Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

छत्रपती शिवाजी महाराज ३२ | chhatrapati shivaji maharaj episode 32 | Author :- Mahendranath prabhu

छत्रपती शिवाजी महाराज ३२ | chhatrapati shivaji maharaj episode 32 | Author :- Mahendranath prabhu
छत्रपती शिवाजी महाराज ३२ | chhatrapati shivaji maharaj episode 32 | Author :- Mahendranath prabhu

 



   " हे वक्तव्य तुमच्या तोंडून ऐकण्यात आम्हाला जे सुख लाभल ते अन्य कशात नाही. तुमच्या या शब्दावर तुमच्या
वरून जीव ओवाळून टाकावा असे वाटते." तसे शहाजी राजांनी
जिजाबाईंना आपल्या मिठीत घेतले.

पुढे

   शहाजी राजे आणि लखुजी राजे आपसात चर्चा करत होते.
लखुजी राजे म्हणाले," राजे, आम्हाला वाटतं की हुकूम आल्या
नंतरच दरबारात आम्ही हजर व्हावे. त्या अगोदर होऊ नये.
आपले काय मत आहे या बाबतीत ?" शहाजी राजे म्हणाले,
   " आपल्याला घाबरण्याचे मुळीच कारण नाहीये. कारण
आम्ही आमच्या मनात काय आहे, हे अगोदरच कळविले आहे."
    " हो पण त्याचा आपणास काहीच उत्तर अजून आले नाही.
असे असताना बिन भुलाये मेहमान हो जा ना जरुरी हैं क्या ?"
   " त्या खलीताचे उत्तर जरी आले नसले तरी ही त्यांना
आमचं म्हणणे मान्य करावेच लागेल. पण मला वाटतं की
आपल्याला अशी भीती वाटते की मलिक अंबर काहीतरी
दगा फटका करील. हो ना ?"
   " राजे आम्ही त्यांना खूप वर्षांपासून ओळखतोय त्यामुळे
ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे आम्हीं जाणून आहोत.
हुकूम होईल तेव्हा आम्ही स्वतः जातीने हजर होऊ या
बद्दल चिंता नसावी. परंतु तुम्ही न बोलवता त्यांना भेटून या
तर ते आम्हाला रास्त वाटत नाहीये."
   " म्हणजे आपला त्यांच्या वर विश्वास नाही.असेच ना ?"
   " हो. शिवाय आम्ही एकटेच जाऊ, तुम्ही आमच्या सोबत
येऊ नका. असे आमचे म्हणणे आहे."
    " आम्हाला काही दगा फटका होऊ शकतो. अशी वाटते
आहे ना तुम्हाला. पण तसं काहीही होणार नाही.आम्हाला
खात्री आहे त्याची."
   " हो कारण ते लोक उलट्या काळजाचे आहेत. आम्ही
कित्येक प्रसंग ह्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत."
   " आम्ही इथं जरी वेरुळात राहिलो तरी ते इथं येणार नाहीत
हे कशावरून ? ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पाठविलेल्या खलीताचे उत्तर अद्याप आले नाही याचा अर्थ मलिक अंबरला हे अनपेक्षितच असेल."
   " अनपेक्षित तर आहेच. म्हणूनच ते त्यांना पचायला जड
जाईल. पचायला जड जाऊदेच.मग जाऊ."
    " आबा साहेब , मला वाटतं की त्यांना वेळ दिला जाऊच नये. कारण ही मलिक अंबर ची पद्धत आहे." इतक्यात तिथं
जिजाबाई येतात आणि चुपचाप मागे उभ्या राहून दोघांत
काय चर्चा सुरू झाली आहे, हे ऐकण्याचां त्या प्रयत्न करततात. तसे शहाजी राजे म्हणाले," जास्त वेळ देणे म्हणजे आपल्यावर आक्रमण होण्याचा अधिक धोका संभवतो."
   " राजे आम्ही अधिक जुनी माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ माहित आहे. अजून खलिताचे उत्तर न देणे म्हणजे ते लोक आपल्याला कमी लेखतात."
   " आबा साहेब, आम्हाला आपल्या इतकं कळत नाही. पण
मलिक अंबरच्या दालनात स्वतः मलिक अंबर ने म्हटलेले
वाक्य सांगतो. व्यवहारात असे छोटे मोठे काहीही नसते. फक्त
तो क्षण महत्वाचा असतो. म्हणून त्यावेळी आपण काय करायला हवे हे महत्वाचे."
  " मग आम्ही सांगतो की आपण ह्या क्षणी इथंच राहणे योग्य आहे, कारण आपण एका बाळाचे बाप होणार आहात म्हणून तुमची इथं जास्त गरज आहे. "
   " आबा साहेब आमच्या शोर्या वर आपल्याला शंका येतेय
का  ?"
" नाही राजे. अजिबात नाही. आम्हाला असे वाटते की  तुम्ही आपल्या बाळाच्या भवितव्यासाठी  तरी इथं थांबावे."
   " शंभू महादेवाची कृपा आहे आमच्यावर म्हणून बाळाची
चिंता नको, त्यांना काहीही होणार नाही. परंतु आम्ही तुमच्या
सोबतच येणार, सगळ्यांना कळू की मराठे एकत्र आल्यावर
त्यांची किती ताकद किती आहे ती."
   " राजे तुम्ही संस्कारी आहात म्हणून असा चांगला विचार  करताय. पण ते नेमक्या उलट्या काळजाचे आहेत. आम्ही सहजासहजी त्यांना एकटे सापडलो तर कापून काढा असा ही
आदेश निघेल आणि तुम्ही सोबत असला तर तुमच्यावर ही निशाणा साधण्याचां त्यांना बहाणा मिळेल . म्हणून आम्हाला
वाटते की तुम्ही आमच्या सोबत येऊ नये." ते ऐकून जिजाबाई स्वतःशीच उद्गारल्या," म्हणजे दरबारात धोका आहे तर ! स्वारी
आपल्याला सांगत नाहीयेत. पण आम्ही एकटे जाऊ देणार नाही. आम्ही ही सोबत जाऊ त्यांच्या." असा ठाम निर्णय त्यांनी
घेतला. आणि तिकडून त्या निघून गेल्या. आणि जेव्हा  शहाजी राजे आपल्या दालनात एकटेच विचार करत असल्याचे दिसले
तेव्हा त्यांच्या दालनात जिजाबाई  प्रवेश करतात नि त्यांच्या अगदी बाजूला  येऊन बसत त्या म्हणाल्या," आम्हाला वाटतं की उद्या तुम्ही दरबारात जाणार आहात तेव्हा आम्ही सुध्दा तुमच्या सोबत असायला हवं." त्यावर शहाजी राजे म्हणाले," छे छे छे! अजिबात नाही भलतचं काय बोलताय आम्ही असा विचार स्वप्नात ही करू शकत नाही." शाहजी राजे उद्गारले.
  " अहो, आमची चिंता करू नका. आम्हाला काहीही होणार
नाही." जिजाबाई म्हणाल्या. त्यावर शहाजी राजे म्हणाले,
   " असं तुम्ही म्हणता पण तिथं नेमके काय होणार आहे, हे
आम्हाला देखील माहित नाही. परंतु आम्ही एकदा उचललेले
पाऊल मागे पण घेणार नाही. हे होईल ते होईल."
    " म्हणूनच आम्ही आपल्या सोबत  येण्याचा हट्ट करतोय."
    " अहो पण तुम्हाला कळत कसं नाहीये. ही वेळ कुठची आहे ? म्हणजे मला म्हणायचं आहे की  तुम्ही आऊ होणार आहात. अश्या प्रसंगी तुम्हाला तिकडे घेऊन जाणे म्हणजे आमच्या जीवाला घोर लागून नाही का राहणार ?"
  " आपण आमची चिंता करूच नका.शंभू महादेव आहेत
आमच्या पाठशी हे का विसरता तुम्ही !"
  " ते जरी काही असले तरी ही तुम्ही आमच्या सोबत यायचे
नाही म्हणजे नाही आणि या विषयावर पुन्हा चर्चा नकोय." असे म्हणून शहाजी राजे चालते झाले.

दौलताबाद

    फतेह खान उद्गारला," अब्बू जान जैसे आपने कहा है, ठीक
बिल्कुल वैसे ही होगा. वो दोनो दरबार तक पहुंच ही नहीं पाएंगे." तसा मलिक अंबर ने गोंधळून विचारले की, हमने कहा
था कब ? कुछ भी बोल रहे हो, हम ने सिर्फ इतना कहा था की
दरबार में हर घटना का जिक्र किया जाता है, इसलिए यह बाते भी दर्ज  होगी । हम ऐसा हरगिज नहीं करेंगे।"
  " आपको सिर्फ इस बात का ऐतराज है ना, की उन दोनो को
दरबार में ना मारा जाए कहीं बाहर मारा जाए बस यही ना ?"
   " और बाहर कैसे मारोगे ?"
   " वो हम पर छोड़ दिजिए।"
   "नहीं. हम जानना चाहते है। क्योंकि लखुजी राजे और
शाहजी राजे को खुले मैदान में मारना इतना आसान नहीं, और नहीं कोई उन्हे मार सकता है । उन्हे  सिर्फ धोके से मारा जा
सकता हैं. जांबाज सरदार हैं वो. इसलिए बताओ तुम्हारी योजना क्या है ? अगर हमे सही लगी तो हम तुम्हे इजाजात
देंगे । " असे विचारताच फतेह खान ने आपली योजना मलिक
अंबर च्या कानात सांगितली. योजना ऐकून मलिक अंबर
अत्यंत खुश झाका नि म्हणाला ," सुबानल्लाह  क्या तरकीब सोची है ।" तसा फतेह खान म्हणाला ," और किसीको हम पर शक भी नहीं होगा ।"

भोसले गढ़ी

     जिजाबाईंनी गोमाजी काकांना तातडीने बोलवून घेतले नि
सांगितले की आपल्या दोघांना ताबडतोब दौलताबाद ला जायचे
आहे." तेव्हा गोमाजी ने विचारले "  का " म्हणून. तश्या त्या
पुढे म्हणाल्या की आबा साहेब आणि स्वारी तिकडेच गेले आहेत. म्हणून आपल्याला ही तिकडे निघायचंय." तेव्हा गोमाजी नि शंका उपस्थित करत म्हटले की, हे राजांना ठाऊक
आहे का ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या की, त्यांनी नको येऊ
म्हणून सांगितले आहे. परंतु आम्हाला तिथं जाणे फार गरजेचे
आहे." गोमाजी ने प्रश्न केला," पण राजांनी विचारले तर आपण
काय सांगणार त्यांना ?"त्यावर जिजाबाई म्हणाल्या," ते काय
सांगायचं ते आम्ही पाहू , पण तुम्ही आम्हाला तिथं घेऊन चला." त्यावर गोमाजी काका म्हणाले," जिजा अक्का ऐका
माझं. राजांनी मनाई केलेली असताना तिथं जाणे योग्य ठरणार
नाहीये. राजे उगाचच रागावतील तुम्हाला." त्यावर जिजाबाई
म्हणाल्या की , ते रागावले तरी ही चालतील आम्हाला. पण आता आम्ही इथ क्षणभर पण थांबू शकत नाही."
   "  जिजा अक्का ऐका माझं. थोरले धनी पण मलाच दोष देतील.पोटीशी असलेल्या बाईला घेऊन कसा आलास तू असं म्हणतील मला. शिवाय तिथं मधल्या बाई साहेब पण असतील त्या पण माझ्यावर रागावतील. म्हणून मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही देव घरात जा नि शंभू मदादेवा समोर बसा. शंभू महादेवच सर्वकाही ठीक करतील."
   " गोमाजी काका तुम्हाला  काय वाटतं हे सर्व आम्ही केलं नसेल ? सर्वकाही केलं पण तिथं गेल्यावर आम्हाला असं वाटतंय की शंभू महादेवच आम्हाला सांगतोय की तिकडे
जा म्हणून. बघा तुम्ही येत असाल तर चला नाहीतर आम्ही
एकट्याच जाऊ !" गोमाजी म्हणाले," नाही नाही असं कसं
आम्ही तुम्हाला एकट्यान जाऊ देवू , चला आम्ही पण येतो तुमच्या सोबत." दोघेही लगेच दौलताबाद ला जायला निघाले.

  दौलताबाद

   " मी आण राजू म्हणाला की, मलिक अंबर जी हमने सुना की शाहजी राजे लखुजी राजे को दरबार में लेके आ रहे है।" त्यावर मलिक अंबर हसला नि मग म्हणाला की,  ऐसा हम ने भी सुना है, देखते है वो दरबार में पहुंचते है की नहीं ?" असे  मलिक अंबर पटकन बोलून गेला. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या छटा कडे पाहून मी आण राजू म्हणाला," लेकिन आपके चेहरे पर जो भाव है उससे लगता नहीं की आप उन्हे दरबार तक पहुंचने देंगे ।" मलिक अंबर आपल्या चेहऱ्यावर चे भाव लपवत कृत्रित  हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाला, " क्यों ? भला ऐसा हम क्यों सोचेंगे ?" इतक्यात शहाजी राजे , संभाजी राजे, लखुजी राजे
आणि दत्ताजी राजे दरबारात हजर झाले. त्या सर्वांना  पाहून मलिक अंबर ला स्वतःवर फार क्रोध आला की आपण आपल्या
फर्जन च्या वक्तव्यावर विश्वास का ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावरचा
क्रोध पाहून कोणीही सांगितले असते की शहाजी राजे नि
लखुजी राजे दरबारात सहिसलामत आलेले आवडलेले नाहीये.
आणि ही गोष्ट मी आण राजू यांच्या लक्षात आल्या वाचून राहील
काय ? म्हणून  मी आण राजू मिश्किल हास्य करत म्हणाले,
   "  आइए लखुजी राजे आपका दरबार में स्वागत है , आपको यहां देखकर हमे बहुत खुशी है, असल में हम से ज्यादा तो मालिक अंबर को खुशी हुई । हैं ना मलिक अंबर जी " उसे कहते है की , जले पर नमक छिड़कना आणि  मी आण राजू ने नेमके तेच केलं होतं. तेव्हा मलिक अंबर ला करे तर ते आवडले
नाही. परंतु दरबारात सगळ्यांसमोर तो मी आण राजू ऐकवू
शकणार नव्हता म्हणून त्याने मधला मार्ग निवडला. आणि
शक्य तितके स्वतःला सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत तो
म्हणाला," दरबार  में ऐसी बाते करना मुनासिब नहीं है । और
दरबार का दस्तुर हैं की अपनी निजी बात को काबू में रखना
चाहिए। यह बात लखुजी राजे भी अच्छी तरह जानते  हैं, और शाहजी राजे भी जानते है ।"तसे लखुजी राजे दुजोरा देत म्हणाले," जी हां !" इतक्यात फतेह खान आला नि मलिक अंबरच्या कानात काहीतरी बोलला की, अब्बा हुजूर खफा मत होना यह लोग ही आए तो है मगर जिंदा वापस नहीं जायेंगे।
हमने सब बंदोबस्त किया है, सिर्फ देखते जाइए होता है क्या ?"
फतेह खान इतका आत्म विश्वासाने बोलला की मलिक अंबर
सुध्दा मनातल्या मनात खुश झाला. इतक्यात  बादशहा हजरत निजामशहा दरबारात हजर झाले. तसे सगळ्यांनी वाकून त्यांना
मुजरा केला. लखुजी जाधव आणि शहाजी राजांना पाहून खूप बादशहा हजरत ला फार आनंद झाला. यात शंका नाही.


       गोमाजी काका आणि जिजाबाई दौलताबाद  पोहोचले. जिजाबाईंना प्रवासाचा खूप त्रास होऊ लागला होता. म्हणून गोमाजी म्हणाले की जिजा अक्का काही त्रास होतोय का ? मी वैद्यांना बोलावून आणू का ?" जिजाबाई म्हणाल्या ," आम्हाला त्रास होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर माझं एक करा."
  " बरं सांगा. "
  "  तुम्ही आत्ताच्या आता दरबारात जाऊन तिथं काय घडलं आहे ते पाहून माघारी या तेव्हाच आमच्या मनाला शांती लाभेल." पण जिजाबाईंना अश्या परिस्थिती मध्ये एकटीला सोडून जायचे त्याच्या जीवावर आले होते. म्हणून गोमाजी त्यांना मधल्या बाई जिथं थांबल्या आहेत तिथं नेऊन सोडण्याचे आपले मत व्यक्त करतो. परंतु जिजाबाई तिथं जाऊ शकत
नाही. कारण स्वारी ने आवडणार नाही हे कारण पुढे करतात.
पण तरी ही गोमाजी तिकडून हलायला तयार होत नाही.हे बघून त्या पुढे म्हणाल्या की , जर तुम्ही जात नसाल तर आम्हीच
एकट्या जातो. तसा गोमाजीचा नाईलाज झला नि मग जायला
तयार झाला. कारण त्याच्या कडे दुसरा पर्यायच उरला नव्हता.

   मलिक अंबर ने बादशहा खबर दिली की जहांगीरचां बेटा
खुररंम शहाजान ने आपल्या बापाच्या विरोधात बंड पुकारले आहे , म्हणून शहाजांन ने बादशहा हजरत कडे मदत मागितली नि बादशहा हजरत त्या गोष्टीस राजी झाले. त्यावर मी आण राजू म्हणाला ," पण त्याचा परिणाम उलट झाला. आदिलशहा
आणि मोंगल दोघेही मिळून निजामशाही वर चाल करून येत
आहेत." तेव्हा बादशहा हजरत म्हणाले की लखुजी राजे आप जानते है,की ...इतक्यात मी आण राजू ने मध्येच त्या मन्सूर खान ला लखुजी राजेंनी कसं पराजित केलं ते सांगितले. तसा  मलिक अंबर मध्येच म्हणाला की  त्या गोष्टीचा संबंध या गोष्टी शी करणे म्हणजे सरळ सरळ लखुजी राजांचा अपमान
केल्या सारखाच आहे. मोगलोंसे मिलकर भी कही सरदार उनके खिलाफ थे  और आप ऐसी बात फरमा रहे है। जो हकीगत
नहीं है, क्यों लखुजी राजे यह बात सच  है ना ?" पण लखुजी राजे काहीच बोलले नाहीत. परंतु मी आण राजू गप्प बसण्यात ला थोडाच होता तो लगेच म्हणाला की, मन्सूर खान के साथ अब्दुल्ला भी आया था लेकीन लखुजी राजे के सामने से वो भाग गया था और अब वही मोहबत खान के साथ आ रहा है।" तेव्हा बादशहाला हजरत म्हणाला," हम वही फरमा रहे है। लखुजी राजे अब वापस आए तो निजाम शाह का तख्त महसूस है।  लखुजी राजे का मुआजम किया जाये. लखुजी राजांनी आपली मान डोलावली.

     पण बादशहा ने अश्या प्रकारे लखुजी राजांचे  निजामशाहीत आल्याबद्दल स्वागत तर केलेच पण त्या शिवाय त्यांची जहागिरी त्याना परत  देण्यात आली पण  मलिक अंबर ला ते आवडले नाही. पण इलाज नव्हता. तो बादशहा पुढे काही बोलू शकत नव्हता. बादशहा जसा दरबारातून निघून गेला तसे लखुजी राजे , शहाजी राजे संभाजी राजे ,  दत्ताजी राजे एकदम खुश होऊन तेथून बाहेर पडले. त्यांनी आपापल्या शमशेर परत
घेतल्या तेव्हा दत्ताजी राजे म्हणाले," आबा साहेब, बादशहाने
आपला सन्मान केला." लखुजी राजे म्हणाले," हां पण कित्येकांना ते आवडलेले दिसत नाहीत. त्यामुळे जे झाले
ते चांगले का वाईट ते सध्या तरी सांगणे कठीण आहे."
   " असं का म्हणता आबा साहेब ?"
   " ते आपल्या मुक्कामी गेल्यावरच सांगतो.मी पुढे निघतो
तुम्ही या मागवून ." असे बोलून लखुजी राजे पुढे निघून गेले.
दत्ताजी राजांना मात्र काही कळले नाही की आबा साहेब असे
का म्हणाले ?


  गोमाजी ला ही खबर बाहेरून च मिळाली तसे गोमाजी साखरे
घेऊन सगळ्यांना वाटत सुटले. आणि शेवटी जिजाबाई कडे
येत म्हणाले की जिजा अक्का ह्या साखरे घ्या. आनंदाची बातमी
आहे. बादशहा ने थोरल्या धन्यांचा मान सन्मान केला." त्यावर
जिजाबाई खुश होत म्हणाल्या," खरंच ?" गोमाजी म्हणाले,
एक शब्द न शब्द खरा आहे, कारण शिव बंदित मिठाई वाटली
गेली आणि सगळीकडे एकच चर्चा आहे, बादशहाने भर दरबारात सगळ्यांसमोर थोरल्या धन्याचा मान सन्मान केला म्हणून." जिजाबाई म्हणाल्या की ते खरं असेल ही परंतु हिला आनंदाची बातमी नाही म्हणता येणार ?" गोमाजी ने न समजून विचारले की, का बरं ?" तेव्हा जिजाबाई म्हणाल्या की तुम्हाला आठवतं एकदा आबा साहेब काय म्हणाले होते ते.....आबा साहेब म्हणाले होते की, एक वेळ कुणी दुसऱ्या ने आपला
सन्मान केलेला चालेल. पण तो बादशहा ने केलेला नसावा. त्याचे कारण असे की बादशहा जेव्हा सगळ्या समोर आपला  सन्मान करतो  तेव्हा इतरांच्या नजरेत ते खटकते. त्या उलट बादशहाने बोल लावले तर सळ्यांनाच त्याचा आनंद होतो." गोमाजी म्हणाले," जिजा आक्का थोरले धनी तुम्ही लहान
होता तेव्हा म्हणाले ना ,  तेव्हा बादशहा दुसरा होता आणि
आता दुसरा बादशहा  आहे." त्यावर जिजाबाई म्हणाल्या,
   "  बादशहा कुणीही असो पण वजीरे आलम तर तेच आहेत ना ? तुम्ही एक काम कराल ?" गोमाजी म्हणाला," हो करेन ना , काम तर सांगा." जिजाबाई उद्गारल्या की , " तुम्ही असेच जा नि आबा साहेबांना इथं घेऊन या आम्हाला त्यांना भेटायचे आहे. " त्यावर गोमाजी अत्यंत खुश होत म्हणाला," बरं असेच जातो नि त्यांना घेऊन येतो." तसे जिजाबाईंनी विचारले,
   " आणि स्वारी ना कोण आणणार  ?" गोमाजी उत्तरला की,
   " ते त्यांच्या सोबतच असतील.असा जातो नि घेऊन येतो."
असे बोलून गोमाजी निघूनही गेला.


      हत्ती बिथरला नि सगळ्यांना पायाखाली तुडवत सुटला. कोणाला ही तो आवरत नव्हता. दत्ताजी राजे कडे एक शिलेदार पळत आला नि म्हणाला की राजे वाचवा!" तसे दत्ताजी राजे," ऐकत नाही म्हणजे काय ? " असे म्हणून त्यांनी आपली तलवार उपसली. तेव्हा संभाजी राजेंनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करत म्हंटले की ,अहो, दत्ताजी राजे ऐका तरी !" दत्ताजी राजे कशाचे ऐकतात, त्यांच्या वर जणू जूनून सवार होता. ते पळतच गेले त्या हत्ती पाशी गेले नि उंच उडी मारून त्या हत्तीची सोंड एका फटक्यात  छाटली. आणि अभिमानाने संभाजी राजे जवळ येत ते म्हणाले," बघितलेत संभाजी राजे ऐकत नाही म्हणजे काय एका तलवारीच्या घाव मध्ये त्यांची सोंड छाटून टाकली." तेव्हा संभाजी राजे म्हणाले," अहो, दत्ताजी राजे हे काय केले तुम्ही ? एका प्राण्यावर आपल्या शक्तीचा वापर केलात. हे शोभले नाही तुम्हाला." त्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. नि वादाचे रूपांतर युद्धात झाले. दोघेही एकमेकावर तुटून पडले. दत्ताजी
राजेंच्या हातून तलवार सुटून खाली पडली नि ते स्वतः देखील
खाली कोसळले. इतक्यात दुसरा शिलेदार संभाजी राजे समोर आला. त्याच्या शी संभाजी राजांचे युद्ध जुंपले. संभाजी राजेंनी आपली तलवार जोरात फिरविली त्यांचे गर्द न मारण्यासाठी पण झाले काय तो पटकन खाली वाकला नि त्याच वेळी त्याच्या मागे उभा असलेल्या दत्ताजी राजेंच्या  गर्दन वर तलवारीचा घाव बसला नि दत्ताजी राजांचा गळा कापला गेला. दत्ताजी राजे
तिथच कोसळून खाली पडले. नकळत घडले खरे पण आता
काय करणार ? संभाजी राजांनी तेथून पळ काढला. इतक्यात समोरून घोड्यावर बसून घोडा उधळत येत आलेल्या लखुजी राजांना एका शिलादाराने  खबर दिली की दत्ताजी पडले." तसे लखुजी राजे  पळतच दत्ताजी राजे जिथे पडले होते तेथे
पोहोचले नि घोड्यावरून खाली उतरले नि दत्ताजी राजांचे जिथं
शव पडले होते तिथे आले नि तेथे जमलेल्या लोकांना विचारले की , हे कोणाचे काम आहे ?" तेव्हा सभोवती गोळा झालेल्या माणसा पैकी एकजण म्हणाला," हे काम संभाजी राजेंचे आहे ." असे म्हणताच रागाने लालबुंद झालेल्या लखुजी राजांनी आपली तलवार उपसली नि विचारले," कोठे आहेत ते संभाजी राजे ? " तेव्हा एका शिलेदारांनी सांगितले की
भोसल्यांच्या सैन्या पाशी आहेत. तसे लखुजी राजे लगेच
तिकडे निघाले. संभाजी राजे जवळ येताच ते म्हणाले," संभाजी
राजे, तुम्ही दत्ताजी राजेंना पाडलेत ?" तेव्हा संभाजी राजे
म्हणाले की आमचा इरादा तो नव्हता. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतानाच हे असं घडलं." पण
लखुजी राजे त्यांचे थोडेच ऐकणार दोघांमध्ये युद्ध जुंपले.
हे जसे शहाजी राजांना समजले तसे ते आपल्या बंधू ना वाचवण्यासाठी पळतच तिथं दोघांच्या मध्ये आले. परंतु नकळत
लखुजीच्या तलवारीचा घाव त्यांना लागला नि ते बेशुद्ध होऊन
खाली पडले.पण लखुजी राजे थांबले नाहीत. त्यांनी संभाजी राजांचा गळा आपल्या तलवारी ने चिरलाच. तसे संभाजी राजे जमिनीवर कोसळले. तेव्हा कुठं लखुजी राजांचा राग शांत झाला नि त्यांच्या हातातील तलवार हातातून सुटून खाली पडली. ते पळतच दत्ताजी राजांच्या शवाच्या ठिकाणी आले नि
त्यांनी दत्ताजी राजे असे मोठ्याने ओरडले. त्याच वेळी गोमाजी शहाजी राजे जिथं बेशुध्द होऊन पडले होते तेथे आले नि त्यांनी शहाजी राजांना उचलून आपल्या पाठगुळी  घेतले नि शहाजी राजे ज्या तंबूत थांबले होते तिकडे घेऊन आला. शहाजी राजांची ही अवस्था पाहून जिजाबाईंचे अवसान गळून पडले. गोमाजीनी त्यांना एका बाकावर झोपवले. तश्या जिजाबाई उद्गारल्या की, स्वारी काय झालं तुम्हाला ?" पण उत्तर कोण देणार ते तर बेशुध्द होते म्हणून गोमाजी काका विचारण्यासाठी जिजाबाई मागे वळल्या पण गोमाजी स्वतः सुध्दा बेशुध्द होऊन खाली पडला.
       जिजाबाईंना काय करावे ते कळेना. मग अचानक त्यांच्या
ध्यानात आलं तसे त्यांनी त्यांच्या तोंडावर पाणी मारून शुध्दीवर
आणण्यासाठी त्यांनी आपल्या आजूबाजूला पाहिले. तेव्हा त्यांची नजर घड्यावर पडली. त्या लगेच उठल्या नि घड्यातील पाणी घेऊन शहाजी राजांच्या चेहऱ्यावर शिंपडले.पण काहीच उपयोग झाला नाही. मग तेच पाणी गोमाजीच्या चेहऱ्यावर ही शिंपडले. पण तेही शुध्दीवर आले नाहीत. म्हणून जिजाबाई शहाजी राजांच्या शेजारी बसल्या नि उद्गारल्या, कुणाच्या तलवारीत इतके बळ आले ? " इतक्यात पाठी मागून
गोमाजी म्हणाले," राजे sss बस पुढे काहीच बोलले नाहीत.
जिजाबाईंनी मागे वळून पाहिले. तेव्हा  गोमाजी हळूहळू शुध्दीवर येत असल्याचे जाणवले. तश्या त्या उठून त्याच्या
जवळ आल्या नि त्याला विचारू लागल्या की , गोमाजी काका,
स्वारी शुध्दीवर अजून येत नाहीये. त्यांच्यावर शमशेर कुणी
चालविली ?" तेव्हा गोमाजी म्हणाले," माहित नाही. कारण
मी तिथं जेव्हा पोहोचलो तेव्हा राजे बेशुद्धावस्थेत सापडलेत.
त्यांना उचलून मी इथे आणले. तशी लगेच त्यांना आपल्या
आबा साहेबांची पण  आठवण आली. त्यांनी विचारले की आमचे आबा साहेब कुठे नि कसे आहेत ?" गोमाजी म्हणाले,
  "  ते आम्हाला कुठं दिसले नाहीत. "
  " शेवटी आम्ही म्हटले तेच खरं झालं. दरबार मध्यल्या कुणालातरी हे आवडले नाही आणि त्यांनीच हे घडवून आणले."
  " थोरले धनी." नकळत पटकन गोमाजी च्या मुखातून निघून
गेले. तसे जिजाबाईंनी विचारले की,गोमाजी काका तुम्ही आता
काय म्हणालेत ?" तसे गोमाजी सारवासारव करत म्हणाले,
   " मला म्हणायचं होतं की धनी मला कोठे दिसले नाहीत. परंतु
लोक म्हणत होते की त्यांच्या हातात रक्ताने माखलेली तलवार दिसली म्हणून."
  " म्हणजे ?"
  " म्हणजे काय लोकं काय पण म्हणतात आपण व्यक्तिशः
पाहिलं नाही मग विश्वास कसा ठेवायचा ?"
  " म्हणजे तुम्ही आमच्या पासून काहीतरी लपवत आहात.
सांगा, आजूबाजूचे लोक काय म्हणत होते ?"
   " त्यांनी थोरल्या धन्याचे नाव घेतले."
   " काय ? आबा साहेबांनी स्वारी वर वार केला. नाही नाही
आबा साहेब असं कदापि  करणार नाहीत. "
    " आम्ही पण तेच तर म्हणतोय की थोरले धनी असं नाहीच करणार नाहीत म्हणून. म्हणून  मी लोकांच्या बोलण्यावर विश्वास नाही केला. राजांना उचलले नि घेऊन इकडे आलो."

क्रमशः
 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.