Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

रामायण भाग २० | Ramayana episode 20 | Author : Mahendranath prabhu.

रामायण भाग २० | Ramayana episode 20 | Author : Mahendranath prabhu.
रामायण भाग २० | Ramayana episode 20 | Author : Mahendranath prabhu. 



    निषदराज त्याना गंगेच्या काठावर घेऊन आला.परंतु
तेथे नावाडी नव्हता. म्हणून निषादराज मोठ्या ने ओरडून
त्याला हाक मारू लागला.
     " ए sss नावाडी दादा कुठं आहेस रे ?" नावाडी माणसाचे घर तिथं जवळच असल्याने तो आपल्या
अंगणातून पाहू लागला कोण  आलंय ते. पण दुरून त्याला
काही ओळखले नाही म्हणून तो पाहतच तिथं उभा राहिला. ते पाहून निषादराज म्हणाला," अरे पाहतो काय
ये कडे ." असे म्हणताच तो नावाडी आपल्या पत्नीस
म्हणाला ,' कोण आलंय कोण जाणे जाऊन पाहतो."
असे बोलून पतवार ( व्हले ) उचलून गंगेच्या काठावर
जायला निघाला. तोपर्यंत श्रीराम गंगेच्या पात्रात शिरले
नि ओंजळभर पाणी हातात घेऊन गंगे मातेचे नाव
घेऊन  गंगेचे पाणी गंगेलाच अर्पण केले नि गंगेला
प्रणाम केला नि पुन्हा काठावर आले जिथे सीता लक्ष्मण
आणि  निषादराज उभे होते तेथे आले नि निषादराज ला
म्हणाले ," मित्र आमच्या मागे अजून किती पळापळ
करणार आहेस ? आतापर्यंत आमच्यासाठी खुप कष्ट
केलेस . आता आम्हाला निरोप द्या."
    " कष्ट उलट आपण मला आपल्या सोबत  येऊ नका म्हटल्याने मला कष्ट झालेत फार. प्रभू माझी एक विनंती
मान्य करा.अजून काही दिवस मी आपल्या सोबत राहू
इच्छितोय स्वामी ! मला नाही म्हणू नका. शिवाय पुढचा रस्ता आबाडधोबड आहे, ठिकठिकाणी उंच सखल पणा आहे आणि काट्याकुटांचाही आहे. अश्या बिकट रस्त्याने चालायचं म्हणजे सोबत कुणीतरी माहितगार पाहिजे.
आणि हे काम माझ्या  सारखा मनुष्य करू शकतो.
कारण आमचं सारं जीवन अश्या खडतर मार्गातूनच
जाते म्हणून म्हणतोय मला आपल्या सोबत काही दिवस
तरी राहू दे. मग आपण म्हणाल तेव्हा मी परत जाईन."
    इतक्यात तेथे नावाडी आला नि म्हणाला ," हुं आलो
बुवा एकदाचा  ! " तेव्हा निषादराज म्हणाला ," तुझ्या नावेत बसायला कोण  कोण आलेत ते माहीत आहे का तुला ? हे अयोध्येचे राजा श्रीराम आणि हे लक्ष्मण दादा
आणि ही आमची सीता माई ! आम्हां सर्वांना पलीकडे
नेऊन सोड." तेव्हा तो नावाडी म्हणाला," अच्छा म्हणजे
हे आहेत तर अयोध्येचे राजा श्रीराम !" असे म्हणून हात
जोडून  म्हटले," नमस्ते   रामराजा , नमस्ते लक्ष्मण दादा आणि नमस्ते सीता माई  !" तेव्हा श्रीराम म्हणाले ,
  " नावाडी दादा आपली नाव जरा किनाऱ्यावर आण म्हणजे त्यात सीता आरामात चढू शकेल."
     " हे कसं होऊ शकतं ?"
     " का ?"
     " तुम्हां लोकांना पलीकडे घेऊन गेलो नि मध्येच माझी
नाव  नदीत बुडाली म्हणजे ? "
     " का ? तुझी नाव आमचं वजन घेऊ शकत नाही ?"
     "  ती वजन तेव्हाच घेईल ना , जर ती नाव राहील."
     " म्हणजे ?"
     " आम्हाला या चरणांचा प्रताप माहीत आहे कृपादान !
आम्हाला माहीत आहे आपल्या या चरणांच स्पर्श एका
शिळेला झाला नि त्या शिळेचे रूपांतर एका सुंदर स्त्री मध्ये
झाले. म्हणून मी आपणास माझ्या नावेत बसू देणार नाही.
म्हणून मी आपणास माझ्या नावेत बसू देणार नाही. कोण
जाणे माझी  नाव पण स्त्री बनली तर मी माझे पोट
कसे भरणार बरं ?"
     " मग काय आम्ही गंगेच्या पलिकडे कसे जाणार ?"
श्रीरामानी विचारले.
     " याला एकच उपाय आहे."
     " कोणता ?"
     " प्रथम आम्ही या चरणांना स्वच्छ गंगेच्या पाण्याने धुवून काढू आणि ते चरणासमृत आम्ही स्वता प्राशन करू
तेव्हा जर आपल्या चरणा मुळे काही चमत्कार घडला नाही  तरच आम्ही आपल्याला आमच्या नावेत चढायला देऊ. पहा मान्य असेल तर मी माझ्या कामाला सुरुवात करतो." त्याच्या या व्यक्तव्यावर श्रीराम मनातल्या मनात स्मित हास्य करत असतात. तेव्हा त्या नावाड्याने आपल्या पत्नीला हांक मारून गंगेच्या पाण्यासाठी पात्र आणि एक परात आणायला सांगितली. तशी त्याची ती पत्नी पार्वती ने गंगेचे पाणी आणायसाठी एक लोटा आणि चरण धुण्यासाठी एक परात घेऊन  पळतच आली आमच्या दिशेने . तेव्हा श्रीराम म्हणाले ," दादा, आमच्यापाशी कोणताही जादूटोणा नाहीये, आमच्या सांगण्यावर तू विश्वास ठेव. कारण आम्ही सुध्दा तुझ्या प्रमाणेच समान्य मनुष्य आहोत."
    " नाही मी आपले चरण धुतल्या शिवाय मी आपल्या नावेत चढू देणार नाही.  कारण ही नाव माझे सारे कुटूंब पोसतेय. आपल्या चरणाच्या स्पर्शाने जर एक नाव स्त्री बनली तर माझ्या ही नावेचे स्त्री मध्ये रूपांतर झाले तर !
माझ्या कुटूंबाचे पालन पोषण मी कसे करणार ,  म्हणून
मग नाईलाजाने  श्रीरामाना चे त्याचे म्हणणे ऐकावेच लागले. त्या नावाड्याची पत्नी एक परात  आणि  एक
लोटा घेऊन   गंगेच्या काठी आली. त्यानंतर नावड्याच्या
पत्नी ने लोटा भरून पाणी आणले. मग त्या नावाड्याने श्रीरामाचे चरण त्या परातीत ठेवून गंगेच्या पाण्याने ते
स्वच्छ  धुतले . आणि त्यानंतर अंगावरील उपरण्याने
श्रीरामाचे श्रीचरण पुसून काढले. त्यानंतर त्यांच्या धुतलेल्या चरणांचे पाणी तो स्वतः प्याला. आणि त्यानंतरच त्याने आपल्या नावेत श्रीराम, लक्ष्मण आणि
सीता आणि निषादराज या सर्वांना आपल्या नावेत बसू
दिले. आणि त्यानंतर त्या सर्वांना गंगेच्या पलीकडे नेऊन सोडले. नावेतून खाली उतरल्यावर सीते ने आपल्या बोटातील एक अंगुटी काढून श्रीरामपाशी दिली. मग श्रीरामानी  ती अंगुटी त्या नावड्याला देऊ लागतात.परंतु नावाडी ती अंगुटी घेण्यास नकार देऊन तो म्हणाला ," एक धोबी दुसऱ्या धोबीचे वस्त्र धुण्याचे मोल घेत नाहीत. अगदी तसेच नावाडी दुसऱ्या नावाड्या कडून मोल घेत नाही. मी सुद्धा नावाडी नि आपण सुध्दा नावाडी मग
आपल्या कडून मोल घेऊ कसे ? मग सीता गंगेच्या
पाण्यात उतरली नि आपल्या हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन पुन्हा गंगेला अर्पण करत म्हणाली ," ए s s भगवती गंगा माते मी आज तुझ्या दर्शनाने पावन झाली. मला आशीर्वाद देत की  मी आपल्या पती नि दीरा सोबत वनात जात आहे. वनवास समाप्त झाल्यानंतर पुन्हा आपले दर्शन घेण्यासाठी पुन्हा याच मार्गाने  येईन आणि आपली पूजा करीन ही माझी मनोकामना पूर्ण करशील याची
मला पूर्ण  खात्री आहे." असे म्हणून गंगेच्या पात्रातून
बाहेर आली आणि श्रीरामांच्या जवळ येऊन उभी राहिली.
तसे श्रीराम त्या नावड्यास म्हणाले ," येतो दादा !"
    तेव्हा तो नावाडी म्हणाला ," अयोध्येचे राजे श्रीराम
या नावाड्याला विसरू नका. पुन्हा याच मार्गाने या." तेव्हा श्रीराम म्हणाले ,  " कसे विसरणार तुला ? आम्ही याच मार्गांनी येऊ !"  असे म्हणून ते आपल्या बंधू स नि सीते ला उद्देशून म्हणाले ,   " चला." असं म्हणून ते निघाले. नावाडी
हात जोडून श्रीराम गेलेल्या दिशेकडे पहात होता. आणि
खाली वाकून श्रीरामांच्या पद स्पर्शाने पावन झालेली धूळ
आपल्या मस्तकी धारण केली नि श्रीरामाची छबी जोपर्यंत
नजरेला दिसत होती तोपर्यंत तो नावाडी तेथून हलला
नाही. निषादराज सर्वांच्या पुढे चालत होता. बाकी सर्वजण
त्याच्या मागोमाग चालत होते. दरमजल दरमजल करीत
ते सर्वजण प्रयाग राजला पोहोचले. प्रयाग राज ला त्रिवेणी
संगम आहे. तीन नदीचा संगम अर्थात  गंगा, जमुना आणि सरस्वती तीन नद्या एकत्र आल्या आहेत. परंतु सरस्वती
नदीचे पस्त्र  तिथं दिसत नाही. त्या नदीतून वाहणारे पाणी
तीन रंगाचे आहे.परंतु नद्या तर दोनच दिसतात मग तिसरी
नदी कोठे आहे ? असा ही प्रश्न पडतो. परंतु थोड्या वेळा
पुरता लगेच जाणवते की पाणी तीन वेगवेगळ्या  रंगाचे
आहे तर निश्चितच इथं तीन नद्यांचे पाणी आहे म्हणजेच त्रिवेणी संगम आहे. तेथून निघाले ते थेट भरतद्वाज ऋषींच्या आश्रम जवळ आले .तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक ऋषी कुमार आला. तेव्हा श्रीराम त्याला म्हणाले ,
    "  ऋषी कुमार आम्ही भरतद्वाज ऋषीच्या दर्शनासाचे अभिलाशी आहोत. " तेव्हा ऋषी कुमार म्हणाला ," मी गुरुदेवांना सूचित करतो." असे म्हणून ऋषी कुमार गेला. तेव्हा श्रीरामाची नजर भरतद्वाज जेथे यज्ञ करत होते तेथे गेली. तसे ते लक्ष्मणाला म्हणाले ," लक्ष्मण मला वाटतं की भरतद्वाज मुनी अग्निहोत्र यज्ञ करत आहेत. त्याचाच हा धूर येत आहे." ऋषी कुमार यज्ञ होत असलेल्या ठिकाणी गेला नि गुरुदेवांना  म्हणाला ," प्रणाम गुरुदेव !" तेव्हा भरतद्वाज मुनींनी विचारले ," काय झालं सदानंद ?" तेव्हा ऋषी कुमार म्हणाला ," द्वारवर तीन बटुक ब्राम्हण आले आहेत आणि ते आपल्या दर्शनाचे अभिलाशी आहेत." त्यावर भरतद्वाज मुनी म्हणाले ," त्या सज्जनांना आदर सहित इथं घेऊन ये." तसा तो ऋषी कुमार गेला नि श्रीरामाना म्हणाला ," या ss  गुरूदेव आपली प्रतीक्षा
करत आहेत." तेव्हा श्रीराम निषादराज कडे पाहत म्हणाले ," शस्त्र अस्त्र आश्रमात घेऊन जायला वर्ज्य आहे. अर्थात आपण आपली शस्त्र इथेच द्वारवर काढून ठेवावीत." तेव्हा ऋषी कुमार म्हणाला ," माझ्याकडे काढून द्या. मी एका सुरक्षित ठिकाणी ठेवून देतो." त्यानंतर श्रीरामानी आणि लक्ष्मणाने आपले धनुष्यबाण आणि तुनीर त्या ऋषीकुमारच्या स्वाधीन केली आणि मग भरतद्वाज मुनींच्या दर्शनासाठी हवनकुंडा पाशी आले. तेव्हा यज्ञ संपन्न झाला म्हणून बाकीचे ऋषी उठून गेले होते. त्याच क्षणी श्रीराम , लक्ष्मण , सीता आणि निषादराज सर्वजण मिळून भरतद्वाज ऋषी ना प्रणाम करतात. त्यानंतर श्रीराम आपला परिचय देत म्हणाले ,
     "  मी महाराज दशरथांचा पुत्र राम आपल्या श्रीचरणी प्रणाम करत आहे." तेव्हा भरतद्वाज मुनीं आशीर्वाद देत म्हणाले," यशस्वी भव , चिरंजीवी भव !" त्यानंतर श्रीराम म्हणाले ," हा माझा  छोटा भाऊ लक्ष्मण !"  तेव्हा भरतद्वाज म्हणाले," कल्याणवस्तू !" भरतद्वाज मुनीं उद्गारले. त्यानंतर सीतेचा परिचय देताना श्रीराम म्हणाले ,
    "  ही जनक नंदनी सीता आणि माझी भार्या !" त्यावर भरतद्वाज मुनींनी सीतेला  " अखंड सौभाग्यवती भव ! " असा आशीर्वाद दिला. शेवटी निषादराजचा    परिचय देत श्रीराम म्हणाले ," हा निषादांचा राजा निषादराज माझा परम मित्र आहे, वनात आमची सहाय्यता करत तो इथपर्यंत आला आहे. " तेव्हा निषादराज म्हणाला,
     "  आम्ही तर आपले सेवक आहोत मुनींवर !" तेव्हा भरतद्वाज मुनींनी आशीर्वाद देत म्हटले,"  आयुष्यमान भव ! हे रघुनंदन आमच्या आश्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आसन ग्रहण करा. " असे म्हणून ते "
सदानंद sss सदानंद " म्हणून हांक मारतात. सदानंद पाणी घेऊन आला. त्याने श्रीरामाच्या हातात पाण्याचे भांडे दिले.  श्रीरामानी प्रथम आपल्या पायावर पाणी ओतले  नंतर लक्ष्मणाने आपल्या पायावर पाणी ओतले. त्यानंतर सीतेने देखील ते पाणी आपल्या पायावर  ओतले नि शेवटी निषादराज ने ते पाणी आपल्या पायावर  ओतले. त्यानंतर सदानंद  पाण्याचे भांडे घेऊन गेले.
तेव्हा भरतद्वाज म्हणाले ," या रघुनंदन आसन ग्रहण करा." त्यानंतर सर्वांनी आसन ग्रहण केले. परंतु निषादराज खाली जमिनीवर बसला. ते पाहून महर्षी भरतद्वाज ऋषी म्हणाले ," हे काय निषादराज तू रघुनंदन चा मित्र आहेस नि  जमिनीवर का बसला आहेस ? श्रीराम सोबत आसन वर बैस !"
     " नाही मुनिराज मी नीच जातीचा आहे . एकदम छोटा
मनुष्य !" त्यावर  महर्षी भरतद्वाज म्हणाले ," स्वतःला छोटा समजणे हाच सर्वात मोठा मोठेपणा आहे. आणि तू प्रभूचा मित्र असताना स्वतःला नीच का म्हणवितोस. राहिली गोष्ट नीच होण्याची तर  रघुनंदन ने कोणालाही नीच राहूच दिलं नाही. आणि जो प्रभूला प्रिय आहे, तो हरिजन  म्हणजे हरीच्या जवळ असलेला. अर्थात त्याचीच जात जास्त उच्च समजली जाते. म्हणून तू स्वत:ला नीच न समजता रघुनंदन च्या बाजूचे आसन ग्रहण कर." तसा निषादराज म्हणाला," धन्यवाद !" असे म्हणून निषादराज श्रीरामाच्या बाजूला बसला. तेव्हा भरतद्वाज मुनी म्हणाले ," रघुनंदन ब्रम्हर्षी विश्वामित्राच्या आश्रमात आपले साहस नि आपण केलेला पराक्रम ऐकल्या नंतर आम्हाला तुमच्या दर्शनाची ओढ लागली. ए महावीर आमच्या आश्रमात आपले आतिथ्थ स्वीकार  केल्यामुळे आम्हाला अलौकिक आनंदाची अनुभती होत आहे. आमच्या समस्त जीवनाची तपस्या आणि साधना सफल झाली आहे . जसे  की आमच्या संपूर्ण जीवनाचे सारे पुण्य आणि केलेल्या साऱ्या तपस्यांचे फळ एकदम  मिळत आहे." श्रीराम म्हणाले ," मुनींवर आपण ज्याचा आदर करता त्या व्यक्तीला काही करावेच लागत नाही. तो आपोआप मोठा होतो. आपल्या केवळ दर्शनाने मनुष्याचे दुःख दूर होते."
    " धन्य आहेस राम !  बस आम्हाला एकाच गोष्टीचे दुःख
आहे आणि ते म्हणजे आमचे परम मित्र महाराज दशरथाने तुझा काही एक अपराध नसताना वनवास का दिला ?"
    " आपण तर त्रिकालदर्शी आहात. सर्वज्ञ आहात. आपल्या पासून काय लपले आहे ? महाराजांनी मला
वनवास देऊन माझ्यावर फार उपकार केले आहेत. नाहीतर आपल्या सारख्या महान तपस्वीव्याचे दर्शन कसे प्राप्त झाले असते."
    " हे पुरुषोत्तम आपल्या  मर्यादा नुसार अनुकूल भाव आहेत. परंतु विना कोणत्या अपराध शिवाय वनवास भोगणे हा विचार आमचे हृदय अत्यन्त व्याकुळ करत आहे. "
    " विश्वास करा ऋषींवर मी अगदी खरं तेच सांगतोय. की मी एकदम खुश आहे इथं शिवाय आपल्या सारख्या ऋषीमुनीं आणि तपस्वीचे दर्शन प्राप्त झाले. तसेच सत्यकाम आणि दुरबलांची सेवा करण्याचा अवसर मिळाला."
     " धन्य हो रघुनंदन धन्य हो ! आपले आत्मबल आणि
आपला आत्मविश्वास आम्हा तपस्वी पेक्षा जास्त आहे. पितृ च्या आज्ञा ने वनवास पत्करला. तुझा हा आदर्श
आर्य लोकांमध्ये अनंत काळ पर्यत तसाच राहील .एक
ज्वलंत दीप बनून राहील. वत्स गंगा आणि जमुना च्या
काठावर वसलेले हे पवित्र स्थान आहे. आपल्यासाठी एकदम योग्य आहे. आता आपण लक्ष्मण , सीता सोबत ह्याच आश्रमात राहू शकता."
    " इथं निवास करणे आमच्यासाठी अनुकूल असणार नाही."
    " का वत्स ? तीर्थ प्रयाग राज पावन भूमी मध्ये
निवास करणे  कोणती आपत्ती आहे ?"
     " अयोध्येची सीमा इथून जवळच आहे अयोध्या वाशियाना जर समजलं की आम्ही इथं आहोत तर त्यांची रांगच लागेल." आपल्या आश्रमाची शांतता पण भंग पावेल नि आमचा उद्देश पण पूर्ण होणार नाही. म्हणून आम्हाला एखादे एकांतवासाचे  स्थान सूचवा."
     " इकडून दहा कोस दूर एक चित्रकूट नावाचा पर्वत
आहे. मोठे रमनिय स्थान आहे. तिथं पण साधू आणि
ऋषीमुनी तपस्या करत असतात. ते स्थान तुमच्या साठी
उपयुक्त ठरेल."
    " चित्रकूट ला जाण्यासाठी मार्ग कोठून आहे, तेवढे
फक्त सांगा ऋषींवर."
     " राम तू ज्या मार्गांनी जाशील तो मार्ग तुझ्यासाठी सुलभ असेल. परंतु तुला जमुना पार करावी लागेल.
हां पण तिथं कोणी नाव पार करणारा मिळणार नाही.
निषादराज तुझ्या सोबत आहे ह्याच्या मदतीने बांबूच्या
काट्यांचा एक तराफा बनवा नि त्यात बसून नदी पार
करा. काही अंतर चालून गेल्यावर एक वटवृक्ष दिसेल
त्या वृक्षाच्या सावलीमध्ये अनेक सिध्द पुरुष पूजा मध्ये लिन आहेत.त्याना प्रणाम करायला विसरू नकोस . तेथूनच तुला चित्रकूट पर्वताचा पत्ता मिळेल. राम तुझा वनवास जगासाठी कल्याणकारी असेल. आणि मी आपल्या पिताश्री प्रमाणे इथून सदैव तुझ्या यशाची कामना करीन."
    " जशी आपली आज्ञा  !" असे म्हणून त्यांना हात जोडून प्रणाम केला नि लक्ष्मण सीता सहित पुढच्या
प्रवासाला लागले. महर्षी भरतद्वाजच्या सांगण्यानुसार
ते यमुनेच्या तटावर पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर
निषादराजच्या मदतीने बाबूंच्या काठ्यांचा तराफा
बनविला. तेव्हा लक्ष्मणाने श्रीरामाचा नि स्वतःचा धनुष्यबाण आणि बाणाचे तुनीर तराफ्यात नेऊन ठेवले.
निषादराज पाण्यातून बाहेर येत  तो श्रीरामांना  म्हणाला ,
      " हा घ्या आपला तराफा तयार आहे फक्त त्यात बसून नदी पार करायची आहे."
     " निषादराज तू आमची फार मदत केली आहेस मित्र
त्याबद्दल आम्ही आपले सदैव कृतज्ञ राहू. आम्ही या
तराफ्यात बसून नदी पार करू आणि तू इथून परत
जायचे आहे."
     " मला परत पाठवू नका. मी आपल्या सोबत येतो."
     " निषादराज तू मला वचन दिले होतेस की तुला सांगेन
तेव्हा तू मागे परतशील."
     " हां मान्य आहे मला. परंतु अजून यमुना पार केलेली
नाही. शिवाय पुढे अजून खडतर प्रवास आहे."
    " माहितेय मला अडचणी तर पावलापावलावर मिळतील. परंतु आमचे स्थान निश्चित झाले आहे. आणि
तुला सुद्धा आपल्या राज्य पासून फार दिवस दूर राहायला
नाही पाहिजे. आणि आता जाता जाता ना सुद्धा मी
तुझ्यावर एक उत्तरदायित्व सोपवत आहोत." निषादराज
आपली मान होकारार्थी हलवितो. तेव्हा श्रीराम पुढे
म्हणाले ," भरत ने आताच राजा बनला आहे. तेव्हा राज्य
कारभार सांभाळायला थोडा वेळ तर लागेलच. तेव्हा तुझे राज्य कौशल देशाच्या सीमेवर आहे. जोपर्यंत भरत राज्य कारभार पूर्ण पणे सांभाळत नाही तोपर्यंत तू सीमेची रक्षा कर." त्यावर निषादराज म्हणाला ," आपण त्याची अजिबात चिंता करू नका. मी आपल्याला वचन देतो.
आम्हां निषाद वीरांच्या मृत शरीरावरुनच सीमा पार
करावी लागेल. हे माझे वचन आहे आपल्याला." तेव्हा
श्रीराम म्हणाले ," अच्छा मित्र आता निरोप घेण्याची वेळ आली आहे."असे म्हणून निषादराज आलिंगन दिले.
त्यानंतर निषादराज ने त्या दोघांचे चरणस्पर्श केले.
आणि मग श्रीराम आणि सीता त्या तराफ्यात स्वार झाली.
त्यानंतर निषादराज आणि लक्ष्मण या दोघांनी तराफ्याला
नदीत लोटले नि लक्ष्मण चटकन त्यात स्वार झाला. नि
मग लक्ष्मणाने पतवार हातात घेतली नि टेकट नदी पार
केली. तेव्हा निषादराज ने आपला हात हलवून त्या
तिघाना निरोप दिला नि नदीला वंदन करून मागे परतला.
किनाऱ्यावर पोहोचताच ते सर्वजण तराफ्यात तुन
खाली उतरले नि पुढच्या प्रवास आरंभ केला. राना-वनातून आणि काट्याकुट्यातून मार्ग काढत निघाले.

     क्रमशः


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.