रामायण भाग १६ | Ramayan episode 16 | Author : Mahendranath Prabhu.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रामायण भाग १६ | Ramayan episode 16 | Author : Mahendranath Prabhu. |
परंतु जर पिताच अन्याय करू लागला तर दुसरा
उपाय काय आहे दादा ? आपल्या धर्मात्मा पुत्राला एका
स्त्री च्या मोहात पडून......" लक्ष्मण ला पुढे बोलू न देता
श्रीराम म्हणाले ," बस कर लक्ष्मण. आणि आता माझं ऐक.
तुझे , पिताश्री विषयी इतके घाणेरडे विचार असतील तर
आजपासून तू मला दादा म्हणायचे सोड. आणि आजपासून तू मला आपले तोंड दाखवू नकोस." तेव्हा
लक्ष्मण विव्हल स्वरात उद्गारला ," दादा हे आपण काय
बोलत आहात ? मी आपल्या शिवाय एक क्षणभर सुध्दा
जगू शकणार नाहीये. दादा आपण माझ्यासाठी ईश्वर
आहात. आपल्या बरोबर कोणी अन्याय केला तर मी
ते कसे सहन करणार सांगा बरं !"
" हे तुला कोणी सांगितले की माझ्यावर अन्याय होत
आहे अथवा अत्याचार होत आहे , खरं सांगायचं तर तू
जे काही बोललास तोच अत्याचार आहे. जो तू आपल्या
मोठ्या भावावर आणि पिताश्री सोबत करत आहेस."
" पिताश्री वर s s "
" हां पिताश्री वर त्यांची पीडा काय आहे ते तुला माहीत
आहे का ? त्यांची समस्या काय आहे ते माहीत आहे
का तुला ? त्यांचा सारखा धीर वीर पुरुष कोणत्या धर्मसंकटा मध्ये पडला आहे ?"
" जो स्त्री मोहात फसेल त्यांची हीच दशा होईल."
" त्यांचे धर्मसंकट स्त्री मोह नाहीये. त्यांचे धर्मसंकट आहे
धर्म ....हां धर्म ! आज एक सत्यवादी राजाचा धर्म पित्याच्या धर्माशी टक्कर घेत आहे. त्यांच्या पुढे एक प्रश्न
आहे की सत्यवचन पूर्ण करावे का पित्याचा धर्म पूर्ण करावा. हेच त्यांच्या दुःखाचे कारण आहे. एका राजा ने कुण्या एकाला वर दिला की तुला जे काय पाहिजे ते माग. आणि मागणाऱ्या ने मागितलेले वचन पूर्ण करायचे असेल तर राजाला त्यांच्या सर्वात प्रिय असलेल्या पुत्राचे बलिदान
करावे लागत आहे. आणि जर का ते आपले वचन तोडताहेत तर त्यांच्या कुळाच्या किर्तीला बट्टा लागत आहे. आणि जर का त्यांनी दिलेले वचन पूर्ण करताहेत तर ते आपल्या त्या पुत्रा विना जिवंत राहू शकत नाही. शिवाय त्या पुत्राला दगड -धोंडे आणि काटे टोचायला वनात पाठवायला लागेल आणि ते पण चौदावर्षासाठी ! लक्ष्मण तू त्यांचे दुःख का समजत नाहीयेस. त्यांची आज जी अवस्था आहे ती एका शिकारीच्या जाळ्यात अडकलेल्या घायाळ सिंहासारखी आहे. आणि अश्या त्या असाय्य सिंहावर तू आपले बाण सोडत आहेस. केवळ
आपली वीरता दाखविण्यासाठी धिक्कार आहे अश्या
वीरतावर ! अश्या धर्मात्मा पित्या बद्दल तू बोलून मोठे
पाप केले आहेस. त्या पापाचे प्रायश्चित्त आपल्या सर्वांना
करावे लागणार आहे. जर त्याना आपल्या धर्माची पर्वा नसती तर ते आज दुःखी दिसले नसते. आज मी त्याना असाय्य अवस्था मध्ये पाहिले. मी जेव्हा हे पाहिले तेव्हा मला स्वतःलाच स्वतःचा राग येऊ लागला नि असं वाटू लागलं की आज दादा माझ्यामुळे वीर, धर्मात्मा पिता दुःखी आहे. मी आपले कर्तव्य निश्चित करण्यासाठी एका क्षणाचा पण विलंब केला नाही. कारण मी त्यांचा पुत्र होण्याच्या नात्याने माझं एकच कर्तव्य आहे की मी तेच काम करू की ज्याने त्यांच्या सत्य , धर्म आणि प्रतिज्ञेला धक्का लागणार नाही. तर त्या उलट त्यांची कीर्ती वाढेल. त्यांचे यश मैली होणार नाही. लक्ष्मण आपल्या पित्या सारखे पिता मिळायला भाग्य लागते. परंतु जर कोणाचे पिता दुराचारी पण असतील. साऱ्या लोकांनी त्यांचा त्याग केला असेल. पण तरी देखील पुत्राचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या पित्याला देवा सारखे पुजावे. कारण पिता मनुष्याचा प्राणदाता आहे. लक्ष्मण जे लोक आपल्या पित्याची भक्ती करत नाहीत त्यांची पूजा देवताच काय पण ईश्वर सुध्दा पूजा स्वीकारत नाही."
" मग काय दादा माता कैकेयी ने आपल्यावर केलेला अन्याय आम्ही सहन करायचा का ?"
" मी कैकेयी मातेला दोषी मानतच नाहीये."
" दाद s s ?"
" हां लक्ष्मण ! बालपणापासून आजपर्यंत त्यांनी
आपल्याला किती प्रेम , स्नेह दिला तो इतक्या लौकर कसा
विसरलास ? माता तर निश्चल प्रेम आणि स्नेहाची पवित्र नदी आहे. तिच्या जलात स्नेहाची लाटा सदैव उठतच राहतात."
" प्रेमाची नदी होती तर ती एका दिवसात कशी आटली
हे मला कळत नाहीये."
" लक्षण संसार मध्ये अश्या अनेक अघटित घटना घडतच असतात. परंतु नानुष्याला त्या घटना कळत नाही.
जसे की अकस्मात भूकंप येतो नि साऱ्या माणसाचे जीवन विस्कळीत करून टाकतो. अश्यावेळी दुसऱ्या कोणाला
दोष देणे योग्य नाही. त्या साऱ्या घटना आपल्या नशिबाचा
एक भाग आहे . असं मानून त्याचा स्वीकार करावा. आज आपल्या सोबत जे काही घडतं. ते पूर्व नियोजित होतं.
अर्थात ते होणारच होते. कारण ते विधिलिखितच होतं. म्हणूनच की काय माता कैकेयी सारख्या पुण्यवान स्त्री ची बुध्दी भ्रष्ट झाली."
"जरी हे विधिलिखित असले तरी मी त्या विधिलिखित
कडून पराजित होऊ इच्छित नाही. कारण वीरांची परीक्षा
अश्याच आपत्ती काळात होते."
" वीरांची परीक्षा केवळ आपत्ती काळातच होत नाही. तर मनुष्याच्या धर्माची पण परीक्षा होते. लक्ष्मण वीरता
केवळ शस्त्र उचल्यानेच होत नाही तर कधी कधी शस्त्र न उचलण्याने सुध्दा परमवीर ची निशाणी असू शकते . लक्ष्मण ठेवून दे ते शस्त्र .आणि उद्या मी इथून गेल्यानंतर
भरताचा राज्यभिषेक झाल्यानंतर त्याच्या सेवेला हे शस्त्र धारण कर."
" आपण गेल्यानंतर याचा काय अर्थ आहे दादा ? जर
आपण वनात गेलात तर मी देखील आपल्या सोबत वनात येईन."
" नाही लक्ष्मण नाही. वनवास मला झाला आहे तुला
नाही."
" मला ? दादा आपण मला आपल्या पासून वेगळे कधीपासून समजू लागले ? दादा आपणच म्हणाला होता ना की जिथं राम तिथं लक्ष्मण असेल. आपणच म्हणाला होता की लक्ष्मण आपली दुसरी अंतरात्मा आहे. अर्थात जे राम भोगेल तेच लक्ष्मण पण भोगेल. मग आज असं का
म्हणता ?"
" लक्ष्मण इथं भरत, शत्रुघ्न पण नाहीयेत.अश्या वेळी गुरू, माता , पिता, संगेसबंधी आणि स्नेही या सर्वांना कोण सांभाळेल ?"
" दादा , माझे गुरू , माता-पिता, भाऊ, संगेसबंधी आणि स्नेही केवळ आपणच आहात. माझं कर्म,धर्म ,गती, सदगती केवळ आपणच आहात. आपल्या पासून वेगळी कल्पना मी कधी केलीच नाही. रागाच्या भरात एखादी अनुचित गोष्ट बोललो असेन तर पहिली चूक समजून मला क्षमा करावी. " असे म्हणू लक्ष्मण हात जोडून त्यांच्या चरणाजवळ बसून पुढे म्हणाला ," एवढे निष्ठुर बनू नका
दादा ! आणि माझा त्याग करू नका. एवढा मोठा दंड
मला देऊ नका. मला आपल्यापासून वेगळे करू नका.
मलाही आपल्या सोबत वनात घेऊन चला." तसे प्रभू श्रीराम खाली वाकून लक्ष्मणाच्या खांद्याला पकडून वर उठवत श्रीराम म्हणाले ," लक्ष्मण मी तुला आपल्या सोबत घेऊ जाऊ शकत नाही. कारण माता सुमित्रा मला काय म्हणेल." इतक्यातच तिथं माता सुमित्रा आली नि त्यांनी श्रीरामाचे व्यक्तव्य ऐकले होते . म्हणून त्या म्हणाल्या ,
" माता सुमित्रा काय म्हणेल... हे तुला माहीत नाही का रघुनंदन ?" तेव्हा लक्ष्मण हात जोडून आपल्या मातेला म्हणाला ," आई , मी दादा आणि वहिनी सोबत वनात जाणार आहे . तेव्हा तू मला वनात जाण्यापासून रोखू नकोस ." त्यावर माता सुमित्रा म्हणाली ," वन आणि नगर याच्याशी तुला काय घेणे आहे ? तुझ्यासाठी तर जिथं राम आहे तिथं तुझी अयोध्या असेल. राम आणि सीता वनात चालले आहेत तर तुझं ह्या अयोध्येत काही काम नाहीये."
असे म्हणताच लक्ष्मण एकदम खुश झाला नि म्हणाला,
" आई , आज तू माझे मस्त गर्वाने उंच केले आहेस."
" परंतु माझे मस्तक तेव्हाच उंच होईल जेव्हा तू चौदा वर्षे
वनवास भोगून अयोध्येला परत येशील. तेव्हा मी पाहीन की आपल्या मोठ्या बंधूंच्या सेवेत तू कोठेही कमी पडलेला नाहीस. आजपासून मी तुझी आई नाही तर सीताच तुझी आई आणि राम तुझे पिता ! हे झोपले तर तू पहारा करत बसायचं . ह्यांनी भोजन केल्यानंतरच जर
भोजन शिल्लक असेल तरच तू तर खायचं आहे. ह्यांच्या रस्त्यावरवचे काटे तू आपल्या डोळ्याने उचलायचे आहेत. ह्या दोघांची तू इतकी सेवा कर की सीता इथल्या महालातील सुख विसरायला पाहिजे. लक्ष्मण एक गोष्ट
लक्षात ठेव की पूर्ण संसार मध्ये एक सेवक चा धर्म
सर्वात मोठे कठीण आहे."
" वा सुमित्रा वा ! आज मी धन्य झाले. खरंच तू महान आहेस तुझा हा अनुपम त्याग दुसऱ्या कोणालाही करायला जमणार नाही." महाराणी कैशल्या म्हणाल्या.
" ताई , महान तर तू आहेस , तुझ्या कडूनच मी हे शिकले." महाराणी सुमित्रा म्हणाल्या.
" राम तुझ्या हाती मी लक्ष्मणाला सोपवत आहे. सुमित्रा जवळ उर्मिला ही लक्ष्मणाची अमानत आहे. तेव्हा जसा
लक्ष्मणाला घेऊन जात आहेस अगदी तसाच चौदा वर्षे
पूर्ण झाल्यानंतर ह्याला माझ्या स्वाधीन करायचा आहे."
" आई , तू चिंता नकरु नकोस , लक्ष्मण माझ्या नजरे समोरून एक क्षण सुद्धा दूर होणार नाहीये. " त्यानंतर मुनिवेष धारण करण्यासाठी सर्वजण जातात. आणि उर्मिलेला जेव्हा हे माहीत पडते तेव्हा उर्मिला सुद्धा
आपली इच्छा प्रगट करते. अर्थात मला सुध्दा आपल्या सोबत घेऊन चला. तेव्हा लक्ष्मण म्हणाला ," नाही उर्मिला दादाला जर हे माहीत पडले की तू माझ्या सोबत येत
आहेस तर ते मला सुध्दा स्वतः सोबत घेऊन जायला
तयार होणार नाहीत. आणि तुला तर माहीत आहे की मी दादा शिवाय एक क्षण सुद्धा जगू शकणार नाही. म्हणून माझी तुला विनंती आहे की माझ्या मार्गातील काटा तू बनु नकोस. मला प्रभूच्या सेवेपासून वंचित करू नकोस."
त्यावर उर्मिला म्हणाली ," मी त्यासाठी आपल्या सोबत येत नाहीये तर आपण थकून भागून कुटी मध्ये याल तेव्हा मला आपली सेवा मला करता यावी यासाठीच मी आपल्या सोबत येण्याची इच्छा प्रगट केली."
" परंतु मी तुझ्या कुटी मध्ये येणारच नाही तर तू
माझी सेवा करणार कशी ? आणि तू ऐकले नाहीस का आई काय म्हणाली ती . आई म्हणाली दिवसरात्र आपल्या दादा-वहिनीची सेवा कर आणि जेव्हा ते रात्री विश्राम करतील तेव्हा पहारा देत बैस ! मग मला सांग तुझाकडे केव्हा आणि कसा येणार ? म्हणून तू इतच रहा. कारण
कौशल्या माता एकट्याच आहेत इथं.दादा आणि वहिनी
दोघेही नाहीत इथं.अश्या वेळी तुला इथं राहणे आवश्यक
आहे. मला कल्पना आहे की या क्षणी आपल्या दोघांना मोठ्या कठीण परिस्थितीतुन जावं लागणार आहे, मी दादा आणि वहिनीची तिथं सेवा करीन आणि तू इथं राहून माता कौशल्याची सेवा कर ." उर्मिला ने लक्ष्मण कडे पाहिले असता लक्ष्मण म्हणाला " हां उर्मिला पुत्र आणि सून दोघेही इथं नाहीत.अश्या मातेची अवस्था काय होईल. ती फार दिवस जिवंत राहणार नाही म्हणून त्यांची सेवा कर आणि त्याना जिवंत ठेवण्याचे काम तुला करावयाचे आहे. उर्मी , कौशल्या मातेची काळजी घेण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवत आहे. आणि हां अजून एक प्रार्थना करतो मी तुला. ती ही की ज्या वेळी वनात जाण्यासाठी मी
निघेन त्यावेळी तुझ्या डोळ्यात मला अश्रू दिसणार नाहीत याची काळजी घे. मी इथून जाताना तुझ्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहीन आणि ते स्मित हास्य मी माझ्या हृदयात साठवून ठेवीन. आम्ही चौदा वर्षे वनात राहून आल्यानंतर मी तुझ्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहीन
तेव्हाच मला माझी आराधना सफल झाली याची खुशी मिळेल."
" फार मोठे कठीण कार्य देत आहात आपण मला."
" उर्मी जे लोक कठीण कार्य करतात. लोक त्यांचेच
गुणगान गातात. तुझ्या महान कार्या विषयी कोणाला
माहीत नसले तरी हा लक्ष्मण सदैव तुझा ऋणी राहील." त्यावर उर्मिला काहीच बोलली नाही."
रामाचा राज्यभिषेक होणार नाही. ही खबर वाऱ्या
सारखी पूर्ण अयोध्या नगरिस पसरली. प्रजा आपसात
कुजबुजाला लागली आणि ज्यांना विश्वास वाटेना ते एकमेकांना विचारून खरं आहे का खोटे हे जाणून घेऊ
लागला. तेव्हा एकाने विचारले की हे खरे आहे का ? रामाचा राज्यभिषेक होणार नाही ? " तेव्हा एकजण म्हणाला ," हो ही खरी आहे गोष्ट !" तेव्हा दुसरा एकजण
म्हणाला , " अरे हा काय अनर्थ होणार आहे ? विध्यात्याने हे काय केलं अमृत दाखवून विष दिलं." एकजण म्हणाला
लगेच दुसरा म्हणाला, " म्हणजे म्हाताऱ्या राजाचे म्हातारणी डोके फिरले की काय ? म्हणजे बघ ना
कालपर्यंत सर्वांच्या इच्छेनुसार श्रीरामाना राज्यभिषेक होणार आहे. आणि आज अचानक पणे भरतला राज्यभिषेक होणार म्हणून जाहीर केले ?"
" अरे हे सर्व राणीच्या सांगण्यावरून केलं."
" बायकोचे आहारी गेलेल राजा अजून काय करू
शकतो. परंतु आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही. असा
एकजण म्हणाला.
" अरे दादा कालपर्यंत सर्वकाही ठीक होते नि एका
रात्रीत सर्वकाही बदललंलं .भरत ला राज्यभिषेक नि श्रीरामाला चौदा वर्षे वनवास ! मला काय वाटतंय ते माहितेय का तुला ? हे सर्व महाराणी कैकेयीचे कारस्थान
असणार ."
" हां बरोबर आहे तुझं म्हणणे. हे फक्त तिचेच कारस्थान नसणार त्यात भरत पण सामील असावा. एकीकडे दाखवायचे की आपले मोठ्या बंधुवर किती प्रेम आहे जसे जीव की प्राण आणि दुसरी कडून गुप्त कारस्थान करत राहायची !"
" कालपर्यंत जीव की प्राण असलेला श्रीराम आज
अचानक वैरी कसा बनला." असे अनेक लोक आपली मते
मांडू लागला आणि काही लोकं तर महाराजाच्या निर्णयाला विरोध करू म्हणून सांगू लागले. त्यानंतर सर्व लोकांचं एकमत झाले की सर्वजण राजमहाल मध्ये जाऊन सरळ महाराजानाच जाब विचारू , असे म्हणून ते सर्वजन
राजमहालाच्या दिशेने निघाले. त्याच क्षणी राज महालात
महाराणी कैकेयीचा महाल सोडून सर्वत्र शोककळा
पसरली होती. राजमालात श्रीराम , सीता आणि लक्ष्मण वनात जायची तयारी करत होते. जेव्हा मंथराने महाराणी कैकेयीला सांगितले की वनात फक्त रामच जाणार नाही
तर त्याच्या सोबत सीता आणि लक्ष्मण पण जाणार आहे
हे ऐकून महाराणी एकदम खुश होत म्हणाली ," बरं झालं सर्वजण जाताहेत ते. मुख्य म्हणजे लक्ष्मण राम सोबत जातोय म्हणून . मला जास्त करून त्याचीच भीती वाटत होती. मोठा रामभक्त आहे तो त्याने जरूर विरोध केला
असता. पण माझा राम सत्यवचनी आहे, तो असं होऊ देणार नाही. नाहीतर आपल्या मार्गातील काटा लक्ष्मणच होता. पण आता तो सुध्दा राम सोबत जातोय हे बरं आहे. नाहीतर त्याने भरतला नीट राज्यकारभार करू दिला नसता. म्हणून तो स्वतःहून राम सोबत जात आहे हे
ऐकून देवच पावला असे म्हणावयाचे वाटते ." असे म्हणत असताना एका दासी कडे संन्यासी लोकांची वस्त्रे आहेत हे महाराणी कैकेयी ने पाहिली तेव्हा तिने न समजून मंथराला विचारले की हे काय आहे ?" तेव्हा कैकेयी म्हणाली," ही संन्यासी लोकांची वस्त्रे आहेत. परंतु ही वस्त्रे मी बिच्चाऱ्या राम , लक्ष्मण आणि सीता यांच्यासाठी आणली आहेत. बिच्चाऱ्याना वस्त्रे शोधत बसायला लागले असते. म्हणून मी सर्वांसाठी संन्यासी वस्त्रे आणली होती."
" हे बरे केलेस जा नेऊन दे त्याना. कारण ते तिघेही
जितक्या लौकर इथून जातील तेवढेच बरे झाले म्हणायचे.
तेवढ्यात महाराणी कैकेयी च्या महाली गुरुमाता आली.
गुरुमातेला पाहून महाराणी कैकेयी ने त्याना प्रणाम केला
तेव्हा गुरुमाता म्हणाली ," महाराणी कैकेयी हा काय अनर्थ
करायला निघालीस ? प्रजा भयंकर संतापली आहे. शिवाय
जिथं राम नाही तिथं कोणी राहणार नाही. मग भरत ला
राजा बनविलेस तरी कोणाचा राजा म्हणविणार त्याला ?
दुसरी गोष्ट म्हणजे भरत तुझ्या या कुटील कारस्थान ने
खुश होईल असं वाटतंय का तुला ?"
" का नाही खुश होणार , तोच तर अयोध्येचा राजा बनण्यास योग्य आहे." हे महाराणी कैकेयी चे व्यक्तव्य
ऐकून मंथरा अति प्रसन्न झाली. तेव्हा गुरुमाता म्हणाली,
" ज्या फांदीवर बसून तीच फांदी तोडत आहेस ना ,मग तीच फांदी मोडून तूच तोंडघशी पडणार आहेस आणि
जीवनभर पश्चात्ताप करत राहणार आहेस." त्यावर
महाराणी कैकेयी म्हणाली ," माझ्या हातात काय येईल
नि काय येणार नाही याची चिंता आपण करू नका. मी ते
पाहून घेईन. आता आपण बऱ्या बोलणं इथून जात असाल तर ठीक आहे नाहीतर मला सारा शिष्टाचारच्या सीमा पार करून आपल्याला या भवन मधून बाहेर काढले
जाईल."
" अत्याचार च्या साऱ्या सीमा पार केल्यास महाराणी
तू मला काय शिकविणार शिष्टाचार ; पण लक्षात ठेव. साऱ्या संसार मध्ये ज्या ज्या वेळी सावत्र आईची गोष्ट
निघेल त्या त्या वेळी सर्वात प्रथम तुझंच नाव घेतलं
जाईल नि या पुढे आपल्या कन्येचे नाव कुणी कैकेयी
ठेवणार नाही." त्यावर कुत्सित पणे हसून महाराणी
कैकेयी म्हणाली ," अगदी बरोबर म्हणालात गुरुमाता
संसार मध्ये कैकेयी एकच झाली आहे नि पुढेही एकच
राहणार आहे " असे म्हणून महाराणी तेथून निघून गेली. नाईलाजाने गुरुमाता सुद्धा तेथून निघून गेली.
राज्यसभेत महाराज दशरथ , महर्षी वशिष्ठ आणि
इतर बसलेले असतात. तेव्हा तिथं महाराणी कैकेयी
येते नि कुलगुरू वशिष्ठ याना प्रणाम करते. इतक्यात
आर्यसुमन्त तेथे येतात नि महाराजांना वंदन करून
म्हणाले ," महाराज, राम , लक्ष्मण आणि सीता यांनी
आपली सारी संपत्ती गरिबांना दान केली. आणि राजवस्त्रे
त्यागून संन्यासी वस्त्रे परिधान करून द्वारवर आपल्या
दर्शनासाठी उभे आहेत आपली आज्ञा मागत आहेत. तेव्हा
महाराज दशरथ म्हणाले, " आर्यसुमन्त त्याना ताबडतोब इथं घेऊन ये." तेव्हा आर्यसुमन्त म्हणाला , " जशी आपली आज्ञा !" असे म्हणून आर्यसुमन्त तेथून निघून गेले नि त्या तिघांना सोबत घेऊन आले तेव्हा श्रीराम ने आपले दोन्ही हात जोडून म्हणाले ," पिताश्री मी दंडकारण्य मध्ये जाण्यापूर्वी आपले आशिर्वाद घ्यायला आलो आहे. आणि माझ्या सोबत लक्ष्मण आणि सीता सुध्दा वनात जाणार
आहेत. आम्हाला वनांमध्ये जाण्याची परवानगी द्या."
" काय लक्ष्मण आणि सीता सुध्दा जाणार आहेत ? नाही नाही राम असा अनर्थ करू नकोस."
" पिताश्री मी ह्या दोघांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला.
परंतु ह्या दोघांनी आपला हट्ट सोडला नाही. पिताश्री आता
आपण शोक करणे सोडा. आणि आता आम्हाला जाण्याची परवानगी द्या. मी वनात जाऊन चौदा वर्षे वनात
राहून आपली प्रतिज्ञा पूर्ण करीन. आणि चौदा वर्षे पूर्ण
होताच पुन्हा आपल्या दर्शनासाठी आपल्या समोर उपस्थित होईन. " त्यावर महाराज दशरथ म्हणाले ," नाही
राम तू वनात जाऊ नकोस. कैकेयी च्या वचनात मी पूर्ण अडकलोय. परंतु तू एक वीर पुरुष आहेस. मी दिलेले वचन न मानता माझ्याकडून तू हे आपले राज्य हिसकावून घेतले असतेस."
" पिताश्री मला माहित होतं की आपण हेच म्हणणार.
ही आपली महानता आहे. म्हणूनच आपण मिळविलेली
कीर्ती आपल्या पुत्रासाठी त्याग करायला निघालात. परंतु
एका पुत्राचे पण तर हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या
पित्याची मनोकामना पूर्ण करून त्यांचा पुत्र होण्याचे
कृतीने सिद्ध करून दाखविणे पण गरजेचे आहे."
" राम तू आपल्या पित्याला सत्यवचनी बनवू इच्छितोस खरंच मागील जन्मी फार पुण्य केले असणार
म्हणूनच तुझ्या सारखा सर्वगुण संपन्न धर्मात्मा पुत्र मला
लाभला. परंतु तू वनात आणि मी महालात नाही पुत्र
मी सुद्धा तुझ्या सोबत वनात येतो. " तेव्हा राम म्हणाला,
" पिताश्री आपणच तर म्हणत होता की एक राजा
प्रजेची अमानत असते. अर्थात अश्या बिकट परिस्थिती
मध्ये पित्याने पुत्र मोहात पडून आपल्या प्रजेचा त्याग
कसे जाऊ शकता तुम्ही ! आणि खरं सांगू आपण माझी
व्यर्थ चिंता करताय . ती अगोदर करायचे सोडून द्या. आणि मला आता वनात जाण्याची आज्ञा द्या. " त्यावर महाराज दशरथ म्हणाले ," ही विधीची कशी विटंबना आहे. मोठ्या धर्मसंकटात टाकलंय मला. मी जगुही शकणार नाही नि सुखाने मरुपण शकणार नाही. ठीक आहे जशी विधात्याची इच्छा ! आर्यसुमन्त माझी आज्ञा आहे की अयोध्येची चतुरंग सैन्या राम सोबत वनात जाईल. राज्याचा राजकोश, धान्यभांडर आणि इतर काही आवश्यक वस्तू त्यांच्या सोबत पाठवा. जेणे करून ह्या लोकांना वनात ऋषी सोबत राहून यज्ञ करता यावा, दानधर्म करता येईल अशी व्यवस्था करा. आणि माझ्या आज्ञाचे पालन करा." तेव्हा महाराणी कैकेयी म्हणाली की महाराज जर राज्याचा सारा राजकोश वनात जाईल , चतुरंग सैन्या जाईल मग या उजाड झालेल्या राज्याचा माझा पुत्र कदापि स्वीकार करणार नाही. आणि दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले वचन हरलात. कारण आपण भरतला राजा घोषित केले. त्यामुळे भरतच्या अनुमती शिवाय राज्यातील कोणतीही वस्तू कोणालाही देऊ शकत नाही. आणि तो आपल्याला अधिकार ही नाही. माझ्या वरदान मागताना मी आपल्याला सांगितले आहे की ह्या लोकांनी कोपीन मुनी सारखा वेष धारण करायचा आहे नि चौदा वर्षे वनात
जाऊन राहायचे आहे. आणि तशीच ह्यांच्या अंगावरील राजवस्त्र , सारे अलंकार इथंच काढून ठेवावयाचे आहेत.
आणि ह्यांच्या साठी मुनींची वस्त्रे अगोदरच आणून ठेवली
आहेत. मंथरा sss " असे म्हणताच मंथरा मुनींची वस्त्रे
घेऊन आली. नि म्हणाली ," ही वस्त्रे रामसाठी !" ते दृश्य
पाहून आर्यसुमन्त ला भयंकर राग आला. परंतु आपल्या
रागावर नियंत्रण ठेवून तो म्हणाला," देवी कैकेयी क्रूरपणाची पण सीमा असते. आपली क्रूरता पाहून माझं ही मन करते की अयोध्या नगरी सोडून राम सोबत वनात जावे. तू आपल्या पतीची जी दुर्गती केली आहेस त्याबद्दल
तुला नरकात नरक यातना भोगायला तर लागतीलच ! परंतु ह्यात तुझा दोष नसावा. कारण कडू कारले साखरेत
तळले नि तुपात घोळले तरी ते कडू ते कडूच लागते. तुझ्या आईने सुद्धा तुझ्या पित्याची हीच दुर्दशा केली होती."
" आर्यसुमन्त आपण आपल्या मर्यादेत राहाल तर उत्तम
होईल." तेव्हा राम म्हणाले , " आर्यसुमन्त माता कैकेयी
एकदम बरोबर बोलत आहे, आम्हां लोकांना मुनिवेष
धारण करूनच वनात जायचं आहे. राजकोष वगैरे
माझ्या सोबत काहीही जाणार नाही. कारण मी या साऱ्या गोष्टींचा त्याग केला आहे. माता मला आपण आशिर्वाद देऊन ती वस्त्रे द्या." मग महाराणी कैकेयी ने रामाला वस्त्रे दिली. त्यानंतर जेव्हा दुसरी वस्त्रे घ्यायला आली तेव्हा मंथरा म्हणाली ," ही वस्त्रे लक्ष्मण साठी ! " तेव्हा महाराणी कैकेयी ने ती वस्त्रे लक्ष्मण ला दिली. त्यानंतर पुन्हा वस्त्रे
घेण्यासाठी महाराणी कैकेयी गेली असता मंथरा म्हणाली
" ही वस्त्रे तुझ्या सूनबाई सीतेसाठी आहेत . " महाराणी ती वस्त्रे सीतेला द्यायला गेली असता मघापासून गप्प असलेले कुलगुरु वशिष्ठ म्हणाले ," थांब हट्ट धर्मी महाराणी तू आपल्या पतीचा जो अपमान केला आहे. अपमान
करण्याच्या साऱ्या सीमा पार केल्या आहेस तू .पतीचा
कधी मान राखला नाहीस. कमीत कमी रघुवंशी ची मर्यादा तरी तोडू नकोस. सीता तुझी सून आहे. रघुवंशाची शोभा ! आपल्या सूनबाईची उत्तम वस्त्रे उतरून त्या वस्त्रांचा
जागी जोगीनीची वस्त्रे देताना तुझे हात कसे कापले नाहीत ? तू फक्त रामसाठी वनवास मागितला होता.
अर्थात सीता आपल्या राजवस्त्र नि अलंकार परिधान
करून वनात थाटामाटात राहील. ही माझी आज्ञा आहे."
" गुरुदेव योग्य तेच बोलत आहेत. सीता जिथं पण
राहील महाराणी सारखी राहील. मी महाराज जनकाला
तसे वचन दिले आहे. म्हणून सीता वनात एका महाराणी
सारखी राहील." त्यावर सीता म्हणाली," पितृदेव, गुरुदेव
मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे की मला राज वैभव
नकोय. कारण जिचा पत्नी वनात मुनी प्रमाणे आपले जीवन जगत असेल तर तिला महाराणी सारखे सुख भोगणे तिला शोभेल का ? तिला तिचा पत्नी धर्म तरी या
गोष्टीला तयार होईल का ? पत्नी चे सुख पतीच्या सुख-दु:खातच असते. कारण पतीच तिचा सर्वस्व असतो. अर्थात माझे स्वामी ज्या अवस्थे मध्ये राहतील. त्याच
अवस्थेत मी देखील राहीन."
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा