छत्रपती शिवाजी महाराज ३१ | chhatrapati shivaji maharaj episode 31 | Author : Mahendranath prabhu
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज ३१ | chhatrapati shivaji maharaj episode 31 | Author : Mahendranath prabhu |
त्यावर दत्ताजी राजे चिडून म्हणाले," काका साहेब पण आपल्या पायावर पाय ठेवून चालणारे, ते काय बघतील. ते काही नाही आम्ही सारा बंदोबस्त करून ठेवला आहे. आणि यावेळी मी कोणाचे ही ऐकणार नाही." असे म्हणून चालता झाला. तेव्हा जगदेव आणि लखुजी जाधव त्यांच्या पाठमोरी आकृती कडे पाहतच राहिले.
पुढे
मंबाजी राजे जिजाबाई च्या दालनात आले नि म्हणाले,"
वहिनी साहेब, आम्ही ऐकलं ते खरं आहे का ?" तेव्हा जिजाबाईंनी उलट प्रश्न केला की काय ऐकलंत तुम्ही ?"
" हेच की शहाजी राजे सिंदखेड ला गेलेत म्हणून."
" हो खरंय ते. "
" पण कशा साठी गेलेत ते माहित आहे का ?"
" हो साखरेची थैली घेऊन गेलेत."
" ते फक्त निमित्त आहे हो ; पण खरे कारण माहित आहे का
तुम्हाला ?"
" म्हणजे काय म्हणावयाचे आहे तुम्हाला ?"
" नाही म्हणजे आम्हाला इतकंच म्हणावयाचे आहे की शहाजी राजे साखरेची थैली घेऊन गेले इतकंच माहित आहे
का त्या व्यतरिक्त अजून काही माहित आहे ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या की आमचे आबा साहेब मोगलांकडे गेलेत हेही माहित आहे आम्हाला."
" पण तुमचे आबा साहेब मोगलांकडे का गेलेत हे माहीत
आहे का तुम्हाला ?"
" रयते साठी गेलेत कारण आमचं सिंदखेड अश्या सिमेवर
आहे, तिथं सतत लढाया होत असतात. त्यामुळे तिकडच्या
लोकांना जीव मुठीत ठेवून जगावे लागते. म्हणून रयतेच्या
संरक्षणासाठी मोगलांकडे गेले तर बिघडले कोठे ?"
" मग तर वहिनी साहेब तुम्हाला काहीच माहीत नाही. आणि
तुम्हाला जी माहिती कुणी दिली आहे ती साफ चुकीची आहे."
" ती कशी काय ?"
" आम्ही सांगतो ." असे म्हणून मंबाजी राजांनी सारे सत्य
कथन केलं. हे शहाजी राजानी जाणीपूर्वक लपवून ठेवले होते
तेही सांगून टाकले. ते ऐकून जिजाबाईंना तर धक्काच बसला.
पण तरी देखील त्या म्हणाल्या," नाही नाही असं होणे शक्यच
नाही. कोणीतरी उगाचच आपल्यात भांडण लावून देतं. पण
असं होणं शक्यच नाही." त्यावर मंबाजी राजे म्हणाले," मग
ठीक आहे, तुमचा तुमच्या स्वारी वर फारच विश्वास आहे.नाही
का ? मग तिकडून काय वार्ता येते ती पहा. असे म्हणून मंबाजी राजे तेथून चालते झाले. जिजाबाई मात्र चिंतामय झाल्या. पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी त्यांना शहाजी राजांचे बोल आठवले की तुम्ही चिंता करू नका. आम्ही सर्वकाही ठीक करू ?" पण
तरी देखील मनाला चिंता तर वाटतेच ना ?"
सिंदखेड जाधव गढी
दत्ताजी राजे आपल्या साऱ्या सैनिकांना सांगत असतात की
कुण्या ही माणसाला गढी मध्ये प्रवेश करू देऊ नका. मग तो
नातेवाईक असला तरीही ! आमचा इशारा मिळताच त्याला
जायबंदी करा." एवढ्यात तेथे लखुजी राजे आले नि म्हणाले
की कशासाठी चालले आहे हे ? हे बघा जोपर्यंत माझ्या कडून
आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू नका." त्यावर
दत्ताजी राजे म्हणाले की, आबा साहेब, तुम्हाला अजून असं
का वाटतेय की शहाजी राजे असं काही करणार नाहीत."
" आमचा आत्मविश्वास सांगतोय की आपण जसा विचार
करतोय असं काहीही होणार नाहीये." इतक्यात नजरबाज ने
येऊन वर्दी देवून दिली की सिंदखेड च्या सीमा रेषेत भोसाल्या नि प्रवेश केला. तेव्हा त्यांना लखुजी राजांनी विचारले की त्यांच्या सोबत सैन्यबळ किती आहे ? तर तो नजर बाज म्हणाला," फार थोडे से सैन्य आहे, शहाजी राजे सोबत फक्त त्यांचे बंधू संभाजी राजे आहेत." तेव्हा लखुजी राजे म्हणाले,
" बघितलेत आम्ही काय म्हणालो होतो तुम्हाला की शहाजी राजे आम्हाला मारायला कधीच येणार नाहीत." दत्ताजी राजे,
" आबा साहेब, शहाजी राजे फार मुसद्दी आहेत हे माहीत नाही का तुम्हाला ? ते कधी काय करतील हे सांगणे कठीण आहे, म्हणून सावध असणे अत्यंत गरजेचे आहे." असे बोलून त्यांनी आपल्या सैन्याला आदेश दिला की त्या दोघांना ही दिसता क्षणीच कैद करा."
वजीरे आलम मी आण राजू ने कासिम खान ला विचारले की
" कासिम खान हमने तुम्हे एक काम सौंपा था वो हुआ क्या ?"
कासिम खान म्हणाला," हां हुजूर अब मराठे एक दुसरे को कैसे
मार काट कर गिराते हैं, वो देख लिजिए।" मी आण राजू म्हणाला," हमे तो सिर्फ मलिक अंबर की ताकत खत्म करनी
हैं, इसलिए जो मुनासिब है, वो सब करो।" कासिम खान एकदम खात्रीपूर्वक म्हणाला," आप चिंता न करे, सबकुछ वही
होगा जो आप चाहते है।"
" हां लेकिन हमे मालिक अंबर पर बिल्कुल ऐतबार नहीं हैं
क्योंकि वो इतना चालाख है की कब कैसे चाल खेलेगा वो
किसी को भी नहीं पता, इसलिए शहाजी राजे और लखुजी
राजे इन पर नजर बाज रखो अगर ऐसा लगे कि वो दोनो
आपस में दिलजमाई कर रहे है, तो दोनो को खत्म कर दो
इल्जाम भी अपने पर नहीं आएगा सब लोग यहीं कहेंगे
दोनो में कुछ कहासुनी हुई और दोनो ने गुस्से में आकर एक
दूसरे को काट गिराया ।" कासिम खान ने होकारार्थी
आपली मान डोलावली.
इतक्यातच शहाजी राजे नि संभाजी राजांनी गढी मध्ये प्रवेश केला. तसे सैन्याची त्यांना चोहिकडून घेरले. संभाजी राजांना ते अपेक्षित नव्हते. म्हणून ते जरा गोंधळलेच. म्हणून त्यांनी सरळ सरळ विचारलेच की पाहुण्याची स्वागत करण्याची ही कोणती पद्धत ?" तेव्हा शहाजी राजे म्हणाले," पण आम्हाला हे
अपेक्षित होते दादा साहेब ." त्यावर दत्ताजी राजे म्हणाले,
" म्हणजे असे म्हणा की तुमच्या अपेक्षा प्रमाणे तुमचे स्वागत झाले म्हणून. "
" दत्ताजी राजे आम्ही शस्त्र सुध्दा बाळगले नाही."
" राजे आपण बादशहा च्या दरबारात मुसाद्दी म्हणून ओळखले जातात हे काही आम्हाला माहीत नाही काय ?आणि
मारेकरी मुसद्दि असोत अथवा नसोत हा दत्ताजी कोणालाही
सोडत नाही." तेव्हा संभाजी राजे शहाजी राजांच्या कडे पाहत
म्हणाले," शहाजी राजे, तुम्ही आहात म्हणून आम्ही हे सारे
ऐकून घेत आहोत, आणि आम्ही आपल्या सोबत का आलोत
ते आता कळले का ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले," दादा
साहेब , आपल्या मनात गैर आणू नका. आणि दत्ताजी राजे
आपण पण मनात गैर आणू नका. आम्ही इथं युद्ध करायला
आलो नाही तर एक खुश खबर घेऊन आलोय." त्यावर
दत्ताजी राजे म्हणाले,"अरे वा म्हणजे तुम्ही सुद्धा आबा
साहेबां सारखे मोगलात सामील होणार तर !" लखुजी राजे
म्हणाले," दत्ताजी राजे उगाच कशाला शब्दाला शब्द वाढविता
आता ऐकलं नाही का, ते खुश खबर घेऊन आले म्हणून. चला
आंत या." तसे लगेच दत्ताजी राजे म्हणाले," नाही थांबा.
अगोदर कळू दे तरी काय खुशखबर आहे ती ?" त्यावर संभाजी
राजे चिडून म्हणाले," त्या शिवाय काय आम्ही वेरुळ वरून
सिंदखेड ला आलोय इतकं ही कळत नाहीये." तेव्हा शहाजी
राजे म्हणाले," दत्ताजी राजांचे म्हणणे रास्त आहे, त्यांच्या
मनात संशय असणारच. पण आता आम्हीच सांगतो की आपण
आता थोरले आबा साहेब होणार आहेत नि तुम्ही मामा साहेब
होणार आहात." असे म्हणताच सर्वांनी रोखलेल्या तलवारी
एकदम खाली आणल्या. दत्ताजी राजाच्या चेहऱ्यावर चा राग
क्षणात गायब झाला आणि ती जागा माया नि वात्सल्याने घेतली
दत्ताजी राजे पुढे आले नि शहाजी राजांची गळाभेट घेतली.
तेव्हा संभाजी राजेंनी सुटकेचा निःश्वास सोडला नि दोन्ही
हात कमरेवर घेतले.
वेरुळ भोसले गढ़ी
शहाजी राजे आपल्या बंधू सह सिंदखेड ला गेले आहेत
लखुजी राजांना जिवानिशी ठार मारण्यासाठी ही वार्ता हां हां म्हणता सर्वत्र पसरली होती आणि मंबाजी राजांनी जिजाबाईंना खरी माहिती दिल्या मुळे जिजाबाईंना फार चिंता लागून राहिली होती. म्हणून त्यांनी रेणुका मातेला नि शंभू महादेवाना प्रार्थना केली होती की अघटीत असं काहीच घडू देवू नकोस. पण तरी ही मनातली चिंता काही जात नाही. म्हणूनच कुणीतरी म्हटले
आहे ना की जे मन चींती ते वैरी न चिंती ! ते खरंय आता इथं
पण तेच झाले. जिजाबाईंच्या मनात नको नको ते भयानक विचार येऊ लागले . अश्या वेळी सयंम राखणे फार महत्त्वाचे
असते. आणि तेच कित्येकांना जमत नाही. जिजाबाईची
पण तीच अवस्था झाली होती. त्या एकदम चिंतामय अवस्थेत आपल्याच दालनात बसल्या आहेत . इतक्यात तिथं उमाबाई आल्या नि त्यांनी त्यांची समजूत काढली. त्या म्हणाल्या,
" तुमच्या मनात जे वाईट विचार येताहेत ना त्यांना अगोदर मनातून काढून टाका. "
" हो आम्ही प्रयत्न करत आहोत पण आम्हाला ते जमत
नाहीये." जिजाबाईनी ते कबूल केले. त्यावर उमाबाई त्यांना
म्हणाल्या की, " तुम्ही तुमच्या स्वारी ना ओळखत नाही का ? ते तुमच्या आबा साहेबांना मारायला ते जाणार आहेत काय ?"
" पण गढी मध्ये तर हीच वार्ता आहे." जिजाबाई उद्गारल्या
" लोक काय म्हणतात त्या कडे लक्ष न देता आपलं मन
काय सांगत आहे त्या कडे लक्ष द्या." उमाबाई
" तशी आम्हाला स्वारीची खात्री आहे नि आबा साहेबांची
पण ते दोघेही कधी कधी अनपेक्षित वागतात. हे खरंय. पण
काहीतरी मधला मार्ग शोधून काढतीलच याची खात्री आहे."
" आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथं आमच्या आत्या बाई आहेत. त्या असं काहीही होऊ देणार नाहीत."
" खरंय. आम्ही आऊ साहेबांना विसरलो होतोच की आमच्या आऊ साहेब असं काहीही होऊ देणार नाहीत. याची खात्री आहे आम्हाला."
" त्यांना जेव्हा कळेल की त्यांची लाडकी लेक आऊ होणार
आहे, तेव्हा त्यांना किती आनंद होईल याची कल्पना करणे
पण शक्य होणार नाही."
" हो खरंय. पण आम्हाला कळत नाहीये की अश्या आनंदाच्या
प्रसंगी का नको नको ती संकटे येताहेत ?"
" जिजा तुम्हीच आम्हाला धीर देता नि तुम्हीच असं बोलता
तेव्हा मनातील हे सगळे विचार आधी काढून टाका. आणि फक्त
हे लक्षात ठेवा की तुम्ही आऊ होणार आहात तर तुम्हाला सदासर्वदा आनंदित राहायला हवंय. कारण गर्भावर त्याचे
परिणाम होत असतात. तेव्हा नेहमी आनंदित राहण्याचा प्रयत्न
करा. तेच यावेळी तुमचे प्रथम कर्तव्य आहे. कळलं ?" तेव्हा
जिजाबाईंनी होकारार्थी मान डोलावली.
सिंदखेड गढी
तिकडे सिंदखेड ला लखुजी राजांनी ही गोड बातमी आपल्या तिन्ही बाई साहेबांना सांगितली. ती गोड बातमी ऐकून त्या तिन्ही
बाई साहेब अत्यंत खुश झाल्या. भागीरथी बाईंचे तर म्हणणे होते की आपण सर्वांनी जिजाबाईंना भेटायला वेरुळ ला जावे. पण त्या साठी लखुजी राजे राजी नसतात. त्यांचे म्हणणे असे असते की आम्हाला सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. तुमच्या सारखं नाही ना ?" तेव्हा धाकट्या बाईसाहेब यमुना बाई म्हणाल्या, जिजाची अशी खबर ऐकून सुध्दा ?"त्यावर लखुजी राजे म्हणाले," होय. कारण आता आम्ही मोगलाईत आहोत आणि जिजा निजामशाहीत तेव्हा विचार करूनच पाऊले उचलली पाहिजेत." असे म्हणून ते तेथून निघून गेले. तेव्हा भागीरथी बाई साहेब यमुना बाईना म्हणाल्या की आता तुम्हीच स्वारी ची समजूत काढा." तेव्हा यमुना बाई साहेब उद्गारल्या ,
" आमच्यावर बाई काय ढकलता ? कारभाराचा प्रश्न आहे तो, आमचे ऐकणार नाहीत ते. पण थोरल्या बाई साहेबांचे ते नक्की ऐकतील."
" खरं सांगू या क्षणी आम्हाला काहीच सुचत नाहीये. कारभार
निजामशाही, मोगलशाही या पैकी काहीही सुचत नाही. या क्षणी
फक्त आम्हाला आमच्या जिजा दिसताहेत."
" मग हेच कारण सांगा की, एकदम हट्टच धरा. मग बघा कसे ऐकतील ते."
" हो पाहते प्रयत्न करून."
" हो तुम्ही करा तुमचं काम आणि आम्ही करतो आमचं काम
म्हणजे तयारीला लागतो. म्हणजे तिकडे जाणार तर जिजा
साठी त्यांच्या आवडीचे चार पदार्थ तरी बनवायला नकोत का ?" भागीरथी बाई उद्गारल्या. तश्या त्या दोघींनी सुध्दा
आपली समत्ती दर्शविली. त्या त्यानंतर त्या दोघी जिजाच्या
आवडीचे पदार्थ बनवायच्या तयारीला लागल्या देखील.
शहाजी राजे दालनात एकटेच होते. दरवाजा कडे त्यांची पाठ
होती. इतक्यात लखुजी राजांनी त्यांच्या दालनात प्रवेश केला.
पावलांची चाहूल लागताच शहाजी राजे दचकून गर्कन मागे वळले. त्यांना दचकलेले पाहून लखुजी राजे उद्गारले," मघाशी
तर इतक्या भाले तलवारी समोर ही न घाबरता शांत पने उभे
होता , मग आता काय झाले ? तुम्हाला असं तर वाटलं नाही ना
की आम्ही तुमच्यावर हल्ला करायला आलोय म्हणून ." त्यावर शहाजी राजे स्मित हास्य करत म्हणाले," अजिबात नाही. कारण आम्हाला खात्री आहे, आपण असं कदापि करणार नाही. परंतु सदानकदा सावध तर असायलाच पाहिजे ? ना जाणो तुमच्या जागी दुसरा कोणी आला म्हणजे ? ही झाली आताची गोष्ट आता मघाशी आम्ही शांत का होतो ते सांगतो. आम्हाला पूर्ण खात्री होती की आपल्या आदेशाशिवाय कुणी ही आमच्या वर हत्यार चालवणार नाही."
" वाहवा राजे आम्ही मानलं तुमच्या मुसद्दिपणाला.बसा."
शहाजी राजे बसले तसे लखुजी राजे पण बसले नि शहाजी
राजांना म्हणाले," आम्ही एक आमचं निरीक्षण नोंदवू का ?"
" अवश्य !"
" आपण जितके शांत दिसता तितकेच सावध. बरोबर ना ?"
" अगदी बरोबर, आता आम्ही तुमच्या बाबत आमचे निरीक्षण
नोंदवित आहोत ,अर्थात आपली परवानगी असेल तर!"
" परवानगी आहे, बोला."
" तुम्ही आजोबा होणार ह्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर
कमीच आहे, पण दडपण जास्त आहे, मान्य आहे ?"
" एकदम बरोबर."
" मला असं वाटतं की आपण मन मोकळे पणाने बोलावं."
" त्या अगोदर आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितोय आणि
ते म्हणजे तुम्ही फक्त इथं साखर घेऊन आले नाहीत तर आम्हाला मारण्यासाठी आला आहात , म्हणजे तसे तुम्हाला
फर्मान आहे, बरोबर ?"
" होय."
" मग काय विचार आहे फर्मान पुरे करणार का बंड खोरी
करणार ? तशी पण आम्ही आमची इच्छा तुमच्या समोर
अगोदरच जाहीर केली होती. मोगलाईत येण्याची !"
" पण आम्ही त्या उलट म्हणजे आपल्याला निजामशाहीत
परत घेऊन जाण्यासाठी आलोय."
" पण फर्मान तर आम्हाला मृत्यू देंड देण्याचे आहे."
" होय. परंतु शंभू महादेवाच्या कृपेने हे आम्हाला आता
सुचलं. ते पण एकदम मुळाशी गेल्या नंतर..?"
" मुळाशी...मी नाही समजलो."
" आता बघा तुम्हीच विचार करा निजामशाहीत होता. तेव्हा
तुम्ही बारा हजार मनसबदार होता आणि इथं फक्त तुम्हाला पांच हजारी..?"
" नाही. असं नाही होणार."
" असंच झालंय तुम्हीच विचार करा. तुमच्या जवळ सध्या असलेला फौज फाट्यात वाढ झाली आहे का ? नाही ना ? मग
कशावरून समजायचं की तुम्हाला जास्त मनसबदारी देण्यात
आली आहे, म्हणून सांगतोय निजाम शाहीत परत या."
" पण राजे आम्ही निजामशाहीत कसे बरे येऊ शकतो, कारण आमच्या वर मलिक अंबर वर हल्ला केल्याचा संशय
आहे, मग तिथं येणे रास्त होईल का ?"
" आता त्यांच्या बाजूने विचार करा, सध्या त्यांना आपली
गरज आहे.आपल्याला त्यांची गरज नाहीये. आणि मराठ्यांना
एकत्र राहण्यातच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. आपण आपसात जर लढत राहिलो तर त्यांचेच फावणार आहे . मग असं करू द्यायचे आहे का ?"
" ते पटतंय आम्हाला पण आम्हाला मारण्याचे फर्मान वजीरे
आलम ने दिले तुम्हाला हे विसरायचं का ?"
" आम्हाला काय वाटतंय ते माहितेय का ? हे फर्मान आपण मोगलांकडे जाऊन त्यांची ताकद वाढत असल्या मुळे काढले
असावे."
" ह्यात खरे काय आहे , हे ना तुम्हाला माहित आहे ना
आम्हाला. परंतु तुमच्या बोलण्याने आम्हाला हुरूप मात्र नक्की
आला." लखुजी राजे उद्गारले.
भोसले गढी
जिजाबाईंना झोप येत नव्हती. त्यांना सारखे तेच आठवत
होते जे मंबाजी राजांनी त्यांना सांगितले होते.जाऊबाई त्यांच्या शेजारी बसल्या होत्या नि त्यांना समजावत होत्या की तुम्ही आता झोपा. पण त्यांना शहाजी राजे नि आबासाहेब यांची चिंता लागली होती, म्हणून की काय त्या म्हणाल्या," गोमाजी काका ना बोलवा नि सांगा की आम्हाला आता निघायचं आहे."
" कुठं निघायचंय."
" सिंदखेड ला ."
" इतक्या रात्री ?"
" हां !"
" अहो जिजाबाई इतक्या रात्री कुणी बाहेर जाते का ? शिवाय
तुम्ही आता एकट्या नाही राहिल्यात दोन जिवाच्या आहात तुम्ही ! अश्या परिस्थिती मध्ये तुम्हाला कोठे ही जायची मनाई
आहे."
" जाऊबाई साहेब , आम्हाला तुमच्या भावना कळत नाही अश्यातला भाग नाहीये. परंतु आम्हाला त्या दोघांची जास्त काळजी वाटते."
" मग आपण असं करू, सकाळ झाली ना ? अगोदर सासु
बाईंची परवानगी घेऊ मगच सिंदखेड ला जाऊ ! म्हणजे आम्ही
सुध्दा तुमच्या सोबत येऊ. म्हणून आता निजा." संभाजी राजेंच्या पत्नीने कशीतरी त्यांची समजूत घातली.
सिंदखेड जाधवांची गढी
म्हाळसा बाई म्हणाल्या," आमची सर्व तयारी झाली आहे,
फक्त आपल्या परवानगी ची आम्ही वाट पाहत आहोत."
दत्ताजी राजे म्हणाले," मग तर आम्ही देखील येणार जिजाना
भेटायला." लखुजी राजे मात्र या गोष्टीस तयार नव्हते. म्हणजे
त्यांना असं वाटत होतं की आपल्याशी धोकेबाजी होऊ शकते.
म्हणजे दुश्मनानी अगोदरच आपल्यासाठी सापळा लावला असेल तर आपण स्वतःहून अलगद त्या सापळ्यात अडकु."
पण म्हाळसा बाई ऐकायला तयारच नव्हता. त्यांचे म्हणणे
होते की आम्ही जिजाच्या आऊ साहेब आहोत, आता काही
जरी मध्ये रस्त्यात आडवे आले तरी आम्ही माघार घेणार नाही."
दत्ताजी राजे म्हणाले," आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला
भेटायला जाणारच." तसे लखुजी जाधव म्हणाले ," जिजा
आमच्या लाडक्या नाहीत का ? आमच्या काळजाच्या तुकडा
आहेत त्या." म्हाळसा बाई म्हणाल्या," मग का नकोय म्हणताय
चला आपण सर्वजणच जाऊ काय ?" त्या सर्वांचा हट्ट पाहून
लखुजी जाधवांनी शेवटी होकार दिलाच. तसे सर्वजण खुश झाले.
दौलताबाद मलिक अंबर चे दालन
मलिक अंबर आणि त्यांचा फर्जन फतेह खान बेसब्ररीने
वाट पाहत होते की कधी एकदा लखुजी राजे स्वर्गवासी झाल्याची खबर येते. पण त्यांच्या पदरी निराशाच पडते.
फतेह खान आपल्या बापाला म्हणाला," अब्बा हुजूर अब तक
तो लखुजी राजे इंतकाल होने की खबर आनी चाहिए थी लेकिन
अभी तक कोई खबर नहीं आई ।"
" हम भी यही सोच रहे है ।"
" कहीं ऐसा तो नहीं की ये मराठे कोई नई चाल चल रहे है।"
" ऐसा वो हरगिज़ नहीं कर सकते।"
" क्यों नहीं कर सकते ?"
" क्योंकि हमारा तर्जुबा यही कहता की वो ऐसा हरगिज नहीं
कर सकते ।"
" और अगर ऐसा ही किया तो ?"
" तो उसके लिए भी हमने सोच रखा है, बेटे हम यूंही वजीरे
आलम नहीं है । हम जो कुछ करते है, बहुत ही सोच समझकर
करते है । इसलिए थोड़ा सब्र करो क्योंकि सब्र का फल मीठा
होता है ।"
भोसले गढी
जिजाबाई आपल्या अंगावरील अलंकार उतरवत असतात.
इतक्यात त्यांना शाहजी राजे आपल्या पाठीमागे उभे आहेत
असे दिसले. तसे त्यांच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर एक सुखद
लहर उमटते. त्या म्हणाल्या," तुम्ही आलात बरं झालं आमच्या
मनाला की किती घोर लावून गेला होता ." तसे शहाजी राजे म्हणाले, " आमच्या सोबत कोण आलंय ते पाहिलंत का ?" असे म्हणताच लखुजी राजे त्यांच्या समोर आले. तसा त्यांच्या आनंद पारावर राहिला नाही. त्या पळतच जाऊन त्यांना बिलगावे असे त्यांना वाटत असतानाच अचानक त्यांच्या नजरे समोरून दोन्ही चेहरे गायब झाले . म्हणजे एकदरित त्यांना तो भास झाला होता. व्यक्तिशः ते दोघे काही तेथे आलेले नव्हते. हे जाणवतच त्यांचे मन परत उदास झाले. त्या स्वतःशीच म्हणाल्या की आमच्या सोबत असे भास का होऊ लागले आहेत ? इतक्यात पुन्हा शहाजी राजेंच्या चेहर त्यांना दिसला. त्यांना वाटले की हा देखील भासच असावा. म्हणून त्यांनी वळून देखील पाहिले नाही. तसे शहाजी राजे म्हणाले," हे काय आम्ही आल्याची साधी दख्खल देखील घेतली नाही. आम्हाला वाटलं होतं की आमच्या वाटेकडे तुम्ही डोळे लावून बसला असाल. पण इथं तर आम्ही वेगळंच वातावरण पाहतोय." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," नाही नाही हा आमचा भास असावा." शहाजी राजे म्हणाले," अहो आम्ही खरंच आलोय." जिजाबाई उद्गारल्या," आता तुम्ही म्हणाल की आम्ही तुमच्या आबा साहेबांना पण सोबत आणलंय." तसे लखुजी राजे खरोखरच समोर येत म्हणाले," अरे वा म्हणजे आमच्या जिजाना विद्या येते की काय ?"
" नाही नाही हा आमचा भास आहे."
" अहो, बघा तरी कोण कोण आलंय ते." असे लखुजी राजे
म्हणाले तसे एक एक करून सर्वजण पुढे आले. जिजाबाई
आपल्या स्वारी सोबत आबा साहेब, तिन्ही आऊ साहेब, आणि
दादा साहेबांना पाहून एकदम खुश होतात. पण हा भास तर
नाही ना अशी शंका मनात येऊन गेली म्हणून त्यांनी स्वतःच्या
हाताला चिमटा काढून खात्री करून घेतली की हा भास नाही.
आणि मग त्या पटकन मागे वळल्या आणि लखुजी राजेंच्या जवळ गेल्या नि म्हणाल्या," आबा साहेब, तुम्ही खरंच आले आहेत का ?"
" म्हणजे अजून विश्वास बसत नाही का ?"
" आम्हाला सारखे भासच होत होते की तुम्ही येणार आहात
म्हणून."
" हो का ? मग आम्ही खरोखरच आलोय की." तश्या जिजाबाई त्यांच्या पायी पडण्यासाठी त्या खाली वाकणार तोच म्हाळसा बाई म्हणाल्या," आता खाली वाकायचे नाही." असे म्हणताच त्या आपल्या आबा साहेबांना बिलागल्या. त्यानंतर म्हाळसा बाईना बिलगल्या, तश्या म्हाळसा बाईंनी त्यांना प्रेमाने गोंजरले. त्यानंतर भागीरथी बाईंची गळाभेट घेतली. तेव्हा त्या म्हणाल्या," थोरल्या बाईच्या चेहऱ्यावर जिजा पोटात असताना
जसे तेज दिसत होते अगदी तसेच तेज जिजाच्या चेहऱ्यावर दिसत आहे." त्यानंतर यमुनाबाईची गळाभेट घेतली. तेव्हा यमुना बाईंनी आपल्या पापणीची काळी टिट जिजा बाईंच्या काना जवळ लावत म्हणाल्या ," आमच्या जिजाना कोणाचीही नजर लागू नये." आणि शेवटी दत्ताजी राजे जवळ जिजाबाई गेल्या तसे दत्ताजी राजे म्हणाले," जिजा आम्ही आपले शब्द मागे घ्यायला आलो आहोत. तुमची नि तुमच्या बाळाची काळजी आम्ही अवश्य घेऊ इतकंच नाही तर त्याला युद्ध कलेचे ज्ञान आम्ही देवू." यमुना बाई म्हणाल्या," बघितलेत, रेणुका मातेला
नवस केल्या बरोबर लगेच प्रचिती आली." तश्या भागीरथी बाई म्हणाल्या," जेव्हा इथं यायला निघाल्या तेव्हा आम्ही म्हंटले होते की आता लवकरच पाळणा हलू दे, पण जिजा आणि राजे इतके आज्ञा धारक असतील असे वाटले नव्हते. असे म्हणताच जिजाबाईंना एकदम लाजल्या सारखे झाले. तसे सर्वजण हसू लागले. तसे शहाजी राजे म्हणाले," चला, आऊ साहेब आपल्या सर्वांची वाट पाहत आहेत." भागीरथी बाई म्हणाल्या, बघितलंत कसा लगेच विषय बदलत आहेत." तसे पुन्हा सर्वजण हसले.
" चला तर !" लखुजी राजे उद्गारले. त्यानंतर म्हाळसा बाई
मात्र आपल्या लेकी सोबत थांबल्या. आणि बाकीचे सगळे जण
गेले. जिजाबाई आपल्या माते कडे पाहत म्हणाल्या," आऊ
साहेब, आपले डोळे सारखे का पाणावत आहेत ?" त्यावर
म्हाळसा बाई म्हणाल्या," हे आनंदाचे अश्रू आहेत, तुम्हाला
आम्ही आमच्या डोळ्यात साठवून घेत आहोत. काल परवा
पर्यंत तुम्ही लहान होता नि आता इतक्या मोठ्या झाल्या आहेत
की आता स्वतः आऊ होणार आहात.यावर आमचा विश्वासच
बसत नाहीये. म्हणून तुमचे हे गोजिरे रूप आम्ही साठवून घेत
आहोत." इतक्यात गोदा आत आली गोदाला पाहून जिजाबाई
तिच्या जवळ आल्या नि म्हटले की, गोदा तू आलीस होय."
" हां जिजा अक्का मी तुमची सावली परत आली आहे
तुमच्या कडे. आता मी तुम्हाला काही करू देणार नाही."
तशी जिजाबाईंनी गोदाला गळाभेट दिली.
मंबाजी राजे आणि त्यांच्या आऊ साहेब सोयराबाई मध्ये
वार्ता सुरू आहेत. लखुजी राजे आणि त्यांचा पूर्ण परिवार
वेरुळ ला आल्याचे पाहून मंबाजी राजे म्हणाले," आऊ साहेब
आम्ही हे काय पाहत आहोत." त्यावर सोयरा बाई म्हणाल्या,
" जिजाबाई पहिलट करीन आहेत ना, मग असं होणारच."
" पण लखुजी राजे इथं आल्याची खबर वजीरे आलम ला
समजली तर त्याचा त्रास आपल्या सर्वांनाच होईल."
" हे सर्वजण इथं आलेत त्यावरून आम्हाला वाटत नाही
की लखुजी जाधवांना मारण्याची खबर खरी होती."
" अहो, आऊ साहेब, आम्हाला ही खबर स्वतः कासिम खान
ने दिली आणि कासिम खान ला मी आण राजू ने दिली मग
खोटी कशी असेल ?"
" खोटीच असणार ती. नाहीतर इथं आले असते का सगळे ?"
" हुं आम्हाला देखील ही शंका आलीच होती. तसा इथं
कोणाचाच भरवसा देता येत नाही. आमच्या बंधू राजांनी काय
शक्कल लढविली असेल तेथे ती कोण जाणे ?"
" कोणी शहाजी राजांनी ?" तशी मंबाजी राजांनी मान
डोलावली. तश्या त्या पुढे म्हणाल्या," खरे आहे तुमचं ... इथं
कोणाचाच भरवसा देता येत नाहीये. इथं आपल्याच नातलगांच्या भरवसा देता येत नाही तिथं मी आण राजू चा
भरवसा कसा देणार, पण जाऊ देत, सर्वजण खुश आहेत ना, मग आपण ही त्यात सामील व्हायचं काय ?"
शहाजी राजांनी पाठविलेला लखोटा मलिक अंबर रागाने
फेकून दिले. तसे फतेह खान ने विचारले," क्या हुआ अब्बा
हुजूर लखोटा क्यों फेक दिया ? आपने तो लखुजी राजे को
मारने का फरमान दिया था ? क्या उन्होंने काम को अंजाम दिया ?"
" बाप कौन है ? और सवाल किसको कर रहे हो ? पढ़ो
इसमें क्या लिखा है ।" फतेह खान ने लखोटा उचलला आणि
वाचले. त्या मध्ये लिहिले होते की, वजीरे आलम का परचम
बुलंद रहे . लखुजी राजे निजामशाही में वापस आने के लिए
राजी हो गए है, हम उन्हे बादशहा हजरत के सामने पेश करने वाले है ।" लखोटा वाचून फतेह खान चिडला नि म्हणाला,
" आपने जो कहा वो तो उन्होंने किया नहीं इन्हे इनकी कियेकी सजा देनी चाहिए।" मालिक अंबर म्हणाला," आज गलती से सही लेकिन सही फरमा रहे हो । "
" अब्बा हुजूर इन दोनो को दरबार में आने तो दो,हम उन्हे सजा देंगे ।"
" आने तो दो, उसके लिए दो दिन लगेंगे और उन दो दिनों
में कुछ भी हो सकता है।"
वेरुल गढ़ी
शहाजी राजाकडे एकटक जिजाबाई पाहतच राहतात. तेव्हा
शहाजी राजांनी विचारले की असे काय पाहताय आमच्या कडे." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आम्ही आपल्याला अजून
पूर्त ओळखलेच नाही." शहाजी राजे म्हणाले," तुम्ही तर
आम्हाला चांगलेच ओळखता." त्यावर जिजाबाई म्हणाल्या,
" नाही. आम्ही आपल्याला ओळखूच शकणार नाही कधी.
इतका कठीण प्रश्न इतक्या सुलभ पने कशा काय तुम्ही सोडवू
शकता ? आम्ही अशी कल्पना सुध्दा केली नव्हती. आणि खरं
सांगायचं तर आमच्या कडे तुमची प्रशंसा करायला शब्द पण
नाहीयेत." शहाजी राजे म्हणाले," आज आमची फार तारीफ
सुरू आहे. क्या बात है ." जिजाबाई म्हणाल्या," ज्यांना
मारण्याचं फर्मान दिलं गेलं त्यांनाच परत निजामशाहीत घेऊन
येणे हे किमया फक्त तुम्हीच करू शकता."
" एक विसरता..... तुम्ही मध्ये आहात."
" आम्हाला पुसट शी चाहूल ही लागू दिली नव्हती तुम्ही. मग
आम्ही कसे काय मध्ये ?"
" जगातल्या प्रत्येक लेकीचे आपल्या जन्म दात्यावर किती
प्रेम असतं हे आम्हाला कुणी सांगायला हवे आहे का ? मग
आम्ही कसे काय वेड वाकडे करू ? सुवर्ण मद्य काढणारच
ना ?"
" आमच्या वर जीव आहे, म्हणून तुम्ही असं केलंत का ? .....आम्हाला हे वक्तव्य अर्धवट वाटते."
" आमच्या कडूनच वदवून घेण्यात तुम्हाला सुख वाटतअसेल
तर ऐका. " तशा त्या गालातल्या गालात हसल्या. तसे ते पुढे
म्हणाले ," मग पूर्ण वाक्यात ऐका तर , जसा तुमचा त्यांच्यात
जीव अडकला आहे, तसा आमचा जीव तुमच्यात अडकला आहे."
" हे वक्तव्य तुमच्या तोंडून ऐकण्यात आम्हाला जे सुख लाभल ते अन्य कशात नाही. तुमच्या या शब्दावर तुमच्या
वरून जीव ओवाळून टाकावा असे वाटते." तसे शहाजी राजांनी
जिजाबाईंना आपल्या मिठीत घेतले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा