्हणाले," स्वराज्य स्थापन केलं म्हणजे काय केलं
तर पुणे , सुपे, पाटस वर विजय मिळवून त्यावर स्वतःचा
कारभार सुरू केला. वेगळं काय केलं ? सांगा ना ?"
" नाही पण निजामशाहीत ला बराच भाग जिंकला."
" घोडे, हत्ती च्या बुद्धिबळ खेळात प्यादा राजा होतो का ?
अगोदर मलिक अंबर, नंतर निजामशाही आणि आता आदिलशाही सर्वांनीच त्यांना नुसतं डोक्यावर चढवून ठेवले.
भातवडी जंग काय जिंकली आदिलशहा ने त्यांना सर लष्कर
बनविले. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, एक बेडूक फुगला
त्याची तारीफ केली तर अजून फुगला पण त्याला कुठं माहित
आहे किती ही फुगला तरी त्याला बैल होता येणार नाही. उलट
फुगून फुगून स्वतःच फुटून जाईल." त्यावर खेलोजी राजे म्हणाले की, आम्हाला ही हेच वाटले. त्यांची आपसात किती
भानगडी आहेत. अश्या परिस्थितीत ह्यांनी स्वतःचा कारभार
सुरू केला. म्हणजे तिन्ही बादशहाशी वैर स्वतःच ओढवून
घेतले. नाही त्यांना जाऊन समजवायला हवे."
" वाटलच होतं मला. संभाजी दादा साहेबांनी हीच चुकी केली.
त्यांची बाजू घ्यायला गेले नि स्वतःचा जीव गमावून बसले.
म्हणून काही गरज नाही त्यांना समजवण्याची त्यांना त्यांच्या
कर्माने मरू दे.शहाण्या माणसाने त्यांची बाजू घेऊ नये. म्हणून
तुम्हाला ही सांगतोय तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका."मंबाजी राजे म्हणाले.
भोसले गढी वेरुळ
जिजाबाई कारभारी म्हणजे पंत ना सांगतात की तुम्ही आमची बाजू घ्या. किंवा स्वारी ची बाजू घ्या. असे आम्ही म्हणणारच नाही. तुमची पण बाजू आहे.बोला." त्यावर पंत म्हणाले," छे
छे छे ! आमची कसली बाजू ? आपण मालक आपण जे
सांगणार ते आम्ही करणार." त्यावर जिजाबाई म्हणाल्या,
पाहिलत स्वराज्य हा विचारच रुजला नाही मनात." तेव्हा
शहाजी राजे म्हणाले," स्वराज्य म्हणजे काही निजामशाही
किंवा आदिलशाही नाही.आणि मोगलाई ते नाहीच नाही.
स्वराज्य हे फक्त आमचेच राज्य नव्हे तर आपल्या सर्वांचे राज्य
आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे मत इथं मांडू शकता." त्यावर पंत म्हणाले," आम्हाला मत वगैरे काही कळत नाही फक्त तुम्ही सांगाल ते काम करू बस." जिजाबाई म्हणाल्या," तुमच्या घरी हुकूम कोणाचा चालतो ? नाही म्हणजे तुमचा का तुमच्या मंडळींचा ?" त्यावर पंत म्हणाले, " छे छे छे ! भलतच काय ? आम्ही सांगतो तेच त्या ऐकतात." त्यावर जिजाबाई स्मित हास्य
करत म्हणाल्या, " मग मला सांगा की तुमच्या मंडळींची
तक्रार काय असते ती तुम्ही ऐकून घेता की नाही ?"
" हो. घेतो ना "
" मग सांगा , त्यांची काय तक्रार असते ?"
" हेच की हे महाग झालं, ते महाग झालं परवडत नाही,म्हणजे जकात भरावी लागते ना ?"
" जकात ...जकात का भरायची ? ही काय निजामशाही
नाहीये. " असे बोलून त्या शहाजी राजांकडे पाहत म्हणाल्या,
" म्हणजे जकातीचे दर कमी करू शकतो ना आपण . हो ना ?" शहाजी राजांकडे पाहत त्या म्हणाल्या. त्यावर शहाजी राजे म्हणाले," हो जरूर जकात दर कमी करू शकतो."
क्रमशः
shoorveer,chhatrapatishivajimaharaj,shoorveer3,#maharanpratap,#prithvirajchauhan,#samratprithvirajchauhan,maratha king shivaji maharaj,greatest warrior shivaji,kesariya,छत्रपति शिवाजी महाराज,rapperiya baalam,rajneesh jaipuri,shambo rap,jagirdar rv,meetu solanki,shoorveer song singer,trending song shoorveer,maharashtra,jay shivraye jai shamboraje,जय शिवराय जय शंभुराजे,राखी केसरिया की लाज शिवाजी,हो शम्भू रूप अवतार शिवाजी,rajasthani rapper,marathi rapper,shambo
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा