Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

रामायण भाग १३ | Ramayana episode 13 | Author : Mahendranath Prabhu.

रामायण भाग १३ | Ramayana episode 13 | Author : Mahendranath Prabhu.
रामायण भाग १३ | Ramayana episode 13 | Author : Mahendranath Prabhu. 

 



  महाराज दशरथ आणि राम त्या कक्षेतून निघाले. तसे
द्वारपाल म्हणाला ," महाराज एक निवेदन आहे आपल्यासाठी !" त्यावर महाराज म्हणाले ," बोल काय
निवेदन द्यायचे आहे तुला ? "
     " महाराज महाराणी कैकेयीची दासी आली होती
आपल्याला भेटू इच्छित होती. आम्ही इथूनच माघारी
पाठविले."
    " काय संदेश घेऊन आली होती ?"
    " महाराणी कैकेयी ने आपल्याला आपल्या भवन मध्ये
भेटायला बोलविले होते."
    " राम तू जा आपल्या कक्षेमध्ये तिथंच गुरुदेव पण येणार आहेत. तू आणि सीता कडून एक अनुष्ठान करू
इच्छित आहेत ते." तसा राम ने होकारार्थी मान डोलावली.
महाराज महाराणी कैकेयीच्या भवन मध्ये गेले आणि राम
आपल्या कक्षेत गेले तेव्हा तेथे गुरुदेव वशिष्ठ अगोदरच
उपस्थित होते. श्रीरामानी गुरुदेव चे चरण धुतले आणि पाण्याचे पात्र सीते जवळ दिले. सीते कडून लगेच ते उर्मिला ने घेतले. श्रीरामानी उपरणाने त्यांचे चरण पुसून काढले.
   " राम आज आम्ही तुझ्या कडून जे अनुष्ठान करणार
आहे. त्यासाठी तुला आज उपवास करायला लागणार आहे. उद्या तुझा राज्यभिषेक होईपर्यंत तुम्हां दोघांना स्वतःवर संयम ठेवायचा आहे." त्यावर राम म्हणाला ,
  " जशी आपली आज्ञा !" त्यानंतर तेथून महर्षी वशिष्ठ
निघून गेले. महाराज दशरथ महाराणी कैकेयीच्या भवन
मध्ये गेले. तेव्हा तेथे कोणीच नव्हते. म्हणून त्यांनी प्रथम
महाराणी कैकेयीला हाका मारून पाहिल्या. परंतु काहीच
प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दासी मंथरा ला हाका मारून
पाहिल्या परंतु काही प्रतिसाद आला नाही. मात्र एक दासी
येऊन म्हणाली ," महाराणी कोभवनला गेली आहे. पण
कशासाठी ? " परंतु त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर द्यायला कोण
होते तेथे ? महाराज कोभवन मध्ये गेले असता पाहतात  तर महाराणी ने आपला सारा साज शुंगार उतरलेला
असतो. केस मोकळे सोडले आहेत. अंगावरील सारे अलंकार जमिनीवर विखुरलेले पाहिले. महाराजांना काही
कळेना म्हणून ते तिच्या जवळ येऊन तिला हाका मारतात. परंतु काहीच प्रतिसाद देत नाहीत. तेव्हा ते विचारतात की देवी कैकेयी काय झालं ते सांगशील का ?" परंतु महाराणी हुं की चू करत नाहीत. तेव्हा ते तिच्या अगदी जवळ येतात नि खाली बसून तिला विचारू लागतात की हा काय अवतार बनविला आहेस ? आणि एवढं रागवायला काय झालं ? तुझा कोणी अपमान केला आहे का ? केला असेल तर त्याचे नाव सांग मी आताच्या आता त्याला शासन करतो." परंतु कैकेयी काहीच उत्तर देत नाही. तुला माहीत आहे ना तू आम्हाला किती प्रिय आहेस ती ! " पण तरी देखील महाराणी कैकेयी काहीच बोलत नाही. शेवटी महाराज म्हणाले," तुला काय पाहिजे ते आम्ही तुला देऊ शकतो. तुझी इच्छा असेल आम्ही राजाला भिकारी नि भिकाऱ्या ला राजा बनवू शकतो. बोल काय पाहिजे तुला ? पण काहीच उत्तर दिलं नाही. देवी सूर्याचे चक्र जिथे फिरते तिथपर्यंत सारा प्रदेश माझ्या अपत्या खाली आहे. तेव्हा तुला काय पाहिजे ते सांग. आपल्या राज्यात असलेली सर्वात अमूल्य वस्तू माग. मी ताबडतोब आणून देईन. परंतु अशी माझ्यावर रुसू नकोस. तू अशी रुसलीस तर आम्ही कोणाच्या आधारावर जगणार ? महाराणी कैकेयी जे मागशील ते आम्ही या क्षणी देवू असे आम्ही तुला वचन देत आहोत." तेव्हा  महाराणी कैकेयी म्हणाली ," देणार , देणार असे नेहमी सांगताय पण आजपर्यंत दिलं आहे का काही ? आता ही नवीन वचन अजून जुनी वचन पूर्ण केली नाहीत. मग या नवीन वचनांचे काय करू ?" महाराज मोठ्या गोंधळात पडले. म्हणून त्यांनी विचारले ," देवी कोणते जुने वचन पूर्ण केले नाही आम्ही ?"
    " झाले. म्हणजे ते वचन विसरलात."
    " महाराज देवासुर संग्राम झाला होता आपण इंद्राची
सहायता करायला गेले होते. तेव्हा मी आपल्या रथाची
सारथी बनली होती. ते तरी आठवते की तेही नाही ?"
   " हां तू त्यावेळी इतक्या खुशलतेने रथ हाकला होतास
की सारे वीर तुझी प्रशंसा केली होती. सारे आठवते मला."
    " मग हेही आठवत असेल ना, आपण बाण लागून जखमी होऊन मूर्च्छित झाला होता. तेव्हा मी रथ तेथून
बाहेर काढून एका निर्धन स्थळी घेऊन गेले. आणि त्यानंतर
आपली मी सेवा केली नि आपले प्राण वाचविले. जर त्या
वेळी मी रथ एका सुरक्षा स्थळी घेऊन गेले नसते तर आपला प्राण वाचला तरी असता का ?" तेव्हा महाराज
म्हणाले ," मला सर्वकाही आठवते. म्हणून तुला काय पाहिजे ते मांग. माझा प्राण जरी मागितला तरी तो मी
हसत हसत देईन." त्यावर कुत्सित हसून म्हणाली ," मला
आपले प्राण नकोय. आपण खुश होऊन दोन वरदान दिले
होते. तेव्हा मी म्हणाले की माझे हे दोन वरदान आपल्याकडे अमानात च्या स्वरूपात असतील. जेव्हा
मला गरज असेल तेव्हा ते मी मागीन."
    " हो असे मी म्हणालो होतो. आणि मला असा आभास
होत आहे की त्यावेळी आम्ही फार मोठीं कंजूशी केली.
तू जी वीरता दाखविली होती. तिच्या फलस्वरूप तुला दोन
नाही तर चार वरदान द्यायला पाहिजे होती."
     " महाराज या क्षणी ती दोन वरदान पूर्ण केलीत तरी
पुरेसे आहे."
    " अवश्य करू बोल काय वरदान हवंय तुला ?"
    " असं खूपदा ऐकलं आहे नि मला आपल्या बोलण्यावर
विश्वास नाहीये."
     " काय ? माझ्या व्यक्तव्यावर विश्वास नाहीये तुझा ?
राघूकुलाची रीत सदैव चालत आली आहे, प्राण जाय पण
वचन न जाय."
    " महाराज असे मधुर बोलून आपण आमची समजूत
काढू नका."
     " माझ्यावर विश्वास मी खरंच सांगतोय. वाटल्यास
तुझी शपथ घेतो पाहिजे तर !"
    " माझी शपथ माझ्या पेक्षा अजून कोणी असेल प्रिय !"
    " हो , आहे. राम ss "
    " मग रामाची शपथ का नाही घेतली ?"
    " राम ची शपथ ? ठीक आहे, तुझ्या साठी आम्ही
रामची शपथ घेऊन सांगतो की तू जे काही मागशील
ते आम्ही या क्षणी देवू !" असे महाराजांनी म्हणताच महाराणी कैकेयी खुश झाली. कारण रामाची खोटी शपथ
तर महाराज कदापि घेऊ शकणार नाही. म्हणून तिने मुद्दाम विचारले की नक्की द्याल ना ?"
     " अवश्य ! पण त्या आधी तुला आमचे एक म्हणणे
ऐकावे लागेल."
     " कोणते ?"
     " हे भयानक रूप बदलून ये. आता या क्षणी भवनाच्या
बाहेर जाऊन साज शुंगार करून ये. जशी नेहमी असायची
आम्हाला तुझे तेच रूप पाहून आमची दशा तशी होते
जशी आकाशातील चंद्राला पाहून चकोरची होते."
    " पण माझं म्हणणं तर आधी ऐकून घ्या."
    " आता तर मी रामाची शपथ घेतली आहे. आता तरी
माझ्यावर विश्वास कर आणि आम्हाला तेच तुझे मोहिनी
रूप दाखव. तुझी दोन्ही वरदान तात्काळ पूर्ण होतील."
    " असं म्हणता ठीक आहे." असे म्हणून महाराणी
ताबडतोब त्या भवनाच्या बाहेर निघून गेल्या.

      लक्ष्मण आपल्या पत्नीला अर्थात उर्मिला हिला काही
सांगत असतो की उद्यापासून आम्ही राजदरबारातील कामात व्यस्त असणार , कारण सर्व कामे तर आम्हालाच
पहायची आहेत."
     " एवढ्या चिंतेत तर महाराज पण नाहीत."
     " त्याना चिंता व्हायला पण नाही पाहिजे. कारण आम्ही जे आहोत. आम्ही असताना जर महाराजांना चिंता करावी लागली तर आम्ही असून काय लाभ !"
     " सर्व कामात आपण एक गोष्ट विसरलात."
     " नाही उर्मिले. तुला मी कदापि विसरू शकणार नाही
कारण तू माझी प्रेरणा आहेस, हृदयाची धडकन आहेस
तुला बरे मी कसा विसरेन."
     " हुं ss आपल्याला बोलणे तर खूप येतं."
    " नाही प्रिये ! खरं तेच सांगतोय. तू माझी प्राणसखी
आहेस. प्राणा शिवाय व्यक्ती बोलू तरी शकते काय ?"
    " बोलण्यात आपला कोणीच हात धरू शकणार नाही."
    " प्रिये ! या क्षणी मी एकटा आहे. भरतदादा नि शत्रुघ्न
इथं असता तर थोडा थोडा भार त्यांच्यावर पण पडला
असता. पण काही हरकत नाही. मी उद्याच माता कैकेयी
सांगतो की भरतदादा नि शत्रुघ्न या दोघांना बोलावून घ्या.
थोडा थोडा भार त्या दोघांकडे देऊन मी माझ्या उर्मिले
साठी थोडासा वेळ काढू शकतो." असे म्हणताच उर्मिलेच्या चेहऱ्यावर हर्षानंद उमटला.

     महाराणी कैकेयी साज शुंगार करून महाराज उपस्थित
असलेल्या भवन मध्ये येते. तिला पाहून महाराज दशरथ
म्हणाले ," हुं ss आता मात्र वाटतेस महाराज दशरथाच्या
हृदयावर विराजमान असलेली साम्रानी ! ये बैस माझ्या बाजूला." असे म्हणून महाराणी कैकेयीचा हात पकडून
आपल्या शेजारी बसवत ते पुढे म्हणाले ," ऐक  साऱ्या
नगर मध्ये कशी हर्षद्वनी होत आहे. प्रजा रामाचा राज्यभिषेक बनवत आहे." त्यावर महाराणी कैकेयी स्मित
हास्य करत म्हणाली ," ते तर मी ऐकतेच आहे. परंतु आपण माझी इच्छा तर ऐकून घ्या. आपण मला दिलेले
दोन वरदान तर अगोदर पूर्ण करा."
     " अवश्य ! आज रामाच्या नावाने जे मागशील ते देईन.
मन इच्छित वरदान माग."
    " मला फक्त माझे ते दोन वरदान पाहिजेत बस्स !"
    " मागून तर बघ."
    " पण मला कळत अगोदर कोणते वरदान मागू ?"
आपल्या हातातील बोटे दाखवत अगोदर हे मागू का हे ?
असं करा ना, आपणच सांगा कोणते वरदान मागू ?"
आपल्या हाताची ती दोन बोटे दाखवत म्हणाली. महाराज
दशरथानी तिचा हात आपल्या हातात घेतला नि त्या दोन्ही
बोटाचे निरीक्षण करून एक बोट पकडून महाराज दशरथ
म्हणाले ," अगोदर हे वरदान माग."
    " मागू ?"
    " हां हां माग." असे महाराज दशरथ म्हणताच महाराणी
कैकेयी स्मित हास्य करत म्हणाली. करगळीच्या बाजू कडील बोट दाखवत कैकेयी म्हणाली ," माझं हे वरदान
म्हणतेय की अयोध्याचे राज्य माझा पुत्र भरतला मिळावे."
असे म्हणतात महाराज दशरथाच्या पाया खालील जमीन
सारल्याचा भास झाला. महाराज एकदम दचकून म्हणाले,
   " काय ? अयोध्याचा राजा भरत."
   " हां महाराज आणि माझं दुसरं वरदान रामला चौदा
वर्षे वनवास मिळावा." असे म्हणताच महाराजांना वाटले
की त्यांच्या शरीरातील प्राण कोणीतरी काढून घेत आहे.
म्हणूनच महाराजांनी विचारले की काय ? रामाला चौदा
वर्षे वनवास ! " लागोपाठ दोन धक्के महाराजांना मिळाले.
    " हां महाराज राम चौदा वर्षे वनात जाऊन राहायचं
बिलकुल तपस्वी बनून मुनी वेष धारण करून चौदा वर्षे
वनवासात जाऊन राहावे. आणि त्याला कोणत्याही नगरात जाणे वर्ज्य आहे." महाराणी कैकेयी चे हे व्यक्तव्य ऐकून महाराज एकदम स्तब्द झाले. कदाचित असं काही होईल याची कल्पना देखील केली नसावी. महाराणी कैकेयीने महाराज एकदम स्तब्द झाले तशी ती म्हणाली ," काय झालं ? माझं व्यक्तव्य ऐकून तुम्ही स्तब्द का झाले ? माझे दोन वरदान आपल्या पाशी अमानातच्या स्वरूपात होते. ते मी मन इच्छित वरदान मागितले. जर आपल्याला आपले वचन पूर्ण करायचे नसेल तर करू नका. साऱ्या नगरात आपलीच अपकीर्ती गायली जाईल आणि मग धर्म आणि सत्य आपल्या तोंडी पुन्हा असणार नाही असे कबूल करा." तेव्हा महाराज म्हणाले की तुला माहीत
तरी आहे का ? की तू काय मागत आहेस ?"
     " अवश्य ! माहीत नसते तर मागितले का मी असते !"
     " छे छे छे ! हे शक्यच नाहीये. हा वर मी देऊच शकत
नाही."
     " हुं ss  हे मला अगोदरच माहीत होते म्हणून तर मी
आपल्याला रामाची शपथ घ्यायाला लावली का उगाच !
सत्य वचन ते हेच का ? आपण काय विचार करून आपण मला वरदान मागायला सांगितले होते. आपल्याला काय वाटलं की ही भोळीभाली कैकेयी थोडेसे सोने मागेल
नि गप्प बसेल. आपल्याला हे नाही का जाणवले की कैकेयी एका राजाची पुत्री आहे तर दुसऱ्या राजाची पत्नी
आहे. एक महाराणी काय मागू शकते याचा विचार केला नाही का आपण ?" तेव्हा महाराज दशरथ हरलेल्या खिलाडू सारखे फक्त होकारार्थी मान डोलावत म्हणाले,
" खरंय विचार करायला पाहिजे होता. पण विचार केला
नाही. मला ओळखायला पाहिजे होते तुझ्या खऱ्या रुपाला पण नाही ओळखले. मी एक हिरा समजून गळ्यात
अडकवून फिरत होतो ती एक विषारी नागीण निघाली."
त्यावर ती कुत्सित पणे हास्य करत म्हणाली ," महाराज
आपण तर आम्हां स्त्रिया सारखे शिव्या द्यायला लागलेत.
कसले वीर पुरुष आहात तुम्ही ! मला तर आपल्या व्यक्तव्यावर हसू येत आहे."
   " तू काय हसणार , सारा संसार हसणार आहे माझ्यावर.
म्हणेल म्हातारा दशरथ एका स्त्रीच्या मोहात असा फसला
की राम सारख्या धर्मात्मा पुत्राला वनात पाठविले. असे
मी का केले असें कोणी विचारले तर काय उत्तर देऊ मी त्यांना ?"
     " आणि जर कोठे वीर पुरुषांची सभा असेल नि तिथे
आपल्याला विचारले जाईल की ज्या स्त्री ने आपल्या
प्राणाची रक्षा केली. त्या स्त्री चे आपण ऋणी होता त्या
स्त्री ने आपले वरदान मागितले तर भ्याड पुरुषा सारखे
तोंड लपवून बसलात काय म्हणून कोणी विचारले तर काय उत्तर द्याल आपण ? शिवाय स्वर्गातील आपले पूर्वज
आपल्याला प्रश्न करतील तर काय उत्तर द्याल आपण ?"
     " कैकेयी तू मला कोठेही आपले तोंड दाखवायला
जागा शिल्लक ठेवली नाहीस. स्त्री तर देवीचे रूप असते.
पण तू तर कुलनाशिणी निघाली. मी तुला नको तेवढे
महत्व दिले. हा त्याचाच तर परिणाम आहे."
      " एवढा का विलाप करता आहात ? मी कोणी  दासी
नाही की भरत आपला पुत्र नाही ? आता मला पूर्ण विश्वास झाला की आपण आपले वचन पूर्ण करणार नाही.
पण मी आपणास एक सांगते की आज एक तर राम
वनवासात जाईल अथवा माझी तिरडी उठेल आपल्या
द्वारातून. कारण वचन भंग करणाऱ्या डरपोक ! भ्याड
पुरुषाची पत्नी बनून राहणे शोभत नाही. त्या पेक्षा मी मरण स्वीकारीन." असे म्हणून तेथून निघून जाऊ लागते. तेव्हा महाराज तिचा हात पकडून म्हणाले ," असे कठोर बोलू नकोस प्रिये ! एवढी निर्दयी कशी झालीस तू ? अगोदर तर अशी नव्हतीस , मग आजच का असे रूप धारण केलेस ? राहिली गोष्ट भरत माझा पुत्र आहे का नाही तर ऐक. भरत आणि राम माझे दोन डोळे आहेत. तू भरतला  राज्य द्यायला सांगतेस हरकत नाही. जर भरत राजा बनू इच्छित असेल तर त्याला मी त्याला उद्याच आजोळी वरून बोलवून घेतो नि त्याचा राज्यभिषेक करून टाकतो. माझ्या रामला राज्याचा अजिबात लालसा नाहीये. त्याने कालच राज्यसभेत राज्य घेण्यास नकार दिला होता. तुझी इच्छा आहे की अयोध्या चा राजा भरत बनवा हरकत नाही. परंतु रामला वनवासात पाठविण्याचा हट्ट सोड. आणि आपले दुसरे वरदान वापस घे राणी वापस घे."
     " असे कदापि होणार नाही. जर वचन द्यायची असतील
तर दोन्ही वचन पूर्ण करावी लागतील. आणि रामला मी आजच वनात जाताना पाहू इच्छित आहे." तेव्हा महाराज
दोन्ही हात जोडून म्हणाले," तुला जर माझे मस्तक हवे
असेल तर या क्षणी ते कापून तुझ्या चरणांवर ठेवून देतो.
परंतु रामाला वनवासात पाठवून मला तडफडत मरण्याची
शिक्षा देऊ नकोस. राम माझा श्वास आहे राणी ! श्वास शिवाय मनुष्य कसे जगू शकेल बरं ?" त्यावर महाराणी
कैकेयी म्हणाली ," राम जर इतका प्रिय होता तर त्याची
शपथ घेऊन सांगण्याची गरज होती ? मोठ्या उदार मनाने
म्हणाला मांग कैकेयी काय पाहिजे ते वरदान मांग. आणि
जसे मागितले तसे आपल्या वचन पूर्ण करण्यास तयार
नाही. रघुवंश शिरोमणी काय म्हणाला होता ते तरी ठाऊक
आहे का ? ते पण मीच सांगते. रघुवंशीची रीत पहिल्या पासून चालत आली आहे , प्राण जाई पण वचन न जाई ! ते सारं खोटं होतं की काय ? जर वचन पूर्ण करता येत नाही तर वचन देता कशाला ? कोणी जबरदस्ती केली होती का ?"
   " राणी तू मला कोठे आणून उभे केलेस ? मी आता रामला काय सांगू नि कसे सांगू की राम आता तू राजाचा
उत्तराधिकारी नाही राहिलास ! कोणत्या तोंडाने सांगू ?"
महाराज दशरथ एकदम भावविभोर झाले होते. त्यांच्या
प्रत्येक शब्दात करुणा आणि विव्हलता दिसत होती.
   

      क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..