छत्रपती शिवाजी महाराज ३८ | chhatrapati shivaji maharaj episode 38 | Author :- Mahendranath prabhu
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज ३८ | chhatrapati shivaji maharaj episode 38 | Author :- Mahendranath prabhu |
तेव्हा रणदुल्ला खान त्याच्या मदतीला धाऊन आला. शहाजी राजांना त्याची कल्पना होतीच म्हणा. त्यांनी आपल्या लाथेच्या एका प्रहार ने त्याला तोंडावर पाडले. आणि त्याला ताकीद दिली की खबरदार, खान साहब, चालाकी करने की कोशिश न करना, वर्ना आपका ये पंडित अल्लाह को प्यारा हो जायेगा । आप बाहर जाइए ओर अपने सारे लोंगोको हाथ पीछे बांधकर हमारे सामने लेकर आइए, और उसमे कोई चालाकी नही वरना ये पंडित तो गया "
पुढे
जन्माला येणार बाळ देखील जिजाबाईंची फारच कसोटी
घेत होता. सर्वजण हवालदिल झाले होते. सोयराबाई ते शंभू
महादेवाना प्रार्थना करत होत्या. इतक्यात बाळाचे रडणे सर्वांच्या
कानावर पडले. तसे सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यानंतर
जिजाबाई आपल्या बाळास म्हणाले," बाळ राजे तुम्ही आले नि
आमचा सारा क्षीण कुठच्या कुठे पळून गेला. बाळ राजे तुम्ही
ह्या भोसले घराण्यात जन्माला आला आहात, तेव्हा ह्या घराण्याचे नि आपल्या आबा साहेबांचे नाव मोठे करायचे
आहे, हे ध्यानात ठेवा." इतक्यात तेथे गोदा आली तिला
पाहून जिजाबाईंनी विचारले," ह्या वाड्यात आम्हाला कोणीच
काही सांगत नाहीये. गोदा अग तू तरी खरं काय ते सांग आम्हाला." त्यावर गोदा म्हणाली," जिजा अक्का जरा दमाने
घ्या. बाळ राजांचा खरंच पायगुण चांगला आहे पहा, जसे
बाळ राजे जन्माला आले तसे चांगले घडू लागले पहा. धनी
आता शुध्दीवर आले आहेत,आणि गोमाजी काका तुमच्या
स्वारी ची माहिती काढत आहेत."
रणदुल्ला खान शाहजी राजांची माफी मागितली. तसे शहाजी
राजांनी पंडित मुरार जगदेव ला सोडले. तसा मुरार जगदेव
म्हणाले," राजे आम्ही तुमच्या बद्दल जे ऐकले होते ते खरे आहे, आम्हाला आता पटले बुवा. तुम्ही शातिर ते आहेतच पण जाबांझ पण आहात. " रणदुल्ला की खान म्हणाला," हम चाहते है की आप निजामशाही छोड़कर आदिलशाही में आईए।"
" आपने हमे इस काबिल समझा हमारे लिए इतना ही काफी
हैं, हम निजामशाही से बगावत नहीं कर सकते." त्यवर पंडित
मुरार जगदेव म्हणाला ," पाणी वाहते राहायला हवं .साचून
राहिलं तर ते डबके होते आणि मग ते कोणाच्याच उपगाचे
नसते. बघा विचार करा." त्यावर रणदुल्ला खान म्हणाला,
" पंडित सही कह रहे है, राजे जरा गौर कीजिए।" शाहजी
राजे म्हणाले," फूल खुशबूदार होते है, तभी तो उनको फूल
के तौर याद किया जाता है, खुशबूदार होना फूल की पहचान
है, गुलजार होना गुलशन की उसी तरह वफादार होना यह
हमारी पहचान है । " तेव्हा रणदुल्ला खान म्हणाला," इतनी
वफाए भी नहीं है राजे , रियासत के मसले में एक खता के
बदले में भुल जाते हैं , सब वफाएं यह बात याद रखना ।" इतक्यात शरीफ जी राजे आले आणि त्यांनी शहाजी राजेंना खुश खबर दिली की दादा साहेब आपण आबा साहेब झालेत. वहिनी साहेबांना बाळ झाले." तसे पंडित मुरार जगदेव म्हणाले, ह्याला हवे तर बाळाचा पायगुण म्हणा नि यावर विचार करा." त्यावर शहाजी राजे विचारमग्न झाले. ते पाहून पंडित मुरार जगदेव मंद हास्य केले, म्हणजे आज नाहीतर उद्या शहाजी राजे नक्कीच आदिलशाही मध्ये येतील. असे त्याला वाटले असावे.
जिजाबाई आपल्या बाळाला म्हणाल्या की, आपलं , आपल्या कुळाचं आणि रयतेचे सौख्य आबादनी राहावे म्हणून तुमच्या पाचवी ला शस्त्र पूजन केले. शंभू महादेव तुम्हाला
उदंड यश देवो !" इतक्यात तेथे उमाबाई आल्या नि म्हणाल्या,
" बाळाच्या बारशाची तयारी करायला हवी. सिंदखेड ला खलिता आणि साखरेची थैली पाठविली आहे, परंतु....
असे बोलून मध्येच थांबले. तसे लगेच जिजाबाईंनी विचारले,
" मध्येच बोलायचे का थांबले सासूबाई साहेब ?पण आमच्या लक्षात आले ते. बारशा ला कोण येणार याचीच चिंता लागून राहिली आहे ना ?" त्यावर उमाबाई म्हणाल्या," नाही तसे सिंदखेड वाले येतीलच सर्व. पण...?" परत बोलता बोलता मध्येच थांबल्या. तशा जिजाबाई म्हणाल्या," तुम्हाला मोहीमे वर गेलेल्या स्वारीची नि आबा साहेबांची चिंता लागली आहे ना, म्हणजे बाळ राजांचे आबा साहेब येताहेत का थोरले आबा साहेब येताहेत का दोघेही येणार नाहीत." असे म्हणताच दोघींचे ही चेहरे एकदम गंभीर झाले. काय बोलावे ते सुचत नव्हते.
सिंदखेड लखुजी राजे गढी
म्हाळसा बाईना खबर मिळताच त्यांनी ती खबर मधल्या
बाईना दिली तश्या मधल्या बाई म्हणाल्या," आपल्याला
ताबडतोब निघायला हवं. जिजाबाई अजून लहान आहेत
त्यांना कसं कळणार लहान बाळ पाच प्रकारे रडते ते. बाळ भूक
लगल्या मुळे रडतंय का पोटात दुखत असल्यामुळे रडतंय
का झोप आल्यामुळे रडतंय हे काही काही कळणार नाही
त्यांना ." म्हाळसा बाई म्हणाल्या," पण तुम्ही तर जिजावर
रागवला होता ना ?" यावर भागीरथी बाई म्हणाल्या," आम्ही
अजूनही त्यांच्यावर रागावलेले आहोत, बाळाचे पहिले रडणे
आम्हाला का नाही ऐकू दिलं, इथं यायचं होतं. आम्ही केलं
नसतं का ? आणि समजा इथं यायचं नव्हतं मनात ते आम्हाला
तिथं बोलवायचं होतं , आमच्या कानात बाळाचा आवाज कधी
पडणार आहे कोण जाणे ? " किंचित विचारमग्न झाल्या. नि
लगेच आठवल्या सारखं करत त्या म्हणाल्या," थोरल्या बाई,
तिथं मालिश करणारी बाई असेल का हो ? म्हणजे हाडांना बळकटी यायला पाहिजे ना ?" त्यावर म्हाळसा बाई म्हणाल्या,
" अहो हो हो मधल्या बाई ! जिजानी बाळाला रानात जन्म दिला नाही. तिकडेही साऱ्या सोयी आहेत, उमाबाई आहेत, सोयराबाई आहेत."
" खरंच आमही खूळ लागल्यागत बोलतोय नाही का ? पण
काय करणार , कुणालाही बाळ झालं की आम्हाला असंच काही
होतं, त्यात करून बाळ आमच्या जिजाना झालंय मग आम्ही भानावर असणे मुश्किलच आहे. आमच्या कडे अश्या नको
पाहू. लवकर कधी जायचे ते ठरवा. आम्ही तयारीला लागतो."
मोंगलाची छावणी
शहाजी राजे तलवार उपसून लपत छपत लखुजी राजाच्या
छावणीत शिरले. लखुजी राजांची त्यांच्या कडे पाठ होती. पण
ते बेसावध नव्हते. कुणी तरी आंत आल्याची चाहूल लागली
तशी शमशेर उपसून गरकन मागे वळले नि वार केला. पण
तो वार शहाजी राजांनी आपल्या तलवारी वर घेतला. तेव्हा
लखुजी राजांनी म्हंटले," आम्ही मात्र तुमच्या समोर येण्याचे
टाळत होतो. पण आता तुम्ही आमच्या साठी दुसरा पर्याय ठेवला नाही." त्यावर शहाजी राजे म्हणाले," आबा साहेब,
आम्ही आपल्या वर तलवार चालवण्यासाठी नाही आलोय."
" तलवार चालवून ही नाही म्हणता."
" आबा साहेब, आम्ही तलवार उपसून आलो ते रस्त्यात
कुणी आडवे आले तर त्यासाठी होती तुमच्या साठी नव्हे !"
" दुश्मनाच्या छावनीत आलात मग दुसरं काय म्हणणार ?"
" आम्ही आपल्याला आनंदाची बातमी द्यायला आलोय.
आपण आजोबा झाला आहात. तुमच्या लाडक्या जिजा
आऊ झाल्या आहेत."
" काय सांगता राजे, खरंच का ? आम्ही थोरले आबा साहेब
झालोत ?"
" हां आबा साहेब हां !"
" मग तर गळाभेटच घ्यायला हवी." असे म्हणून आपली
तलवार म्यानात परत ठेवून दिली. आणि दोघांनी एकमेकांना
आलिंगन दिले.
सिंदखेड
यमुना बाई दत्ताजी राजांचे पुत्र यशवंत राजेना घेऊन
म्हाळसा बाई जवळ आल्या नि म्हणाल्या," आता आम्हाला
आमचं पूर्ण नाव सांगता येतं. पण आम्ही असं नाही सांगणार
आम्हाला थोरल्या आऊ साहेबां कडून बक्षीस हवं आहे."
असं बाळ राजांचे म्हणणे आहे." म्हाळसा बाई म्हणाल्या," हो
का ? आम्ही तुम्हाला नक्कीच बक्षीस देवू पण आधी तुमचं नाव
सांगा बरं." तसे त्याने आपले नाव सांगितले. यशवंत दत्ताजी
जाधव." तश्या यमुना बाई म्हणाल्या," अगदी दत्ताजी राजे
वरच गेले आहेत. खेळण्यातील सर्व तलवारी तोडून झाल्यात.
आता खरोखरची तलवार हवीय आम्हाला." म्हाळसा बाई
म्हणाल्या ," हो का ? ती पण देवू पण त्या अगोदर एक आनंदाची बातमी द्यायची आहे, पण तुमची परवानगी असेल
तर !" यशवंत राजे म्हणाले," आहे आमची परवानगी सांगा
काय बातमी आहे आनंदाची ?" म्हाळसा बाई म्हणाल्या,
" तुम्हाला ना सख्खा आते भाऊ झालाय. तुमच्या आबा
साहेबांची एक लाडकी बहीण आहे जिजा त्यांना बाळ झालं."
" काय सांगता थोरल्या बाई खरंच का ?" यमुना बाई
हर्शभराने म्हणाल्या. यशवंत राजे म्हणाले," मग आम्ही पण
येणार , तुमच्या बरोबर, आमचे आबा साहेब फसवून गेले. येतो
म्हणून सांगितले नि अद्याप आलेच नाहीत." असे म्हणताच
त्या दोघींचा चेहरा मात्र उदास झाला. इतक्यात एक संदेश वाहक आला नि खलीता देवून गेला. म्हाळसा बाईंनी तो
खलीता वाचला. त्यात जिजाबाईंना बाळ झाले त्याची बातमी
होती. तुम्ही सर्वांनी आपल्या इतमाना ला शोभेल अशी तयारी
करून बारशाला जा. उत्तरे कडे हालचाली वाढल्या आहेत. कदाचित आम्ही माघार घेऊ."
भोसले गढी
जिजाबाई बाळ राजांना घेऊन बाहेर आल्या. तेव्हा गोमाजी
म्हणाला," जिजा अक्का , बाळ जन्माला आला तेव्हा तुमच्या
वाणी दिसत होता पण आता राजे वानी दिसतोय. तुम्हाला
जाणवत नाही का ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," मला तर
पहिल्या दिवसापासूनच वाटतोय, पण हे स्वारी ना कोण सांगणार, आपल्या पाठी मागे पण दोन डोळे वाट पाहत आहेत.
मोहीमे वर गेले की इथल्या सर्वांना विसरून जातात." गोमाजी
म्हणाला," पण मला काय वाटतं जिजा अक्का राजे बाळाच्या
बारशाला नक्की येणार." तशा हर्शभरांने जिजाबाई म्हणाल्या,
" म्हणजे मोहीम संपली म्हणायची तर !"
" नाही. मोहीम नाही संपली तर तिकडे उत्तरेला बंडखोरी
झाली आहे, म्हणून इकडची मोहीमेचा गाशा गुंडाळला."
" मग तर फारच छान झालं. स्वारी पळतच येतील. बाळ
राजांना पहायला."
गोदा बाळ राजांना घेऊन इकडून तिकडे येरझाऱ्या घालत
असताना विचारते," बाळ राजे तुमचं नाव काय ठेवायचं बरं."
त्यावर जिजाबाई एकदम प्रसन्न मनाने म्हणाले," अग गोदा किती छान कल्पना आहे तुझी ? नाही म्हणजे आपलंच आपल्याला नाव ठेवता आलं असतं तर किती मजा आली असती नाही ?" इतक्यात तिथं जाऊबाई आणि गोदावरी बाई आल्या. जाऊबाई म्हणाल्या की, बाळ राजांचे काय नाव ठेवायचं ठरलं बरं ? नाही म्हणजे कसं आहे तुमचं सर्काही विशेषच असतं ना, म्हणजे बोलणं चालणं, वागणं सर्वच काही विशेष मग नाव देखील विशेषच असेल." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," नाही अजून काही ठरलं नाहीये. पण शंभू महादेवच काहीतरी सुचवतील." तश्या जाऊबाई म्हणाल्या ," हो ना मग आम्ही तोपर्यंत ह्यांना शंभू महादेवच संबोधित करतो " असे बोलून गोदावरी बाईंच्या हातात एक छोटीशी संदुक.असते ती उघडुन त्यातून अलंकार काढत त्या म्हणाल्या," शंभू महादेव आता तुम्हीच सांगा ह्यातले कोणते डाग हवेत तुम्हाला ? नाही सांगितलंत तर मी जे देईन ते घ्यावे लागतील बरं का ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," अहो, जाऊबाई कशाला देताय हे सर्व ? बाळ राजांना फक्त तुमचा आशीर्वाद पुरेसा आहे." जाऊबाई म्हणाल्या, " तो तर देवून आम्ही ! परंतु हे डाग आमच्या आता काही कामाचे नाहीत, म्हणून ते आम्ही सर्वांना वाटून टाकणार आहोत. पण त्याची सुरुवात बाळ राजाकडून करणार आहोत. हो की नाही हो बाळ राजे ?" जिजाबाई म्हणाल्या," गोदा तुला
माहितेय, जाऊबाई ना दागिने घालायची किती हौस होती ती !"
" हो होती हौस पण आता ती कोमजून गेली."
इतक्यात नौबती वाजू लागल्या तशी गोदा म्हणाली," अरे वा बाळ राजाच्या बारशाला कोण कोण आलंय ते पाहू !" जिजाबाई म्हणाल्या ," म्हणजे बाळ राजांच्या बारशाला त्यांचे आबा साहेब येणार वाटतं." तसे सगळेजण बाहेरच्या दिशेने निघाले. दरवाजात उभे राहून वाट पाहू लागले कोण कोण येतेय ते. सर्वात पहिल्यांदा शहाजी राजे आणि शरीफ जी राजे आले.
त्यांना पाहून जिजाबाईंना फार अत्यानंद झाला. त्यांच्या पाठोपाठ लखुजी राजे पण आले नि मग जिजाऊंच्या तिन्ही
आऊ साहेब पण आल्या. आणि सोबत दत्ताजी राजेंचा पुत्र
यशवंत राजे पण आले. त्या सर्वांना बारशाला आल्याचे पाहून
सर्वांनाच आनंद झाला. जणू काही संभाजी राजेंच्या मृत्यू ने
दोन्ही घराण्यात झालेली कटुता बाळ राजांचा आगमनाने
संपली असेच सध्यातरी वाटत होते. जिजाबाई बाळ राजांना
शहाजी राजांच्या समोर आणले. शहाजी राजांनी त्यांना न्याहाळून पाहिले. इतक्यात लखुजी राजे पुढे आले नि त्यांनी
बाळ राजांना एकदम जवळून पाहिले नि हातातील कडे काढून
बाळ राजे नि जिजाबाई याच्या वरून ओवाळून ते कडे गोमाजी
ला दिले. गोमाजी चे डोळे भरून आले म्हणून हिराजी ने
विचारले," गोमाजी काका कडे मिळाले म्हणून अश्रू आले का
डोळ्यात ?" त्यावर गोमाजी म्हणाला," नाही रे, गड्या, म्हणून
नाही सगळे आले म्हणून आनंद झालंय मला." लखुजी राजे
म्हणाले," बाळ राजे, आता तुम्ही कुळांचे नाव उज्ज्वल करा
बरं का ?" तेवढ्यात पाठीमागून म्हाळसा बाई म्हणाल्या," अहो,
झालं की नाही तुमचं ? आम्हाला पण बाळ राजांना पाहू द्या.व्हा
मागे." लखुजी राजे मागे हटले. तश्या म्हाळसा बाई आणि
भागिरथी बाई पुढे आल्या. त्यांनी बाळाला न्याहाळत म्हटले,
" मधल्या बाई बाळ राजांचे डोळे एकदम जिजा सारखे दिसतात." म्हाळसा बाई उद्गारल्या," अरे हो खरंच की !"
भागिरथी बाई म्हणाल्या," जिजा, आता तुम्ही आऊ झालात
तेव्हा आम्ही आऊ या नात्याने तुम्हाला जे काही बोललो ते
विसरून जा बरं!" तेवढ्यात यशवंत राजांना जाग येते तसे ते म्हणाले," आम्हाला पण बाळ राजांना पहायचे आहे." म्हाळसा बाई म्हणाल्या, " उठलेत का यशवंत राजे. या ." यशवंत बाळ राजाकडे येतात नि हट्ट करू लागलात की बाळ राजांना आमच्या मांडीवर द्या." म्हाळसा बाई म्हणाल्या," यशवंत राजे तुम्ही अजून लहान आहात ? बाळ राजांना कसे घेणार बरं ?"
म्हाळसा बाई एकटक आपल्या लेकी कडे पाहतच राहिल्या.
म्हणून जिजाबाईंनी त्यांना विचारले की असं काय पाहताय
आमच्याकडे?"त्यावर जिजाबाई म्हणाल्या," किती दिवसानंतर
तुमच्या चेहऱ्यावर तेज पाहत आहे." त्यावर जिजाबाईनीं
सांगितले की, हे केवळ स्वारी ना नि आबा साहेबांना एकत्र
पाहून आमच्या मनातील शंका कुशंका साऱ्या काही दूर झाल्या." त्यावर म्हाळसा बाईंनी फक्त होकारार्थी मान डोलावली. बाळाला आपल्या मांडीवर देत नाहीत म्हणून ते
ते थेट म्हाळसा बाई कडे गेले नि म्हणाले की आम्हाला बाळ राजांना घ्यायचे आहे. " पण त्यांनी देखील नाही म्हटले म्हणून त्यांनी सरळ जिजाबाई कडे मागणी पण सरळ जिजाबाईचे नाव घेऊनच. तेव्हा म्हाळसा बाईंनी त्यांना समजावले की , त्या तुमच्या आत्याबाई आहेत, तेव्हा त्यांना आत्याबाई च म्हणायचं.
तेव्हा जिजाबाईंनी यशवंत राजांना विचारले," तुम्हाला काय
पाहिजे ते मागा तर ते म्हणाले," आम्ही बाळ राजांचे नाव ठेवू
का ?" तेव्हा भागिरथी बाई ने म्हटले," स्वतःचे नाव तरी
सांगता येते का ?" त्यावर यशवंत राजेंनी आपले स्वतःचे
संपूर्ण नाव बरोबर सांगितले. त्यावर जिजाबाई म्हणाल्या,
" हे तर तुमचे नाव झाले बाळ राजाचे नाव काय ठेवणार ?
असे विचारले असता एक क्षणाचा ही विलंब न करता त्यांनी
दत्ताजी राजे असे नाव सांगितले. परंतु हे नाव ऐकून मात्र
सर्वांच्या चेहऱ्यावर चा रंग बदलला. तो प्रसंग सर्वांच्या
डोळ्यासमोर उभा राहिला. क्षणभर कोणीच काही बोलले
नाही इतक्यात तेथे गोदा आली नि म्हणाली," थोरल्या बाई
साहेब आपल्याला थोरल्या बाई साहेबांनी बोलविले आहे.
म्हाळसा बाई उमाबाई च्या दालनात गेल्या असता तेथे सोयरा
बाई पण होत्या. त्यांना तिथं पाहून किंचित चापापल्या खऱ्या !
पण लगेच गैरसमज दूर झाला. सोयराबाईंनी सांगितले की
बाळ राजे जन्मा ला आले नि आमची नजरच बदलून गेली.
आम्ही मागचे सारे विसरलो आहोत. आता आपण ही मागचे सारे विसरून जावे. म्हाळसा बाई म्हणाल्या," बाळ राजांचा पायगुण तसा आहे." त्यावर उमाबाई म्हणाल्या," बाळ राजांनी सगळ्यांना जोडले. आता आपली जबाबदारी आहे की आपण
सर्वांनी एकत्र गुण्या गोविंदाने राहावे.कायम."
त्यानंतर बारशा च्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जिजाबाई
ची ओठी भरण्यात आली. त्यावेळी बाळ राजे यमुना बाई कडे
होते. ओठी भरण्याच्या वेळी बाळ राजे कोणाकडे द्यावे असा
विचार त्यांच्या मनात येत होता इतक्यात जाऊबाई म्हणाल्या,
बाळ राजांना आमच्या कडे द्या. तसे यशवंत राजे म्हणाले,
" नाही. आमच्या कडे द्या." त्यावर जाऊबाई हसून म्हणाल्या
" या तुम्ही पण म्हणजे बाळ राजे तुमच्या कडे राहतील."
असे म्हणून त्यांनी यशवंत राजांना आपल्या जवळ घेतले.
आणि एका हातात बाळ राजांना घेतले. हा त्रिवेणी संगम
पाहून हिराजी ला मोठे आश्चर्य वाटले. म्हणजे संभाजी राजानी
ज्याच्या बापाला मारले. त्याच्या मुलाला जाऊ बाईंनी जवळ
घेतले. म्हणजे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. नाही का ?"
शहाजी राजांनी विचारलं," बाळाचे नाव काय ठेवायचं ठरलं.?"
त्यावर लगेच जिजाबाई म्हणाल्या," आता तुम्ही आला आहात
तर बाळाचे नाव तुम्हीच ठेवा." उमाबाईचे म्हणणे देखील
तेच असते. म्हणून शहाजी राजे गोदावरीच्या कानात बाळ
राजांचे नाव सांगतात. गोदावरी बाई ते बाळाच्या कानात
सांगून हुर्रे करतात. तेव्हा म्हाळसा बाईंनी विचारले," बाळाचे
नाव काय ठेवले ते आम्हाला तरी सांगा." तश्या गोदावरी बाई
म्हणाल्या," संभाजी राजे." हे नाव ऐकताच जाधव मंडळी ना
मात्र हे आवडलं नाही. म्हणजे त्यांच्या सुकलेल्या जखमे वरची
खपली काढली असे झाले जणू ! आणि भागिरथी बाई नाराज
होत हळूच म्हाळसा बाईच्या कानात कुजबुजल्या की नाव
काय ठेवलं तर संभाजी !" तसे म्हाळसा बाईंनी त्यांना समजावले की मधल्या बाई शांत रहा." इतक्यात मंबाजी राजांनी येऊन वर्दी दिली की वजीरे आलम मलिक अंबर येत
आहेत. आणि थोड्याच वेळात ते तिथं हजर ही झाले. त्यांनी
बाळा साठी भेट तर आणलीच होती. पण त्या व्यतिरिक्त
शहाजी राजांच्या साठी मनसबदारीचा फर्मान आणले होते.
शहाजी राजांची मनसबदारी आता पाच हजारी वरून बारा
हजार करण्यात आली होती शिवाय बाळ राजा साठी तीन
गावे बहाल केली होती. शहाजी राजांनी त्यांचे आभार मानले.
लखुजी राजांना मुद्दाम चिडविण्याच्या हेतूने म्हणा. मलिक
अंबर म्हणाला की आमच्या सोबत राहील त्याची अशीच
भरभराट होईल. काय लखुजी राजे बरोबर ना ? " असे बोलून
शहाजी राजांना उद्देशून म्हणाले,' रिश्तेदारी कैसी निभानी है,
यह कोई आपसे सीखे शाहजी राजे, जग में एक दुसरे के
खिलाफ ओर यहां एक दूसरे से गले मिल रहे हो ।" त्यावर लखुजी राजे म्हणाले," यह सब हम आप से ही।सीखा है, फतेह खान रिश्ता इब्राहिम अदील शाह के बेटी के साथ जोड़ते है, और दूसरी तरफ अपनी बेटी का रिश्ता शहाजान के साथ जोड़ते है, मतलब यह एकी समय में, निजाम शाही , अदील शाही, और मुगल तीनो के साथ रिश्ता जोड़ते है।" मलिक अंबर म्हणाला," लखुजी राजे यह बात सिर्फ रिश्तोंकी नहीं है , आपको युद्ध में सीखस्त मिली उसने आपको बहुत कुछ सिखा दिया है, बस आगे आगे देखो होता है क्या ? हर सिखस्त पर एक नई सीख मिलेगी ।" असे बोलून तेथून चालता झाला. पण हा अपमान लखुजी राजांच्या जिव्हारी लागला. ते म्हणाले,
" आमचा अपमान करण्यासाठी कार्यक्रमाला बोलविले होते का ?" पण दुसरा कोणी बोलण्या अगोदरच मंबाजी राजे म्हणाले ," लखुजी राजे कार्यक्रम तर केव्हाच आटोपला." तसे लखुजी राजे म्हणाले," चला आता आपण लगेच निघायचं." असे म्हणून लखुजी राजे आणि त्यांच्या तिन्ही राण्या आणि यशवंत राजे सगळे निघून गेले. क्षणा पूर्वीचा आनंद मावळला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा