रामायण भाग १४ | Ramayana episode 14 | Author : Mahendranath Prabhu
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रामायण भाग १४ | Ramayana episode 14 | Author : Mahendranath Prabhu |
महाराणी कौशल्या विष्णू देवाला वंदन करून जपमाळ
घेऊन जपमाळ करत असते . तेव्हा तेथे महाराणी सुमित्रा
येतात नि महाराणी कौशल्याला उद्देशून म्हणाल्या ," ताई , आपण तर आपल्या भवनातच देवाचे मंदिर स्थापित केले
आहे नि स्वत: ही आपल्या भवनातून बाहेर पडत नाही.
तेव्हा महाराणी डोळे उघडून सुमित्रा कडे पाहत म्हणाल्या,
" बोल सुमित्रा ! तुला काही सांगायचे आहे का ?" त्यावर महाराणी सुमित्रा म्हणाल्या," ताई , जरा भवनाच्या बाहेर तर येऊन बघ. अयोध्येतील जनतेने संपूर्ण अयोध्या नगरी सजविली आहे. जणू त्यांच्या साठी तो सण आहे." तेव्हा महाराणी म्हणाल्या ," ठाऊक आहे मला. सारे नगर दीपमाळा ने प्रकाशित झाले आहे. उद्या प्रातःकाळी रामाला राज्यभिषेक होणार आहे. प्रजा आपल्या भावी राजाला शुभकामना देऊ इच्छित आहेत." त्यावर महाराणी सुमित्रा म्हणाल्या ," ताई , आपण भवनात बसल्या- बसल्या आपल्या भवनाच्या बाहेर काय चाललंय याची पूर्ण कल्पना आपल्याला आहे ? परंतु माझी इच्छा आहे की आपण जरा आपल्या भवनाच्या छप्परावर तर येऊन पहा ना ?" त्यावर महाराणी कौशल्या म्हणाल्या ," नाही सुमित्रा ! रामाच्या कल्याणासाठी मी विष्णू जप करत आहे. प्रातःकाळ पर्यंत एक लाख जप पूर्ण होणे आवश्यक आहे. कारण उद्या राम राज्यभिषेक साठी इथं येईल तेव्हा मी विष्णू देवाला वंदन करून त्याला राजतीलक करणार आहे . मग त्या राजतीलकाला कोणाची नजर लागणार नाही. कोणाची कुदृष्टि
पडणार नाही. पण हां तू उद्या सकाळी आरती साठी इथं ये बरं का ?"
महाराज दशरथ महाराणी कैकेयीच्या चरणांवर आपले
मस्तक ठेवून म्हणाले ," राणी एवढी कठोर होऊ नकोस.
तुझ्या मनातील कोमलता, आईची ममता कोठे गेली ? तू
रामाला सख्या आई सारखे प्रेम केले आहेस. आणि राम ने
सुध्दा आपल्या आई मध्ये आणि तुझ्या मध्ये कधी फरक
नाही केला. तेव्हा जरा विचार कर , एवढी निष्ठुर बनू नकोस नाहीतर उद्या कलंकितचा डाग लागेल तुझ्या माथ्यावर . तेव्हा विचार कर अजून वेळ गेलेली नाहीये. एवढी निष्ठुरता सोडून दे. मी तुझ्या पाया पडतो." असे म्हणून महाराज दशरथा ने आपले मस्तक महाराणी कैकेयीच्या चरणांवर ठेवले. परंतु महाराणीला त्याचे काहीही सोयरसुतक नव्हते. ती कुत्सित पणे म्हणाली ," महाराज स्त्री सारखा विलाप करणे आपल्याला शोभत नाहीये. धर्म असो वा अधर्म न्याय असो वा अन्याय मला त्याचा काही फरक पडत नाहीये. भरतला राज्यभिषेक आणि रामला वनवास या व्यतिरिक्त मी अन्य कोणत्याही गोष्टी ने संतुष्ट होणार नाहीये." त्यावर महाराज दशरथ म्हणाले ," मग हा दशरथ राहणार नाही या जगात एक वेळ मासळी पाण्याशिवाय राहील. समस्त प्राणी सुर्यविना जिवंत राहू शकतील. परंतु ह्या दशरथाचे प्राण पुत्रराम विना राहणार नाही."
" मग वचन तोडून टाका. आपल्या रघुवंशा मध्ये वचन
पूर्तीसाठी स्वतःच्या जीवनाचे बलिदान केले. एक पक्षासाठी आपल्या शरीराचे तुकडे तुकडे केले. आपण
त्या रघुवंशी मधले तर नाहीयेत. आपण रघुवंशीसाठी कलंक आहात कलंक."
" कैकेयी जीवनभरच्या प्रेमाचे फळ हेच देशील का ?
बघ हे तुझ्या कपाळावर लिहिले आहे की तुझा सर्वनाश
होईल."
" होऊ दे झाला तर सर्वनाश ! परंतु राम आजच वनात
जाईल."
" कलंकिनी , कुलनाशिणी हे तू नाही तर दशरथाचा
काळ बोलत आहे. काळ बोलत आहे, काळ बोलत आहे."
असे म्हणतच जमिनीवर आपले मस्तक ठेवता क्षणिच
बेशुध्द होतात. तेव्हा महाराणी कैकेयी त्यांच्याकडे वळून पाहते नि म्हणते की , परत मूर्च्छित झाले."
प्रजे मध्ये मात्र सर्व प्रजा रात्रभर जागून आरास, दीपमाळा लावत होत्या. त्यातील एकजण म्हणाली,"
" आता प्रातःकाळ व्हायला फार वेळ लागणार नाहीये.
त्या अगोदर हरिद्वारावर दीपमाळा लागल्या पाहिजेत.
शिवाय साऱ्या महालात दीपमाळा लागल्या पाहिजेत."
काही मंडळी आनंदाने भजन पूजन करत असतात.
महाराज दशरथाना शुद्ध आली तसे ते मोठ्या ने म्हणाले ," बंद करा हे संगीत." प्रजा गाणे गात असतात.
तेवढ्यात एक दासी तेथे आली नि म्हणाली," महाराजांची
आज्ञा आहे की संगीत बंद करा." महाराज दशरथ फ़क्त
राम राम करत असतात. तेव्हा त्यांच्या बाजूला बसलेली
महाराणी कैकेयी म्हणाली ," महाराज खूप झालं. आता उठणार आहात का ? स्त्रिया सारखे धर्तीवर पडून विलाप
करत राहणार आहात. प्रातःकाळ व्हायला आली आहे.
आता वीर पुरुषा सारखे उठा नि सिहांसनावर विराजमान
व्हा. तोपर्यंत मंत्रीगण येतील. त्याना आपला बदललेला
निर्णय सांगणार नाहीत का ? उठा बरं." असे म्हणून त्याना
आधार देऊन उठविते. पण महाराज फक्त राम राम करत
राहतात. अयोध्या तील प्रजा मात्र राज्यभिषेकाची तयारी
करण्यात व्यस्त असते. साधू लोक नदीवर जाऊन कलश
मध्ये जल घेऊन येतात. महर्षी वशिष्ठ त्याना जल ठेवायला
सांगतात. तेवढ्यात तेथे आर्यसुमन्त येतो तेव्हा महर्षी वशिष्ठ त्याना सांगतात की नदीवरून जल आणले गेले
आहे." तेव्हा आर्यसुमन्त म्हणाला," बाकी सुध्दा सर्व तयारी झाली आहे." तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले ," वा ! छान." पण तेवढ्यात त्याना महाराजांची आठवण होते
म्हणून त्यांनी आर्यसुमन्त ला विचारले की अजून महाराज
कसे आले नाहीत. प्रातःकाळी पुष्प नक्षत्रावर राज्यभिषेक
होणे आवश्यक आहे. पण त्या अगोदर महाराजांनी अग्निहोत्र झाले पाहिजेत. त्यानंतर राज्यसभेत जाणे आवश्यक आहे. म्हणून आर्यसुमन्त रामाला पण संदेश
द्या की राम आणि सीता दोघांनी पण शुचिर्भूत होऊन
राज्यसभेत हजर व्हावे." असे म्हणताच आर्यसुमन्त
तेथून निघाला. तो थेट कैकेयीच्या भवन वर पोहोचला.
त्याने महाराजांना प्रमाण करत म्हटले," जय हो आर्य
शिरोमणी ! आणि महाराणी कैकेयीना आर्यसुमन्तचा
प्रणाम ! " परंतु काहीच प्रतिसाद नाही हे पाहून आर्यसुमन्तला मोठे आश्चर्य वाटले. की जणू शोककळा
पसरली आहे. म्हणजे महाराज सिंहासनावर असे बसले
आहेत की त्याना अफार दुःख झाले आहे. परंतु त्याला
कारण काय असावे बरं ? त्याना काही कळेना की महाराज असे का बसले आहेत ? परंतु काही घडलेच नाही असे
दाखवत आर्यसुमन्त महर्षी वशिष्ठांनी दिलेला संदेश देतात
की महाराज राज्यभिषेकाची सारी तयारी झाली आहे. आपली कुलगुरू वशिष्ठ वाट पाहत आहेत. तेव्हा
लौकरात लौकर यज्ञ शाळेत उपस्थित राहून कार्यक्रमाला
सुरुवात करावी." महाराज उठण्याचा प्रयत्न करतात पण
उठू शकले नाहीत. तेव्हा आर्यसुमन्त ने विचारले की
महाराज काय झालं ?" पण काहीच उत्तर मिळाले नाही.
म्हणून ते महाराणी कैकेयीला विचारतात की महाराजांची
ही दशा कशामुळे झाली ?" परंतु आर्यसुमन्त ने विचारलेल्या प्रश्नाचे सरळ उत्तर न देता महाराणी कैकेयी
म्हणाली ," ह्यांच्या मनातील गोष्टी त्यांनाच ठाऊक ! पण
हां पूर्ण रात्रभर रामाचा जप करत आहेत. तेव्हा आपण
रामाला इथं बोलवून आणा." परंतु आर्यसुमन्त आपल्या
स्थानावरून हलत नाही. तेव्हा महाराणी कैकेयी म्हणाल्या,
" आर्यसुमन्त जा राम ला बोलवून आणा." तेव्हा
आर्यसुमन्त म्हणाले ," क्षमा करा महादेवी ! मला महाराजांची आज्ञा झाल्या शिवाय मी रामाला बोलवायला
जाऊ शकत नाही." तेव्हा महाराज आपले मस्तक वर
उचलतात नि आर्यसुमन्त ला आदेश देतात की रामला
बोलवून आणा." तसा आर्यसुमन्त म्हणाले ," जशी आपली
आज्ञा !" असे म्हणून आर्यसुमन्त तेथून निघून गेले.
श्रीराम आणि सीता दोघेही शुचिर्भूत होऊन नवीन
वस्त्र परिधान करतात. तेव्हा सीता कोणत्यातरी विचारात
मग्न असते. म्हणून श्रीराम तिला विचारतात की , सीते
कोणत्या विचारात मग्न आहेस ?" तेव्हा सीता हसून म्हणाली ," नाही कसल्या." तेव्हा राम म्हणाले ," नाही तू
काहीतरी विचार करत होतीस." तेव्हा सीता म्हणाली की
मी विचार करीत होती की उद्या आपल्या मस्तकावर
राजमुकुट घातल्यानंतर आपण प्रजेचे होणार मग माझ्या
वाटेला किती बरं येणार हाच विचार करत होते मी ! एवढ्या मोठ्या राज्यात माझं स्थान कोठे असेल प्रभू ?"
" तुझे स्थान माझ्या हृदयात आहे सीते!"
" मी आपली नाहीतर राजा रामचंद्राची वार्ता करते आहे."
" राजा राम बद्दल असे म्हणून राजा रामावर फार
अन्याय केलाय. मी राजा राम जरी असलो तरीही सीते
शिवाय राम अपूर्ण आहे." तेवढ्यात एक दासी आली नि
म्हणाली ," महाराणीचा जय हो ! "
" बोल सुनंदा काय खबर आणलीस ?"
" महामंत्री आर्यसुमन्त एक विशेष संदेश घेऊन आले
आहेत नि आपल्याला ताबडतोब भेटू इच्छितात."
" ठीक आहे येतो म्हणून सांग." असे म्हणताच दासी
सुनंदा तेथून निघून गेली. तेव्हा राम सीतेला म्हणाला,
" काहीतरी राज्यभिषेक विषयी बोलावयाचे असेल
त्याना भेटून येतो मी त्यांना." असे म्हणून राम सीतेच्या
भवनाच्या बाहेर पडतात. त्यानंतर आर्यसुमन्त जवळ
येऊन म्हणाला," प्रणाम आर्यसुमन्त ! "
" आयुष्यमान हो किर्तीमान हो !"
" बोला आर्यसुमन्त माझ्यासाठी काय संदेश आहे ?"
" मला महाराजांनी आपल्याकडे पाठविले आहे."
" काही विशेष काम आहे का ?"
" हो . विशेषच असेल. महाराज अजून महाराणी कैकेयीच्या महाली आहेत. आणि महाराणी ने आपल्याला
लौकर बोलविले आहे."
" तात स्वास्थ तर आहेत ना ?"
" बस आपल्याला भेटू इच्छित आहेत."
" प्रणाम !" तसे आर्यसुमन्त सेवकाला रामाच्या मस्तकावर छत्र धरायला सांगितले . तसे राम विचारतात
की हे काय आहे ?" तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले ," आज
आपला राज्यभिषेक होणार आहे. अर्थात आपण कोठेही
जाल तिथं छत्रसाल मध्येच जाल." त्या सेवकाने रामाच्या
मस्तकावर छत्र धरले." तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले ," आपण महाराजांना भेटून या आणि मी यज्ञ शाळेत आहे." राम महाराणी कैकेयीच्या महाली जाण्याच्या मार्गाने निघाले आणि आर्यसुमन्त यज्ञ शाळेच्या दिशेने निघाले.
राम महाराणी कैकेयीच्या महाली पोहोचतात. तेव्हा आपल्या पित्याची अवस्था पाहून त्याना विचारू लागले
की आपल्याला कशाचे दुःख आहे ? परंतु महाराज फक्त
एकवेळ डोळे उघडून राम कडे पाहतात नि पुन्हा आपले
मस्तक खाली घालतात. श्रीरामाना कळत नाही आपल्या
पित्याला कशाचे दुःख आहे ? शेवटी महाराणी कैकेयीला
राम विचारतात की माते पिताश्रीना कशाचे दुःख आहे ?
आपल्याला माहीत असेल तर मला सांगण्याची कृपा करावी."तेव्हा महाराणी कैकेयी म्हणाली," तुझ्या पिताश्रीचा रोग फक्त तू दूर करू शकतोस."
" माते आपल्याला अशी शंका का आहे की मी पिताश्रीच्या आज्ञाचे पालन करणार नाही."
" कारणच तसं आहे."
" माते बालपणी मी आपल्या अंगाखाद्यावर खेळलो
आहे. आपण त्याच रामावर संदेह करत आहात ? मी अवश्य काहीतरी घोर अपराध केला आहे, म्हणून माझे
पिता माझ्याशी बोलत नाहीयेत.आणि माझी माता माझ्यावर संदेह करत आहे."
" नाही. मला माहित आहे की तू सत्य वचनापासून
हटणार नाहीस. परंतु ...?"
" परंतु काय माते ? माते आपण फक्त मला संकेत
करा मी आपल्या त्वचेचे चप्पल बनविण. आणि पित्या
एवढाच आपला पण माझ्यावर अधिकार आहे. जर ते सांगत नाहीयेत तर त्यांच्या तर्फे आपणच सांगावे." तरीपण कोणीही बोलत नाही म्हणून श्रीराम म्हणाले की
मी असं काय करू ज्याने आपल्याला संतुष्टी मिळेल ?"
" ठीक आहे, तू म्हणत असशील तर मी सांगते. तुझ्या
पिताश्रीनी मला दोन वर दिले होते नि सांगितले होते की
तुला जेव्हा मागायचे असतील तेव्हा ते मागून घे. आणि
आज मी ते माझे दोन वर मागितले तर त्याना ते देणे अशक्य झालंय म्हणजे वर पूर्ण करायचा असेल तर पुत्र
मोह आड येतो. आणि ते देऊ इच्छित नसतील तर रघकुलला कलंक लागतो. बिचारे धर्म संकट मध्ये पडले आहेत. त्यामुळे ते तुला सांगू इच्छित असले तरी सांगू शकत नाहीत."
" असे कोणते होते ते दोन वर ?"
" पहिला वर तुझ्या ऐवजी भरतचा राज्यभिषेक व्हायला हवाय."
" आणि दुसरा वर ?"
" दुसरा वर तू मुनिवेष धारण करून चौदा वर्षे वनवास
स्वीकारावा." तेव्हा राम स्मित हास्य करत म्हणाले ," हात्तीच्या इतकेच ना ? त्यासाठी होता एवढा विवाद ?
माते मी तर भाग्यशाली आहे. जे मला पिता आणि माता
या दोघांच्या वचन पुर्तीची संधी मिळाली. खरे सांगायचे
असे भाग्य कुणा एखाद्या लाच प्राप्त होते. आणि आता राहिली भरतला राज्य देण्याची गोष्ट तर त्यासाठी मला
कोणाच्याही आज्ञाची गरज नाही." तेव्हा महाराज आपला
हात उचलून रामला आशीर्वाद देतात. " आणि वन गमन गोष्ट तर आपल्या आशीर्वादाने मला वनात जाण्याची संधी
उपलब्ध झाली. वनात जाऊन ऋषी मुनींचा आशीर्वाद
ही मिळेल नि त्यांच्या कडून आध्यात्मिक ज्ञान पण मिळेल. माते माझे तर सर्व बाजूनी कल्याणच झालं. म्हणजे पिताश्रीच्या वचनाचे पालन करणे, मातेची इच्छा
पूर्ण करण्याची संधी मिळाली. आणि छोट्या बंधुला राज्यभिषेक , वनात गेल्यावर साधू संतांची भेट होईल. माते पिताश्री ला एवढेच दुःख होते की अजून काही आहे दुःख?" त्यावर महाराणी कैकेयी म्हणाली ," नाही पुत्र
अजून दुसरे कोणतेही त्याना दुःख नाही. तुझ्या शपथ भरत शपथ ! आता तूच समजावून सांग त्याना की त्यांनी
आपल्या वचनाचे पालन करावे. रघुकुलला कलंकित
करण्या पासून वाचवावे." तेव्हा राम म्हणाला ," पिताश्री
मी आपले मनोरथ ओळखले आहे. अर्थात आपल्याला
आज्ञा देण्याची पण गरज नाहीये. मी स्वतः आपले मनोरथ
पूर्ण करीन. मला केवळ एका गोष्टीचे दुःख होत आहे. इतक्या क्षुल्लकशा गोष्टीसाठी स्वतःच्या मनाला इतका
त्रास करून घेतला. अर्थात आपला माझ्यावर पूर्ण विश्वास
नाही . पिताश्री माझ्या चालचलनाने मी आपला विश्वास
संपादन करीन. आता मला वनात जाण्याची अनुमती द्या.
वनात जाऊन मी आपल्या आचरणाने आपले वचन पूर्ण
करीन. मी आता माता कौशल्या नि माता सुमित्रा यांची
आज्ञा घेऊन वनात जाण्यापूर्वी आपल्या चरणांवर मस्तक
ठेवायला येतो." असे म्हणून राम महाराणी कौशल्याला भेटण्यासाठी तेथून निघून गेले नि जसा डोक्यावर छत्र
पकडणारा श्रीराम जवळ आला तसे श्रीराम म्हणाले,"
बस आता त्याची आवश्यकता नाहीये." असे म्हणून राम
आपल्या मातेच्या भवन जवळ आले तशी त्याना मातेच्या
भवनातुन आरती म्हणण्याचा आवाज येत होता. परंतु
राम तेथे पोहोचता तेव्हा आरती संपली होती. श्रीरामला
पाहून माता अति प्रसन्न झाली नि म्हणाली ," अगदी योग्य
वेळी आलास. मी रात्रभर विष्णू देवाचा एक लक्ष जप केला
आहे. म्हणून मी विष्णूच्या श्री चरणांचा धुळीने टिळक करते." असे म्हणून महाराणी कौशल्याने श्रीरामाना टिळक केला. आणि म्हणाल्या ," आसनावर बैस मी देवाचा
प्रसाद आणते." परंतु श्रीराम आसनावर न बसता उभे
राहतात. ते पाहून त्या म्हणाल्या," अरे पाहतोस काय
बैस ना ?" त्यावर श्रीराम म्हणाले ," नाही आई ! मी आता
बसत नाही."
" घाई आहे का ?"
" नाही आई ! या आसनावर मी आता बसू शकत नाही
कारण ते माझ्यासाठी वर्ज्य आहे."
" आता सिंहासनावर बसायला निघालास म्हणून आपल्या आई ने दिलेले आसन आता वर्ज्य आहे."
" आई आता माझी कुशाच्या आसनावर बसण्याची
वेळ आहे."
" राज करणार आहेस का तपस्या ?"
" तपस्या ! महाराज मला तपस्या करण्यासाठी वनात
पाठवत आहेत. मी चौदा वर्षे वनात राहून तपस्या करणार
आहे. आणि महाराज भरतला राज गादीवर बसविणार
आहेत."
" हसून आपल्या आईची थट्टा करत आहेस होय ?"
" नाही आई , हे अटळ सत्य आहे. मला पिताश्रीचे
वचन पूर्ण करण्यासाठी या क्षणी वनात जायचं आहे." असे
म्हणताच महाराणी कौशल्याना एकदम धक्का बसला.
त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले नि त्याना भोवळ
येऊ लागली नि त्यांच्या हातातील आरतीचे ताट हातातून
निसटले नि जमिनीवर कोसळले. नि त्या एकदम किंचळल्या. विश्वास न होऊन म्हणाल्या," नाही हे सर्व
खोटे आहे." तेव्हा श्रीराम म्हणाले ," आई , अयोध्येच्या
महाराणीनी धैर्य हरवून चालणार नाही."
" परंतु असं का ? कोणी केले हे सर्व ? तुझ्या राज्यभिषेक साठी तर महाराज स्वतःच उत्सुक होते महाराजांनी तर कुलगुरू वशिष्ठाना लौकरात लौकर मुहूर्त काढायला सांगितला. मग एक रात्रीत असे काय घडले की ज्यामुळे असा निर्णय घेण्यात आला. माझ्या पेक्षा तर कैकेयी तुझ्यावर प्रेम करते मग तिने का नाही रोखले महाराजांना ?"
" स्वतः माता कैकेयीचा तर हा आदेश आहे."
" कैकेयी ने ?"
" हां आई , माता कैकेयी ने देवासुर संग्रामात पिताश्री
कडून दोन वर प्राप्त केले होते. ते आज त्यानी मागितले.
एका वर मध्ये भरतीसाठी राज्यभिषेक आणि दुसऱ्या वर मध्ये माझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास. म्हणून मला
आजच वनात जायचं आहे. मी आपला निरोप घ्यायला
आलोय." त्यावर महाराणी कौशल्या म्हणाल्या ," चौदा
वर्षे वनात राहणार ते पण इतक्या अकस्मात सांगितले
इतक्या अकस्मात तर वीज पण आकाशात चमकत नाही.
इतक्या सहजपणे सांगितले. मला तर तुझ्या व्यक्तव्यावर विश्वासच बसत नाहीये. चौदा वर्षे वनात जाऊन राहणार
वनात जाऊन राहण्याचा अर्थ तरी माहीत आहे का माझ्या
बाळा ? तू वनात गेल्यानंतर तुझ्या विना मी जिवंत तरी
राहू शकेन काय ? छे छे छे ! तू कोठेही जायचे नाहीये."
असे म्हणून त्यांनी श्रीरामाना आपल्या हृदयाशी घट्ट धरले. तू कोठेच जायचं नाहीये."
" परंतु ही पित्याची आज्ञा आहे आई !"
" पित्याची आज्ञा आहे तर मातेचा पण आपल्या पुत्रावर तेवढाच अधिकार आहे, म्हणून मातेच्या आज्ञे शिवाय तू कोठेही जाऊ शकत नाही."
" परंतु मातेची पण तर आज्ञा मिळाली आहे. म्हणजे
माता कैकेयीने आज्ञा दिली आहे."
" कैकेयी त्यात स्वार्थ आहे, अश्या आज्ञाचे काय मोल
आहे ?"
" माझ्यासाठी कैकेयी सुध्दा माताच आहे, जश्या आपण आहात. अर्थात माझ्यासाठी माता कैकेयीचे
तेवढेच मोल आहे जेवढे आपले मोल आहे."
" ते मला माहित नाही. पण माझ्या आज्ञा शिवाय तू
कोठेही जायचे नाही."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा