Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

रामायण भाग १७ | Ramayana episode 17 | Author : Mahendranath Prabhu.

रामायण भाग १७ | Ramayana episode 17 | Author : Mahendranath Prabhu.
रामायण भाग १७ | Ramayana episode 17 | Author : Mahendranath Prabhu. 

 



  

         सीता महाराणी कैकेयी जवळ गेली नि म्हणाली,
" माता मला वस्त्रे द्या आणि परिधान कशी करायची तेही शिकवा. महाराणी कैकेयी ने सीताला वस्त्रे दिली. तेव्हा मंथरा म्हणाली ," या सुनबाई , मी शिकविते तुम्हाला
वस्त्रे परिधान करायची ती." असे तिला बाजूला घेऊन जात पुढे म्हणाली ," सुनबाई या मी तुम्हाला वस्त्रे घालायला शिकविते. सर्वात प्रथम तू ही राजवस्त्रे आणि अंगावरील अलंकार उतरवून ठेव." असे म्हणताच
गुरुमाता म्हणाली ," सीता भले तू मुनिवेष धारण कर , परंतु आपल्या अंगावरील आभूषणे उतरू नकोस . एक स्त्री.साठी आभूषणे उतरविणे अपशकुन मानला जातो." त्यावर सीता म्हणाली ," जशी आपली आज्ञा गुरुमाता !" सीता त्या मंथरा सोबत गेली , तर दुसरीकडे अयोध्येतील सारी प्रजा राजभवनच्या द्वारावर एकत्रित पणे उभे असतात. प्रेजेचे म्हणणे होते की रामावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. कारण राम विना ही अयोध्या उजाडलेल्या बागे सारखी भकास दिसत आहे. तेव्हा आम्ही हा अनर्थ होऊ देणार नाही. आणि  जर का विरोध
करूनही  महाराज ऐकले नाहीत. तर आम्ही सुध्दा रामा सोबत निघून जाऊ वनात. मग करत बसा अयोध्येतील
प्रजा विना राजपाट ! " असे म्हणून ते मोठ्या ने घोषणा
देऊ लागले की प्रभू श्रीरामचंद्र की जय !"

      त्यानंतर तिघेही भगवी वस्त्रे परिधान करून महाराज दशरथ समोर सर्वांना हात जोडून नम्रपणे प्रणाम करतात. महाराज त्या तिघांना मुनिवेष मध्ये पाहून ते म्हणाले ,"  हे ईश्वर मला हे दृश्य पाहण्यासाठी का बरं जिवंत ठेवले आहेस अजून ? " असे म्हणून ते सीतेकडे पाहत
म्हणाले ," जानकी, सीता तू वनात जाऊ नकोस. कारण
मी तुझ्या पित्याला तसे वचन दिले आहे की आपल्या
पुत्रीला आम्ही कधीही अंतर देणार नाही. आपल्या पुत्री
समान ठेवू तिला. परंतु माझ्या कडून ते वचन पाळले
गेले नाही. म्हणून तू एक काम कर , तू इथं न राहता
आपल्या पित्याच्या घरी जाऊन रहा. मला माहित आहे की
तू इथं का राहू इच्छित नाहीस. कारण कैकेयी सारखी
क्रूर सासू सोबत कोणीही राहणार नाही. म्हणून तू आपल्या पित्या कडे जा , एवढीच माझी तुला प्रार्थना आहे. तू वनात जाऊ नकोस." तेव्हा सीता म्हणाली,
पिताश्री माझे प्राण तर प्रभू सोबत जातील मग या मृत
शरीराला इथं ठेवून काय करणार तुम्ही  ? म्हणून पिताश्री मला वनात जाण्यापासून  रोखू नका. मला माझ्या पती पासून दूर करू नका." त्यावर महाराज निरुत्तर झाले. परंतु
महाराणी कैकेयी राम कडे पाहत म्हणाली," राम तू
वनात जाण्यास जितका उशीर करशील तितके तुझे
पिताश्री विचलित होतील. म्हणून जास्त विलंब न करणे
उचित नाहीये. लवकरात लौकर वनात जाण्यासाठी प्रस्थान कर." त्यावर राम म्हणाले ," हां माते ! आपण योग्य तेच म्हणालात." असे म्हणून श्रीराम ने प्रथम माता कैकेयी चे चरणस्पर्श केले. तेव्हा श्रीराम म्हणाले ,"  माते मला
आशीर्वाद द्या की आपले वचन पूर्ण करण्यास मी यशस्वी
होईन म्हणून." महाराणी कैकेयी आशिर्वाद देत म्हटलं की, यशस्वी भव ! " त्यानंतर श्रीरामाने महर्षी वशिष्ठांचे चरणस्पर्श करत म्हटले," गुरुदेव मला वनात जाण्याची
अनुमती द्या." तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले ," राम तुझी कीर्ती अनंत काळापर्यंत दैदीप्यमान राहील." त्यानंतर श्रीराम आपल्या पित्याचे चरणस्पर्श करत म्हटले,' पिताश्री आम्हाला वनात जाण्याची परवानगी द्या." त्यावर महाराज एकदम विव्हल स्वरात म्हणाले," आशीर्वाद देण्याचा पण अधिकार आता ह्या दशरथाला राहिलेला नाहीये. माझ्या सारखा पिता या आधी झाला नाही आणि या पुढे पण होणार नाही."
     " पिताश्री आपण शोक करू नका. आपल्यासारख्या
महान पित्याचा आदर्श आमच्या समोर सदैव राहील. वनात जाण्यापूर्वी आपल्या चारणापाशी एक निवेदन आहे की  माझी माता कौशल्या फार दुःखी आहे , तिचे सांत्वन करा नि माझ्या आईला कधीही अंतर देऊ नका." त्यानंतर लक्ष्मणने आपल्या पित्याचे चरणस्पर्श केले नि दुसऱ्या कोणाचे चरणस्पर्श न करता आपल्या स्थानावर जाऊन उभा राहिला. त्यानंतर सीतेने महाराज दशरथांच्या पायावर
आपले मस्तक ठेवले. तेव्हा आशीर्वाद देण्यासाठी महाराजांनी आपला हात उचलला; परंतु आशीर्वाद देण्याचा तरी आपल्याला अधिकार आहे का ? असा विचार त्यांच्या मनाला पडला
असावा अथवा काय आशीर्वाद देऊ हा विचार पडला असावा. त्यानंतर सीतेने महाराणी कैकेयीचे चरणस्पर्श
केले तेव्हा महाराणी कैकेयी ने आशीर्वाद देत म्हटले,
     " आयुष्यमान भव !" त्यानंतर सीतेने महर्षी वशिष्ठांचे
चरणस्पर्श केले. तेव्हा गुरुदेव म्हणाले," पुत्रवती भव !"
इतकं केल्यानंतर सीता राम जवळ जाऊन उभी राहिली.
त्यानंतर श्रीराम म्हणाले," चला लवकर निघायला हवं."
असे म्हणून ते तिघेही तिथून निघून गेले. तेव्हा महाराज
म्हणाले , " आर्यसुमन्त जा नि त्या तिघांना रोखा. " त्यावर
आर्यसुमन्त म्हणाले ," महाराज हे जर मला शक्य असते तर  मी ते केव्हाच केलं ही असतं आणि त्या बदल्यात जीवनभर वनवास भोगला ही  असता. परंतु आपल्याला ठाऊक असेलच की श्रीराम आपला निर्णय कधीही बदलणार नाहीत."
     " मग एक काम कर रथ घेऊन जा नि त्या तिघांना
रथात बसवून घेऊन जा. सीतेला जमिनीवर चालू देऊ नकोस. त्यांच्या सोबत वनात जा आणि त्याना साऱ्या वनाची माहिती देऊन त्यांची कशीतरी समजूत काढून त्याना परत अयोध्येला घेऊन या.'

        श्रीराम आपल्या  पत्नी आणि बंधू सोबत निघाले तशी महालातील दास , दासी , राम आणि सीता या दोघांचे चरणस्पर्श करू लागले. तिकडे महाराज आर्यसुमन्त ला आदेश देतात की सीतेला जमिनीवरून चालायला देऊ नकोस.तू परत येईपर्यंत हा दशरथ तुझी वाट पाहिल." असे म्हणताच आर्यसुमन्त लगबगीने त्यांच्या मागोमाग
निघून त्यांच्या अगोदर रथा जवळ पोहोचले  नि रथ तयार केला आणि  सर्वात प्रथम रथात आपण स्वार झाले . कारण अजून रथ तयार करायचा होता तो करून घेतला.
नि सारथी च्या स्थानावर स्वतः बसले. त्यानंतर राम , लक्ष्मण आणि सीता रथात बसले. तेव्हा अयोध्येतील प्रजाने त्यांचा रथ अडविला.नि श्रीरामाना ते विनंती करू लागले की आम्हाला सोडून जाऊ नका. कारण तुम्ही आमचे राजे आहात. आपल्याला महाराजांनी राज
गादीवर नाही बसविले तर  आम्ही महाराजा विरुद्ध विद्रोह करू की, अश्या अन्यायी राजाला राजगादीवर बसण्याचा
काहीही अधिकार नाहीये. तेव्हा श्रीराम त्या लोकांवर नाराज होत म्हणाले ," कोणा विरुद्ध विरोध करणार आहात आपण ? आपल्याच आदर्श राजाला ? ज्यांनी आपल्या सत्यवचनासाठी आपल्या पुत्राचा पण  बळी दिला. उलट अश्या राजा विषयी आपल्या मनात आदर
असायला पाहिजे नि अभिमान पण  पाहिजे. आपल्या राजाने आपल्या सर्वांना पुत्रा समान सांभाळले मग तुमचे
कर्तव्य त्यांचा आदर करण्याचे नाही आहे का ? आज
ते फार दुःखी आहेत. अश्या वेळी त्यांच्या पुत्रा प्रमाणे
त्यांचे सांत्वन करणे जरुरीचे आहे. आणि त्यांच्या विरुध्द
प्रजेमध्ये विद्रोह करण्याची भावना मनात आणू नका. मी इथून गेल्यानंतरही माझ्या पित्याचा तसाच आदर झाला
पाहिजे. जसा आतापर्यंत  आदर करत आला आहात.    
         त्यानंतर भरतचा राज्यभिषेक करून त्याला
आपला सयोग द्या. हीच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. आर्यसुमन्त चला रथ हाकला. " आर्यसुमन्त ने रथ हाकला. तेव्हा एकजण म्हणाला ," नाही आम्ही इथं आता  राहणार नाही. जिथं आमचा राजा राम राहतील तीच आमची अयोध्या असेल. बोला सियावर रामचंद्र की जय असा जयजयकार केला. प्रजेचा आवाज जसा महाराज दशरथानी ऐकला तसे ते म्हणाले," माझा राम निघाला आहे वनात जाण्यासाठी ; परंतु त्याला वनात जाऊ देऊ नका." असे म्हणतच ते रामाच्या मागे धावू लागले. तसे ते तोल जाऊन पडले. महाराणी कैकेयी ने त्याना आपला
आधार देण्याचा प्रयत्न केला ; परंतु त्यांनी तिचा आधार
घेण्यास नकार दिला. नि स्वतः राम गेलेल्या दिशेकडे जाऊ
लागले. आणि मुखातून एकच जप सुरू होता. आणि तो
म्हणजे रामला रोखा जाऊ देऊ नका. शेवटी मुख्य द्वारी आल्यावर त्यांनी पाहिले की सारी प्रजा श्रीरामाच्या रथाच्या मागे चालत आहे . रथ पण फार दूर गेला होता. हे महाराजांनी पाहून ते मोठ्या ने ते ओरडले की माझ्या रामला वनात जाऊ देऊ नका. " असे म्हणून जमिनीवर कोसळले. महाराजांचा आवाज ऐकून आपल्या भवन मध्ये असलेल्या महाराणी सुमित्रा आणि महाराणी कौशल्या पळतच बाहेर आल्या नि जमिनीवर कोसळलेल्या महाराजांना आपला आधार देत म्हणाल्या ," स्वामी उठा बरं !" महाराणी कैकेयी ने सुध्दा त्याना धरायचा प्रयत्न
केला ; परंतु महाराजांनी  तर तिचा हात झिडकारला.
म्हणाले ," चांडाळणी !  दूर हो माझ्या नजरे समोरून. आणि  पुन्हा मला तुझं काळ तोंड कधी दाखवू नकोस. आणि हां तुझ्याशी विवाह करताना तुला दिलेले सारी वचने मी आज तोडतोय. आजपासून तुझं नि माझं नाते संपले. आजपासून तू स्वतःला विधवा समज. मृत्यूनंतर स्वर्गात
गेल्यावर ही तुझा माझा काही संबंध राहणार नाही. तुझ्या कुटनीतीचे समर्थन करत भरताने केले तर मृत्यू नंतर जी क्रिया केली जाते त्यावेळी मी त्याच्या हातून जल सुध्दा घेणार नाही." असे म्हणताच महाराणी कौशल्या आणि सुमित्रा म्हणल्या, " महाराज एवढी घोर शिक्षा देऊ नको भरताला." तेव्हा महाराज म्हणाले ," रामच्या आई कौशल्या मला माझ्या भवनात घेऊन चल. तिथं माझ्या रामच्या आठवणी आहेत. मला तिथं घेऊन चल." तेव्हा महाराणी कौशल्या आपला आधार देऊन त्याना घेऊन जातात. तेव्हा महाराणी सुमित्रा सुध्दा त्यांच्या मागोमाग चलते. महाराणी कैकेयी पुतळा बनून एका बाजूला उभी असते. गुरुमाता नि महर्षी वशिष्ठ चुपचाप उभे असतात.

     श्रीरामच्या रथाच्या मागोमाग चालत असते. आणि ते
रामला एकच विनंती करत असतात की श्रीराम आम्हाला सोडून जाऊ नका. आणि जायचंच असेल ते  आपल्या सोबत आम्हालाही घेऊन चला वनात. तिथं आम्ही आमची
राजधानी बांधू नि आपण आमचे राजा असल्याचे घोषित
करू !" असे काहीजण बोलत होते.

     क्रमशः

टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..