रामायण भाग १५ | Ramayana episode 15 | Author : Mahendranath Prabhu.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रामायण भाग १५ | Ramayana episode 15 | Author : Mahendranath Prabhu. |
" आई , तू माझी जननी आहेस. तू एक माता असून
दुसऱ्या मातेच्या आज्ञेची अवहेलना करायला सांगतेस.
अधर्माचा रस्ता स्वीकारायला सांगतेस ! " पण माता
काहीच बोलत नाही हे पाहून श्रीराम म्हणाले ," रघुकुल ची
कुलवधू माता कौशल्या रघुकुल ची रीत विसरली. आपले
पूर्वज राजा सगर ची संतान आपल्या पित्याची आज्ञा मानून पृथ्वी पातळ एक करून आपल्या प्राणांची आहुती दिली होती. सत्यवचन आपले दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपले पूर्वज राजा हरीचंद्राने पुत्राला आणि पत्नीला भर बाजारात विकले होते. मी पित्याचे वचन आणि मातेची आज्ञा पाळण्याचा व्रत घेतले आहे. मला त्यातून विन मुख व्हायला सांगतेस. पदभ्रष्ट व्हायला
सांगतेस आणि स्वतः त्या पापात भागीदारिणी होऊ नकोस आई !"
" हुं ss निभाव रघुकुल ची रित कर्म , धर्म, आणि कर्तव्य
तू आपल्या धर्माचे पालन कर मी आईच्या धर्माचे पालन
करीन. अर्थात गाई च्या वासरा प्रमाणे तुझ्या मागून मी
देखील येईन माझ्या बाळा!"
" नाही आई तू माझ्या बरोबर येऊ शकत नाहीस. कारण एका स्त्री चा पहिला धर्म असतो तिचा पती आणि मग तिचे संतान. आणि हा आर्य स्त्री चा धर्म आहे. आपल्या स्वामींचा त्याग त्या स्त्री साठी मोठे निंदेचे कारण होऊ शकते. आपल्या मनात असा विचार देखील नाही आला पाहिजे. आपला पतीच आपली गती आहे. आपला धर्म आहे. आई राजा स्वामी, ईश्वर सर्वकाही आहे. अर्थात त्यांच्या आज्ञाचे पालन करणे आवश्यक आहे. माझ्या धर्मात्मा पित्याला सोडून तू माझ्या सोबत येऊ शकत नाहीस. चौदा वर्षे वनात राहिल्या नंतर मी पुन्हा येईन तुझ्याकडे. चौदा वर्षे काय हा हा म्हणता निघून जातील."
" चौदा वर्षे तुझ्या विना.......ठीक आहे , जा तू ! आणि पित्याचे वचन पूर्ण कर. मातेची आज्ञा पाळ ! धर्म , कर्म ,
आणि कर्तव्ये पार पाड. फक्त त्यात पिसली जाणार
आहे ती तुझी ही आई ! चौदा वर्षे तुझी वाट पाहता पाहता हे डोळे पाषाण होऊन जातील .आणि जर चौदा वर्षे तुझ्या आईचे प्राण राहिले तर तुझी वाट अवश्य पाहीन. तू आपल्या आईचा निरोप घ्यायला आला आहेस. परंतु तुला माहीत नाही की तू निरोपा सोबत आपल्या आईचे प्राण घेऊन चालला आहेस. माझ्या बाळा तूच सांग कशी राहू मी चौदा वर्ष ?" तेवढ्यात तेथे सीता आली नि म्हणाली," आई sss " महाराणी कौशल्या उद्गारल्या,
" सीते माझ्या बाळा !" असे म्हणून त्यानी सीतेला घट्ट मिठी मारली नि मग पुढे म्हणाल्या ," बघ सीते होत्याचे नव्हते होऊन बसले. तुला माहितेय राम आपल्या पिता , माता , पत्नी आणि बंधू या सर्वांचा त्याग करून तो वनात निघून चालला आहे. तेव्हा आता त्याला निरोप देण्याची वेळ आली आहे." तेव्हा सीता म्हणाली , " मला सर्वकाही माहीत आहे आई ! म्हणूनच तर मी आपली आज्ञा मागायला आली आहे."
" म्हणजे ? कोठे जाणार आहेस तू ? आपल्या पित्याच्या घरी जनकाकडे का ? " परंतु सीतेने त्यांच्या
प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्यावर त्या पुढे म्हणाल्या ,
" आपल्या पित्याकडे जाऊ नकोस तू . नाहीतर मी इथं एकटी राहीन सीता , म्हणून तू माझ्या सोबत राहा."
" नाही माते ! मी जनक पुरीला जाण्यासाठी आपली
अनुमती मागायला आली नाहीये. कारण जेव्हा मी विवाह करून इथं यायला निघाली तेव्हा माझ्या आई ने सांगितले होते की जनक पुरीशी असलेले माझे नाते संपले आहे. आणि आता तू रघुवीर ची अर्धांगिनीं आहेस. म्हणून जे
सुख पतीचे आहे तेच सुख पत्नीचे पण आहे, म्हणूनच मी आपल्या पती सोबत वनात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यासाठी आपली अनुमती मागायला आली आहे
मी "
" काय ss तू वनात जाणार ?"
" हां माते ! जिथे माझे स्वामी तिथं मी ! अर्थात माझे
स्वामी मला जिथं घेऊन जातील तिथं मी जाणार आहे."
" सीते काय बोलते आहेस तू हे ? वनात जाण्याचा
अर्थ तुला माहीत तरी आहे का ?"
" मी आपल्या सोबतच असणार आहे. त्यामुळे अर्थ किंवा अनर्थ इथपर्यंत जाण्याची काही जरुरी नाही आहे ?"
" सीते जे पाय मुलायम मखमल वरून कधी खाली
म्हणजे जमिनीवर कधी पडले नाहीत. तेच पाय वनात दगड- धोंड्यातून आणि काट्या कुट्यातून कसे बरे चालणार आहेत ? शिवाय वनात जंगली प्राणी सुद्धा असणार मग मला सांग त्या प्राणा मध्ये तू कशी जिवंत
राहू शकणार बरं ?"
" जसे माझे नाथ राहतील तशीच मी सुध्दा राहीन. माझे प्रभू माझ्या सोबत असल्यावर मला कोणाची भीती आहे? म्हणजे मला म्हणायचंय की माझ्याकडे पाहण्याची कोणीही हिंम्मत ही करणार नाही."
" ते सर्व ठीक आहे ; ! परंतु जिने कधी दुःखच पाहिले
नाही. सदैव सुखात वाढलेली ती सुकमार .....वनात तू कशी राहणार बरं ? आणि खरं सांगायचं तर तिथं भोजन मिळणार नाही. अर्थात कंदमुळे खाऊन जगावे लागनार."
" दुःख ! खरं सांगू......आपल्या चरणांची सेवा करण्या व्यतिरिक्त माझ्यासाठी दुसरं कोणतेही सुख नाहीये. जसे जल वीन मासा जसा मासा पाण्या शिवाय जगू शकणार
नाही. अगदी तशीच मी सुध्दा माझ्या रघुवीर शिवाय जगू
शकणार नाही."
" भावनेच्या भरात तू हा निर्णय घेतोयेस त्यामुळे तुझे त्यात हित आहे किंवा नाही याचा विचार कधी केला
आहेस का ? नाही ना ? मग ऐक , तिथले जीवन फार मोठे दुःखदायक आहे." तेव्हा सीता म्हणाली , " माझ्यासाठी दुःख आणि सुख दोन्ही गोष्टी समान आहेत. आणि खरं सांगायचं तर जिथे माझे प्रभू असतील तिथंच माझ्यासाठी सुखच सुख असेल. आणि जिथं आपण माझ्या सोबत
नसणार तिथं माझ्यासाठी दुःखच दुःख असेल. म्हणून मला कोणी त्या जागी स्वर्ग जरी दिले तरी पण ते
माझ्यासाठी दु:खदायकच असेल. नाथ आपण मला जीवनभर सोबत राहण्याचे वचन दिले होते ना ? मग आता मला इथं एकटीला सोडून चाललाय मग हा अधर्म नाही आहे का ? आर्यश्रेष्ठ जसा आपण आपला धर्म निभावणार तसा मला देखील आपला पत्नी धर्म निभावू दे. बहीण , भाऊ , माता- पिता ही सर्व नाती मागेच राहतात. शेष फक्त एकच नातं राहते आणि ते नाते म्हणजे पती-पत्नीचे ! एका स्त्री साठी फक्त तिचा पतीच
सर्वकाही आहे. आई आता आपणच ह्यांना काहीतरी सांगा बरं !" तेव्हा महाराणी कौशल्या म्हणाल्या ," राम आता तूच मला एका स्त्री चा धर्म सांगत होतास ना ? की एका स्त्री साठी तिचा पतीच सर्वस्व आहे, मग मला सांग
सीतेसाठी तो धर्म वेगळा कसा असेल ?"
" आई s s स्त्री साठी वनवास नाहीये."
" नाथ जर आपण मला आपल्या सोबत घेऊन जात
नसाल तर एक दिवस अजून थांबा."
" ते कशासाठी ?"
" माझ्या चितेला अग्नी कोण देईल ."
" सीते sss "
" राम , सीता योग्य तेच बोलत आहे. तिचे प्राण जर
तुला वाचवायचे असतील तर तिला ही तू आपल्या
सोबत घेऊन जा . मी राहीन एकटी !"
" ठीक आहे सीते ! मग चलण्याची तयारी कर." तेवढ्यात तेथे लक्ष्मण दादा दादा असे ओरडत आला नि विचारू लागला की , दादा मी जे ऐकलं ते खरं आहे का ? महाराणी कैकेयी च्या सांगण्यावरून महाराजांनी आपले
राज्य आपल्याकडून काढून घेतले नि भरत ला दिले."
" लक्ष्मण तू माता कैकेयी ला कैकेयी म्हणून कधी
पासून बोलु लागलास ?"
" तुम्ही म्हणा तिला माता मी तिला माता कदापि
बोलणार नाही. आणि खरं सांगायचं तर ती माता नाहीतर कुलनाशिणी आहे.परंतु मी असं होऊ पण देणार नाही. माझे हे धनुष्य केवळ शोभेची वस्तू नाहीये. मी ह्या धनुष्याच्या मदतीने अयोध्येची चतुरंग सैन्येशी सामना करीन ."
" लक्ष्मण sss " राम एकदम रागावून म्हणाले.
" महाराज काय समजले की राम मोठा विनशील आहे
काहीही बोलणार नाही. परंतु हा लक्ष्मण चूप बसणार नाही. शिवाय अयोध्येतील लोक सुध्दा हा अन्याय सहन करणार नाहीत. सारी जनता विद्रोह करतील. पण त्यासाठी जनता कशाला पाहिजे ? त्यांचा हा दास लक्ष्मण एकटाच महाराजांची चतुरंग सैन्येला पुरेसा आहे आणि समजा भरत माझ्यावर चढाई करून आला तर त्याला सुध्दा त्याच्या आईचे दूध आठवून देईन मी ! "
" लक्ष्मण काय अनाप शनाप बोलतो आहेस तू हे ?"
" दादा तुम्ही यात पडू नका . कारण मी काही चुकीचे करतोय असं नाहीये. शत्रू शी लढणे हाच आपला क्षत्रिय धर्म आहे. अर्थात अन्याय सहन करणे हे सुध्दा चुकीचे आहे. जे राज्य जनतेच्या संमती ने आपल्याला दिलं गेलंय ते राज्य आपल्या कडून हिरावून घेण्याचा कोणालाही
अधिकार नाहीये. मग ते स्वतः महाराज असले तरीही त्याना तो अधिकार नाही. आणि समजा महाराजानी तसा प्रयत्न केलाच तर मी त्याना पराजित करून त्याना आपल्या समोर दरवाजावर हात जोडून उभे राहण्यास भाग पाडीन. आणि त्यांच्या सोबत भरतलाही उभा करेन."
" वा वा ! फार सुंदर विचार आहेत तुझे. आपल्या
पित्याला हात जोडून दरवाजात उभा करणार आहेस.
आणि पुत्र आपल्या पत्नी सोबत सिंहासनावर बसलेला आहे. तुला माहितेय आकाशातील देवता धरतीवर उतरून जेव्हा हे दृश्य पाहतील तेव्हा त्यांना जाणवेल की मनुष्याने किती उन्नती केली आहे ती "
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा