छत्रपती शिवाजी महाराज भाग ३९ | chhatrapati shivaji maharaj episode 39 | Author :- Mahendranath prabhu
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज भाग ३९ | chhatrapati shivaji maharaj episode 39 | Author :- Mahendranath prabhu |
" आमचा अपमान करण्यासाठी कार्यक्रमाला बोलविले होते का ?" पण दुसरा कोणी बोलण्या अगोदरच मंबाजी राजे म्हणाले ," लखुजी राजे कार्यक्रम तर केव्हाच आटोपला." तसे लखुजी राजे म्हणाले," चला आता आपण लगेच निघायचं." असे म्हणून लखुजी राजे आणि त्यांच्या तिन्ही राण्या आणि यशवंत राजे सगळे निघून गेले. क्षणा पूर्वीचा आनंद मावळला.
पुढे
शहाजी राजे बेचैनी ने इकडून तिकडे येरझाऱ्या घालत
असतात. तेव्हा जिजाबाईंनी त्याचे कारण विचारले.तेव्हा
त्यांनी आबा साहेब अदील शाहीत गेल्याचे सांगितले. आम्ही
आदिलशाहीत येणार नाही म्हटल्यावर त्या पंडित मुरार जगदेव
ने आबा साहेबांना आपल्या जाळ्यात ओढले नि रणदुल्ला
खान कड़े घेऊन गेले नि आबा साहेब त्यांनी दाखविलेल्या
अमिषाला बळी पडले. त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आपला
वापर केला जातोय हे आबा साहेबांच्यां ध्यानात येत नाही आहे
काय ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले," प्रत्येक शाहित हेच तर
होतेय पण आपण आपला वापर करू देतोय. म्हणून ते वापर
करतात. आमच्या कडून त्यांचा अपमान झालाय म्हणून ते
आदिलशाहीत गेलेत असा सर्वांचे मत झाले आहे पण नाही
ही केवळ सबब होती." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," सबब
कशी ? बारशाच्या वेळी त्यांचा अपमान झालाच." त्यावर
शहाजी राजे म्हणाले," मग मोगलाईत काय आम्ही जायला
सांगितले होते ? उलट सगळ्यांच्या विरोधात जाऊन आम्ही
त्यांना निजामशाहीत मान सन्मानाने परत आणले होते हे तुम्ही पण विसरलात ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," शंभू महादेवाचीच तशी इच्छा नव्हती. नाहीतर बघा ना, सगळे
सगेसबंधी एकत्र यावेत एकत्र राहावेत हीच आमची इच्छा पण आमच्या पदरात नेहमी निराशाच पडते. ही तेढ कमी व्हायची
सोडून उलट वाढत जाते." इतक्यात शरीफ जी राजे आले
नि म्हणाले," क्षमा करा दादा साहेब, आज वर्दी न देताच यावे
लागले कारण वेळच तशी आली आहे." त्यावर शहाजी राजे म्हणाले," तसे कारण असल्या शिवाय तुम्ही असे येणार, बोला
काय बातमी आणलीत ?" शरीफ जी राजे म्हणाले," दादा
साहेब मलिक अंबर साहेबांचे फर्मान आले आहे की, अहमद
नगर पासून पाच कोसावर भातवडी ला रण मांजण्याचे संकेत
आहेत. मोगल आणि आदिलशहा एकत्र येऊन संगतमत करून
आपल्या विरुध्द मोहीम उघडली आहे. तेव्हा मोहीमे वर जाणे
गरजेचे आहे." तश्या जिजाबाई उद्गारल्या ," अरे देवा म्हणजे
पुन्हा एकदा .....वक्तव्य पूर्ण करण्या अगोदरच शरीफ जी
राजे म्हणाले," काय झालं वहिनी साहेब, दादा साहेबांच्या
मनात तह करणे, किंव्हा पळून जाणे हा विचार कधीच येत
नाही. मी बरोबर बोलतोय ना दादा साहेब ?" शहाजी राजे
म्हणाले ," शरीफ जी राजे त्यांच्या मनात वेगळी खंत आहे.
आणि ती म्हणजे आम्ही आणि त्यांचे आबा साहेब पुन्हा एकदा
एकमेका समोर येऊ अशी त्यांना भीती वाटत आहे. होय ना ?"
" कोण मरणाला बगल देणार, कोण मोहीम फत्य करणार
याचाच घोर आम्ही रात्रिंददिवस करणार का ? सांगा. नाही
शौर्य, पराक्रम हे आपल्या रक्तात आहेत , हे बाळकडू बालपणी आम्ही देखील घेतलं. पण युद्धात आपलेच संगेसंबधी आपल्या
विरुध्द असतील हे सांगण्यात आलं नव्हतं. म्हणजे महाभारतातल्या महासंग्राम संपलाच नाहीये. म्हणजेच तो
कधीच संपणार नाहीये का ?" त्यावर शरीफ जी राजे म्हणाले,
" वहिनी साहेब तुमचं म्हणणे रास्त आहे , म्हणून दादा साहेब तुम्ही येऊ नका मोहीमेवर आम्ही पाहतो काय ते."
" आणि आम्ही काय सबब द्यायचे ? वजीरे आलम सोडाच.
पण आम्ही आमच्या मनाला काय उत्तर देवू ? आदिलशाही
नि मोगलशाही एकत्र येऊन निजामशाही बद्दल मोहीम उघड- ताहेत आणि आम्ही आमचे सगेसबंधी आमच्या समोर आले
म्हणून आम्ही माघार घ्यावी ? मग महाभारत नको की गीता
नको. काहीच वाचायला नको. आणि त्यातून काहीच शिकायला
नको." त्यावर शरीफ जी राजे म्हणाले," ही तुमची बाजू खरंच
रास्त आहे, दादा साहेब. पण वहिनी साहेब आम्ही तुम्हाला
वचन देतो की लखुजी राजे नि दादा साहेब एकमेका समोर
येणारच नाहीत. आणि आम्ही त्यांना येऊच देणार नाही. दादा साहेब यावेळी तुमची बाजू मान मरतबाने भक्कम आहे, यावेळी तुमच्या हातात आहे की मोहीम कुठची निवडायची ? आणि वहिनी साहेब तुम्ही काहीच घोर घेऊ नका. दादा साहेबांना काहीच होणार नाही. आणि तशीच जर वेळ आली तर दादा
साहेब वर आलेला प्रत्येक वार आम्ही स्वतः घेऊ पण दादा
साहेबांना आम्ही काही होऊ देणार नाही."
फतेह खान चिडून म्हणाला," लखुजी राजे आदिलशाही में
गए इसका नतीजा यह है।" मलिक अंबर म्हणाला," लेकिन
वो अपने खिलाफ है, यह याद रखो और हकीकत का सामना
करो ।" मालिक अंबर नकाशाचे निरीक्षण करत होता म्हणून
फतेह खान ने विचारले," यह क्या कर रहे है, अब्बा हुजूर ?
" हमारे खिलाफ कौन कौन कहां से आ रहा है, इसका मुआइना
कर रहे हम. लश्कर खान मोगल फौज लेकर यहां से बढ़ रहा है, और मुल्लाबाबा आदिलशाह की फौज लेकर यहा से बढ रहा
है ओर लखुजी राजे और उनका परिवार और साथ में सुजा
खान करमुल्ला खान, जहां खान, सिकंदर खान, खलील खान
इशाम्द खान, पानी पिलो अब तक कुछ सरदारोंकी नाम ली है
अब और ऐसे बहुत है, याखूब खान , फराक खान , मुस्तफा
खान, दिलावर खान, अशी मलिक अंबर घेतच गेला तसा
फतेह खान मध्येच रोखत म्हणाला," कुल मिलाकर कितने
है अब्बा हुजूर ?" मलिक अंबर म्हणाला," लगबग ऐसी हजार ... तसा फतेह खान वैतागुन म्हणाला," यह सब लखुजी राजा की वजह से हुआ वो अगर निजामशाही नहीं छोड़ते तो शांहजान की हिम्मत नहीं होती." मलिक अंबर म्हणाला," सब्र कर बेटा. यह कहकर लखुजी राजा को ऊंचा कर रहे हो, सोच की रफ्तार तेज करो, नहीं तो वजीरे आलम तक कैसे पहुंच पाएंगे । जंग के बारे में सोचो हम यहां से फौज लेकर पीछे तालाब को ओर आयेंगे । मोगली फौज हमारे पीठ पर रहेंगी, यहां से यहां तक आयेंगे ।" फतेह खान ने विचारले की, आप इस उमर में जंग लड़ेंगे ?" मालिक अंबर म्हणाला," शेर कितना भी बूढ़ा क्यों न हो जाए घास कभी नहीं खाता शिकार ही खाता है। आप भी आपका हौसला बुलंद करो और इस तालाब को तोड़ दो ।"
" तालाब को तोड़ दूं ?"
" ऐसी हजार फौज के साथ लड़ना इतनी आसान बात नही
है फतेह मियां इसलिए हम फौज को तालाब तक लेकर आएंगे
और आप तालाब को तोड़ दो।"
" लेकिन तालाब को तोड़कर क्या होगा ?"
" दुश्मन तालाब में बह जाएगा ।"
" तो यह काम किसी और की दीजिए । क्योंकि तालाब
को तोड़ते समय खुदा का ना खस्ता दुश्मन के साथ हम भी बह गए तो ?"
" तो और किसको भेजेंगे ?"
" तो मराठे किस लिए है, यह काम भोसले खानदान को दो
कुछ भी हो एक तो ससुर मरेगा या दामाद या फिर दोनो ।
शहाजी राजांनी सुध्दा नकाशा दाखवत मुल्लाबाबा कोठून
कसा येणार दाखवत असताना शरीफ जी राजे मात्र आपल्याच
विचारात गर्क होते. त्यांचे शहाजी राजे सांगत असलेल्या योजने
कडे लक्षच नव्हतं. पण शहाजी राजांच्या ते ध्यानात आले नि
त्यांनी त्यांना त्याचे कारण विचारले तर ते म्हणाले," आपल्याला
बळीचा बकरा बनवलाय जतोय असं आम्हास वाटते. खेलोजी
दादा साहेब तुम्हाला ही तसेच वाटतंय ना ?" तेव्हा खेलोजी
राजांचे म्हणणे ही तेच असतं की तुम्ही मोगलांची रसद तोडली
नसती तर आपल्या जनावरांना दाणा पाणी मिळाला नसता."
त्यावर शहाजी राजे म्हणाले," गरज भागली ना, मग झालं तर !" तसे शरीफ जी राजे म्हणाले," पण दादा साहेब, ते करत
असताना तुम्हाला काय झालं असतं तर वहिनी साहेबांना आम्ही
काय उत्तर दिलं असतं ?" तेव्हा शहाजी राजे म्हणाले," ते सारे वजीरे आलम मुळेच शक्य झालं. कारण ती योजना त्यांचीच होती. " तेव्हा खेलोजी राजे म्हणाले," त्यात ही तुम्हाला त्यांचीच बुद्धिमत्ता दिसते." त्यावर शहाजी राजे म्हणाले,
" खेलोजी राजे नीट ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला ही तेच दिसेल. मला सांगा. समजा गरज भागली नाही तर....आपल्याला झोप मिळाली नाही, जेवण मिळालं नाही तर काय होईल सांगा.. आपल्यातील जनावर चवताळून बाहेर येईल आणि ती आपली माणुसकी विसरेल..आणि मग दिसेल त्याला फाडुन टाकेल." त्यावर शरीफ जी राजे खुश होत म्हणाले," अरे वा आपली खूपच चांगली योजना आहे." शहाजी राजे म्हणाले," आमचे कौतुक नको. फक्त इकडे लक्ष द्या. मुल्ला बाबा ( नकाशात दाखवत ) हा इथून येईल. त्याला इथं चोही कडून गराडा घालून कोंडीत पकडायचे. तरच आदिलशाही फौजेत अफरातफर मांजेल."
जिजाबाई गोमाजी ना बोलवून घेतात नि त्यांना मोहीमे बद्दल
माहिती विचारतात. गोमाजी सांगायला तयार होत नाही हे पाहून
त्या म्हणाल्या, " गोमाजी काका तुम्ही जर सांगितले नाही तर
आम्ही स्वतः भातवाडी ला जाऊ आणि माहिती काढू ." असे
म्हटल्या मुळे गोमाजी ना सत्य परिस्थिती सांगावी लागते की
आधीलशहा आणि मोगल याची जवळ जवळ ऐसी हजार
फौज आहे, आणि त्यांच्या विरोधात फक्त मराठ्यांना ठेवले
आहे, शिवाय फौजेच्या दाणा पाणी ची पण सोय नाहीये.
राजे आपला जीव धोक्यात घालून शत्रू सैन्याची रसद तोडून
आपल्या फौजेची गरज भागवत आहेत. त्या म्हाताऱ्या चे काय
षडयंत्र आहे तेच कळत नाहीये. तेव्हा जिजाबाईंनी विचारले,
" म्हातारा कोण ?" तेव्हा गोमाजी उद्गारला," मलिक अंबर."
जिजाबाई म्हणाल्या," आता शंभू महादेवच स्वारीच्या पाठीशी
उभे राहतील."
उमाबाई झोपण्याचा प्रयत्न करत होत्या. पण मनात मोहीमे
वर नेमके काय घडले असेल हा विचार सारखा मनात घोंघावत
असल्यामुळे काही केल्या त्यांना झोप येत नव्हती. अचानक
कोणत्यातरी विचाराने त्या दचकल्या नि पलंगावर उठून बसल्या.तोच समोर त्यांना जिजाबाई दिसल्या. क्षणभर त्यांना वाटले की जिजाबाई मोहीमे वरील काही खबर घेऊन आल्या की काय म्हणून त्यांनी भित भितच विचारले की काय खबर आहे ?" जिजाबाईंना क्षणभर कळलेच नाही सासूबाई असं का विचारत आहेत. पण लगेच स्वतःला सावरून म्हणाले,"नाही काही नाही." त्यावर उमाबाई ने विचारले," मग इतक्या रात्री तुम्ही इथं का बरं आल्या ?" आता उत्तर काय द्यावे ते क्षणभर
जिजाबाईंना सुचलेच नाही. पण लगेच बाळ राजांचे कारण
पुढे करत म्हणाल्या," ते काय झालं बाळ राजांना झोप
येत नव्हती ना ? म्हणून तुम्हाला बोलवायला आले. जरा
येता का आमच्या दालनात ?" उमाबाई समजल्या की जिजाबाई खोटे सबब सांगत आहेत. कारण बाळ राजे
केव्हाच झोपले आहेत, हे त्यांना गोदा ने सांगितले होते म्हणून
त्या म्हणाल्या," नाही हे कारण नाहीये. बाळ राजे झोपले आहेत
हे मला माहीत आहे, आणि ते एकदा झोपल्या नंतर पहाटे
नगारे वाजल्या नंतरच उठतात. आम्ही अस्वस्थ आहोत म्हणून
आलात ना ?" तसे जिजाबाईंनी दुसरे कारण पुढे केले की,
नाही नाही. त्याचं काय झाले आम्ही पाणी प्यायला जात
होतो ना सहजच तुमच्या दालनात नजर पडली. तुम्ही जाग्या दिसल्या म्हणून मी आंत आले." उमाबाई म्हणाल्या ," हुं आलं
लक्षात आम्हाला बरं वाटावं म्हणून बोलताय ना असं ?"
" मग चला ना ."
" का कुणास ठाऊक आमचं मन धाऱ्या वर नाहीये. मनात
सारखा एकच विचार येतोय की तिकडे मोहीमे वर काय घडलं
असेल. यापूर्वी सुध्दा मोहिमा झाल्या. पण आजच्या सारखे
आम्हाला कधीच वाटले नव्हते. बरं या तुम्ही आम्ही शंभू महादेव
चा जप करतो. निदान ते केल्याने तरी मनाला शांती लाभेल."
" आपण आम्हाला मागच्या मोहीमेच्या वेळी काय सांगितले होते ते आठवते का ? आपण नेहमी चांगलेच विचार करावेत वाईट विचार मनात आणू नयेत. चांगले विचार केले तर आपल्या बरोबर चांगलेच घडते. आठवते. तेव्हा पासून आम्ही ते आमच्या हृदयात कोरून ठेवले आहे."
" फार समजस आहात. कधी एकदा ह्या मोहीम संपतात आणि मंगल वाद्य वाजतात असं झालंय."
निजामशाही दरबार
निजामशहाच्या दरबारात सर्व सरदार उपस्थित होते, मंबाजी
राजे, खेलोजी राजे, शहाजी राजे, खंडागळे सरदार, वजीरे
आलम मलिक अंबर, फतेह खान, स्वतः निजामशहा बादशहा
हजरत आणि इतर शिलेदार वजीरे आलम ची पूर्ण खात्री होती
ह्या वेळी बादशहा हजरत आपलाच सन्मान करणार, फतेह
खान ला तसेच वाटत होते. मंबाजी राजांना वाटत असते की
भात्वडी चे युद्ध जिंकल्याने सगळ्यांचा सत्कार होईल. पण
प्रत्यक्षात झालं मात्र उलटच. पण कारण ही तसेच असावे. म्हणजे वजीरे आलम दाणा पाणी पुरविले नाही म्हणून शाहजी
राजांनी आपला जीव धोक्यात घालून दुश्मन ची रसद तोडली.
हे बादशहा कळले नसेल का ? म्हणूनच सारे श्रेय शहाजी राजांना बादशहाने दिले असावे. म्हणजे झाले असे की बादशहा
हजरत ने फर्मान फतेह खान च्या त्याला वाचायला सांगितले.
त्याने एक नजर फक्त टाकली त्या फर्मान वर त्याचे डोळे पांढरे
व्हायचे शिल्लक राहिले. त्या युद्धाचे सारे श्रेय शहाजी राजांना
देण्यात आले होते. जसे त्याने फर्मान वाचून दाखविले. सगळ्यांचे चेहरे काळे ठीक्कर पडले. वजीरे आलम मलिक अंबर ला फार वाईट तर वाटलेच; पण त्या क्रोध जास्त आला. पण बादशाह हजरत समोर तर काहीच बोलू शकत नाही. म्हणून सर्वजण गप्प बसले. शहाजी राजांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत नव्हता. हे बादशहा हजरत च्या ध्यानी आले म्हणून त्याने
शहाजी राजांना विचारले सुध्दा की, आपको खुशी नहीं हुई ?"
तसे शहाजी राजे म्हणाले," नहीं. ऐसी कोई बात नहीं है, मैं
बहुत खुश हूं ।" बादशहा हजरत म्हणाला,"लेकिन आपको
देखकर ऐसा बिल्कुल नहीं लगता की आपको खुशी हुई हो."
तेव्हा शहाजी राजांनी सांगितले की, यह जंग हमारे लिए भी
यादगार रहेगी इस जंग में हमने अपने परछाई को गवाया है।
फतेह फौज का पीछा कर रहे थे तभी मुल्ला बाबा ने उनको
मारा डाला. त्याचा बदला घेतला मी पण भाऊ तर गमावून बसलोच ना मी ?" त्यावर बादशहा काय बोलणार म्हणा.
भोसले गढ़ी
उमाबाई आपल्या नातवाला म्हणजे बाळ राजे संभाजी ना
संत एकनाथ महाराजांनी रामायण तील प्रभू श्रीरामचंद्राचा
एक प्रसंग सांगताना म्हणतात की, मृदू पने नाही यश कीर्ती, मृदू पण नाही लाभ प्राप्ति, मृदू पने नाही विजय वृत्ति जानतेने सौमित्रा ...सौमित्र म्हणजे लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचां कोण होता ?" लगेच बाळ राजांनी उत्तर दिले की, भाऊ !" उमाबाई म्हणाल्या," बरोबर. पण कसा .... मोठ्या भावाची सावली
बनून राहिलेला. राम जेवला तर लक्ष्मण जेवणार, नाही जेवला
तर नाही जेवणार...वेळ प्रसंगी मोठ्या भावाला पाठींबा देणारा.
(त्या क्षणी त्यांच्या पाठीमागच्या खिडकीवर शहाजी राजे नि
जिजाबाई येऊन उभे राहतात.) अरण्य कांड मध्ये सीता हरण
झाल्यावर थोरल्या भावाला आधार देणारा. आधी रामाचा जन्म
आणि नंतर लक्ष्मण पण तरी रामाच्या अगोदर स्वतःचा मृत्यू स्वीकारणारा लक्ष्मण. असं म्हणत असताना एकदम भावनावश
झाल्या नि त्यांना एकदम हुदका आला. तसे शहाजी राजे आणि
जिजाबाई पुढे आले. तेव्हा शहाजी राजे म्हणाले," आऊ साहेब
आम्ही शरीफ जी ना वाचवू शकलो नाही. परंतु तुमच्या लक्ष्मणाला मारणाऱ्याला ही आम्ही सोडले नाही." त्यावर उमाबाई म्हणाल्या," एका लेकराला सन्मान दुसऱ्या लेकराला
मृत्यू सुख कधी एकट्याने येतच नाही काय सोबत दुःखाला घेऊन येतेच. आमचे स्वारी गेल्या पासून सुरू झालेले हे दुष्टचक्र
तुमच्या भावापर्यंत येऊन पोहचले." तेव्हा बाळ राजे म्हणाले,
" मोठ्या आऊ साहेब रडताहेत."त्यावर जिजाबाई म्हणाल्या,
" मग हे आम्हाला काय सांगताय तुम्ही सांगा तुमच्या मोठ्या
आऊ साहेबांना की आमच्या आऊ आणि आबा साहेब हे चित्र
बदलणार आहेत. हे दुष्टचक्र थांबविणार आहेत. कारण आम्ही बदल घडवून आणणार आहोत. जा सांगा मोठ्या आऊ साहेबांना की डोळे पुसा म्हणून." तसे बाळा साहेब पलंगावरून
खाली उतरले नि उमाबाई जवळ गेले नि म्हणाले," मोठ्या आऊ
डोळे पुसा पाहू !" तसे उमा बाईंनी आपले डोळे पुसले नि बाळाला पोटाशी धरिले.
जिजाबाई बाळ राजांना घेऊन आल्या नि त्यांना झोपवत
असताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून शहाजी राजे
म्हणाले," मघाशी तर आऊ साहेबांना धीर देत होता आणि
इथं आपल्या दालनात आल्या नंतर एकदम हळवे झालात.
नेमके काय झालं ते आम्हाला सांगाल का ?" जिजाबाई
म्हणाल्या," सासूबाईंचे , आमच्या आऊ साहेबां सारखे रोज
एक नवीन रूप पहायला मिळते. मला असं वाटतं की आम्ही
अजून त्यांना पुरते ओळखलेच नाही आहोत.
" म्हणजे ?"
" म्हणजे असं की आज त्या आम्हाला एकदम तेजस्वी दिसल्या. म्हणजे अगोदर मालोजी काका गेले नि आता
शरीफ जी गेले. एका पाठोपाठ किती घाव त्यांनी सहन केले.
परंतु मनात यत्किंचिही कडवट पना आला नाही. अनोळखी कुणी व्यक्ती आला तर त्याला कळणार देखील नाही की या बाईने इतके दुःख पचवले असेल. कधी सनुभुती ची अपेक्षा केली नाही की कधी दुःखाचे प्रदर्शन केले नाही.आम्हाला त्या
योगिनी आणि तपस्विनी भासत होता त्या." त्यावर शहाजी
राजे म्हणाले," तुमच्या बोलण्यावरून आमच्या डोक्यात एक
वेगळाच विचार येऊ लागला."
" काय ?"
" हाच की आम्ही मोहीमे वर असू किंवा शिकार करायला
गेले असू तिथं आम्हाला आमच्या मनातील राग काढता येतो.
पण तुम्हा स्त्रियांना तशी संधि मिळत नाही. आपला राग
मनातल्या मनात दाबून ठेवायला लागतो."
" हे ते सरसकट विधान झाले. सासूबाई इथं वाड्यात राहतात. त्यांना पोटा पाण्याची कशाची चिंता करावी लागत
नाही. पण रयतेला ह्या साऱ्या गोष्टी साठी आयुष्य भर जिजावे लागते. त्यांच्या वर जेव्हा दुःख कोसळते तेव्हा ते स्वतःला कसे
सावरत असतील याची आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही." त्यावर शहाजी राजे म्हणाले," खरंय आम्ही या आधी
असा काहीच विचार केला नव्हता."
" आपण नेहमी म्हणत असतो की आपल्याला बदलायचं
आहे , पण काय ते आता हळूहळू स्पष्ट होत आहे. गरीबीतल्या
गरीब स्त्री ने मोकळे पणाने घेतलेला श्वास म्हणजे बदल, सतत
कोणाचे तरी दडपण मनात सतत वाटणारी भीती तीच आयुष्याला वेढून टाकणारी तिलाच कायमचं काढून टाकायचे
आहे."
" ही पण ती भीती काढणार कशी आणि भीती गेली हे
कळणार कसं ? आणि समजा आपण कोणाकडून तरी ती
वदवून घेतले तरी ते खरं असेलच कशावरून ? वरकरणी
पण लोक सांगतात ना ? ते खरेच बोलत आहात हे कळणार
कसं ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," त्यांच्या कृतीतून कळेल म्हणजे श्रावणात चैत्रात माहेरवाशिणी एकत्र येऊन झाडावर
बांधलेल्या झोपाळ्या वर बसून उंच झोके घेतले म्हणजे समजायचे की त्यांची भीती गेली. त्यांनी मुक्त पने तो आनंद घेतला म्हणजे त्यांची भीती गेली आहे. आणि घरातील पुरुषांनी स्त्रियांना तो आनंद घेऊ देतील म्हणजे त्यांच्या मनातील ही
भीती गेली आहे असे म्हणता येईल.आणि ज्यावेळी हे असे चित्र
दिसेल त्यावेळी आपण म्हणू शकू की आपण काहीतरी बदललं
आहे."
फतेह खान आपल्या भयंकर चिडला होता. त्याचे म्हणणे
होते की तुम्ही शहाजी राजांना आपल्या डोक्यावर बसविले.
हा त्याचा परिणाम आहे. पण मी गप्प बसणार नाही." त्यावर
मलिक अंबर विचारले की, क्या करने वाले हो तुम ?"
" मैं फर्मान निकालने वाला हूं "
" कैसा फर्मान ?"
" अब्बा हुजूर और लोग भी तो नाराज है,मैं उनको फरमान
भेज दूंगा !"
" फरमान हमारे नाम से निकालने वाले है, तो हमे भी बताओ
क्या करने वाले हो ?"
" जरुरत नाही हैं."
भोसले गढी
शहाजी राजे म्हणाले," आम्ही हे निश्चित च करू, परंतु या वाटेत दुश्मन खूप आहेत आणि आता ते आणखीन वाढतील."
" म्हणजे अजून कोण दुश्मन झाले आहेत."
" बाहेरचे तर होतेच पण आता आतले देखील वाढतील.
भर दरबार बादशहा ने आमचा केलेला सत्कार कित्येक जणांना
आवडलेला नाहीये. त्यात आमचे घरचे ही आहेत नि बाहेरचे ही
म्हणून सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा