Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

रामायण भाग ११ | Ramayana episode 11 | Author : Mahendranath prabhu.

रामायण भाग ११ | Ramayana episode 11 | Author : Mahendranath prabhu.
रामायण भाग ११ | Ramayana episode 11 | Author : Mahendranath prabhu. 




  महाराज मी आपल्या आज्ञाची हवलेलना करणार नाही.
परंतु आजच वडिलांचे पत्र आलं आहे, त्यांनी मला बोलविले आहे." त्यावर महाराज दशरथ म्हणाले ," आर्यजित जर मोठ्या महाराजांचा आदेश नसता तर मी
आपल्याला कदापि जाऊ दिले नसते. कारण महाराणी
कैकेयीची हीच इच्छा होती की आपण काही दिवस इथंच
राहावे." त्यावर महाराणी कैकेयी म्हणाल्या ," महाराज
मी दादाला जाऊच देणार नव्हती. परंतु पिताश्रीचे आजच
पुन्हा पत्र आलंय , त्यात त्यांनी आदेश दिला आहे. त्यामुळे
त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणे जरुरीचे झाले आहे." त्यावर महाराज दशरथानी भरत आणि या दोघांना बोलवून घेतले. तेव्हा भरत आणि शत्रुघ्न दोघेही ताबडतोब आपल्या पिताश्री जवळ हजर होतात. नि आपल्याला एवढ्या तातडीने का बोलवून घेतले त्या बद्दल
कारणही भरत ने विचारले की पिताश्री आपण आम्हाला बोलविलेत का ?" तेव्हा महाराज दशरथ म्हणाले ," हां भरत, तुझे मामाश्री आर्यजित तुम्हां दोघांना सोबत घेऊन जाऊ इच्छित आहेत. आणि ते पण आजच !"
     " आजच  " असे म्हणून आपल्या मामाकडे पाहत भरत म्हणाला ," का ? मामाला आमची अयोध्या आवडली नाही का ?" त्यावर आर्यजित म्हणाला ," कुमार असं नाहीये. खरं सांगायचं तर तुझ्या  आजोबांची तशी इच्छा आहे की मी तुम्हां दोघांना ताबडतोब कैकेयी देशी निघून यावे. अर्थात आम्ही त्यांच्या आज्ञाचे उल्लंघन करू
शकत नाही, शकणार नाही." त्यावर महाराणी कैकेयी
म्हणाल्या," भरत , आजकाल तुझ्या आजोबांचे स्वास्थ
ठीक राहत नाहीये , म्हणून त्यांनी दादाला बोलविले आहे.
दादाला आजच जायला हवं. तुम्हां दोघांनी पण आपल्या मामश्री सोबत जायचे आहे. कारण माझ्या पिताश्रींची तशी इच्छा आहे. म्हणून तुम्ही दोघांनी आजच आपल्या मामाश्री सोबत निघा. परंतु जाण्या अगोदर माता कौशल्या नि माता सुमित्रा या दोघींची पण अनुमती घ्या. " त्यावर भरत म्हणाला ," मी सर्वात प्रथम रामदादा नि वहिनीची अनुमती घेणार आहे."
  " हां अवश्य आपल्या दादा वहिनीची अनुमती घ्या."
       त्यानंतर भरत आणि शत्रुघ्न हे दोघेजण प्रभू श्रीराम यांच्या जवळ गेले नि त्या दोघांनी प्रथम प्रभू श्रीरामांचे चरणस्पर्श केले नि मग सीतेचे चरणस्पर्श केले. आणि भरत प्रभू श्रीरामाना म्हणाला ," दादा , मी आपला निरोप घ्यायला आलोय , कारण मी आणि शत्रुघ्न मामा सोबत जात आहोत." त्यावर श्रीराम म्हणाले ," शेवटी मामा नाहीत ऐकले तर ! म्हणून ते तुम्हां आमच्या पासून हिरावून नेत आहेत. परंतु हरकत नाही. तुम्ही दोघेजण मामाश्रीच्या
घरी जाऊन  काही दिवस आजोळी राहून तिथला आनंद उपभोगून या."  त्यावर भरत म्हणाला ," दादा, तिथला आनंद इथल्या आनंदा पेक्षा जास्त अमूल्य असणार नाहीये. शिवाय आम्हाला तिथं चैन पडणार नाही. दादा माझी तर  इच्छा आहे की माझ्या शरीराचे दोन तुकडे व्हावेत. एक तुकडा आपल्या चरणापाशी पडून राहण्यासाठी नि दुसरा तुकडा आजोबा जवळ  आजोबांची आज्ञा पळत असावा. दादा आपल्या चरणा पेक्षा मला स्वर्ग सुध्दा आवडणार नाही." त्यावर प्रभू श्रीराम म्हणाले ," तुम्हां दोघां शिवाय माझं तरी कोठे मन लागणार आहे , परंतु आजोबांची इच्छा पण तर पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे नाही का ? आणि खरे सांगू माझी पण इच्छा होतेय की तुझ्या सोबत चालावे."
     " मग तर चल ना दादा !"
    " भरत , इथं पण पिताश्री सोबत कोणीतरी असायला
हवं ना ? जेव्हा आम्ही दोघेजण महर्षी सोबत गेलो होतो
तेव्हा तुम्ही दोघेजण पिताश्री सोबत होता. आता तुम्ही
दोघेजण जात आहात तर आम्ही दोघांनी इथं राहायला
हवं. मी आणि लक्ष्मण इथं राहून आईची नि पिताश्रीची
सेवा करू आणि समज माझे इथं मन लागले नाही तर
मी स्वतःच तुला इथं बोलवून घेईन."
    " दादा, अगदी असेच कर, काहीतरी कारण सांगून आम्हा दोघांना इथं बोलवून घे."
    " जशी आपली आज्ञा दादा !" असे म्हणून त्या दोघांनी
त्या दोघांचा निरोप घेतला नि मामाश्री सोबत आपल्या
आजोळी निघून गेले.

    " महर्षी आम्ही ज्या ज्या वेळी इथिळून जाण्याची अनुमती महाराजा जवळ मागतो. त्या त्या महाराज काही
ना काही बहाणा करून आम्हाला थांबवितात. त्या मागे
आपली सुद्धा प्रेरणा असते. " त्यावर महर्षी वशिष्ठ म्हणाले," हां महर्षी ! महाराजा प्रमाणे आमची देखील हीच
इच्छा आहे की आपण इथून जाऊ नये." त्यावर महर्षी
म्हणाले ," खरे सांगायचे तर आमची पण इथून जाण्याची
नाहीये. कारण इथं राहिल्याने आम्हाला आपले नि श्रीरामाचे नित्य दर्शन घडत राहील. परंतु आपल्याला तर
माहीत आहे की आता आमची जाण्याची वेळ झाली आहे
तेव्हा महाराजांची आपण समजून काढून आम्हाला इथून
जाण्याची परवानगी मिळावी. कृपा करून आमचे एवढे
काम कराच तुम्ही !" जेव्हा महाजांची परवानगी मागण्यांसाठी ते दोघेजण महाराजा पाशी पोहोचले. नि महाराजा समोर आपली इच्छा प्रगट केली .तेव्हा महाराज
दशरथ म्हणाले ," मुनींवर , आमची इच्छा नाही की आपण
आम्हाला सोडून जावे. कारण आपल्यामुळेच आज रघुकुलची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. म्हणून माझी इच्छा आहे की आपण अयोध्येला सोडून कोठेही जाऊ नये. आमच्या कडून काही चुकलं असेल तर मोठ्या उदार मनाने आम्हाला क्षमा करावी. आणि खरे सांगायचे तर मला नि माझ्या पूर्ण परिवाराला आपल्या आशिर्वादाची फार गरज आहे. ही अयोध्या आता आपलीच आहे, तेव्हा आपण आपल्या अयोध्येला सोडून कोठेही जाऊ नका ." त्यावर महर्षी म्हणाले," महाराज , आपण आम्हाला निश्चित मोहपाश मध्ये अडकवू पाहत आहात. परंतु आम्हांला इथं थांबून चालणार नाही. कारण आमचं इथले कार्य संपले आहे . आता या पुढील कार्य करण्यासाठी आम्हाला इथून जाणे गरजेचे आहे. आपण आमची अडचण समजून घ्यावी. अशी मी आपणास प्रार्थना करत आहे." त्यावर महाराज दशरथ म्हणाले ," महर्षी , आपल्या सारख्या महाज्ञानी मुनींवरांनी असे म्हटलं  तर आमच्या सारख्या सामान्य माणसांनी काय करावे बरे ? आपण तर महान विभूती आहात. म्हणून तर आमचे पूर्वज महाराज त्रिशंकू साठी  अंतरिक्ष मध्ये नवीन स्वर्ग निर्माण केले होते. हे आम्ही कसे विसरू बरे ?" महर्षी म्हणाले, " महाराज आपण निश्चल प्रेम भावाने आम्हाला मोहजाळ मध्ये अडकवू पाहताय नि आमची उगाचच प्रशंसा करत आहात. परंतु आपल्याला माहीत असेल की जेव्हा मेनका देवेंद्राची आज्ञा घेऊन आमचे तपोभंग करायला आली होती, तेव्हा आम्हाला आमच्या तपोबल आणि सारी सिद्धी प्राप्त झाली होती. त्यामुळे आमच्यात अहंकार आला होता. मेनकाच्या शरीराला पाहून आमच्यात मोहमाया उत्पन्न झाली. त्यामुळे झाले काय मी मेनकेचा हात पकडताच माझ्या साऱ्या सिध्दी शीण झाल्या. राजन माया फार दगाबाज आहे. तेव्हा अश्या प्रसंगी फार जपून पावले उचलली पाहिजेत. अन्यता पश्चात्ताप करण्याची पाळी येईल आमच्यावर." असे म्हणत असतानाच त्याना मेनकाने त्यांचे तपोभंग कसे केले ते आठवले. मी तपस्या करत असताना मला अहंकार झाला होता की माझ्या सारखा दुसरा कोणीही तपस्वी नाहीये. इंद्रदेवाने माझी तपोभंग करण्यासाठी मेनका अप्सरेला पृथ्वीवर पाठविले. मी ध्यान मे लिन असताना मेनका ने नृत्य करून माझी ध्यान भंग केले. मी डोळे उघडून मेनका कडे पाहिले असता तिच्या शरीरावर मोहित झालो. आणि तिचा हात पकडला. त्याच क्षणी माझ्या साऱ्या शक्ती शीण पावल्या. म्हणून महाराज फार कठीण आहेत ह्या साऱ्या गोष्टी ! आम्ही स्वतः मायेच्या जाळ्यात अडकलो होतो. आमच्यात अहंकार निर्माण झाला होता. इतकेच नाही तर देवतुल्य महर्षी वशिष्ठ ज्यांची देव सुध्दा गुण गातात. त्यांच्याशी वैर करण्याची मुर्खता आम्ही करून बसलो. पण लौकरच त्या मोहजाल म्हणून बाहेर पडलो. परंतु आज सुध्दा आपला आग्रह पुन्हा त्याच मोहजाल मध्ये अडकवू पाहतो आहे असे वाटते." त्यावर महाराज दशरथ म्हणाले ," नाही मुनींवर आमचे कोणतेही मोहजाळ नाहीये. आम्ही केवळ आपल्या श्री चरणांची पूजा करू इच्छितोय."
    " महाराज हीच तर त्या मोहजालचे मूळ आहे. शास्त्र
सांगते की मनुष्याने आपले सांसारिक सारे कर्म पूर्ण केल्याच्या नंतर पुत्र, पत्नी या सर्व माया बंधनाचा त्याग
करून अध्यामिक कडे वळायला हवं. आणि वेळ जर चुकली तर त्याला मृत्यूच्या वेळी त्याची चेतना जागी होईल. परंतु त्यावेळी त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. म्हणून महाराज आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्यावी."
     तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले," महर्षी आपण इथं राहिल्याने चारही दिशानी प्रकाश पसरला आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला अडवू पाहत होतो. परंतु समुद्र आणि नदी ह्यांना आपण वाहण्या पासून रोखणे योग्य नाहीये. म्हणून महाराज महर्षी ना आता इथून जाण्याची परवानगी देणे आवश्यक आहे."
  " आपण दोन्ही गुरुजन आहात. तेव्हा आपल्या आज्ञेच्या
बाहेर मी जाऊ शकत नाही. म्हणून गुरुदेव आपण आर्यसुमन्त ला सांगून महर्षीची पाठवणी करा." त्यानंतर
आर्यसुमन्त ने महर्षींची जाण्याची सारी व्यवस्था केली.

    महाराज दशरथ आपल्या शयनकक्षेत असतात. मात्र
त्यांच्या कानात महर्षी विश्वमित्रांचे शब्द पडतात की मनुष्याने सांसारिक बंधनातून स्वत:ला मुक्त करायला हवे.
अर्थात मोहमायाचा त्याग करून अध्यामिक विषयांकडे
वळले पाहिजे. आणि परमार्थ साधायला पाहिजे. त्यासाठी
वेळीच चेतना जागली पाहिजे..नाहीतर म्हातारणी ती चेतना जागतेच परंतु त्यावेळी योग्य वेळ निघून गेलेली
असते. म्हणजे याचा अर्थ मला सुध्दा संसार त्यागून ह्या
मोहमायातुन बाहेर पडायला हवे आहे. असा विचार मनात
येताच महाराज दशरथ स्वतः गुरुदेवांच्या आश्रमात
जायला निघतात. आणि जसे ते आश्रम मध्ये पोहोचतात.
तसे त्याना पाहून आश्रमातील परिचारिका पळतच गुरुदेवांच्या कडे जाऊन महाराज दशरथ आल्याची खबर
देतात. महर्षी वशिष्ठ समजून जातात की ज्या अर्थी महाराज स्वतःच आश्रमात आले आहेत तर नक्कीच तशी
काहीतरी समस्या असणार. इतका विचार होईपर्यंत महाराज दशरथ महर्षी वशिष्ठ जिथे बसले होते तिथे जाऊन पोहोचले. नि त्यांनी महर्षी वशिष्ठाना प्रणाम करत
म्हणाले," गुरुदेव मी आपल्याकडे एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायला आलोय. जर आपले सारे नित्यकाम आटोपले असतील तर मला आपल्या
बरोबर  एकांत मध्ये बोलायचे आहे." असे म्हणताच महर्षी
वशिष्ठ म्हणाले ," अवश्य !" असे म्हणून त्यांनी लगेच आपल्या हातातील काम बाजूला ठेवून दिले. आणि महाराजा सोबत एकांत मध्ये जाऊन बसतात. तेव्हा महाराज दशरथ म्हणाले," असे म्हणतात की ज्यांच्यावर गुरुदेवांची कृपादृष्टी असते त्यांची कामे सहजपणे होऊन जातात. मी जीवनात जे काही प्राप्त केले आहे ते आपल्या चरणांच्या पूजेमुळे प्राप्त झालं आहे .आता फक्त एकच इच्छा आहे की  राहिलेले शेष कार्य सुध्दा आपल्या कृपेनेच ते पूर्ण व्हावे बस फक्त इतकीच प्रार्थना आहे आपल्या चरणी !" तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले," हे राजन मी आपल्या नम्रतेवर अति प्रसन्न झालो आहे बोला काय समस्या आहे? " तेव्हा महाराज दशरथ म्हणाले ," मला वाटतं की रामाला आता राज गादीवर बसविण्यास काहीच
हरकत नाही.कारण राम आता सर्व प्रकारे योग्य आहे. रामाचा  आदर केवळ त्याचे मित्रच करीत नाहीतर त्याचे
वैरी राजा सुध्दा करतात. शिवाय अयोध्येतील प्रजेला राम इतका प्रिय आहे जितका अन्य कोणी नाही. म्हणून मी आता राज्याचा सारा कारभार राम वर सोपवू इच्छितोय. तेव्हा गुरुदेव आपण  रामाचा राज्यभिषेक आपल्या शुभहस्ते व्हावा अशी माझी इच्छा आहे नि लालसा पण आहे. मग हे जीवन राहिले किंवा नाही राहिले तरी मला त्याची अजिबात पर्वा राहणार नाहीये."
     " महाराज मी आपल्या व्यक्तव्यावर अति प्रसन्न झालो
आहे. शिवाय मी आपल्या मताशी सहमत आहे. परंतु यासाठी आपल्याला राज्यसभेचे आयोजन करावे लागेल.
आणि समस्त राजा , मंत्री , सामंताना आमंत्रित करून
त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवावा लागेल नि त्यांच्या संमती
नुसार पुढील निर्णय घ्यावा लागेल. कारण आपल्या कुळाची हीच परंपरा आहे. म्हणून आपल्याला देखील त्या
परंपरे नुसार कार्य करावे लागेल." महाराज दशरथानी लगेच राज्यसभेचे आयोजन करून समस्त  मंत्रीगण
सामंत या सर्वांना आमंत्रित करण्यात आले. महाराज जमलेल्या सर्व सामंताना नि मंत्रीगणाना अभिवादन करून
म्हणाले की आजपर्यंत आमच्या कुळाच्या परंपरेनुसार मी
सदैव आपल्या प्रजेच्या हिताचा विचार करूनच राज्य कारभार केला आहे. परंतु जसे माझे पूर्वज करत आले आहेत त्या प्रमाणे मी देखील वनात जाऊन तपसाधना
करण्याचा निश्चित केले आहे. म्हणून राज्याचा सारा भार
आपल्या जेष्ठ पुत्र रामाच्या स्वाधीन करुन वनात जाऊ
इच्छितोय. तेव्हा मी आपल्या पुढे हा प्रस्ताव ठेवत आहे.
आपण माझ्या मताशी सहमत असल्यास तशी संमती
दर्शवून मला धन्य करावे. जर माझ्या ह्या प्रस्तावात काही
त्रुटी असतील तर स्पष्टपणे तसे जाहीर करावे." असे
म्हणताच एकजण उठून उभा राहत म्हणाला ," महाराज
आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत. तेवढ्यात दुसरा
तिसरा आणि त्यानंतर सभेतील सर्वजण एकदम म्हणाले,
" आम्ही आपल्या मताचे समर्थन करत आहोत." तेव्हा
महाराज खुश तर झाले. परंतु प्रजेच्या मनातील भाव जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रजेला विचारले की माझा
प्रस्ताव आपण का स्वीकार केला ? केवळ मी सांगतोय
म्हणून तर नव्हे ना ? आपण राम ला आपला राजा का
स्वीकारलात हे मी आपल्या कडून जाणून घेऊ इच्छितोय."
तेव्हा एकजण उठून उभा राहत म्हणाला," राम सत्यवादी
आहे, शीलवान आहे." एकाचे बोलणे संपते न संपते तसा दुसरा म्हणाला की राम कोमल स्वभाचे आहेत. आणि ते लोकांचे दुःख सुख समजतात आणि लोकांना धीर पण देतात. तसा तिसरा उठून उभा राहत म्हणाला, शत्रुशी लढण्याची त्यांच्यात समर्थता आहे. ऋषीमुनींचा ते आदर करतात. त्यांच्या मध्ये एक विशेष गुण आहे आणि तो म्हणजे प्रजेला ते आपल्या समान मानतात. कोणाशी मित्रता करण्यात ते संकोच करत नाही. हे सर्व उत्तम राजा
असल्याचे गुण आहेत. " तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले,
राम मध्ये विशेष गुण आहेत. यावरूनच प्रजा पालक
नि हितकर्ता राजा असल्याचे सिद्ध होते. आणि म्हणूनच
राम राजा होण्यास सर्व परीने योग्य आहे. राज्यसभेतील
सर्व मान्यवरांचे हेच मत आहे. तेव्हा महाराज राम ला राज्यसभेत बोलवून आपल्या मत त्यांच्या समोर व्यक्त करावे." तेव्हा महाराज आर्यसुमन्त ला आदेश देतात की जा नि रामाला दरबारात बोलवून आण." आर्यसुमन्त म्हणाला, " जशी आपली आज्ञा !" असे संबोधून ते तेथून निघून गेले. आणि जसा संदेश श्रीरामाला दिला तेव्हा श्रीरामानी विचारले ," आम्हाला राज्यसभेत बोलविले गेले पण का ?" तेव्हा दूत म्हणाला ," ते तिथंच गेल्यानंतर कळेल." तेव्हा श्रीरामाना प्रश्न पडला की पिताश्रीनी राज्यसभेत बोलविले याचा अर्थ आपल्याकडून नक्कीच काहीतरी चूक झाली असावी." तेव्हा सीता म्हणाली ," नाही आर्य आपल्या कडून कदापि चूक होणार नाही. काही विशेष कार्य असावे." तेव्हा दूत म्हणाला ," हां कुमार, महाराजांनी राज्यसभा भरविली आहे. आणि त्या राज्यसभे मध्ये उपप्रदेशातील सामंत, मंत्रीगण, गुरुजण आणि प्रजेतील काही प्रतिनिधी राज्यसभे मध्ये उपस्थिती आहेत. काही विशेष कार्यासाठी आपणास राज्यसभेत बोलविले आहे." आणि थोड्याच वेळात श्रीराम राज्यसभेत उपस्थित होतात नि सर्व प्रथम महर्षी वशिष्ठाना प्रणाम करतात नि मग महाराज दशरथांचे चरणस्पर्श करून उभे राहत म्हणाले ," मी आपला पुत्र राम आपल्या श्री चरणांना वंदन करतो. मी आपल्या आदेशानुसार राज्यसभेत उपस्थित झालो आहे. तेव्हा आपण आम्हाला आज्ञा करावी आम्ही आपल्या आज्ञाचे पालन अवश्य करू ." तेव्हा महाराज दशरथानी गुरुदेवांना विनंती केली तसे गुरुदेव महर्षी वशिष्ठ म्हणाले ," राम , सामंत, मंत्रीगण, आणि प्रजेतील प्रतिनिधी च्या संमती ने महाराजांनी तुला युवराज घोषित करून राज्यभिषेक करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तुझ्या मध्ये ते सर्वगुण आहेत जे एका उत्तम राजा होण्यासाठी आवश्यक आहेत. शिवाय तुझ्या मध्ये वीरता असल्याने शत्रूचे भय उरले नाही. तेव्हा युवराज पद स्वीकारून राज्यकारभार सांभाळावा." तेव्हा श्रीराम म्हणाले की पूज्यवर मी दृष्टता करतोय म्हणून मला क्षमा असावी. मी युवराज पद स्वीकारू शकत नाही. कारण पिताश्रींची चारही दिशांनी कीर्ती पसरली आहे. अश्या महान राजाच्या श्रीचरणावर मला स्वतःचा प्राण जरी अर्पण करायला लागला तरी मी स्वतःला धन्य समजेन. तेव्हा पिताश्री असताना मी त्यांची जागा घेईन असे आपल्याला वाटलंच कसे ? आपण असे करून माझ्यावर फार अन्याय केला आहे. कदाचित त्यात आपला काही दोष नाही. माझ्या कडून काहीतरी चुकले असावे. म्हणून आपण असा विचार केला आहे." तेव्हा महाराज दशरथ म्हणाले ," त्यात त्यांचा काही दोष नाही. ही माझी इच्छा आहे. कारण माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी सारे सुख चैन भोगले आहेत, अनेक यज्ञ केलेत.अनेक लढाया केल्या. आणि जोपर्यंत राजा बनून राहीन तोपर्यंत प्रजेच्या ऋणातून मुक्त होणार नाही. मी आता म्हातारा झालो आहे. राज्याचा सारा कारभार तुझ्यावर सोपवून विश्राम करू इच्छितोय." तेव्हा श्रीराम म्हणाले ," प्रजेची सेवा करण्यासाठी मला राजा बनण्याची गरज नाहीये. मी आपल्या श्रीचरणाशी बसून राज्याचा कारभार सांभाळू
शकतो. पिताश्री मला आपल्या चरणापासून वंचित करू नका." तेव्हा महाराज दशरथ म्हणाले ," राम असे केवळ
तूच बोलू शकतोस. कारण तू मर्यादा पुरुषोत्तम आहेस. परंतु पित्याच्या मोहा मध्ये तू आपल्या पित्याचे हित पण विसरलास. पुत्र पित्ताचा मित्र पण असतो. तू पुत्राचा
मोहामध्ये मित्रता विसरलास. आपल्या पित्याचे कल्याण
कसे होईल याचा विचार केला नाहीस." तेव्हा श्रीराम म्हणाले ," प्रभू आपण असे कसे म्हणू शकता मी आपल्या
कल्याणाचा विचार केला नाही." तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले ," या प्रश्नाचे उत्तर मी देतो राम." तेव्हा श्रीराम
म्हणाले ," सांगा गुरुदेव." महर्षी वशिष्ठ म्हणाले ," मनुष्यच्या जीवनात चार गोष्टींची गरज असते. धर्म, अर्थ, मोक्ष, आणि साधना  सफल झाल्यानंतर अंतिम कार्य असते राज्य त्यागून आध्यात्मिक साधना करावी नि आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा यासाठी शेष करणे अति आवश्यक आहे. कारण  हे शरीर सोडून जायचे आहे. म्हणून सर्व बंधनातून मुक्त होणे आवश्यक आहे. नाहीतर एक दिवस मृत्यू त्याला  सर्व बंधनातून मुक्त करेल. म्हणून मृत्यू सर्व बंधनातून मुक्त करण्या अगोदर मनुष्याने सर्व बधनांचा त्याग करून आपला आत्मा परम्यात्म्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करावा लागतो. तुझी इच्छा नाही का? आपल्या पिताश्रीनी सुध्दा स्वर्ग प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नये का ? राम तू आपल्या पित्याच्या पायातील साखळी का बनू इच्छित आहेस का ? या क्षणी पुत्र मोह बलवान आहे. परंतु या क्षणी पुत्र बनून निर्णय घेऊ नकोस. या क्षणी तुझे कर्तव्य हेच आहे की आपल्या पित्याच्या स्वर्ग प्राप्तीच्या आड येऊ नये." त्यावर श्रीराम म्हणाले ," गुरुदेव , जीवनामध्ये कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते योग्य निर्णय घेण्यास व्यक्तीला जमत नाही माझीही तशीच अवस्था झाली आहे. तेव्हा महाराज दशरथ आपल्या आसनावरून उठून श्रीरामपाशी येतात नि श्रीरामाना उद्देशून म्हणाले," राम , गुरुदेव जे सांगतात ते ऐकावे. ह्या क्षणी तेच कर्तव्य आहे. आणि माझे मत म्हणशील तर गुरुदेवाची आज्ञा मानून युवराज पदाचा स्वीकार कर आणि माझीही तशीच आज्ञा आहे नि विनंती सुध्दा !" तेव्हा श्रीराम गहिवरून म्हणाले," नाही महाराज असं बोलू नका. मी आपला पुत्र सुद्धा आहे आणि प्रजा सुध्दा आहे. आपण मला जी आज्ञा कराल त्या आज्ञाचे पालन मी अवश्य करेन." असे म्हणताच सर्व राज्यसभा मोठ्या ने ओरडली की राजा श्रीरामचंद्र की जय !" तेव्हा महाराज दशरथ प्रभू श्रीराम याना अलिंंगन देऊन मग म्हणाले ," राम , पित्या समोर पुत्राची अशी जयजयकार पाहिल्या नंतर एका पित्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे." असे म्हणून महाराज दशरथ म्हणाले की गुरुदेव मला वाटत की आता रामाचा राज्यभिषेक करण्यात उशीर लावण्यात काहीच अर्थ नाहीये." तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले," महाराज श्रीरामाचा राज्यभिषेक करण्याचे घोषित कारावे. प्रजाजन म्हणाले, महाराज आम्ही राज्यभिषेक सोहळा पाहूनच जाण्याचे आम्ही निश्चित केले आहे." तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले," महाराज उद्याचा दिवशी फार चांगला शुभ मुहूर्त आहे. तेव्हा उद्याच राज्यभिषेक करावा." तेव्हा श्रीराम म्हणाले,
   " इतक्या लौकर ? कसं शक्य आहे गुरुदेव ? कारण
भरत आणि शत्रुघ्न पण इथं नाही आहेत." तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले की कुमार भरत, शत्रुघ्न इतक्या लौकर येणार नाहीत तेव्हा हा कार्यक्रम करून घ्यावा."
तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले ," राम दुसरा मुहूर्त एवढ्यात
नाहीये. तेव्हा उद्याचा मुहूर्त सोडू नये."
    " राम गुरुदेव जे सांगतात ते सर्वपरीने योग्य आहे. तेव्हा राज्यभिषेकाला विलंब नको." असे म्हणून महाराज दशरथ आर्यसुमन्त ला आदेश देतात की उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची सारी जबाबदारी तुझी आहे." तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले," महाराज आपल्या आज्ञाचे पालन
अवश्य केले जाईल."

क्रमशः


टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..