रामायण भाग २३ | Ramayana episode 23 | Author : Mahendranath Prabhu.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रामायण भाग २३ | Ramayana episode 23 | Author : Mahendranath Prabhu. |
भरत आपल्या मातेकडे नुस्ता पाहतच राहतो. म्हणून
महाराणी कैकेयी म्हणाल्या ," तू माझ्याकडे असं काय पाहतो आहेस, मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केले आहे." असे म्हणताच भरत भयंकर चिडून म्हणाले," तू माझे भले नाही केलेस तर माझा सर्वनाश केलास तू , तुझ्या गर्भातून जन्माला आलेला रघुवंशाचा सर्वात कलंकित पुरुष म्हणून माझी ख्याती झाली. अरे पापिणी , कुलनाशिणी असे करण्यापेक्षा मी जन्माला आलो तेव्हाच माझा गळा घोटून माझा जीव का घेतला नाहीस ? निदान त्यामुळे मला हे अपयशी मरण तर मरावे लागले नसते. माझ्या भाग्याची विडंबना तर पहा. रघुकुल सारखा उज्ज्वल वंश मिळाला. सत्यनिष्ठ वीर पराक्रमी , परम धर्मात्मा , पुण्यशील पिता मिळाला. तिन्ही लोकांत वंदनीय श्रीराम सारखा मला भाऊ मिळाला. आणि तुझ्या सारखी कुलनाशिणीच्या गर्भातून मला जन्म मिळाला. हे माता ह्याच्या पेक्षा परिहास कोणी कोणासोबत केला असता. हे पापिणी श्रीराम सारख्या धर्मात्म्याला वनात पाठविताना तुझी जीभ का गळून पडली नाही ? तुझ्या जिभेचे तुकडे तुकडे का नाही झाले ?" त्यावर महाराणी कैकेयी म्हणाली," तू भावनाच्या आहारी गेल्यामुळे तुझं भलं कशात आहे हे तुला कळत नाहीये. अरे मूर्ख माणसा तू आपल्या भाग्याला ठोकर मारतो आहेस." त्यावर भरत चिडून म्हणाला," माझं भाग्य तेव्हाच फुटलं की ज्या दिवशी रामदादाला वनवासात पाठविलेस. राम दादा तर स्वतःच्या आई पेक्षाही तुझ्यावर प्रेम करायचा. आणि कौशल्या माता तुला आपल्या बहिणी सारखी मानायची. त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला वनात पाठविताना तुझ्या आत्म्याने एक वेळ सुध्दा चित्कार नाही केला. तुझे हृदयाचे तुकडे तुकडे झाले नाहीत ? असा क्रूर वरदान मागताना तुझ्या तोंडात किडे का नाहीत पडलेत ? तुझी जीभ गळून
का नाही पडली ? " त्यावर महाराणी कैकेयी म्हणाली,
" काय मूर्खां सारखा बोलतो आहेस तू ? तुला का
कळत नहीये की प्रत्येक आईला आपल्या पुत्राला
सर्वात उंच पदावर पोहोचलेला पाहायचं असतं. कदाचित
त्याला तू लोभ समज. "
" लोभ..... हा लोभच तर पापाचे मूळ आहे. लोभच तर
तुझ्या सारख्या मनुष्याला आंधळा करतो की ज्यामुळे पाप आणि पुण्य या मधला फरक तिला कळून येत नाही.
ज्या श्रीराम वर मनुष्यच काय पण पशु पक्षी पण प्रेम
करतात. त्या श्रीरामाला तू घरातून बाहेर काढलेस. तू स्त्री नाहीस. मानवाच्या रूपात वावणारी राक्षसिनी आहेस राक्षसिनी !"
" भरत मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलं. मी तुझी आई आहे रे समजून घे मला."
" नाही नाही नाही आजपासून तू माझी आई नाहीस. मला जन्मजन्मांतर नरक मध्ये राहाणे स्वीकार आहे , परंतु तुला आई म्हणणे मला स्वीकार नाही."
" भरत ss "
" जर माझा आवाज स्वर्गात जात असेल तर पिताश्री
आपण पण ऐका. आज पासून मी कैकेयीचा त्याग करत
आहे."
" नाही sss "
" पिताश्री मला आशीर्वाद द्या. आजच वनात जाऊन श्रीराम दादाला वनातून घेऊन येतो आणि आपल्या इच्छेनुसार श्रीराम दादाला अयोध्येच्या राज सिंहासनावर
बसवितो."
" भरत sss "
" महाराणी कैकेयी जर तू स्त्री नसतीस तर आज तुझ्या ह्या दुष्कर्माबद्दल मी आपल्या या हातानी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले असते."
" भरत sss "
" पापाच्या अश्या जिवंत मूर्तीला जिवंत ठेवणे पण पाप आहे. परंतु असं केल्याने माझे श्रीराम दादा माझा त्याग
करतील. म्हणून मी तुला जिवंत सोडत आहे. परंतु आजच्या नंतर तुझं हे कलंकित तोंड पुन्हा मी पाहणार
नाही. "
" नाही माझ्या पुत्रा !"
" ह्या कक्षेत माझं बालपण पिताश्रीच्या अंगाखांद्यावर
घालविले त्या कक्षेत पुन्हा कधी येणार नाही."
" भरत sss "
" या कक्षेत पुन्हा कधी येणार नाही..... पुन्हा कधी
येणार नाही." असे म्हणून भरत त्वेषाने बाहेर निघून जातो आणि महाराणी कैकेयी तो गेलेल्या दिशेकडे पाहत रडत
म्हणाली ," भरत मला क्षमा कर !" पण ते ऐकायला भरत
तिथं होता कुठं ? तो तेथून केव्हाच निघून गेला होता.
आर्यसुमन्त , कुमार भरत आला आहे. एक बरं झालं
तो सरळ आपल्या मातेच्या कक्षेत गेला. इथं आला असता
तर हे करुणामय दृश्य पाहून तो हे दुःख सहन करू शकला नसता. आर्यसुमन्त महाराजांचा मृतदेह तेलनौकेतून बाहेर काढ आणि त्यांच्या अत्यंसंस्काराची तयारी करा. मी भरतला जाऊन भेटतो." असे म्हणून ते तेथून निघून गेली.
" जशी आपली आज्ञा गुरुदेव !" आर्यसुमन्त उद्गारला.
माता कौशल्याच्या कक्षेत जाण्यासाठी परंतु वाटेत त्याला शत्रुघ्न दासी मंथराला काठीने बडवत असलेला दिसला आणि मंथरा मोठ्या ने ओरडत पळत होती नि तोंडाने म्हणत होती की मला वाचवा कोणीतरी ! परंतु कोण येणार वाचवायला शेवटी समोरून येणाऱ्या भरत कडे तिने शरणांगती मागितली. तेव्हा भरत आपल्या धाकट्या बंधुला म्हणाला," शत्रुघ्न क्षत्रिय स्त्री वर कधी शस्त्र उचलत नाहीत."
" दादा हीच सर्वाला कारणीभूत आहे. हिच्या मुळेच
श्रीराम दादा वनात गेले आणि हिच्यामुळे आज आपले
पिताश्री नाहीत. म्हणून मी हिला जिवंत सोडणार नाही."
" थांब शत्रुघ्न ! तू हिच्या सोबत करू इच्छितोस तेच
मी महाराणी कैकेयी सोबत करू इच्छित होतो. पण
नाईलाज आपण या दोघींना दंड देऊ शकत नाही. कारण
आपण जर तसं केलं तर दादा राम आपला त्याग करील.
समस्या कितीही मोठी असली तरी आपले श्रीराम दादा
अधर्म करू देणार नाहीत. "
" मग काय ह्यांना असंच सोडायचं ?"
" दादा राम आपले राजा आहेत. तेव्हा तेच या दोघींना दंड देतील. जा तू इथून निघून जा....जा म्हणतो ना ?" तशी
मंथरा कशीतरी धडपडत निघून जाते. त्यानंतर भरत
म्हणाला," शत्रुघ्न मी कौशल्या आईला माझं तोंड कसं
दाखवू ? कसं सांगू मी आईला की मी निर्दोष आहे." असे
म्हणून भरत महाराणी कौशल्याच्या महाली गेला. तेव्हा
त्याने पाहिलं माता कौशल्या जमिनीवर दुःखीत अंतकरणाने बसल्या होत्या. भरत तिच्यावर जाऊन
म्हणाला," आई s s s आई s s s आई s s s मी भरत
आलोय." असे म्हणताच तशी महाराणी कौशल्या मान
वळवून भरतकडे पहात त्या म्हणाल्या," भरत ss " असे म्हणतच त्या उठल्या नि म्हणाल्या," भरत तू आलास
ते बरं झालं मी तुझीच वाट पाहत होते. इथं माझं कुणी
ऐकत नाही. पण तू आता आलास ना, मला माझ्या राम कडे पाठव. तू आता राजा झालास ना ? मग आपल्या
सैनिकांना आदेश दे की जिथं रामला सोडलं आहे तिथं
त्याच्या आईला पण सोडा." भरतला ते सहन झालं नाही.
तो एकदम ओरडला ," आई s s जर तू सुद्धा राम दादा
जवळ गेलीस तर मी कुणाच्या कुशीत शिरू ? केवळ
राम दादाच तुझा पुत्र आहे.....मी नाही ?"
" तसं नाही पुत्र !"
" आई मी तुझ्याकडे यासाठी आलो होतो की मला वाटलं होतं तू माझ्या डोक्यावरून हात फिरवून माझ्यावर
प्रेमाची उधळण करशील. परंतु माझ्या भाग्यात आईचं प्रेम नाही. कारण मी एक अपराधी आहे आणि माझा अपराध एकच आहे की मी कैकेयीच्या पोटी जन्म घेतला. परंतु त्याचा दोषी मी नाही विधाता आहे. कैकेयी सारख्या क्रूर स्त्री,ला विधात्याने जन्मच का दिला ? आणि जर जन्म द्यायलाच होता तर तिला वांझ का नाही बनविले ? जर तिला वांझ बनविले असते तर माझ्या सारखा क्रूर पुत्र जन्माला आला नसता."
" नाही भरत नाही."
" आई , राम दादा वनवासाला गेला त्याचं दुःख मला इतकं झालं नाही तितकं दुःख मला आज झालं. आज तू सुध्दा आपल्या भरत पुत्रावर संशय घेतला. आई मी तुला कसा विश्वास देऊ ? हां मी ईश्वर ची शपथ घेऊन सांगतो की इथं जे काही झालं त्यात माझा जरासा जरी सहभाग असेल तर माझं सर्व ज्ञान गुरुदेव ने दिलेली सारी विद्या
या क्षणी नष्ट होऊ दे. आणि संसारच्या साऱ्या पापीयांचा
दंड केवळ मला मिळावा."
" भरत sss "
" आई, मला ठाऊक होतं की माझे राम दादा माझ्या सांगण्यावर विश्वास करणार नाहीत. परंतु आपण
माझ्यावर अविश्वास दाखविणार नाही. कारण आई बालपणी मी आपल्या अंगाखांद्यावर खेळलो आपल्या कुशीत मला जास्त प्रेम मिळालं आणि आज तेच प्रेम
जर मला आपल्या कुशीत नाही मिळालं तर मी जिवंत तरी कशाला राहू ? आणि कोणासाठी राहू ? त्यापेक्षा मरण का वाईट आहे ?"
" नाही भरत नाही असं बोलू नकोस बाळ. एक पुत्र
वनात गेला आणि दुसरा पुत्र मरण्याच्या गोष्टी करतो.
मग एक बिच्चारी आई , कोणाच्या सहाऱ्याने
जगेल बरं ? तू आलास तर मला वाटलं की माझा राम आला. माझ्या बोलण्याचा अर्थ असा कदापि नव्हता माझ्या बाळा की मी तुझ्यावर संशय केला. परंतु एक आईचा आत्मा आपल्या दुःखी पुत्राकडेच जाईल. एक पुत्र पित्याच्या आज्ञा राज कारभार सांभाळेल. आईचे हृदय आपल्या वनवासात असलेल्या पुत्रासाठीच तडपेल ना ? म्हणून मी तुझी वाट पाहत होते. माझा राम तर आपल्या सोबत मला वनात घेऊन गेला नाही. परंतु मला माहित होतं की माझा दुसरा पुत्र तू माझी आज्ञा अवश्य पाळशील नि मला वनात नेऊन सोडशील.
" मी आपल्याला वनात नाही पाठविणार आई परंतु वनात गेलेल्याला तुझ्या द्वारी अवश्य घेऊन येईन."
" मला अशी स्वप्ने दाखवू नकोस भरत."
" हे स्वप्न खरे करून दाखविण्याचे काम माझे आहे.
आई मी आपल्याला विचारतो की आपण त्याना जाऊ
कसं दिलं ? आपल्या अधिकाराचा वापर करून त्याना
रोखले का नाहीस ?"
" कशी रोखणार ? त्याने मला मोठ्या ज्ञानी माणसा सारखे नारी जातीचा धर्म शिखवून आपल्या पित्याच्या
आज्ञा शिरसावंद्य मानून वनात निघून गेला. त्याच्या
मनात यत्किंचितही कोणा विषयी राग नव्हता. आपले
राज्य, राजमहाल , आपले साम्राज्य असे सोडून वनात गेला की जसा कोणी आपले जुने झालेले वस्त्रे त्यागून त्याजागी नवीन वस्त्र धारण केले. सीता आपला पतिव्रत धर्माचे पालन करण्यासाठी त्याच्या सोबत निघून गेली. लक्ष्मणाला राम ने खूप रोखण्याचा प्रयत्न केला पण तो नाही ऐकला. सगळ्यांनी आपापल्या धर्माचे पालन केले. आणि माझे वज्र हृदय पहा. दोन दोन पुत्र वनात गेले , सून गेली. परंतु त्याना जाताना पाहून ही माझे प्राण त्यांच्या सोबत गेले नाहीत. पितृस्नेहाच्या धर्माचे पालन तर महाराजांनी केले. जोपर्यंत पुत्र सोबत होता तोपर्यंत त्याना कशाचे दुःख नव्हते. पुत्र वनात निघून जाताच त्यांनी आपला प्राण सोडला. "
" आई पिताश्री सारखे मला महान पिता मिळाले. श्रीराम सारखा सत्यवचनी भाऊ मिळाला. मग मला तुझ्या गर्भातून जन्म का नाही मिळाला ? कैकेयी सूत म्हणून कलंक मिळाला. जर तू माझी जननी असतीस तर माझ्या माथ्यावर असा कलंक लागला नसता. "
" जन्म मरण आपल्या इच्छानुसार होत नाही पुत्र
ते अगोदरच निर्धारित असते. ह्यालाच भाग्य म्हणतात.
आपण सर्व त्या भाग्याची कठपुतली बनून नाचत असतो.
कैकेयी ने जे काही केलं ते आमच्या भाग्यानेच केले. त्यात
त्या बिच्चारीचा काही दोष नाही."
" आई ही आपली उदारता आहे परंतु सारा संसार तर
मलाच दोषी देईल ना ? म्हणतील भरत ने राजा बनण्यासाठी आपल्या भावाच्या विरुद्ध षड्यंत्र रचले."
" नाही. चंद्राकडून अग्नीची वर्षा होऊ शकते. अमृत
विषारी होऊ शकते. माझा पुत्र भरत आपल्या भावाशी
विन्मुख कधीच होणार नाही. याची साक्षी मी साऱ्या
संसारला देईन." तेवढ्यातच तिथं महर्षी वशिष्ठ आले.
त्यांनी कदाचित दोघांचा वार्तालाप ऐकला असावा. म्हणूनच महाराणी कौशल्याला उद्देशून म्हणाले," सूर्याला कोणाच्या साक्षीची गरज नसते महाराणी कौशल्या ! त्याचा प्रकाशच त्याचे प्रमाण आहे. अगदी तसेच भरत तू धर्माचा अवतार आहेस. जसा सुर्यात अंधकार नसतो. तसे तुझे कर्म धर्माच्या विरुद्ध असू शकत नाही. तू जे करशील ते धर्माचे प्रमाण आहे." भरत लगेच महर्षी वशिष्ठांचे चरण धरत पुढे म्हणाला," गुरुदेव माझं रक्षण करा. अश्या बिकट
परिस्थिती मध्ये आपणच माझी रक्षा करू शकता. ह्या
क्षणी पिताश्रीचा मृत्यू आणि बंधुपासून विन्मुख झाल्याने
माझी बुद्धी कुंठित झाली आहे. म्हणून माझं मार्गदर्शन करा गुरुदेव !" तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले ," कुमार तुझ्या
आगमन ची सूचना मिळताच आम्ही तुला हेच सांगायला
आलोय की ही वेळ शोक करण्याची नाहीये. तुझ्या पित्याची महान आत्मा या क्षणी प्रतीक्षा करत असेल की
माझा पुत्र येईल आणि माझा अंत्यसंस्कार करून माझ्या
या मृत शरीराच्या बंधनातून मुक्त करेल. तुझ्यासाठी शरीर
तेलच्या नौकेत सुरक्षित करून ठेवले आहे. तुला धैर्यवान
पुत्रा प्रमाणे त्यांच्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार करायला
पाहिजे. चल वत्स आपल्या पित्याला अंतिम प्रणाम कर.
आणि अंतेष्ठीची व्यवस्था कर. चल. " त्यानंतर थोड्याच
वेळात महाराज दशरथांची अंत्ययात्रा निघाली. सारी प्रजा
महाराजांच्या अंत्ययात्रेला निघाली. आणि मोठ्या ने
म्हणत होते की महाराज दशरथाची जय !" शेवटी एकदाची
अंत्ययात्रा मोक्षधाम भूमीत पोहोचली. त्यांनतर त्यांची
चिता रचली गेली नि सर्वविधी पूर्ण होताच त्यांच्या चितेला
अग्नी देण्यात आला. त्यानंतर सर्वजण घरी परतले.
त्यानंतर त्यांच्या उत्तरक्रिया पण करण्यात आली. हस्तिकलश घेऊन नदीवर गेले.भरत इतका शोकाकुल
झाला होती की आपल्या पित्याचे हस्ती नदीत विसर्जीत
करत नव्हता. शेवटी महर्षी वशिष्ठ म्हणाले ," भरत हस्तीचा मोह करू नकोस. हे तुझे पिता नाहीयेत. तुझे पिता ह्या वेळी स्वर्गात असतील. आपल्या कर्मानुसार परलोक बसले असतील. जीवात्माला हे पाच तत्वांपासून बनलेले शरीर यासाठी दिले जाते. आपल्या जीवनात आपले कर्तव्य आणि धर्माचे पालन करावे. प्राणी निघून गेल्यानंतर मृत शरीराचे पाच तत्व म्हणजे अग्नी,आकाश, जल, वायू, भूमी अर्थात ही त्यांची त्याना परत देऊन टाकायची असतात. जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा एक एक करून प्रत्येकजण आपलं तत्व काढून घेतो, जसे की सर्व प्रथम वायू आपले तत्व काढून घेतो. याचाच अर्थ शरीरातील प्राणवायू शरीर सोडून जातो. हळूहळू शरीर थंड होत जातं याचा अर्थ अग्नीने आपले तत्व काढून घेतले. रक्त गोटले जाते म्हणजे पाण्याने आपलं तत्व काढून घेतले. शरीराला दहन केल्यानंतर आकाश आपले तत्व काढून घेतो नि शेवटी शरीर जळून भष्म झाल्याने भूमीला तिचे तत्व मिळाले. म्हणून हे हस्ती शरयू नदीला अर्पण कर. हेच विधीचे विधान आहे नि ते प्रत्येकाला करायचे आहे. आज जे तू आपल्या पित्यासाठी करत आहेस. एक दिवस तुझा पुत्र सुध्दा तुझ्यासाठी हेच करणार आहे, म्हणून मोह त्यागून दे. कारण तुझे पुढचे कर्तव्य तुझी वाट पाहत आहे." असे म्हणून त्यांनी हस्तीकलश वरील वस्त्र स्वतःच काढले नि स्वतःकडे
असलेली फुले भरत कडे देत ते म्हणाले, " चल लवकर
हस्ती विसर्जित कर." भरत ने हस्ती नदीला अर्पण केले.
आणि प्रणाम केला. आणि त्यानंतर सर्वजण घरी परतले.
दुसऱ्या दिवशी दरबार भरला तेव्हा भरत आणि शत्रुघ्न
तेथे आले आणि त्या दोघांनी प्रथम महर्षी वशिष्ठांना प्रणाम केला नि मग भरत म्हणाला ," गुरुदेव आपल्या
आज्ञानुसार आम्ही दरबारात हजर झालो आहे, आपली
काय आज्ञा आहे आमच्यासाठी ?"
" तुझे पिता धर्माचे पालन करून अन्न धान्य समृद्ध राज्य
तुला देऊन स्वर्गात गेले आहेत. तुझे जेष्ठ भ्राता मोठ्या महात्मा प्रमाणे आपल्या पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी ते वनात निघून गेले. तुझे जेष्ठ भ्राता आणि तुझे पिता या
दोघांनी हे राज्य तुला प्रधान केले आहे. आता तुझे कर्तव्य
हे आहे की सूर्यवंशी राज सिंहासन तुला ग्रहण करायचे
आहे नि आपल्या प्रजेचे रक्षण कर." तेव्हा भरत विचारले की , गुरुदेव , ही आपली आज्ञा आहे का ?"
" ह्या क्षणी तुझे हेच कर्तव्य आहे."
" मंत्री मंडळची काय म्हणणे आहे ?"
" जे राज्य राजा विना असते. त्या राज्याची प्रजा ना
राजा दोन्ही सुरक्षित नसतात. शत्रू कधीही आक्रमण
करू शकतो. म्हणून राजा होणे आवश्यक आहे. आणि हे
रघुवंशाचे राज्य आहे, हे राज्य सांभाळण्यासाठी केवळ
आपण समर्थ आहात."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा