Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

छत्रपती शिवाजी महाराज ४२ | chhatrapati shivaji maharaj episode 42 | Author :- Mahendranath prabhu

छत्रपती शिवाजी महाराज ४२ | chhatrapati shivaji maharaj episode 42 | Author :- Mahendranath prabhu
छत्रपती शिवाजी महाराज ४२ | chhatrapati shivaji maharaj episode 42 | Author :- Mahendranath prabhu





  पण तिथं पोहोचण्याची वाट जरा बिकट आहे. म्हणून तिथं पोहोचण्यासाठी आम्ही सर लष्कर हा मार्ग निवडला आहे. हा मार्गच आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. पण त्यासाठी विचारपूर्वक पाऊले टाकत पुढे जायचे आहे. नाहीतर तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे गोवर मोडून चुलीत कोंबण्या इतके सोपे काम नाहीये ते. जरा धीर धरा. आम्ही जे योजले आहे ते करूनच दाखविणार आहोत. याची खात्री बाळगा."



पुढे

    जिजाबाई म्हणाल्या," आम्हाला अजून एक पद दिसतंय
आणि ते म्हणजे निजामशाहीत , कारण मलिक अंबर आता
राहिले नाहीत तेव्हा तिथं तुमची जास्त गरज असेल. नाही ?"
   " असं काय म्हणताय तुम्ही ?"
   " नाही नाही तुमची ती बाजू सुध्दा पटण्यासारखीच आहे.
निजामशाहीत दोन व्यक्तींची मदार होती. एक आता राहिले
नाहीत आणि दुसरे आम्ही.मग ज्यांनी आम्हाला उभे केले
त्यांचे उपकार विसरून कसे चालेल. नाही का ? तिथे फतेह
खान असेलच;पण त्यात तुम्ही उजवे आहातच. अर्थात तुम्ही वजीरे आलम व्हाल च म्हणजे आणखीन एक वरची पायरी. नाही का ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले," तुम्ही चुकीचे बोलताय वरची आपली पायरी मिळालेल्यांने आपण आपल्या मुलुखात सुबत्ता तयार करू शकतो. आपला मुलुख आपलाच असायला पाहिजे असे वाटत असेल तर अगोदर सुबत्ता असायला पाहिजे की नाही."
   " नाही. अगोदर आपला मुलुख ही भावना असायला हवी. आपण आपल्या मुलुखा साठी झटतोय ही अगोदर भावना हवीय. मग थाळ्यात पुरणपोळी नसली तरी चालेल.मीठ भाकर जरी असली तरी ती आपल्या मुलूखातील असेल."
   " आम्ही सुध्दा हेच स्वप्न पाहिलं आहे,पण आधी सुबत्ता
तयार करू, तोवर...." त्यांना पुढे बोलू न देता त्यांचे वक्तव्य
मध्येच खंडित करत म्हणाल्या," तोवर दुसऱ्यांची चाकरी करू
हो ना ? सुबत्ता निर्माण करणार म्हणजे नेमके काय करणार
तर सारा गोळा करणार काही भाग बादशहा देवून राहिलेल्या
भागात सोयी करणार , असेच ना ? पण आम्ही म्हणतोय
सारा गोळा करा नि सर्वच्या सर्व सोयी साठी वापरा.बादशहा
ला सारा द्यायची काय गरज आहे. त्यालाच म्हणतात आपला
मुलुख आणि आपले राज्य , चाकरीच करायची तर आपल्या मुलूखाची करू, दुसऱ्याची चाकरी करायची काय गरज आहे
?
" आपला मुलुख नि आपलं राज्य म्हणायला फार सोपे आहे
पण ते जेवढे वाटते तेवढे सोपे ही नाहीये ते."
   " ते सोपे नाहीये, हे आम्हाला ही कळतंय. पण आम्हाला
आमच्या स्वारीच्या पराक्रमावर विश्वास आहे, पण त्यांनाच
स्वतःवर विश्वास नाहीये. ते स्वतःला कमी लेखतात. आता तुम्ही
मुल्ला बाबा चा मुलुख जिंकायला गेला होता आणि तो जिंकलात सुध्दा . होय ना ?"
   " हो,  जुन्नर , शिवनेरी सगळचं जिंकले."
   " तुम्ही आदिलशहा कडे जेव्हा गेलात तेव्हा आदिलशहा काय म्हणाला तर तुम्ही मुल्ला बाबाचा जिंकलेला मुलुख   तुमच्याकडेच राहू द्या. असंच म्हणाला . हो ना ?"
   " होय असेच म्हणाला."
   " पण तुम्ही जिंकलेला मुलुख तो कसा देवू शकतो तुम्हाला ?
तुम्हाला त्यात सन्मान वाटला. खरं सांगायचं तर इथंच खरं तर
राजनीती आहे, रक्ताचा एक थेंब ही न गाळता त्याच्या हातून
गेलेला मुलुख त्याने पुन्हा आपल्या राज्यात आणला. असं
व्हायचं कारण तुम्ही त्याची चाकरी पत्करली. त्या उलट तुम्ही
जिंकलेला मुलुख आपल्याकडे राहिला असता तर ते आपलं
राज्य म्हणता आलं असतं. आणि आपल्या ह्या राजाचा आनंद
ही झाला असता नि समाधान ही झालं असतं."
   " आपलं स्वराज्य असावं हे स्वप्न आम्ही अगदी बालपनापासून पाहिलं आहे, पण आम्हाला वाटत होतं की आधी सुबत्ता आधी तयार करू नि मग स्वराज्य."
   " नाही. आधी स्वराज्य मग सुबत्ता."

  बीजापुर

      आदिलशहा इब्राहिम पैगरंबरवाशी झाला. त्यामुळे आदिलशाहीच्या तख्त साठी आदिलशहा इब्राहिमच्या मुलामध्ये
तख्त वरून भांडणे सुरू झाली. पण खरे सांगायचे तर बडे
बेगम चा मोठ्या मुलाचा त्या तख्त वर खरा अधिकार पण
तिसरी बेगम चा पुत्र मोहम्मद ने आपल्या तिन्ही बंधू ना कैद
केले. तसेच दरबारातील कोणीही सरदार आपल्या विरुध्द
जाऊ नये म्हणून त्या सर्वांना देखील कैद केले. त्यात मंबाजी राजे, खेलोजी राजे बाजी घोरपडे, पंडित मुरार जगदेव, वजीरे आलम रणदुल्ला खान या लोकांना त्याच्या सैन्याने कैद केले. फक्त शहाजी राजे यायचे होते. तेव्हा मंबाजी राजे म्हणाले," आता आपल्याला जकडून का ठेवलं आहे ?" एकदम हळू आवाजात विचारले. तेव्हा खलोजी राजे म्हणाले," तख्त वर कोण बसेल या वरून वाद सुरू आहे?" त्यावर मंबाजी राजे म्हणाले," त्यात वाद घालायचे काय कारण ? जो मोठा असेल शाहजादा त्यालाच गादीवर बसविणार ना ? आता आपल्या कडे कसे संभाजी दादा साहेब मोठे मग त्यांचाच अधिकार असणार ना ?" त्यावर खेलोजी म्हणाले," अहो, ते आपल्या कडे झाले. इथं तसं नाहीये. म्हणजे आहे आपल्या सारखेच पण ही काळीज
नसलेली माणसे आहेत ,ह्यांना फक्त स्वतःचे हित कसं साधता
येईल हे जास्त महत्त्वाचं असतं. अर्थात तिसऱ्या बेगम चा मुलगा महंमद आहे त्याला बसायलचे आहे या तख्तावर. आपल्याला दरबारातील  कोणत्याही व्यक्ती ने   विरोध करू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे ."

  भोसले गढी वेरुळ


   शहाजी राजे सर्व तयारी निशी विजापूरला जायला निघाले.
इतक्यात जिजाबाई तेथे आल्या नि विचारले," हे काय तुम्ही
विजापूर ला जायला निघाले असं कळले म्हणून आम्ही आलो."
  " होय आम्ही विजापूर ला जायला निघालो."
  " म्हणजे आपण रात्री जे सगळं बोललो त्याचा काहीच परिणाम नाही."
  " सगळं बोललो म्हणजे हेच ना की, सुबत्ता आधी का स्वराज्य ?"
  " होय. म्हणजे ते फक्त बोलण्या पुरतेच होतं, पुढे काहीच
नाही. सकाळ होताच चाकरी करण्यासाठी पुन्हा तलवार उचलली. कमाल आहे."
   " कमाल आमची नाही तर तुमचीच आहे. बोलणं झाले
म्हणजे काय वाड्यावर झेंडा फडकवून आम्ही स्वराज्य मी
निर्माण केलं अशी दवंडी पिटवायची होती का ? तुम्हाला
म्हणायचं तरी काय ?"
   " त्या संदर्भात हेटाळणी करायची असेल तर समजून घेण्याचा बहाणा तरी का केला ? सरळ सांगायचं तरी होतं
की आम्ही असं फक्त बोलतोय. विसरून जा म्हणून."
   " मग खरंच विसरणार होता ?"
   " नाही.पण आम्ही तसा वेगळा विचार तरी केला नसता.
आणि वेगळी अपेक्षा पण केली नसती."
   " खूप झाले आता. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही बाळ राजांशी
नाही बोलत आहात ?"
   " बाळ राजांशी म्हणजे ?"
   " म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही समजावले म्हणजेच आम्हाला
समजेल. स्वराज्य म्हंटले म्हणजे पोर खेळ नव्हे ! काल
ठरवलं नि आज झाले. तिकडे आदिलशाह इब्राहिम पैंगंबर झाले
तिथं तख्तावर कोण बसणार  म्हणून वाद सुरू आहे. म्हणून आमची तिथं उपस्थित तितकीच गरजेची आहे."
   "  का गरजेची आहे ? आपला नि त्याचा सबंध काय ?"
   " केवळ आपण नि आपलं राज्य असे बोलून चालत नाही.
जरा आपल्या आजूबाजूला पण पहावे लागते. वारा कोठून कोठे
कसा वाहतोय हे सर्व पाहायला लागतं. पहिला वारा कसा वहात होता नि आता कसा वाहतोय हे घराच्या चार भिंतीत राहून दिशा
कळणार नाही आणि दशा दशा होईल. नाही.त्यासाठी मैदानात उतरावे लागेल. झुंज म्हणजे रक्ताचे पाठ वाहून केलेली राजनीती आणि राजनीती रक्ताचा एक थेंब न वाहून केलेली झुंज या दोघांचा मेळ बसवावाच लागेल." असे बोलून शहाजी राजे चालते झाले.

विजापूर

  शहाजी राजे जसे आदिलशहा च्या दरबारात प्रवेश करतात.
तसे मागवून दोन सैनिक येऊन त्यांच्या गळ्यावर आपली
तलवार ठेवतात. तसे शाहजी राजे आपली तलवार उपसतात.
तसा रण दुल्ला खान उद्गारला," जल्दबाजी न करे शाहजी राजे!" तसे शहाजी राजे रागाने म्हणाले," लेकिन हमारा कसूर
क्या है ? हमने तो बगावत नहीं की ।"
   " म्हणजे करायचा विचार आहे तर  !" बाजी घोरपडे
म्हणाले.
   " आम्ही सर लष्कर आहोत बाजी!"
   " अहो, नुसतं बाजी नाही बाजी राजे घोरपडे म्हणा.आणि
जरा हळू बोला नाहीतर नर्ड्यात पाते घुसेल."  पंडित मुरार जगदेव म्हणाले," हमारी कोई गलती नहीं है आणि आपल्याला काहीही होणार नाहीये. विश्वास ठेवा." त्यावर मंबाजी राजांनी विचारले,"असं कसं ? मिर्जा मोहम्मद आणि दौलत खान,
वजीरे आलम  कित्येक सरदारांना घेऊन गेलेत ते." रणदुल्ला खान म्हणाला,"
  "     शहानवाज खान  सरदारंको लेकर गए है। यह बात सच है, लेकिन हुकम था !"
   " किसका ?"
   " हामारा , मोहंमद शहा इस तख्त का वारीस. " असे बोलून
सर्वांसमोर आला तश्या सर्वांनी आपल्या नजरा खाली जमिनीकडे झुकविली. त्यांनी एक वार सगळ्यांकडे नजर फिरविली नि मग म्हटले की, हम इस तख्त छिन्ने के उतारू हुए है। ऐसा किसीने कहा ऐसा हमने सुना किसने कहा ? रण दुल्ला खान क्या ये सच है ?"त्यावर रण दुल्ला खान ने काहीच उत्तर दिले नाही मग त्याने एक एकाकडे नजर टाकायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या जवळ गेला असता, तर प्रत्येकाने खालच्या मानेने नाही असे म्हटले. परंतु शहाजी राजानी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, म्हणून बादशहा मोहम्मद शहाजी राजा जवळ गेला नि त्याने शहाजी राजांना विचारले की,क्या यह सच है, शाहजी राजे ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले की, ऐसी नापाक तकरीर तो हमने नही सुनी ।" त्यानंतर  बाजी राजे घोरपडे यांच्या कडे गेला नि त्याने विचारले," क्या यह सच है बाजी ?" त्यावर बाजी घोरपडे म्हणाला," इस पर आपका ही हक हैं, और कौन होगा ?" तसा खुश होत बादशहा म्हणाला," सुभान अल्लाह ! सुभान अल्लाह ! सुभान अल्लाह ! शाहजी राजे और बाजी इन पर हमे नाज है, जो बात करते है खुलेआम करते हैं उसे कहते हैं वफादरी !" तेव्हा रणदुल्ला हिम्मत करून मग म्हणाला की लेकिन पीछे लोग यही कहेंगे ना ? की बड़े शहजादा को छोड़कर तीसरे शहजादे को कैसे अपनाया ? अच्छा नहीं लगता । त्यावर बादशहा मोहम्मद म्हणाला," सुभान अल्लाह ! रणदुल्ला खान आपने सही फरमाया हमारे तीनो भाइयोंको दरबार में लाया जाए . क्योंकि आज सारा दरबार देखेगा की हमारे सिवा इस तख्त के लिए कोई काबिल नहीं है।" आणि थोड्याच वेळात त्या तिघांना  पाठीमागे हात बांधून दरबारात आणले जाते. ते तिघेही गयावया करत आहेत. म्हणत आहेत की आम्हाला तख्त वगैरे काही नको. फक्त जीवदान दे. पण बादशहा मोहंमद ने विचारले," परवेझ भाईजान क्या आपको तख्त पाने की ख्याइश रखते हो ?"त्यावर तो नाही म्हणाला. तसा मोहम्मद म्हणाला," लेकिन दुनिया नही मानेगी । ओर रणदूल्ला खान कह रहे की अच्छा नहीं दिखेगा । इसलिए
न देखनेके लिए अगर आंखे ही रुकावट बन रही है, तो हम
उसकी आंखे ही निकाल देते है ।" पण त्याने कोणतीही दया
माय न दाखवता  आपल्या मोठ्या भावाचे डोळे फोडण्याचा आदेश दिला. गरम गरम सळ्या त्याच्या डोळ्या मध्ये खुपसून त्याला आंधळे करण्यात आले. तेव्हा मोहम्मद म्हणाला," अब
अगर किसी ने चाहा भी तो परवेज भाईजान तख्त पर नहीं
बैठ सकते. "असे म्हणून भेसूर हसला नि मग म्हणाला," अब
रहा दो भाईयोंका मसला." तसे ते दोघेही रहम करो भाईजान
असे बोलत होते. पण त्याला काही त्या दोघांची दया आली
नाही. त्यांचे डोळे फोडले नाहीत पण हाताची बोटे कलम
करण्यात आली. त्यानंतर त्या तिघांना घेऊन जायला सांगितले.
त्या तिघांना नेल्यानंतर मोहम्मद म्हणाला की, अब हमारे सरहद्द
बढ़ाने में किसी की दखल अंदाजी नहीं होगी।"

   दौलताबाद

   मलिक अंबर च्या मृत्य नंतर त्याच्या मुलाला म्हणजेच फतेह
खान ला वजीरे आलम बनविण्यात आले. त्याने आपल्या
खितमतकार मदिरा आणायला सांगितली.यायला थोडा उशीर
झाला म्हणून फतेह खान ने त्याचा गळा चिरून त्याला ठार केले. तेव्हा लखुजी राजांनी विचारलं," फतेह खान ss म्हंटले म्हणून तो चिडला नि म्हणाला की, वजीरे आलम फतेह खान बोलो. अदब लखूजी राजे आप कही के भी राजा नहीं है फिर भी हम आपको लखुजी राजे कहते है । इसलिए अदब से पेश
आइए ।" तेव्हा खंडागळे सरदार म्हणाला," खूप चांगले केले
वजीरे आलम फतेह खान सापाला दंश करण्या अगोदर च
ठेचले पाहिजे." लखुजी राजे तिकडून जाऊ लागले तसे खंडागळे सरदार म्हणाले की, लखुजी राजे तुम्ही कुठं निघाले ?
आणि ते पण वजीरे आलम ची परवानगी न घेता ?" त्यावर लखुजी राजे म्हणाले, " मी कुठं ही जात नाहीये. मृत पावलेल्या माणसाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी बाहेर जात होतो." त्यावर सरदार खंडागळे म्हणाले," त्या साठी आम्ही आहोत ना, तुम्हाला कुठं जायची गरज नाहीये. कारण वजीरे आलम ला हे असे केलेले आवडत नाहीये. बरोबर बोलतोय ना मी वजीरे आलम ?" तेव्हा फतेह खान ने होकारार्थी मान डोलावली. लखुजी राजांना खरा तर सरदार खंडागळे चा राग येत होता. पण काय करणार राग गिळावां लागत होता. खंडागळे सरदार एवढंच बोलून थांबला नाही तर पुढे म्हणाला," ह्या मुडद्यायला सगळीकडे फिरवितो म्हणजे सगळ्यांना माहीत पडेल की वजीरे आलम चां हुकूम न  मानणाऱ्याची काय अवस्था होते. मी बरोबर बोलतो ना वजीरे आलम ? तसा फतेह खान खुश झाला नि त्याने मान हलवून " हो " म्हटले ," हम खुश हुए खंडागळे सरदार इसलिए  हम तुम्हे  पुना  और पाटस का मूलुख  देने का सोच रहे है ।" तेव्हा लखुजी राजे मध्येच म्हणाले की,  लेकिन वो तो सदयोंसे भोसले के पास रहा है।" तेव्हा फतेह खान चिडून म्हणाला,"  वो निजामशाही का मुलुख था और हमेशा रहेगा । शाहजी राजे के पास सिर्फ जहागिरी थी अब शाहजी राजे भी निजामशाही में नहीं है, इसलिए खंडागळे तुम उसपर चढ़ाई करो और वो मुलुख हासिल करो ।" तेव्हा खंडागळे ने फतेह खान ला विनंती केली की मला एक माणूस द्या. आणि हे सांगत असताना आपल्या नजरेच्या खुणे ने फतेह खान ला सांगितले की लखुजी राजांना माझ्या सोबत पाठवा. आणि फतेह खान ने मुद्दाम लखुजी राजांना त्याच्या सोबत पाठविले.

  भोसले गढ़ी वेरुळ

   बाळ राजांना  सराव करण्यासाठी एक बाहुले बनविले होते. 
पण आज बाळ राजे त्या बाहुल्या रुपी रयते ला काठीने बडवत होते. त्याच वेळी तिथं जिजाबाई आल्या आणि त्यांनी बाळ राजांना विचारले की का मारत आहात ? तर बाळ राजे म्हणाले की, ही आमची रयत आहे आणि आमचे सांगणे  ते ऐकत नाहीये. म्हणून आम्ही त्यांना शिक्षा करत आहोत. जिजाबाई बाळ राजांना समजावून पाहतात. की रयते वर असा अत्याचार करायचा नसतो." पण ते काही ऐकतच नाही त्या बाहुल्या ला काठीने बडवतच राहतात. म्हणून जिजाबाईं त्यांच्या रागवत
म्हणल्या की, आम्ही ही तुम्हाला बडविले तर ?" त्यावर बाळ
राजे निर्भय पने उत्तर देतात की , तुम्ही आम्हाला बडवू शकत
नाही ,कारण आम्ही आपले पुत्र आहोत." असे म्हणून पुन्हा बडविने सुरू केले. जिजाबाईना त्याचा राग आला नि त्यांनी ते बाहुले काढून घेत म्हटले तुम्हाला ही आमचे ऐकायचे नसेल तर आम्ही तुम्हाला पण शिक्षा करू."असे म्हणून त्यांच्या  हातातील बाहुले काढून घेतले. त्यामुळे बाळ राजे रडत मोठ्या आऊ साहेबांकडे गेले नि  आपल्या आऊ साहेबांची तक्रार केली. तेव्हा उमाबाई बाळ राजांची समजूत काढतात. आणि जिजाबाईंना खुश करण्यासाठी त्या बाळ राजांना सांगतात की
आता आपल्या आऊ साहेबांना सांगा बरं, की आम्ही पुन्हा असं करणार नाही म्हणून." तेव्हा जिजाबाई ते बाहुले त्यांच्या हातात देतात. बाळ राजे खुश झाले नि बाहुले घेऊन तिकडून निघून गेले. तसे त्या जिजाबाईंना समजावत म्हणाल्या की, " बाळ राजे होते म्हणून त्याच्या समोर आम्ही विचारले नाही. राजांनी
तुमचं ऐकलं नाही म्हणून त्यांच्या वरचा राग बाळ राजावर
का काढता ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," मी स्वारी वरचा
राग त्यांचा वर नाही काढला तर  रयते वर कोणी अन्याय
करत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही मग ते
स्वप्न असो वां खेळ असो. तेव्हा उमाबाई म्हणाल्या," जिजाबाई आम्हाला ठाऊक आहेत, तुम्ही दुखावल्या आहात. पण हा
त्या वरचा उपाय नाही. आणि पती पत्नी मध्ये असे वाद होतच
असतात. पण त्याचा राग दुसऱ्या वर काढायचा नाही तर
काळ ह्या वैद्य कडे ते काम सोपवून द्यायचे. काळच प्रत्येक
रोगवरचे औषंध आहे."

  विजापूर

    शहाजी राजे बेचैनी ने इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होते.
तेव्हा बाजी राजे घोरपडे यांनी विचारले," इतके अस्वस्थ का
तुम्ही ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले," जर बादशहा आपल्या
भावंडं सोबत असे वागू शकतो तर रयतेची कसा वागेल?"
   " अहो, त्यांच्या कडे हे असेच चालते. ते तख्त साठी आपल्या
बापाला ही मारायला कमी करत नाहीत."
   " असं वाटतं निघून जावे." इतक्यातच आदिलशहा मोहम्मद
आला त्यांनी शहाजी राजांचे शेवटचे वक्तव्य ऐकले असावे.
म्हणूनच की काय त्याने विचारले," कहां जानेका सोच रहे है
शाहजी राजे ?" शाहजी राजे एकदम चपापले. पण लगेच
स्वतःला सावरत म्हणाले," कही नहीं ?" त्यावर तो म्हणाला,
  " शहाजी राजे इतना तो हमे पता है, निघून जावे इसका
मतलब क्या होता है ? " बाजी राजे घोरपड़े सुध्दा भांबावला.
आता शहाजी काय उत्तर देतात या कडे त्याचे लक्ष लागले.
शहाजी राजे मोठे ममुसद्दी आहेत ही कदाचित त्यना ठाऊक
नसावे. शहाजी राजे म्हणाले," हम सोच रहे थे निजामशाही
पुना पाटस जो मुलुख है, उसपर चढ़ाई कर देना चाहिए बस मैं वही कह रहा था मोहिम पर निकल जाएं।" तेव्हा बादशहा हजरत म्हणाला," जरूर जरूर चले जाइए साथ में हमारी भी सैन्या ले जाइए और आपके जो भाई है, ना, मंबाजी राजे और खेलोजी राजे उन्हे भी अपने साथ ले जाइए ।" बाजी राजे घोरपडे तर एकदम चकितच झाले. शहाजी राजांनी बादशहाला देखील मूर्ख बनविले. हे पाहून तो थक्कच झाले. तेव्हा बादशहा मोहम्मद म्हणाला," बाजी राजे, आप ऐसा क्या देख रहे हो ?"
  " हुजुर मैं समझ नहीं पा रहा हुं, कितने आसानी से लोग
सामने वाले को बेवकूफ बनाते है,यह कला हमे नहीं आती
शायद इसलिए जो मुकाम शाहजी राजे पाए वो नहीं पा सके।"
   " कहना क्या चाहते हो ?"
   " जी कुछ नहीं।"
   " कुछ कैसे नहीं बताओ क्या बात है ?"
    " बात कुछ नहीं हुजूर हमे लगा की दरबार का दृश्य देखकर
शहाजी राजे डर गए और वो आदिलशाही छोड़कर जाना चाहते है, लेकिन नजारा कुछ और देखने को मिला मतलब
यह की हाथी के दांत खाने के अलग और दिखाने के अलग
होते है। चाहे तो आप शाहजी राजे को वापस बुलाकर पूछ
लो." तेव्हा मोहम्मद बादशहा म्हणाला," कब किसको क्या
बुलाना  है वो हम तय करेंगे, आप नहीं।"  बाजी राजे !"

    सोयराबाईंनी आपले मत व्यक्त करत आपल्या सूनबाई ना
सांगितले की तुम्ही खेलोजी निजामशाहीत जायला सांगा.
कारण त्यांना अशी भीती वाटत होती की दोघेही भाऊ एकाच
शाहीत राहिले आणि खस्त झाले तर त्या पेक्षा वेगवेगळ्या
शाहीत असले तर दोंघापैकी कुणीतरी वाचेल. असं आपलं
त्यांना वाटत होतं. तर दुसरी कडे वेरुळ मध्ये उमाबाईना आदिलशाहीत काय घडलं याची खबर मिळाली. सर्वांच्या मानेवर तलवार ठेऊन सर्वांना जायबंदी केले. अशी खबर मिळाली म्हणून ते खरे आहे का खोटे हे जाणून घेणयाकरिता उमा बाईंनी जिजाबाईंशी त्या संदर्भात चर्चा केली तर त्यांना त्यातले काही माहित नसल्याचे सांगितले गेले.त्यामुळे दोघंही चिंताग्रस्त होतात. पण त्याच वेळी गोमाजी ने खबर दिली की राजे सुखरूप आहे,बस इतकंच सांगून गप्प झाले. उमा बाईच्या मनावरील दडपण दूर झाले.त्यामुळे त्या निश्चित झाल्या
नि आंत निघून गेल्या. गोमाजी आपली नजर खाली झुकविली
आहे  हे जिजाबाई च्या ध्यानी आले. गोमाजी काहीतरी लपवत
आहेत. असा त्यांना संशय  आला नि त्यांनी त्या बद्दल गोमाजी ना विचारणा केली असता.असे कळले की शहाजी राजांच्या विरुध्द लखुजी राजे आहेत. त्यामुळे जिजाबाई पुन्हा चिंताग्रस्त झाल्या. म्हणजे स्वारी आणि आबा साहेब पुन्हा एकामेका विरुध्द लढणारा आहेत . या विचारानेच त्या हवादील झाल्या.

  शहाजी राजांनी पुणे आणि पाटस जिंकल्याची खबर लखुजी
राजे खंडागळे सरदार देत असताना सांगतात की आम्ही तिथं
पोहोचण्यापूर्वीच शहाजी राजांनी पुणे आणि पाटस जिंकले.
पण खंडागळे सरदार वाटले की, हे आपली चेष्टा करताहेत.
आणि ह्यांची पण तर हीच इच्छा होती की शहाजी राजे भोसल्यांची वंश परंपरागत असलेले वतन त्यांच्या कसे राहावे
अशी आपली पण इच्छा होती होय ना ?" त्यावर लखुजी राजे
म्हणाले," आम्हाला काय वाटतं ते महत्वाचे नाहीये. तुम्हाला
काय वाटते ते महत्वाचे आहे. कारण शहाजी राजे पुणे जिंकून पाटस गेले आहेत ना, तुम्ही पाटस जा नि शहाजी राजावर हल्ला करा." त्यावर लखुजी राजे म्हणाले," हल्ला ना करू या की, पण तुम्ही पुढे नि आम्ही मागे ." त्यावर खंडागळे सरदार ने विचारले," असे कसे ?" लखुजी राजे म्हणाले," अहो, मोहीम तुमची आहे, आम्ही फक्त तुमची सुरक्षा करणार , काय बरोबर ना ?" खंडागळे सरदार कडे लखुजी राजांच्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर नव्हतं.खरं तर खंडागळे सरदाराचा इरादा होता की जावई आणि सासरा दोघांना एकमेका विरुध्द लढविण्याचा. परंतु त्यांना कदाचित माहित नसावे लखुजी राजे राजनीती मध्ये मुरलेले एक कुशल मनसबदार होते. वरून लखुजी राजे मुद्दामच म्हणाले,  " मग निघायचं ना ?" तसा खंडागळे म्हणाला," नको नको आपण तिथं पोहोचण्या आधीच शहाजी राजांनी पाटस जिंकले तर , आपण काय नुसतं त्यांचा फडकणारा झंडा पहायला जायचं का ? त्या पेक्षा आपण वजीरे आलम कडे जाऊ !" तेव्हा लखुजी राजांनी विचारलं की, आणि काय सांगणार तिथं ?"
   " तिथं काय सांगायचं ते आम्ही बघू तुम्हाला त्याची चिंता
करण्याचे काही कारण नाही." असे बोलून खंडागळे सरदार
तिकडून निघून गेला. लखुजी राजे त्याच्या पाठमोरी आकृती
कडे पाहत गालातल्या गालात हसत होते जणू ते त्यांना सांगू
इच्छित होते की आम्हां आपसात लढवू पाहत होतास ना ?
तुला काय वाटलं ? आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू ? ते पण
अश्या सरदाराची जो फतेह खान समोर चोंबडेगिरीचे काम
करतो.

भोसले गढी वेरुळ

     शहाजी राजे मोहीमे वरून परत आले. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सगळे उभे होते. बाळ राजे आपल्या आबा
साहेबांना पाहताच उमाबाईच्या हातून आपला हात सोडवून
ते पळतच शहाजी राजाकडे झेपावले. तसे शहाजी राजांनी त्यांना उचलून घेतले. सगळेजण तेथे उपस्थित होते.मात्र त्यात जिजाबाई नव्हता. आणि शहाजी राजांची नजर जिजाबाईंना शोधत होती. हे उमाबाईच्या ध्यानात आल्यावाचून राहिले नाही. म्हणूनच की काय त्या म्हणाल्या," राजे तुम्ही ज्यांना शोधत आहात, त्या तुमच्या वर रुसल्या आहेत कारण तुम्ही त्यांना जाताना दुखवून गेला होता. आता त्यांचा रुसवा कसा घालवायचा ते तुमचंच तुम्ही पहा बरं." गोमाजी आंत जाऊन त्यांनी जिजाबाईंना वर्दी दिली की राजे आले आहेत, आणि तुम्ही आल्या नाही तिथं." त्यावर जिजाबाई म्हणाल्या की, ज्यांना आनंद झालाय ते आहेत ना तिथं. मग झालं तर !" इतक्यात तिथं शहाजी राजे आले नि म्हणाले, गोमाजी काका तुमच्या ह्या जिजा अक्का अगोदर आम्ही मोहीमे वर गेलो की  किती हळहळल्या होत्या." त्यावर गोमाजी म्हणाले," राजे आता तुमच्या दोघांच्या मध्ये आम्ही काय बोलणार ना ?"असे म्हणून ते तेथून चालते झाले. तेव्हा शहाजी राजे म्हणाले," आम्ही एवढा मुलुख मारून आलोय तरी देखील आपल्याला आनंद झाला नाही आणि आमचं स्वागत करायला यावं असं वाटलं नाही तुम्हाला याला काय म्हणावं !"
  " काहीही म्हणून नका. जेवढं बोलायचं होतं तेवढं जाताना बोलून गेलात."
   " अच्छा म्हणजे आमच्यावर रुसाल्या आहात तर !"
  " अंह ss. रुसलो नाहीतर उलट्या शहाण्या झालो. तुम्ही येण्याचीच आम्ही वाट पाहत होतो, तुम्ही आल्यावर तुमची परवानगी घेऊनच आम्ही देखील स्वारी वर जायचं विचार करत होतो."
  " तुम्ही स्वारी वर जाणार, म्हणजे आम्ही काय हातात चुडा
भरला की काय ?"
  " तसं नाही बाहेर गेल्या शिवाय आम्हाला तरी कसं कळणार की वारा कोणत्या दिशेने वाहतोय तो ? चार भिंतीच्या आंतमध्ये
राहून थोडेच कळणार आहे ?  नाही का ?"
  " अच्छा म्हणजे आमचेच बोल आम्हाला ऐकवता तर  ? मला
हे कळत नाही की,  सर्व स्त्रियांना हेच का आवडतं की आपल्याच कुंकू वाचे बोल वेळ येताच आपल्याच कुंकू ला ऐकवावे ? त्यात काही वेगळे समाधान वगैरे मिळतं का ? आम्ही
एवढा मुलुख मारून आणला. पण त्याचे साधे कौतुक ही केलं
नाही. बरं ते जाऊ दे आम्ही काय सांगतो ते ऐका. पुणे पाटस हा मुलुख तुम्ही  जिंकला. आणि आता तो आपला झाला."
  " आम्ही नाही स्वारीनी जिंकला."
  " म्हणजे तेच की, आम्ही आणि तुम्ही काही वेगळे आहोत
का ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," पण त्याचा  उपयोग काय ? मुलुख जिंकून आदिलशाहीत दौलती मध्ये भर घातली दुसरे काय केलं.?" शहाजी राजे म्हणाले," म्हणजे आम्ही काय म्हणतोय ते तुमच्या ध्यानात आलेले दिसत नाहीये. आम्ही मुलुख जिंकला म्हणजे तो आता आपला झालाय." शहाजी राजे जे सांगू इच्छित होते ते जिजाबाईच्या काही ध्यानी येत त्या फार गोंधलेळ्या स्थितीत शहाजी राजांकडे पाहत म्हणाल्या,
  "  तुम्हाला नेमके काय म्हणावयाचे आहे ते नीट आम्हाला समजेल अश्या भाषेत सांगाल का ?" तेव्हा शहाजी राजांनी विजापूर ला निघते वेळी जे वक्तव्य केले तेच वक्तव्य पुन्हा
ऐकविले. " आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना, की झुंज आणि
राजनीती याचा मेळ साधायला हवा, आणि तोच आम्ही साधला." पण तरी देखील जिजाबाई च्या ध्यानात येत नव्हते.
म्हणून आदिलशाही दरबारात काय घडलं ह्याचे वर्णन करून
शेवटी राजे म्हणाले की , आम्ही त्याच वेळी आदिलशाही सोडण्याचा विचार केला. पण लगेच आमच्या ध्यानात आलं की जुन्नर आणि शिवनेरी जरी आपल्या कडे असली तरी पुणे
आणि पाटस हे  दोन्ही मुलुख आपल्या ताब्यात असणे गरजेचे
आहे. कारण हे दोन्ही मुलुख वंश परंपरागत भोसल्यांची जहागीरी मध्ये होते. पण ते सध्या ते दोन्ही मुलुख निजामशाहीत
आहेत, ते परत आपल्या ताब्यात घेणे आवश्यक आहे, म्हणून
आम्ही आदिलशहा सैन्य वापरून ते दोन्ही मुलुख जिंकून घेतले.
आता ते आपले झाले. अर्थात त्यावर भोसल्यांचा झंडा फडकवला. आता पासून तो मुलुख आपला.तुम्हाला हवे असलेले स्वराज निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे." असे
म्हणताच जिजाबाईंना इतका आनंद झाला की त्याचे वर्णन
शब्दात करता येणार नाही.त्या पळतच शहाजी राजांना बिलगल्या. तेव्हा शहाजी राजांनी त्यांना आपल्या मिठीत घेतले.


क्रमशः







shoorveer,chhatrapatishivajimaharaj,shoorveer3,#maharanpratap,#prithvirajchauhan,#samratprithvirajchauhan,maratha king shivaji maharaj,greatest warrior shivaji,kesariya,छत्रपति शिवाजी महाराज,rapperiya baalam,rajneesh jaipuri,shambo rap,jagirdar rv,meetu solanki,shoorveer song singer,trending song shoorveer,maharashtra,jay shivraye jai shamboraje,जय शिवराय जय शंभुराजे,राखी केसरिया की लाज शिवाजी,हो शम्भू रूप अवतार शिवाजी,rajasthani rapper,marathi rapper,shambo

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.