रामायण भाग १९ | Ramayana episode 19 | Author : Mahendranath Prabhu.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रामायण भाग १९ | Ramayana episode 19 | Author : Mahendranath Prabhu. |
निषादराज लक्ष्मण ला म्हणाला ," धन्य आहे तू आणि
धन्य आहे तुझी माता जिने तुझ्या सारख्या करमवीर
पुत्राला जन्म दिला. माझं तर हृदय फाटत आहे हे सारे
ऐकून. कुठे ते चक्रवर्ती राजा दशरथ आणि मिथिला नरेश जनक नदंनीं सीता आणि लक्ष्मण सारखा दीर एका
चक्रवर्ती राजाचे पुत्र आज वनात भटकत आहेत. गवताच्या बिछान्यावर झोपत आहेत. आपल्या सारख्या
लोका सोबत असं घडू शकतं तर आम्ही तर एकदम
सामान्य आहोत. आमचे काय हाल होतील याची कल्पना
देखील करता येत नाही. हाय रे महाराणी कैकेयी हा तू
काय अनर्थ करून बसलीस ? " तेव्हा लक्ष्मण म्हणाला,
" मित्र कोणालाही दोष देणे योग्य नाहीये. कारण भाग्यात जे लिहिलं असतं मनुष्या सोबत तेच घडतं."
" नाही लक्ष्मण दादा आम्हाला नाही कळत या साऱ्या
गोष्टी ! आम्ही कदापि माफ नाही करणार महाराणी कैकेयीला." त्यावर लक्ष्मण काहीच बोलला नाही.
सकाळ होताच श्रीराम नदीत स्थान करून पूर्वेकडे
तोंड सुरदेवला ओंजळीने पुष्प वाहतात. आणि लक्ष्मण श्रीरामाच्या पादुका ना आपल्या शेलाने पुसून ठेविले.
तेवढ्यात निषादराज आपल्या काही माणसा सोबत तेथे हजर होतात. नि श्रीरामाचे चरणस्पर्श करतात.तेव्हा श्रीराम म्हणाले ," मित्र अगदी वेळेवर आलास बघ. "
" प्रभू हा काय अवतार केलाय स्वतःचा म्हणजे मुनी
सारखे केस बांधले आहेत."
" मित्र वनात मुनिधारी बनून राहायचं आहे तर मुनीला
शोभणारा वेश परिधान करायला पाहिजे. आता आम्ही
गंगा पार करणार आहोत. आणि तिथून पुढे पायी चालत
जाणार आहोत." तेव्हा निषादराज म्हणाला," पुढे जाणे
गरजेचे आहे का ? नाही म्हणजे इथं पण तर वन प्रदेश
आहे.एक वेळ या दास च्या म्हणण्यावर विचार करून
पहा. हे राज्य आपलं आहे नि हा दास पण आपला आहे
चौदा वर्षे इथल्या वनात रहा नि या दासाला आपली सेवा
करण्याची संधी द्या. " त्यावर श्रीराम म्हणाले ," निषादराज
तू आमचा मित्र आहेस ना, मग मित्रांचे हे कर्तव्य आहे की
त्याने आपल्या मित्राला मदत करावी. आमचा मार्ग
अडवून आमच्या कार्यात अडसर निर्माण करू नये. आपल्या भावनेला थांबवा. नि आम्हाला पुढे जाण्याची
परवानगी द्या. कर्तव्य भावना पेक्षा फार मोठे असते."
तेव्हा निषादराज उद्गारला ," ही मोठी मोठी वाक्य
आम्हाला कळत नाहीत. आम्हाला फक्त इतकंच माहीत
आहे की प्रेमा पेक्षा काहीच मोठे नाहीये. आमचे फक्त
आपल्यावर प्रेम आहे दुसरे काही नाही."
" मग आज तुला त्या प्रेमाची शपथ आहे की आम्हाला
पुढचा मार्ग गमन करू दे." त्यावर पुढे काय बोलणार
बिच्चारा निषादराज तो फक्त इतकंच म्हणाला," जर
आपण प्रेमाची शपथ घातली तर पुढे काय बोलणार आम्ही ! फक्त इतकंच बोलू शकतो आणि ते म्हणजे
जशी आपली इच्छा !" तेव्हा श्रीराम म्हणाले," नावाड्यला
सांगून एका नावेची सोय करा आणि आम्हाला गंगा पार
करायची आहे. तेवढी आमच्यावर कृपा करा मित्र !"
" कृपा करा असे नका म्हणू ! कारण मित्रावर कृपा
केली जात नाही. तर जे काय करायचं असतं ते आपले
कर्तव्य आहे असे समजून करायचं असतं."
" मी आपला सेवक आहे तेव्हा चिंता करण्याची
काही गरज नाही. गंगा पार करण्यासाठी नावेची सोय केली जाईल. मी आताच जातो नि बंदोबस्त करून येतो."
असे म्हणून तो तेथून चालता झाला. तेव्हा आर्यसुमन्त
म्हणाले ," नावेची काय गरज आहे रथ आहे.जिकडे
पण जायचं आहे तिकडे रथातून जाऊ !"
" नाही आर्यसुमन्त आम्ही इथून पायीच जाणार
आहोत. आणि कृपा करून आपण रथ घेऊन परत
महाराजांच्या सेवेला जा."
" नाही रघुनंदन असा आदेश देऊ नका. आपल्या विना
अयोध्येला जाऊन करू काय ? त्यापेक्षा मी आपल्या
सोबत येतो. गंगा पार केल्यावर जिथं आपण जाऊ
इच्छिता तिकडे चला. मी आपली सेवा करीन आणि
मला जंगलाची चांगली माहिती सुध्दा आहे. मी जंगलात
जाऊन लाकडे गोळा करून येईन." तेव्हा श्रीराम म्हणाले,
" आर्यसुमन्त आपण केवळ पिताश्री चे मंत्री नाहीतर
मित्र सुध्दा आहात. आपल्या शिवाय पिताश्रीचे सांत्वन
कोण करणार बरं ? आपण तिथं असाल तर आम्हाला
कसलीही चिंता राहणार नाही. माझ्या तर्फे पिताश्रीना
निवेदन करा की भरत ला लौकर बोलवून घ्या. आणि लौकरात लौकर त्याचा राज्यभिषेक करा. आणि भारत
म्हणावे त्याच्या दृष्टीने जे स्थान माता कैकेयी आहे तेच स्थान माता सुमित्रा आणि माता कौशल्या चे सुध्दा आहे.
म्हणून जो सन्मान माता कैकेयी ला देशील तोच सन्मान माता सुमित्रा आणि माता कौशल्या ला दे. तसेच समस्त
अयोध्या वाशी , गुरुजनाना माझ्या कडून तशीच लक्ष्मण
आणि सीता अर्थात आम्हां सर्वाचरण वंदना स्वीकार करणे , आचार्यांना म्हणावे वनवासा वरून आल्यानंतर भेट होईल."
" एवढे निर्दयी बनू नका श्रीराम जितक्या सहजपणे
आपण सर्वकाही करायला सांगितलेत ते करणे किती
कठीण आहे.खाली रथ घेऊन जाऊ का ? त्यापेक्षा गंगेच्या
काठावर अग्नी प्रवेश करणे परवडेल मला."
" आर्यसुमन्त कोणत्याही संकटाला न घाबरणारा शिवाय कठीण पेक्षा कठीण परिस्थितीतही त्या परिस्थितीवर मात करणारा उपाय शोधून काढणारा महामंत्री थोडीशी कठीण परिस्थिती काय आली तर त्या
परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायचे सोडून त्यातून पळवाट
काढणे हे कुठपर्यंत ठीक आहे, याचा विचार आपणच
करावा.आणि कृपा करून वापस अयोध्येला जावे नि
आपल्या बुद्धिनुसार पुढील कार्य करणे की ज्यामुळे
पिताश्री का सुख मिळेल आणि माता कैकेयी ला सुख
आणि शांती मिळेल." श्रीराम उद्गारले.
" माता कैकेयी ला सुख आणि संतोष मिळेल." त्यावर
लक्ष्मण कुत्सित पणे म्हणाला ," माता कैकेयीच्या सुख
आणि संतोष बद्दल कोणाला काही विचार करण्याची
गरज नाहीये. आपले सुख आणि स्वार्थ मिळविण्यासाठी
ती कोणत्याही थराला जाईल. आर्यसुमन्त त्याना जाऊन
सांगा की आपल्या प्रिय भरतला राजगादीवर बसून ऐश्वर्य
सुख भोगावे."
" लक्ष्मण पुन्हा तीच दृष्टता !"
" क्षमा करा दादा !"
" आर्यसुमन्त , लक्ष्मणाच्या. पोरकट भाषे विषयी
तिथं कोणालाही काही सांगू नका. हीच माझी आपणास
शपथ आहे." तेव्हा आर्यसुमन्त म्हणाला ," महाराजानी
एक विशेष रूपात संदेश दिला होता की जर राम लक्ष्मण
येत नसतील तर देवी सीताला सोबत जरूर आणावे. त्यांनी हे पण सांगितले होते की सीता दोन चार वनातील
कष्ट पाहिल्यानंतर तिने परत अयोध्येला यावे कोणासाठी
नाही माझ्यासाठी तरी यावे. आणि महाराजानी हेही
सांगितले होते की राम गेल्यानंतर माझा नि कैशाल्याचा
कोणी सहारा नाहीये.जर आपण मला वापस पाठविताहेत
तर निदान जानकी ला तरी माझ्या सोबत पाठवा." त्यावर
श्रीराम म्हणाले ," अवश्य ! जानकी परत जात असेल तर
मला आनंदच होईल."
" आर्य sss "
" हां सीते इथपर्यंत आल्यानंतर इकडील परिस्थितीची
जाणीव झालीच असेल तुला.आता तू घरी परतलीस तर
समस्त परिवारातील म्हणचे सासू- सासरा आणि इतर प्रिय जणांची चिंता मिटेल.सासू-सासऱ्यांची तुला सेवा केलीस
तर मला फार आनंद होईल.म्हणून तू आर्यसुमन्त घरी
परतावे हेच योग्य आहे. सीते एक माझं."
" स्वामी मी आपली सावली आहे माझं स्वतःचं काही
अस्तित्व नाही. जर आपण आपल्या शरीराच्या सावलीला
आपल्या पासून वेगळे करू शकाल तर मला ही परत
पाठवून द्या."
" जानकी स्त्री तर अनेक नात्यांमध्ये वाटलेली आहे,
जसे की बहीण, कन्या, माता या नात्यामध्ये वाटलेली
आहे. अर्थात बाकीच्या नात्या कडे पाठ फिरविणे
कुठपर्यंत योग्य आहे ?"
" आर्य आपण सुद्धा मला पित्या समान आहात. पण
तरी देखील मी आपणास उत्तर देत आहे, त्याबद्दल मला
क्षमा असावी. एक स्त्री ची सारी नाती सारे संगेसबंधी
असले तरी स्त्री चा खरा आधार स्तंभ तिचा पती आहे.
हीच शिकवण माझ्या आईने दिली होती आणि तीच शिकवण माझ्या प्रिय आणि पूज्य सासू नि दिली आहे
नि सांगितले आहे की जशी साथ सुखात दिली तशीच
साथ दुखात दे असे सांगून त्यांनी मला स्वामी सोबत
पाठविले आहे."
" आर्यसुमन्त सीतेला परत घेऊन जाण्याचा विचार
त्यागावा लागेल नि रथ घेऊन अयोध्येला परतावे लागेल."
" हां आर्यसुमन्त जोपर्यंत आपण रथ घेऊन अयोध्येला
परत नाही तोपर्यंत देवी कैकेयी ला चिंता लागून राहील
की आम्ही परत तर येणार नाही ना ?"लक्ष्मण उद्गारला
" आर्य आपल्याला वापस आलेले पाहून माता कैकेयी
ला विश्वास होईल की राम खरंच वनवासाला गेला मग
ती पिताश्री वर मिथ्या आरोप करायचे सोडून देईल.म्हणून
आता जास्त विलंब न करता ताबडतोब अयोध्येला परतावे." श्रीराम म्हणाले.
" जशी आपली आज्ञा ! मी लगेच अयोध्या कडे प्रस्तान
करतो." तेवढ्यातच तेथे निषादराज नि म्हणाला,"
सरकार गंगा पार करण्यासाठी नावेचा बंदोबस्त झाला.
चला आता !"
" ठीक आहे." श्रीराम उद्गारले.तेव्हा लक्ष्मण त्याच्या
पादुका त्यांच्या श्रीचरणा जवळ ठेवले.तेव्हा श्रीराम
म्हणाले ," आता त्या विलासाची पण गरज नाही.इथून
पुढचा प्रवास नग्न पायांनी करणार आहे." मग लक्ष्मणाने
स्वतःचे नि श्रीरामाचे पादुका उचलून ठेवल्या. तेव्हा
निषादराज म्हणाला ," हे काय केलं नग्न पायांनी
प्रवास आपल्याला कल्पना नाहीये नग्न पायांनी
चालणे फार कठीण आहे , ठीक ठिकाणी दगड धोंडे काटे
कुटे सापडतील, त्या काट्याकुट्यातून कसे चालणार तुम्ही
काटे टोचतील पाय रक्तबंबाळ होतील."
" निषादराज त्याची चिंता करू नका.बालपणी आश्रमात शिकविले आहे गुरुदेवांनी. लक्ष्मण तुला
आठवते काय गुरुदेव काय म्हणाले ते." असे म्हणताच
तोच प्रसंग डोळ्यासमोर दिसला. गुरुदेव म्हणाले होते
की आज तुम्ही राजा आहात.पण कधी वनात जावे लागले
तर वनात अनेक समस्या ना तोंड द्यावे लागेल.म्हणजे
पायाला रस्त्यावरील दगडाचे बारीक तुकडे काट्या प्रमाणे
पायाला टोचू लागतात शिवाय वनात काटे-कुटे असतात.
ते सुध्दा पायाला टोचू शकतात म्हनुष्याने सर्व प्रकारची
तयारी ठेवली पाहिजे. गुरुदेव त्रिकालदर्शी आहेत त्याना
ठाऊक होते की पुढे काय होणार आहे ते. "
" जर गुरुदेवांना पुढे काय होणार आहे माहीत होते
तर त्यांनी हे होण्यापासून रोखले का नाही ?"
" नाही रोखू शकत कोणीही कारण धर्माची गती पार
न्यारी आहे ! तो प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडवून आणतात.
तेव्हा आता आम्हाला वनात प्रस्थान करण्याची अनुमती
द्या. आर्यसुमन्त आता आपण ही निरोप घ्या." तेव्हा
आर्यसुमन्त म्हणाले ," आपली कीर्ती सर्वत्र पसरेल."
त्यानंतर श्रीराम लक्ष्मण आणि सीता निषादराज सोबत
निघून गेले. आर्यसुमन्त मात्र ते गेलेल्या दिशेकडे पहात
होता.जोपर्यंत ते लोक त्यांच्या नजरे समोरून दूर जात
तोपर्यंत ते तिथंच उभे राहिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा