रामायण भाग १८ | Ramayana episode 18 | Author : Mahendranath Prabhu.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रामायण भाग १८ | Ramayana episode 18 | Author : Mahendranath Prabhu |
श्रीरामांचा रथ जस जसा पुढे सरकत होता. तस तशी
अयोध्येतील प्रजा देखील पुढे पुढे सरकत होती. आणि
सतत श्रीरामाना विनंती करत होती. की आम्हाला सोडून
जाऊ नका. जी अवस्था लोकांची झाली त्याच्या ही पेक्षा
वाईट स्थिती महाराज दशरथांची झाली होती. आपल्या
भवनात महाराणी कौशल्या सोबत बसल्या होत्या.
महाराज दशरथ दुःखी अंतकरणाने श्रीरामाचा जप करत
होते. महाराणी कौशल्या ह्यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वहात होत्या. तीच अवस्था लक्ष्मणाच्या पत्नीची
अर्थात उर्मिला नि माता सुमित्रांची होती. कोणीही कोणाशी बोलत नव्हते. श्रीरामाचा रथ नदीच्या किनाऱ्यावर येताच
आर्यसुमन्त ने रथ थांबविला. आणि तशी पण संध्याकाळ
झाली होती म्हणून श्रीराम सर्वांना उद्देशून म्हणाले," लोक
हो , आता संध्याकाळ होत आली आहे तेव्हा तुम्ही आता
इथून माघारी जा." त्यावर कोणीतरी म्हणाले ," आम्ही
जाण्यासाठी आलेलो नाही. तेव्हा श्रीरामानी न समजून
विचारले," म्हणजे ? तुम्ही आमच्या सोबत कुठपर्यंत
येणार बरं ?" त्यावर कोणीतरी म्हणाले," फक्त चौदा वर्षे "
श्रीरामानी त्याना अनेक प्रकारे समजावून पाहिले. परंतु
कोणालाही वापस जाण्याची इच्छा नव्हती. प्रत्येकाचे एकच म्हणणे होते आणि ते म्हणजे तुम्ही जिथं राहाल तिथंच आम्ही देखील राहू ! आणि फक्त इतकेच नाही तर आम्ही त्या स्थानावर आपली राजधानी निर्माण करू नि आपण आमचे राजा नि सीता आमची महाराणी आम्ही तुम्हां दोघांना कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही. परंतु कृपा करून आमचा त्याग करू नका." तेव्हा श्रीराम म्हणाले , " नाही. तुम्ही असं केलात तर उद्या माता कैकेयी
माझ्यावर आरोप करू शकते की मी अयोध्येतील प्रजेला
भडकवून आपल्या सोबत घेऊन गेलो. शिवाय तुमच्या
मागोमाग अयोध्येतील अजुन काही लोक अयोध्या सोडून आले तर उद्या भरत काय म्हणेल ?" त्यावर एकजण म्हणाले , " त्याला काही म्हणायचे ते म्हणू दे परंतु आम्हाला परत अयोध्येला जायचं नाही. आणि आमचा हा अटळ निर्णय आहे." श्रीरामाना काय करावे सुचत नव्हते. आपल्या विषयी प्रजेचे प्रेम पाहूंनी श्रीराम एकदम भावूक झाले. परंतु काही झाले तरी प्रजेला वापस पाठविने गरजेचे आहे. लोक अयोध्येला परत जाण्यास तयार नाहीत. म्हणून मग त्यातून एक उपाय शोधून काढला नि श्रीराम आर्यसुमन्त ला म्हणाले ," आज रात्र आपण इथंच थांबू ! सर्वांच्या जेवणाची सोय करा. सकळ होताच पुढचा निर्णय घेऊ."असे श्रीरामानी सांगितले तशी सारी प्रजा आनंदीत झाली. रात्री सर्वजण निद्राणीन झाले. केवळ लक्ष्मण पहारा देत बसला होता आणि उर्मिलला राजमहालात आपल्या भवन मध्ये बसली होती. तिला आपल्या स्वामींचे शब्द आठवले. लक्ष्मण म्हणाले,
" उर्मी आपल्या दोघांचा या पुढचा प्रवास खडतर आहे.
मी वनात राहून दादा आणि वहिनीची सेवा करणार आणि
तू इथं राहून माता कौशल्येची सेवा कर. कारण त्यांची ना
इथं पुत्र आहे आणि नाही सून त्यांच्या सोबत आहे. म्हणून त्यांना चौदा वर्षे जिवंत ठेवायचे असेल तर तुला त्यांची मनभावें सेवा करावी लागेल. अर्थात त्याना चौदावर्षे सांभाळण्याचे काम मी तुझ्यावर सोपवत आहे." हे तिला तिच्या स्वामीने सांगितलेले आठवले. तेव्हा तिच्या मागे तिची सासू महाराणी सुमित्रा होत्या त्या पुढे आल्या नि त्यांनी तिला विचारले ," तू अजून झोपली नाहीस ?" त्यावर उर्मिला ने विचारले ," आपण पण तर झोपल्या नाहीत ?" तेव्हा महाराणी सुमित्रा म्हणाल्या," कोण झोपलंय , कुणी नाही. सारा राजमहाल जागत आहे. महाराज थोड्या वेळासाठी शुध्दीवर येतात नि फक्त राम राम म्हणतात नि पुन्हा बेशुद्ध होतात. असं वाटतं की राम सोबत सर्वांची निंद सुद्धा अयोध्या सोडून निघून गेली आहे. त्यावर उर्मिला म्हणाली, " आई , एक रात्र सुध्दा काढणे कठीण झाले आहे तिथं चौदा वर्षे कशी काढणार ?" त्यावर महाराणी सुमित्रा म्हणाली," असं का बोलतेस बेटी ? असं
का नाही म्हणत आहेस की चौदा वर्षा तील एक दिवस
कमी झाला. आजची रात्र निघाली तर चौदावर्षे पण
हां हां म्हणता निघून जातील."
सर्वजण निद्राणीन होते. आणि लक्ष्मण फ़क्त पहारा
देत बसला होता. अचानक श्रीरामाने आपले डोळे उघडले. आणि आपल्या बाजूला झोपलेल्या सीतेला
उठविले. आणि मग तिघेही आर्यसुमन्त जिथे झोपले होते
तेथे आले नि आर्यसुमन्तच्या खांद्याला पकडून हलवून
उठविले. आर्यसुमन्त उठल्यानंतर श्रीराम म्हणाले ,
" आपल्याला या क्षणी इथून निघायला हवं."
" ह्यांना असंच सोडून ?"
" हां त्या शिवाय दुसरा पर्याय नाही."
" परंतु असं केल्याने त्या बिच्चाऱ्या वर फार अन्याय
होईल."
" मला कल्पना आहे त्याची ! परंतु दुसरा काय उपाय
आहे ? हे लोक आमच्या सोबत आले तर ह्यांच्या परिवारातील लोक काय करतील बरं ? म्हणून ह्यांना इथंच
सोडून आपण निघून गेलो हे आपल्या परिवारात
जातील. असे म्हणून श्रीराम आपल्या निद्राणीन असलेल्या
प्रजेला प्रणाम करतात. तेव्हा लक्ष्मण ने विचारले," दादा ,
आपण कोणाला प्रणाम करत आहात ?"
" लक्ष्मण , हे लोक निद्राणीन आहेत त्यांच्या हृदयात
आपल्या विषयी फार प्रेम आहे म्हणून ते आपल्याला
सोडून जाऊ इच्छित नाही. परंतु आम्हा पेक्षा त्यांच्या
परिवाराला त्यांची फार गरज आहे.म्हणून आपण त्या
सर्वांना इथंच सोडून जात आहोत.आपला प्रणाम हा
त्यांच्या निस्वार्थ भक्तीला असेल.म्हणून त्यांना प्रणाम
कर." लक्ष्मणाने त्याना प्रणाम केला. आर्यसुमन्त रथ
अगोदर पूर्व दिशेला घेऊन चला नि मग दक्षिण दिशेला
कारण हे लोक जेव्हा उठतील तेव्हा त्यांना कळले
नाही पाहिजे की जाणारी लोकं कोणत्या दिशेला गेली.
आणि असे केले तरच हे लोक आपल्या घरी जातील."
तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले ," जशी आपली आज्ञा महाराज !" असे म्हणून आर्यसुमन्त रथ घेऊन पूर्व
दिशेला निघाले.
सकाळ झाली तसे सगळे उठले नि त्या तिघांना शोधू
लागले. श्रीराम कोठे गेले ? लक्ष्मण दादा कोठे गेले नि
सीता माता कोठे गेल्या ? असे म्हणत त्या तिघाना शोधू
लागले होते.आणि लवकरच त्यांच्या लक्षात आले की
श्रीराम , लक्ष्मण आणि सीता आपल्याला वनात निघून गेले.तिकडे आर्यसुमन्त ने एका स्थानावर रथ थांबविला.
तेव्हा श्रीरामानी विचारले की आर्यसुमन्त रथ का थांबविला ? " तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले ," राम ही आपल्या कौशल देशाची सीमा संपली. इथून पुढे तुम्ही
आपली जनभूमी सोडून जात आहात." तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले,
" लक्ष्मण , इथं अयोध्याची सीमा संपली. म्हणून
आपण आपल्या जन्मभूमीला प्रणाम करू या !' असे
म्हणून ते तिघेही रथातून खाली उतरले नि त्यांनी भूमीला
प्रणाम केला. नि म्हटले," आई, जन्मभूमी मी आज तुझ्या
पासून दूर जात आहे. परंतु मी जिथं असेन तिथं तुझी
आठवण सदैव राहील. म्हणून तुझ्यातील थोडी माती सोबत घेऊन जात आहे. कारण मला तुझ्या मातीचा टिळक मला करता यावा." असे म्हणून थोडीशी माती घेतली नि पुन्हा रथा जवळ आले तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले ," इथून पुढे निषादराज सिंगेपूर ची सीमा सुरू होते." तेव्हा श्रीराम उद्गारले," निषादराज sss माझा मित्र !" त्याच वेळी निषादराज राज चा एक पहारेकरी
झडावर चढून टेहळणी करत असतो.त्याने श्रीरामाचा रथ
पाहिला.परंतु दूर दूर त्या चौघा व्यतिरिक्त अन्य कोणी
दिसला नाही.
निषादराज चा एक दूत निषादराज च्या दरबारात हजर झाला नि त्याने खबर दिली की गंगेच्या पलीकडे एक
रथ दिसला. त्या रथावर अयोध्या राज्याची द्वजपताका फडफडत आहे.आणि रथामध्ये दोन धनुर्धारी कुमार
आणि सोबत एक स्त्री पण बसलेली दिसली."
" आणि त्यांच्या सोबत सैन्य नाहीये का ?"
" नाहीये. मी त्यांचा पाठलाग केला.ते आपल्या सिंगेरपूरच्या सीमेवर येऊन एका वटवृक्षा खाली थांबले
आहेत."
" दोन कुमार आणि एक स्त्री आणि एक सारथी पण कोण असतील बरं ?"
" राजाजी सारथी त्या दोघांना कधी कुमार म्हणत होतं तर कधी श्रीराम म्हणत होता."
" काय ? म्हणालास ......श्रीराम !"
" हां श्रीराम !"
" अयोध्या चे कुमार श्रीराम माझे परम मित्र आहेत.
मी जेव्हा गुरूच्या आश्रमात शस्त्रविद्या शिकत होतो ना
तेव्हा आमची मैत्री झाली." असे म्हणून निषादराज किंचित
विचार करून म्हणाला," याचा अर्थ आमचा मित्र आम्हाला
भेटायला आमच्या राज्याच्या सीमेवर आले आहेत. मी आज धन्य झालो." त्यावेळी त्याच्या शेजारी बसलेली स्त्री म्हणाली ," तू तर नेहमी असंच म्हणतोस की त्यांनी तुला वचन दिले आहे की एक दिवस ते आपल्या गावात येणार आहेत आपल्याला भेटायला."
" हो त्यांनी मला तसे वचन दिले होते. परंतु एक राजा
आपल्या गावंढळ मित्राला भेटायला खरोखरच येईल याचा
विश्वास तेव्हाच होईल.जेव्हा मी प्रत्यक्ष माझ्या या डोळ्यांनी पाहीन तेव्हाच विश्वास होईल."असे ते म्हणून
पुढे म्हणाला ," एक काम कर आपल्या सिंगापूर गावात
अयोध्येचे राजा येणार आहेत." तसा नगारा वाजवून
पूर्ण गावाला गोळा केले.त्यानंतर निषादराज सर्वांना
उद्देशून म्हणाला," अयोध्येचा राजा आपल्याकडे येतो
आहे, तेव्हा आपण त्यांच्या स्वागताला त्या वटवृक्षा जवळ
जायला हवं." असे म्हणताच पूर्ण गाव निघाला गंगा
नदीच्या काठी !"
श्रीराम म्हणाले ," आजची रात्र आपण इथंच त्या
वटवृक्षाच्या सावलीत काढू उद्या पहाटे गंगेच्या पलीकडे
जाऊ ! " त्यानंतर लक्ष्मणाने वटवृक्षा खालची जमीन
आपल्या उपरण्याने स्वच्छ केली. त्यावर श्रीरामना
बासायला सांगितले. श्रीराम आणि सीता दोघेही वटवृक्षाच्या सावलीत बसले. त्यानंतर लक्ष्मण रथात
असलेले आपले धनुष्य आणायला गेला परंतु त्या
अगोदर आर्यसुमन्त धनुष्य आणि भाता घेऊन येत
असतात तेव्हा लक्ष्मण त्यांच्या हातून ती आपली शस्त्रे
घेतो नि वटवृक्षा खाली ठेवून देतो. तेव्हा आर्यसुमन्त ने
श्रीरामाना विचारले की श्रीराम इथून पुढे निषादराजच्या
गावची सीमा लागते. तेव्हा आपण इथं आल्याची सूचना
आपल्या मित्राला देऊ का ?" त्यावर श्रीराम म्हणाले,
" नाही. त्याना कशला उगाच त्रास देता , उद्या सकाळी
आपण गंगा पार करून प्रस्थान करायचे आहे."
निषदराजच्या त्या माणसाने सर्व गावकऱ्यांना गोळा
केले नि सर्वांना उद्देशून निषादराज म्हणाले," बंधू हो
आज माझे स्वामी आले आहेत.माझे परम मित्र श्रीराम अयोध्या चे राजकुमार आपल्या गावच्या सीमेवर आले आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी उपहार घेऊन चला. तशी उपहार ची त्याना गरज नाही. कारण आमचे स्वामी श्रीराम फक्त भक्तीचे भुकेलेले आहेत. तेव्हा चला सर्वांनी गंगेच्या किनाऱ्यावर." असे म्हणून सर्वजण गंगेच्या किनाऱ्यावर जायला निघाले सुध्दा आणि थोड्या वेळात राम ज्या वटवृक्षा खाली बसले होते तेथे पोहोंचले. नि मोठ्या ने म्हणाले ," राजा राम आम्ही आपल्या दर्शनाला आलोय. सरदार ss तेव्हा श्रीराम म्हणाले ," सरदार नाही मित्र म्हण. सखा ! " असे म्हणून निषादराज ला श्रीरामानी आलिंगन दिले. तेव्हा निषादराज खुश होत म्हणाला," आमचे सारे गावकरी आपल्या दर्शनासाठी आले आहेत. तेच तुम्ही इथं बसा. श्रीराम बसले मात्र निषादराज चे गावकरी रांगेने श्रीराम चे श्रीचरणी आपले मस्तक ठेवत होते. काहींनी कलिंगड, केळी सारखे फळे श्रीरामाना भेट म्हणून आणले होते. तेव्हा श्रीराम म्हणाले," मित्र तुझ्या परिवारातील सर्व मंडळी क्षेमकुशल तर आहेस ना ?"
" आपल्या आशीर्वादाने सर्वकाही कुशलमंगल आहे."
" तुझ्या गाववाल्यानी जी सामुग्री भेट म्हणून दिली
आहे त्याचा मी स्वीकार करतो. परंतु दुसऱ्या ने दिलेली
वस्तू ग्रहण नाही करू शकत नाही. आता मी एका तपस्वी
मुनी सारखे जीवन जगायचे आहे आणि ते पण वनात राहून." त्यावर न समजून निषादराज ने विचारले," वनामध्ये तपस्वी बनून ? हे मला कळले नाही सरकार ?"
" अजून आपण आम्हाला हे नाही सांगितले की हा
मुनिवेष आपण धारण का केला ? हे अनोखी रुप आपण
का घेतले आहे ? अयोध्याचे राजकुमार मुनिवेष मध्ये
आम्हाला काहीच कळेनासे झालंय. लक्ष्मण दादा ने पण
मुनींची वेश धारण केली आहे आणि ह्या....?"
" ही जनक नंदनी सीता तुझी वहिनी !"
" वहिनी नाही नाही माझी तेवढी पात्रता नाहीये. अयोध्याच्या महाराणी म्हणजे आमची आई ! सिताआई
मी आपले चरणस्पर्श करतो." असे म्हणून त्याने सीतेचे
चरणस्पर्श केले. तेव्हा सीता त्याला म्हणाली ," नाही.
आमच्यासाठी जसे लक्ष्मण दादा तसेच आपणही !"
" महाराणी सीता की जय !"
" अजून आपण आम्हाला हे नाही सांगितले की
मुनींचा वेष धारण का केला आहे ?" परंतु श्रीराम त्याच्या
ह्या प्रश्नांचे काहीच उत्तर देत नाहीत तेव्हा आर्यसुमन्त
म्हणाले," निषादराज तुझे मित्र तुला आपल्या सावत्र
आईच्या कर्तुत्वा विषयी सांगणार नाहीत. श्रीराम त्याना पुढे काही बोलू न देता मध्येच थांबविले. तेव्हा लक्ष्मण म्हणाला , " जी गोष्ट सर्वांना माहीत आहे त्यगोष्टी बद्दल आपल्या मित्रा पासून लपविणे योग्य नाहीये. " पण तरी देखील श्रीराम काहीच बोलले नाहीत तेव्हा निषादराज
स्वतःच समजला नि म्हणाला," आम्ही पण जग पाहिलं आहे स्वामी ! आपल्या पुत्राला राजगादीवर बसण्यासाठी सावत्र पुत्राला वनवास दिला. हे कारण आहे ना ?"
" निषदराज sss तू माझा मित्र आहेस माझ्या आईचा
असा अपमान करू नकोस."
" आमची तेवढी पात्रता कोठे आहे. परंतु माझी आपणाला एक विनंती आहे की आजची रात्र आमच्या
नगरात येऊन आमच्या भूमीला पावन करावी."
" निषदराज आम्हाला कोणत्याही नगरात प्रवेश वर्ज्य
आहे. आम्हाला तपस्वी वेष धारण मुनींवर सारखे वनात
राहायचं आहे."
" मग ठीक आम्हीच इथं गंगा किनारी येऊन आपली
सेवा करू. " निषदराज म्हणाला.
महाराज दशरथ पलंगावर झोपले होते. मुखातून फक्त
राम राम हा जप सुरू आहे. त्यांच्या शेजारी उर्मिला उभी
राहून त्याना वारा घालत होती तर महाराणी कौशल्या
विष्णू देवाची आरती करत असतात. इतक्यात
महाराज उठून पलंगावर बसतात. नि म्हणतात की
मला सर्वत्र अंधार का दिसतो आहे ?" तेव्हा उर्मिला
म्हणाली ," पिताश्री आता सुर्यास्त होण्याची वेळ झाली
आहे, दीपमाळा लावू का ?" तेव्हा महाराज म्हणाले ," नाही पोरी ! दीपक लावून माझ्या मनातील अंधार
जाणार नाही. जाणार नाही हा अंधार. आता तर सुर्यवंशाचा सुर्यच अस्त झाला आहे."
" असं नका बोलू पिताश्री ! "
" का नको बोलू बेटी अयोध्येच्या इतिहासात ना अशी
सकाळ झाली आहे नाही संध्याकाळ ,अयोध्या मध्ये आजचा किती भाग्यवान दिवस आहे,माता कुमाता झाली.
आणि पिता कसाई झाला. बेटी एक काम कर मला
कोठुनतरी थोडेसे विष आणून दे."
" पिताश्री हे आपण काय बोलत आहात .?"
" हां बेटी मी लाजेने तर मरणार नाही. खरंच नाही
मरणार ' असे म्हणून ते आपल्या पलंगावरून उठले तोच
समोर महाराणी कौशल्या दिसली. तसे ते आपल्या पत्नीला म्हणाले ," कैशल्या मला मरण येण्याचा उपाय सांग. " महाराणी कौशल्या म्हणाल्या ," धीर धरा स्वामी धीर धरा." असे म्हणून त्यांचे हात पकडून त्याना पुन्हा त्यांच्या पलंगावर बसवून महाराणी कौशल्या म्हणाली," हे आपण काय बोलत आहात ?" तेव्हा महाराज म्हणाले," आता काय करायचं शुल्लक आहे, पुत्राला वनवास दिला. राजमहालला अंधकारा मध्ये लोटले.आणि अयोध्येला उजाड करून टाकली. आता मला सांग अजून काय करायचं शिल्लक आहे ? मग ते पण करून टाकतो. कौशल्ये तू का नाही गेलीस त्याच्या बरोबर ? तू तर त्याच्या बरोबर जाऊ शकत होतीस. ? "
" पुत्रा सोबत वनात गेली असती तरी माझं प्राण इथंच
भटकले असते. आत इथं आहे तर पुत्रसाठी प्राण तडफडताहेत. पण काय करणार ? दैवगतीचा फेरा कधी
कोणाला चुकला आहे काय ? मी आपल्या साठी विष्णूच्या
चरणांचे चारनामृत घेऊन येते.सकाळपासून पोटात अन्नाचा एक सुध्दा गेला नाही."
" नाही कौशल्ये जाणारा निघून गेला. माझा राम आता
कोठे पोहोचला असेल ? त्याला भोजन मिळाले असेल
की नाही.कारण पित्याचा आज्ञाकरी पुत्र आहे तो , दुसऱ्या
कोणत्या नगर मध्ये जाणार सुध्दा नाही. एका चक्रवर्ती
राजाचा पुत्र रस्त्यावर भीक मागत आहे."
स्वामी गवत पानाचा बिछाना तयार केला आहे चला
जरा विश्राम करा. श्रीराम सीतेला म्हणाले ," सीते चल."
ते दोघेही निषादराज ने केलेल्या बिछान्यावर जाऊन
बसले. तसा निषादराज श्रीरामासमोर दोन्ही जोडून
म्हणाला ," सरकार माझी एक विनंती आहे परंतु आपण
जर मान्य केला तरच सांगू इच्छितोय."
" सांग ना संकोच कशासाठी करतो आहेस ?"
" स्वामी आपण आम्हाला मित्र मानता तर माझी
इच्छा पुरी करा, मला माहित अयोध्या सारखे माझे
राज्य मोठे नाहीये. परंतु तरीही माझी इच्छा आहे की आपण आमच्या राज्यात चालावे नि आमच्या राज्याचा कारभार तुम्ही सांभाळावा. आजपासून तुम्ही आमचे राजा नि आम्ही आपली प्रजा. आपण मला आपला मित्र मानता
तर आमचा प्रस्ताव स्वीकार करा."
" मित्र निषदराज आपले स्नेह , आपला सत्कार, आणि
समर्पणची भावना पाहून आम्हाला भवविभोर करून टाकले. आम्हाला सदैव तुझ्या मित्रत्वार गर्व राहील."
तसा तो खुश होऊन म्हणाला," सरकार ने आमचा प्रस्ताव
स्वीकारला."
" नाही मित्र आम्ही आपला सत्कार स्वीकारला. परंतु
आम्ही आपली भेट स्वीकारू शकत नाही.राज्य मला
अयोध्येचे देत होते पिताश्री ! मीच नाही स्वीकारले."
" हे काय म्हणत आहे सरकार ? आम्ही तर हेच ऐकलं
आहे की आपल्याला त्यांनी अयोध्या मधून काढलं आहे."
" नाही. त्यांनी मला नाही काढलं. मी स्वतः सर्व सोडून
आलो. त्यांच्या वचनाची पूर्णतः करण्यासाठी ! हेच माझे
कर्तव्य पण आहे नि धर्म सुध्दा आहे.निषादराज आम्हाला
धर्म पालन करण्यासाठी मदत करा."
" आपल्या संकल्पा पुढं ब्रम्हदेव पण हरेल. आम्ही तर
आहोतच तुच्छ प्राणी म्हणून काही पण बडबडतोय
आमच्या कडून आपली सेवा होणार नाही.हे जाणवलं आहे मला. आता जा नि विश्राम करा. लक्ष्मण तू पण जा.
आणि निषादराज आर्यसुमन्तच्या झोपण्याची व्यवस्था
करा." तेव्हा निषादराज उद्गारला," सरकार , सगळ्या
गोष्टींचा बंदोबस्त झाला आहे, आपण चिंता करू नका.
या लक्ष्मण दादा !" असे म्हणून लक्ष्मणला सोबत घेऊन
जातो. तेव्हा श्रीराम सीतेला म्हणाले ," सीता आता तू पण
झोप. वनात असाच बिछाना मिळेल." असे म्हणून
गवताच्या अंथरुणावर झोपले तशी सीता पण त्यांच्या
शेजारी झोपली. निषादराज लक्ष्मणाला घेऊन आर्यसुमन्त
जवळ आला नि म्हणाला," या लक्ष्मण दादा हा आपल्यासाठी बिछाना तयार केला आहे.आणि आर्यसुमन्त पण !" तेव्हा लक्ष्मण म्हणाला ," नाही.मी
झोपणार नाही तर पहारा देत राहणार. "
" याचा अर्थ तुम्ही रात्रभर झोपणारच नाही ?"
" हां कारण आई ने सांगितले होते की दादा झोपल्यानंतर पहारा देत रहा."
" धन्य हो लक्ष्मण दादा , एका भावाचे दुसऱ्या भावावर
इतके प्रेम जगामध्ये अन्य कोठे दिसणार नाही. धन्य आहेस तू आणि धन्य आहे तुझी माता जिने तुझ्या सारखा
कर्मवीर पुत्राला जन्म दिला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा