Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

रामायण भाग २२ | Ramayana episode 22 | Author : Mahendranath Prabhu

रामायण भाग २२ | Ramayana episode 22 | Author : Mahendranath Prabhu
रामायण भाग २२ | Ramayana episode 22 | Author : Mahendranath Prabhu

 



     आर्यसुमन्त अयोध्येला परत आल्याची खबर मिळताच
मंथरा पळतच महाराणी कैकेयीच्या महाली पोहोचली नि
म्हणाली ," राणी सर्वकाही ठीक झालं. आर्यसुमन्त परत
आला रिकाम्या हाताने याचा अर्थ राम चौदा वर्षे लक्ष्मणा
सहित वनवासाला गेला. आत चिंता करण्याची गरज नाही.
   " हां ते ठीक आहे ,पण ते सारे ऐकून  महाराज काय
म्हणाले ?"
   " काय म्हणणार विलाप करत होते. मग गुरू वशिष्ठांनी
काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा ते चूप झाले.
पण असं ऐकायला मिळालं की ते कुणाला काही बोलतच
नाहीत. फक्त आकाशात पाहत राहतात. 

   महाराज दशरथ फक्त राम राम करत असतात. अचानक
उठून बसत म्हणाले ," कौशल्या कोठे आहेस तू ?" तशी
महाराणी कौशल्या, महाराणी सुमित्रा आणि उर्मिला
बसलेल्या असतात त्या पळतच महाराजा जवळ येतात.
महाराणी म्हणाल्या ," मी आपल्या जवळच आहे स्वामी !"
    " मला वाटतं माझं मरण जवळ आलं आहे. कारण
लोकांचे म्हणणे असे आहे की मरण जवळ आलेल्या व्यक्तीला काही दिसत नाही."
    " स्वामी असं अभद्र बोलू नका. सर्वकाही ठीक होईल.
आपण असेच विलाप करत बसलात तर रामला पण दुःख
होईल. गुरुदेवांचा उपदेश लक्षात आहे ना ? बघा मी आई
असूनही गुरुदेवचा उपदेश लक्षात ठेवला आहे. आणि
गुरुदेव सांगतात ते खरंय राजाने रडले नाही पाहिजे."
     " खरंय तुझं म्हणणे राजाने रडले नाही पाहिजे. परंतु
असा तर नियम नाही ना ? की राजाने मरण पण मागू नये." त्यावर महाराणी सुमित्रा एकदम आर्त स्वरात म्हणाल्या ," स्वामी आपण धीर ठेवा तरच आम्ही पण जगू
शकू ! " तेव्हा महाराज म्हणाले," परंतु मी असा नाही जगू
शकणार." महाराणी सुमित्रा एकदम दुःखी स्वरात म्हणाल्या," असं अभद्र बोलू नका काही !"
    " कर्मफल कोण कसे बदलणार  ? केलेल्या कर्माची
फळे भोगायलाच लागतील ना ? कारण नीती हेच सांगते
की जो जसे कर्म करील तसे त्याचे फळ मिळेल त्याला. राजा कितीही मोठा असला नि त्याचे सैन्य बळ किती असले तरी राजाला त्याच्या कर्म फळ पासून कोणीही वाचवू शकत नाही. हेच विधीचे विधान आहे. कारण एका अंध मुनीने मला शाप दिला होता की मी पुत्र वियोगाने मरेन म्हणून आज त्याचा शाप खरा ठरणार आहे. हे मुनींवर आपण जे बोललात ते आज खरे ठरणार आहे. मी सुध्दा पुत्र वियोग मरणार आहे." तेव्हा महाराणी कौशल्या ने समजून विचारले , " कोण मुनी आणि कोणी शाप दिला होता आपल्याला ?"
     " श्रवण कुमारच्या आई- बापाने ! "
    " कोण श्रवण कुमार ? आपल्याला भ्रम होत आहे."
    " नाही कौशल्या ही सत्य गोष्ट आहे. ही त्यावेळची
गोष्ट आहे. जेव्हा आपला विवाह झाला नव्हता. मी युवा
अवस्था मध्ये होतो. आणि त्यावेळी मला आकेटला जाण्याचा फार नाद होता. कारण मला शब्द बाण चालविण्यात मी निपुण होतो. तेव्हा लोक राजा दशरथ
नुसत्या आवाजावरून अचूक बाण मारतो. शिकार पडलीच पाहिजे. एके दिवशी असाच आकेटला गेलो होतो. मग महाराज दशरथानी  महाराणी कौशल्याला श्रवण कुमारची संपूर्ण कथा ऐकविली. ( श्रावण कुमारची कथा पहिल्या भागात मी दिली आहे म्हणून पुन्हा ती कथा इथं सांगत  नाही ) आणि शेवटी महाराज दशरथ म्हणाले,
   " तो बघ कौशल्या मुनी मला शाप देत आहे की जसा मी पुत्र वियोगाने तडफडून मरणार आहे तसा  तू देखील आपल्या पुत्र वियोगाने तडफडून मरशील. असा आवाज
चोहीकडून येत आहे असा त्याना भास झाला. कसे तरी
स्वतःला सावरत पलंगावर बसण्याचा प्रयत्न करत असतानाच ते जमिनीवर कोसळले. नि एकदम मूर्च्छित
झाले. महाराणी कौशल्या ने त्यांचे मस्तक उचलून आपल्या मांडीवर घेतले. आणि महाराणी सुमित्रा ने त्यांचा उजवा हात आपल्या हातात घेऊन चोळत बसली. थोड्या वेळाने महाराज शुध्दीवर आले नि फक्त राम राम करतच प्राण सोडला. तश्या त्या दोन्ही महाराण्या स्वामी असे मोठ्या ने ओरडून टाहो फोडला.

   श्रीराम ध्यान लावून बसले होते. अचानकपणे एकदम
मोठ्या ने ओरडले - पिताश्री sss " जवळच लक्ष्मण
काहीतरी काम कर असतो परंतु श्रीराम मोठ्याने ओरडल्याने लक्ष्मणाने हातातील काम टाकून पळत
श्रीरामाकडे आला नि विचारू लागला की , दादा काय
झालं ? का ओरडला ?" तेव्हा श्रीराम म्हणाला," अकस्मात
असे दिसले की पिताश्रीचा रथ आकाश मार्गाने दक्षिणेकडे
जाताना दिसला. ज्या दिवसापासून आपण अयोध्या सोडली आहे, त्या दिवसापासून आपले ध्यान पिताश्री कडे
लागलेले असते. त्यामुळे असं झालं असेल."
     " कदाचित ते म्हणतोस तसे पण असेल. परमेश्वर त्याना दीर्घायुष्य देऊ दे. ओम s s "
  

    महाराज दशरथाचा मृतदेह  विविध फुलांनी सजविला होता. तेवढ्यात तेथे महर्षी  वशिष्ठ आले नि महाराजांना उद्देशून म्हणाले," हे सुर्यकुलाचे गौरव जीवनभर वशिष्ठाला अर्ध्य अर्पण करून चरण वंदना करत राहिलास.परंतु आज वशिष्ठ तुझ्या चरणांवर श्रद्धांजलीचे पुष्प अर्पण करायला आलो आहे. आपण आपल्या संपूर्ण जीवनात आपल्या धर्माचे एकदम उत्तम रीतीने पालन केले आहे. आपल्या प्रजेशी एका पित्या सारखे प्रेम केलेस. जण कल्याण करून एका राजाचे कर्तव्य पूर्ण केलेस. देवासुर संग्राम मध्ये राक्षसावर विजय प्राप्त करून आपण हे सिध्द केलात की कर्म आणि धर्माचे पालन  करून मनुष्य देवता पेक्षा उच्छ स्थान प्राप्त करू शकतो. आज आपले पूर्वज अभिमामाने आपल्याकडे पाहत आहेत. आपण रघुवंशाचे नाव आणि कीर्ती कायम तशीच ठेवलीस. तुझ्या पूर्वजांना त्या बद्दल गर्व राहील. आपले नाव सुध्दा रघु , इश्वाक आणि भगीरथ सारखे मोठ्या आदराने घेतले जाईल. आईची ममता संसार मध्ये सदा विख्यात होती. परंतु पुत्र वियोग मध्ये आपले प्राण देऊन  संसार मध्ये असे स्थापित केले. त्याची गौर्यगाथा युगायुगांतर गायली जाईल. हे महात्मा माझा प्रणाम स्वीकार करा. " असे म्हणून त्यांनी आपल्या ओंजळीतील पुष्प महाराजांच्या चरणार वाहिली." आणि काही न बोलता बाजूला जाऊन उभे राहिले. त्यानंतर आर्यसुमन्त आपल्या ओंजळीतुन पुष्प आणली नि म्हणाला," हे चक्रवर्ती सम्राट मी आपल्या नि समस्त सामंत आणि राजाच्या तर्फे आपणास पुष्पांजळी अर्पण करत आहे. आपल्या आज्ञा पालन मध्ये ज्या ज्या वेळी माझ्याकडून त्रुटी झाली त्या त्या वेळी आपण मोठ्या उदारतेने मला क्षमा केली. परंतु आपल्या अंतिम आज्ञा चे मी पालन करू शकलो नाही. त्या अपराधाचा  ना
आपण  मला दंड दिला नाही मला क्षमा केली. हे बालसखा शक्य असेल तर मला क्षमा करावी. असे म्हणून त्यांनी महाराजांच्या चरणांवर पुष्प वाहिली. त्यानंतर महाराणी सफेद वस्त्र धारण करून तेथे आल्या नि त्यांनी सुध्दा महाराजांच्या चरणांवर पुष्प अर्पण केली नि त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून प्रणाम केला नि माघारी वळल्या. त्यानंतर महाराणी कैकेयी आल्या त्यांनी महाराजांच्या चरणांवर पुष्प वाहिली. नि त्या देखील निघून गेल्या. त्यानंतर महाराणी सुमित्रा आल्या त्यांनी देखील महाराजांच्या चरणांवर पुष्प वाहिली नि त्यांच्या चरणांना स्पर्श करून प्रणाम केला नि त्या माघारी वळल्या. त्यानंतर आली उर्मिला तिने देखील महाराजांच्या चरणांवर पुष्प वाहिली नि माघारी वळली. त्यानंतर मंत्रीगण, सामंत आणि इतर लोकांनी सुद्धा पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ताबडतोब राज्यसभा भरविली. महाराजांच्या सिंहासनावर महाराजांचा राजमुकुट ठेवून सर्वजण आपापल्या स्थानावर बसले होते.
    तेव्हा आर्यसुमन्त म्हणाला ," गुरुदेव सर्वात महत्वाचा
प्रश्न म्हणजे महाराजांचा दाहसंस्कार कोण करणार ?"
     तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले ," शास्त्रोक्त विधाना नुसार पुत्रालाच पित्याचा मृतशरीराला दाहसंस्कार करण्याचा अधिकार आहे. ज्यांचे चार पुत्र धर्तीवर विद्यवान आहेत. अश्या पुण्यमा पित्याचा दाहसंस्कार त्यांच्या कोणत्याही पुत्राच्या उपस्थिती शिवाय करणे योग्य नाहीये." तेव्हा मंत्रीगण म्हणाला," परंतु त्या चारापैकी एक पण इथं उपस्थित नाहीये. राम लक्ष्मण वनात आहेत. कुमार भरत आणि शत्रुघ्न खूप दूर कैकेयी देशामध्ये आहे. संदेश पाठवून बोलवून घेईपर्यंत फार उशीर होईल. तोपर्यंत महाराजांचे शव ठेवणे योग्य होईल का ? "
    " अवश्य उचित होईल. महाराज दशरथ सारख्या परम
प्रतापी आणि धर्म परायण राजाला त्यांच्या पुत्रा द्वारे  दिले
जाणारे  अग्नीदान आणि पिंडदान या पुण्यफल पासून त्याना वंचित ठेवणे योग्य नाही. म्हणून राज्यवैध्याला
बोलवून त्याना सांगा की महाराजांच्या शवाला सुगंधीयुक्त
औषधानी  तैलनौकेत ठेवायला सांगणे ज्यामुळे महाराजांच्या शरीराला अजिबात शती पोहोचणार नाही. तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले," जशी आपली मर्जी !" तसे महर्षी वशिष्ठ म्हणाले," भरत आणि शत्रुघ्न या दोघांना ताबडतोब बोलवून घेण्याची व्यवस्था करा ." तेव्हा एक मंत्रीगण म्हणाला," जशी आपली आज्ञा गुरुदेव."  तेव्हा आर्यसुमन्त म्हणाला ," गुरुदेव दुसरा प्रश्न हा आहे की
जोपर्यंत नवीन राजाचा राज्यभिषेक होत नाही तोपर्यंत
राज्याचे शासन कसे असेल ?"
   " दुसरी गोष्ट म्हणजे  जसे पित्याचे छत्र डोक्यावर
नसल्याने पुत्र अनाथ होतात. अगदी तसेच राजा विना
प्रजेमध्ये अराजकता वाढू लागते. " पहिला मंत्री म्हणाला
    " न्याय प्रजेवर लागू करण्याची शक्ती नसल्याने अपराध
वाढू लागतात. " श्रीधर म्हणाला
     " आणि ज्या देशात अराजकता असेल त्या देशातील प्रजा दरवाजा उघडा ठेवून झोपू शकत नाहीत. दूर देशामध्ये व्यापार करायला जाणारे व्यापारी कुशलतापूर्वक प्रवास करू शकत नाही."  तिसरा म्हणाला
   "  राजा विना साधू आणि साधूचा विभाग  कोण करेल ?
न्याय कोण करील ? म्हणून शासन व्यवस्था सांभाळण्या साठी कोणालातरी नियुक्त करा." दुसरा म्हणाला. तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले, " आपल्या सर्वांचे म्हणणे बरोबर आहे. परंतु अशी परिस्थिती कौशल देशात कधीच येणार नाही. अजून दशरथ महाराजांची सत्ता  संपलेली नाहीये. रघुकुल दशरथाच्या राज्यात  आपल्या सारखे लोक असताना अराजकता होईलच कशी ? जोपर्यंत दशरथ महाराजांचे शरीर विध्यमान तोपर्यंत त्यांचे शासन विध्यमान आहे. महाराजांनी राज्याचा उत्तराधिकारी भरतला स्वीकारलं आहे. म्हणून भरतला संदेश पाठवून लौकरात लौकर भरतला इथं बोलवून घ्यावे. आर्यसुमन्त ss "
    " जी गुरुदेव !"
    " भरत येइपर्यंत सैन्या अध्यक्षांच्या मदतीने राज्याचा
सारा राज्य कारभार आपण सांभाळायचे आहे."
     " जशी आपली आज्ञा गुरुदेव !"
     " श्रीधर ss "
    " जी गुरुदेव !"
    " आपण  वायू वेगाने पळणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन
कैकेयी देशाला जायचं आहे."
     " आज्ञेचे पालन होईल गुरुदेव."
     " पुढचं ऐक . भरतच्या आजोळी जाऊन सामान्य
स्थितीत भेटणे. आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा
शोक प्रगट ना करता कुमार भरतला कुलगुरू वशिष्ठांनी
आपल्याला कुशल मंगल सांगितले आहे. एका अत्यावश्यक कार्यासाठी आपल्याला अयोध्याला बोलविले
आहे."
    " असेच होईल गुरुदेव!"
    " राम लक्ष्मण सीताचा वनवास अथवा महाराज स्वर्गवाशी झाल्याचे वृत्तांत त्याला देवू नये. आपल्या
 कोणत्याही व्यवहाराने त्याला इथल्या परिस्थितीचा आभास व्हायला नाही पाहिजे. अन्यता तो हे दुःख  सहन करू शकणार नाही."
    " आर्यसुमन्त sss "
    " जी गुरुदेव !"
    "  ज्या प्रकारे कैकेयी देश जाणाऱ्यांना राजदूत पाशी अमूल्य भेट दिली जाते त्या प्रमाणे आज सुध्दा तशीच अमूल्य भेट कैकेयी नरेशला दिली जावी."
  " जशी आपली आज्ञा ! " आर्यसुमन्त उद्गारला. त्यानंतर
दरबार सभा समाप्त दिली आणि ते सर्वजण महाराजांच्या
मृतदेहाची व्यवस्था पाहायला गेले. तेव्हा त्यांनी पाहिले
की तेलनौका सुगंधी औषधयुक्त संपूर्ण भरून ठेवली होती.

     पहाटेची वेळ होती नि भरत आपल्या बंधूसह झोपला
होता. अचानक दचकून उठला. तेव्हा बाजूला झोपलेला शत्रुघ्न ही उठून बसला नि भरतला विचारू लागला
की दादा काय झालं ? का उठलास झोपेतून ? वाईट स्वप्न
पाहिलेस का ?" त्यावर भरत ने फक्त इतकेच विचारले
   "  सकाळ झाली का ?"
   " हो झाली का बरं ?"
   " असं म्हणतात की पहाटेची स्वप्ने खरी होतात. आतापर्यंत राम दादा बद्दल स्वप्न पाहत होतो. परंतु
आज पिताश्रीचेजे स्वप्न पाहिले.
    " काय पाहिलेस स्वप्नात ?"
    " कसं सांगू पिताश्रीच्या मस्तकावर राजमुकुट
नव्हता. केस मोकळे होते. पर्वताच्या शिखर वरून खाली
पडले. त्यांनी तेल भात खाल्ला. त्यानंतर त्यांचे मस्तक
खाली ठेवलेल्या तेलात सारखे सारखे बुडविले. मग दुसरे
स्वप्न पाहिले सागर सुकला आहे. चंद्र पृथ्वीवर पडला
आहे. चारही दिशांनी अंधार पसरला आहे. पर्वत खाली
पडले आहेत नि त्यातून दूर निघत आहे. पिताश्रीनी लाल
फुलांची माळ घातली आहे. लाल चंदन लावलेले,
गाढवाच्या सजविलेल्या रथात बसून दक्षिणेकडे जात आहेत. शत्रुघ्न पिताश्रीच्या बद्दल असे स्वप्न पाहून मला
फार भीती वाटत आहे. अयोध्या मध्ये काही ना काही
अनर्थ घडला आहे." तेवढ्यात एक दास येऊन म्हणाला,
   " अयोध्या वरून एक राजदूत आला आहे आपल्यासाठी
एक संदेश घेऊन. ताबडतोब भेटू इच्छित आहे." असे म्हणून दास निघून गेला. तेव्हा भरत म्हणाला," पाहिलेस
मी काय म्हणालो होतो की अयोध्या मध्ये काहीतरी अनर्थ
घडला आहे हे नक्की ! चल पाहू काय बातमी आहे ती."
दोघेही घाईघाईने बाहेर आले. श्रीधरला पाहताच त्याने
विचारले," श्रीधर काय संदेश आणला आहेस ? अयोध्या
मध्ये सर्व कुशल मंगल तर आहे ना ? पिताश्री,मताश्री
राम दादा ?" श्रीधर हात जोडून म्हणाला," गुरुदेव वशिष्ठांनी आपल्याला ताबडतोब अयोध्याला बोलविले
आहे."
    " हो जाऊ. शत्रुघ्न चल आजोबांची अनुमती घेऊ."
असे म्हणून ते दोघेही घाईने आंत निघून गेले. जेव्हा
त्या दोघांनी आपल्या आजोबांना अयोध्याला जाण्याविषयी सांगितले तेव्हा अश्वापती महाराज म्हणाले,
    " कुलगुरू वशिष्ठांचा संदेश आहे तर मी थांबण्याचा
आग्रह करणार नाही. कुमारांच्या जाण्याची व्यवस्था करा."
    " जशी आपली आज्ञा पिताश्री !"
    "  आजोबा विशेष आयोजनची आवश्यकता नाही. फक्त जाण्याची आज्ञा द्या." असे म्हणून भरताने आपल्या
आजोबांचे चरणस्पर्श केले. तेव्हा त्यांनी आशीर्वाद देत
म्हटले ," कल्यानवस्तू ! " त्यानंतर भरत ने आपल्या
मामाश्रीचे चरणस्पर्श केले. तसे त्याच्या मामाश्री ने आशीर्वाद देत म्हटले ," आयुष्यमान भव !" शत्रुघ्नाने भरतचे अनुकरण केले. त्यानंतर ते दोघेही निघाले. जेव्हा
त्यांचा रथ अयोध्याच्या सीमेवरून आंत शिरला. तेव्हा
त्याचा रथ पाहून एकजण म्हणाला," अरे, तो पहा भरत
आला." तसा दुसरा लगेच म्हणाला," अरे सोड,अश्या पापी
माणसाचे तोंड सुध्दा पाहू नये." भरतचा रथ राजभवनाच्या
दिशेने जात होता. परंतु भरतचे लक्ष लोकांच्या चेहऱ्यावर
उमटणाऱ्या छटांकडे पाहत होता. लोक आपल्याला पाहून
न पाहिल्यासारखे का करत आहेत. हे त्याला काही कळेना
रथ जेव्हा राजभवन जवळ पोहोचला. आणि दोघेही रथातुन खाली उतरले. तेव्हा भरत म्हणाला," शत्रुघ्न नगर मध्ये आपल्याकडे पाहून लोकांनी आपली तोंडे दुसरीकडे वळविले. आणि इथं राजभवना मध्ये सर्वत्र उदाशी पसरली आहे." तेव्हा शत्रुघ्न म्हणाला," हां दादा मला पण हे जाणवले." तेव्हा भरत म्हणाला," चल पाहू !" दोघेही जातात. मंथराने त्या दोघांना पाहिले मात्र तशी हर्षभराने
पळत गेली महाराणी कैकेयीच्या महाली आणि मोठ्या ने
ओरडून म्हणाली," राणी, तुझा पुत्र आणि अयोध्येचा राजा
भरताने राजभवना मध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या स्वागतासाठी आरतीचे ताट सजव." हे ऐकता क्षणी
महाराणी कैकेयी एकदम खुश झाली. तेव्हा मंथरा म्हणाली," नियमानुसार भरत प्रथम आपल्या पित्याला
भेटायला जाईल नि तिथं जाऊन दुःखी होईल. म्हणून
मी त्याला सरळ इथं घेऊन येते. तू आरतीचे ताट सजवून
ठेव. मी आलीच !" असे म्हणून मंथरा पळतच सुटली.
भरत एका सुरक्षा सैनिकाला विचारले ," महाराज आपल्या कक्षेत नाहीत मग आहेत कोठे ते ?" तो काही बोलण्या
अगोदरच मंथरा तेथे पोहोचली. त्याला म्हणाली," चल
तुझी आई तुझी आतुरतेने वाट पाहत आहे."
     " परंतु अगोदर आम्हाला पिताश्रीना भेटायचे आहे.
कोठे आहेत पिताश्री ?"
    " ते आता  भेटणार नाहीत. म्हणून तर तुझ्या आई ने
तुला आपल्या महालात बोलविले आहे. तुझ्या बरोबर
तुझ्या मातोश्रीला काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे." असे म्हणून शत्रुघ्नाकडे पाहत मंथरा म्हणाली," तुझी माता पण तुझी वाट पाहत आहे, जा तू आपल्या मातोश्रीला जाऊन भेट " तेव्हा भरत आपल्या बंधूकडे पाहत म्हणाले," काही
कळत नाही काय भानगड आहे ती !" असे म्हणून भरत
मंथरा सोबत गेला नि शत्रुघ्न आपल्या मातेला भेटायला
आपल्या मातेच्या भवनाकडे निघाला. जेव्हा भरत आपल्या मातेच्या महाली पोहोचला. तेव्हा त्याने आपल्या
आईला आरतीचे ताट घेऊन उभी असलेली पाहिले. पण
त्याच बरोबर तिच्या शरीरावरील सफेद वस्त्र पाहून भरत
च्या हातातले धनुष्यबाण आपोआपच हातातून सुटून
खाली पडले. तो आपल्या मातेकडे पाहून म्हणाला," माते ही कसली वस्त्रे परिधान केली आहेस ? आपले आभूषणे
कोठे आहेत ? आपल्या भांगेत सिंदूर नाहीये. काय झालं
मातेश्वरी ? महाराज आपल्या कक्षेत पण नाहीयेत. राज
महालात सर्वत्र उदाशी का पसरली आहे ? कोठे आहेत
महाराज ? सांग ना माते कोठे आहेत माझे पिताश्री ?
सांग माते कोठे आहेत पिताश्री ?" तेव्हा महाराणी कैकेयी
म्हणाली ," पुत्र संसार मध्ये जो जन्म घेतो त्याला एक ना
एक दिवस संसारचा त्याग करावाच लागतो. तुझे पिताश्री
स्वर्गवाशी झाले. हे ऐकता क्षणी भरतला वाटलं की जणू
धरणी दुभंगुण त्यात आपण गाडले जात आहोत की काय
तसेच त्याचे पाय लठपटू लागले. डोळ्यातून अश्रूचा महापूर लोटला. तो मागे मागे हटत एका आसनावर बसला. थोड्यावेळाने भरत म्हणाला ," रस्त्यामध्ये माझे
हृदय भीतीने कापत होते. मला पडलेली स्वप्न ,अपशकुन
सारे खरे ठरलेत. अखेर अघटित घडलंच तर माते !"
तेवढ्यात तिथं मंथरा आली नि तिने महाराणीच्या हातातील आरतीचे ताट घेऊन गेली. तशी महाराणी
कैकेयी त्याच्या जवळ गेली नि त्याचे सांत्वन करत म्हणाली,"  भरत तू तर आपल्या पिताश्री प्रमाणे वीर
पुरुष आहेस संसार मध्ये प्रत्येकाला हे नश्वर शरीराला
सोडून जावेच लागते. आणि हे अटळ सत्य आहे. तुझ्या
सारख्या वीर पुरुषांला  हे शोभत नाही." तेव्हा भरत
म्हणाला," माते मी किती अभागी आहे, आपल्या पिताश्रीचे अंतिम दर्शन पण करू शकलो नाही. पिताश्री
आपण माझी थोडीशी पण वाट पाहिली नाही. आपण मला दादा रामच्या स्वाधीन करून जायला हवे होते. आई
जायच्या अगोदर त्यानी मला अवश्य हांक मारली असेल.
त्या क्षणी आपण सारेजण त्यांच्या जवळ होते. फक्त
मीच नव्हतो त्यांच्या जवळ. त्याना माझी नक्कीच आठवण आली असेल. प्राण त्यागण्याच्या अगोदर त्यांचे
अंतिम शब्द काय होते ? सांग ना आई !" त्यावर महाराणी
कैकेयी म्हणाली ," ते अंतिम क्षणी केवळ रामाची
आठवण करत होते."
    " फक्त राम दादाला हांक मारत होते. म्हणजे राम दादा
पण त्यांच्या जवळ नव्हते ?"
   " नाही."
   " असं अकस्मात काय घडलं होतं जे दादा राम पण त्यांच्या जवळ नव्हते ? परंतु आपण तर त्यांच्या जवळ होता ना ?"
    " नाही. त्यांनी महाराणी कौशल्याच्या भवनामध्ये प्राण
त्यागले."
    " माता कौशल्याच्या भवनामध्ये त्यांनी आपले प्राण
त्यागले त्यावेळी दादा राम आणि लक्ष्मण कोठे होते ?"
    " वनांमध्ये !"
    " वनांमध्ये पण का ?"
    " महाराजांनी स्वर्गवाशी होण्या अगोदर त्याला चौदा
वर्षाचा वनवास दिला होता."
    " वनवास तो पण दादा रामला ? नाही. असं होऊ शकत
नाही. हा दंड तर भयंकर अपराध्याना दिला जातो. राम
दादा तर सत्य, धर्म आणि मर्यादाची मूर्ती आहे. त्याना हा
दंड कोणत्या कारणामुळे दिला गेला ? काय दोष होता
त्यांचा ? सांग आई !"
    " कोणाचा काही दोष नव्हता भरत फक्त वचन पाळण्याची गोष्ट होती आणि तुझ्या पित्याने सत्यवचनी ,
धर्मपरायन राजा प्रमाणे आपले वचन पूर्ण करण्यासाठी
त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
   " वचन ....कोणते वचन ? आणि कोणाला दिले होते
त्यांनी हे वचन ?"
   " मला."
   " आपल्याला...... काय वचन दिले होते त्यांनी आपल्याला ?"
    " ही फार जुनी आणि मोठी कहाणी आहे. कधीतरी
सांगेन मी तुला. आता तू प्रवास करून फार थकून आला आहेस. जरा विश्राम कर. तुला भरपूर सारी कर्तव्य पार पाडायची आहेत. आपल्या पित्याचा अंत्यसंस्कार करणे आहे, राज्य कारभार सांभाळायचे आहे. एक राजाला बालकां प्रमाणे रडत राहणे शोभत नाहीये." त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसून पुढे म्हणाली," ही वेळ अश्रू वाहण्याचे नाहीये. तुला आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे."
    " हां माते आपले म्हणणे बरोबर आहे. मला आपल्या
कर्तव्याचे पालन करायला हवे. परंतु मला असं का वाटते
की राजभवन मध्ये फार मोठे षड्यंत्र रचले गेले आहे."
असे म्हणताच महाराणी कैकेयी एकदम दचकली. भरत
पुढे म्हणाला," कुण्या दुष्टाने आमच्या कुळाचा सर्वनाश
करण्याचा प्रयत्न केला. आमच्या सुख आणि शांतीप्रिय
जीवनामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वात
प्रथम माझे कर्तव्य हेच राहील  की षड्यंत्र रचणाऱ्यांच्या
मुळापर्यंत पोहोचून त्याला दंड देणे ज्याने माझ्या पित्याची
हत्या केली आहे. माझ्या दादा रामला वनवासात पाठविण्याचा अपराध केला आहे. ज्याने आमच्या वंशावर
क्रूर आघात केला. त्याला मी जिवंत सोडणार नाही." तेव्हा
महाराणी ने विचारले ," तू त्या अपराध्याला प्राण दंड देशील का ? " भरत म्हणाला ," अवश्य ! मग तो स्वतः काळ का असेना ?"
    " असं मग तर तुला तो दंड मला द्यावा लागेल."
    " आपल्याला ?"
    " हां मला.मीच महाराजा जवळ दोन वर मागितले होते.
आणि महाराजांनी मला दोन वर दिले होते नि सांगितले होते जेव्हा पाहिजे तेव्हा वर माग ते ताबडतोब पूर्ण
करण्यात येतील. तू आजोळी गेल्यानंतर महाराणी कौशल्याच्या सांगण्यावरून महाराजानी रामचा राज्यभिषेक करण्याचा निश्चित केला. महाराणी कौशल्या ने विचार केला कैकेयीचा पुत्र इथं नाहीये. या संधीचा फायदा आपण का घेऊ नये ? परंतु मी असं होऊ दिले नाही. मी जिवंत असताना तुला या राज्यापासून वंचित कोण कसे करू शकेल ? मी महाराजा कडून माझे ते दोन वर मागून घेतले. एका वरामध्ये तुझ्यासाठी अयोध्याचे राज्य आणि दुसऱ्या वरामध्ये रामासाठी चौदा वर्षाचा वनवास द्यायला मी लावला. तुझ्या मार्गातील सर्व काटे मी काढून टाकले. या कामात मला बिच्चारा मंथरा ने मदत केली. तिनेच हा मार्ग मला सुचविला. आणि मी केला. राम सोबत लक्ष्मण आणि सीता विना आपत्ती केल्याशिवाय स्वतःच निघून गेले. सारे काम व्यवस्थित पार पडले.परंतु
एकच वाईट गोष्ट घडली आणि ती वाईट गोष्ट म्हणजे
महाराज रामच्या वियोगाने स्वर्गवाशी झाले. किंचित हसून पुढे म्हणाल्या ," मला माहित आहे, पित्याच्या स्वर्गवासा मुळे तुला फार दुःख झाले आहे. तेवढेच दुःख आम्हालाही
झाले आहे. महाराज तर परत येणार नाहीत. परंतु तुला
त्यांच्या वचनाचे पालन अवश्य करायला हवे. त्यांच्या
वचनानुसार तू ह्या विशाल राज्याचा एकछत्र सम्राट आहेस.
हा निष्कंटक राज्य तुझे आहे. म्हणून सांगते धैर्य धर नि हे सिंहासन सांभाळ राजन. भरत कुण्या सामान्य माणसाला
असे शोकाकुल होणे स्वाभाविक आहे. परंत तू तर सामान्य नाहीयेस. तू तर सत्यप्रज्ञ सदाचारी आहेस तुझी बुद्धी वेदांचे अनुसरण करणारी आहे. या क्षणी तुझे पहिले कर्तव्य म्हणजे पित्याच्या शरीराला दाहसंस्कार करणे."
भरत आपल्या मातेकडे नुस्ता पाहतच राहतो. म्हणून
महाराणी कैकेयी म्हणाल्या ," तू माझ्याकडे असं काय पाहतो आहेस, मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केले आहे."

क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.