Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

रामायण भाग १२ | Ramayana episode 12 | Author : Mahendranath Prabhu.

रामायण भाग १२ | Ramayana episode 12 | Author : Mahendranath Prabhu.
रामायण भाग १२ | Ramayana episode 12 | Author : Mahendranath Prabhu. 




    एका दासीने महाराणी कैकेयी ला श्रीरामाच्या राज्यभिषेकाची माहिती दिली तशी महाराणी कौशल्या
फार आनंदित होतात.परंतु विश्वास न झाल्याने पुन्हा
महाराणी सुमित्रा विचारतात की , खरं सांगतेस सुमित्रा ?"
माझ्या रामचा उद्या राज्यभिषेक होणार आहे का ? " तेव्हा महाराणी सुमित्रा म्हणाली ," हां ताई , लक्ष्मणाने तर
ही बातमी आणली आहे." तेव्हा लक्ष्मण म्हणाला ," हां मोठ्या आई , महाराजांनी स्वतः राज्यसभेत घोषणा केली. ती पण कुण्या एकट्या दुकट्या माणसा जवळ नाही तर त्यावेळी राज्यसभेत सामंत , मंत्रीगण आणि प्रजाजन समोर जाहीर केलं की उद्या राम दादाचा राज्यभिषेक होणार." तेव्हा महाराणी कौशल्या खुश होऊन श्री विष्णू चे आभार प्रगट करत म्हणाल्या," कमलनयन आपली अशीच कृपादृष्टी असू दे रामावर." असे म्हणून लक्ष्मण सहित सर्वजण व्यंकटेशेला प्रणाम करतात. तेवढ्यात
तेथे श्रीराम सुध्दा येतात. त्याना पाहून लक्ष्मण म्हणाले,
   " ते पहा राम दादा आले." श्रीराम येतात नि प्रथम
आपल्या आई चे चरणस्पर्श केले नि मग म्हणाले," माते
पिताश्रीनी उद्या माझा राज्यभिषेक करणार आहेत. तेव्हा
आपण मला आशीर्वाद द्या. " तेव्हा महाराणी कौशल्या
आशीर्वाद देत म्हणाल्या ," आयुष्यमान हो !" त्यानंतर
श्रीराम माता सुमित्राचे चरणस्पर्श करत म्हणाले," माता
मी आपले चरणस्पर्श करत आहे, मला आशीर्वाद द्या."
तश्या महाराणी सुमित्रा आशीर्वाद देत म्हणाल्या की
दीर्घायुष्य व्हा. आणि सुर्यवंशाची कीर्ती सर्वत्र धुमधूमु दे."
तेव्हा महाराणी कौशल्या म्हणाल्या ," माझी विषु देवाची
आराधना सफल झाली. कुदेवता तुझे रक्षण करो नि सुर्यवंशाची कीर्ती सर्वत्र धुमधूमु दे." त्यावर राम म्हणाले ,
माते तुझ्या आशीर्वादाने मला बल आणि समृद्धी अवश्य
मिळेल." तेव्हा माता सुमित्रा म्हणाल्या ," लक्ष्मण आजपर्यंत आपल्या दादाच्या शीतल सावलीत वाढल्यास
परंतु आजपासून तू आपल्या दादाचा सेवक, अंगरक्षक आहेस. आणि पासून तुझा दादा तुझा प्रभू आहे. त्याची
सेवा करणे हाच तुझा धर्म आहे." त्यावर श्रीराम म्हणाले,
माता माझ्यात नि लक्ष्मणात काहीच फरक नाहीये. माते
लक्ष्मण माझी दुसरी आत्मा आहे. म्हणून जो लक्ष्मण आहे
तोच मी आहे. आणि जो मी आहे तोच लक्ष्मण आहे. जो
भोग मी भोगेन तोच भोग लक्ष्मण भोगेल. लक्ष्मण माझे
जीवन सुख दुःख सर्वकाही तुझ्यासाठीच आहे." तेव्हा
लक्ष्मण म्हणाला ," दादा माझा जन्मच ह्या श्रीचरणाशी
समर्पित आहे. आणि सदैव समर्पित असेल." त्यावर महाराणी कौशल्या म्हणाल्या ," राम आणि लक्ष्मण हा
शुभ समाचार सीता आणि उर्मिलेला जाऊन द्या बरं."
    " चल दादा. हा शुभ समाचार ऐकून वहिनी फार खुश
होईल." असे म्हणून लगेच गोड बातमी द्यायला गेला देखील. आणि सीतेच्या महाली पोचला नि म्हणाला, सावधान अयोध्यापती राजा श्रीराम येत आहेत." तेव्हा
सीतेला विश्वास न होऊन तिने त्याला विचारले ," राजा राम ?" लक्ष्मण म्हणाला ," हां वहिनी राजा रामचंद्र जी येत
आहेत. ते पहा आले." तेव्हा सीतेने विचारले ," आर्य हे लक्ष्मण दादा काय म्हणत आहेत ?"
     " हां सीते महाराजांचा तसा आदेश आहे." श्रीराम पुढे
काही बोलण्या अगोदर लक्ष्मण म्हणाला ," हां वहिनी उद्या
कृती नक्षावर राज्यभिषेक होणार आहे. आणि महाराणी
सीतेला उद्या राज्यसभे मध्ये दादांच्या डाव्या बाजूला बसविण्यात येईल." तेव्हा सीता प्रश्न केला की , परंतु हे सर्व इतक्या लौकर का ?"
    " हां सीता मी सुद्धा हाच विचार करतोय. खरे सांगायचे
तर मला हे योग्य वाटत नाहीये." त्यावर लक्ष्मणाने विचारले," त्यात अनुचित काय आहे दादा ?"
     " अनुचित यासाठी आम्ही चारही भाऊ एकाच दिवशी
थोड्याफार फरकाने जन्मलोय. चारही भाऊ एकत्र लहानाचे मोठे झालो नि आमचा विवाह देखील एकाच दिवशी झाला. मग राज्यभिषेक एकाचाच का ?"
     " ते यासाठी दादा की हीच परंपरा आहे. जेष्ठ पुत्र
राज्याचा उत्तराधिकारी असतो."
    " हो मान्य. परंतु मला अजिबात त्यात रस वाटत नाहीये. कारण इथं भरत, शत्रुघ्न नाहीयेत. त्यामुळे मला अजिबात इच्छा नाहीये. आणि उत्साह पण वाटत नाहीये. आणि आनंद ही वाटत नाहीये." तेव्हा लक्ष्मण म्हणाला ," इच्छा ,  आनंद आणि उत्साह पाहायचा असेल तर तो प्रजेमध्ये दाटलेला दिसेल. जिथे पाहावे तेथे आनंद आणि उत्साह ओसांडताना दिसत आहे." आणि खरोखरच होते
ते. संपूर्ण राज्यामध्ये दवंडी दिली जात होती.दवंडी देणारा
म्हणाला ," उद्या महाराजांनी श्रीराम यांचा राज्यभिषेक
करायचा निर्णय घेतला आहे. उद्या प्रातःकाळी श्रीरामचंद्राचा राज्यभिषेक होणार आहे. तेव्हा सर्व प्रजाजनांनी उपस्थित राहायचे आहे." असे म्हणताच
सर्व प्रजाजनांनी मोठ्या ने जयजयकार केला नि मग आनंदाने नाचू लागले. ते पाहून मात्र महाराणीची दासी मंथरा हिच्या पोटात वरवाटे येऊ लागले. परंतु प्रजा इतकी आनंदित होती की आनंदाने नृत्य करत होती. सर्व लोकांनी उत्सव असल्या प्रमाणे संपूर्ण अयोध्या नगरी फुलांनी सजविली होती. रांगोळी दीपमाला पेटवून सर्वत्र प्रकाश पसरविला होते. अंधाराचे साम्राज्य कोठेही दिसत नव्हते. प्रजेचा तो आनंद नि उत्साह पाहून मंथरा दासीच्या अंगाची  लाही लाही झाली होती. तिला तो आनंद सहन झाल्याने ती लोकांच्या हातातील आरतीचे ताट आपल्या हातातील दांडा मारून पाडू लागली आणि इतकेच करून न थांबता तो लोकांना आपल्या दांड्याने बडवू लागली. पण तरी देखील लोक तिचे ऐकत नव्हते. इकडे राम आणि सीता महालाच्या भींतीवर उभे राहून लोकांचा उत्साह पाहत होते. तेव्हा सीता म्हणाली ," लोकांमध्ये फार उत्साह दिसतोय."
    " हां सीते मी याची कल्पना देखील केली नव्हती. तेवढ्यात तेथे लक्ष्मण आला नि म्हणाला ," दादा मी आता
पाहून आलोय , लोकांनी सारी अयोध्या नगरी सजविली आहे. संपुर्ण राज्यामध्ये कोठेही अंधार दिसत नाहीये. इतक्या दीपमाळा लोकांनी लावल्या आहेत. तेव्हा उर्मिला म्हणाली ," ताई , लोक  आनंदाने इतके बेभान झाले की
रस्त्यावर नृत्य करीत आहेत." तेव्हा लक्ष्मण श्रीरामाना लोकांनी पेटवलेल्या दीपमाळा दाखवत म्हणाला, " दादा, बघ लोकांनी सारी अयोध्या नगरी दीपमाळा ने प्रकाशमय केली आहे, यावरून सिद्ध होते की अयोध्येतील सारी प्रजा आपल्यावर किती प्रेम करते." त्यावर राम म्हणाले ,
   "  लक्ष्मण , प्रजेतील उत्साह तू पाहिलास परंतु साऱ्या प्रजेला खुश ठेवणे मोठे कठीण कार्य आहे. मला तर वाटतं की माझ्या जीवनातील मोठा कठीण प्रसंग लौकरच येणार आहे. प्रेमाचे मूल्य द्यावे लागते लक्ष्मण. मंथरा पळत राजमहाल मध्ये प्रवेश करते नि पाहते तर इथं सुध्दा दासी वगैरे आनंदाने दीपमाळा लावत असतात. मंथरा रागाने एकीच्या हातातील आरतीचे ताट  पाडले तेव्हा त्या दासी म्हणाल्या," कुबडी तुला काय झालं दिसत नाही का ? " तेव्हा मंथरा म्हणाली," बंद करा हे सर्व !" त्यावर एक दासी म्हणाली," अरे कुबडी तुला माहीत आहे का ? उद्या श्रीराम राजा होणार आहेत." तेव्हा कुबडी म्हणाली," राम राजा होणार हेच माझं सर्वात मोठं दुःख आहे." त्यावर त्या दासी एकमेकींना म्हणाल्या," जाऊ द्या गं ह्या कुबडी ला तिला कधी आनंद झालाच नाही." मंथरा महाराणी कैकेयी च्या महाली जायला निघाली. तेव्हा कैकेयी च्या महालात कैकेयी दासीना सोन्याच्या वस्तूच्या भेटी देतात. त्या दासी महाराणी की जय म्हणाल्या. तेव्हा कैकेयी म्हणाली ,
     "  जयजयकार माझा नाही माझ्या रामचा करा." तश्या श्रीरामा की जय म्हणत आल्या नि तश्या निघूनही गेल्या. तश्या महाराणी स्वतःशीच म्हणाल्या की मंथरा कोठे कोण जाणे ? " तेवढ्यात मंथरा तेथे आली. तशी महाराणी कैकेयी रागाने म्हणाल्या ," आलीस , कोठे तडफडायला गेली होतीस ? हा बघ सर्वात अगोदर एक मोत्याचा हार काढून ठेवलाय तुझ्यासाठीच ! ये माझ्या माई  मी हार  स्वतः घालते तुझ्या गळ्यात." असे म्हणून हार तिच्या गळ्यात घालायला जातात तर मंथरा त्याना लोटून देत म्हणाली," मला नकोय तुझा हार. त्या पेक्षा माझा गळा कापून फेकून दे. तुझे वाईट दिवस पाहण्या पेक्षा मेलेलं अधिक चांगले." तेव्हा महाराणी कैकेयी चिडून
म्हणाल्या ," चूप रे ! काहीपण बोलत असते. माझे का वाईट दिवस येतील ? असे म्हणून त्या मंथरा कडे पाहत म्हणाल्या ," मंथरा तुला काय झालंय ? तुझी ही अवस्था
पाहून माझ्या मनात शंका येऊ लागली. राम आपल्या तिन्ही भाऊ सोबत नि महाराज सर्व खुशाल तर आहेत
ना ?" त्यावर मंथरा म्हणाली," ते सर्व खुश आहेत. मला फक्त तुझ्या चेहऱ्यावर खुशी दिसत नाहीये."
    " मला काय झालंय मी तर खुशीच्या सागरामध्ये जलविहार करत आहे. माझं फक्त एकच स्वप्न आहे की माझा राम कधी राजा बनेल ? कधी अयोध्येच्या सिंहासनावर बसेल ?" त्यावर मंथरा खेद व्यक्त करत म्हणाली ," हाय हाय फुटले रे तुझे नशीब !" तश्या महाराणी कैकेयी चिडून म्हणाल्या , " काळतोंडी तुझे रूप
चांगले नाही निदान वार्ता तर चांगल्या कर. मला असे वाटतेय की लक्ष्मण  तुला काहीतरी बोलला असावा. माझा राम तर कोणाला काही बोलणारच नाही. कडू बोलणे त्याला येतच नाही." त्यावर मंथरा कुत्सित स्वरात म्हणाली ," का बोलेल ? सर्वांशी गोड बोलून तर अयोध्येचे सर्व राज्य हडपेल." त्यावर महाराणी कैकेयी म्हणाल्या ," काळतोंडी काय म्हणालीस ? तुझी जीभ छाटून टाकीन. राम सर्वात मोठा आहे, अर्थात राजा तोच बनेल. आणि सूर्यवंशांची रीत पण हीच आहे." त्यावर मंथरा कुत्सित स्वरात म्हणाली ," त्या रितीचा परिणाम काय असेल माहीत आहे का तुला ? राम राजा बनेल नि भरत बनेल त्याचा दास आणि तू बनशील दासी !" त्यावर चिडून महाराणी कैकेयी म्हणाली," तुझ्या मनात रामा बद्दल हा विचार आलाच कसा ? माझा राम आपली माता कौशल्या पेक्षा ही माझ्यावर जास्त प्रेम करतो नि आपल्या छोट्या बंधूंना आपल्या प्राणापेक्षा ही जपतो. मला वाटतं तुझी बुद्धी भ्रष्ट्र झाली आहे." त्यावर मंथरा म्हणाली ," बुध्दी माझी भ्रष्ट्र झाली आहे का तुझी ? राणी ती गोष्ट आता विसर जेव्हा राम आपल्या आईपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम असल्याचा दिखावा करत होता आणि आपल्या प्राणापेक्षा प्रेम असल्याचे ढोंग करत असे. आता तरी भरतच्या प्राणाची चिंता कर, भरत रामाच्या रस्त्यातला काटा आहे. भरतला आपल्या मार्गातून हटविण्यासाठी अनेक कुटील डाव खेळेल.   हे प्रभू माझ्या भरताची रक्षा करा." हे ऐकून महाराणी कैकेयी एकदम विचलित झाली. म्हणजे खरंच
असं होईल का ? पण क्षणभरच. लगेच तिच्या मनात दुसरा
विचार येई की, छे छे छे ! राम तसा नाहीये. परंतु लगेच
दुसरे मन म्हणे की, असे कशावरून वाटते तुला ? त्यामुळे
महाराणी कैकेयी एकदम बेचैन होई  की कोणते खरं ?
तिच्या चेहऱ्यावरील बदलणाऱ्या छटा वरून मंथरा समजली की आपल्या कुटील शब्दाचा महाराणीवर
परिणाम आता होऊ लागला आहे, अजून थोडा प्रयत्न
जर केला तर आपल्या कार्यात खरंच यश येईल असा विचार करून एकामागोमाग एक ती पत्ते फेकू लागली
होती. परंतु तरी देखील महाराणीचे मन ते मान्य करायला
तयार नसते म्हणूनच की काय त्या मंथराला म्हणाल्या,
    " मंथरा हे तू काय करत आहेस ? आमच्या नात्या मध्ये
विष कालवत आहेस. ? " त्यावर मंथरा अजून आगीत तेल
ओतत म्हणाली," अमृत आणि विष या मधला फरक तुला
कळला असता तर आज ही वेळ आलीच नसती तुझ्यावर.
तुला काय वाटतं राजा तुझा गुलाम आहे, तू म्हणशील तसेच होईल. एकदम चुकीचा विचार करते आहेस तू. तुला माहितेय भरत रामाच्या राज्यभिषेक मध्ये अडसर बनू
नये म्हणून तर भरतला त्याच्या आजोळी पाठवून तो
येण्या आधी रामाचा राज्यभिषेक करून घेत आहेत. आता
तूच विचार कर जर त्यांच्या मनात भरत विषयी प्रेम असते
तर भरत येण्याची त्यांनी वाट पाहिली नसती का ? इतक्या घाईने राज्यभिषेक का केला जात आहे हे सांग बरं मला ?" परंतु महाराणी कैकेयीला अजूनही मंथराचे म्हणणे पटत नसते. त्या म्हणाल्या ," नाही मंथरा नाही  , तू जे सांगत आहेस ते सर्व खोटे आहे. उगाच माझ्या मनात राम विषयी भलते सलते भरून देऊ नकोस. माझा राम तू म्हणतेस तसा नाहीच आहे. म्हणून असे कुटील डाव मी मुळीच खेळणार नाहीये. मला सांग असा कुटील डाव खेळून तुला काय प्राप्त होणार आहे ? " त्यावर मंथरा म्हणाली ," ह्यात माझा काय फायदा ? सर्वच माणसं स्वार्थी नसतात. काही हितचिंतक पण असतात. तुला मी माझ्या अंगाखांद्यावर खेळविले आहे. कोमल फुलाला जसे जपले जाते तसे तुला मी जपले आहे. मी जिला लहानाचे मोठे केले तिच्यावर कोणी अन्याय करत असेल तर मी गप्प राहीन का ? माझं काय आहे ? तुझा पुत्र राजा बनू दे किंवा कौशल्येचा मी  तर महाराणी बनणार नाहीये. परंतु तू आता महाराजांची सगळ्यात प्रिय आहेस म्हणून अकडते आहेस ना ? पण एक दिवस तू दासी होणार एकदम माझ्या सारखीच." महाराणी उद्गारली ," दासी मला दासी बनविण्याची कोणाची हिंम्मत आहे ? कोणाची दासी बनेन मी ?" मंथरा आता ध्यानी आले की आपण केलेली किमया आता आपला रंग दाखवत आहे. असा विचार करून मंथरा म्हणाली ," आपल्या सवतीची ती तुला आपली दासी बनवून तुझ्या कडून आपली सेवा करून घेईल. " तेव्हा महाराणी कैकेयी उद्गारली की, ताई कदापि नाही असं करणार तू उगाच काही पण सांगत आहेस." त्यावर कैकेयी आपला कुटील डाव खेळत म्हणाली ," तू जिला ताई म्हणतेस. ती कौशल्या तिने काय केलंय ते माहीत आहे का तुला ? नाही ना ? मी सांगते. तू आपल्या तालावर महाराजांना नाचवत होतीस ना त्याच महाराजांना तिने वश केलंय नि एका डावात तुझा सत्यानाश केला. " असे म्हणताच मात्र महाराणी कैकेयी विचार करू लागली होती. तसा तिने पुढील पत्ता फेकत म्हणाली," रामाचा राज टिळकांची घोषणा होण्यापूर्वी  राजाने तुला माहिती पडू दिले नाही तू त्यांची सर्वात जास्त प्रिय राणी होतीस ना ? मग मला सांग आपल्या सर्वात प्रिय असलेल्या व्यक्तीशी असा कोणी विश्वासघात करेल का ? किती दिवस हे षड्यंत्र सुरू असेल कोणास ठाऊक ? तुला त्याची थोडीशी हवा पण लागू दिली नाही. यावरूनच तू विचार कर. आणि सवती मत्सर हा असतोच. मग ती सवत मातीची जरी असली तरी नागीण च असते. माझ्या भोळ्या राणी हे कधी समजेल तुला ! " आता मात्र मंथराच्या व्यक्तव्यावर विश्वास वाटला नि ती आपल्या मनात विचार करू लागली की मला इतक्या ही गोष्ट जाणवली का नाही ? सतत एकच गोष्ट कोणी ऐकविली तर खोटी गोष्ट पण खरी वाटू लागते. महाराणी कैकेयी ची विवेक बुद्धीवर मंथराच्या षड्यंत्राचा रंग चढल्याने तिला आता मंथराचे म्हणणे खरे वाटू लागले. आणि मग तिने आपले मत व्यक्त केले की , नाही नाही नाही मी कोणाची पण दासी बनणार नाही. त्यापेक्षा विष प्राशन करून आत्महत्या करिन." तेव्हा मंथरा म्हणाली," आत्महत्या करण्याचा का विचार करत आहेस मूर्ख राणी ! हरलेला डाव जिंकण्याचा प्रयत्न कर. रामच्या ऐवजी तुझा पुत्र राजा कसा बनेल याचा विचार कर."
    " मंथरा ती आता वेळ निघून गेली आहे. उद्या सकाळी
राम राजा बनेल. तेव्हा खोटी स्वप्ने मला दाखवू नकोस."
    " मी तुला खोटे स्वप्ने दाखवत नाही तर ती खरी कशी केली जातील याविषयी मार्ग ही सांगेन. आज नि उद्या या मध्ये एक रात्र बाकी आहे." त्यावर महाराणी कैकेयी म्हणाल्या," एका रात्रीत काय होणार आहे ?" तेव्हा दासी मंथरा म्हणाली," प्रलय. " तेव्हा न समजून महाराणी कैकेयी ने विचारले
   " प्रलय ?" दासी मंथरा म्हणाली ," हां प्रलय. कारण प्रलय एका क्षणात येऊ शकतो. फक्त अचूक फासा
फेकण्याची गरज आहे."
    " माझा तर सर्वनाश झाला आहे मंथरा. माझी बुद्धी
चाले नाशी झाली आहे. काय करावे ते सुचत नाहीये. ह्या
घरात तर तुझ्या शिवाय दुसरा कोणीही हितचिंतक नाहीये.
तेव्हा तूच एखादा उपाय सांग."
   " उपाय पण मीच सांगू ?"
   " मग दुसरा कोण सांगेल मला."
   " मग ठीक आहे. आता उपाय ऐक. महाराज जवळ दोन
वरदान आहेत तुझे."
    " वरदान ?"
   "  हे पण विसरलीस. तूच तर मला सांगितले होतेस की
देवता आणि असुरा मध्ये युध्द झाले होते. तेव्हा त्या युद्धात महाराज इंद्राची मदत करायला गेले होते. तू सुद्धा त्यांच्या सोबत होतीस. महाराज जखमी झाले होते नि मूर्च्छित सुद्धा झाले होते. त्या प्रसंगी .....असे मंथरा ला तो प्रसंग आठवला की महाराज फार जखमी झाले होते आणि मूर्च्छित ही झाले होते. म्हणून महाराणी ने मोठ्या खुशलतेने गर्दीतून रथ बाहेर काढला नि एका सुरक्षित जागी घेऊन गेली. तेव्हा मंथरा म्हणाली ," तू महाराजांना एका सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलीस नि महाराजांचे प्राण वाचविलेस आणि महाराजांच्या शरीरात रुतलेले बाण काढून महाराजांचे प्राण वाचविले होते. म्हणून महाराजांनी प्रसन्न होऊन तुला दोन वरदान दिले होते. तेव्हा तू त्याना म्हणालीस की मला गरज वाटेल तेव्हा मी हे वर मागून घेईन. तेव्हा ती आता वेळ आली आहे."
    " खरंच ?"
    " हां !"
    " आता त्या वरदानाचा कसा वापर करायचा ते पण
सांग ना ?"
    " एका वरदानात रामच्या ऐवजी भरताचा राज्यभिषेक!"
     " अरे वा मंथरा ! आता दुसऱ्या वरदानात ?"
    " दुसऱ्या वरदानात राम साठी चौदा वर्षे वनवास !"
    " रामसाठी वनवास तो कशासाठी ?"
   " तुला ऐकायचं नसेल तर जा."
   " मंथरा अशी रागावू नकोस. मी ना समज आहे मला
कळत नाहीये. अवश्य काहीतरी हित असेल. मला समजावून सांग. मला बरोबर समजेल."
     " राणी ही वेळ भावूक होण्याची नाहीये. कुटनीती
वापरण्याची वेळ आहे. राम ने अयोध्येच्या प्रजेला पण
वश केले आहे. त्या प्रजेला आपल्या बाजूने करण्यास
काही वर्षे लागतील की नाही म्हणुन रामाला चौदा वर्षे
वनवास. त्या चौदा वर्षात भरत सर्व प्रजेला आपल्या कडे
वळवून घेईल. म्हणून सांगते जा महाराज कडे नि सर्व
पारडे बदलून टाक." असे म्हणताच कैकेयी एक टाळी
मरते. तशी एक दासी त्यांच्या समोर हजर होते. तश्या
महाराणी कैकेयी म्हणाल्या की , जा महाराज जिथे
असतील तेथे जाऊन सांग की महाराणी ने आताच्या आता
आपल्या महाल मध्ये बोलविले आहे."
     " जशी आपली आज्ञा !" ती दासी निघून गेली. तेव्हा द्वारपाल त्या दासीला अडवितात. तेव्हा ती दासी म्हणाली,
   " मला आताच्या आता महाराजांना भेटावयाचे आहे."
  " या क्षणी महाराजांना कोणाला मेटण्याची परवानगी
नाहीये."
    " महाराणी कैकेयी चा विशेष संदेश आहे."
    " तरीही महाराजांना भेटण्याची परवानगी नाहीये."
    " महाराणी कैकेयीच्या दासीला आपण अडवीत आहात. तेव्हा महाराणीची आज्ञा पाळा "
    " आम्ही फक्त राज आज्ञा पाळतो."
    " मग एवढा संदेश तरी देऊ शकता ना ?"
    " काय संदेश आहे ?"
    " महाराणी कैकेयी ने ताबडतोब भेटायला बोलविले आहे." असे म्हणून दासी निघून गेली.

  महाराज दशरथ श्रीरामाशी चर्चा करत असतात. महाराज
म्हणाले ," राम उद्या तुझ्या डोक्यावर राजमुकुट घातला
जाणार आहे . एक गोष्ट लक्ष्यात ठेव. जो मनुष्य राजमुकुट
घालतो तो प्रजा नि देशाच्या हाती स्वतःला सोपवतो. राजा
होण्याचा अर्थ आहे संन्यासी होणे. मग त्याचे स्वतःचे काही राहत नाही. सर्वकाही देशाचे होते.

एक गोष्ट लक्षात ठेव. ती ही की एकदा राजा झाल्यावर तो
देशाचा होतो. त्याने फक्त देशाच्या हिताचाच  विचार करावा. तशीच आवश्यकता पडली तर पुत्र, पत्नी चा त्याग करावा लागला तरी मागे पुढे पाहू नये. देशासाठी
स्वतःचे प्राण जरी द्यावे लागले तर त्याने मागे-पुढे न पाहता स्वतःच्या जीवाचे बलिदान करावे. एकदा राजा झाल्यावर त्याच्यावर फक्त देशाचा अधिकार असतो. जो राजा आपल्या प्रजेच्या सुख-दुःखात सामील होत नाही. त्या राजाला प्रजेकडून कर घेण्याचा काहीही अधिकार नाहीये. राजाला आपल्या आचरणाने प्रजेपुढे आदर्श निर्माण करायला पाहिजे. मर्याद्याचे उल्लंघन होता कामा नये. कारण प्रजा राजाचे आचरण पाहूनच तसे आचरण करतो. न्याय करतेवेळी पक्षपात होता कामा नये. आवश्यकता पडल्यानंतर राजाला स्त्री, पुत्र, आणि मित्र इतकेच नाहीतर आपले प्राण जरी त्यागावे लागले तरी ते त्यागावे लागतील. कारण प्रजा ही त्याचा मित्र आणि प्रजा ही त्याचा परिवार आणि जो मनुष्य राजा बनल्यावर देशाचे हित पाहत नाही त्याला प्रजे कडून कर घेण्याचा काहीही अधिकार नाहीये. राजाला आपल्या आचरणाने मर्यादा आणि आदर्श स्थापित करायला पाहिजे. कारण प्रजा तेच पाहून आचरण करते. एक राजाची शक्ती दंड नाही न्याय आहे. न्याय सुद्धा पक्षपाती करणारा नसावा. आणि संकोचवाला पण असू नये. कारण न्याय करताना त्यात उदारता पण सोडू नये. राजाला पृथ्वीचा ईश्वर म्हटले आहे. कारण लाखो प्राण्यांचे जीवन मरण , सुख-दुःख त्याच्या हातात असते. म्हणून दया, क्षमा, उदारता आणि ईश्वर चे गुण असायला पाहिजे. युद्ध करतेवेळी राजाला आपल्या सैन्याच्या पुढे असायला पाहिजे. नाहीतर प्रजा त्याचा
आदर करीत नाही. राजाला कवी, ऋषी यांच्या सानिध्यात
असायला हवे. कारण तेच योग्य मर्गदर्शक असतात. त्याचे
अंतरंग आणि निस्वार्थी मंत्री असतील तर त्यांचे अवलोकन
करायला पाहिजे. आपल्या मनातील गुणभात आपल्या
मनातच ठेवणे आवश्यक आहे. राजाला गुप्त रूपाने आपल्या राज्यात फिरून आपल्या राज्यात काय चाललं
आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. राम तसा तू सर्व
ज्ञान संपन्न आहेस. परंतु निवृत्त होणाऱ्या राजाने नवीन
येणाऱ्या राजाने आपले अनुभवा पासून अवगत करायला
पाहिजे."
     महाराणी कैकेयी  आपल्या भवन मध्ये मोठ्या बेचैनीने
उकडून तिकडे येर जाऱ्या घालत असतात. तेव्हा मंथरा
महाराणीला आणखीन चिडविण्याच्या हेतू ने म्हणाली,
    " पाहिलेस तुझ्या दासीला महाराजांना भेटू दिलं गेलं
नाही. अजून तर रामाचा राज्यभिषेक सुद्धा झाला नाही तर
ही अवस्था पुढे काय होईल याचा आतापासूनच विचार
केलेला बरा." मंथराच्या व्यक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले. महाराणी कैकेयी संतापाने म्हणाली,
    " मी पण राम कसा बसतो राजगादीवर !"
    " आता मला हेच पाहायचं आहे की भडकलेली आग
महाराजांच्या मधुर वाणीने थंड तर होणार नाही ना ?
सावधान राणी महाराजांच्या मधुर वाणीने पिघळलीस तर
आयुष्य भर पस्तावशीर." त्यावर महाराणी म्हणाली ," त्याना येऊ दे तर खरं , त्यांच्या कडून प्रथम आपले वर
पूर्ण करून घेते की नाही ते बघच तू." त्यावर मंथरा
म्हणाली," उतावीळ पणा अजिबात करू नको. उतावीळ
पणाने हाती आलेली बाजी निघून जाईल."
    " त्यात उतावीळ पणा कसला आहे नि आता वेळच
कोठे उरला माझ्या जवळ."
   " पण तरी देखील निशाणा एकदम अचूक साधायला
हवा आहे."
    " मग मंथरा मी काय करू ? या क्षणी पूर्ण अयोध्या मध्ये तुझ्या शिवाय माझा दुसरा कोणी नाहीये. म्हणून तू
जो रस्ता दाखवशील त्याच मार्गाचा मी अवलंब करीन."
   " त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे स्त्री चरित्र दाखवायचे असेल तर ते पूर्ण दाखविणे आवश्यक आहे. पण सर्वात आधी तू आपला हा साज शुंगार उतरून ठेव. काढून टाक सोन्याच्या वस्तू आणि सरळ भवन मध्ये निघून जा." पाण्यातून बाहेर काढलेल्या मासळी प्रमाणे तडफडत रहा. रडून रडून आपले डोळे सुजवून ठेव. भलेही अश्रू खोटे असतील."
   " मग त्याने काय होईल ?"
   " काय होईल ? महाराजांची पार झोप उडून जाईल. मग
ते तुझी समजूत काढण्याचा प्रयत्न करतील. तुझ्या पुढे
नतमस्तक होतील. राणी तुझी ही अवस्था कोणी केली ? माझ्या प्राणा पेक्षा प्रिय असणारी काय झालंय ते सांगशील
तर माझ्यावर फार उपकार होतील बघ तुझे. पण राणी
सावधान राणी काहीही न बोलता फक्त रडतच राहायचं.
अजून मोठा गळा काढून रडायला सुरुवात कर मात्र आपल्या प्राणनाथ ला कोणत्याही गोष्टीचा सुगाव लागू
देऊ नकोस. त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नकोस.
   " मग मी माझे ते दोन वर कधी मागणार ?"
   " सांगते ना ! प्रथम रामाची शपथ काढून घ्यायला सांग
आणि मगच आपल्या मनातील हेतू महाराजा समोर व्यक्त
कर. परंतु रामाची शपथ जोपर्यंत काढून घेत नाहीत तोपर्यंत आपल्या मनातील हेतू सांगू नकोस. हे मात्र लक्षात ठेव विसरू नकोस." महाराणी कैकेयी आपली मान हलवून पक्के लक्षात ठेवीन चे आश्वासन दिले.

    क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.