छत्रपती शिवाजी महाराज ३७ | chhatrapati shivaji maharaj episode 37 | Author :- Mahendranath prabhu
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज ३७ | chhatrapati shivaji maharaj episode 37 | Author :- Mahendranath prabhu |
शरीफ जी राजे म्हणाले," आम्ही म्हणत होतो की लखुजी राजे आणि एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर काय करणार ? म्हणजे तशी वेळ येणार नाही म्हणा. कारण लखुजी राजे मोहीमे वरच नाहीत." शहाजी राजे म्हणाले," ते आताच कसं सांगता येईल ? मोहीमे चे काही सांगता येतं का ? कधी पण फर्मान निघू शकतं. आणि सामोरा समोर आल्यानंतर
लढणे भागच आहे ना ?"
पुढे
शहाजी राजे आणि लखुजी राजे समोरासमोर जसे आले
तसे शहाजी राजे म्हणाले," संभाजी दादाच्या वेळी माझ्या
हातात तलवार नव्हती म्हणून मारू शकलात संभाजी दादांना.
आता पाहू या कोण वाचवायला येतो ते तुम्हाला." त्यावर
लखुजी राजे म्हणाले," आम्ही पण हातात काही चुडा भरलेला नाही." असे म्हणून दोघांचे तुंबळ युद्ध जुंपले. कोण कुणाला कमी पडत नव्हता. तश्या दोघीही माय लेकी किंचाळून उठल्या.
अर्थात ते स्वप्न होतं. वेरूळ मध्ये जिजाबाई आणि सिंदखेड
मध्ये म्हाळसा बाई दोघींना ही एकच स्वप्न पडले. झोपते वेळी
दोघींच्या ही मनात एकच विचार सुरू होता. तो म्हणजे दोघेही
एकमेकावर समोर आले तर काय होईल ? मनी असे तेच स्वप्नात दिसे असं म्हणतात ते खरंय. पण कधी कधी तो दृष्टांत पण असू शकतो. दोघीही किंचाळून उठल्या खऱ्या दोघींच्या मनात मात्र विचार वेगळा आला. जिजाबाई हात जोडून म्हणाल्या," शंभू महादेवा, स्वप्नात दाखविलेस तेवढेच पुरे ! आता आमच्यात सहन करण्याची क्षमता नाहीये." तिकडे म्हाळसा बाई म्हणाल्या," रेणुका माते काय सुचवू पाहतेस ग बाई , का उद्या घडणारे आज दाखवतेस आहेस का ? आमच्या पेक्षा आमच्या जिजाची फार कसोटी आहे बाई, ह्या दिवसात हा त्राण नको देवूस ग बाई ."
सकाळी जिजाबाई तुळशी ला पाणी घालायला गेल्या तरी
त्या रात्री पडलेल्या स्वप्नाचा च विचार करत होत्या. त्यांच्या
हात थरथरत असल्याने हातातील आरतीचे ताट आणि ताब्या
खाली पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. इतक्यात
गोमाजी त्यांच्या मदतीला धाऊन आले नि त्यांच्या हातातले
ताट त्यांनी आपल्या हातात घेतले नि विचारले की, जिजा
अक्का काय झाले ? तुमचा हाथ थरथरत का होता ?" त्यावर
जिजाबाई म्हणाल्या," गोमाजी काका आबा साहेब आणि स्वारी
समोरासमोर तर येणार नाहीत ना ?" त्यावर गोमाजी म्हणाले,
" कसे येतील समोरासमोर ,कारण थोरले धनी सिंदखेडलाच
आहेत अद्याप " त्यावर जिजाबाई म्हणाल्या, " अरे हो विसरलेच मी पण आम्हाला स्वप्न असं का पडले ?" गोमाजी तुळशवृंदावन कडे बोट करत म्हणाला, " जिजा अक्का, सर्व चिंता ह्यांच्या वर सोडा. सर्वकाही ठीक होईल."गोमाजी जिजाबाईंना तुळशी ला पाणी घालून तिला गाराने घालायला सांगितले . त्या प्रमाणे जिजाबाईंनी केले.
रुस्तम खान लखुजी राजांना भेटायला आला तेव्हा लखुजी
राजांनी त्यांना त्यांच्या सुरक्षेतेची हमी दिली. पण रुस्तम खान
म्हणाला," देखिये लखुजी राजे जुबान की हिफाजत दौलत की हिफाजत से ज्यादा मुश्किल होती है ." तेव्हा लखुजी राजांनी
त्याला आश्वासन दिले की ,आपल्याला इथ अजिबात दगा
फटका होणार नाही याची हमी आम्ही देतो." त्यानंतर लखुजी
राजांनी त्याला इथं येण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, तुम्हाला मैदाने जंग मे सामील व्हायचे आहे."
असे त्याने म्हणताच लखुजी राजांनी लगेच त्याला होकार दिला.
त्याचे त्याला फार मोठे आश्चर्य वाटले. म्हणून त्याने विश्वास न झाल्याने विचारले," आप सचमुच मान गए ?" तसे लखुजी राजे म्हणाले," हां बिल्कुल एक बार हमने कह दिया तो समझ लिजिए वो पत्थर की लकीर है पत्थर टूटने पर भी वो मिटेगी
नहीं । लेकिन हम एक बात जानना चाहते है, अगर आप
बताना मुनासिब ना समझे तो मत बताईएगा लेकिन एक सवाल
हम आपसे कराना चाहते है." तसा रुस्तम खान म्हणाला," अवश्य आप सवाल कर सकते है, पूछिए क्या पूछना चाहते है आप ?" तेव्हा लखुजी राजांनी विचारलं की निजामशाही कडून कोण कोण लढणार आहेत ? तेव्हा मग त्याने कोण कोठून लढणार आहे, त्या सर्वाची नावे घेतली जसे की, उत्तर से उमर अली और घाड़गे सरदार, पूरब से हमीद खान और शेरखान, पश्चिम से मुस्तफा सैय्यद श्रीपत राव और दख्खन से शाहजी राजे और शरीफ जी राजे ।" असे बोलून तो क्षणभर थांबला नि लखुजी राजेंच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या छटांचे तो अवलोकन करू लागला होता. त्यांच्या चेहऱ्यावर ची गंभीरता पाहून त्याने विचारले, " क्या हुआ ? आप किस सोच में पड़ गए है ?" तेव्हा
लखुजी राजांनी हिंदी मधून सांगितले की, ज्यांच्याशी आम्हाला
युद्ध करायचे आहे, ते आमचे जुने साथीदार आहैत. शिवाय
आमचे त्यात जावई आहेत. पण हरकत नाही आम्ही अवश्य
त्यांच्या सोबत लढू." रुस्तम खान ला त्याचं फार मोठे आश्चर्य
वाटले. म्हणूनच की काय त्याने विचारले देखील की,सच में आप उनके साथ लढेंगे ?" तेव्हा लखुजी राजे उद्गारले. त्यावर रुस्तम खान म्हणाला की," हमे तो लगा की आप मना करेंगे ?" लखुजी राजे उद्गारले," हम ऐसा कभी नहीं कर सकते. विश्वास
करो हम पर ." लखुजी राजे म्हणाले खरे पण मनात कुठेतरी
असं वाटत होतं की जे आपण करायला निघालोय ते योग्य आहे
का ? नाही म्हणजे जावई बापुच समोर आले तर काय करायचं ? आपल्या लेकीचे कुंकू पुसायला आपणच कारणीभूत
व्हायचं का ? छे छे छे ! असं होता कामा नये. त्यासाठी आपल्याला एक काम करायला हवं.दोघांचा सामनाच व्हायला
नको असा विचार करून त्यांनी आपल्या साठी पश्चिम दिशा
मागून घेतली नि त्याने ती दिली देखील. रुस्तम खान खुश
होऊन निघून गेला.
बदशहा हजरत निजामशहा आपल्या दोन्ही वजीर कडून
जंग मध्ये कोणते सरदार कोणत्या दिशेकडून लढणार आहेत
हे माहिती करून घेतो. उत्तर से उमर अली और घाड़गे
सरदार, पूरब से हमीद खान और शेरखान, पश्चिम से मुस्तफा
सैय्यद श्रीपत राव और दख्खन से शाहजी राजे और शरीफ जी
राजे ।" तेव्हा बादशहा हजरत ने विचारले," और मोगलो की
तरफ से कौन कहां से लढ रहा है ?" जेव्हा बादशाह ने लखुजी
राजांचे नाव ऐकले तशी बादशहाने रणनीती विषयी चौकशी
केली तेव्हा दोन्ही वजीर ने सांगितले की, अगोदर सैन्याला
आपल्या इलाख्यात घुसू देऊ मग त्यांच्या वर पुढून आणि
मागून आक्रमण करून त्यांना कोंडीत पकडू." तेव्हा बादशहा
हजरत म्हणाले," यह सब नुक्से पुराने हो चुके है, और लखुजी
राजे यह रणनीति जानते है, इसलिए कोई नई तरकीब ढूंढ लो."
तशी वजीरे आलम मलिक अंबर च्या डोक्यात एकदम सुपर
कल्पना सुचली. त्यानं शहाजी राजांना दक्षिण दिशेच्या ऐवजी
पश्चिम दिशेकडे कूच करायला सांगितले. म्हणजे जावई आणि
सासरा समोरासमोर आले तरच आपली सरसी होईल कारण
लखुजी राजे सिर्फ शहाजी राजेंच्या समोरच मागे हटतील."
बादशहा हजरत अत्यंत खुश होत म्हणाला की वा काय उपाय
शोधून काढला. सूबान अल्हाह !"
उमाबाई आणि जिजाबाई बसलेल्या असतात. इतक्यात
तेथे गोदावरी बाई आणि जाऊबाई येतात. त्यांना पाहून उमा बाई
त्यांना येण्याचे कारण विचारले असता. त्यांनी आपल्या मनात
असलेली इच्छा बोलून दाखविली. परंतु ही मूळ संकल्पना
आपली नसून जाऊबाई ची असल्याची गोदावरी बाई सांगतात.
ते ऐकून उमाबाई अत्यंत खुश झाल्या त्या म्हणाल्या," वा छान
तुम्ही सुचवावे आणि ह्यांनी ते अंमलात आणावे. छान ओठी
भरा हं !"
फतेह खान इकडून तिकडे येरझाऱ्या घालत असतो. इतक्यात मलिक अंबर तिथं येतात नि आपल्या दालनात आपल्या सुपुत्राला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. कारण ही वेळ त्याची महफिल मध्ये जाण्याची असल्याने त्यांना आश्चर्य वाटणे साहजिकच होते. त्यांनीं त्या संदर्भात विचारणा केली असता. तो आपल्या बापावर चिडला. आपण नेहमी असाच माझा पान उतारा करत असता काय मिळते हे सर्व करून ?" त्यावर मलिक अंबर म्हणाला की, एका वजीरे आलमच्या शहजादे ने कसं राहिला हवे आहे याचा विचार केलास का कधी ?" फतेह खान म्हणाला," अब्बा हुजुरी मी सणसणीत खबर आणली आहे, म्हणून तर कधी पासून वाट पाहतोय तुमची .पण तुम्हाला मला अपमानीत केल्या शिवाय मजा येत नाही." त्यावर मलिक अंबर म्हणाला ," काय खबर आणलीस ती सांग बरं ." त्यावर फतेह खान म्हणाला," शहाजी राजे उद्या दक्षिण कडून लढणार आहे, ही खबर लखुजी राजे पर्यंत पोहोचली आणि त्यांनी आपली रणनीती बदलली. लखुजी राजे उद्या दक्षिण दिशेच्या ऐवजी पश्चिम दिशेकडून हमला करणार आहेत." त्यावर मलिक अंबर ने विचारले की ही बातमी खरी आहे का ?" तर फतेह खान म्हणाला, " ये सोलाना सच है।" तसा मलिक अंबर म्हणाला," तो ठीक है, शाहजी राजे को आज रात ही संदेशा भेजो की कल दख्खन से नहीं बल्कि पश्चिम से लड़ना है।" तेव्हा फतेह खान म्हणाला," किसी से खूब कहा है की जहर ही जहर को मीठा देता है, जैसे की लोहा लोहे को काटता है ।"असे बोलून फतेह खान तेथून बाहेर पडला.
उद्या शहाजी राजे नि लखुजी राजे समोरासमोर येऊन लढणार आहेत ही वार्ता ऐकल्या पासून सोयराबाईंना त्याचा
कोण आनंद झाला. कधी ही वार्ता जिजा बाईना ऐकवून
त्यांच्या वर कसे तोंड सुख कसं घेता येईल जणू ह्याचीच त्या
वाट पाहत होत्या. त्या लगेच जिजा बाईच्या दालनात गेल्या
नि म्हणाल्या," जिजाबाई , तुम्ही काय नशीब घेऊन जन्माला
बाई कुणास ठाऊक ? म्हणजे बघा ना तुमच्या नशिबी साधं
ओठी भरणे पण नाही." त्यावर जिजाबाई न समजून म्हणाल्या
" आमची ओठी तर उद्याच भरली जाणार आहे."
" ते आमच्या सूनबाई जाऊ बाई आणि गोदावरी बाई करणार होत्या. पण उद्याचा दिवस काय बातमी घेऊन येतो ते कुणास ठाऊक ? "
" ते तर कुणालाच माहित नसते. पण उद्या काय होणार आहे ?"
" म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही असं म्हणा की !"
" तुम्हाला नेमके म्हणायचं आहे ते सांगा."
" उद्या शहाजी राजे नि लखुजी राजे समोरासमोर येणार
आहेत. मग काय घडेल ते सांगता येईल का ? नाही ना ?"
" नाही नाही आम्हाला आजच वार्ता कळली की आबा साहेब
अजूनही सिंदखेडलाच आहेत." त्यावर सोयराबाई कुत्सित
पने म्हणाल्या," अहो, आज आहेत, पण उद्या मोहीमे वर
जायचे फर्मान आलं तर जावंच लागणार ना ? नाही म्हणून
थोडेच चालते. खरं सांगायचं तर त्यांना जायचंच नव्हतं. पण
नियती आपल्या मना सारखे करू देत नाही ना ?"
" काकी तुम्ही हे खरे सांगताय ?"
" आता खोटं बोलून आम्हाला त्यात काही मिळणार आहे
का ? नाही ना ?" जिजाबाईंना एकदम चिंताग्रस्त झालेले
पाहून त्या पुढे म्हणाल्या," तुम्ही एकदम तयारीत रहा.म्हणजे उद्या कोणतीही माहिती येऊ शकते. जशी आम्हाला बातमी मिळेल तशीच आम्ही तुम्हाला येऊन सांगू ." असे म्हणून सोयराबाई तर निघून गेल्या. पण जिजाबाई मात्र एकदम
चिंताग्रस्त झाल्या. इतक्यात त्यांना शहाजी राजे जेव्हा मोहीमे
वर जाण्यासाठी निघाले होते तेव्हा ते जिजाबाईंनाकाय म्हणाले होते ते आठवलं ; तुमचे आबा साहेब आणि आम्ही यदादाचित समोरासमोर आलोच युद्ध होणे अटल आहे. आणि समजा दुर्दैवाने तसे झालेच तर तुमच्या पैकी एकीचे कुंकू तलवारीच्या अग्र टोकावर असणार आहे . हे जसे त्यांना आठवले तसा त्यांचा जीव खासावीस झाला. त्याचे मन एकदम हळवे झाले. इतक्यात तेथे उमाबाई आल्या आणि त्यांच्या पाठोपाठ गोदावरी आणि जाऊबाई पण आल्या. उमा बाईंनी मोठ्या मायेने त्यांना विचारले," जिजाबाई काय झालंय तुमच्या पोटात दुखतंय का ?" अश्या त्यांना त्या आपुलकीने विचारू लागल्या .तश्या जिजाबाई एकदम उमा बाईना बिलगल्या. उमाबाईंनी त्यांना आपल्या पोटाशी धरले. आणि प्रेमाने विचारू लागल्या की काय झालंय ते मला सांगा बरं ?"
सिंदखेड लखुजी जाधव गढी
लखुजी जाधव मोहीमेवर निघाले आहेत, त्यावेळी नेहमी
प्रमाणे म्हाळसा बाई त्यांचे औक्षण करायला आल्या खऱ्या
पण का कुणास ठाऊक त्यांचे थरथर कापत होते कदाचित.
त्याना शहाजी राजांनी म्हटलेले शब्द आठवलेले असावेत.
त्यामुळे त्यांचे हात थरथर कापू लागले आहेत. ते पाहून
भागिरथी बाई म्हणाल्या," थोरल्या बाई तुमचे हात का थरथरत
आहेत ?" लखुजी राजांनी विचारले की, तुम्हाला आमच्या यशा
बद्दल शंका का अपयश बद्दल ?" त्यावर म्हाळसा बाई म्हणाल्या , " आम्हाला ह्या मोहिमाच नकोत." असं म्हटल्या मुळे भागिरथी बाईंनी म्हाळसा बाईंच्या हातातील आरती ताट आपल्या हातात घेतले नि लखुजी राजांना औक्षण केले नि म्हंटले की मोहीमेवर जाताना अशी भाषा कशाला ? तुम्हाला उदंड यश मिळू दे." तेव्हा लखुजी राजे म्हणाले," थोरल्या बाई नेहमी पुढे चालायचं असते. मागे वळून पाहायचं नसतं की आपण किती रस्ता मागे पडला तो." त्यावर म्हाळसा बाई म्हणाल्या," आता तुम्हाला कसं सांगू ? आम्हाला बोलायला सुध्दा हिम्मत होत नाही. पण बोलल्या शिवाय कळणार कसं ? म्हणून बोलते भोसले आणि जाधव या मध्ये कोणाची ही हार जित झाली तरी नुकसान आपलंच होणार." त्यावर लखुजी राजे म्हणाले, " आम्हाला कळत नाहीये. असे म्हणायचं आहे का तुम्हाला ? पण तुम्हाला एक सांगतो की शहाजी राजे आणि आम्ही समोरासमोर येणार नाही याची काळजी घेतली आहे आम्ही !"
" पण समजा समोर आलातच तर ?"
" वेड वाकडं काही होऊ देणार नाही. याची खात्री बाळगा."
वेरूळ भोसले गढी
सोयरबाईंनी वार्ता दिल्या पासून जिजाबाई फार कोलमडून
गेल्या. काय घडतं आणि काही नाही याचीच चिंता त्यांना
लागून राहिली होती. त्यामुळे त्यांचे मन एकदम बैचेन झाले
होते. त्यात आणखीन मंबाजी राजे धीर देण्या ऐवजी त्यांना
अजून घाबरवत होते. जिजाबाई आपल्या आपल्या दालनात
एकट्याच होत्या. आणि शंभू महादेवाना आणि रेणुका माते ला
साकडं घालत होते की काही अभ्रद घडू देवू नकोस." इतक्यात
तिथं मंबाजी राजे आले नि म्हणाले," वहिनी साहेब, दोन्ही घराच्या देवांना साकडं घालतातय ते चांगले आहे. कुणास ठाऊक कसली खबर येईल ती ? म्हणजे आमच्या आऊ साहेबांनी सांगितले आहे की जशी खबर मिळेल तशी खबर मी आपणास येऊन सांगेन. म्हणून आम्ही आलोय खबर घेऊन." तसे जिजाबाईंनी अधिरतेने विचारले," कोणती खबर आणलात ती अगोदर सांगा बरं " मंबाजी राजे म्हणाले," अजून
कोणतीही अमंगल खबर आली नाहीये म्हणा. पण आल्यावर
नक्की सांगेन." पण त्यांना माहीत नसते की त्यांच्या पाठीमागे
उमा बाई उभ्या आहेत. आणि त्यांनी मंबाजी राजाचे बोलणे
अगोदर ऐकून घेतले नि त्यांना चांगलेच खडसावले. त्या म्हणाल्या की मंबाजी राजे मनसबदार झाला आहात ना ?
कुठं काय बोलावे हे देखील कळत नाहीये का ? का मुद्दाम
करताय हे सारे ?" सध्या त्यांची अवस्था काय आहे ती." त्यावर मंबाजी राजे म्हणाले, " आऊ साहेबांनीं सांगितले होते की
जशी खबर येईल तशी येऊन सांगा म्हणून." उमाबाई म्हणाल्या,
" हो का ? एवढा जर पुळका आहे, तर मला येऊन सांगा हां !"
मंबाजी राजांच्या तोंडात मारल्या सारखे झाले. त्यांनी तेथून
काढता पाय घेतला. तशी उमा बाईंनी जिजाबाईंना धीर दिला.
नि सांगितले की काही चिंता करू नका. सर्वकाही चांगलेच
होईल. मनात कधीही वाईट विचार आणायचे नसतात. नेहमी
सकारात्मक विचार करायचा असतो.
शहाजी राजे आपल्या प्रताप नावाच्या घोड्याशी हितगुज
करत असतात. आपल्या विजयाचे सारे श्रेय्य त्या घोड्यालाच
देतात. इतक्यात तेथे शरीफ राजे आले नि म्हणाले ," दादा साहेब तुम्हाला ठाऊक आहे. ?" त्यावर शहाजी राजांनी विचारलं कशाबद्दल बोलताय ?" लखुजी राजे पश्चिम दिशेकडून लढताहेत म्हणून मलिक अंबर ने आपल्या देखील पश्चिम दिशेकडून लढण्याचे फर्मान येणार आहे." शहाजी राजे म्हणाले, " आमच्याशी सल्लामसलत न करता असा कसा ते निर्णय बदलू शकतात ? हे सरासर चुकीचे आहे. असं कुणी करतं का ?"
" मग आता काय करायचं ?"
" ते आता आम्ही करूनच दाखवणार."
मलिक अंबर दालन
फतेह खान आला नि आपल्या बापाला म्हणाला,"अब्बा हुजूर
आप उदास क्यों बैठे है ? जश्न बनाना चाहिए ।"
" किस बात का जश्न बनाना चाहिए ?"
" शाहजी राजे और लखुजी राजे आमने सामने आएंगे तो
एक दूसरे पर वार तो करेंगे तो शाहजी अल्ला को प्यारे हो जायेंगे तो हम उन्हे महरुम कहेंगे ।" त्यावर मलिक अंबर म्हणाला, " शहाजी राजे के बजाए अगर लखुजी राजे को महरुम कहना हमे अच्छा लगेगा ."
" लेकिन क्यों अब्बा हुजूर ?"
" अब वो ऐसे मुकाम पर पहुंच गए है की वो कहीं भी रहेंगे
तो की उनकी राय पहली मानी जायेगी मुगल सल्तनत में रहेंगे
तो लश्कर खान जरूर पूछेगा कि वजीरे आलम मालिक अंबर
क्या सोचता है, उसकी रणनीति कैसी है ?और अगर निजामशाही में वापस आयेंगे तो बादशहा हजरत पूछेंगे कि
लश्कर खान की रणनीति कैसी है ? "
" अब्बा हुजूर आप बहुत दूर का सोचते है ।"
"गुलाम से वजीरे आलम युही नहीं बना बैठे ? आगे के बारे
में सोचो फतेह मियां बहुत दूर की नहीं तो कल की सोचो ।"
" कल तो हमे बहुत बड़ा दुख होगा, शाहजी राजे महरुम
होने की खबर हम भिजवा देंगे ।"
लखुजी राजे तलवारी च्या धारेवर आपले हात फिरवत
असतानाच मोगल सल्तनत वजीरे आलम लश्कर खान
आला. तसे लखुजी राजे म्हणाले," मोंगल सल्तनत का परचम
बुलंद रहे । " असे म्हणून लखुजी राजे पुढे म्हणाले," आप
क्यों आए हमे बुलाया होता."त्यावर लश्कर खान म्हणाला,
" लखुजी राजे, आप निजामशाही को नेस्तनाबूत करेंगे
उनका कोई भी सरदार नहीं बचना चाहिए। रिश्ते नाते का यहां कोई मोल नहीं है, इसलिए आप कल दख्खन से लढेंगे आपके
सामने होंगे आपके दामाद शाहजी राजे । याद रखना यह
लश्कर खान वजीरे आलम का फरमान है।" असे बोलून
तो निघून ही गेला. आता लखुजी राजांना प्रश्न पडला की
आता काय करावं ? शहाजी राजे आपल्या समोर येऊ नये
म्हणून भरपूर प्रयत्न केला. पण शेवटी जे व्हायचे तेच झाले.
वेरूळ भोसले गढी
हिराजी ला जखमी अवस्थेत आणले गेले. गोदे ने त्याला
पाहिले आणि फक्त मोठ्याने टाहो फोडला. तसे सगळेजण पळतच बाहेर आले. गोमाजी पटकन पुढे आला नि हिराजी चे डोके आपल्या मांडीवर उचलून घेतले नि त्याला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. हिराजी डोळे उघडत नव्हता. आणि गोमाजी त्याला प्रश्नावर प्रश्न विचारत होता की तू एकटाच कसा आलास ? राजे कुठं आहेत ? वगैरे ....." पण हिराजी काहीच बोलत नव्हता. त्यामुळे जिजाबाई ची अवस्था फार विचित्र झाली होती. त्यांना खरे काय झाले होते ते काही कळेना. अचानक त्याच्या पोटात वेदना सुरू झाल्या. त्यांना पकडुन आंत घेऊन जाण्यात आले. त्यांना आपल्या वेदनांची अजिबात परवा नव्हती. त्यांना फक्त शहाजी राजांची चिंता सतावत होती. सगळ्या बाया त्यांच्या सभोवती जमल्या होत्या . सोयराबाईंनी रांज वैद्याला बोलविण्यास गोदावरी बाईना सांगितले. गोदावरी बाईंनी होकारार्थी मान डोलावली नि त्या वैद्य बुवा ला बोलवायला गेल्या. जिजाबाईंना स्वतःला होणाऱ्या वेदनांची अजिबात परवा नव्हती. त्या फक्त एकच प्रश्न विचारत होत्या की स्वारी चे काय झालं ते सांगा." पण कोण सांगणार ? तिकडे काय घडलं हे कुणालाच माहीत नाही. हिराजी अजून शुध्दीवर
आलेला नाही. त्यामुळे कळायला काहीच मार्ग उरला नव्हता.
सोयराबाई म्हणाल्या," आता फक्त जन्माला येणाऱ्या बाळाचा
विचार करा, बाकी काहीच विचार करू नका." उमा बाईंनी
पण तेच सांगितले.
हिराजी शुध्दीवर हळूहळू शुध्दीवर आला पण तोच उलट
विचारू लागला की राजे कुठे आहेत नि राजांचे काय झाले?"
गोदे ने विचारले," धनी तुम्ही ठीक आहे ना ." हिराजी म्हणाला," हो मी ठीक आहे." वैद्य बुवा आले आणि त्यांनी
जिजाबाईंच्या हाताची नाडी पकडुन सांगितले की प्रसूती ची वेळ अगदी जवळ आली आहे, तेव्हा मी पुढच्या तयारीला
लागतो ." असे म्हणून ते जडीबुटीचा काढा बनवाया गेले.
काही बायकांनी चादर आणल्या आणि आडोसा तयार केला.
गोमाजी ने हिराजी ला विचारले की राजे कोठे आहेत ?
तर हिराजी म्हणाला," मला माहित नाही." मग गोमाजी नि
विचारले की तुला कुणी मारले तर हिराजी म्हणाला,
" आदिलशाही च्या सरदारांनी ते राजांना भेटायला येत होते.
मी त्यांना अडवले नि त्यात आमची बाचाबाची झाली आणि त्यांनी माझ्या वर हत्यार उचलले. मी जखमी झालो नि बेशुध्द झालो त्यामुळे पुढे काय झालं ते मला माहित नाही."
रणदुल्ला खान आणि पंडित मुरार जगदेव ही आदिलशाही
ची माणसे शहाजी राजांना भेटायला आले तेव्हा शहाजी राजे
त्याच्यावर खूप रागावले. पण पंडित मुरार जगदेव म्हणाले,
" राजे शांत व्हा आम्ही तुमच्यावर आक्रमण करायला नाही
आलोय तर आपल्याला आदिलशाहीत घेऊन जायला आलोय."
तेव्हा शहाजी राजे म्हणाले,' हो मग आमच्या माणसाला का
जखमी केले ? ही कोणती पद्धत भेट घेण्याची ? नाही म्हणजे तुम्हाला जर वाटतं की आम्ही आदिलशाहीत यावे तर तुम्ही तुमच्या शिव बांदित अगोदरच सांगून ठेवायला पाहिजे होते ना, तुमच्या सैनिकांनी आमच्या शिलेदारला घायाळ केलं त्याचं काय ? "
" राजे शांत व्हा !"
" कसा शांत होऊ , सांगा बरं ? तुम्ही पंडित आहात ना,
तुम्हाला इतकं तर माहित असेलच की आपण कुणाकडे
आपल्या कामासाठी जातो तर त्याच्याशी सन्मानाने वागायचं
असतं. तुम्ही अगोदर दुसऱ्यांना मान द्या तेव्हा दुसरे तुम्हाला
मान देतील." त्यावर रणदुल्ला खान म्हणाला," राजे हम आपसे
अदब से पेश आ रहे हैं, इसका मतलब ये नही की आप हमारा
अपमान करते रहेंगे ।"पंडित मुरार जगदेव म्हणाले की,आप
हमारी तौहीन कर रहे है और हम चुपचाप सुनते रहे है, आप
हम से यह उम्मीद मत रखिएगा की हम चुपचाप यहाँसे जायेंगे ।
रणदुल्ला म्हणाला की, आम्ही अजूनही एकमेकांचे दुश्मनच आहोत तेव्हा विचार करा." तेव्हा शहाजी राजे म्हणाले की आपण आमच्या छावणी आले आहेत हे विसरू नका."
" तुमच्या छावणी ला आमच्या सैन्याची घेरले आहे, हे तुम्ही
विसरू नका. एका क्षणात पळापळ सुरू होईल." असे बोलून
संधि मिळताच अचानक पंडित मुरार जगदेव ने शहाजी वर
हल्ला चढविला. शहाजी च्या गळ्याला आपली कट्यार लावत म्हणाला, " हमने सुना था की शाहजी राजे बहुत शातिर है और जाबाज़ भी है लेकिन , इन्हे देखकर ऐसा लगता तो नहीं." शाहजी राजानी क्षणाचा ही विलंब न करता स्वताची सुटका तर
केलीच पण पंडित मुरार जगदेव ला जायबंदी केले. त्याच्या
गळ्यावर कट्यार ठेवत ते म्हणाले, सही सुना है आपने, अब पता चला हम क्या कर सकते है, और क्या नहीं कर सकते।" तेव्हा रणदुल्ला खान त्याच्या मदतीला धाऊन आला. शहाजी राजांना त्याची कल्पना होतीच म्हणा. त्यांनी आपल्या लाथेच्या एका प्रहार ने त्याला तोंडावर पाडले. आणि त्याला ताकीद दिली की खबरदार, खान साहब, चालाकी करने की कोशिश न करना, वर्ना आपका ये पंडित अल्लाह को प्यारा हो जायेगा । आप बाहर जाइए ओर अपने सारे लोंगोको हाथ पीछे बांधकर हमारे सामने लेकर आइए, और उसमे कोई चालाकी नही वरना ये पंडित तो गया "
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा