छत्रपती शिवाजी महाराज ३३ | chhatrapati shivaji maharaj episode 33 | Author :- Mahendranath prabhu
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज ३३ | chhatrapati shivaji maharaj episode 33 | Author :- Mahendranath prabhu |
" त्यांनी थोरल्या धन्याचे नाव घेतले."
" काय ? आबा साहेबांनी स्वारी वर वार केला. नाही नाही
आबा साहेब असं कदापि करणार नाहीत. "
" आम्ही पण तेच तर म्हणतोय की थोरले धनी असं नाहीच करणार नाहीत म्हणून. म्हणून मी लोकांच्या बोलण्यावर विश्वास नाही केला. राजांना उचलले नि घेऊन इकडे आलो."
पुढे
शहाजी राजांना हळूहळू शुध्दीवर येऊ लागले तसे गोमाजी
जिजाबाईंना ओरडुन म्हणाले," जिजा अक्का राजे शुध्दीवर
येताहेत. " तसे शहाजी राजे ग्लानीतच म्हणाले," त्यांना बोलवू
नका. आम्ही त्यांना आमचं तोंड ही दाखवू शकत नाही." पुन्हा
शुध्द हरपली. जिजाबाई त्यांच्या कडे पळतच आल्या नि त्यांना
विचारू लागल्या ," स्वारी , तुम्ही असं का म्हणालात ? " पण
शहाजी राजे ग्लानीतच होते. डोळे ही उघडले जात नव्हते. तश्या जिजाबाई उद्गारल्या की, उघडा ना डोळे ?" अचानक
त्यांना आपल्या आबा साहेबांची आठवण झाली तशी त्यांच्या मनात शंका आली की आबा साहेबांना तर काही झाले ना ? बहुतेक असेच काहीतरी असावे म्हणूनच स्वारी असे म्हणाले असावेत. असा मनात विचार येऊन गेला. तसे त्यांचे मन अजूनच हळवे झाले नि त्या शहाजी राजांना हलवून विचारू लागल्या की , सांगा ना , काय झालं ते ?" तेव्हा शहाजी राजे
किंचित डोळे उघडुन म्हणाले," आम्ही वेरुळ ला आहोत का ?"
" नाही.दौलताबाद ला आहात ." जिजाबाई उद्गरल्या.
" म्हणजे आम्ही तुम्हाला इथ यायला मनाई करून सुध्दा
तुम्ही इथं आलात ? होय ना ?"
" नाही. आम्ही इथं आलो म्हणजे आम्हाला तिथं राहावे ना,
सतत तुमची नि आबा साहेबांची चिंता आम्हाला लागली होती
म्हणून आम्ही इथं आलो. परंतु दरबारात आलो नाही म्हणजे तुमची आज्ञा पाळली असा त्याचा अर्थ होत नाही का ? आता मला सांगा काय झालं ? तुमच्यावर आबा साहेबांनी शमशेर चालविली असं आम्हाला सांगण्यात आलं खरं आहे का हे ?"
असे म्हणताच शहाजी राजांच्या डोळ्यासमोर तो भयानक
प्रसंग जसाचा तसा उभा राहिला. राजे बोलत नाहीत म्हणून
जिजाबाईंनी पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा शहाजी राजे म्हणाले,
" नाही." असे म्हणताच त्यांच्या डोक्यावरील ओझे थोडेसे
कमी झाले. आम्ही मग त्या म्हणाल्या," नाहीच करणार. पण
मग तुम्ही जखमी कसे झाले ?"
" आम्ही त्यांच्या मध्ये आलो म्हणून आम्हाला लागले."
" तुम्ही त्यांच्या मध्ये आलात तरी ते थांबले नाहीत म्हणजे ते कुणावर वार करत होते.?"
" त्या क्षणी ते आमचे सासरे नव्हते. तर आपला पुत्र गमावलेले एक दुःखी पिता होते. त्यांचा राग इतका अनावर झाला होता की ते थांबलेच नाहीत." असे बोलून थोडक्यात घडलेला प्रसंग त्यांनी सांगितला. तश्या जिजाबाई दादा साहेब असे म्हणून त्या ओक्सीबोक्सी रडू लागल्या. गोमाजी ना कळत नव्हते कुणाचे सात्वन करावे ? आणि कसे करावे ?
लखुजी जाधवांच्या दालनात देखील शोककळा पसरली.
सर्वजण मान खाली घालून उभे होते. कुणाच्या हि डोक्यावर पगडी नव्हती. दत्ताजी राजांचे शव जमिनीवर पडले होते नि गळ्या पर्यंत चादर ओढण्याने मानेवरचा घाव दिसत नव्हता. लखुजी राजे एकदम शून्य अवस्थेत दत्ताजी राजे कडे पाठ करून उभे होते. आणि आपल्या डोळ्यातील अश्रू लपविण्याचा ते प्रयत्न ही करत होते. इतक्यात तिथे भागिरथी बाई आल्या. त्यांना कळेना ह्या सर्वांना काय झाले आहे ते. तेवढ्यात त्यांचे लक्ष दत्ताजी राजांच्या शवा कडे गेले तेव्हा त्यांनी विचारले,
" दत्ताजी राजे असे काय पडले आहेत, उठवा त्यांना." पण कुणीच काही बोलत नाही. तश्या त्या म्हणाल्या," आणि हे काय तुम्ही सर्वजण असे काय उभे आहेत नि तुमची सर्वांनी डोकी उघडी का आहेत ?" पण कोणीच काही बोलले नाहीत. तश्या त्या लखुजी राजांना म्हणाल्या," स्वारी तुम्ही तरी सांगा ह्यांना ?
हे सर्वजण असे काय उभे आहेत ? आणि दत्ताजी राजे
दिवसा ढवळ्या का झोपले आहेत ?" तेव्हा लखुजी राजे
म्हणाले," दत्ताजी राजे आता कधीच उठणार नाहीत. ते
आपल्याला सोडून गेले कायमचे." तसा त्यांनी टाहो फोडला.
आणि नंतर रडत च विचारले की, हे कसं झालं नि कोणी केलं ?" तेव्हा कोणीतरी बोलला की, संभाजी राजे भोसले.
जिजाबाई राजांच्या खांद्याला पट्टी बांधतात. तेव्हा शहाजी राजे
म्हणाले," जे झालं त्याला संभाजी राजांचा काही दोष नव्हता.
गैरसमज झाला." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आता दोष
कुणाचा होता किंवा नव्हता त्याचा विचार करून आता उपयोग
आहे का ? घडणारी गोष्ट घडून गेली....पण आता आम्ही दत्ताजी दादांच्या अंतिम दर्शनासाठी जाऊ इच्छित आहोत." पण शहाजी राजे काहीच बोलत नाहीत हे पाहून त्या म्हणाल्या," आम्ही काही ढोंगरां एवढे मागितले का ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले," नाही. तुमचं रास्तच पण....?"
" पण काय ?"
" काही नाही मीही येतो तुमच्या सोबत, गोमाजी काका
संभाजी दादांना पण सोबत घ्या. आज काय तो सोक्षमोक्ष
लावूनच टाकतो." इतक्यात हिराजी काही जणांच्या मदतीने
संभाजी राजेंचे शव घेऊन येतात. जमिनीवर घोंगडी अंथरूण
त्यावर संभाजी राजाचे मृत शरीर ठेवतात. तसे शहाजी राजे
दादा साहेब करून मोठ्याने ओरडले. जिजाबाई पण दादा
साहेब करून मोठ्याने ओरडल्या. आणि रडू लागल्या. तेव्हा
गोमाजी ने हिराजी ला विचारले की हे कसे घडले. तेव्हा हिराजी
म्हणाला ," दरबार सुटला तसे सर्वजण तेथून बाहेर पडले.
अचाकपणे खंडागळे सरदारांचा हत्ती बिथरला नि सगळ्यांना पायाखाली तुडवत सुटला. तो कोणाला ही आवरत नव्हता.
म्हणून दत्ताजी राजे आपली तलवार उपसून त्या हत्तीच्या
सामोरी गेले नि एक उंच उडी मारून त्या हत्तीची सोंड कापून
टाकली. म्हणून सभाजी राजे म्हणाले," इतका मांज चांगला
नाही दत्ताजी राजे. त्यावर दोघांची बाचाबाची झाली दोघांनी
ही एकमेकावर तलवार उपसल्या. आणि त्यात संभाजी राजे
कडून दत्ताजी राजे मारले गेले. त्यानंतर लखुजी जाधवांनीं
संभाजी राजांना ठार केले." ते ऐकून जिजाबाई म्हणाल्या
की आम्ही दत्ताजी दादांचे अंतिम दर्शन करून येतो." तेव्हा
शहाजी राजे म्हणाले," तुम्ही जाऊ नका तिकडे "
" अहो असे कसे म्हणता ? आमचे दादा साहेब गेलेत अंतिम
दर्शन करून येतो."
" नका जाऊ. तुमच्या आबा साहेबांनी आमच्या दादा साहेबांना
ठार केले नि आमच्या वर ही त्यांनीच वार केला. तुमचे आबा
साहेब आता नाती ओळखत नाहीत. ते तुम्हाला देखील ठार
करतील."
" असे कसे करतील ते. आणि केलेच तर अश्या जगण्याला
काय अर्थ आहे."
" हे बघा. आमच्या परवानगी शिवाय तुम्ही गेलात तर तुमच्या सोबत कोणीही येणार नाही."
" गोमाजी काका येतील. चला गोमाजी काका." तेव्हा
शहाजी राजे गोमाजी काका कडे पाहू लागले तसे गोमाजी
काका हात जोडून म्हणाले," राजे रागवू नका. पण जाणे भाग
आहे." असे बोलून ते जिजाबाई सोबत निघाले.
भागिरथी बाईंनी विचारले की, हे कसे घडले ?" तेव्हा लखुजी
राजे म्हणाले," दत्ताजी राजे पडले या बातमीनेच आम्ही इतके
हादरलो होतो की आपल्या पोटच्या गोळ्याला ज्याने संपवले त्याला संपवून टाकायचे बस ! असा निर्धार करून निघालो. संभाजी राजांना गाठले नि त्यांच्या वर वार करणार तोच मध्ये शहाजी राजे आले नि त्यांच्यावर वार झाला. पण तेव्हा भानच राहिले नाही संभाजी राजांना संपवायचे हा एकच ध्यास मनी होता बस !" तेव्हा भागिरथी बाईंनी विचारले," पण शहाजी राजांना किती लागलं ? जीव घेणा वार तर नव्हता ना ?" लखुजी राजे म्हणाले," त्यानंतर मी तिथं थांबलोच नाही. त्यामुळे मागे काय घडलं ते माहित नाही." इतक्यात तिथं जिजाबाई आल्या नि लखुजी राजांना बिलगून रडतच म्हणाल्या," आबा साहेब काय घडलं हे, निदान तुम्ही तरी थांबायचं होतं. हे टाळता आलं असतं ?" तेव्हा लखुजी राजे हात जोडून म्हणाले," हे आम्ही ठरवून नाही केलं. नकळत होऊन गेलं." तश्या भागीरथी बाई म्हणाल्या,' तुम्ही इथं का आल्यात ? तुमची इथं येण्याची हिम्मत कशी झाली ? थोरल्या बाई आता जर इथं असत्या तर तुम्हाला धक्के मारून घालवून दिलं असतं ." जिजाबाईनीं विचारले," मधल्या आऊ असं काय बोलताय ? आम्ही काय केलं ?" त्यावर भागिरथी बाई म्हणाल्या ," तुम्ही आता भोसले झाल्या आहात ना, तुमच्या नादान संभाजी राजांनी आमच्या दत्ताजी राजांना ठार केलं. आमच्या वंशाचा दिवा मलवला. तुम्ही काय आता सात्वान करायला आला आहात का ?" त्यावर लखुजी राजे म्हणाले,
" तुम्ही जिजाना बोल लावू नका. त्या सात्वन करायला आल्या आहेत. पण खरं तर त्यांचेच सात्वण आपण करायला
पाहिजे. आम्ही समशेर चालविली नि... वक्तव्य पूर्ण करण्या
अगोदरच जिजाबाई म्हणाल्या," नाही नाही स्वारी सुखरूप
आहेत. तलवारीच्या घावाने ते जखमी झाले आहेत खरे . शुध्दीवर आल्या नंतर खरा प्रकार कळला नि फार कोलमडून गेलेत हो. आबा साहेब ते तुम्हाला थांबवायलाच आले होते." त्यावर भागीरथी बाई चिडून म्हणाल्या," काहीही सांगू नका. इथं
येऊन भोसल्यांची बाजू मांडू नका." असे बोलून त्या चालत्या
झाल्या. तेव्हां जिजाबाईं म्हणाल्या ," आबा साहेब आम्हाला
दत्ताजी दादांचे अंतिम दर्शन घेऊ द्या. फक्त एकदाच. गोमाजी
काका अहो, तुम्ही तरी सांगा." पण लखुजी राजे काहीच बोलत
नाहीत तेव्हा जिजाबाई म्हणाल्या," दत्ताजी दादा साहेब गेले
तसे तुमच्या शमशेर ने संभाजी दादा साहेब गेलेच ना ? कधी
न भरून न येणारी जखम झाली ? आबा साहेब फक्त एकदा
दत्ताजी दादा साहेबांचे दर्शन घेऊ द्या." तेव्हा लखुजी राजांनी
समत्ती दिली. तश्या त्या दत्ताजी राजांच्या शव पाशी जातात
नि रडतच त्यांच्या चरण स्पर्श करून नमस्कार करतात. नि
मग मधल्या आऊ कडे जातात तर त्या आपले तोंड फिरवतात
कोणीच त्यांच्या शी बोलायला तयार नव्हता. म्हणून त्या
गोमाजी ला म्हणाल्या," गोमाजी काका आता इथून चला.
कारण इथं आपल्याशी कोणालाच बोलायचे नाहीये. आमचं
आता इथं कुणीही राहिलेलं नाहीये . " असे बोलून त्या गोमाजी
सोबत तेथून निघून गेल्या.
भोसले दालन दौलताबाद
" जिजा अक्का तुम्हाला बरं नाही वाटत आहे ना मग जरा आराम करा. बाहेर सर्व तयारी सुरू आहे."
" नाही.गोमाजी काका आम्हाला कुठं ही मन मोकळे पणाने
रडता येणार नाही म्हणून आम्ही इथं आलोय. असे म्हणून
अगोदर मन मोकळं पणाने रडून घेतात. तेव्हा त्यांना एक
प्रसंग आठवला. संभाजी राजे म्हणाले," वहिनी साहेब तुमचं
रास्तच आहे. एकदा शहाजी राजे आले ना, मग सगळे गैरसमज
दूर होतील. तसाच एक दत्ताजी राजांचा प्रसंग आठवला. जिजा
आम्ही म्हणालो होतो की आम्ही तुमच्या कोणत्याच गोष्टीत
भाग घेणार नाही. पण नाही आम्ही आमचा शब्द मागे घेतो.
मग त्या स्वतःशीच बोलत म्हणाल्या," आमच्या साठी ते दोघेही दादा साहेबच होते. मग आम्ही एकाचाच पक्ष कसा बरं घेणार ? हत्ती कुणाचा बिथरला. त्याला आवरायला गेलं कोण नि आपसात लढले कोण ? बादशहाच्या दारात रक्ताचा सडा सांडला. आणि ते सांडणारे दोन्ही ही आपलेच." गोमाजी म्हणाला," जिजा अक्का स्वतःला सांभाळा." जिजाबाई म्हणाल्या," नाही गोमाजी काका दरबार कोणाचा ही असो पण त्यात रक्त सांडणारे कायम आपलेच. असे का ? कधी थांबणार
आहोत आपल्याच माणसाचे रक्त सांडणे , कधी येणार आहे
आपल्याला शहाणपण ? कधी चुकणार आहे हे दुष्टचक्र कधी ?" गोमाजी काका माठातले पाणी तब्याने भरून घेतात.
इतक्यात एक जण आला नि जिजाबाईंना मुजरा करून
म्हणाला की सगळेजण निघालेत चला. तश्या जिजाबाई निघाल्या.
भोसले गढी
अंत्यसंस्कार करून शहाजी राजे परतले तसे त्यांच्या हातावर
पाणी घालण्यात आले. त्यांनी थोडे पाणी पिऊन घेतले. तेव्हा गोमाजी म्हणाले," जिजा अक्का संपले सारे." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," झाले संपले सारे, इतकंच असतं का ? अग्नी दिला म्हणजे संपले सारे ? मग मागे राहिलेल्या आठवणीचे काय करायचे ?" तेव्हा गोदा म्हणाली ," गोमाजी काका तुम्ही तरी समजवा ह्यांना. तुम्ही गेल्या पासून जिजा अक्का उभ्याच आहेत, अजिबात बसल्या नाहीत. अश्या अवस्थेत उभं राहणे चांगले आहे का ?" गोमाजी म्हणाला," जिजा अक्का चला आंत." तेव्हा खेलोजी राजे जिजाबाई कडे रागाने पाहत आंत निघून गेले. त्यानंतर शहाजी राजे पण निघून गेले. तेव्हा गोमाजी म्हणाला," जिजा अक्का तुम्ही स्वतःला नि पोटातील बाळाला कशा पाई शिक्षा देताय ? चला बसा आधी !" जिजाबाई एकदम रडव्या स्वरात म्हणाल्या , " गोमाजी काका आम्ही स्वतःला शिक्षा देणार नाही तर दुसऱ्या कोणाला देणार ? पहाताय ना इथं प्रत्येकाच्या नजरेत आम्हीच दोषी आहोत. कुणीतरी आमच्या कडे वेगळ्या नजरेने पाहतेय का ?" आणि खरे ही हेते ते सर्वजण जिजाबाई कडे त्याच नजरेने पाहत होते. कोणालाही असं वाटत नव्हतं की त्या देखील आपल्या दादा साहेबांना गमावून बसल्या आहेत. आपल्या इतकेच त्यांना देखील तितकेच दुःख झालं आहे. पण प्रत्येकाला फक्त स्वतःचे दुःख कळतंय इतरांच्या यातना कशा कळणार ? नाही का ?
अंत्यसंस्कार ला गेलेल्या मंडळी ने भोसले मंडळी चा निरोप
घेतला. आणि ते निघून गेले. मघापासून थाबून ठेवलेला हुदका
एकदम बाहेर आला. जाऊबाईना म्हणजेच संभाजी राजांच्या
पत्नीला एकदम रडू कोसळले. तेव्हा उमाबाईंनी त्यांना आपल्या
हृदयाशी धरले. थोड्या वेळ त्यांना तसेच रडू दिले नि मग त्यांना
घेऊन गेल्या. पाठीमागे फक्त सोयराबाई राहिल्या. त्या जिजाबाई
जवळ आल्या नि म्हणाल्या," भोसल्यांचे रक्त पिऊन तहान
भागली नाही का तुमची ? अजून कोणाच्या रक्ताची वाट पाहताय ते तरी सांगा. " त्यावर जिजाबाई म्हणाल्या," काकी
साहेब , काय बोलताय हे ?" तश्या सोयराबाई अजूनच चिडल्या
नि म्हणाल्या," तुमचं धाडस तरी कसं होतं वर तोंड करून
बोलायला ? एखाद्याने स्वतःला अंधार कोठडीत बंद करून
घेतले असते." तेव्हा जिजाबाई आपली बाजू मांडण्याचा
प्रयत्न करतात पण सोयराबाई त्यांना बोलूच देत नाहीत.
वरून त्यांनाच तोंडात येईल त्या बोलून मोकळ्या झाल्या.
वरून दमदाटी करत म्हणाल्या की एक शब्द ही बोलू नका.
आम्ही मुळीच ऐकून घेणार नाही." असे बोलून त्या तरातरा
निघून ही गेल्या. जिजाबाई मात्र एकट्याच रडत बसल्या.
खरे सांगायचे तर दोघांनी पण थोडा संयम पाळला असता. आणि आपल्या रागावर नियंत्रण केलं असतं तर कदाचित हे विपरीत घडलं नसतं. पण रागाला डोळे नसतात. हेच खरे ! शिवाय नियतीच्या मनात काय आहे, हे कुणाला ही माहित नसतं. पण म्हणतात ना होनी को कोई नहीं टाल सकता जो होना है वो होकर ही रहता है ।
शहाजी राजांच्या जखमेवर वैद्य बुवा पट्टी बांधतात. आणि
ते तेथून निघून जातात. त्यानंतर शहाजी राजे पलंगावर आडवे
होतात. इतक्यात तेथे जिजाबाई आल्या त्यांना पाहून शहाजी
राजांनी आपली पाठ फिरवली. तेव्हा जिजाबाई म्हणाल्या," जे
काय घडून गेलं त्यात आमचा काय दोष होता ते तरी सांगा ना ?
आमच्या कडे तुम्ही देखील पाठ फिरवता ?" शहाजी राजे
म्हणाले," आम्ही तिकडे जाऊ नका म्हटले होते तुम्ही ऐकलंत
का आमचं ....नाही ना ? मग आता काय विचारताय ?" असे
म्हटले तसे जिजाबाईंना तो प्रसंग आठवला. जेव्हा त्यांनी दत्ताजी राजांच्या अंतिम दर्शनासाठी परवानगी मागितली होती
आणि शहाजी राजानी ती नाकारली होती. पण तरी देखील त्या
गेल्या होत्या. हे जसे आठवले तश्या त्या म्हणाल्या," असं नका
ना बोलू , आम्हाला त्रास होतोय." त्यावर शहाजी राजे म्हणाले,
' मग ठीक आहे, आम्ही काहीच बोलत नाही." त्यांच्या कडे
न पाहताच ते म्हणाले. तशा जिजाबाई तेथून निघून गेल्या.
जाऊबाई आणि गोदावरी बाई बसल्या होत्या. दिवा जळत
होता. इतक्यात जिजाबाई तेथे आल्या नि त्यांनी प्रथम त्या
नंदादीप ला नमस्कार केला. तश्या गोदावरी बाई म्हणाल्या,
" जाऊबाई , जिजाबाई आल्यात." तश्या जाऊबाई आपली
मान वळवून जिजाबाई कडे पहातात. जिजाबाई त्यांच्या
जवळ आल्या नि त्यांच्या बाजूला बसल्या. तश्या जाऊबाई
म्हणाल्या," जिजाबाई, काय झालं हे ? होत्याचं नव्हतं होऊन
बसलं , आम्ही कुणाचे काय वाईट केलं होतं म्हणून ही शिक्षा आम्हाला मिळाली."
" नाही जाऊबाई तुमचं नाही काही चुकलं. काळजाला
पीळ पडतील पण ह्या प्रश्नांची उत्तरे काही मिळणार नाहीत."
बराच वेळा नंतर तिथं सोयराबाई आल्या नि जिजाबाई वर
रागवत म्हणाल्या," बराच वेळ सूनबाई जवळ बसून राहिलात
तरी काहीही सिद्ध होणार नाहीये ." जिजाबाई उदारल्या, की
आम्ही काहीही सिद्ध करत नाही. आम्ही फक्त जाऊ बाईना
भेटायला आलो होतो. आमच्याने उठवत नव्हते म्हणून जरा
बसून राहिलो. " त्यावर सोयराबाई म्हणाल्या," इतका कळवला
जर तुमच्या तीर्थरूपानी दाखविला असता तर आमचा पुत्र
जिवंत असणार होता." जिजाबाई बोलू शकल्या असत्या. पण
त्या काहीच बोलल्या नाहीत.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा