Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

रामायण -३ | ramayana episode 3 | author :- Mahendranath prabhu

रामायण -३
रामायण -३

 


    महर्षी वशिष्ठ म्हणाले ," आज आश्रमातील तुम्हां लोकांचा अंतिम दिवस आहे. आज मी तुम्हाला एक अंतिम
पाठ शिकविणार आहे."असे म्हणून किंचित थांबले. क्षणभर वेळाने ते पुढे म्हणाले ," आज मी तुम्हां साऱ्यांना गुरूदक्षिणा या ऋणातून मुक्त करत आहे. या पुढे तुम्हांला या वशिष्ठांची आज्ञा पाळायची गरज नाहीये.  स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घ्यायला मोकळे आहात. मुख्य सांगायचे म्हणजे शास्त्रांच्या नियमानुसार मनुष्याला एकूण तीन ऋण फेडायचे असतात. आता ते ऋण कोणते ते ऐका. देव ऋण , पितृ ऋण आणि आचार्य ऋण , त्यापैकी देव ऋण भक्ती आणि यज्ञा मार्फत फेडले जाऊ शकते. शिवाय समस्त प्राणी मात्रा मध्ये जेव्हा तुम्हां लोकांना ईश्वर दिसू लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमची पूजा ईश्वरापर्यंत पोहोचली असे समजावे. पितृ ऋण म्हणजे आपल्या सुखाचा विचार न करता आपल्या आई-वडिलांची सेवा करणे , मृत माता पित्याचे श्राद्ध आणि तर्पण करणे ह्यालाच पितृ ऋण फेडणे म्हणतात. आणि आचार्य ऋण म्हणजे गुरू दक्षिणा तर माझी गुरू दक्षिणा ही असेल की तुम्ही सर्वांनी आपल्या कर्मा ने नि आचरणाने लोकांच्या मनावर आपला एक आदर्श पणाचा एक ठसा उमटवा. जेणे करून समस्त लोक तुमचं आदर्श पणाचे अनुकरण करतील. आपसातील वैरभाव विसरून त्यांच्या मध्ये प्रेम भावना निर्माण होईल. हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा असेल. आणि ज्या ज्या वेळी तुम्ही माझं स्मरण कराल त्या त्या वेळी मी तुमच्या पाशी अवश्य जाणीव होईल तुम्हाला." असे म्हटल्यानंतर सर्वांनी महर्षी वशिष्ठाना वंदन केले. त्यानंतर सर्वजण गुरुमाता च्या आश्रमात गेले नि प्रभू श्रीरामानी त्याना वंदन करत म्हटलं ," गुरुमाता , आपण आम्हाला मातृप्रेम दिले त्याबद्दल आमचा  आपल्याला सादर प्रणाम ! " गुरुमाते ने  त्या सर्वांना आशीर्वाद दिला. तसे प्रभू श्राराम पुढे म्हणाले," गुरुमाता कळत नकळत जर आमच्या कडून काही अपराध झाला असेल तर आम्हाला त्याबद्दल क्षमा  करावी." त्यावर गुरुमाता म्हणाल्या ," राम तुझ्या कडून अपराध घडणे तर शक्यच नाहीये. उलट तू आम्हांला सोडून चालला आहेस त्याबद्दल आम्हाला फार वाईटच वाटतंय.परंतु  तुला इथून
जाणे ही आवश्यक असल्यामुळे आम्ही तुला अडविणार
देखील नाही. परंतु तुझी आम्हाला आठवण मात्र आल्या शिवाय राहणार नाहीये. कारण तुझे स्थान आमच्या मन मंदिरात कोरले गेले आहे. " त्याच वेळी आर्यसुमन्त तेथे आले नि गुरुमाते ला वंदन करत म्हणाले,  " गुरुमाता , आर्यसुमन्तचा आपल्याला सादर प्रणाम !" गुरुमाता आशीर्वाद देत  म्हणाल्या, " कल्याण असो !" तेव्हा आर्यसुमन्त म्हणाले ," गुरुमाता, अयोध्याच्या महाराणी कौशल्या यांनी आपल्या  चारही पुत्रांची राजवस्त्रे आणि आपल्यासाठी उपहार पाठविले आहेत.  त्यांचा स्वीकार करावे आणि राजकुमारांना अयोध्येला  घेऊन  जाण्याची परवानगी द्यावी." तेव्हा गुरुमाता म्हणाल्या , " कौशल्या महाराणी ना माझा धन्यवाद सांगा." असे म्हणून प्रभू श्रीरामाकडे पाहत त्या म्हणाल्या , " श्रीराम ,  आर्यसुमन्त हे अयोध्येचे महामंत्रीच नाहीतर आपल्या पित्याचे बालपणाचे मित्र देखील आहेत. त्याना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा." तेव्हा प्रभू श्रीरामानी हात जोडून नमस्कार करत म्हटलं ," प्रणाम आर्यसुमंत !" तेव्हा आर्यसुमंत उद्गारले, " चिरंजीवी भव , यशस्वी भव !"
    तेव्हा गुरुमाता म्हणाल्या," आर्यसुमन्त , राजकुमाराना
राजवस्त्र परिधान  करण्यासाठी आमची मदत करा.  नाहीतर महाराणी कौशल्या म्हणतील की राजकुमाराना साधारण मनुष्या प्रमाणे सजवून पाठविले." आर्यसुमन्त यांनी त्याना मदत केली. सर्व राजकुमारानी राजवस्त्र परिधान केली. त्यानंतर  ते सर्वजण रथात बसले. तसा रथ अयोध्येस जायला निघाला. जसा रथ अयोध्या नगरी च्या
द्वारी आला ,  तसा अयोध्या वासीयांनी चार ही राजकुमारावर फुलांचा वर्षाव केला नि  राजकुमारांचा जयजयकार केला. रथ जसा पुढे चालत होता तशी त्या रथावर फुलांची उधळण केली जात होती. रथ राजमहाल जवळ येता होता. त्यावेळी  नगर वाशियानी राजकुमारांवर
फुलांची करत असलेली उधळण पाहून त्या  पळतच आपापल्या महाराण्यांकडे गेल्या नि  संदेश दिला की राजकुमार द्वारापाशी आले आहेत. महाराणी कौशल्याच्या दासीने जेव्हा राजकुमार राजमहाल जवळ आल्याची सूचना कौशल्या महाराणीना दिली. तेव्हा त्या इतक्या खुश झाल्या की त्यांना कळत नव्हतं की अश्या वेळी काय करावे ? म्हणजे असेच पळत जाऊन सर्व राजकुमारांची दृष्टी काढावी ?  का ? त्यांच्या समोर आपण जाऊच नये. कारण न जाणो आपलीच नजर त्याना लागली तर ? अशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. तर दुसरीकडे कैकेयी महाराणी ची दासी मंथरा फक्त भरताला पाहून पळतच महाराणी कैकयी ला खुशखबर द्यायला गेली आणि खबर दिली ही ! परंतु त्यावेळी कैकेयी महाराणी ने भरत ची
चौकशी न करता त्यांनी विचारले ," मंथरा , राम कसा आहे ?" त्यावर  मंथरा उद्गारली ," मी रामला पाहिलंच नाही, मी फक्त नि फक्त भरतलाच पाहत होते."

    श्रीराम आपल्या बंधू सहित रथातून खाली उतरले नि
महर्षी वशिष्ठांच्या मागोमाग निघाले. महर्षी विशिष्ठ त्या
चार ही राजकुमाराना घेऊन महाराज दशरथांच्या राज महाली जायला निघाले. तेव्हा महाराणी कैकेयी आणि सुमित्रा ह्या दोघीजणी महाराणी कौशल्या यांच्या महाली आल्या नि त्या म्हणाल्या ," राजकुमाराना अगोदर
मातोश्रीच्या महाली आणायला हवं होतं, परंतु गुरुदेव त्याना महाराजांच्या कक्षेत  घेऊन जात आहेत तर आपण ही जाऊ या का महाराजांच्या कक्षेत ?" तेव्हा महाराणी कौशल्या म्हणाल्या ," गुरुदेव काय म्हणतील ? तेव्हा जरा शांत रहा." महर्षी वशिष्ठ त्या चार ही भावंडाना महाराज दशरथा च्या महाली घेऊन गेले. तेव्हा प्रभू श्रीरामाने खाली वाकून महाराजांचे चरणस्पर्श करत म्हटले," मी आपला पुत्र राम आपल्या बंधू सहित उपस्थित झालो आहे. आपली सेवा करण्यासाठीच !  आणि आपल्या आज्ञाचे पालन कारण करण्यासाठीही आम्ही सदैव तयार आहोत." त्यावर महाराज दशरथ म्हणाले ," तुम्हां सर्वांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी माझी प्रार्थना !" असे म्हणून महर्षी वशिष्ठांकडे पाहत महाराज दशरथ म्हणाले," गुरुदेव , आपण माझी चार ही मनोरथ पूर्ण केलीत. त्याबद्दल आपणास माझा प्रणाम !"
     " महाराज आपण ह्या  चारजणांना बालकांच्या स्वरूपात माझ्या स्वाधीन केले होते परंतु आता त्या बालकांचे रूपांतर तरुणा मध्ये झाले आहे. मी आपल्या चार ही पुत्राना वेद, वेदांत, अर्थशास्त्र , समाज शास्त्र  वगैरे
विद्या मध्ये पारंगत केले आहे." तेवढ्यात तेथे तिन्ही महाराण्या आल्या. तेव्हा महाराणी कौशल्या प्रथम गुदेवांची क्षमा मागून म्हणाल्या, " आम्हाला क्षमा करा गुरुदेव, आम्ही आपल्या पुत्रांना भेटण्यासाठी इतक्या आतुर झालो होतो की आम्ही अजून वाट पाहू नाही शकलो, म्हणून आम्ही इथं येण्याचा अपराध केला." त्यावर महर्षी वशिष्ठ म्हणाले," नाही महाराणी आपल्या कडून कोणताही अपराध नाही घडला. उलट आम्हीच विसरलो
होतो की अगोदर मातांना पुत्रांची भेट घडवायला पाहिजे.
कारण पुत्रावर प्रथम त्यांच्या मातेचा असतो. नाही का ?
परंतु राजकीय धर्म त्याहून मोठा समजून आम्ही राज कुमाराना महाराजांच्या महाली घेऊन आलो." असे म्हणून
महर्षी वशिष्ठ राम कडे पाहत म्हणाले ," राम सर्वात उच्च स्थान जर कोणते असेल तर ते जन्म देणाऱ्या मातेचे असते. म्हणून प्रथम मातेला वंदन करायला हवे." असे म्हणताच श्रीराम  तिन्ही मातोश्री जवळ गेले. परंतु प्रथम चरणस्पर्श आपल्या मातेचे न करता कैकेयी मातेचे चरणस्पर्श केले. महाराणी कैकेयी ने त्याना आशीर्वाद दिले
नि  त्याला आपल्या गळ्याला लावले. त्यानंतर श्रीरामानी सुमित्रा मातेचे चरणस्पर्श केले. तसे सुमित्रा मातेने सुध्दा त्याचा दंडाना पकडून वर उठवून आपल्या हृदयाशी धरले. त्यानंतर शेवटी श्रीरामानी आपल्या जन्मदात्रीचे अर्थात महाराणी कौशल्याचे चरणस्पर्श केले. जन्मदात्री ने त्याच्या दोन्ही बाहुना पकडून वर उठविले नि आपल्या हृदयापाशी धरले.

      भोजनाची वेळ झाली तशी सर्वजण भोजन करायला
बसले. तेव्हा माता आपल्या पुत्रांना आग्रह करून भोजन
भरवीत होत्या. तेव्हा महाराज म्हणाले," हे काय भोजन
भरवायला ते काय आता छोटे बाळ आहेत का ?" तेव्हा
महाराणी कौशल्या म्हणाल्या ," मोठे झालेत ते केवळ आपल्यासाठी आमच्यासाठी तर ते सदैव बालकच राहणार." त्यावर कोणीच काही बोलले नाहीत.

      दुसऱ्या दिवशी सर्वांना उठणे सोबत  चंदनाचा लेप लावून स्नान घालण्यात आले. तेव्हा राजकुमार लक्ष्मण म्हणाला ," पुरे करा किती लावताय चंदन ?" तेव्हा माता कैकयी म्हणाली ," आमच्या राजकुमारांची शरीरे चंदन प्रमाणे सुंदर दिसायला पाहिजेत." तेव्हा राजकुमार लक्ष्मण म्हणाला ," चंदन सारखे सुंदर परंतु आमचे गुरुदेव म्हणाले की राजकुमारांची शरीरे वज्रा सारखी कठीण आणि कणखर बनली पाहिजेत. कारण त्याच्यामुळे  त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणीही हिंम्मत करणार नाही. आणि समजा जर  कोणी तसा प्रयत्न केलाच तर त्याची ताकद
चक्काचुर झाल्याशिवाय राहणार नाहीये." त्यावर माता कैकेयी हसून म्हणाल्या  ," हो , ते तर मी पाहतच आहे. गुरुदेवांनी तुम्हां सर्वांना वज्रा सारखे टणक बनविले आहे हे खरंय. परंतु गुरुदेवांना काय माहीत राजकुमाराना प्रेम आणि श्रुंगार पण करता आला पाहिजे." श्रुंगार हा शब्द ऐकून राजकुमार लक्ष्मण ला थोडेसे अवघडल्या सारखे झाले. म्हणजे श्रुंगार तर स्त्रिया करताना कदाचित असे म्हणणावयाचे असेल त्याला. परंतु त्याच्या वक्तव्याचा अर्थ त्या समजल्या. तश्या त्या हसून म्हणाल्या,
   " हो प्रेम आणि श्रुंगार करायला येणे  आवश्यक आहे, नाहीतर दुसऱ्या राज्यात जेव्हा राजकुमार जातील तेव्हा तिथल्या राजकन्या काय म्हणतील की अयोध्येच्या राजकुमाराना प्रेम आणि श्रुंगाराची कला अवगतच नाही. त्याना फक्त योध्दा बनून राहण्यातच शौर्य वाटते. कदाचित त्यांच्या गुरुदेवांनी त्याना प्रेम आणि श्रुंगार ही विद्या शिकविलीच नसेल. फक्त क्षत्रिय विद्या शिकविली. असं वाटतंय." तेव्हा भरत मध्येच म्हणाला ," आई , आमच्या गुरुदेवांनी तर सांगितले की एका क्षत्रिय पुरुषाची सुंदरता त्याच्या वीरता मध्ये असते. त्यामुळे सर्व प्राणी सुखी आणि समाधानाने राहू शकतात. " तेव्हा माता कैकेयी म्हणाल्या ," लक्ष्मण मान्य आहे की वीर पुरुषांची सुंदरता त्यांच्या रण कौशल्या मध्ये आहे, परंतु त्याच बरोबर प्रेम आणि  कोमल भावना त्याच्या मध्ये नसतील   तर त्या सुंदरतेला काही अर्थ राहणार नाहीये. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्यांनी कधी प्रेम आणि श्रुंगाराचा स्वाद घेतलाच नाही त्याना काय कळणार म्हणा प्रेम आणि श्रुंगार कशाला म्हणतात ते. " त्यावर कोणीच काही बोलले नाही.

     महाराज दशरथ आपल्या शयनकक्षाकडे जात असतात अचानक त्यांची पाऊले श्रीरामाच्या शयन कक्षाच्या दिशेने वळतात. त्यांनी हळूच श्रीरामांच्या कक्षात
डोकावून पाहिले. तेव्हा श्रीराम निद्रा अवस्था मध्ये असतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नताची लहर उमटलेली असते. ते पाहून महाराज दशरथाचे मन एकदम भरून आले. तेवढ्यात तेथे महाराणी कौशल्या आल्या नि त्यांनी विचारले ," काय झालं महाराज , आपण इथं काय करत आहात  ?" त्यावर महाराज म्हणाले ," प्रिये,  श्रीरामाचा चेहरा एकदा तरी पाहिल्या खेरीज मला रात्रीची
झोपच येत नाही. "
     " मग जागे करू का त्याला ?"
     " नाही नको. झोपू दे त्याला. "
     " मग चला तर आता झोपायला."
     " हो ; चल." दोघेही जातात.

महर्षी विश्वामित्र काही ऋषी सोबत यज्ञ करत असतात. त्याच वेळी रावणाने पाठविलेले दोन मायावी राक्षस तेथे
येतात. आणि ते आपसात बोलू लागतात की ऋषी विश्वामित्र हा यज्ञ करून आर्य लोकांना नवीन शक्ती प्रदान
करणार असं दिसतंय. एकंदरीत त्यांच्या ह्या प्रयत्न असफल करायला हवा." लगेच दुसरा राक्षस म्हणाला ," परंतु त्यांचा हा प्रयत्न वाया जाणार , कारण महाराज रावण चा आदेश आहे की  पृथ्वीवर कोणीही ऋषी यज्ञ याग करत असेल तर त्यांच्या यज्ञाचा विध्वंस करा. म्हणजे यज्ञ सफल होणार नाहीये. आणि यज्ञा मुळे आर्य लोकांना
शक्ती प्राप्त होते नि ते आपल्यावर म्हणजेच राक्षस जातीवर विजय मिळवितात.म्हणून त्यांचा कोणताही यज्ञ
सफल होऊ द्यायचा नाही.  " असे म्हणून त्यांनी त्या हवन
कुंडात माणसांची हस्ती टाकल्या. त्यानंतर रक्ताने भरलेली
घागर त्या हवनकुंडात ओतून अग्नि विझविला. तेव्हा  यज्ञा सभोवती बसलेले सर्व ऋषींमुनीं उठतात.नि पर्णकुटीत जमा होतात. तेव्हा एका ऋषी ने विश्वामित्राला विचारले की , आपण ह्या राक्षसांना शाप का देत नाहीत ?" त्यावर महर्षी विश्वामित्र म्हणाले," आपण जो अनुष्ठान करत आहोत त्याचा अर्थच असा आहे की आपण क्रोध
करू शकत नाही आणि राक्षसांना शापही  देऊ शकत नाही." त्यावर दुसरा ऋषी म्हणाला ,  " असं असेल तर जनकल्याण हेतू आपण काहीच  करू शकणार नाहीये."
   " चिंता करू नकोस वत्स ! मी याचा ही उपाय शोधला
आहे.आणि त्यासाठी मी अयोध्येचा राजा दशरथ यांच्याकडे   मदत मागायला जाणार आहे,  कारण अश्या कार्यात आमची मदत करणे हे राजाचे परम कर्तव्य आहे."

  अयोध्येचा  दरबार भरला आहे नि महामंत्री आर्यसुमन्त
महाराजा पुढे एक प्रस्ताव मांडतात की चार ही राजकुमार
आता विद्या संपादन करून अयोध्येस आले आहेत तेव्हा
त्यांच्यावर राज्याचा कार्यभाग सांभायला द्यायला हवा."
महाराज दशरथ म्हणाले," चार ही राजकुमार गुरुदेवांचे
शिष्य आहेत. तेव्हा कोणाची कशा मध्ये रुची जास्त आहे
हे गुरुदेवांनाच माहीत असेल तेव्हा गुरुदेवांनीच ते सांगावे." तेवढ्यात एक दूत आला नि त्याने संदेश दिला की महर्षी विश्वामित्र आले आहेत द्वारापाशी ! ." दूताचा संदेश ऐकून महाराज दशरथ मोठ्या विचारात पडले की महर्षी विश्वामित्र यावेळी आपल्याकडे कशासाठी आलेत  बरे ?" तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले ," महर्षी विश्वामित्र अकारण इथं येणार नाहीत.  इथं येण्यामागे त्यांचा जरूर
काहीतरी उद्देश असावा. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी
आपल्याला सामोरी जायला हवं." असे म्हणून महाराज दशरथ आणि महर्षी वशिष्ठ दोघेही विश्वमित्रांच्या स्वागतासाठी राजभवन च्या द्वारी जातात. आणि  महर्षी विश्वामित्रांचे स्वागत करत महर्षी वशिष्ठ म्हणाले ,
      " या मुनींवर आपल्या पद कमलानी आमची अयोध्या भूमी पावन करा." महाराज दशरथ ही तेच म्हणाले," या मुनींवर आपल्या  पद कमलानी आमची भूमी पावन करा."
      असे म्हणून महाराज दशरथानी महर्षी विश्वामित्रांना उच्च आसनावर बसविले नि मग  त्यांचे चरण धुतले, नि त्यानंतर त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून त्याना प्रणाम केला. नि त्यानंतर त्याना  आपल्या कडे येण्याचे कारण विचारले. तेव्हा विश्वामित्र म्हणाले ,"आपल्या कडे
येण्यामागचे कारण एकच आहे की आपल्या पूर्वजांनी
अलौकिक अशी कामगिरी केली आहे. आणि आपणही
आम्हां ऋषीमुनींची मदत कराल याबद्दल खात्री आहे आम्हाला. कारण आपल्याला ब्रम्हर्षी विशिष्ठां सारखे गुरू लाभले आहेत. तिथं चुकीचे काहीही घडणार नाहीये. शिवाय आपल्या पूर्वजांनी केलेल्या महान कार्याची महती सर्वत्र पसरलेली आहे, अर्थात मी ज्या कार्यासाठी आलोय ते महान कार्य आपल्याकडूनच पूर्णत्वास जाईल याबद्दल ही पूर्ण खात्री आहे आम्हाला. म्हणूनच  आम्ही आलोय इथं." महाराज दशरथ म्हणाले, " अवश्य करू आम्ही आपली मदत.परंतु आपल्याला आमच्या कडून कोणती
मदत हवीय ती तर सांगा." तेव्हा विश्वामित्र म्हणाले," आम्ही जनकल्याणार्थ एक यज्ञ करत आहोत. परंतु त्या
मध्ये रावणाने पाठविले असुर सुबाहु आणि तारका पुत्र मारीच विघ्न आणत आहेत, तेव्हा त्या राक्षसा पासून आमची रक्षा करा नि आमचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडू दे.
" त्यावर महाराज दशरथ म्हणाले ," ऋषी मुनींची सेवा करणे हे आमचे परम कर्तव्य आहे, म्हणून अयोध्येची पूर्ण सैन्य आपल्या अनुष्ठानाचे संरक्षण करील." तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले, " आम्हाला आपली सैन्या नकोय.कारण त्याने असुर शक्ती ही संघटना करून तेथे युध्द आरंभ होईल.  म्हणून आपण आम्हाला फक्त आपला राम द्यावा." श्रीरामाचे नाव ऐकताच महाराज दशरथ म्हणाले ," राम अजून बालक आहे, त्याला अजून युद्धाचा अनुभव ही नाही. म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण रामाला मागू नका. मी स्वतः माझी पूर्ण सैन्या घेऊन येतो
आपल्या सेवेला." त्यावर महर्षी विश्वामित्र चिडून म्हणाले,
     " बस कर राजन मोठ्या मोठ्या बढाया मारणे एकदम
सोपे असते. परंतु कार्य करणे महाकठीण असते. तुझ्या पूर्वजांनी आपले वचन निभावण्यासाठी  न जाणो का
काय केले जसे की महाराज शिबी ने एका कबुतरासाठी आपल्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले. महाराज हरिश्चंद्राने तर आपले वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या पुत्राला नि पत्नीला विकले. आणि तू आपल्या पुत्राला द्यायला नाकरतोस ? जर तुला दिलेले वचन पाळायचे नसेल तर नको पाळूस आम्ही निघालो." असे म्हणून ते संतापाने उठून उभे राहिले नि आता निघणार तोच महाराज दशरथानी त्यांचे चरण पकडले नि त्यांची  क्षमा मागितली. आणि त्यांची विनंती करत म्हणाले ," ऋषींवर, क्रोध करू नका आमच्यावर , माझं म्हणणं काय आहे हे जरा समजून घ्याल तर फार बरं होईल. " असे म्हणून ते
किंचित थांबले. नि क्षणभर वेळाने म्हणाले ," आपण ज्या राक्षसा विषयी बोलत आहात , ते राक्षस महाबल्याड रावणाचे सैनिक आहेत. त्यांच्याशी बालक राम कसा बरं
युद्ध करू शकेल ? म्हणून मला आपल्या सोबत येण्याची परवानगी द्या."  त्यावर महर्षी विश्वामित्र म्हणाले ," म्हणजे तू अजून श्रीरामाला पुरता ओळखतच नाहीस तर ! राजन तुला माहिती तरी आहे काय ? ज्याला तू बालक राम म्हणतोस तो व्यक्तिशः आहे कोण ? जर तुला माहीत नसेल तर ब्रम्हर्षी वशिष्ठांना विचारून घे." तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले," महाराज ब्रम्हर्षी विश्वामित्र जे बोलत आहेत ते सत्य आहे, राम कोणी सामान्य मनुष्य नाहीये. अर्थात रामाचा जन्म जनकल्याणासाठीच झाला आहे. " आणि ब्रम्हर्षी विश्वामित्र रामाच्या कल्याणार्थ आपल्या सोबत घेऊन चालले आहेत. नाहीतर स्वतः ब्रम्हर्षी विश्वामित्र सुबाहु , मारीच सारख्या राक्षसांचा विनाश करण्यास स्वतः समर्थ आहेत, परंतु हे सारे श्रेय्य ते रामाला देऊ इच्छित आहेत. म्हणून त्यांना नकार देऊ नका." महर्षी वशिष्ठांचे म्हणणे मान्य करून महाराज दशरथानी आर्यसुमन्त ला आदेश दिला रामाला ब्रम्हर्षी विश्वामित्र सोबत पाठविण्याची व्यवस्था करा." आर्यसुमन्त ने होकारार्थी मान डोलावली नि तेथून निघून गेले.

      क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..