छत्रपती शिवाजी महाराज ४० | chhatrapati shivaji maharaj episode 40 | Author :- Mahendranath prabhu
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज ४० | chhatrapati shivaji maharaj episode 40 | Author :- Mahendranath prabhu |
शहाजी राजे म्हणाले," आम्ही हे निश्चित च करू, परंतु या वाटेत दुश्मन खूप आहेत आणि आता ते आणखीन वाढतील."
" म्हणजे अजून कोण दुश्मन झाले आहेत."
" बाहेरचे तर होतेच पण आता आतले देखील वाढतील.
भर दरबार बादशहा ने आमचा केलेला सत्कार कित्येक जणांना
आवडलेला नाहीये. त्यात आमचे घरचे ही आहेत नि बाहेरचे ही
म्हणून सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे."
पुढे
मंबाजी राजे आपल्या बंधू ला म्हणजेच खेलोजी राजे ना
शहाजी राजा विरुध्द भडकवण्याचा काम करतात. भातवडीच्या
मोहीमेत आपण पण पराक्रम केला होता ना, मग सारे श्रेय
शहाजी राजांनाच का दिलं गेलं ?" त्यावर खेलोजी राजे
उद्गारले," आम्हाला ही तेच कळत नाही. आम्हाला का नाही
श्रेय दिलं गेलं ? आम्हाला तो आमचा अपमान वाटला." मंबाजी
राजे अजुन आगीत तेल ओतत म्हणाले," मला काय वाटतं
माहितेय शहाजी राजांनीच काहीतरी डाव खेळला असावा."
खेलोजी राजांनी न समजून विचारले ," म्हणजे ?"
" म्हणजे शहाजी राजांनी कोणाला तरी लालच दाखवून
बादशहाचे कान भरले असावेत.कारण शहाजी राजे दिसतात
तसे नाहीत बरं का ? "
" आम्हाला नाही वाटत तसं."
" नाहीच वाटणार , आमच्या वर कधी कुणी विश्वास
ठेवलाच नाही. अगोदर संभाजी दादा साहेब तेच करत होते
आणि आपण ही तेच करताय ? पण कुणाला कळत नाही
आम्ही म्हणतोय त्यात किती तत्य आहे ते. आता तुम्हीच
विचार करा ना, शहाजी राजांनी शरीफ जी राजांचे चे नाव
आवर्जून घेतले पण आपल्या कुणाचे घेतले का ? नाही ना ? त्यावरूनच समजायचं खरं काय आहे ते." मंबाजी राजे म्हणाले, खेलोजी राजे विचारले ," मग आता काय करायचं ?"
" आपण फतेह खान कडे तशी तक्रार करू."
" त्या फतेह खान कडे अजिबात नको. फतेह खान चा अगोदरच शहाजी राजे वर राग आहे . त्या पेक्षा आपण आपल्या
तच पाहायचं."
मलिक अंबर दालन , दौलताबाद
शहाजी राजे शाहजी राजे हमेशा कहते रहते थे, कभी थकते
नहीं थे. देखा ना उन्होंने कैसा खेल खेला उन्होंने जो सम्मान आपको मिलना चाहिए था वो शाहजी राजा को मिला क्योंकि योजना तो आपकी थी सिर्फ तालाब का बांध हो तो शहाजी ने तोड़ा ।" तेव्हा मलिक म्हणाला," यह काम तो मैंने तुम्हे सौपा था अगर वो काम आप कर लेते तो आज तुम्हारा नाम होता, लेकिन नहीं तुम्हे तो मौत का डर लगा । बेटा फतेह खान जो जान की बाज़ी लगाते है, उन्हे जांबाज कहा जाता है और वो काम शाहजी राजे ने कर दिखाया इसलिए बादशहा हजरत ने उन्हें नवाजा है ।" तसा फतेह खान भडकला म्हणाला,"आप अभी भी उनकी तारीफ में लगे है ."
" मैं उनकी तारीफ नहीं कर रहा हूं, बल्कि हाकीगत बयान
कर रहा हूं । खैर वो बात छोड़िए तुमने कुछ सोचा है वो हमे बताओ क्या सोचा है ?"
" अब्बा हुजूर आप अब तक कुछ कर न पाए लेकिन हमने
फांसा फेंका भी ।"
" ऐसा क्या किया तुमने ?"
" हमने उनके परिवार के एक सदस्य को बुलाया ."
" किसे ? मंबाजी राजे को ? वो तो तुम्हे से भी कमजोर
कड़ी है ।"
" अब्बा हुजूर हर बात में आप हमे क्यों घसीट ते है ? वो
एक कमजोर कड़ी है, यह हम भी जानते है, इसलिए हमने
खेलोजी राजे को बुलाया है। जो तरीका बादशहा हजरत ने
अपनाया था वही तरीका हम भी अपनाएंगे ।"
" अच्छा कैसे ?"
" भातवड़ी की जंग में जैसे सारे दांव पेच आपने तय किए
थे दुश्मन को तालाब तक लाने की तरकीब भी आपकी थी
शाहजी राजे ने तो सिर्फ तालाब का बांध तोड़ दिया था।"
" ये काम तो हम ने आपको सौंपा था अगर आप हमारी
बात मान लेते तो...?"
" अब्बा हुजूर फिर आप हम पर आ रहे है, बात भातवडी
हो रही है, सबकुछ आपने तय किया था फिर भी एक मामूली
सा सरदार फिर भी बादशाह ने उसे नवाजा है,इसलिए अब
देखते है, आगे से वो इस तख्त से सिर्फ जलील होंगे और हमेशा
जलील होते रहेंगे।"
भोसले गढ़ी , वेरुळ
इतक्यात एक पठाण खलीता घेऊन आला. खलीता खेलोजी राजांच्या नावाने असल्याने खेलोजी राजांनी तो खलीता घेतला. वाचून पाहिला तेव्हा मंबाजी राजांनी विचारले," कोणाचे आहे फर्मान.?" तेव्हा खेलोजी राजे म्हणाले," आम्हाला फतेह खान ने बोलविले आहे." त्यावर मंबाजी राजे म्हणाले," पाहिलंत मी काय म्हणालो होतो की फतेह खान सुध्दा शहाजी राजांना सारे श्रेय दिलं म्हणून नाराज आहे.चला आपण दोघेही जाऊ ." त्यावर खेलोजी राजे म्हणाले की, आपण नाही फक्त आम्ही जाणार आहोत,कारण त्यांनी आम्हाला एकट्यालाच बोलविले आहे." इतक्यात तेथे शहाजी राजे आले. त्यांनी विचारले की काय भानगड आहे." तर खेलोजी राजे म्हणाले," आम्हाला एकट्यालाच फतेह खान ने बोलविले आहे." त्यावर शहाजी राजे म्हणाले," तुम्हाला एकट्यालाच बोलविले म्हणजे काहीतरी गडबड आहे असं वाटतं आम्हाला, म्हणून आम्ही ही येतो
तुमच्या सोबत."
" पण आम्हाला एकट्यालाच बोलविले आहे."
" संभाजी दादा साहेब असते तर तेच आले असते तुमच्या
सोबत. आता ते नाही आहेत तर आमची जबाबदारी आहे. कारण ते आमच्या सोबत आले होते केवळ आमच्या बरोबर
काही विपरीत घडू नये म्हणून.म्हणून आम्हाला जी वाटतं की
आम्हाला तुमच्या सोबत यायला हवं "
मलिक अंबर चे दालन , दौलताबाद
खेलोजी राजे सोबत शहाजी राजे दौलताबाद ला गेले. तेव्हा
त्यांना पाहून मलिक अंबर ने आपल्या मुलास विचारले की , क्या
यही थी तुम्हारी तरकीब ? शहाजी राजे को क्यों बुलाया ?"
तेव्हा फतेह खान म्हणाला," हम ने तो उनको नहीं बुलाया वो खुद आए है । लेकिन बहुत जल्द उनको यहां आने का अफसोस रहेगा ।" मालिक अंबर ने कहा की, उन्हे अनदेखा कर लो !" तेव्हा फतेह खान उद्गारला की, अब आए है तो जलील होकर ही जायेंगे ।" आणि शहाजी राजांची कुणी दाख्खल ही घेतली नाही तिथं आल्याची.खरे सांगायचं तर हे शहाजी
राजांच्या मनाला फार लागलं. पण ते काहीच बोलले नाहीत.
पुढे काय घडतं ते फक्त नि फक्त पाहत राहिले. मालिक अंबर ने
खेलोजी राजांचे स्वागत केले आणि पुढं म्हणाले," हमारे बेटे आपके लिए कुछ करना चाहा है।" खेलोजी राजे ने कहा
शुक्रिया हमारे बारे में इतना सोच ने के लिए ।" तेव्हा फतेह खान
शहाजी राजांना टोमणा मारत म्हणाला," हमारे अब्बा हुजूर
कुछ लोगों के लिए बहुत ही सोचा करते थे लेकिन अब उन्हें
उसका अफसोस है , इसलिए अब्बा हुजूर ने आपके लिए भी
अब कुछ सोचा है । क्योंकि भातवड़ी जंग में आपने साबित कर दिया था की आप एक जांबाज सिपा सालार है । इसलिए अब्बा हुजुर आप पर एक जिम्मेदारी सौंप ना चाहते है। " खेलोजी राजे म्हणाले ," जी हमारे लिए इतना सोचना भी काफी है।" तेव्हा मलिक अंबर म्हणाला," इब्राहिम आदिलशहा बसाये हुए नवरसपुर पर हमला बोलना है और साथ में सोलापुर में किला भी हासिल करना है ."
" भातवडी में आप ने जो हूनर दिखा दिया उस मुकाबले में
यह तो कुछ भी नहीं है, है ना अब्बा हुजूर ?"
" अपने आपको साबित करो बादशाह हजरत आपको भी
नवाजंगे ।" मालिक अंबर बोलला.
" गुस्ताखी की माफी चाहते है वजीरे आलम जी लेकीन हम
आपसे पूछना चाहते है की, हम से ऐसी भी क्या खता हुई की आप हमारी तरफ देख भी नहीं रहे है।" त्यावर मलिक अंबर ने
जे उत्तर दिले.ते शहाजी राजांच्या स्वाभिमानाला घायाळ करणारे
होते.मलिक अंबर काय म्हणाले ते पहा. " मेहमान नवाजी का शौक बीन बुलाए मेहमान के साथ कोई नहीं रखता ." मालिक अंबर ने असे म्हटले. त्यावर सर्वांनी.खो खो करून हसले.जणू काही शहाजी राजांची थट्टा केली जात होती. त्यांना साथ मलिक अंबर पण देवू इच्छित होता. परंतु मलिक अंबर ची तब्बेत खराब
त्याला हसता ही येत नव्हते.म्हणजे त्रास होत होता. ओठातून
हास्य बाहेर पडत नव्हते. त्याला साधं हसता ही येत नव्हतं.
एक हाताचा कोपर खाली टेकून बोलण्याचा प्रयत्न करत होता.
फतेह खान मात्र शहाजी राजांचा अपमान करण्याची मिळालेली संधि सोडू इच्छित नव्हता. म्हणूनच की काय तो पुढे म्हणाला की, मुझे लगा की मुसीबत, आदिलशाही और मुगल यह तिनो बीन बुलाए मेहमान हो सकते है, लेकिन आज पता चला की शाहजी राजे भी बीन बुलाए मेहमान हो सकते है। ह्या वक्तव्यावर दरबारातील सारे सरदार खो खो करून हसले.त्यात
खंडागळे सरदार पण होते. शहाजी राजांना मेल्याहून मेल्या
सारखे झाले. पण मुकाट्याने सारे सहन केले.
भोसले गढी ,वेरुळ
बाळ राजे गोदा कडे खरी तलवार मागत असतात. तेव्हा
तिथं जिजाबाई आल्या नि विचारले," बाळ राजे काय चालले
आहे ?" तेव्हा गोदा म्हणाली," खेळातली तलवार तोडून झाली
आता खरोखर ची तलवार पाहिजे त्यांना ."असे म्हणताच जिजाबाईंना स्वतः च्या बालपणीचा प्रसंग आठवला. त्यांनी सुध्दा आपल्या आबा साहेबांकडे खरी तलवार मागितली होती. तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहायला.तसे त्या स्मित हास्य करत म्हणाल्या," बाळ राजे, आम्ही तुम्हाला लवकरच देवू हो खरी तलवार. पण बाळ राजे दौलत सांभाळायला फक्त तलवार चालवून चालत नाही तर कारभार पण सांभाळता आला पाहिजे
तसेच न्याय पण करता आला पाहिजे." त्याच क्षणी तिथे मंबाजी राजे आले आणि त्यांनी ते ऐकले की जिजाबाई बाळ राजांना दौलत सांभाळण्या विषयी जे माहिती देत आहेत.त्यांना
त्या गोष्टीचा राग आला. म्हणूनच की काय ते म्हणाले," शिकवा त्यांना पण , म्हणजे आम्हाला इथल्या सदरेवर जाण्याची
सोय पण ठेवू नका.आम्ही कोठे दिसू नये अशी आपल्या सर्वाची
इच्छा आहे." तेव्हा जिजाबाईंनी हाताची खुण करत बजावले
की बोलायचे थांबा. त्यानंतर त्यांनी गोदा ला फर्मावले की बाळ
राजांना इथून घेऊन जा म्हणून. त्या प्रमाणे गोदा बाळ राजांना तेथून घेऊन गेली. त्यानंतर मंबाजी राजे कडे पाहत त्या म्हणाल्या," लहान मुला जवळ काय बोलायचं नि काय टाळायचं हे मोठ्यानीं ठरवायचं असतं. कारण लहान मुलं लगेच त्यांचेच अनुकरण करत असतात." असे बोलून जिजाबाई म्हणाल्या,
" आता बोला काय बोलायचे आहे ते." त्यावर मंबाजी राजे म्हणाले," आम्ही इथं कुठच दिसू नये असे तुम्हा सगळ्यांना वाटतं ना ? ना इथंसदरेवर ना बादशहा दरबारात ? आम्ही जे करू तिथं तुम्ही मोडता घालता. त्यामुळं आम्हाला कुठच मान नाही." त्यावर जिजाबाई पण राहवले नाही त्यांनी मंबाजी राजांना चांगलेच सुनावले.त्या म्हणाल्या," त्याला कारणीभूत तुम्ही स्वतः हा आहात. आम्हाला बोल लावताना जरा स्वतःकडे बघा." असे म्हटल्या मुळे मंबाजी राजे अजूनच चिडले. त्यांनी
पलट वार करत विचारले की, " याला आम्ही कसे जबाबदार सांगा बरं." त्यानंतर जिजाबाईंनी त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींचा पाढा वाचला. तो असा, " तुम्हीच तुमची कामगिरी आठवा, कारभारातील कामगिरी मोहिमे वरची कामगिरी ..... छाती ठोकून सांगता येईल अशी कोणती कामगिरी चोख पार
पाडली आहे तुम्ही ? वजीरे आलम मलिक अंबर येवो, फतेह खान येवो किंवा त्यांचा सरदार इकलाख खान येवो, ताठ मानेने कोणत्याही गोष्टीचा जवाब दिला आहे का तुम्ही ? नाही
दिला. त्यापेक्षा त्यांच्या पुढे लाळ घोटेपणा केला हा तुमचा
दोष, त्यांना नको ती सेवा पुरविली, हा तुमचा दुसरा दोष, त्यांना
आपल्या घरातील खाजगी तील गोष्ट केवळ स्वतः बद्दल
त्यांचे मत व्हावे म्हणून माहिती पुरविली. हा तुमचा तिसरा दोष, आणि सर्वात मोठा दोष तुमचा हा आहे की तुमचा सख्ख्या
मोठा भाऊ संभाजी दादा साहेब गेले. तेव्हा तुम्हाला दुःख
होण्या ऐवजी तुम्हाला ह्याची चिंता होती की, तुमचं वतन जाईल किंवा राहील ? त्या साठी मीआण राजू समोर तुम्ही टाचा
झिजविला हा तुमचा चौथा दोष , मोहीमे वर असताना दुश्मनाना तलवारीचे पाणी पाजण्या ऐवजी मोहीम अर्ध्यावरच सोडून
वजीरे आलम मीआण राजू ची भेट घेतली आणि मनसबदारीची
कागद घेऊन आलात हा तुमचा पाचवा दोष , आणखीन काय काय दाखले द्यावेत ?" तसा मंबाजी राजे चिडून म्हणाला,
" वहिनी साहेब, ही वेळ तुम्हीच आमच्यावर आणली. आता एक शब्द ही बोलू नका. आता जे काय करायचं आहे ते आमचं आम्ही पाहू पण तुम्ही हे बोल ऐकवले ते आम्ही कधीच विसरणार नाही." असे बोलून मंबाजी राजे चालते झाले. ते सरळ सोयराबाईच्या दालनात गेले नि सर्व पाढा वाचून दाखविला. मग काय सोयरांबाईंनी सर्वांना सदरेवर यायला सांगितले. तेव्हा उमाबाईनी नेहमी प्रमाणे समजूतदार पना दाखवत सर्वांना उद्देशून सांगितले की, सगळ्यांनी संयमाने वागा. आणि आपण सर्वांनी एकत्र राहण्यातच सर्वांचे हित आहे. पण ते सोयराबाईंनी ते अमान्य केले. त्या म्हणाल्या," पुन्हा पुहा तेच तेच वाद नकोत आम्हाला वाटणी करून पाहिजे." तेव्हा मंबाजी राजे म्हणाले," नाहीतरी आम्ही सारख्या चुकाच करत असतो असे वहिनी साहेब म्हणतात, आम्ही लाळ घोटण्यात धन्यता मानतो ना ? त्या पेक्षा आम्ही इथं न राहीलेलच बरं." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आम्ही असं काहीही म्हटलेले नाही.आम्ही फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होतो. आम्ही शंभू
महादेवाच्या पिंडी वरील फुल उचलून शपथ घेऊ शकतो की आम्ही वाटणी या संदर्भात काहीही बोललो नाहीये." इतक्यात गोदा सोबत तेथे बाळ राजे येतात. मंबाजी राजे म्हणाले की, उद्देश तसा नसता तर काढून दाखविलेच नसते." तेव्हा बाळ राजांनी गोदा ला विचारले की इथं मोठी माणसे भांडताहेत का ?" तेव्हा जिजाबाईंनी गोदा ला सूचित केले की त्यांना इथून घेऊन जा. त्या प्रमाणे गोदा त्याला तिकडून घेऊन गेली. तेव्हा सोयराबाई उठून उभ्या राहिल्या नि म्हणाल्या की ,वाटणी झाली की आम्ही देऊळ गावाला जाऊन राहू." असे बोलून सोयराबाई तेथून तडक निघून गेल्या. त्यांच्या पाठोपाठ मंबाजी राजे पण निघून गेले. तेव्हा उमाबाई म्हणाल्या, " एवढंच बघायचं राहिलं होतं आमच्या नशिबात." फार दुःखी झाल्या होत्या त्या.
देऊळगाव
मंबाजी राजे एकदम खुश होते. आज त्यांच्या मना सारखे
झाले होते. कारण वेगळे व्हायची त्यांनीं फार पूर्वी पासूनच
इच्छा होती.पण सोयराबाई तेव्हा तयार नव्हता. पण मंबाजी राजे अश्या संधींची वाट पाहत होते नि ती संधि आज उपलब्ध
झाली. म्हणून की काय ते खेलोजी राजांना म्हणाले," अगदी
योग्य वेळी वाटणी झाली. " तेव्हा खेलोजी म्हणाले," योग्य
वेळी म्हणजे ?" तेव्हा मंबाजी राजे स्पष्टीकरण करत मंबाजी
राजे म्हणाले," इतकी वर्षे पर्वत सारखे शहाजी राजांच्या
पाठीशी उभे असणारे मलिक अंबर त्यांच्या विरोधात उभे
राहिले म्हणून नवरसपुर ची मोहिम आणि सोलापूर ची मोहीम
तुम्हाला मिळाली. आता बादशहाची मर्जी फिरायला कितीसा
अवकाश ?" तेव्हा खेलोजी राजे म्हणाले," पण या सर्व
कारस्थान त्यांनी आपल्याला वेठीस धरले.त्या वजीरे आलम चा
काय भरवसा द्यावा ?"
" तसा भरवसा कोणाचा ही देता येत नाही.शहाजी राजांचा
तरी भरवसा देता येईल का ? नाही ना ? म्हणून म्हणतोय
झालं ते फार उत्तमच झालं. वजीरे आलम नाराज झाला आहे
उद्या बादशहा ही होईल. आपण फक्त वजीरे आलम पासून
थोडे अंतर राखून राहायला हवं. म्हणजे झालं."
" अहो, फक्त मोहिमा केल्या म्हणजे झालं नाही कारभार
पण पहायला आला पाहिजे."
" त्या साठी वहिनी साहेब आहेत ना पाहतील.नाहीतरी
त्यांना त्याची फार आवड आहे ना ?"
" पण मला तर त्यांच्या कारभारात खोट काही दिसतच
नाही."
" नाहीच दिसणार, कनवाळू पना ना ? पण एक दिवस
तो दयाळू पना त्यांना महागात पडेल. जास्त चांगले असणे
पण हिताचे ठरत नाही खेलोजी राजे." मंबाजी राजे उद्गारले.
" आता ते कुणास ठाऊक ? त्यांना जमणार नाही का आम्हाला ?"
वेरूळ
शहाजी राजे हिराजी ला सोबत घेऊन निघाले तर जिजाबाई
औक्षण करायचं असे म्हणत होत्या. पण शहाजी राजे म्हणाले,
तसे केलं तर आऊ साहेबांना कळेल. म्हणून ते सर्व बाजूला
ठेवा. आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले निघतो आम्ही कोणाला
ही सांगू नका." असे म्हणून शहाजी राजे हिराजी सोबत निघून
गेले. जिजाबाई मागे वळणार तोच समोर दत्त म्हणून उमाबाई
उभ्या होत्या. त्यांना पाहून त्या चपापल्या. आता काय उत्तर
द्यावे ते त्यांना कळत नव्हते. इतक्यात उमाबाई म्हणाल्या,
" जाताना अडवायचं नसतं म्हणून आम्ही गप्प राहिलो.
पण आम्हाला ठाऊक आहे राजे कोठे गेले ते. असे गोंधळून
जाऊ नका. राजे आमच्याच पोटी उपजलेत आम्हाला ठाऊक ते कोठे जातील ते. वाटण्या झाल्या. वाडा रिकामा झाला. पूर्वी
इथं गोकुळ नांदत होतं आता रिकाम्या घरातल्या वासे पण
अंगावर येतात. आम्हाला माहीत आहे राजे घृष्णेश्वर ला गेले आहेत आपण ही तिथंच जाऊ या." जिजाबाईंना काय बोलावे ते चटकन सुचलं नाही म्हणून त्या पटकन इतकंच म्हणाल्या," अँ ss हो जाऊ या." तश्या उमाबाई म्हणाल्या," जिजाबाई आज तुमचं मन धाऱ्यावर नाहीये असं दिसतंय नाहीतर आता पर्यंत तुमची कळी खुलली असती. हरकत नाही. गोदा ला सांगते संभाजी राजांना तयार करायला." जिजाबाई नाही म्हणू शकत नव्हत्या आणि हो पण म्हणू शकत नव्हत्या. म्हणून फक
भांबावल्या सारख्या करत होत्या. उमाबाई निघून गेल्या. शहाजी
राजांनी आऊ साहेबांना सांगण्यास मनाई केली होती.म्हणून
त्या काहीच बोलू शकल्या नाहीत.
देऊळगाव
सोयराबाई वेरुळ सोडून देऊळ गावाला गेल्या होत्या तरी
त्यांना वेरुळ लाच असल्याचे जाणवत होते म्हणून की काय
गोदावरी बाई त्यांना सांगायला आल्या की देव घराचे तुम्ही
काम पाहणार आहात ना आम्ही कोठी घरातलं काम पाहणार
आहोत. तेव्हा सोयराबाई चिडून म्हणाल्या," सर्वकाही आपणच
पाहणार आहोत की काय ? मुद पाक खाण्यात आणि देवघरात
थोरल्या बाई साहेब पाहतात. हे विसरलात काय ? आणि कोठी
घरातले काम जिजाबाई पाहतील. तसा त्यांचा हात चांगला आहे. " तेव्हा गोदा बाई म्हणाल्या," सासूबाई आपण वेरुळ
ला नाही आहोत. वाटण्या झाल्या आणि आपण देऊळ गावाला
राहायला आलोय." तश्या सोयराबाई म्हणाल्या," अरे ही खरंच
की आमच्या हे ध्यानात नाही आलं. खरं सांगू इतकी वर्षे एकत्र
राहिलो. वेरूळ वाड्याशी नि जाऊबाई शी नाते जुळले. ते काही
अजून तुटत नाही. वरून कितीही कठोर बोललो असलो तरी
तिथल्या वाड्याशी नि जाऊबाई शी आमचं नातं आहे."
इकलाख खान ला खबर मिळाली की मंबाजी राजे नि
शहाजी राजे एकत्र राहात नाहीत. तेव्हा संधि बरी आहे, असा
विचार करून फकिराचा वेष धारण करून तो भोसले वाड्यात
त्याच्या सोबत अजून दोन साथीदार होते. तो आला नि गोमाजी
च्या डोक्यावर मोरपीस फरवून म्हणाला की, पाने की जो चाहत
हो, वही हमारी किस्मत हो, बरसो पहले भी हमारे सिने में आग
लगी है,वही कयामत तक जिंदा हो, हमारे सिने भी बरसो पहले
आग लगी थी वह कयामत तक जिंदा रहेगी । लगेच दूसरा
फकीर वेशातील त्याचा साथीदार म्हणाला," आए लाख तूफान हौसले टूटते है, मंझील को याद कर हौसले बुलंद कर. " तेव्हा
गोमाजी त्याला दम देत म्हणाला," ए दिवसभर मोठ्याने ओरडुन तुझं नरडे दुखत नाही का ? आणि आंत कसा आलास ? चल निघ. तिथं बाहेर जाऊन थांब." तेव्हा तिथं जिजाबाई म्हणाल्या, " गोमाजी काका त्यांना काही दिल्या शिवाय माघारी पाठवू नका.मी गोदा ला सांगते." असे बोलून त्या गोदा ला हाक मारली . तशी गोदा तेथे आली. तश्या जिजाबाई तिला त्या फकीराना काहीतरी वाढायला सांगतात. तेव्हा गोमाजी त्या तिघांना बाहेर जाऊन बसायला सांगतो.त्या
प्रमाणे ते तिघेजण तिथं जाऊन बसतात. पण त्याचे कान
मात्र जिजाबाई आणि गोमाजी मध्ये होणाऱ्या वार्तालाप कडे
टवकारलेले असतात. गोमाजी जिजाबाईंना विचारतो की
जिजा अक्का कसला घोर लागला आहे तुम्हाला ? " जिजाबाई
त्याला सांगतात की सासूबाईंना वाटतं की स्वारी घृष्णेश्वराच्या
दर्शनाला गेले आहेत म्हणून. पण खरं तर स्वारी मुल्ला बाबा चा
मुलुख जिंकून त्याचा नामोनिशाण मिटवायला गेली आहे. पण
हे आम्ही सासूबाईंना सांगू शकत नाही.कारण स्वारीनी आम्हास
सांगायला मनाई केली आहे."इतक्यात गोदा त्या फकीराना
भिक्षा घालण्यासाठी आंतून धान्य घेऊन आली.तिला पाहताच
फकिराच्या वेशातील इकलाख खान एकदम खुश होऊन म्हणाला," पाने की जो चाहत हो , वही हमारी किस्मत हो
बरसो पहले हमारे सिने में आग लगी है, वही कयामत तक
जिंदा रहेगी ।" तसा गोमाजी त्याच्या कडे पाहून ओरडला
नि म्हणाला," गप्प गुमान घे की आणि निघ इथून." भिक्षा
देवून होताच गोमाजी गोदा ला घरात जायला सांगतो. ते फकीर
तिथंच घोटाळत राहतात. तसा गोमाजी म्हणाला," जिजा अक्का काही घोर घेऊ नका. आपण बाई साहेबांना घेऊन
घृष्णेश्वर ला जाऊ." त्यावेळी इकलाख कान देवून ऐकतो.
जिजाबाई आणि उमाबाई दर्शनाला म्हणून निघतात.
लखुजी राजे मुरार जगदेव आणि रणगदुल्ला खान ची भेट
घेतात नि त्यांना सांगतात की आवाम खुश आहे नि आपल्याला
ती दुवा देत आहे. " तेव्हा पंडित मुरार जगदेव म्हणाला की ,बात सिर्फ आवाम को खुश करने की बात नहीं हुई थी
सरहदे तो बढ़ानी की बात हुई थी लेकिन सरहदे तो बढ़ नही
रही है, " त्यावर लखुजी राजे म्हणाले," कोशिश तो जारी हैं ."
" सिर्फ कोशिश नहीं सरहदे तो बढ़ानी तो हैही, लेकिन अब
ऐसा लगता है, आपके पास अब वो ताकद नहीं रही जो पहले
हुआ करती थी ।" लखुजी राजे म्हणाले," अब हम आपको
शिकायत का मौका नहीं देगे हमारी कोशिश जारी रहेगी ।"
असे बोलून लखुजी राजे तेथून निघून गेले. रणदुल्हा खान
म्हणाला," पंडित मुरार जगदेव, दुबारा कोशिश करनी पड़ेगी
शाहजी राजे को वापस लाने की ।"
संध्याकाळ जशी झाली तसा आपल्या त्या दोन साथीदार
गोदा शिवाय दुसरा कोणी नाही असा विचार करून तो आंत
शिरला. गोदा कामात मग्न असताना त्यांना मागून जाऊन पकडले. तशी गोदा झटापट करून त्याच्या हातून सुटते नि पळत सुटली.पण तो तिला पकडण्यात यशस्वी झाला असता.
पण इतक्यातच घृष्णेश्वराच्या दर्शनाला गेलेले उमाबाई , जिजाबाई , गोमाजी आणि बाळ राजे दर्शन घेऊन परत आलेले
असतात. मग जिजाबाई आणि इकलाख खान सोबत युद्ध
सुरू होते ते गोमाजी त्याच्या त्या दोन साथीदार सोबत युद्ध
सुरू होते. शेवटी इकलाख खान आणि त्याच्या दोन साथीदारांना
जायबंदी केले. जिजाबाई त्याच्या छातड्या वर एक पाय रोवून
तलवार त्याच्या गळ्यावर ठेवली. तसा तो भयभीत झाला होता.
लखुजी राजे आपल्या धाकट्या बंधू ना म्हणाले की सिंदखेड
ला निघायची तयारी करा. त्यावर जगदेव म्हणाला,"आपण तर... त्यांचे वकव्य मध्येच खंडित करत ते म्हणाले," इकडे
वारे वेगळाच दिशेने वाहत आहेत, काल परवा पर्यंत जे आपल्याला आदिलशाहीत येण्यासाठी पायाखाली घड्या
टाकत होते तेच आता म्हणतात की तुमचं पूर्वीचे तेज राहिलं
नाही आता. उद्या आपल्या पेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीला आपल्या डोक्यावर आणून बसवतील.ह्यांचे मनोरजन होईल.
पण त्या वाघाचे कुत्र होईल."
इकलाख खान सोबत त्यांच्या त्या दोन साथीदारांना पण
जायबंदी केले आहे, पण तरी देखील त्याची मस्ती काही जिरली
नाही, तो म्हणतोय कसा पाने की जो चाहत हो, वही हमारी
किस्मत हो बरसो पहले हमारे दिल में आग लगी थी वही कयामत तक जिंदा रहेगी ।" तसा गोमाजी म्हणाला," फकीराच्या वेशात येऊन त्या फकिराच्या नावाला कलंक
लावत आहेस." तेव्हा जिजाबाईंनी सांगितले की ह्याचे अगोदर
डोळे काढा. मग ह्याला खड्यात पुरून टाका.विषारी नाग आहे
तो त्याला ठेचूनच काढलं पाहिजे." तेव्हा इकलाख खान
म्हणाला," हमे बचाने वजीरे आलम मालिक अंबर आयेंगे , दूसरे फतेह खान आयेंगे लेकिन आप लोगोंको कौन बचाएगा ?
" ए ss मुडद्या तुला काय वाटलं तू इथून जिवंत जाशील काय ?"
" कौन मारेगा हमे ? तुम्हारी मत मारी गई है क्या ?"
" ये आवाज खाली कर, आज तुला मी जिता सोडत नाही."
असे म्हणून गोदा ने बाजूला पडलेला भाला उचलला नि इकलाख खान च्या गळ्याला लावला." तेव्हा गोमाजी ने तिला रोखले नि मग म्हणाला," ह्याच्या शरीरात फक्त चिखल भरला आहे. पण तू आपले रक्ताने विटाळू नकोस." असे म्हणून जिजाबाईंना उद्देशून म्हणाला," जिजा अक्का तुम्ही फक्त आदेश द्या." त्यावर इकलाख हसून म्हणाला," वो क्या देगी आदेश वो एक औरत है।" जिजाबाई चिडून म्हणाल्या,"औरत हैं, म्हणजे समजतोस काय स्त्रीला ? उसी के पेट से जन्म लिया है ना ? क्या आसमान से गिरे हो ? एका स्त्री कडे पाहण्याची ही कसली घाणेरडी नजर ? अश्या नजरेला मुळासकट काढून टाकायला पाहिजे." त्यावर तो बेफिर पने हसून म्हणाला,औरत जात होती है, किसलिए ? उस पर नजर नहीं डालेंगे तो और किस पर डालेंगे ।" जिजाबाईचां राग अनावर झाला. त्यांनी आपली तलवार उपसली नि त्याच्या गळ्याला लावली नि त्याच्या गळा कापून टाकणार तोच गोमाजी म्हणाला," जिजा अक्का तुमचे हात ह्याच्या घाणेरड्या रक्ताने विटाळू नका.त्याला माझ्या हवाली करा?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आता ह्याचे अगोदर डोळे फोडू नका. त्याला पाहू दे त्याच्या डोळ्याने त्याच्या शरीराचे कसे तुकडे तुकडे होताहेत.ह्याची फार खांडोळी करून टाका मेल्याची ! साऱ्या जगाला कळू दे, स्त्री वर वाईट नजर ठेवणाऱ्यांना काय गत होते आमच्या राज शाही मध्ये." तसा गोमाजी त्याला म्हणाला चल रे, तुझी मस्ती कशी जिरवतो ती बघ आता!"असे बोलून त्या तिघांनाही घेऊन गेले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा