रामायण भाग २१| Ramayana episode 21| Author : Mahendranath prabhu
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रामायण भाग २१| Ramayana episode 21| Author : Mahendranath prabhu |
महाराणी कैकेयी आपल्या महालात बसली आहे. आणि तिच्या सोबत तिची दासी मंथरा आहे नि महाराणीचे
ती कान भरत आहे. मंथरा म्हणाली ," राणी हातावर हात
घेऊन बसून राहण्यात काही अर्थ नाही. तुला काय वाटतं
राजा भरतला त्याच्या आजोळी वरून बोलवून घेईल असं
तुला तसं वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. म्हणून आपणच एखादा गुप्तचर कैकेयी देशाला पाठवून भरत ला बोलवून घेऊ.कसं ?"
" ठीक आहे बोलवून घेऊ परंतु मंथरा अजून त्याची वेळ
आलेली नाहीये. कारण आर्यसुमन्त त्या तिघांना वनात
सोडून वापस आलेला नाहीये. माहीत नाही काय षड्यंत्र सुरू आहे ते . त्याला प्रथम येऊ दे मगच आमची खात्री होईल की राम खरोखरच चौदा वर्षांसाठी वनवासाला गेला मग मनात कोणतीच आशंका राहणार नाही.
" हुं sss तू बरोबर बोलत आहेस." मंथरा म्हणाली.
निषादराज नावेतून खाली उतरला तेव्हा एका सेवकाने विचारले," काय महाराज सर्व कुशल मंगल तर आहे ना ?"
निषादराज म्हणाला," कसले कुशल मंगल ? स्वामींनी मला वापस घरी पाठविले. मला असे जाणवते की माझं शरीर इथं आहे ; परंतु आत्मा श्रीरामाकडे आहे." तेव्हा
तो सेवक म्हणाला," मंत्रीजी आपलीच वाट पाहत आहेत."
" काय ? आर्यसुमन्त अजून गेले नाहीत ?"
" तो पहा त्यांचा रथ उभा आहे." असे दाखवत तो सेवक
निषादराज आर्यसुमन्त जवळ घेऊन आला.
" मंत्रीजी प्रणाम !" निषादराज हात जोडून त्यांच्या समोर उभा राहत विचारले. आर्यसुमन्त ने निषादराजला
प्रणाम केला. तेव्हा निषादराज ने विचारले ," मंत्रीजी
आपण अजून अयोध्येला गेले नाहीत का बरं ?"
" निषादराज मी रोज अयोध्येला जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे रोज रथाला घोडे बांधतोय. परंतु ना घोडे
दोन पाऊले पुढे चालायला तयार आणि नाही मला अयोध्येला जावे असे वाटत नाही. कारण खाली रथ अयोध्येला घेऊन गेलो तर अयोध्या वाशियाना काय सांगू ? म्हणून मला अयोध्येला जाण्याची हिंम्मत होत नाही. निषादराज आता मला हे सांग श्रीरामा ना कोठे सोडून आलास ?"
" मी त्यांच्या सोबत यमुना नदी पार करिपर्यंत होतो.
तेथून पुढे ते चित्रकूट पर्वताच्या दिशेने निघून गेले नि मी
परत आलो.मलाही स्वामीनी स्वतःसोबत नेले नाही."
" बस आता मी सुध्दा चित्रकूट पर्वतावर जाईन."
" असं करू नका आर्यसुमन्त तुम्हाला माहीत आहे ना
प्रभू श्रीराम काय म्हणाले होते."
" हो माहीत आहे, त्या अपराधाची जी शिक्षा मिळेल
ती मी आनंदाने स्वीकारीन. परंतु चौदा वर्षे तिथेच राहीन आणि चौदा वर्षानंतर त्याना याच रथात बसवून अयोध्येला
घेऊन येईन."
" नाही नाही हे योग्य होणार नाही. आपण श्रीरामाच्या
नजरेत अपराधी ठराल. म्हणून या क्षणी आपले अयोध्येला जाणेच योग्य ठरेल."
" नाही."
" महाराज अयोध्येला जा."
" नाही."
" महाराज आपल्याला श्रीरामा ची शपथ आहे. माझ्यावर कृपा करा नि अयोध्येला निघून जा. नाहीतर रामजी दुःखी होतील. शिवाय महाराजांचा तरी विचार करा. महाराज आपली वाट पाहत असतील. मी लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणून मला क्षमा करा. परंतु महाराज आपल्याला अयोध्येला चलावेच लागेल. चला." असे म्हणून निषादराज आर्यसुमन्तचा हात पकडून जबरदस्तीने त्याना घेऊन गेला.
महाराज दशरथ पलंगावर झोपले आहेत. महाराणी
कैशल्या त्यांचे पाय दाबत आहे तर महाराणी सुमित्रा
त्यांचा हात आपल्या हातात घेऊन हलक्या हातानी
मालिश करत आहे. आणि उर्मिला पलंगाच्या मागे उभी
राहून त्याना हवा घालत आहे. त्यावेळी महाराजांच्या
चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलेले होते. कारण महाराजाना
श्रीरामाच्या बालपणीचे दिवस आठवले. श्रीराम एकदम लहान होते तेव्हा ते धुडधुड धावत असत नि महाराज त्याच्या मागे धावत असत. त्यावेळी कधी कधी ते पडत असत. आणि शेवटी धावून श्रीरामाना पकडत असत. असे सुंदर दृश्य पाहण्यात मग्न होते. त्यानंतर त्याना राम , लक्ष्मण ,भरत आणि शत्रुघ्न जेव्हा गुरूंच्या आश्रमात जेव्हा विद्या संपादन करण्यासाठी त्याना आश्रमात जायचं असतं तेव्हा भरत विचारतो की तिथं अंगाई गीत ऐकायला मिळेल ना ? कारण अंगाई गीत ऐकल्या शिवाय मला
झोपच येत नाही " त्याचं हे व्यक्तव्य ऐकून सर्वजण हसले.
तेव्हा राम म्हणाले ," मी ऐकविणार तुला अंगाई !" त्यानंतरचा प्रसंग म्हणजे श्रीराम वनात जातात. त्यावेळचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि महाराज घाबरून जागे झाले. तशी महाराणी कौशल्यानी विचारले ," काय झालं महाराज ?" तेव्हा महाराजांनी विचारले ,
" आर्यसुमन्त रामला घेऊन आला का ? "
" नाही." असे म्हणून महाराणी कोशल्या रडायला लागल्या. तेव्हा महाराज म्हणाले," रडू नकोस कौशल्या राम येत आहे. माझा राम रथात बसून येत आहे." त्याच
वेळी वनात राम, लक्ष्मण आणि सीता अनवाणी पायानी दगड-धोंड्यातून , काट्याकुट्यातून मार्ग काढत निघाले होते. चालता चालता सीतेच्या पायाला काटा टोचला. श्रीमानी तिच्या पायातील काटा अलगद काढला. त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.
कैकेयी देशा मध्ये भरत आणि शत्रुघ्न बसले होते. भरत म्हणाले ," आता इथं माझं मन लागत नाही. मला राम दादाची फार आठवण येत आहे." तेवढ्यात तेथे भरतचे आजोबा आणि मामा येतात. त्याना पाहून शत्रुघ्न म्हणाले," ते बघ आजोबा आले." असे म्हणून दोघेही उठून उभे राहतात नि आपल्या आजोबांचे चरणस्पर्श करतात. तेव्हा अश्वपती ने विचारले ," भरत तुझे मामाजी सांगत होते की आज काल फार उदास राहतोस म्हणून. तुझं इथं
मन लागत नाही का ?"
" अयोध्येच्या माणसांची आठवण येते का ?"
" आपल्या माणसांची आठवण येणारच ना ?" भरत
उद्गारला. तेव्हा महाराज अश्वपती म्हणाले ," आम्ही तुझे
कोणीच नाहीत का ?"
" असं कोण म्हणाले. परंतु .....?"
" परंतु काय ? मातेची आठव येतं का ?" मामाजी ने विचारले. तेव्हा शत्रुघ्न म्हणाले," दादाला या क्षणी कोणाची
फार आठवण येत असेल तर तो मोठ्या दादाची अर्थात रामची !" तेव्हा मामाची म्हणाले ," मग जरूर तुझी आठवण रामाने काढली असेल. कारण दोन्ही कडून जेव्हा
सारखीच ओढ असते त्याच वेळी असे घडते." तसा भरत
म्हणाला ," तसे तर दादा म्हणाला होता की मी तुला
लवकरच बोलवून घेईन. पण न जाणो अजून का नाही
बोलविले. आणि आज काल तर त्यांची छबी माझ्या
डोळ्यासमोरून हटतच नाही. आणि रात्री अपशकुन वाली स्वप्न पडतात. एकदा तर असं स्वप्न पडलं की एक स्त्री
त्यांची वस्त्रे खेचून घेऊ पाहत आहे. तर कधी मी पाहतो की अयोध्या मध्ये शोककळा पसरली आहे. मला वाटतं अयोध्या मध्ये काहीतरी अघटित नक्कीच घडलंय नाहीतर माझं मन इतकं उदास झालं नसतं.
राम, लक्ष्मण आणि सीता एका मोकळ्या मैदानातुन
निघाले होते.इतक्यात सीतेच्या पायात काटा रुतला तशी
ओरडली. श्रीरामानी सीतेला आपल्या हाताचा आधार दिला होता. आणि लक्ष्मणाने अगदी अलगद सीतेच्या पायातील काटा काढला नि आपल्या वस्त्राने तिच्या पायाची जख्यमं बांधली.! तेव्हा श्रीरामानी विचारले ," सीते तुला थकवा जाणवतोय काय ?" त्यावर सीता म्हणाली ," थकवा नाही पण तहान अवश्य लागली आहे." श्रीराम म्हणाले ," अगं पण इथं कोठे पाणी मिळणार ?" तेवढ्यात लक्ष्मण म्हणाला ," दादा, ती बघ वस्ती तिथं दिसत आहे. वस्ती आहे म्हणजे तिथं विहिर जरूर असणार चला जाऊ तिकडे." इतक्यात दोन माणसं समोरून येताना दिसली. लक्ष्मणाने त्या दोघांना विचारले, इथं प्यायला पाणी मिळेल का हो ?"
" का नाही मिळणार , इथं जवळच तर आमच गाव आहे." महिला म्हणाली. तिच्या सोबत असलेला पुरुष त्या स्त्रीचा पती असावा. तेव्हा तिला म्हणाले," बरं झालं देवाने पाणी बनविले ते. नाहीतर पाण्या शिवाय आपण माणसं कशी जगली असती.? त्यावर ती स्त्री म्हणाली ," हे लोक परदेशी वाटतात; परंतु ते परदेशी नाहीयेत."
" मला तर कुण्या राजाचे राजकुमार वाटतात. पोशाखा
वरून भले ते ऋषी कुमार वाटतात. परंतु ते कुण्या राजाचे
राजकुमार असावेत."
" काहीतरीच काय बोलतोय हे राजकुमार कसे असू
शकतील ? त्यांच्या पायात धड चप्पल पण नाही. म्हणून
ते नग्न पायाने चालतात ."
" तुला माहीत नाही विधीचे विधान. मोठमोठे राजकुमार पण भिकारी होतात." त्यावर ती स्त्री म्हणाली,
" गप्प बसा. उगाच काहीपण बोलत बसता. आधीच
ते फार दुःखी दिसतात. म्हणून काहीही बोलू नका. आता
गाव पण आलंय बिच्चाऱ्या ना पाणी पाजू या !"
" हां पाणी तर पाजायचंच आहे, परंतु तू आपले तोंड
बंद ठेव." शेवटी गावात येऊन पोहोचले. तिथं काही स्त्रिया
विहिवर पाणी भरत होत्या. तेव्हा ती स्त्री एका स्त्रीला हांक
मारून म्हणाली ," चंद्रा जरा विहिरीतून पाणी काढ नि
या परदेशी लोकांना पाणी पाज." त्यावर ती चंद्रा म्हणाली,
" हां हां जरूर." असे म्हणून तिने पुन्हा पोहरा विहिरीत सोडला नि विहिरीतुन पाणी काढले आणि
सर्व प्रथम तिने सीतेला पाणी पाजले नि म्हणाली ," चालत आली का ? मग जा तिकडे जरा आराम कर." तिने दाखविलेल्या स्थानावर सीता जाऊन बसली .तशी ती त्या दोघांना म्हणाली, " या दादा तुम्ही पण पाणी प्या !" प्रथम श्रीराम गेले. त्यांच्या हातावर तिने पाणी ओतले तसे त्यानी प्रथम आपले हात धुतले नि मग आपल्या ओंजळीने पाणी
प्याले. त्यानंतर लक्ष्मण आला तसे त्याच्या हातावर सुद्धा
त्या स्त्री ने पाणी ओतले तसे लक्ष्मणा ने प्रथम आपले
हात धुतले नि त्यानंतर ओंजळीने पाणी प्याले. त्यानंतर
लक्ष्मणाने आपला शेला ओला करून घेतला नि आपल्या
ओंजळीत पाणी घेऊन ते पाणी श्रीरामाच्या चरणांवर
ओतले नि मग आपल्या शेल्याने ते पुसून काढले. तेव्हा
त्या तिघांकडे ते लोक मोठ्या कुतूहलाने पाहत होते. त्यातील एक स्त्री ने विचारले की तुम्ही चांगल्या घरची माणसं वाटता. परंतु जंगलात का फिरताय ?" त्यावर सीता म्हणाली , " आम्हाला वनातच रहायचंय."
" असं वनात कोणी आपल्या इच्छे ने राहतोय का ?
बरं ते जाऊ दे मला हे सांग. ते दोघेजण कोण आहेत ?
त्यावर सीता म्हणाली ," ज्यांच्या खांद्याला धनुष्य बाण
लटकतोय ना ते माझे दीर आहेत. आणि जे बसले आहेत
ते .....सीता बोलण्या अगोदर ती स्त्री म्हणाली ," तुझे भ्रतार ना ?" तशी सीता लाजली. त्यानंतर त्या स्त्री ने
विचारले ,' तुझं नाव काय ?"
" सीता !"
" आणि त्या दोघांचे नाव काय आहे ?"
" लक्ष्मण ....."
" आणि ते राम ......किंचित विचार करून ती स्त्री
म्हणाली ," राम लक्ष्मण आणि सीता ! आणि ती पण
आमच्या गावात ?" लगेच लोकांची कुजबूज सुरू होते.
" अरे बाप रे ! किती कठोर आहेत ह्यांचे आई-बाप
फुला सारखी नाजूक असलेल्या आपल्या सुनेला वनात
पाठविले." त्यावर श्रीराम म्हणाले ," नाही ताई , त्यांनी
नाही पाठविले. आम्ही स्वतःच वनात आलो."
" कोणी वनात स्वतःहून येत नाही. हा सारा भाग्याचा खेळ आहे कुमार."
" तू आमची राणी आहेस . हे आम्हाला माहीत नव्हते.
म्हणून आमच्या कडून काही चुकलं तर आम्हाला क्षमा करा महाराणी !"
" नाही. तुमच्या कडून काहीही चुकलेले नाहीये."
" आपल्या सारखी माणसाचे जर वनवास भोगतात तर ब्रम्हदेवाने राज पाट कोणासाठी बनविले?" एकजण म्हणाला. लगेच दुसरा गावकरी म्हणाला," आपले नग्न पाय पाहून तर मला फार वाईट वाटतं."
" आपण आमचे राजे आहात. म्हणून आता इथंच रहा
आमच्या गावात."
" नाही दादा आम्हाला चित्रकूट पर्वतावर जायचे आहे.
भरतद्वाज मुनीने आम्हाला सांगितले तेच स्थान उत्तम आहे. म्हणून कृपा करून तिकडे जाण्याचा रस्ता आम्हाला
दाखवा.
" त्यात काय आम्ही स्वतः आपल्याला त्यांच्या कडे
घेऊन चलतो. तिकडे वाल्मिक ऋषींचा आश्रम पण आहे.
वाल्मिक ऋषींची परवानगी घेऊन आपल्यासाठी एक झोपडी पण बांधून देऊ ! आपण आमचे राजे आहात."
असे म्हणून ते सर्वजण राम लक्ष्मण आणि सीता सोबत
निघाले. आणि लवकरच चित्रकूट पर्वतावर पोहोचले. तेव्हा श्रीराम ला पाहून वाल्मिक ऋषी म्हणाले," राम आज तुझ्या येण्याने वाल्मीकीची पर्णकुटि पवित्र झाली. तुझ्या दिव्य तेजाने सारा आश्रम प्रकाशमय होत आहे. "
" प्रभू आपल्या सेवकाला मोठेपणा देत आहेत .अन्यता
हे श्रीचरणी पर्यंत पोहोचणेही माझे सौभाग्य आहे.नाहीतर
ज्यांच्या शरणाला आल्यावर मनुष्य आपल्या निहित आत्म्याला परमेश्वर स्पर्श झालाचा अनुभव करतो. तुला माहितेय मी आता काय अनुभव करत आहे जसा भक्त आणि ईश्वर मिलन होत आहे.जसे ईश्वर स्वतःच आपल्या भक्ताला भेटायला आहेत.
" महात्म्य आपण तर कवी आहात.कवी आपल्या
भावनांच्या स्वतःच कल्पनेने सृष्टीची रचना करू शकतो.
कवी मध्ये इतकी शक्ती असते.भावनांच्या बळाने दगडाची
मूर्ती सुद्धा सजीव बनवितो. मग साधारण मनुष्याची ईश्वर च्या रुपाशी कल्पना करणे कोणते कठीण कार्य आहे ?
"ही कल्पना नाहीये राम जशी मनुष्याची स्थिती होते
तो आपल्या शरीरात विध्यमान असलेल्या ईश्वर रूपाचे
दर्शन घेऊ पहातो तेव्हा तो स्वतःच ईश्वर होऊन जातो. कारण तुला जो ओळखेल तो तुझ्या रूपातच लुप्त होईल.
" हे महामुनी प्रेम आणि भक्तीची परिसीमा आहे ज्यांना
कणकणामध्ये ईश्वर दिसतो.म्हणून माझ्या सारख्या साधारण मनुष्यालाही ईश्वर ची संज्ञा देत आहेत.
" आतापर्यंत जे तू कार्य केलेस जसे की तारका चा वध
भगवान परशुरामाचे गर्वहरण यावरून माझी पूर्ण खात्री
झाली तू कोणी साधारण मनुष्य नाहीयेस.जरूर अवतारी
पुरुष आहेस जो धर्मात्माची रक्षा करण्यासाठी आणि
दृष्टांचा संहार करण्यासाठी अवतार घेतला आहे. तुही
माझ्या काव्याचे नायक आहेस राम "
" वास्तविकता पाहता मी कोण आहे माझा जन्म कशासाठी झाला हे मी कसे माहीत असणार ? हे तर आपल्या सारखा त्रिकालदर्शीच सांगू शकतो. मी फक्त स्वतःला मनुष्य समजतो. मी दशरथ राम आहे.आणि आपल्या बंधू नि पत्नीसह आपल्या पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगायला वनात आलोय.मी अश्या कोणत्याही स्थानावर राहू इच्छित नाही की माझ्या उपस्थिमुळे कुण्या तपस्वी च्या पूजे मध्ये विघ्न येईल. म्हणून पूर्ण विचार करून माझ्यासाठी असं स्थान निश्चित करा जिथं मी चौदा वर्षे राहू शकेन.
" मला स्थान विचारतोस अगोदर मला हे सांग असं
कोणतं स्थान आहे जिथं तू नाही आहेस."
" प्रभू मला आपल्या मधुर वाणीत अडकवू नका. आपण माझ्यासाठी एक स्थान निश्चित करा जिथं आम्ही छोटीशी झोपडी बांधून त्यात राहू."
" आपली झोपडी तर प्रत्येक भक्तांच्या हृदयात आहे.
आणि सांसारिक रूपाने जर आपल्याला ऋषीमुनींच्या
सानिध्यात राहायचं असेल तर मंदाकिनी नदीच्या तीरावर
कुटिया बांधून राहू शकता. पुण्यशीर मंदाकिनी वास्तविक पाहता गंगेची धारा आहेत. जिला महर्षी अत्री ची पत्नी
देवी अनुसया आपल्या तपोबलच्या मदतीने निल पर्वतावर
आणली आहे. इथं वनांमध्ये राहणारे ऋषीमुनीं मोठे स्नेही आहेत. ते आपला राजा समान आदर करतील आणि आपल्याला कुटिया बांधण्यासाठी मदत करतील."
आणि खरोखरच सर्व ऋषीमुनींनी मिळून रामसाठी
पालापाचोळ्यांची कुटिया बांधली. त्यानंतर पूजापाठ
करून सर्व ऋषीमिनीचा आशीर्वाद घेतला.तेव्हा श्रीराम
म्हणाले," हे वनच्या देवता , हे वृक्ष लतावेली , हे पवित्र मंदाकिनी मी दशरथ पुत्र राम, आपल्या भार्या आणि
आपल्या बंधू सोबत पर्णकुटीत प्रवेश करत आहे.आपली
कृपा सदैव आमच्यावर राहू दे." असे म्हणून प्रणाम केला
आणि आपल्या पत्नीसह त्या पर्णकुटीत प्रवेश केला.
त्यानंतर जिथं सुर्यदेवाच्या चित्राला वंदन करून अयोध्या
वरून आणलेली माती सुर्यदेवाच्या चित्रा समोर ठेवून
तिला वंदन करून श्रीराम म्हणाले ," हे अयोध्याच्या पावन
माती माझ्या पर्णकुटी माझा कौशल देश माझ्या हृदयात सदा तुझा वास राहू दे." असे म्हणून प्रणाम केला.
आर्यसुमन्त खाली रथ घेऊन अयोध्येला न जाता महर्षी
वशिष्ठांच्या आश्रमात पोहोचले. आणि महर्षी वशिष्ठाना
वंदन करून ते म्हणाले," गुरुदेव मी आपल्या पाशी आलोय. कारण मला आपली मदत हवीय."
" कशासाठी ?"
" महाराजांनी माझ्यावर एक काम सोपविले होते.पण
त्यात मी अपयशी ठरलो. गुरुदेव मी देवी सीतेला पण आणू शकलो नाही. खाली रथ घेऊन आलोय."
" आर्यसुमन्त तू खाली रथ घेऊन आला नाहीस तर
रघुवंशाचे धर्म , कर्म आणि सत्याचा गौरव घेऊन आलास.
जर रथ अशा प्रकारे वापस आला नसता तर रघुवंशाची
सारी कीर्ती रसातळाला गेली असती. म्हणून जे झाले ते
चांगले झाले. म्हणून मनात कोणताही किंतु परंतु न
ठेवता सरळ महाराजांची भेट घे."
" महाराजा समोर जाण्याची माझ्यात हिंम्मत नाहीये.
त्यांचे डोळे माझ्या वाटेकडे लागले असावेत. आणि त्यांचे
कान रथाचा आवाज ऐकण्यासाठी तरसले असतील. त्यांच्या समोर मी गेल्यावर मला एकटाच आलेला पाहून
त्यांची जी दशा होईल याची मी कल्पना पण करू शकत
नाही. गुरुदेव आपण माझ्या सोबत असाल तर आपले
ज्ञान आणि उपदेश मुळे महाराजांचे दुःख कमी होऊ
शकते. अयोध्येसाठी ही संकटाची घडी आहे; परंतु यातून
आपणच काहीतरी मार्ग शोधून काढू शकता. म्हणून
आपण पण माझ्या सोबत चालावे."तेव्हा महर्षी वशिष्ठ
समजले की पुढे काय होणार आहे ते म्हणूनच की काय
ते म्हणाले ," घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात. त्याला
कोणीही थांबवू शकत नाही. चल येतो मी !" असे म्हणून
महर्षी वशिष्ठ आपल्या स्थानावरून उठले.
महाराज दशरथ पलंगावर पहुडले आहेत. उर्मिला
त्यांच्या उजव्या बाजूला उभी आहे नि पंख्याने त्याना
हवा घालत आहे. आणि त्यांच्या डाव्या बाजूला महाराणी
सुमित्रा उभी आहे आणि महाराणी कौशल्या विष्णू देवाची
पूजा करत आहेत. त्यांची पूजा आटोपताच त्या महाराज
जवळ आल्या नि मोठ्या ने त्याना हांका मारू लागल्या की-
" स्वामी s s स्वामी sss "
" हुं s s s असे म्हणून किंचित डोळे उघडून ते म्हणाले, " कौशल्ये आज पाच दिवस झाले राम ला अयोध्या सोडून.परंतु अजून आर्यसुमन्त आला नाही याचा अर्थ आर्यसुमन्त श्रीरामाचे मन वळविण्याचा प्रयत्न करत असावा. राम मोठा नियमाने चालणारा व्यक्ती आहे .त्याचे
मन वळविणे एवढे सोपे नाहीये ते काम !" तेवढ्यात एक
दासी आली नि म्हणाली ," महाराज की जय हो !" असे
म्हणताच महाराज आपली मान वळवून त्या दासीकडे
पाहतात. तशी ती दासी पुढे म्हणाली ," गुरुदेव वशिष्ठ
आर्यसुमन्त सोबत येत आहे."
" आर्यसुमन्त आले .....मग ताबडतोब पाठवून देणे त्याना." तशी ती दासी म्हणाली," जशी आपली मर्जी!"
असे म्हणून ती निघून पण गेली. तसे महाराज खुश होऊन
उठून बसले. तेवढ्यात महर्षी वशिष्ठ आणि आर्यसुमन्त
दोघांनी एकदम प्रवेश केला. त्याना पाहून महाराज ने
हात जोडून प्रणाम केला. इतक्यात त्यांची नजर आर्यसुमन्त वर गेली तसे त्यांनी आर्यसुमन्त ला विचारले ,
" सुमन तू एकटा आलास ? राम कोठे आहे नि सीता
कोठे आहे ?" परंतु आर्यसुमन्त ने कोणतेही उत्तर दिले नाही. तेव्हा महाराजांनी पुन्हा तोच प्रश्न केला. आता मात्र
आर्यसुमन्त ला उत्तर दिल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणूंनच की काय आर्यसुमन्त म्हणाले," क्षमा करा महाराज मी आपल्या आज्ञाचे पालन करू शकलो नाही."
" आर्यसुमन्त सीतेला पण आणू शकला नाहीस तू !
माझं एवढं छोटंसं काम पण करू शकला नाहीस ?"
" हां महाराज मी फार मोठा अपराध केला आहे. राज
आज्ञाचे पालन नाही केलं. त्यामुळे मला दंड मिळणे आवश्यक आहे. मला प्राणदान दंड मिळायला पाहिजे महाराज !"
" मला महाराज म्हणू नकोस. आता अयोध्याचा कोणी
ना राजा आहे ना मंत्री ! आर्यसुमन्त अयोध्यावर जर कोणाचे अधिपत्य असते तर असा अनर्थ झाला नसता. विना मंत्रिमंडळाशी विचारविनिमय केल्याशिवाय एका नारीच्या हातची कंठपुतली बनून आपल्या कुळाचा सर्वनाश केला. सुमंत जर तू मला राजा मानत असशील तर माझा आदेश आहे की तुला मला रथा मध्ये टाकून माझा राम जिथे गेला तिथे मलाही नेऊन सोड. कारण माझा प्राण राम पाशी आहे."
" महाराज तुझ्या सारख्या धीर, धर्म, कर्म, आणि सर्वज्ञान संपन्न असलेल्या राजाला हे शोभत नाही."
" एवढा मोठा अनर्थ घडलाय अयोध्या मध्ये त्याची क्षमा
पण मागून मिळणार नाही."
" आपण राम सारख्या धर्मात्मा कर्तव्य निष्ठ पुत्राचे पिता आहात. वचन पूर्तीसाठी त्यागवीर ने जो निर्णय घेतला तो पूर्णत्वास जाऊ दे."
" त्या महान पुत्रांचा महानता पर्यंत सुद्धा मी पोहोचू
शकत नाही. मी रामाला राज्य देतो म्हणून सांगून त्याला
हद्दपार केले. पण तरी देखील तो हसतच निघून गेला.
अश्या पुत्र न पुत्र न होण्यावर सुद्धा माझे प्राण नाही
निघाले कुडीतून. हे विधाता जर संपूर्ण जीवनात जर मी
एक सुध्दा चांगले काम केले आहे तर मला या क्षणी मृत्यू
द्या. कारण आता जगण्याची कोणतीही अभिलाषा नाही.
" महाराज आपण स्वतः ज्ञानी आहात. शूरवीर आणि
धैर्यवान आहात. आपल्याला असं विव्हल होणे योग्य नाही. जीवन मृत्यू हानी लाभ प्रियजनांची भेट आणि
हरवणं हे सर्व काळाच्या आधीन आहे. जसे की दिवस
आणि रात्र येणे आणि जाणे कोणी टाळू शकत नाही.
तसेच सुख आणि दुःख आपल्या वेळनुसार येत राहील
नि जात राहील हे अटळ सत्य आहे. ते सहन करणे भाग आहे."
" तरी सुद्धा दुःख सहन करण्याची क्षमता नसेल तर !"
" महाराज आपली ही अवस्था पुत्र मोहामुळे झाली
आहे. अन्यता ही वेळ आपल्या पुत्रावर गर्व करण्याची आहे. किंचित शांत मनाने विचार करा म्हणजे कळून
येईल की राम ने फार मोठे महानकार्य केले. ते म्हणजे
एवढ्या मोठ्या साम्राज्याचा त्याग करून हसत हसत वनात निघून गेला. का ? तर आपले वचन खोटे ठरू नये म्हणून त्याने वनवास स्वीकारला. त्याच्या चेहऱ्यावर यत्किंचितही दुःख दिसले नाही. लक्ष्मणाला पहा सीते कडे पहा एका राजाची पुत्री नि एका सम्राटची पत्नी असुनही आनंदाने वनवास स्वीकारला. सर्वांनी आपापल्या धर्माचे पालन केले. हे राजन आपले तर मस्तक अभिमानाने उंच झाले पाहिजे. "
" मुनींवर बोलायला फार सोपे पण करायला फार कठीण आहे."
" कठीण परिस्थिती मध्येच धैर्याची परीक्षा असते. आपल्या सुख-दुःखाने प्रजा प्रभावित होते. हे विसरू नका
या वेळी आपल्या वर फार जबाबदारी आहे राजन."
" आपल्यासाठी श्रीरामाने हाच संदेश दिला आहे. म्हणाले , पिताश्री माझ्यामुळे आपण दुःखी होऊ नका.
नाहीतर मला फार दुःख होईल. राज्य सोडण्याचे अजिबात
दुःख नाहीये. त्यांनी भरतसाठी पण संदेश दिला आहे की
त्याने असे कोणतेही कार्य करू नये की ज्याने आमच्या
पिताश्रीना दुःख होईल. महाराज आपल्या राम साठी तरी
या दुःखाचा त्याग करा."
" जरा विचार करा महाराज रामाच्या भवसागर मध्ये
आपले अयोध्याचे जहाज डोलत आहे. आपण त्या जहाजाचे कप्तान आहात. आपण धैर्य ठेवलेत तरच
आपले जहाज वादळातुनही पार होईल. अन्यता हे जहाज
पाण्यात बुडून जाईल.म्हणून धैर्य ठेवा स्वामी ! सर्वकाही ठीक होईल."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा