Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

छत्रपती शिवाजी महाराज ४१ | chhatrapati shivaji maharaj episode 41 | Author :- Mahendranath prabhu

 

छत्रपती शिवाजी महाराज ४१ | chhatrapati shivaji maharaj episode 41 | Author :- Mahendranath prabhu
छत्रपती शिवाजी महाराज ४१ | chhatrapati shivaji maharaj episode 41 | Author :- Mahendranath prabhu




     जिजाबाईचां राग अनावर झाला. त्यांनी आपली तलवार उपसली नि त्याच्या गळ्याला लावली नि त्याच्या गळा कापून टाकणार तोच गोमाजी म्हणाला," जिजा अक्का तुमचे हात ह्याच्या घाणेरड्या रक्ताने विटाळू नका.त्याला माझ्या हवाली करा?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आता ह्याचे अगोदर डोळे फोडू नका. त्याला पाहू दे त्याच्या डोळ्याने त्याच्या शरीराचे कसे तुकडे तुकडे होताहेत.ह्याची फार खांडोळी करून टाका मेल्याची  ! साऱ्या जगाला कळू दे, स्त्री वर वाईट नजर
ठेवणाऱ्यांना काय गत होते आमच्या राज्यात." तसा गोमाजी
त्याला म्हणाला चल रे, तुझी मस्ती कशी जिरवतो ती बघ आता!"असे बोलून त्या तिघांनाही घेऊन गेले.

पुढे

   एक पठाण आला नि जिजा बाईंच्या हातात फर्मान देवून
गेला जिजाबाईंनी फर्मान खोलून वाचू लागल्या. इतक्यात तिथं
उमाबाईना पाहून जिजाबाई चपापल्या. पण आता फर्मान
लपवू पण शकत नव्हत्या. कारण उमा बाईंनी फर्मान पाहिले
होते.म्हणून त्यांना वाटले की हे फर्मान वजीरे आलंम मलिक
अंबर चे असणार , इकलाख खान ची गर्दन मारल्याची खबर
वरपर्यंत पोहोचली असावी. आता पुढे काय होणार या भीतीने
त्यांनी विचारले ," इकलाख खान ची गर्दन मारल्याची खबर
इतक्या लवकर वरपर्यंत पोहोचली सुध्दा ?" तेव्हा जिजाबाई म्हणाल्या," नाही. पण तुम्ही त्याचा घोर घेऊ नका." त्यावर उमा बाईंनी विचारले की, कशा कशाचा घोर घ्यायचा नाही ते सांगा बरं ? शहाजी राजे आम्हाला न सांगताच गेले. तुम्हाला देखील सांगू नको म्हणून सांगून गेले. इथं गोदा वर हल्ला झाला ते विसरायचं का इकलाख मारला गेला त्याचा घोर घ्यायचा नाही ? ते तरी सांगा." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आम्ही स्वारी ना शब्द दिला होता की आम्ही कुणालाही  काही सांगणार नाही म्हणून. परंतु आता आमचा नाईलाज झाला आहे, म्हणून स्वारी ना आम्ही दिलेला शब्द मोडत आहोत. शरीफ जीचा काळ झाला. त्याचा सूड म्हणून स्वारी मुल्ला बाबा चे नामोनिशाण मिटवायला स्वारी गेले आहेत." त्यावर उमा बाई म्हणाल्या,
   "  अहो, पण ही गोष्ट आदिलशहाला कळल्या शिवाय राहील काय ? राजांचा  उद्देश कितीही चांगला असला तरीही एकदा सुडाचे सत्र सुरू झालं की ते कधीच थांबत नाही. त्यात माणूस अडकतच जातो. असं होता कामा नये. आणि आता हे फर्मान कोणाचे आले आहे ते नाही सांगितलेत ते." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आदिलशाहा ने पाठविले आहे. स्वारी ना तिकडे बोलविले आहे." ते ऐकून उमाबाई अधिकच  चिंताग्रस्त झाल्या.
त्या म्हणाल्या," शेवटी आम्ही म्हणत होते तेच झाले. शंभू महादेवा  आता तूच यातून मार्ग काढ बरं आणि राजे जिकडे असतील तिकडे सुखरूप ठेव रे बाबा."

   लखुजी राजे आपल्या धाकट्या बंधू वर रागवतात.कारण
त्यांनी जगदेव रावांना सिंदखेड ला रवाना व्हायला सांगितले
होते. परंतु ते सिंदखेड गेलेत नाहीत. त्याच कारण सांगताना
ते म्हणाले की, रणदुल्ला खान नेच आम्हाला थांबायला सांगितले . म्हणून आम्ही थांबलो. लखुजी राजांना कळेना या मागचे कारण काय ? इतक्यात पंडित मुरार जगदेव आणि रणदुल्ला खाना सोबत शहाजी राजे येत आहेत. हे पाहून लखुजी राजांनी अंदाज लावला की शहाजी राजांना कैद करून आणण्यात येत आहे. परंतु जगदेव रावांचे असे म्हणणे होते की
नाही, शहाजी राजे रुबाबात येत आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा गैरसमज दूर झाला. कारण  रणदुल्ला खान ने शहाजी
राजांना  म्हटले की ," आपका स्वागत करने लिए खुद बादशहा इब्राहिम अदीलशाह आ रहे है।"  आणि थोड्याच वेळात बादशाह दरबारात प्रवेश करतात. त्यांना पाहून सर्वजण वाकून मुजरा करतात. तेव्हा लखुजी राजे म्हणाले," बघितलेत ,आमचं स्वागत सरदार राऊटी मध्ये केले. आणि शहाजी राजांचे
स्वगत करायला  स्वतः बादशहा येणार आहे, ह्यालाच डोक्यावर बसवणे म्हणतात." त्यावर जगदेव राव म्हणाले," ते काय
मराठी सरदाराला डोक्यावर बसविणार आणि  तसे पण शहाजी
राजांचे एवढे कर्तुव कोठे आहे." तेव्हा रणदुल्ला खान म्हणाला,
" बादशहा सलामत दुनिया को अपना जिगर ओर हुनर सिर्फ
बातोंसे नहीं मैदानी जंग में मुगलिया सल्तनत के खिलाफ दिखाने वाले शाहजी राजे मालोजी राजे भोसले आदिलशाही
सल्तनत में हाजिर हुए है। उनका इकबाल आप करे, यही हमारी
ख्याहिश है । तेव्हा बादशहा इब्राहिम म्हणाला," हुं ss मुगल
सल्तनत से लोहा लेने वाले एक जांबाज शिपाई यहां मौजूद
है,इसका हमे फर्क है, उन बगावत खोरोंको उनके अंजाम तक
पहुचनाने वाले शाहजी राजे भोसले बिन मालोजी राजे भोसले
का यह सल्तनत सच्चे दिल से इकबाल करती और इन्हे सर
लश्कर पद से नवाजती है। " अश्या प्रकारे आदिलशहा इब्राहिम हजरत ने त्यांचा सत्कार तर केलाच शिवाय सर लष्कर ही पदवी बहाल केली. त्या शिवाय मुल्ला बाबा ला ठार करून त्यांनी मिळविलेला मुलुख  जुन्नर पुणे त्यांना इनाम म्हणून बहाल करण्यात आला. तेव्हा पंडित मुरार जगदेव म्हणाले," मैदाने
जंग की डोर अब आपके हाथ में है। अब तो फतेह निश्चित है।
शाहजी राजे म्हणाले," बादशहा की पारखी नजर और रहमदिली और आपका सबका यकीन यही हमारे लिए फतेह की बात है।"

   जिजाबाईंना ही वार्ता समजली तेव्हा त्या फार खुश झाल्या.
नि म्हणाल्या," शंभू महादेवा  असाच स्वारी च्या पाठीशी रहा."
तेव्हा बाळ राजे संभाजी राजांनी विचारले की, तुम्ही हसताय?"
तेव्हा जिजाबाईं म्हणाल्या," का ? आम्ही हसू पण नये ?"
  " तुम्ही हसत नाही ना म्हणून म्हटलं."
  " आम्ही का हसतोय माहितेय ? आम्हाला फार आनंद झालाय म्हणून हसतोय आम्ही !"  
   " पण कशाचा आनंद ?"
   " तुमचे आबा साहेब ना सर लष्कर झालेत ?"
   " म्हणजे काय झाले ....बादशहा ...?" असं छोट्याश्या बाळाने प्रश्न केला. ह्या प्रश्नाने मात्र त्यांच्या चेहऱ्यावर चे हास्य क्षणात मावळले . आणि त्यांच्या बालपणीचा प्रसंग आठवला. त्या म्हणाल्या होत्या की आपण सदैव मुजरे करीत का ? आपल्याला कधी बादशाह व्हायचेच नाही का ? हे सारे आठवले
तसा त्यांचा चेहरा एकदम गंभीर झाला.

   जिजाबाई शहाजी राजांना पंख्या ने वारा घालत असतात.
आणि त्याच वेळी शहाजी राजे मोठ्या अभिमानाने सांगत
असतात की, बादशहा ने प्रथम च आमचा सर लष्कर म्हणून
गौरव केला.आज आबा साहेब असते तर त्यांना कोण आनंद
झाला असता. तिथं दरबारात तुमचे आबा साहेब आणि काका
साहेब पण होते. आता त्यांना किती आनंद वाटला असेल ते
कोण जाणे ? कदाचित त्यांना अपमानच वाटला असावा. त्यांच्या पेक्षा मोठ्या मानाचे  पद जे मला मिळाले. पण स्वतः
बादशहा इब्राहिमच्या मनात मात्र प्रचंड आदर होता. आणि
रणदुल्ला खान आणि पंडित मुरार जगदेव अगत्याने आमचे कौतुक करत होते." शहाजी राजे मोठ्या अभिमानाने सांगत होते नि जिजाबाई फक्त निमूटपणे ऐकत होत्या. त्यावर आपली कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत. हे लवकरच  शहाजी राजांच्या ध्यानी येते. तसे ते त्यांच्या वर नाराज होत म्हणाले की,
काय झालं ? तुमच्या आबा साहेबांचा विचार करताय की काय ?" तेव्हा जिजाबाईं म्हणाल्या," ते आता फक्त आमचे आबा साहेब झाले त्याचा विचार करतेय."
   " म्हणजे ?"
   " या पूर्वी तुम्ही कधी तुमचे आबा साहेब असे म्हणत नव्हता. ते तुमचे पण आबा साहेब होते. आणि आता ते फक्त आमचे आबा  साहेब झाले ? इतका फरक तो पण इतक्या लवकर इतका फरक झाला याचा विचार करते."

मलिक अंबर दालन   दौलताबाद

   आदिलशाहीत लखुजी राजांचा अपमान झाला म्हणून लखुजी
राजे पुन्हा निजामशाहीत गेले. मलिक अंबर ची तब्बेत खराब
असल्याने मलिक अंबरच्या वतीने त्यांचा मुलगा फतेह खान
बोलतो. तो म्हणाला की, अब्बा हुजूर ईमान की बात कर रहे
है। आप सब मराठों सरदारोंको  यहां इसलिए बुलाया है की
आप सबका ईमान यहां अब्बा हुजूर के कदमों में है ।" तोच
खंडागळे सरदार पटकन म्हणाला की, ह्या खंडागळेचे ईमान आपके चरणो में ही है। पायावर रगात सांडून दाखला देवू का ?" तेव्हा फतेह खान खुश होऊन म्हणाला," शाब्बास !
सबके सामने ऐसी बात करने की हिम्मत चाहिए । जो आपके
पास है।  बेईमान यह बात कभी भी नहीं कह सकते।"
मालिक अंबर बोला," बेईमानोसे कभी भी ईमान की बात
नहीं होगी। वो अपने नजरोंसे गिर चुके है, काफी लोगोंको की
मिलने की चाहत...." अचानक खोखल्याची उबळ आली त्यामुळे मलिक अंबरचे वक्तव्य मध्येच खंडित झाले. तेव्हा
त्यांचे खंडित झालेले वक्तव्य फतेह खान पूर्ण करत म्हणाला
" काफी लोग मिलनेकी चाहत रखते है। लेकिन अब्बा हुजूर
वो गलती दुबारा नहीं करेंगे । जिनको अब्बा हुजूर ने दिल के
करीब रखा था वही लोग धोका देकर चले गए । जख्म ज्यादा गहरे है।" तसा खंडागळे सरदार मध्येच पचकला म्हणाला की, आमच्या  इथं खाल्या घराचे वासे मोजणे असे म्हणतात. शिकवले तुम्ही तरबेज केलं तुम्ही पण वरची मलाई कोण खाते तर तिकडे आदिलशाही चे तख्त तिकडे शहाजी राजांना सर लष्कर बनविले. काय लखुजी राजे आम्ही चुकीचे तर बोलत नाही ना ? तिथं तुमची पण आता इज्जत राहिली नाही म्हणून तुम्ही इथं आला. आता काय बोलणार तुम्ही ? तोंड तरी आहे का बोलायला ?" मलिक अंबर म्हणाला की, भरोसा जितना शोहरत रखने वाला होता है धोका उतना ही कीमती हो जाता है ।" पुन्हा खोखला लागला. तेव्हा फतेह खान पुढे म्हणाला," जमीन पर धूल है उसे धोने के लिए ईमान का पानी चाहिए . जो लोग मुगलिया सल्तनत या आदिलशाही सल्तनत में जाना चाहते है,वो खुशी से जा सकते है और जो हमारे साथ रहना चाहते है उन्हे इस तख्त के साथ ईमान रखना होगा ।" अचानक मालिक अंबरचा खोखला जास्तच चाळवला. तसा फतेह खान ने दरबार बरखास्त केला. आणि खंडागळे सरदार आणि फतेह खान दोघांनी मलिक अंबर ला  आधार दिला नि त्याला आंत घेऊन गेले.बाकीचे सर्व सरदार निघून गेले. आता फक्त दरबारात लखुजी राजे आणि त्यांचे बंधू जगदेव राव शिल्लक होते. लखुजी राजांची बिलकुल दख्खल घेतली गेली नाही. हा सर्वात मोठा लखुजी राजांचा अपमान होता. तेव्हा ते आपल्या बंधू ला म्हणाले," झालं संपले सारे !"

  भोसले गढी

   शहाजी राजांना राग आला ते म्हणाले की आम्ही एवढे
भरभरून सांगतोय पण आपल्या कडून आमचं कौतुक नाही
की काय नाही .....झाली आमची न्याहरी." तेव्हा जिजाबाईं
म्हणाल्या," जेवणावर राग काढू नका." आम्ही आपले कौतुक
ही ऐकले." तेव्हा शाहजी राजे म्हणाले, " आम्ही राग काढत नाही, पण आम्हाला आता खायची इच्छा नाही. आम्ही इतकं
भरभरून सांगतोय पण साधं कौतुक ही तुम्ही केलं नाही आणि चेहऱ्यावर आनंद देखील नाही. याचा अर्थ तुम्हाला आनंद झालाच नाही."
   " झाला. आधी आम्हाला आनंदच झाला. पण लहान संभाजी
राजांनी आम्हाला हवेत उडू दिलं नाही. लगेच जमिनीवर आणलं."
  " बाळ राजांनी काय केलं !"
  " बाळ राजांनी मला विचारले की सर लष्कर म्हणजे काय ?
आम्ही काय सांगायला हवं होतं त्यांना ? बढती मिळाली की दोन शिंगे फुटली ?
  " तुम्हालाच कौतुक नाही म्हंटल्यावर दुसरं काय होणार ?
आम्ही जी स्वप्न पाहिली आहेत ती  हाच मार्गाने पूर्ण होणार आहेत."
   " असं आम्हाला तरी नाही वाटतं. कारण हा तो मार्गच नव्हे!
प्रथम आम्ही स्वतःलाच विचारलं की आनंद झाला का ? तर
हो आनंद झाला  पण समाधान आहे का त्यात तर उत्तर नाही
असं मिळालं.आमच्या हाती काही लागलेच नाही. मग अश्या
आनंदाचा उपयोग काय ?" असे म्हणून त्या तेथून जाऊ लागतात. तसे शहाजी राजे त्यांना थांबवत म्हणाले," आम्हाला
अजून हि असंच वाटतंय की आपल्या स्वप्ना कडे घेऊन जाणारा हाच तो मार्ग !"
   " कसा ? पद कोणतेही असो, पण शेवटी चाकरीच करायची
ना ? मग काय फरक पडतोय मान आणि सन्मान ? " असे
बोलून त्या निघून गेल्या. शहाजी राजे मात्र आपल्याच विचारात
मग्न झाले. तेव्हा पंत म्हणाले," राजे आपण खुश दिसत नाहीत.
बाहेर बघा लोकांनी गुढे तोरणे उभारून दिवाळी साजरी
करताहेत. " तेव्हा शहाजी राजे म्हणाले," आपलीच माणसे
खुश नाहीत तर काय फायदा या सर्वाचा ?" इतक्यात समोरून
बाजी पासलकर  आले ते म्हणाले," का फायदा नाही राजे, तुम्ही सर लष्कर झालात. मग आनंद नाही होणार का ? मग गुढी तोरणे उभारून उत्सव साजरा केलाच पाहिजे. तुम्ही राजहंस आहात,आता सर लष्कर झालात. आता आता शी कुठं ओळख होऊ लागली आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे."
    " तुम्हाला आनंद झाला ?"
    " का नाही होणार , आमचे राजे सर लष्कर झाले."
   " बाजी पासलकर बसा."
   " नाही. मी इथं बसायला नाही आलोय एक काम होतं ."
   " काम बोला."
   " आम्ही बाजी घोरपडे ना इथं घेऊन आलोय." असे बाजी
पासलकर नी म्हणताच बाजी घोरपडे पुढे येत म्हणाले," राजे
Ss शहाजी राजे समोर येऊन उभे रहात म्हणाले," बाजी राजे
घोरपडे म्हणा पालकर . जसे शहाजी राजे तसे आम्ही पण
राजे की !" त्यावर बाजी पासलकर हसून म्हणाले," हो ना मग आम्ही कुठं नाही म्हटलं तुम्ही पण राजेच आहात. आमच्या म्हणण्याने काही फरक होणार आहे का ?" त्यावर बाजी घोरपडे म्हणाले," आम्ही पण पूर्वीचे भोसलेच की, आता
घोरपडे हे नाव आम्हाला इनामात मिळालेले, अहो आपण एकच! आता घरोबा राहिला नाही इतकंच." तेव्हा शहाजी
राजे म्हणाले," आम्ही देखील ऐकून आहोत. बसा." बाजी
घोरपडे जसे बसले तसे शहाजी राजे म्हणाले," नात्याची आठवण करून द्यायला आला आहात काय ?" बाजी घोरपडे
म्हणाले," नाही अजिबात नाही. आता तुम्ही सर लष्कर झालात
म्हणून आलो. असा गैरसमज करून घेऊ  नका राजे." त्यावर
शहाजी राजे म्हणाले," गैरसमज कसा ? आमचे आबा साहेब
गेले, नंतर काका साहेब ही गेले. त्यानंतर आमचे चुलत भाऊ
आणि सख्खे भाऊ पण गेले. तेव्हा नाही आली नात्यांची आठवण." असे म्हणताच बाजी घोरपडे ना राग आला ते उठून उभे राहिले.तसे बाजी पासलकर म्हणाले," अहो निघालात आपण इथं कशाला आलो होतो, आदिलशाहीत शब्द टाकायला ना ?" घोरपडे म्हणाले," हो. पण भिक मागायला नाही आलो. आणि कधी भीक मागणार ही नाही. शहाजी राजे सर लष्कर झाले. त्यांना संधि चालून आली त्यांनी ती साधली. तशीच आम्हाला देखील अशी संधि कधी प्राप्त झाली तर आम्ही सुध्दा आमची मर्दुमकी नक्कीच दाखवू. बस इतकंच सांगायला आलो होतो आम्ही ! चला येतो. " असे बोलून ते चालते झाले. त्यावर बाजी पासलकर म्हणाले," ह्यांनी तर बोलकीच बंद करून टाकली. " त्यावर शहाजी राजे म्हणाले," पण आम्हाला ओळख पटली. राजे आहेत ते. आमचंच रक्त आहे ते. तो बाणा असणारच ना ? आम्ही जरूर आदिलशाहीत त्याच्या साठी शब्द टाकू आणि तुमच्या साठी ही !" त्यावर बाजी पासलकर म्हणाले," आमच्या साठी नको राजे . कारण आम्हाला ते जमणार पण नाही. कारण आम्ही आमच्या वावरातच राजे असतो. आता तुम्ही त्यांच्या शब्द टाकणार तेच आमच्यासाठी ढोंगरा एवढे आहे. येतो आम्ही !" बाजी पासलकर निघून गेल्या नंतर शहाजी राजे म्हणाले," काही दूरची नाती जवळ येत आहोत तर काही जवळची नाती दुरावताहेत. बाजी पासलकर सारखी माणसं सुखावतात तर अगदी जवळची माणसं दुखवताहेत."
  

  लखुजी राजे भयंकर चिडले आहेत. सर्वत्र त्यांचा अपमान
होत आहे, त्यामुळे साहजिकच त्यांचे भडकने योगाने आलेच
ते आपल्या धाकट्या बाई साहेबांवर चिडले आहे, ते म्हणाले
आता सगळ्यांच्या जिभेला धार आली आहे, बोला तुम्ही पण
बोला." त्यावर यमुना बाई म्हणाल्या की, तुम्ही उगाचच स्वतःला
त्रास करून घेता आहात. आम्ही असं काहीही म्हटलेले नाही."
  " आम्हाला शब्दांचे अर्थ कळत नाहीत असं म्हणायचंय का
तुम्हाला ? सांगा ना आम्हाला ...तुम्ही आता सर्व सोडा आणि
शांत पडून रहा असंच म्हणाल्या होता ना  तुम्ही ? का ?
आम्हाला कारभार करता येत नाही ? का आता आम्हाला
झेपणारच नाही ? असं तुम्हाला ही वाटतं ?"
   " आम्ही कारभारा बद्दल बोललो आहे का कधी ? आम्हाला
फक्त आपली ही अवस्था पाहवत नाही ?"
   " कसली अवस्था ? बिन पंखाचा गरुड आहोत का आम्ही ?
का बिन पंखांची कोकिळा का बिन नखांचा वाघ ? काय
अवस्था झालीय आमची ?"
    " अहो असं काय बोलताय ?"
    " बोला बोला आता तुम्ही पण शिकवा आम्हाला ." इतक्यात जगदेव राव त्यांच्या जवळ पळत येतात. त्यांना पाहून ते पुढे म्हणाले," जगदेवा आता तुम्ही पण शिकवा आम्हाला. दत्ताजी राजांच्या पुत्र यशवंत राजे आहेत त्यांना ही बोलवा इथं त्यांना म्हणावे आपल्या आजोबांना शिकवा . या तुम्ही सर्वांनी शिकवा." तेव्हा जगदेव राव म्हणाले," दादा साहेब , तुम्ही अगोदर शांत व्हा !" तेव्हा लखुजी राजे खाली बसले. भावनाविभोर झालेले लखुजी राजे किंचित थांबले.आणि लगेच गंभीर होत म्हणाले," जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही जे ठरवू तेच होईल. त्यात बदल नाही." असे म्हणून तेथून ते चालते होईल.तेव्हा त्यांच्या पाठमोरी आकृती कडे पाहून यमुनाबाई म्हणाल्या," मनाला शांती मिळेल अशी दुर्दैवाने घटनाच घडत नाहीये. त्यात नात्यात आलेले वीतुष्ट कारणीभूत आहेच."
   " दादा साहेब जिजाच्या सोयरिकीला तयार नव्हते तेच
बरोबर होते. नात्याच्या बंधनात नसते आणि जर असं घडलं असतं तर इतके घायाळ झाले नसते."
   " म्हणजे ?"
   " जावई आता सर लष्कर झालेत त्यांना मुजरा करणे त्यांना
स्वप्नात हि जमणार नाही म्हणून आदिलशाही सुटली. आणि
ह्या शाहीतून त्या शाहित  येत जात राहिल्यामुळे निजामशाहीत मान राहिला नाही. म्हणून चवताळलेत आहेत ते."

  मलिक अंबर फार आजारी आहे त्याचा मुलगा फतेह खान
त्याला पाणी पाजत होता. आणि त्यानंतर आजूबाजूला कुणी नाही असं पाहून मलिक अंबरच्या गळ्यावर आपला हात ठेवून
म्हणाला," अरे बूढ़े कब से तेरी कबर खोदकर तेरे मरने का
इंतजार कर रहा हु तू मरता क्यों नहीं है, तेरे पैर कबर में अटके
हुए है ,फिर जान क्यों नही छोड़ रहा है।"
   " बेटे, मेरी नजर बहुत तेज है।"
   " ये किसको नजर की बात  सुना रहा तू ? काबुल कंधार से लेकर दख्खन तक अपने बाप भाइयों का  कत्ल करने का दस्तूर है, भूल तो नहीं गया ना ? और मारने से पहले उनकी
आंखे नोज़कर उनसे खेलते भी है, याद है ना ?" तेव्हा मलिक
अंबर म्हणाला," रहम कर बेटे !" तसा फतेह खान चिडून
म्हणाला," वा रहम करे बेटे वा अब्बा हुजूर वा बार बार हमे
जलील करते थे, उसका क्या ? इसी जन्म में भुगतना पड़ता
है, क्यों गले में हड्डी फसे हो ? यह जान छोड़ दो ना ?देखिए
मुझे भी राज करना है, लेकिन आपकी तरह नहीं, मी राज आप से बेहतर करूंगा आप में शाहजी राजा को मारने की हिम्मत नहीं थी लेकिन मैं मुर्तजा निजामशाह को मारकर तख्त हासिल करूंगा ." मालिक अंबर म्हणाला,"अपने दायरे में रहो बेटे ।"
   " ये चुप कर,  तू मर जा, नहीं मैं तेरा गला दबाकर तेरी
सांसे बंद कर दूंगा . मर जा जल्दी ....क्यों सता रहे हो ?"

   भोसले गढ़ी वेरुल
  
  जिजाबाई बाळ राजांना तलवार कशी चालवणे हे शिकवत
असतात. त्या बाळ राजांना ताकीद देतात की तलवार पत्थर
आपटली नाही पाहिजे. कारण वार शस्त्रावर करायचा असतो.
त्या दोघांच्या पाठीमागे उमाबाई उभ्या असतात. इतक्यात
शहाजी राजे खिडकी जवळ येतात तशी त्यांची नजर आखाड्यात तलवार शिकविणाऱ्या जिजाबाई वर पडली. तसे
ते तिथंच उभे राहिले. तेव्हा बाळ राजांनी विचारले की, चुकून
आपटली तर ?" जिजाबाईनी उत्तर देत म्हंटले की , तर दगडाला ही पाझर फुटला पाहिजे. हत्यारा नाही." तेव्हा बाळ
राजे म्हणाले," मग तुमची शमशेर द्या. आम्ही प्रयत्न करू
दगडाला पाझर फोडायला." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आम्ही काय कमी प्रयत्न केले दगडाला पाझर फोडण्यासाठी
पण नाहीच पाझर फुटत तर आम्ही तरी काय करणार ना ?"
उमाबाई म्हणाल्या," जिजाबाई, बाळ राजांनी कितीही हट्ट
केला तरीही त्यांना तुमची शमशेर देवू नका. नाही पेलवणार
त्यांना ? खरं तर हा शिकविण्याचा हट्ट पूरवायलाच नको हवा
होता." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," हट्ट नको पुरवू तर दुसरं
काय करू ? आम्हाला तर वाटतं की ह्यांना लवकरात लवकर
शिकवावे, हत्यारे शिकवावी, घोडेस्वारी करायला शिकवावी आपल्या पोटी उपजणाऱ्या मुलांना हे सगळं लवकरात लवकर शिकवून मोकळे व्हावे." तेव्हा उमा बाईंनी न समजून विचारले की लवकरात लवकर का ?" जिजाबाई म्हणाल्या," आपण जेवढा जीव लावणार तेवढा आपल्यालाच त्रास होणार ना ? ह्यांच्यात काय बदल होणार आहे ? आपण जीव जन्माला घालतो तो समर्पण करण्यासाठीच ना ? मग जास्त दिवस आपल्या कडे ठेवून जीव लावून उगाच आपला त्रास वाढवून का घ्यायचा ?
  " शरीफ जी बिच्चारे असेच गेले." उमाबाई एकदम  भावना
वश होत म्हणाल्या. त्यावर जिजाबाई म्हणाल्या," हे ही उद्या
तेच करणार, कुणाची तरी चाकरी करणार, आणि मग कोणत्या
तरी मोहिमेत खस्त होणार. काळीज तर आपलंच कुरतडलं
जातं ना ? जाणाऱ्या जीवाला कुठं काय परवा असते त्याची . त्रास होतोय तो फक्त आपल्याला. ह्यांना आपण लवकर मोठे करू, मग हे देखील पराक्रम गाजवतील , बढ़ती मिळेल, वजीरे आलम होतील, नि मग खस्त होतील." उमाबाई म्हणाल्या," बस बस थांबा आता. तुमचे बोल जरी खरे असले तरी ते आम्हाला नाही ऐकवत."

    सोयराबाई आणि जाऊबाई या सासू - सूना उमाबाई ना
भेटायला आल्या. जाऊबाईनी उमाबाईचे चरण स्पर्श केले.
तसा उमा बाईंनी त्यांना आशीर्वाद दिला. सुखी रहा." असे
बोलून त्या म्हणाल्या," तुम्हाला काही विचारायचे होते ना ?
आणि हां जिजाबाईंना भेटून जा." त्यावर जाऊबाई म्हणाल्या,
  " अरे हो, विसरलेच होते मी येते भेटून." असे म्हणून सोयरा बाईकडे त्या म्हणाल्या," गेलं तर चालेल ना ?" तेव्हा सोयराबाई त्यांना आपल्या नजरेने खुणवतात. पण त्यांचा
इशारा उमा बाईंनी बरोबर ओळखला. तेव्हा त्या म्हणाल्या,
"आम्ही आल्या पासून पाहतोय की तुम्ही सूनबाई ना पुढे
करताय, तेव्हा तुम्हाला काय विचारायचे ते विचारा.जाऊन
दे त्यांना.सणबाई जा तुम्ही !" जाऊबाई निघून गेल्या. तशा
उमा बाई पुढे म्हणाल्या," बसा." त्या बसल्या. त्या पुढे म्हणाल्या," हुं बोला आता." तेव्हा सोयराबाई म्हणाल्या,
" मंबाजी राजांना काही माहित नाही म्हणा. आम्हीच आलोत.
आता स्पष्टच बोलते.वजीरे आलम मलिक अंबर, पैगंबरवाशी झाले. आणि मी आण राजू तर अगोदरच गेले. आता फतेह खान ला वजीरे आलम ला बनवत आहेत.आणि
तुम्हाला तर माहित आहेच फतेह खान चा भोसले घराण्यावर
राग आहे, म्हणजे खरा शहाजी राजे वर पण सगळ्यांनाच
भोगावे लागते ना ?"
  " हुं बरं पुढे."
  " आम्ही असे म्हणत होतो की मांबाजी राजे नि खेलोजी
साठी आदिलशाही मध्ये शहाजी राजांना शब्द टाकायला
सांगा. शहाजी राजे तर पराक्रमी आहेतच तसे मंबाजी राजे
नि खेलोजी राजे पण पराक्रमी आहेत. शहाजी राजे निजामशाही
सोडून आदिलशाहीत गेलेत. बढती मिळाली नि सर लष्कर झाले. तसेच मंबाजी राजे नि खेलोजी पण आदिलशाहीत
गेले तर त्यांना पण बढती मिळेल.आणि नशिबात असेल तर...
   " हो नशिबात असेल तर मिळेल."
   " पण नसेल तर...
    " नसेल तर नाही मिळणार."
    " अहो,असं काय करताय ? शहाजी राजांनी मदत नका
का करायला बघा ना ? तुम्ही सांगा ना त्यांना. निदान वाडा
तरी सावरायला हवा ना ? आणि हे सर्व करायला स्त्री नेच
पुढाकार घ्यावा लागतो."
  " वाटण्या करता ना हा सयंम दाखविला असता तर ही वेळ
आली नसती. असो आम्ही बोलून बघते शहाजी राजांना."

  शहाजी राजांच्या समोरून जिजाबाई आल्या पण काही न
बोलता साईट देऊन जाऊ लागल्या. तसे शहाजी राजे म्हणाले,
  " तुम्हाला कसला राग आलाय एवढा ते एकदा सांगून टाका
बरं." पण जिजाबाईंनी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर न देता उलट
विचारले," तुम्हाला कसला आनंद झालाय ते आधी सांगा."
   " आज काकी साहेब आल्या होत्या..."
   " जाऊबाई पण भेटल्या मला."
   " सगेसोयरे भेटायला आले म्हणून आनंद होतोय का ?"
   " नाही काकी साहेब कशाला आल्या होत्या हे तर तुम्हाला
माहीतच असेल, पण बाजी घोरपड़े पण आले होते. बाजी
पासलकरानी त्यांच्यासाठी आदिलशाह कड़े शब्द टाकायला
सांगितला आहे."
   " अच्छा म्हणजे सगळ्यांना चाकरी करायची आहे, आणि
त्यासाठी तुमचा शब्द कामी येतोय त्याचा आनंद होतोय का
तुम्हाला ? मग बाजी पासलकर म्हणाले ते काय ?"
   " बाजी पासलकर घोरपडे साठी शब्द टाका म्हणून सांगायला
आले होते, त्यांना स्वतः चाकरी करायची नाहीये. त्यांना त्यांचा वावरच त्यांच्या साठी ठीक आहे, असे ते म्हणाले." जिजाबाई ते ऐकले नि काही न बोलता निघून जाऊ लागले. तसे शहाजी राजे म्हणाले ," तुम्हाला काय बोलायचे एकदा बोलून टाका. "
" कशाला ? तुम्हाला काही करायचंच नाही तर बोलून काय
फायदा त्याचा ?"
  " सकाळी वीणा कारण आऊ साहेबांना तुम्ही दुखवलेत. माझ्या वरचा राग त्यांच्यावर का काढला. तुम्ही आम्हाला विचारलेत आनंद झालाय का समाधान मिळतंय का ? असं विचारल्यापासून आमचं कशातच चित्त लागत नाहीये. सदरेवर गेलो तरी डोक्यात तेच विचार सुरू असतात. मला एक कळत नाही की तुम्हाला घाई कशाची आहे ? प्रत्येक गोष्टीला एक योग्य काळ  हवा असतो. तुम्हाला काय वाटतं की आम्ही आमचं स्वप्न वाऱ्यावर सोडलं ? नाही. आम्ही काहीही वाऱ्यावर सोडलेले नाहीये. पण तिथं पोहोचण्याची वाट जरा बिकट आहे. म्हणून तिथं पोहोचण्यासाठी आम्ही सर लष्कर हा मार्ग निवडला आहे. हा मार्गच आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. पण त्यासाठी विचारपूर्वक पाऊले टाकत पुढे जायचे आहे. नाहीतर तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे गोवर मोडून चुलीत कोंबण्या इतके सोपे काम नाहीये ते. जरा धीर धरा. आम्ही जे योजले आहे ते करूनच दाखविणार आहोत. याची खात्री बाळगा."

क्रमशः

  



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..