छत्रपती शिवाजी महाराज ३६ | chhatrapati shivaji maharaj episode 36 | Author :- Mahendranath prabhu.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज ३६ | chhatrapati shivaji maharaj episode 36 | Author :- Mahendranath prabhu. |
शहाजी राजे आपल्या शिलेदारा सोबत गप्पागोष्टी करत असतात. प्रत्येकजण आपापल्या बहादुरीचे किस्से सांगत
असतात. इतक्यात एक पठाण खलीता घेऊन आला नि
मंबाजी राजेंच्या हातात दिला आणि मंबाजी राजांनी तो
खलिता वाचला. शहाजी राजे मनातल्या मनात विचार करत
होते की, कोणाचा बरं असेल हा खलीता ? मोंगलांचा का
निजामशाहीचा ? कसं कळणार ? मंबाजी राजे तर तोंड
वर करून पाहत देखील नाहीत आमच्याकडे ? पण काहीतरी
खास आहे खालीता मध्ये, हे नक्की !"
पुढे
जिजाबाई तलवारी जवळ उभ्या असतात नि तलवारी शी
हीजगुज करत असतात. इतक्यात तेथे गोदा येते नि त्यांना
म्हणते की , पोटातील बाळाला समजवताय का स्वतःला ?अहो
अशी वेळच येणार नाही बघा. थोरले धनी काहीतरी मार्ग
काढतील बघा." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," हुं तुझे बोल
खरे होवो !" गोदा म्हणाली," पण फक्त गोष्टी करून पोट
भरत नाही त्यासाठी बाळाच्या आऊ ने काहीतरी खायला हवं."
त्यावर जिजाबाई म्हणाल्या," गोदा जेवढ्या सासूबाई आम्हाला
बोल लावत नाहीत. तेवढ्या तू लावतेस." गोदा म्हणाली," त्या
बोलत नाहीत पण करून मात्र दाखवतात."जिजाबाईंनी न
समजून विचारले," म्हणजे ?" गोदा उत्तरली," म्हणजे थोरल्या
बाई साहेबांनी आम्हाला बोचके बांधायला सांगितले आहे."
" म्हणजे तू सिंदखेडला निघालीस ?"
" हो."
" मला एकटी ला सोडून ? तू तर माझी सावली बनून आली
होती स ना ?"
" हो आहेच मी सावली आणि सिंदखेड ला एकटी जाणार
नाही काही."
" मग ?"
" तुम्ही सुद्धा सोबत असणार आहेत आमच्या."
" आम्ही सुध्दा ?"
" हो. पहिलं बाळंत पण माहेरीच केलं जातं ना ?"
" पण सासूबाई परवानगी देतील का ?"
" त्यांनी परवानगी दिली सुध्दा. म्हणून तर थोरल्या बाई
साहेबांनी मला तयारी करायला सांगितली." माहेरी जायला
मिळणार म्हणून जिजाबाई फार खुश झाल्या.
जाऊबाई, गोदावरी ला म्हणाल्या," बरं झालं बाई ! जिजाबाई
माहेरी निघाल्या त्या. निदान तिथं तरी त्या खुश राहतील."
" असं का म्हणता ?"
" इथं काही म्हटले तरी आमचा चेहरा त्यांच्या समोर येणारच
ना ? त्यांना उगाच अपराधी पना जाणवतो त्या बोलत नाहीत.
परंतु आम्हाला तो जाणवतो."
" कमाल आहे तुमची त्यांच्या बद्दल तुमच्या मनात अजिबात
कडवट पना नाहीये."
" कडवट पना आणि जिजाबाई बद्दल कदापि येणार नाही.
त्या जेव्हा पहिल्यांदा इथं आल्या ना तेव्हा फार लहान होत्या.
पण तेव्हा ही समज मोठ्या माणसा सारखीच होती."
" त्या आहेतच हो चांगल्या पण त्यांच्या आबा साहेबां कडून
तुमच्या स्वारी चे जाणे जरा अनपेक्षित होतं ना ? तुम्हाला वाईट
वाटत नाही का त्याचं "
" वाटतं ना, पण त्यात जिजाबाईचा काही दोष नव्हता. आणि त्यांच्या आबा साहेबांना पण आम्ही दोष देणार नाही, कारण आमच्या स्वारी च्या हातून त्यांचा थोरला मुलगा मारला गेला होता. म्हटल्या वर त्यांचा ही राग अनावर होणारच ना ? त्यामुळे कोणाला ही दोष देणे योग्य नाही. हां फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते. आणि ते म्हणजे त्यांना काकासाहेबा सारखे आणि आबासाहेबा सारखे वीरमरण यायला हवे होते ते आलं नाही ते जर आलं असतं ना, तर कशाचीच खंत नव्हती."
इतक्यात तेथे सोयराबाई आल्या नि म्हणाल्या," जिजाबाई
माहेरी चालल्या आहेत बाळंतपणासाठी ! त्यांना आहे का काही दीर गेल्याचे दुःख ? कसे असणार प्रत्येकजण फक्त स्वतःचाच विचार करतो. म्हणून तुम्ही दोघींनी सुध्दा एकिमेकिना धरून रहा." त्यावर त्या दोघी काहीच बोलल्या नाही. कारण त्यांना त्यांच्या सासूबाईची सवय ठाऊक होती. जिजाबाईंना बोल लावण्यासाठी फक्त त्यांना निमित्त हवं असतं.
खलीता मध्ये काय लिहिले आहे हे कोणाला ही न सांगता
मोहीम अर्ध्यावरच सोडून मंबाजी राजे वजीरे आलम मीआण
राजूला येऊन भेटतात. तेव्हा कासिम खान त्यांना पाच हजारी
मनसबदारी मंबाजी राजांना मिळाल्याची खुश खबर देतो.
त्या शिवाय ही जहागिरी वजीरे आलम मीआण राजू मुळे
मिळाल्याचे ही सांगतो. तसे मंबाजी राजे वजीरे आलम मी आण
राजुचे आभार मानतात. तेव्हा कासिम खान त्यांच्यावर एक
काम सोपवतात. आणि ते काम म्हणजे शहाजी राजांच्या वर
नजर ठेवणे. शहाजी राजे आपल्या सासऱ्या सारखे मोगलाई
जाणार असतील तर ताबडतोब इथं येऊन खबर देणे. त्यावर
मंबाजी राजे म्हणाले की, हे काम आपण न सांगता ही आम्ही केलेच असते. त्यानंतर कासिम खान सांगतो की आपले नि शहाजी राजांचे मसुलात बादशहा दरबारी जमा करण्या अगोदर इथ हजेरी लावायला विसरून नकोस." मंबाजी राजांना त्याच्या म्हणण्याचा अर्थ कळला नाही म्हणून मग त्याने शंभू महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर अगोदर कोणाच्या पायी पडता असे विचारले. तेव्हा मंबाजी राजांच्या ध्यानात आले की त्याला नेमके काय म्हणावयाचे आहे ते. म्हणजे जसे अगोदर नंदीच्या पायी पडले जाते तसेच बादशहा हजरत कडे हजेरी लावण्या अगोदर वजीरे आलम मीआण राजू कडे हजेरी लावायला लागणार. हाच अर्थ होता त्याचा.
वजीरे आलम मलिक अंबर चे फर्मान आले होते. आता शेतात
राबणाऱ्या शेतकऱ्यांना पण मोहीमे वर जावे लागणार म्हणून
सारे शेतकरी जिजाबाई कडे न्याय मागायला आले होते.
जिजाबाईंनी त्यांची समजूत घालत म्हटले की आता वेळच तशी
आली आहे, सर्वांना शस्त्र हाती धरावे लागणार." तर शेतकऱ्या चे म्हणणे होते की आम्हाला फक्त शेतीची कामे येतात. हाती
शस्त्र धरलं नाही कधी !" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," जमीन
मालकीची राहिली तर शेती मध्ये राबाणार ना ? शेतीच राहिली
नाहीतर काय करणार तुम्ही ?" इतक्यात तेथे मंबाजी राजे
आले नि अभिमानाने म्हणाले," शेतकऱ्यांनी फक्त शेतातच
राबायचं. मोहीमे वर जायची काहीही गरज नाही. चला निघा
इथून." राजा सारखे आदेश देवून मोकळे झाले. तरी पंत
म्हणाले की वजीरे आलम मलिक अंबर चे फर्मान आले होते
म्हणून आम्ही त्यांना बोलवून घेतले होते." त्यावर मोठ्या
तोराने मंबाजी राजे म्हणाले," वजीरे आलम शी आम्ही बोलू."
बिच्चारे शेतकरी निघून गेले. तेव्हा जिजाबाईंनी विचारले की,
तुम्ही इथं कसे ? नाही म्हणजे तुम्ही मोहीमे वर गेला होता ना ?"
" हो काल रात्री पर्यंत मोहीमे वरच होतो. पण अचानक
वजीरे आलम मीआण राजूनी दरबारी बोलवून घेतले नि
आम्हाला संभाजी दादा साहेबांची मनसबदारी आम्हाला बहाल
केली. आणि दोन्ही मनसबदारीचे व्यवहार आम्हालाच बघायला
सांगितले."असे बोलून तेथून निघून गेले. तेव्हा जिजाबाई पंतांना
म्हणाल्या," पंत मनसबदार दोन असले तरी शिक्का कट्यार
एकच मिळालेली आहे, तेव्हा कोणतेही व्यवहार आमच्याशी
सल्लामसलत केल्या शिवाय करू नका. सासूबाई आजारी
असल्या तरी आम्ही आहोत म्हटले. आम्ही कारभार पाहू शकतो." पंतांनी होकारार्थी मान डोलावली. जिजाबाई
तिकडून निघाल्या त्या सरळ दालनात येऊन बसल्या होत्या. इतक्यात त्यांच्या आऊ साहेब म्हणजेच म्हाळसा बाई आल्या नि
विचारले की तुम्ही अजून तयारी केली नाही. जिजा आटपा लवकर उशीर होतोय जायला . जिजाबाई उठून उभ्या राहतात नि त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकण्याचा प्रयत्न करू
लागतात तर त्यांना त्रास होऊ लागतो. तेव्हा म्हाळसा बाई त्यांना
तसे करण्यास मनाई करतात. शिवाय त्या असं ही म्हणाल्या की , आमच्या पाया पडण्याची गरज नाही. उमाबाईच्या पाया पडून घ्या. कारण त्यांचा निरोप तुम्हाला घ्यायचा आहे." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आम्ही त्यांचा नाही तर आपला निरोप घेत आहोत " म्हाळसा बाईंनी एकदम गोंधळून विचारले,
" म्हणजे तुम्ही सिंदखेड ला येत नाही तर ?"
" होय आऊ साहेब."
" पण अचानक निर्णय बदलण्याचे कारण काय ?"
" कारण विशेष तसं काही नाही."
" मग ?"
" स्वारी इथं नाहीयेत. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही
सिंदखेड ला कसे बरं येणार ? मागे दोन वेळा त्यांची परवानगी
न घेताच आम्ही दौलताबाद आणि वजीरे आलम पाशी गेलो
होतो त्याचे परिणाम काय झाले होते हे आपल्याला ठाऊक
आहेत ना ? पुन्हा तीच चूक कशी करायची ? शिवाय तिथं
तुमची गरज आहे नि इथं आमची !" त्यावर म्हाळसा बाई
त्यांची प्रशंसा करत म्हणाल्या," आम्हाला खूप अभिमान
वाटतोय तुमचा. माहेरी जाण्या इतके चांगले सुख दुसरे
कोणतेही नसते. पण तुम्ही हक्काच्या सुखावर पण पाणी
सोडता. मानलं तुम्हाला आम्ही !"
सोयराबाईंनी मंबाजी राजांना खुश खबर काय आहे ते
सांगायला सांगितले. तेव्हा मंबाजी राजांनी आपल्याला संभाजी
राजांची मनसब मिळाल्याचे सांगितले. त्यावर सोयराबाई अत्यंत
आनंदित झाल्या. आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.
ते पाहून मंबाजी राजांनी त्यांना त्याचे कारण विचारले असता त्या म्हणाल्या," हे आनंदाश्रू आहेत, मनसब बादशहाच्या दरबारी जमा झाल्या नंतर काय अवस्था होते. याचा आमच्या पिढीला चांगलाच अनुभव आहे. आमच्या स्वारी नी मनगटाच्या जोरावर मनसबदारी मिळविली. आणि त्यानंतर संभाजी राजानी ती ठीकवून धरली. थोडे रागिष्ट होते खरे पण त्यांच्या मनगटात धमक होती. शहाजी राजांना पाठीशी घालण्यात वेळ वाया घालवला नसता तर नक्कीच आयुष्य वाढलं असतं त्यांचं ." त्यावर मंबाजी राजे म्हणाले," आऊ साहेब काळ बदलला की माणसे ही बदलतात. अर्थात आपल्याला ही बदलायला हवे आहे. आबा साहेबांनी काका साहेबांची पाठ राखण केली. कारण ते सख्खे भाऊ होते. शिवाय ते स्वतःला लक्ष्मण मानत असत. पण आम्ही तर चुलत भाऊ आहोत. त्यामुळे शहाजी राजांची पाठराखण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शेवटी सख्खे चुलत हा फरक असतोच ना ? पण संभाजी दादा साहेबांना आमचा विचार कधी पटला नाही म्हणा. पण आता तेही हयात नाहीत. म्हणजे आता आम्हाला अडविणारा कोणी
नाही.
" म्हणूनच आम्ही सांगतोय ते नीट ध्यानात ठेवा. तुम्ही
कोणावर ही विश्वास ठेवू नका. आम्ही तुमचं भलच करू
नुकसान नाही करणार, आणि हो जरा दूर चां पण विचार करा."
" म्हणजे ?"
" तिकडे जावई सासरे समोरासमोर आले की भविष्य काय
असेल याचा विचार करा नि तशीच पाऊले टाका."
उमाबाई आपल्या दालनात झोपल्या आहेत. आणि त्यांच्या
पाया शी बसून जिजाबाई त्यांच्या पायांना मालिश करत आहेत.
उमाबाई झोपेतच उद्गारल्या," आत्याबाई, तुम्ही अजून गेल्या
नाहीत का? अहो किती रात्र झाली आहे ? " लगेच आठवल्या
सारखे करत आत्या बाईंनी तर एवढ्यात अर्धा रस्ता पार केला
असेल मग आत्याबाई सारखे हे कुणाचे हात असे बोलून त्यांनी
डोळे उघडले. समोर जिजाबाईंना पाहून त्या म्हणाल्या," अगबाई तुम्ही अजून इथचं. मग आत्याबाई पण अजून इथच
असतील." जिजाबाई म्हणाल्या," नाही.आऊ साहेब गेल्या
सुध्दा !" तसे उमा बाईंनी विचारले ," मग तुम्ही का नाही
गेलात ?" त्यावर जिजाबाईनी त्यांना आराम करण्या विषयी
सांगितले. त्यावर त्या आपण नाजूक नाही असं म्हणाल्या.
आणि त्यांना पुन्हा शिंका येऊ लागल्या. तेव्हा जिजाबाईंनी
त्यांना सांगितले की तुम्हाला आराम करण्याची गरज आहे."
" आम्ही आराम करू पण तुम्ही का नाही गेल्या ते सांगा.
आम्हाला बरं नाही म्हणून तुम्ही जायचं नाकारले का ?"
" हो म्हणूनच."
" मग हे कारण नक्कीच नाही."
" हे ओ काय आम्ही हो म्हटलं की तुम्ही नाही म्हणता आणि
आम्ही नाही म्हटले हो म्हणता ?"
" आम्हाला माहीत आहे , विषय संपवण्यासाठी तुम्ही हो
म्हणालात. आता खरं कारण सांगा. आमची तब्बेत खालावली
म्हणून नाही म्हटलात की वाड्यात पुरुष मंडळी कुणी नाही
म्हणून नाही म्हटलात ?" जिजाबाई त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न
देता दिवा लावायला जातात. तश्या उमाबाई म्हणाल्या," आलं
लक्षात मंबाजी राजे आले, हुकूमाचा कागद मिळाला. कारभारचा प्रश्न आला. होय ना ? या इथं बसा. तुम्ही भोसल्यांच्या सूनबाई आहात. पण आपल्या आऊ साहेबांना पटेल असे कारण सांगितले ना ?"
" खरे तेच सांगितले. स्वारी नी परवानगी दिली असती तर
आलो असतो."
सिंदखेड लखुजी जाधव गढी
म्हाळसा बाई जश्या सिंदखेडला परतल्या. तसे लखुजी राजे
आणि भागिरथी बाई त्यांच्या जवळ आल्या नि त्यांना विचारले,
थोरल्या बाई तुम्ही एकट्याच कश्या आल्यात ? जिजा कुठं आहेत ?" म्हाळसा बाई म्हणाल्या ," नाही आल्यात त्या ?"
" का ?" दोघांनी पण एकदम विचारले.
" कारण आपल्या पेक्षा जिजाची काळजी घेणाऱ्या उमाबाई
आहेत तेथे . त्या खूप काळजी घेतात जिजाची!" म्हाळसा बाई
" तुमच्या माहेरच्या आहेत ना त्या म्हणून म्हणताय तुम्ही असं ? पण बाकीचे त्यांचं काय ?" भागिरथी बाई उद्गारल्या.
" नात्याला जपणारी माणसे आहे ती, उगाच कायपण बोलू
नका ."
" अहो पण पाहिलं बाळंतपण माहेरी असतं ना ?"
" हो माहेरीच असतं, म्हणून जाताना तुम्हाला सोबत चला
म्हटलं होतं, पण तुम्ही नाही आल्या. आता सोबत नाही आणलं तरी तुमची नाराजगी !" म्हाळसा बाई म्हणाल्या.
" आमचा नाही पण धाकल्या बाईं साहेबांचा तरी विचार करायचा होता." भागिरथी बाई उद्गाल्या. त्यांना दुजोरा देत लखुजी राजे म्हणाले," धाकल्या बाईंनी केवढी मोठी तयारी
करून ठेवली होती. तुम्ही जिजाला सोबत आणणार म्हणून."
" आम्ही जीजाना आणणारच होतो पण जिजानी स्पष्ट सांगितले की आम्ही आमच्या स्वारी ची परवानगी घेतली नाही म्हणून आम्ही येऊ शकत नाही. पण आम्हाला असं वाटतं की हे खरे कारण नसून कारभार आहे. शिवाय उमाबाईची तब्बेत ठीक नाहीये. म्हणून कदाचित जीजानी नकार दिला असावा."
जिजाबाई चंदन उगाळत असतात. तेव्हा तेथे गोदा येते
नि त्यांना जिजा अक्का ते माझ्या कडे द्या मी करते. पण जिजाबाई तिच्या हातात देत नाही. दुनिया इकडची तिकडे
झाली तरी मी हे तुला काम करू देणार नाही." गोदा नाईलाजाने
तिकडून निघून गेली. जिजाबाईंनी त्या चंदनाच्या लेप उमा
बाईच्या कपाळी लावला. इतक्यात गोदा परत आली म्हणून
तिच्यावर चिडल्या. " तू परत आलीस ?" त्यावर गोदा म्हणाली,
मी इथं तुमचं काम करायला नाही आले तर दुसऱ्या गावची माणसं आली आहेत. त्यांना घालवून देवू का ? हे विचारायला
आले आहे." असे बोलून गोदा तेथून जाऊ लागली. तश्या जिजाबाई तिला थांब म्हणाल्या नि आपल्या हातातील सहान तिच्या हातात देत त्या म्हणाल्या, आता तू ह्याला सांभाळ आम्ही आलो." असे बोलून त्या सदरेवर पोहोचल्या. तेथे गावातील लोक आले होते. त्यांचे म्हणणे असे आहे की आम्ही शेतकरी लोकं आम्हाला फक्त जमीन नागरून त्यात बी पेरायचं माहित आहे, तलवार पकडली नाही कधी . तेव्हा जिजाबाईंनी मंबाजी राजाकडे पाहत म्हटले की द्या आता त्यांच्या प्रश्नांचे उत्तर ?" मंबाजी रुबाबात म्हणाले," आम्ही राजे आहोत, आम्ही कुणाचे बांधील नाही.". त्यावर जिजाबाई म्हणाल्या ," मग ते तुमच्या फर्माचे बांधील ते कसे राहतील. आपण कारभार पाहतो तर त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायलाच हव." मंबाजी राजांना काय करावे ते कळेना पण उद्धट बोलणे काही त्यांचे गेले नाही. ते म्हणाले," एवढेच असेल तर तुम्हीच द्या त्यांच्या प्रश्नांचे उत्तर ." असे म्हणून मंबाजी राजे तेथून चालते झाले. त्यानंतर जिजाबाई म्हणाल्या," तेव्हा शेतकरी एकदम ओरडले की आम्ही जाणार नाही." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," तुम्ही नका जाऊ पण न्याहरी तरी करून जा ." असे म्हणून जिजाबाईंनी पंतांना सांगितले की ह्या सर्वासाठी झुणका भाकर तयार करा पण झुणक्या मध्ये मीठ टाकायला सांगू नका." शेतकरी ओरडले की तुम्ही काहीही केलात तरी आम्ही जाणार नाही." जिजाबाई म्हणाल्या, " तुमच्या वर कोणीही जबरदस्ती करणार नाही.फक्त जाताना न्याहरी करून च मग जा." इथं जिजाबाई बोलत होत्या
तिथं उमाबाई आणि गोदा तेथे आल्या. आणि जिजाबाई
लोकांना कसे समजावणार आहेत.या कडे लक्ष देतात. जिजाबाई आपल्या आसनावर बसत म्हणाल्या," आता दोन घास खाऊन जा कारण नंतर उसंत मिळणार नाही. वळकटी बांधायची जेवढं जमेल तेवढं अन्न धान्य घ्यायचे नि जिथं सुरक्षा वाटेल तिथं जाऊन राहायचं नाहीतर हकनाक मरून जाल....बेडका सारखे."
" बेडका सारखे म्हणजे ?"
" तुम्हाला माहित नाही थांबा सांगते. बेडूक पाण्यातून बाहेर
कुठं पडतो ? हयातीची होरपळ हसत मुखाने झेलतो. पण पाण्यातच राहतो. पण जंगली श्वापदे लचके तोडायला
रानात शिरतात. पण त्याने बेडकाला त्याचा काही फरक पडतो का ? नाही ना पडत ?"
" म्हणजे आम्ही बेडूक आहोत असं म्हणायचं आहे का तुम्हाला ?"
" अंगातील रक्त उसळतच नसेल तर तुम्ही तरी काय करणार त्याला ? त्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागते. आणि त्यासाठी अंगात धमक असावी लागते. दुश्मनाचां थरकाप उडावा हे अगोदर मनात यावे लागते. हाताच्या मुठी रागाने वळायला हव्यात. छाताडे धैर्याने फुगायला हवीत. पण तुमच्या ते होत नाही. त्याला तुम्ही तरी काय करणार ना ? आता हातात चुडा भरा आम्ही ओठी भरू तुमची. कोणीतरी सबब सांगून पळ
काढत असेल तर आम्हाला हे विचारायला येता की आम्ही
काय करायचं ?"
" अहो पण आम्ही कधी हत्यार हाती धरलं नाही तर !"
" आधी स्वतःला कमी लेकायचे सोडा. अंगात धमक असेल
तर काही वाट्टेल ते करता येते. शेतात वाघ शिरला, साप शिरला
तर काय सबब सांगून त्याच्या कडे पाठ दाखवता. आपण कसंत असलेल्या जमिनीची कुणी नासाडी करत असेल तर फक्त बघत राहायचं."
" अहो हे काय विचारणे झाले. त्या दोघा पण आम्ही दगडांनी ठेचून मारू." सर्वांचे एकदम आवाज उठले. त्यावर जिजाबाई म्हणाल्या," म्हणजे मोहीमेवर गेलात तर दुश्मनाला दगड तर नक्कीच मारू शकता. जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाने प्रतिकार करण्याची शक्ती उपजत दिली आहे. मग आम्ही नाही आम्ही नाही असं का करायचं ? भगवंत
श्रीकृष्णा ने गोवर्धन पर्वत उचलला. ते काय सैनिक घेऊन
साधे गोप होते ते. फक्त अपेक्षा एवढीच होती की प्रत्येकाने
आपापली काठी लावायची. आणि मोहीमेत तलवारच चालवायला पाहिजे असं कोणी सांगितले ? सैनिकांना जेवण
लागते ते कोण बनवणार ? जखमी लोकांना दवा पाणी
करायचं ते कोण करणार ? हत्याराना धार काढायची असते
ती कोण काढणार ? ही सर्व कामे काय स्वतः लढणारेच करणार, आमची स्वारी मोहीमेवर जाते कुणासाठी आपल्या
मुलूखासाठीच ना ? तुमच्यासाठीच ना ? या सर्वांचा विचार
करा मग भाकर खाऊन घ्या." त्यावर एकजण म्हणाला, आम्ही आताच जातो. पण आज अट आहे." जिजाबाई म्हणाल्या," आधी न्याहरी करून घ्या. मग अटीचे पाहू !" त्यावर एकजण
म्हणाला की, अट त्यातच आहे. झुणका मध्ये अगोदर मीठ टाका. मिठाला आम्ही जागणार नाही म्हणून मीठ टाकायला मनाई केली ना ? आता मीठ टाका मग आम्ही खाऊनच निघतो." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," ठीक आहे, आम्ही
मीठ टाकतो तोवर तुम्ही हात ओले करून या."
संभाजी राजांच्या पत्नी जाऊबाई आपल्या धाकट्या जाऊ
बाईला अर्थात गोदावरी बाईना जिजाबाईंची ओठी भरायला
सांगतात. तेव्हा गोदावरी बाई अत्यंत खुश होतात. पण त्याच
वेळी सोयरा बाई तेथे येतात नि त्या दोघींची चांगलीच खरडपट्टी
काढतात. आणि ओठी भरायची काहीही गरज नाही कारण मोहीमे वर गेलेला पुरुष परत येईलच अशी शाश्वती नाही. मग कशाला भरायची ओठी ?" असं बोलून त्या तेथून निघून गेल्या. त्या गेलेल्या दिशेकडे पाहून गोदावरी बाई म्हणाल्या," अश्या काय ह्या ? नेहमी वाईटच का बोलत असतात." त्यावर जाऊबाई म्हणाल्या," असतो एका एकाचा स्वभाव. तुम्ही देऊळ गावाला असता म्हणून तुम्हाला माहित नाही."
" पण तुम्ही हे कसे सहन करता ?"
" जिजाबाई मुळे ही नजर त्यांनी आम्हाला दिली. अगोदर
आम्ही अल्लडच होतो."
उमाबाई आता अत्यंत खुश होता. त्यांची आता खात्री झाली होती की आपल्या पाठीमागे जिजाबाई कारभार चांगलाच सांभाळतील. मघाशी जिजाबाईंनी जी किमया करून दाखविली ती खरोखर कौतुकस्पद होती. त्या इतक्या खुश होत्या की त्यांच्या अंगातील ज्वर देखील गायब झाला होता. त्यांना एक नवीन दिशा दिसू लागली होती. म्हणून अंगावरील शाल काढून गोदा कडे देत त्या म्हणाल्या,' आता आम्हाला ह्याची गरज नाही." इतक्यातच तेथे जिजाबाई आल्या. उमा बाईंच्या अंगावरील शाल गोदा च्या हातात पाहून त्या तिच्यावर रागवत म्हणाल्या की, तू का अशी उभी आणि सासूबाईंच्या अंगावरील शाल तुझ्याकडे काय करत आहे ?" गोदा म्हणाली," त्यांनीच दिली." तेव्हा जिजाबाईंनी विचारले का म्हणून." तेव्हा उमा बाई म्हणाल्या की, आता त्या शाली ची गरज नाहीये.आमचा ज्वर केव्हाच पळून गेला. कारण आता आमची खात्री झाली की तुम्ही कारभार आमच्या पेक्षा ही चांगल्या प्रकारे सांभाळू शकता. आम्ही पाहिलं ना मंघाशी ! अगोदर बेडकाची उपमा मग भगवंत श्रीकृष्णा ने गोवर्धन कसा उचलला. त्यावेळी गोपानी श्रीकृष्णाची कशी मदत केली तेही सांगितले. शिवाय जंगलातील हिंस्त्र श्वापदे आपल्या शेतात शिरल्यावर आपण काय करतो याचे उदाहरण देवून लोकांच्या मनात जिद्द आणि धाडस निर्माण करणे सर्वकाही अपलातून.
तिथली कामे सैनिकाचे जेवण, जखमी सैनिकांची सेवा. वा
तुम्ही असं सांगत होता जणू तुम्ही तिथं राहून आलात." त्यावर
जिजाबाई काहीच बोलल्या नाहीत. तश्या उमाबाई उद्गारल्या, हुं
आलं लक्षात. लहापणापासूनच हे सर्व पाहत आल्या आहात."
" सासूबाई , मिठाचे महत्व सबंध वाढण्याकरिता कसं
उपयोगात आणायचं हे आपणच तर आम्हाला सांगितलेत.
जखमनामा होता त्यावेळेस आठवतं." जिजाबाई उद्गारल्या.
" संबंध सोन्या चांदीने नाही मीठ भाकरी ने जपता येतो.फक्त
तशी मनात भावना असावी लागते. ह्या साऱ्या मंडळीने आमच्या
स्वारी ची मदत केली नि आता शहाजी राजांची मदत करत आहेत. " हे वक्तव्य उमा बाईना आठवलं. तश्या त्या पुढे म्हणाल्या," पण जिजाबाई, तुम्ही आमच्या ही दोन पाऊले
पुढे गेल्यात. शालिवाहन ने मातीच्या सैन्यात प्राण ओतला
तसा तुम्ही सगळ्या मध्ये प्राण ओतलात. आता तुम्ही कोणतेही
आव्हान सहज स्वीकारू शकता याची आम्हाला खात्री झाली.
जा आधी मीठ वाढून या लोकं वाट पाहत असतील. आणि
आम्ही तुमची मुद पाक खाण्यात वाट पाहतोय.या."
" पण तुम्ही मुद पाक खाण्यात कशाला जाता ?"
" तुम्ही सर्वांची काळजी घेता, पण त्या पोटातील बाळाची
काळजी कोण घेणार ? ते काही नाही आम्ही स्वतः तुम्हाला
भरवतो.जा मीठ वाढून या लोक वाट पाहत असतील."
जिजाबाईनीं होकारार्थी मान डोलावली आणि तिकडून निघून
गेल्या. तश्या उमाबाई म्हणाल्या," गोदा , आमच्या पाठीमागे
जिजाची अशीच काळजी घ्या." गोदा ने हसतच मान डोलावली.
शहाजी राजे एका झाडाखाली बसून कसला तरी विचार करत
आहेत त्यामुळे शरीफ जी राजे त्यांना काय विचारत आहेत
त्यावर त्यांचे मुळीच लक्ष नाहीये. कारण त्यांनी उलट प्रश्न केला की आम्हाला काही विचारत होता काय ? " तसे शरीफ जी राजे
यांच्या ध्यानात आले की आपल्या बोलण्याकडे दादा साहेबांचे
लक्ष नाहीये. मग ते काय विचार करत असतील. असा त्यांनी
स्वतःलाच प्रश्न केला. तसे उत्तर ही मिळाले . म्हणूनच की काय
त्यांनी, " दादा साहेब आपण वहिनी बद्दल विचार करताय का
बाळा बद्दल ?" शहाजी राजांनी लगेच उत्तर दिलं की, दोन्ही
चा विचार करतोय आम्ही ! कारण एकाचा विचार करूच शकत
नाही. पण ते जाऊ दे तुम्ही काय म्हणत होता ते सांगा."
त्यावर शरीफ जी राजे म्हणाले," आम्ही म्हणत होतो की
लखुजी राजे आणि एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर
काय करणार ? म्हणजे तशी वेळ येणार नाही म्हणा. कारण
लखुजी राजे मोहीमे वरच नाहीत." शहाजी राजे म्हणाले," ते
आताच कसं सांगता येईल ? मोहीमे चे काही सांगता येतं का ?
कधी पण फर्मान निघू शकतं. आणि सामोरा समोर आल्यानंतर
लढणे भागच आहे ना ?"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा