गोदा गेली नि म्हाळसा बाई आंत आल्या. त्यांना पाहून
शहाजी राजांना आश्चर्याचा धक्का बसला. इतक्यात जिजाबाई
ची त्यांच्या वर नजर गेली आपल्या आऊ साहेबांना पाहून त्यांचे
मन एकदम भरून आले. त्या पळतच आपल्या आऊ साहेबांना
बिलगल्या. त्यानंतर म्हाळसा बाई दोन्ही हात जोडून जावई
पाशी जाऊन म्हणाल्या की, राजे आम्हाला माफ करा. आमच्या
स्वारी च्या चुकीची शिक्षा आमच्या जिजाना देवू नका."
पुढे
शहाजी राजांना कसं तरीच वाटलं क्षणभर काय बोलावे ते
सुचलच नाही. पण नंतर म्हणाले," हे काय बोलताय तुम्ही
भलतच. आम्ही जिजाबाईना शिक्षा का बरं देवू ? जिजाबाई
आता तुम्हीच सांगा तुमच्या आऊ साहेबांना खरं काय आहे ते."
म्हाळसा बाई म्हणाल्या," नाही म्हणजे तुम्ही आता म्हणाला
होती उमाबाई जवळ आमची जिजाची तक्रार करणार आहे
म्हणून. नाही म्हणजे आम्ही अगोदरच इथ आलो जेव्हा तुम्ही
जिजाना दम देत होता. पण असं आम्हाला आंत येणे रास्त
वाटलं नाही म्हणून आम्ही गोदा ला वर्दी द्यायला आंत पाठविलं." त्यावर शहाजी राजे हसून म्हणाले," ते होय ते
आमचे रागवणे खोटे खोटे होते, हो की नाही हो जिजाबाई ."
" हां आऊ साहेब स्वारी काय आमच्यावर खरोखरचे रागवत
नव्हते. "
" म्हणजे आम्ही ऐकलं ते खोटं का ?"
" तुम्ही जे ऐकलंच ते पूर्ण खरे ही नाही आणि खोटे ही नाही." शहाजी राजे म्हणाले
" म्हणजे आम्ही नाही समजलो." म्हाळसा बाई
" आम्ही जिजाबाई वर रागवलो पण कशासाठी तर आम्ही
आणलेला गजरा त्यांनी आपल्या केंसात माळला नाही म्हणून."
" जिजा राजांनी इतका प्रेमाने आणलेला गजरा का बरं नाही
माळला ?"
" आऊ साहेब आम्हाला त्या फुलांच्या वासाचा खूपच
त्रास होत होता म्हणून आम्ही ती पुडी सोडून ही पाहिला नाही. " म्हणून आम्ही आऊ साहेबाजवळ त्यांच्या लाडक्या
सूनबाईंची तक्रार करणार होतो ."
" आम्ही देखील सांगितले असते सासूबाईंना आणि आऊ
साहेब आपल्याला ठाऊक आहे, सासूबाई नेहमी आमचीच
नि बाजू घेतात. "
" हो मग तुम्हीच सांगा की तुम्ही कोणाची बाजू घ्याल ?"
" त्या आमच्या आऊ साहेब आहेत. त्या आमचीच बाजू घेणार."
" हो का? मग आमच्या कुणीच नाहीत का त्या ?"
" हो आहेत ना , पण आऊ साहेब कोणी तुमच्या पाया पडायला आलं नाही ते." असे बोलून त्या गालातल्या गालात हसल्या. शहाजी राजांना जाणवले की आपण सासूबाई च्या पायी नाही पडलो. तसे खाली वाकले नि त्यांनी म्हाळसा बाईंचे चरण स्पर्श केले. तेव्हा म्हाळसा बाईंनी आशीर्वाद देत म्हंटले की, सुखी रहा." असे म्हणून त्या जिजाबाई कडे पाहत म्हणाल्या," आम्हाला खूप बरं वाटलं तुम्हा दोघांस खुश पाहून." शहाजी राजे उठून उभे रहात म्हणाले,
" असं नाही....आता सांगा तुम्ही कुणाच्या बाजूने."
" आम्ही... बाळाच्या बाजूने अर्थात तुम्हा दोघांच्या बाजूने."
तसे दोघेही खुश होतात.
सिंदखेड
लखुजी राजांना बादशहा कडून खलीता आलेला असतो.
लखुजी राजांनी आपल्या धाकट्या बंधूंना तो खलीता वाचायला
सांगितला.जगदेव रावानी तो खालीता वाचला. त्यात बादशहा
ने घडलेल्या घटने विषयी अफसोस जाहीर केला होता. शिवाय
असं ही लिहिले होते की सल्तनत साठी आपली आवश्यकता
आहे. शाही इमान के साथ...." तेव्हा लखुजी राजे मध्येच म्हणाले," पाहिलेस जगदेवा त्यांना अफासोस वगैरे काही नसतं मूळ मुद्दा खाली लिहिलेल्या ओळीत आहे. आपण कुठं दुसरी कडे जाऊ नये म्हणून शाही इमान के साथ बोलवत आहेत.
त्यांना फक्त आपला वापर करायचा आहे. बस्स!"
" मग आता तुम्ही काय करायचं ठरवलं ?"
" आम्ही आता तेच करणार जे अगोदर ठरविलं आहे."
" म्हणजे मोंगलाकडे जाणे पक्के तर !"
वेरूळ भोसले गढी
जिजाबाई शहाजी राजांना विचारतात की , मग पुढे काय
करायचं ठरविलं आहे ? म्हणजे आम्हाला असं म्हणालात की
आबा साहेबांनी ठरवलं आहे, तसेच होणार असे बोलून गप्प
झालात. आबा साहेबांनी काय ठरविलं आहे ? ते तर सांगा."
तेव्हा शहाजी राजांनी आबा साहेब पुन्हा मोगलाईत जाणार
असल्याचे सांगितले. जिजाबाईंना वाटले की आबा साहेबांना
स्वारी राग तर नसेल ना ? बहुधा तेच कारण असावे. पण ते
खरे आहे का खोटे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी विचारले,
" तुमच्या वर रागवू न तर गेले नसतील ना ?" त्यावर शहाजी
राजे उद्गारले," छे छे छ ! ते आमच्या वर का रागवतील .
ते निजामशाहीवर नाराज आहेत. कारण हत्ती स्वतःहून
बिथरला नाही तर करवला गेला असे आम्हास वाटते.आणि
आबा साहेबांना ही तसेच वाटत असावे. किंव्हा कौटुंबिक अथवा वयक्तिक कारण नसून राजकीय कारण असावे.."
" मग तुमचा चेहरा का उतरला ?" जिजाबाईनी विचारले.
त्यावर शहाजी राजे म्हणाले," आम्हाला काय वाटतं माहितेय
अशी सारखी सारखी जर बाजू बदलत राहीलो आपण तर विश्वासवार्ता गमावलीं जाईल. मग विश्वास कोण कसा ठेवणार आपल्या वर ?" शहाजी राजांचे म्हणणे जिजाबाईंना पटले.
मग हे आबा साहेबांना कळत नसेल का हे असा ही प्रश्न त्यांना
पडला ? म्हणून त्यांनी शहाजी राजांना विचारले की , तुम्हाला
काय वाटते ? म्हणजे काय कारण असेल ह्याला ?" शहाजी
राजे म्हणाले," आम्हाला वाटतं की, सिंदखेड हे सीमा रेषेवर आहे, म्हणून त्यांना ते सोयीस्कर वाटले असावे." तसा लगेच
जिजाबाईंनी प्रश्न केला की, " पण तुम्ही तर म्हणताय मोगलाईत जाऊन काहीच फायदा नाही. तिकडे एकमेकांवर शस्त्र उचलली आहेत. शहाजान ने जहांगीरशी बंड पुकारले आहे." शहाजी राजे उद्गारले," कदाचित त्यांना मोगलाई पेक्षा निजामशाहीत जास्त नुकसान आहे, असं वाटत असावं."
" नुकसान ? मला समजले नाही."
" नाहीतर मला सांगा तिकडे आजूबाजूला भयानक सरदार असताना तिकडे का गेले असते."
" हुं तुमचं म्हणणे पण रास्त आहे. आता सारे काही शंभू
महादेवाच्या हाती."
सोयराबाईंनी म्हाळसा बाईना विचारले की तुम्हाला तर
सर्व कळलेच असेल ना ?"
" कशाबद्दल बोलत आहात तुम्ही ?"
" तुम्ही आणि आम्ही आता विरुध्द झालो."
" नाही सोयराबाई राजकारण वेगळे नि कौटुंबिक संबंध
वेगळे. अहो लहानपणा पासून आम्ही हेच ऐकत आलो नि
हेच पाहत आलो. अहो कोणताही सरदार, अथवा मनसबदार वजीरे आलम आणि बादशहाला सुध्दा हेच लागू पडते.
वजीरे आलम सोयरिक जुळवतात. त्यांच्या वार्ता ऐकल्या
असतीलच."
" नाही आम्ही ऐकलं कारण आम्ही एवढे थोर नाही ते सारं
तुम्ही ऐकलं असणार." इतक्यात तिथं जिजाबाई आल्या नि
म्हणाल्या," काकी साहेब, हे तुम्ही आऊ साहेबांना का ऐकवताय?"
" अजून ऐकवलं कुठं ? तुमच्या आऊ साहेब वजीरे आलम
च्या मोठमोठ्या गोष्टी सांगताहेत म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही
एवढे थोर नाहीये." असे बोलून त्या म्हाळसा बाई कडे रागाने
पाहत म्हणाल्या," आमच्या थोरल्या लेकाला तुमच्या स्वारी ने
ठार मारले आहे."
" हो मारले ना, पण का मारले ? तुमच्या त्याच थोरल्या लेकाने
आमच्या थोरल्या लेकाला ठार मारले. हे का विसरता तुम्ही ? संभाजी राजेंनी आमच्या लेकाला मारले नसते तर आमच्या
स्वारी ने तुमच्या लेकाला ही मारले नसते. पण जे घडू नये
ते घडून गेले. आता तेच तेच पुन्हा उगाळून काही होणार आहे
का ? नाही ना ? आपण दोघींनी पण आपापला पुत्र गमावला
आहे, आणि दोघींचे दुःख ही समान आहे. पण तेच तेच काढत
राहिलो ते पुढची घडी नीट कशी बसणार, तुम्हीच सांगा ना ?"
" तुमचं ठीक आहे हो, पण आमचं काय ?"
" आमचं काय म्हणजे ?" जिजाबाईंनीं न समजून प्रश्न केला.
तेव्हा म्हाळसा बाईंनी जिजाबाई कडे पाहत म्हटले की " जिजा त्यांना मध्ये अडवू नका बोलू दे त्यांना." तेव्हा सोयराबाई म्हणाल्या, " संभाजी राजेंची मनसबदारी आता कुणाला मिळेल ? का बादशहा च्या दरबारी जमा होईल , का ह्यांना भेटेल ?" जिजाबाई कडे त्यांचा इशारा होता. म्हणून जिजाबाईंनी विचारले की, " ह्यांना म्हणजे स्वारी ना ? अहो काकी साहेब तुम्ही असं म्हणता. आधी शांत व्हा पाहू !" तश्या
सोयरा बाई चिडून म्हणाल्या," कशी शांत होऊ सांगा ना ? मनसबदारी मिळेल की नाही याची काहीच शाश्वती नाही. म्हणून आम्हाला चिंता लागली आहे की जर मनसबदारी बादशहा च्या दरबारात जमा झाली तर बाकीच्या आमच्या सात मुलांनी करायचं काय ? सांगा ना ?" असे म्हणून त्या तेथून निघून गेल्या. तश्या म्हाळसा बाई जिजाबाई जवळ आल्या नि म्हणाल्या," जिजा, आत्ता त्या ज्या काही म्हणाल्या ते बोचणारे जरूर आहे, पण त्यात चुकीचे काही नाही. त्यांची चिंता साहजिकच आहे." आता जिजाबाई च्या ही ध्यानात आलं की
काकी साहेब चिडचिड का करत आहेत. म्हणून त्या आपल्या
आऊ साहेबांना म्हणाल्या की," आऊ साहेब, आता कुठं आमच्या लक्षात येऊ लागले आहे. काकी साहेबांना तुम्ही समजून घेतलात. तुम्ही आबा साहेबांच्या कारभारात लक्ष घालत असल्यामुळे तुम्हाला त्याची चांगली जान आहे. तुम्ही समोरच्या चे म्हणणे रयत म्हणून समजून घेता असे आम्हाला कधी जमणार असे ?" त्यावर म्हाळसा बाई म्हणाल्या," जिजा तुमच्यात ती उपजत आहे."जिजाबाई उत्तरल्या," हो आहे, पण आपल्या इतकी नाही ना झाली अजून."
" होईल. तोही होईल.जरा धीर धरा."
दौलताबाद बादशहा हजरत चे दालन
बादशहा हजरत दोन्ही वजीरे आलम ना आपल्या दरबारी बोलवून घेतले. तेव्हा दोन्ही वजीर आपापल्या परीने बादशहा
सांगू इच्छित असतात की लखुजी राजे निजामशाही सोडून
पुन्हा मोगलाईत गेले. पण का गेले ते मात्र कुणीही सांगत नाहीये. वजीरे मी आण राजू नेहमी आग लावण्याचे चे काम
करतो. आता मराठ्या विरुध्द तो बादशहाचे कान भरत आहे.
" गस्ताकी माफ हो हुजूर हम भी यही फरमा रहे थे हुजूर !" मी आण राजू म्हणाला.
" लखुजी राजे मोगलाईत जायेंगे यह आप ने कहा था ।"
वजीरे आलम मालिक अंबर म्हणाला.
" हमे याद है मालिक अंबर जी, लेकिन हुजूर की परेशानी
बढी है , इसलिए हम कह रहे है, कुछ दिन पहले भी वो छोड़कर
चले गए थे। उनपर हम अपना कीमती वक्त क्यों जाया करेंगे ? मराठा बार्गीरोंके ऊपर यह तख्त और हमारे रियासत के मसले ना कभी ना मुंहताज थे ना कभी रहेंगे."
मुहताज की बात मत करो वजीरे आलम मी आण राजू ! मुहताज़ बारा दिन का बच्चा नहीं रहता, अपने मां से जुदा होकर दम नहीं तोड़ता बल्कि जिंदगी उसे सबकुछ सिखाती है। हां तो बात हो रही है लखुजी राजे की ।" तसा बादशहा संतापाने
म्हणाला, " जज्बात को काबू में रखो । लखुजी राजे चले गए है। रियासत में यह सब होता ही रहता है, अपने भी ऐसा कदम
उठाया होगा बात सिर्फ यह होनी चाहिए इस इस वजह से
हमारे रियासत पर और कॉम पर क्या असर होगा ?"
वेरूळ भोसले गढी
म्हाळसा बाई आणि उमाबाई गप्पागोष्टी करत होत्या. बोलता
बोलता त्या मध्येच थांबल्या नि विचार करू लागल्या म्हणून
उमाबाई ने विचारले की, कसला विचार करता आत्याबाई ?"
" आम्ही उद्या निघायचं म्हणत होतो. म्हणजे तिकडची वार्ता
ऐकल्या पासून मनच थाऱ्यावर नाही बघा."
" आम्ही काय म्हणतो अजून एक दिवस थांबा. म्हणजे कसं
आहे उद्याच निघालात तर जिजाबाईंना वाईट वाटेल. त्या पेक्षा
उद्या निघतो असे म्हणून पर्वा निघा. म्हणजे जिजाबाईंना देखील
वाईट वाटणार नाही."
" आमच्या अगोदर तुमच्या मनात जिजांचा विचार आला.
आमच्या जीजांची फार काळजी घेता तुम्ही. आणि आम्हाला
ह्याची खात्री आहे, म्हणूनच आम्ही जिजाच्या बाबतीत निर्धास्त असतो."
" खरं सांगू आत्याबाई तुम्ही आलात म्हणून आम्हाला लहान
होता आलं. घरात कोणीतरी मोठं माणूस आलं की थोडासा
विसावा मिळतो. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असता दमछाक होत असते आमची. नाही सोसत आता."
" एकदा जबाबदारी सांभाळण्याची सवय झाली की कोणताही लहान व्हायला आवडत नाही, आणि तुम्ही म्हणताय
लहान होता आलं."
" इतरांच आम्हाला माहीत नाही. पण तुमचा जरी विचार केला ना तरी आम्हाला थेट फलटणला जाऊन आल्या सारखे
वाटते. आबा साहेब, आऊ साहेब आठवतात. त्यांच्या जोडीने
आम्हाला वाट दाखविनाऱ्या आम्हाला समजून घेणाऱ्या, आमची समजूत काढणाऱ्या , आम्हाला समजुतीचे बोल ऐकविनाऱ्या, आम्हाला शहाणपण शिकविणाऱ्या आमच्या ह्या आत्याबाई आठवतात.आणि खरे सांगू का ? आम्ही सावरूच
शकलो नसतो. आणि आता आम्ही जे काय करू शकलो हे
केवळ तुमच्या मुळेच."
" उमाबाई हा झाला तुमचा मोठेपणा अथवा असे म्हणा की
आम्ही फक्त निमित्त झालो म्हणून. पण जीवनात अशी काय
वेळ आली की रेणुका मात काही ना काही मार्ग काढतेच बघा.
उबल कोणाची ना कोणाची चाकरी करणारच. आपणच आपल्याला सावरायला हवं."
" बऱ्याचदा आमच्या मनात एक विचार डोकावतो आणि तो
म्हणजे आबा साहेब, मोगलांशी लढताना गेले,आमची स्वारी
आदिलशहा शी लढताना गेली, संभाजी राजे दत्ताजी राजांशी
लढताना ...पुढे त्यांच्या ने बोलवेच ना एकदम भावनाविभोर
झाल्या त्या. तेव्हा म्हाळसा बाई म्हणाल्या," आपलं दुर्दैव
म्हणायचं दुसरं काय ?" त्यावर उमाबाई म्हणाल्या," हे कधी
थांबणारच नाही का ? शंभू महादेव त्यांना बुध्दी देणारच नाही
का ?" त्यावर म्हाळसा बाई म्हणाल्या," त्याने पण काहीतरी विचार केलाच असेल ना ? असे बोलून त्या वात्सल्याने
उमा बाईंच्या डोक्यावरून आपला हात फिरवीतात.
शहाजी राजे जिजाबाईंना विचारतात की तुम्ही आबा साहेबां
चा विचार करताय ना ?" तेव्हा जिजाबाईंनी होकारार्थी मान
डोलावली. तसे ते म्हणाले," खरं तर माझंच चुकलं. तुम्हाला
सांगायला नाही पाहिजे होतं." त्यावर जिजाबाई म्हणाल्या,
" पण ते खोटं नाहीयेना. आम्ही लहानपणापासून पाहत
आलोय. आबा साहेब केव्हाही रयतेचा विचार करतात. कधी
कधी ते मना विरुद्ध पण निर्णय घेतात."
" पण तुम्ही तुमच्या आबा साहेबांचा इतका काय विचार
करताय हे ठाऊक आहे आम्हाला. कारण तुम्हाला त्यांची
काळजी वाटते. आणि आम्हाला हा विषय का नकोय तेही
आम्ही सांगतोय, आम्हाला तुमची काळजी वाटतेय.कारण
तुम्ही स्वतःकडे नीट लक्ष देत नाही आहात."
" तुमचं लक्ष आहे ना, मग झालं तर !"
" आमचं लक्ष ?"
" हो. त्या शिवाय आम्ही स्वतःची काळजी घेत नाही हे
तुम्हाला कळले ?"
" आम्ही तर लक्ष ठेवूच तुमच्यावर. एकवेळ तुमचं स्वतःवर
दुर्लक्ष झालं तरी चालेल. पण आमच्या बाळा कडे अजिबात दुर्लक्ष चालणार नाही आम्हाला "
" बाप रे ! म्हणजे आमच्या वरचे प्रेम कमी झाले म्हणायचं
तर स्वारीचं !"
" छे हो तुमच्या वरचे प्रेम कसं कमी होईल. ते तर उलट वाढतच जाईल."
" खरं ?"
" हो तर !"
" मग ठीक आहे."
" आता मी काय म्हणतो ते नीट ध्यानात घ्या. जहागीर असो,
मनसब असो, वतन असो, तुमचं बाळाकडे अजिबात दुर्लक्ष
होता नये."
" छे छे छे ! तसं आम्ही होऊच देणार नाही.आमचं बाळ
मनसब, वतन या पेक्षा वेगळा विचार करेल. हो ना ?"
दुसऱ्या दिवशी म्हाळसा बाई सिंदखेड जाण्या विषयी जिजाबाई जवळ वार्ता करतात. पण जिजाबाईंना वाटत असते
की आपल्या आऊ ने अजून काही दिवस राहावे. त्यावर त्यांनी
आपल्या लेकीला समजावून सांगितले की तिथे तुमच्या आबा
साहेबांना पण तर आमची गरज आहे, तेव्हा कुठं हो म्हणाल्या.
पण म्हाळसा बाईंचा पाय तेथून निघत नव्हता. त्यांना असं
वाटत होतं की काहीतरी राहिलंय. म्हणजे त्यांना असं वाटतं
होते की लेकीचे हट्ट पुरवायचे वगैरे पण ते त्यांना शक्य नव्हतं.
त्यांना सिंदखेडला जाणे पण जरुरीचे होते. कारण इथं त्या
सर्वांचे रोष पत्करून आल्या होत्या. त्या मागचा उद्देश एकच
होता की आपल्या जावयाने आपल्या वरचा राग आपल्या
लेकी वर काढू नये. दुसरी गोष्ट म्हणजे उमाबाई असल्यामुळे
त्यांना इथं येण्याची हिम्मत झाली. आणि त्यांनी तसे कबूल ही केले. शेवटी जाताना आपल्या लेकीला इतकंच म्हणाल्या की आम्ही इथं असो अथवा नसो पण आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील.
मोहीमे वर जाण्यासाठी बादशहा कडून फर्मान आले. आता
ही गोष्ट जिजाबाईंना सांगायची कशी म्हणून सर्वजण चिंता
मग्न होते. परंतु सोयराबाईचे म्हणणे होते की आज नाहीतर
उद्या कळणारच आहे ना मग आजच कळले तर चांगले आहे
ना ?" त्यावर उमाबाई म्हणाल्या," तुम्हीच किती अस्वस्थ
झालात ते पहा बरं." त्यावर सोयराबाईंनी लगेच उत्तर दिलं
की आमचं कारण वेगळे आहे, मंबाजी राजांना प्रथमच मोहीमे
जाण्याचे फर्मान आलंय." इतक्यात तिथं जिजाबाई आल्या. त्यांना पाहून सर्वजण चिडीचूप झाले. परंतु जिजाबाईंना संशय यायचा तो आलाच. म्हणूनच त्यांनी विचारले की आम्ही आल्यावर सर्वजण गप्प का झाले ? असं काय लपवत आहात
आमच्या पासून ?" उमाबाई काहीतरी थातूरमातूर उत्तर देवून
वेळ मारू नेऊ इच्छित होत्या पण ते काही शक्य झालं नाही.
कारण त्याच वेळी तेथे मंबाजी राजे आले नि पटकन बोलून गेले की आम्हाला फर्मान आलंय मोहीमे वर जायचे. परंतु आम्ही मोहीमे वर जाणार नाही." पण जे सत्य लपविण्याचा प्रयत्न
केला होता ते सत्य समोर आलेच शेवटी अर्थात ते काम मंबाजी राजांनी केलं म्हणा. जिजाबाई शंभू महादेवाच्या पाया पडत असतात. त्या पटकन मागे वळतात. आणि सर्वांकडे पाहून एकदम खासावीस होतात. तेव्हा उमाबाईनीं एक नजर सगळ्यांवर टाकली मग म्हणाल्या की, आता फर्मान आलंय तर जावं तर लागणारच ना . आमची स्वारी तर थाळ्या वरून उठली. आणि एक घास न खाता निघून गेली होती." म्हाळसा बाई म्हणाल्या," जिजा तुम्हाला एकदम धक्का बसू नये म्हणून आम्ही सांगितले नाही, नाही म्हणजे तसं कळणारच होतं
म्हणा पण कसं सांगावं ते कळत नव्हतं. बस इतकंच." त्यावर
शहाजी राजे म्हणाले,' पण तो प्रश्न आमच्या मंबाजी दादा
साहेबांनी सोडवला." पण लगेच पलट वार करत सोयराबाई
म्हणाल्या की, आमच्या मंबाजी राजांना बोल लावू नका.
त्यांना त्यातले काही माहीतच नव्हतं , आणि समजा माहित
जरी असतं तरी त्यांनी लपवाछपवी केलीच नसती. कारण
तशी सवय ना आम्हाला ना आमच्या मुलांना आहे. चला मंबाजी
राजे देवाच्या पाया पडून घ्या नि तयारी ला लागा." जिजाबाईंना
शहाजी राजांनी आपल्या नजरेने खुणावले. तसे त्यांनी देखील
नजरेने सांगितले की इथून चला. त्या प्रमाणे ते दोघेही तेथून
निघून गेले. आम्ही औक्षणाची तयारी करतो ."असे म्हणून त्या
सुध्दा तेथून निघून गेल्या. मंबाजी राजांनी मुकाट्याने शंभू महादेवाच्या पाया पडले नि तेथून निघून गेले.
जिजाबाई शहाजी राजांना म्हणाल्या की तुम्हाला एक विचारू ? पण हसणार नाही ना ?" त्यावर शहाजी राजे
म्हणाले," म्हणजे हसण्या सारखे आहे तर !" त्यावर जिजाबाई
म्हणाल्या की आम्हाला माहीत आहे, " तुम्ही हसाल म्हणून."
" नाही हसणार विचारा." तेव्हा जिजाबाईंनी त्यांना विचारले
की मोहीमे वर काही दिवसा नंतर गेल्यात तर नाही का चालणार ?" त्यांचे हे वक्तव्य अजून शहाजी राजांना खरंच हसू आले. परंतु आपले हसू थांबवून ते म्हणाले," हे बघा आपली स्वप्ने साकार करायची म्हंटले तर चाकरी करावीच लागणार ना ." पण लगेच जिजाबाईंनी आपला विरोध दर्शविला. त्यांना म्हणायचे होते की स्वप्ने साकार करण्यासाठी चाकरी करण्याची काय आवश्यकता आहे ?" तेव्हा शहाजी राजांनी त्यांना समजावून सांगितले की आपल्याला आपलं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर काही दिवस तरी आपल्याला चाकरी करावीच लागणार ना ? उलट बाकी सर्व सोडून आपल्याला बदल कसा घडवून आणता येईल या कडे लक्ष दिला पाहिजे. हो
की नाही ?" तेव्हा जिजाबाईंनी संमत्ती दर्शविली.
मंबाजी राजे, खेलोजि राजे, शाहजी राजे आणि शरीफ जी
राजे मोहीमे वर निघाले. तेव्हा जिजाबाईंनी शहाजी राजांना
औक्षण केले. तेव्हा शहाजी राजे निघाले पण काहीतरी
आठवले तसे मागे वळले. त्यांच्या चेहऱ्यावर ची गंभीरता
पाहून जिजाबाईंनी त्या बद्दलचे कारण विचारले असता. शहाजी
राजांनी सांगितले की, ही मोहीम मोंगला विरुध्द आहे, तेव्हा
तुमचे आबा साहेब म्हणजे लखुजी राजांशी आमचा सामना होऊ नये, असेच आम्हाला वाटते. पण दुर्देव्याने तसे झालेच तर तुमच्या पैकी एकीचे कुंकू हे तलवारीच्या धारेच्या टोकावरच असेल. मग ना आमच्या हातात काय असेल नाही तुमच्या आबा साहेबांचा हातात काही असेल. जे काही होईल
ते नियतीच ठरवील. येतो आम्ही." असे ऐकून जिजाबाईच्या
पाया खालील जमीन सरकल्याचा भास झाला.दोघींचे ही
चेहरे एकदम गंभीर झाले. उमा बाईंच्या चेहऱ्यावर देखील
चिंतेचे भाव उलटले. नाही कुणाला काही फरक पडला तो
केवळ सोयराबाईना. त्यांचा चेहरा एकदम निर्विकार होता.
सिंदखेड लखुजी जाधव गढी
लखुजी राजे मोहीमे वर निघाले असता ते त्या बाई साहेबांना
अर्थात भागिरथी बाईना देखील तेच म्हणाले जे शहाजी राजे
जिजाबाईंना म्हणाले. त्यावर भागिरथी बाई म्हणाल्या,
" कशाला पाहिजे ह्या झुंजी ? त्या पेक्षा त्या शहाजांन ला
स्पष्ट शब्दात सांगा हे नाही जमणार म्हणून." त्यावर लखुजी
राजे म्हणाले," असं कसं करता येईल आम्हाला ? शाहाजांन
ने उगाच का आम्हाला सन्मानाने बोलवून घेतले. झुंज ही
करावीच लागणार , तुम्ही फक्त इतकंच करू शकता की रेणुका
मातेला सांगा की आमची नि शहाजी राजांची गाठभेट होऊ नये.
बस्स!" त्यावर भागिरथी बाई म्हणाल्या," ते आम्हाला काही माहीत नाही. कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. बाकी आम्हाला
काहीच ऐकायचं नाही तुमचं." असे बोल त्या चालत्या झाल्या.
लखुजी राजे म्हणाले," आता कसं समजावचं ह्यांना . मधल्या
बाई होत्या म्हणून इतकं सारे बोलल्या. पण ज्यांना माहीत
आहे, त्या अश्या नाही बोलणार." त्यावर जगदेव राव म्हणाले,
" हो थोरल्या वहिनी साहेब असत्या तर त्या अश्या बोलल्या नसत्या." त्यावर लखुजी राजे," पण आता ठरलं. त्यामुळे
माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." जगदेव राव म्हणाले,
" पण समजा तुमची गाठ शहाजी राजांशी पडली तर ?"
" ते आता काहीच सांगता येणार नाही. तेव्हाच तेव्हा पाहता
येईल. खंडागळेचा हत्ती बिथरला होता तेव्हा कुठं काय आम्ही ठरवून केलं होतं. तसेच आता ही होईल "
वेरूळ भोसले गढी
उमाबाई फार चिंतेत होत्या .त्यांना कळत नव्हते काय करावं ?
म्हणून त्या म्हाळसा बाईंकडे आपले मन व्यक्त करतात. तेव्हा
म्हाळसा बाई त्यांची समजूत काढतात. तेव्हा ते सांगतात की
मोंगला कडून आमची स्वारी आणि निजामशाही कडून आमचे
जावई असे एक एक सरदारच असतील असं नाहीये ना ? कदाचित ते दोघेही समोरासमोर येणारच नाहीत."
" बरं झालं आत्याबाई तुम्ही इथं होता म्हणून. आम्ही तर खरंच हादरून गेलो होतो." असे म्हणत असताना त्यांना शिंक आली. म्हाळसा बाई म्हणाल्या," तुम्ही अगोदर स्वतःची काळजी घ्या. आणि त्या दोघांची चिंता करायचे सोडा. कारण ते दोघेही समजदार आहेत काहीतरी मार्ग काढतीलच यातून. आमची त्या बद्दल खात्री आहे."
जिजाबाई आपल्या दालनात आपल्या पोटातील बाळा शी
बोलताना त्या तलवारी पाशी स्वतः येतात नि बाळाला सांगतात
की आम्ही ह्या तलवारी जवळ आपले मन व्यक्त करत असू .
ते तुमच्या आबा साहेबांना बरोबर कळत असे. खरे तर स्वारी नीच आम्हाला सांगितले होते की, या तलवारी पाशी आपली
घागर रिकामी कर, आम्हाला ते आपोआपच कळणार. आणि
खरं आहे ते. मनातले सारे इथं ओकून टाकले ना की मग मन
कसे हलके होई. मनात कोणतीही गोष्ट कुजत ठेवायची नसते.
नाहीतर कुबड येते म्हणे !" इतक्यात पोटातील बाळाने लाथ
मारली. तश्या त्या आ हा ss म्हणाल्या,' हो हो समजले मला
तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. बाळ सांगते आहे की, आबा
साहेब तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मग थोरल्या आबा साहेबांची
पण घ्या. आणि सामोरा समोर आलात तर आमची आठवण काढा नि थोरल्या आबा साहेबांना पण आठवण करून द्या."
" आमच्या मनात एक विचार आला होता, पण तुमची परवानगी असेल तर आम्ही काही दिवस जिजाना सिंदखेडला घेऊन जाऊ इच्छितोय."
" मग त्यात गैर काय आहे, खुशाल घेऊन जा. आमचं काहीच
म्हणणे नाहीये." असं म्हणत असतानाच त्यांना शिंका येत होत्या. ते पाहून म्हाळसा बाई म्हणाल्या," तुमची तब्बेत बरी
नाहीये का, मघापासून सारख्या शिंकताय म्हणून म्हटलं. तुम्हाला बरं नसेल तर आम्ही जिजाना घेऊन जात नाही."
" छे छे छे ! आम्हाला काय झालंय, थोडीशी सर्दी तर
आहे, त्यासाठी जिजाबाईंना सोबत घेऊन जाण्याचे रद्द करू नका. तुम्ही खरंच जिजाबाईंना घेऊन जा. आणि सर्वात पहिल्यांदा जिजा बाईंच्या कानावर ही गोष्ट घाला. म्हणजे
त्यांच्या मना वरचे दडपण दूर होईल." उमाबाई ना आपल्या
लेकी बद्दल इतका जिव्हाळा पाहून म्हाळसा बाई एकदम
सुखावल्या. आपल्या सूनबाई वर जीवापाड प्रेम करणारी सासू मिळायला पण भाग्य लागते. नाही का ?
शहाजी राजे आपल्या शिलेदारा सोबत गप्पागोष्टी करत असतात. प्रत्येकजण आपापल्या बहादुरीचे किस्से सांगत
असतात. इतक्यात एक पठाण खलीता घेऊन आला नि
मंबाजी राजेंच्या हातात दिला आणि मंबाजी राजांनी तो
खलिता वाचला. शहाजी राजे मनातल्या मनात विचार करत
होते की, कोणाचा बरं असेल हा खलीता ? मोंगलांचा का
निजामशाहीचा ? कसं कळणार ? मंबाजी राजे तर तोंड
वर करून पाहत देखील नाहीत आमच्याकडे ? पण काहीतरी
खास आहे खालीता मध्ये, हे नक्की !"
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा