Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

छत्रपती शिवाजी महाराज ३४ | chhatrapati shivaji maharaj episode 34 | Author :- Mahendranath prabhu

छत्रपती शिवाजी महाराज ३४ | chhatrapati shivaji maharaj episode 34 | Author :- Mahendranath prabhu

छत्रपती शिवाजी महाराज ३४ | chhatrapati shivaji maharaj episode 34 | Author :- Mahendranath prabhu


 



      जिजाबाई उदारल्या, की आम्ही काहीही सिद्ध करत नाही. आम्ही फक्त जाऊ बाईना भेटायला आलो होतो. आमच्याने उठवत नव्हते म्हणून जरा बसून राहिलो. " त्यावर सोयराबाई म्हणाल्या," इतका कळवला जर तुमच्या तीर्थरूपानी दाखविला असता तर आमचा पुत्र जिवंत असणार होता."


  पुढे

      म्हाळसा बाई रेणुका मातेच्या देव्हाऱ्यात दिवा लावत होत्या.
इतक्यात तेथे लखुजी राजे आले नि त्यांना म्हणाले," म्हाळसा
बाई !" तश्या त्या म्हणाल्या," तुम्ही आलात वर्दी नाही नगारा
नाही." लखुजी राजे म्हणाले," आम्हीच तुम्हाला वर्दी द्यायला
आलोय." तेव्हा त्यांनी उलट प्रश्न केला की, तुम्ही का ? दुसरं
कुणीच नाहीये का ?" लखुजी राजे म्हणाले," दुसऱ्या कोणाची
हिम्मत होईना , म्हणून मग आम्ही आलो." म्हाळसा बाई म्हणाल्या," तुम्ही आलेत ते बरं झालं म्हणा !  आमच्या
जीवाला किती घोर लागला होता. तिथं काहीतरी अघटीत
घडेल असं वाटलं होतं पण तुम्ही सुखरूप आलात. आम्हाला
अजून काय हवे ?" असे बोलून त्या दिवा लावू लागल्या.
तसे लखुजी जाधव म्हणाले," म्हाळसा बाई दिवा लावू नका."
   " अहो, दिवा लावायला किती वेळ लागणार आहे." असे
म्हणून त्या आपल्या कामाला लागल्या. नाईलाजाने त्यांच्या
हातातील दिवा लखुजी राजांनी काढून घेतला नि बाजूला
ठेवला नि त्यांना जबरदस्तीने घेऊन गेले. म्हाळसा बाई बाहेर
येऊन पाहतात तर काय त्यांना त्यांच्याच पुत्राचे शव दिसले. त्या
दत्ताजी राजे जवळ गेल्या नि त्यांना हलवत त्या म्हणाल्या,
  " अहो, दत्ताजी राजे उठा, ही काय झोपायची वेळ आहे ?
आणि अशी काय चादर लपेटून घेतलाय स्वतःला. लहानपणी
कितीही कपड्यात घट्ट हात बांधून ठेवले तरी ते हात मोकळे
करणारच मग आज काय झालं ? काढा ते हात बाहेर ."
तश्या भागीरथी बाई त्यांना आवरायला गेल्या. तश्या त्या
चिडल्या नि  उद्गारल्या," माहितेय मला. ते आता कधीच
उठणार नाही ते. दत्ताजी राजे एकदा तरी उठा हो, आपल्या
आऊ साहेबाकडे पहा हो." असे बोलून ओक्सिबोक्सी त्या
रडू लागल्या.

   भोसले गढी

      जिजाबाई म्हणाल्या," त्यांना का मध्ये आणताय ?"
     " मग कोणाला मध्ये आणू तुम्हीच सांगा ना ? बरं त्यांना
नाही आणत मध्ये मग आमच्या पुत्राला कोणी मारले ? आम्ही
हे ऐकले ते खोटे आहे का ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या,
  " आमच्या दत्ताजी दादा साहेबांनी संभाजी दादा साहेबाचे काय बिघडवले होते ?"
   " ते बोलू नका. फक्त तुमच्या आबा साहेबांनी आमच्या
संभाजी राजांना मारले की नाही तेवढं फक्त सांगा. आणि
तोंड वर करून बोलू नका. " इतक्यात तिथं उमाबाई आल्या
नि म्हणाल्या," सोयराबाई स्वतःला आवरा.( दुसऱ्यांना दोष
लावण्या अगोदर स्वतःच काय चुकलं याचा शोध घ्या. मगच
दुसऱ्यांना बोल लावा. खरे तर असं बोलायला हवं होतं पण
त्या काही तश्या म्हणाल्या नाहीत. हा त्यांचा चांगुपणा म्हणा
हवं तर !" ) उमाबाई ना पाहून सोयराबाई एकदम चूप झाल्या.

     मंबाजी राजे वजीरे आलम मी आण राजू कडे पोहोचले.
केवळ संभाजी राजेंची जहागिरी आपल्याला मिळावी यासाठी
सख्खा भाऊ गेल्याचे दुःख नाही असेच मी आण राजू ला
वाटले म्हणून की काय त्यांनी त्यांची खिल्ली उडविली. आणि
कासिम खान कडे पाहत ते म्हणाले," कासिम खान मंबाजी
राजे कहना क्या चाहते है, हम कुछ समझे नहीं ?"   तेव्हा कासिम खान मंबाजी राजांची बाजू घेत म्हणाले," हुजुर मंबाजी राजे को जो कुछ हुआ उसका अफसोस तो हैही लेकिन आगे की कार्यवाही करनी पड़ेगी ना ? क्यों मंबाजी राजे ?" तसा मंबाजी राजे म्हणाले," जी हां जी हां !"
" मतलब हम समझे नहीं।"
" मंबाजी राजे मी आण राजू यहां आने की वजह जानना
चाहते है ।" तसा मंबाजी राजे म्हणाले," संभाजी राजे महरुम हो जाने के बाद उनकी जहागिरी हमे दी जाए बस यही अर्जी लेकर आए है हम । हुजुर हुकुम का परचम लहराना है तो हमारा भी ईमान देखना भी  लाजमी है ।" मी आण राजू खुश होऊन म्हणाला," कासिम खान , ऐसे खुलेआम बात करने वाले हमे बहुत ही पसंद है । बाकी सब  मराठों को कुछ इनसे सीखना चाहिए।"
   " इज्जत अफसाई का शुक्र गुजार हूं ! गुस्ताखी माफ हुजूर लेकिन आपने अभी तक हमारे ख्वाहिश के बारे में नहीं फरमाया ."
   " हूं ss मसला तो ही ख्वाहिश सो का है, वजीरे आलम बनने
की ख्वाहिश रख सकते हो, उस में कोई गलत नही.
   " नहीं नहीं हम अपना हौसला इतना भी बुलंद नहीं करेंगे
की जिसका बोझ हम सह नहीं पाएंगे ।"
  " सुबान अल्लाह  सुबान अल्लाह  जल्दी ही इस बात गौर करेंगे और जल्दी ही आपको इत्तला कर देंगे ।"
   " जी शुक्रिया हुजूर । अभी इजाजत दिजिये "
   "इजाजत है।" असे मी आण राजू ने म्हणताच. मंबाजी राजांनी मुजरा केला. आणि तिकडून निघून गेले. तसे मी आण
राजू उठून उभे राहत म्हणाले," कासिम खान इनको अपने
भाई के मौत का बिल्कुल भी अफसोस नही है, सिर्फ फिकर
उनको अपनी जहागीर की ।" असे बोलून कुत्सित पण हसला.

      बादशहा हजरत ने मलिक अंबर ला आपल्या दालनात बोलविले नि म्हंटले की, हमने सूना हैं खंडागळे सरदार के
हाथी के साथ आपके फरजन फतेह खान ने छेड़खानी की थी
इसलिए वो हाथी बेकाबू हो गया था ।" बादशहा हजरत ने सरळ
आपल्या मुलाचे नाव घेतल्याचे वजीरे आलम मलिक अंबर
मनातून फार घाबरला नि सारवासारव करत म्हणाला," नहीं हुजूर हमारे फर्जन ऐसा हरगिज नहीं कर सकते हमे पूरा यकीन है . मुझे लगता है यह किसकी साजिश होगी । हम खुद इसकी छान बीन करेंगे।"
   " अगर हमारे दो हाथ आपस में लड़ेंगे तो नुकसान किसका
होगा ? हमारा होगा ना?"
   " जी जी नुकसान हमारा होगा ।"
   " जरा यह भी सोचिए अगर. इसी तरह हमारे मनसबदार
आपस में लड़ेंगे तो कयामत आएगी।"

सिंदखेड

    लखुजी राजे म्हाळसा बाईना म्हणाले की शोक आवरा. आम्ही दत्ताजी राजांचा सूड पूर्ण पने घेतला आहे. आता शहाजी राजे मध्ये आले त्याला आम्ही काय करणार ?" म्हाळसा बाई
चिडून म्हणाल्या," ते सांगून झालंय त्या क्षणी तुम्ही तसे वागलात ते आम्ही समजू शकतो. पण पुन्हा पुन्हा त्याचेच
समर्थन करायचं का ? तुम्ही असे नव्हता. सगळ्यांचा विचार
करायचा असतो. हे आम्ही तुमच्या कडूनच शिकलो. पण
तुम्ही बदलला आहात. इतक्या वेळात जिजा सोबत काय
घडलं ह्याचा एक शब्दही काढत नाही आहात ?"
  " जिजाचा इथं काय सबंध ?"
  " जीजाच तर ह्या दोन घराण्याला जोडून आहेत, मग त्यांचा
विचार नको का करायला ? आपल्या बद्दलचे, दत्ताजी बद्दलचे
आणि तुमच्या बद्दल चे बोल कुणाला ऐकावे लागणार ? जिजा नाच ना ? अहो, सध्या त्यांची अवस्था काय आहे, दोन जीवांच्या
आहेत त्या. कसं सहन करत असतील त्या ? ह्याचा विचार
केला आहे  का कधी ?" त्यावर लखुजी राजे म्हणाले," तुमचं म्हणणे तरी काय आहे ?" त्यावर म्हाळसा बाई म्हणाल्या,
   "  दिवस कार्य पूर्ण झाल्यावर आपल्याला तिथं जायला हवं. उमा बाईंची नि सर्वांचीच माफी मागायला हवी आहे, जिजाचा संसार सावरण्यासाठी आपल्याला हे करायलाच हवं. आपल्याला काय वाटतं हे बाजूला ठेवून." तसे लखुजी राजे काही न बोलता उठून निघून  गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहून त्या म्हणाल्या," तुम्हाला आमचे म्हणणे पटलेले दिसत नाहीते.  हरकत नाही येऊ नका तुम्ही. पण आम्ही
जाणारच "

   म्हाळसा बाईच्या दालनात मधल्या बाई म्हणजेच भागिरथी
बाई आल्या आणि म्हणाल्या की तुम्ही स्वारी ना असं म्हणालात
की  वरुळ ला जाऊन सर्वांची माफी मागा म्हणून." त्यावर
म्हाळसा बाई म्हणाल्या," हो आम्ही असं म्हणालो. पण त्याचा
अर्थ असा नाही की उद्याच जाऊन माफी मागून या म्हणून. दिवस कार्य झाल्यावर आपल्याला तिकडे जायला हवे नि सर्वांची माफी मागायला हवी आहे, जीजांचा संसार सावरायला हवाय. म्हणून आपल्याला काय वाटतं ते महत्वाचे नाहीये. ते सर्व बाजूला ठेवायला हवं असे आम्ही म्हणालो."
   " थोरल्या बाई साहेब  दत्ताजी राजांना तुम्ही आपल्या उदरात
वाढविले तरी तुम्ही असं बोलू शकता ?"
   " जिजा ना सुध्दा ह्याच उदरात वाढविले आहे. दत्ताजी साठी
आम्ही एका कोपऱ्यात  रडत बसू त्याने काय फरक पडणार
आहे कुणाला ? पण जिजा वर काय प्रसंग ओढवला असेल
याचा जरा विचार करा. कशा सामोरी जात असतील त्या प्रत्येक
प्रसंगाला ?"
   " आम्ही काय त्यांचे  दुश्मन आहोत का ? आम्ही सुद्धा त्यांना आपली मुलगीच मानतो."
   " मुलगी मानने आणि मुलगी असणे हाच फरक आहे मधल्या बाई !"
   " म्हणजे आम्ही आता परक्या झालो. असेच ना ?"
   " नाही. तुम्ही विचार करत नाही जरा विचार करून पहा
म्हणजे पटेल."
   " काय विचार करायचा ते तर सांगा."
   " हाच की जिजा पण एक सासरवशीन आहेत, त्यांच्या कडे
ही तितकेच दुःख आहे, असे असताना ही त्या आपल्या थोरल्या
बंधूंना पहायला आल्या त्या किती अडचणी पार करून
आल्या असतील याचा विचार केला का कधी ? नाही ना ?
शिवाय तिथं आल्यावर  तुम्ही त्यांच्याशी कशा वागल्यात
काय वाटलं असेल त्यांच्या मनाला ? किती यातना झाल्या
असतील याची कल्पना आहे का आपल्याला ? नाही. तुम्ही
फक्त आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली. स्वारी चे
एक ठीक आहे हो, ते पुरुष आहेत. पण तुम्ही एक स्त्री आहात
ना, मग स्त्री चे मन तुम्हाला नाही ओळखता आलं ?"
   " आम्हाला हे पटत नाही आणि आम्ही काही देव नाही."
   " देव बनुच नका तुम्ही. फक्त एकदा आऊ होऊन विचार
करा मग पटेल."

  वेरुळ भोसले गढी

  शहाजी राजे बाहेर कुठं गेले होते ते आपल्या दालनात येऊन
बसले. तेव्हा जिजाबाईंनी त्यांना विचारले," रात्र भर कुठं होता
तुम्ही ? आपल्या दालनात ही आले नाहीत." पण शहाजी राजे
काहीच बोलत नाही. तश्या त्या म्हणाल्या," तुम्हाला आमच्याशी
काहीच बोलायचं नाहीते का ? बोला ना ?"
  " एकदा सांगितले ना, आम्हाला तुमच्याशी काहीच बोलायचं
नाहीये म्हणून.
   " पण का नाही बोलायचे ते तर सांगा.आमचा दोष काय तो
तरी सांगा . खंडागळेचा हत्ती पिसाळला हा काय आमचा दोष
आहे ?  पिसाळलेला हत्ती दत्ताजी राजांच्या शिवबंधी ला
चिरडू लागला म्हणून दत्ताजी राजांनी त्याची सोंड कापली
हा काय आमचा दोष झाका का ? संभाजी दादा साहेबांनीं दत्ताजी दादा साहेबावर तलवार चालविली हा काय आमचा दोष होता  ? आबा साहेबांनी संभाजी दादा साहेबांवर तलवार चालविली हा आमचा दोष आहे का  ? सांगा सांगा काय दोष आहे आमचा ? हत्ती कुणाचा ? लढला कोण ? आणि मारले गेले कोण ? ह्या सर्वामध्ये आमचा काय दोष आहे तो तरी सांगा."
  " हे असे बोलून काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला ?"
" आमच्या आतड्याचा पीळ जाणवत नाही आहे का हो
तुम्हाला ? बरं ते जाऊ दे. आमचे सर्वांचे सर्वकाही चुकीचे
फक्त तुमचंच रास्त. पण मुक्कामी गावी जेव्हा प्रथम शुध्दीवर आले तेव्हा काय म्हणाले होते ते आठवा जरा. तेव्हा सर्वकाही
बरोबर होतं. पण जसे संभाजी राजे गेल्याचे कळले तसे सर्व
काही बदलले. आम्ही चुकीचे, आमचे आबा साहेब चुकीचे,
अजूनही तुम्हाला आमचाच राग येतोय ना ? तुम्हाला आमच्याशी बोलायचंच नाहीये ना ? ठीक आहे." असे म्हणून
त्या तलवारीच्या दिशेने गेल्या नि तलवार उचलून म्यानातून
बाहेर खेचली नि त्यांच्या समोर तलवार धरत त्या म्हणाल्या,
मग घ्या ही तलवार आम्हाला नि आपल्या वंशाला संपवून टाका एकदाचे. बाकीचे बोलतात ते बोलणारच. पण तुम्हाला ही आमच्याशी बोलायचं नाही तर हवं कशाला हे जीवन ? घ्या ही तलवार नि संपवून टाका एकदाचे." तसे शहाजी राजे उठले नि त्यांच्या हातून तलवार काढून घेतली पुन्हा होती त्या जाग्यावर ठेवून दिली नि जिजाबाई जवळ आले नि जिजाबाईंना आपल्या मिठीत घेतले. तेव्हा जिजाबाई म्हणाल्या,' का आमची इतकी कसोटी घेता ? तुम्हाला ही हे पटत होतं ना ? मग असे का वागलात ?"  शहाजी राजे म्हणाले , " तुम्ही थेट बोललात आम्हाला ते स्वीकारायला कठीण जात होतं."
   " मग काय आम्ही मुखवटा घालून बोलायचं ? का काहीच
नाही बोलायचे."
   " बोलायचे. आम्हाला काही वाटेल ते बोलायचं. आम्हाला
पचायला कठीण जाईल .पण त्यावर ओरखडा नसेल. आम्ही
अजून त्या क्षणात घडलेल्या भीषण घटनेचा विचार करत आहोत. संभाजी दादा साहेबांना, तुमच्या आबा साहेबांना आणि
आम्हाला विचार करण्याची संधीच मिळाली नाही. आणि ती जर
मिळाली असती तर आधी विचार झाला असता नि त्यातून मार्ग निघाला असता. पण तसे घडले नाही. हाच सर्वात मोठा मुद्दा आहे."
   " त्यातून कोणाला काय मिळालं ? तर काही नाही सर्वकाही
गमावलं."
  " खरंय." शहाजी राजे उद्गारले. इतक्यात हिराजी आले नि
म्हणाले," थोरल्या बाई साहेबांनी सदरेवर बोलवले आहे.असे
म्हणून तो शहाजी राजांना आपला आधार देवू पाहत असताना
जिजाबाई म्हणाल्या," आम्ही आहोत म्हटलं." तसे शहाजी राजांनी त्यांच्या कडे वळून पाहिले. तश्या त्या पुढे म्हणाल्या,
  " आम्ही आहोत ना ? आम्ही आलेलं चालेल ना ? " तेव्हा शहाजी राजांनी आपल्या  नजरेच्या इशाऱ्याने हो म्हटले. तसे हिराजी बाजूला झाले नि जिजाबाईंनी आधार दिला नि निघाले.

    सदरेवर सर्वजण जमले होते. तेव्हा उमाबाई सर्वांना उद्देशून
म्हणाल्या की, आमचं असं मत आहे की आतापर्यंत जसे चालत
आलं आहे, तसेच पुढे ही तसेच चालत राहावे. म्हणजे इथला
कारभार जसा आतापर्यंत सर्वजण मिळून करत होते तसेच
पुढे ही करत राहावे. ते पण कोणाचा ही द्वेष न करता जे
घडून गेले ते बदलता येणार नाही." तश्या सोयराबाई मध्येच
म्हणाल्या," पण टाळता आलं असतं." त्यावर उमाबाई म्हणाल्या," टाळता आलं असतं , असं झालं असतं तर, तसं
झालं असतं तर असा आपण शेकडो वेळा जरी विचार केला
तरी त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. म्हणून सगळेजण
एकत्र आल्या नंतर त्या विषयी कोणी बोलू ही नये. आणि आता ह्या म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही. कालचक्र उलटं फिरविता येत नाही. म्हणून कोणाचा ही दुस्वास नसावा तर
विश्वास असायला हवा." त्यावर शहाजी राजांनी आपले मत
मांडले. खेलोजी राजांनी आपले मत मांडले. मंबाजी राजांनी
पण आपले मत मांडले. शेवटी जिजाबाई आपले मत मांडू
इच्छित होत्या. पण सोयराबाईंनी त्यांना ते मांडू दिले नाही.
त्या म्हणाल्या," पुरे ! जाऊबाई तुम्हाला जे सांगायचे होते ते
तुम्ही सांगितले नि आम्ही ऐकून ही घेतले. पण  अजून कोणी
आम्हाला शिकवू नये . " असे बोलून आपल्या सूनबाई ना म्हणाल्या की  सूनबाई चला." तश्या त्या निघून गेल्या. त्यांचा पाठोपाठ मंबाजी राजे पण निघून गेले. शहाजी राजांनी जिजाबाईंना आपल्या नजरेने सांगितले की शांत रहा.

   सोयराबाई आपल्या दालनात अस्वस्थ पने येरझाऱ्या घालत
होत्या. इतक्यात तिथं मंबाजी राजे आले नि म्हणाले," आऊ
साहेब, तुम्ही अस्वस्थ का ?" त्यावर त्या म्हणाल्या," जाऊबाई
जे म्हणाल्या ते इतकं सोपे नाहीये. आणि ते तेवढेच नाहीये तर अजून काहीतरी आहे." मंबाजी राजे म्हणाले," काकी साहेब
कालचक्र विषयी म्हणाले तेच ना,  कालचक्र नाहीच फिरविता येत ." त्यावर सोयराबाई म्हणाल्या," त्या कश्या बरोबर
आहेत, हे आम्हाला सांगू नका. लखुजी राजांनी आमच्या संभाजी राजांना मारले ते आम्ही कदापि विसरणार नाही. आणि इथं जिजाबाईचा रोज रोज चेहरा पहावा लागणार आहे आम्हाला . मग कसं विसरणार आम्ही ? आणि विसरलोच नाही तर जखम भरणार कशी ? रोज रोज खपली निघतच राहणार."
   " हात्तीच्या इतकंच ना, मग मागे मी आण राजू ने सांगितलेला
उपाय करू, म्हणजे वाटण्या करू, म्हणजे तोंड दिसणारच नाही. " तश्या सोयराबाई त्याच्या कडे रागाने पाहू लागतात.
तसे मंबाजी राजांनी विचारले," काही चुकलं का आमचं ?"
   " मंबाजी राजे तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती. आमच्याच
उदरातून निघालात ना, थोडा ही विचार करता येत नाही ?"
   " आता तुम्हीच म्हणालात ना, की रोज रोज खपली निघेल
म्हणून उपाय सुचवला."
" त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला का ?
वाटणी केली पुढे काय ? तुम्हाला जे मिळेल त्यात तुम्ही खुश राहाल. इकडे शहाजी राजांच्या मनगटात धमक आहे, ते मोहिमे वर मोहीम लढवतील आणि आपली मनसबदारी वाढवत बसतील. मग तुम्हीच त्यांना सारा द्या नि मुजरा पण करा."
   " तुम्ही असे टोचून बोलू नका. स्पष्ट काय ते बोला."
   " संभाजी राजांच्या मनसबदारीचे पुढे काय झाले ?"
   " ते वजीरे आलम मी आण राजू म्हणाले आहेत करतो
काहीतरी !"
   " आणि त्यात तुम्ही हुरळून गेलात होय ना ? त्याचा पाठ
पुरावा कोण करणार ? आणि वाटणीचे अजिबात बोलू नका.
नुकसान तुमचेच होईल."

  दौलताबाद
 
बादशहा निजामशाह म्हणाले," तुम दोनो हमे उलझन में
डाल रहे है ।" तेव्हा वजीरे आलम मलिक अंबर म्हणाले,
" बादशहा हजरज का इकबाल बुलंद हो. मगर यह रास्ता
हुजूर आपिने बताया हैं ."  त्यावर मी आण राजू उद्गारला ,
मराठी बालगीरोंको सर पर बैठाना,गुस्ताकि माफ हुजूर लेकीन
यह नामुमकिन है । " तेव्हा मलिक अंबर म्हणाला," बादशहा
रहिम दिलं से सोचते हैं, और आप की गुस्ताखी को हमेशा माफ
कर देते है,मी आण राजू मगर यह रास्ता खुद हूजूर कहा था।
मुलुख के हिफाजत के लिए और मुगलों सल्तनत से डटकर सामना करने के लिए । मराठा बालगीरांको हमेशा बांध के रखना इसी में अक्लमंदी है ।"
  " जब हमारी बादशहा हजरत से बात हुई थी तभी बादशाह
हमारे बातों पर गौर कर रहे था।" असे मी आण राजू म्हणाला
तसा मलिक अंबर हसला नि मग म्हणाला," आप  वजीरे आलम होकर भी ऐसी बात कर रहे है। जनाब गौर फरमाना
मतलब कबुल करना नहीं होता." तसा बादशहा हजरत
वैतागुन म्हणाला," बस करो तुम लोग." असे म्हणून बादशहा
हजरत आपल्या आसनावर बसून म्हणाला," हम इस नितीजे
पर पहुंचे है की उनके बिना रियासत की बागडोर अधूरी है।"
  " तो   वजीरे आलम का रुतबा  भी उनको दिया जाए ।"
  " आप बादशहा हजरत के बात को गैर अंदाज कर रहे है
उनके  कहने  मतलब यह नहीं था।"
  " हमारा कहना इतना है रियासत के मसले उनके बिना सुलझाए नहीं जा सकते है , बल्कि उनको जोड़कर मसले सुलझाए जा सकते है, उन्हे तोड़कर नहीं."
   " जी हां बदशाह  हजरत का हुक्म सर आंखों पर ।"
   " लखुजी राजे और शाहजी राजे उनको फिर से बुलाया जाए
इसलिए उन्हें फरमान भेजा जाए ।"
   " हुजुर के फरमान का इजहार होगा ।"

    भोसले गढी

   " आम्ही मुद्दाम असे काहीच केलं नाही. आम्हाला खरंच
त्रास होत होता."
   " असं मग बघाच आम्ही काय करतो ते. आमचा आजपर्यंत
असा अवमान कुणीच केला नव्हता."
    " अहो पण ?" इतक्यात तिथे गोदा आली नि तिने वर्दी दिली
की थोरल्या बाई साहेब येत आहेत." शहाजी राजांना वाटले की
त्यांच्या आऊ साहेब येताहेत की काय म्हणून त्यांनी विचारले,
त्यांना वर्दी ची आवशयकता कधी पासून भासू लागली. आत
पाठवून द्या त्यांना आम्हाला त्यांच्या सूनबाईची तक्रार करायची
आहे." गोदा गेली नि म्हाळसा बाई आंत आल्या. त्यांना पाहून
शहाजी राजांना आश्चर्याचा धक्का बसला. इतक्यात जिजाबाई
ची त्यांच्या वर नजर गेली आपल्या आऊ साहेबांना पाहून त्यांचे
मन एकदम भरून आले. त्या पळतच आपल्या आऊ साहेबांना
बिलगल्या.  त्यानंतर म्हाळसा बाई दोन्ही हात जोडून जावई
पाशी जाऊन म्हणाल्या की, राजे आम्हाला माफ करा. आमच्या
स्वारी च्या चुकीची शिक्षा आमच्या जिजाना देवू नका."
 

क्रमशः .

 


  



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.