छत्रपती शिवाजी महाराज २१ | chhatrapati shivaji maharaj 21
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज २१ |
" पण लग्नाच्या वेळी आपण ठरवलं होतं ना की हे सगळं
बदलायचं हो ना ?"
" ते लहान पणीचे स्वप्न होतं हे मोठे पनीचे सत्य आहे."
" हो मान्य, पण आमचं ऐकून तर घ्याल."
" कशासाठी ? आम्हाला त्याचीगरज नाही." असे बोलून
उत्तराची अपेक्षा न करता शहाजी राजे थेट निघून गेले.
पुढे
शहाजी राजे सदरेवर गेले नि कारभारी कडे सारा वसुली ची
नोंद मागितली. कारभारीनी नोंद दिली ही पण शहाजी राजांनी
मागच्या वर्षाची नोंद वही दाखवा." असे ते त्यांना म्हणाले. त्यामुळे कारभारी ला भीतीने घाम फुटला होता. तसे शहाजी राजे म्हणाले की, तुम्हाला नेहमी घाम का फुटतो?" इतक्यात तेथे पंत आले नि म्हणाले," राजे, कारभारी ना त्यात ले काहीही माहित नाही. ही नोंद वही घ्या." शहाजी राजेंनी नोंद वही घेतली नि तपासली. नोंद वह्या नवीन दिसत असल्यामुळे शहाजी राजेंच्या मनात शंका आली म्हणून त्यांनी विचारले," पुन्हा नव्याने नोंदी केल्यात का ?"
" नाही जुनीच आहे."
" मग ही पिवळी का नाही. नाही म्हणजे जुन्या नोंद वह्या
पिवळ्या होतात ना, म्हणून विचारले." त्यावर पंत म्हणाले
की नोंद वह्या जुन्याच आहेत, पण व्यवस्थित जपून ठेवल्या
होत्या ना, म्हणून त्या पिवळ्या दिसत नाही." इतक्यात तेथे
जिजाबाई आल्या नि म्हणाल्या की पंत नोंदी काय नंतर ही
करता येतील. प्रथम तुम्ही तनख्या केव्हा दिला गेला त्याची
नोंद दाखवा. आणि तेही दाखवा की तनख्या देण्या अगोदरच
त्यांच्या कडे सारा वसुली साठी तगादा लावला गेला. ते ही
दाखवा. नोंद असेल ना तुमच्या जवळ ?" पंत म्हणाले ," हो
आहे." जिजाबाई म्हणाल्या," मग वाट कुणाची पाहताय
आत्ताच्या आत्ता आणून दाखवा." तसे पंत कारभारी ना आपल्या सोबत घेऊन गेले. तसे शहाजी राजे म्हणाले," इथं
येण्याचे कारण ?" जिजाबाई म्हणाल्या की, म्हणजे आता
आम्ही इथं पण यायचे नाही का ?"
" इथं यायला मनाई नाहीये, पण कालचा विषय इथं
मांडायला आलाय का ?"
" नाही. कालचा विषय ही नाही आणि आम्ही काही वेगळी
सफाई ही देणार नाहीये."
" मग का आला इथं ?"
" हेच सांगण्यासाठी की आम्हाला वजीरे आलम पाशी
का जावे लागले हे आपल्याला कळावे म्हणून "
" ते आता सांगून काय उपयोग आहे, त्यावेळी जर सांगितला
असता तर वजीरे आलमच्या दरबारी जो आमचा अपमान
झाला तो झाला नसता. आता त्याचा काहीही उपयोग नाही."
" पण ऐकून तर घ्या."
" आता आम्हाला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये.जा तुम्ही !"
तश्या जिजाबाई तेथून निघाल्या त्या उमा बाईंच्या दालनात
गेल्या नि विचारले की आंत येण्याची परवानगी आहे का ?"
" हे काय विचारणे झालं या आंत." उमाबाई उद्गारल्या.
जिजाबाई आंत आल्या नि म्हणाल्या," आम्हाला काही
शिष्टाचार समजत नसतील तर ते आम्ही शिकून घेऊ. आम्ही
कीर्तन करत असू , तेच तेच बोलत असू तर यापुढे आम्ही काहीच बोलणार नाही. स्वप्न बोलणार नाही. सत्यच बोलू , पण ते तरी बोलू द्या. का ते पण बोलणे गुन्हा आहे. पण पूर्ण सत्य तरी ऐकून घ्या. पण ऐकायचंच नाही म्हटल्यावर काय करायचं ?" इतक्यातच तेथे सोयराबाई नि त्या विचारू लागल्या की, कोण ऐकत नाही सूनबाई ?" तेव्हा जिजाबाईंनी मागे वळून पाहिले नि गप्पच झाल्या. उमा बाई उद्गारल्या,
" जिजाबाई तुम्ही आता लहान आहात का ?" असे बोलत असतानाच त्या नजरेंच्या खुणेने सांगतात हा विषय आता इथच संपवा. परंतु त्यांच्या नजरेची भाषा सोयरा बाई समजल्या त्यांनी लगेच म्हणाल्या की ," आम्ही इथं आहोत म्हणून असं सांगताय ना ? बरं बाई बोला तुम्ही आम्ही जातो. तश्या उमा बाई म्हणाल्या," नाही हो, तुम्ही काही परक्या आहात का ?" सोयरा बाई उद्गारल्या," राहू द्या." असे बोलून गेल्या सारखे केले. तिथेच आडोसा पाहून दोघांचा वार्तालाप ऐकण्याचा प्रयत्न करू लागल्या. सोयरा बाई तेथून गेल्या असे समजून उमाबाई म्हणाल्या," तुम्हा दोघांना वाद अजून मिटला नाही का ?" त्यावर जिजाबाई उद्गारल्या की , कसा मिटणार ? बोललोच नाही तर ? प्रत्येक वेळी तेच ऐकवतात. आम्हाला काही ऐकून घ्याचेचं नाही , आम्हाला गरजच नाही. म्हणजे काय ? तुम्ही चला ना आधी ?" त्यावर उमाबाई म्हणाल्या की तुम्ही जरा सबुरी ने घ्या. सलूक करणे म्हणजे काय असे आपण लग्नात विचारले होते. ह्यालाच म्हणतात सलुक. आपलं कितीही बरोबर असले तरी ते सांगण्याचा योग्य काळ असतो. चुकीच्या वेळी सांगितले तर ते बरोबर असले तरी ते चुकीचे ठरते. म्हणून तुम्ही जरा शांत रहा. आम्ही बोलू त्यांच्या शी!" जिजाबाई जायला निघाल्या तश्या सोयरा बाईंनी हाक मारली नि त्यांनी आश्वासन दिले की आम्ही बोलतो तुमच्या स्वारीशी ! कारण आम्हाला तुमची तडफड बघवत नाहीये. असे म्हणून त्या स्वतः सोबत जिजाबाईंना घेऊन गेल्या नि शहाजी राजेंना बोलावणे पाठविले. शहाजी राजे सोयरा बाईंच्या दालनात आले. पण तिथं जिजाबाई ना पाहून त्यांना राग आला नि ते म्हणाले," आलं लक्षात, म्हणजे हा तुम्ही बहाणा केला." तेव्हा जिजाबाई म्हणाल्या की काकी साहेब आम्ही आपल्याला बोललो होतो ना नको म्हणून."
त्यावर सोयरा बाई म्हणाल्या की तुम्ही कशाला चिंता करताय आम्ही आहोत ना ?" असे बोलू सोयरा बाई शहाजी राजे कडे पाहत म्हणाल्या," शहाजी राजे आम्ही आपणास बोलविले, जिजबाईनी नव्हे ? आम्हाला त्यांची तडफड बघवली नाही. म्हणून आम्हीच आपणास बोलविले, शहाजी राजे त्या किती आर्जव करतात आणि तुम्ही त्यांच्या कडे बोलायला सुध्दा तयारच नाही. याचा अर्थ काय समजायचा आम्ही ? शहाजी
राजे, पती- पत्नी चे नाते विश्वासावर कायम ठीकुन असते.
ते एकमेकांशी बोलल्यानेच गैरसमज दूर होतात. तुम्ही आता
मोठे झालात, पराक्रमी झालात तरी आपल्या पत्नी शी बोलायला नको का ? जिजाबाई बोला आता तुम्ही. तुमची
स्वारी आता ऐकून घेईल. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना, ते आमचा शब्द पाडणार नाहीत." जिजाबाई बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच अगोदरच शहाजी राजे म्हणाले," हे सारे कशामुळे होतेय हे माहीत आहे का तुम्हाला काकी साहेब ?".
" कारण काही असो, म्हणून काय बोलायला नको ?"
" मग ते आधी आपल्या सूनबाई ला तरी विचारायचं ना ? वजीरे आलम च्या दरबारी एकट्याच जाऊन त्याला अक्कल शिकवून आल्या. सापाच्या फण्यावरच पाय दिल्यावर तो गप्प बसेल का ? सुटलाय डंक मारत. सारा वसुलीचा तो आता भलताच विचार करू लागलाय ? आता पुढे काय करायचं याचाच विचार सुरू आहे, तुमच्या मुदपाक भाषेत सांगायचं तर जे सांडलंय तेच गोळा करून निस्तरायचं का नव्याने सुरू करायचं." शहाजी राजांनी जिजाबाईंना खडे बोल ऐकवावे हे तर सोयरा बाईना पाहायचे होते आणि त्या प्रमाणे ते साध्य पण केलं. त्यामुळे त्या मनातल्या मनात फार खुश झाल्या. शहाजी राजे तेथून निघून गेल्यावर स्वतःही जिजाबाईंना खडे बोल ऐकवले.
शहाजी राजे पंत आणि कारभारी कडून नोंद वही पाहतात
तेव्हा एका ही नावा पुढे त्यांचा अंगुठा का घेतला नाही हे
विचारता क्षणी तेथे मंबाजी राजे येतात नि आपणच ते मोडीत
काढल्याचे सांगतात आणि त्याचे कारण सांगतात. म्हणे आपली
रयत अंगुठा छाप असल्याने त्यांना कुणी पण फसवू शकतो. म्हणून तो नियम आम्ही मोडीत काढला. शहाजी राजे अधिक खोलवर चौकशी करू नये. म्हणून लगेच पंत आणि कारभारी यांना जायला सांगतात. तेव्हा शहाजी राजे म्हणाले की आम्हाला
वेगवेगळी नोंद करून पाहिजे. असे सरसकट आम्हाला चालणार नाही. असे पंत आणि कारभारी यांना फर्मावले.
शहाजी राजांचे ध्यान दुसरी कडे वळविण्याच्या हेतूने मंबाजी राजे वहिनी साहेब वजीरे आलम कडे गेल्या मुळे शिक्का नि कट्यार इकलाग खान कडे जाण्याची शक्यता आहे, शिवाय एकाने केलेल्या चुकीची शिक्षा साऱ्या भोसले कुटुंबाला मिळू नये इतकंच आमचे म्हणणे आहे. त्यावर शहाजी राजे काहीच
बोलले नाहीत. त्यानंतर शहाजी राजेंची भेट स्वतः उमा बाई
घेतली नि त्यांना सांगितले की शिक्का आणि कट्यार हा
विषया बद्दल आपण उद्या सर्वत्र मिळून निर्णय घेऊ.पण
आजचा विषय वेगळा आहे. तो अगोदर सोडवा. तेव्हा शहाजी
राजे समजून जातात की आऊ साहेब जिजाबाई बद्दल बोलत
आहेत. हे ध्यानात येताच ते म्हणाले," मला जिजाबाई शी
काहीच बोलायचे नाहीये." तेव्हा उमा बाई म्हणाल्या," एकदा
बोलून पहा. मी सांगते म्हणून." नाईलाजाने शहाजी राजे
जिजाबाई ना जाऊन भेटतात. तेव्हा जिजाबाईनी त्यांना सविस्तर माहिती दिली. ती त्यांनी शांतपणे ऐकून घेतली.
आणि शेवटी म्हणाले," झाले बोलून." त्यावर जिजाबाई
म्हणाले की, म्हणजे आमचे म्हणणे आपल्याला पटलेले दिसत
नाही." त्यावर शहाजी म्हणाले," आम्ही असं म्हणालो का ?"
" पण आपण जबाब ही दिला नाही."
" काय जबाब देवू ?"
" म्हणजे आम्ही काही बोलायचंच नाही असा त्याचा अर्थ."
" बोलून काही होणार आहे का ?"
" बोलल्याने च होणार आहे."
" मग मला सांगा मंबाजी राजे म्हणाले म्हणून तुम्ही गेलेत.
आमची वाट का नाही पाहिली ? आम्ही गेलो असतो. नव्हे
आमचंच काम आहे ते."
" तुम्ही मोहीमे वर गेला होता,आणि तुमच्या गैरहजेरीत
आम्ही कारभार पाहायचा असा आपलाच आदेश होता.आणि
मोहीमे वर गेलेला व्यक्ती परत कधी येणार याचा निश्चित काळ
नसतो, अश्या वेळी कुणी रयते वर अत्याचार करत असेल तर
त्याला तो करू द्यायचा होता काय ? कुणी रायते वर कोडे
मारत असेल तर त्याला मारू द्यायचे ? विरोध ही करायचा
नाही ? गप्प पाहत राहायचं ? आम्हाला शक्य नाही ते."
" कुणाला मूठ भर धान्य दिलं, कोडे मारण्या पासून वाचविले
म्हणजे सारी रयत सुखी होणार आहे का ? आणि रयतेचा
विचार करण्या अगोदर विचार आपल्या दौलती करायला हवंय.
दौलती शिवाय काय काय शक्य आहे, ते तर सांगा."
" हो मान्य, पण मला सांगा खजिना काय फक्त सारा वसुली
केल्यानेच भरतो ? मग नऊ महिने मोहिमे वर लूट मिळविता
त्याचं काय ? "
" ती काय जहागीरदार जवळ येत नाही तर ती लूट बादशहा
च्या खजिन्यात जमा होते ."
" मग तेच तर म्हणतोय आम्ही, जर तुम्ही सारा पेक्षा ही जास्त लूट खजिना मध्ये जमा करत असाल तर मग बादशहा सारा का नाही भरला म्हणून का विचारेल ?" त्यावर शहाजी राजे निरुत्तर
झाले.
सदरेवर सर्वजण जमा झाले आहेत. उमाबाई सर्वांना उद्देशून
म्हणाल्या की, शिक्के कट्यार इकलाक खान च्या नावाने
येणार आहेत, असं ऐकण्यात आलं आहे,आणि आपण सर्वजण
त्याच साठी जमा झालो आहोत. तेव्हा ही गोष्ट बाहेर कुठं बाहेर समजता कामा नये. ही प्रत्येकाने काळजी घ्यावयाची आहे." त्यावर सोयराबाई उद्गारल्या," हां पण अशी गुप्त खलबते करण्याची वेळच का आली ?" तसे मंबाजी राजे म्हणाले,
" आऊ साहेब, तुम्हाला माहितेय वहिनी साहेब , वजीरे आलम कडून जाऊन आल्या " तसे संभाजी राजे मध्येच म्हणाले," मंबाजी राजे विषय तो नाहीये. विषय शिक्के कट्यारीचा आहे."
" हां पण मूळ विषय तोच आहे ना ?" सोयरा बाई
" नाही काकी साहेब मूळ विषय तो नाहीये, आपण खातर
करून घेऊ शकता." तेव्हा मध्येच शहाजी राजे म्हणाले की,
आता मागचं उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाहीये."
" आता शरीफ जी राजे पण बोलायला लागलेत. काय
म्हणत होता तुम्ही खातर जमा करून घ्या म्हणून." मंबाजी राजे
" सीताराम शितोळे म्हणजे हिराजी चे वडील त्यांनी सारा
भरला नाही म्हणून त्यांच्या अंगावर कोडे लावण्यात आले, म्हणून वहिनी साहेब त्यात पडले नि त्यांना ते करू दिले नाही. आणि दादा साहेब आपणच वहिनी साहेबांना म्हणालात ना की, आता वजीरे साहेबांना तुम्हीच जबाब द्या म्हणून. तेव्हा मूळ कारण इथं आहे." शरीफ जी राजे
" आपल्या कडून वेळीच तनाख्या दिला न गेल्यामुळे सारा
वसुली होऊ शकली नाही. त्यामुळेच हे सारे घडले आहे. आणि
आता जर शिक्के कट्यारी त्याला मिळाले तर तो रयत वर
अधिकच अत्याचार करेल." शहाजी राजे
" म्हणजे सर्व खपर आमच्या माथी मारा तर !"
" आपला कारभार पूर्वी सारखा चोख नाही. हेच सिद्ध होते
यातून. तेव्हा आता तरी नीट कारभार घ्या हाती." संभाजी राजे
" आणि मंबाजी राजे तुमची दुसरी शंका की ह्याचा त्रास
साऱ्या भोसले कुटुंबाला होता कामा नये. तर ऐकून घ्या. भोसल्याचा पराक्रम आणि पुण्याई इतकी लेचीपेची नाही की त्याचा त्रास दीर्घ काळ टिकेल." उमाबाई
" कशावरून ?" सोयरा बाई
" माझ्या अनुभवा वरून सांगतोय आम्ही जाऊबाई ! वजीरे
आलमच्या कृती कडे नीट लक्ष द्या. शिक्के कट्यार अजून
दिली नाही किंवा देईल ही पण आम्हाला वाटतं ही त्याने फक्त
आपल्याला भीती दाखविली आहे, कारण असं जर नसतं तर
त्याने शहाजी राजे ना अजून दहा गावांची जहागिरी दिलीच
नसती तेव्हा शह काट शह चे हे राजकारण आहे. आणखीन
काहीही नाही." संभाजी राजांना उमा बाईचे म्हणणे एकदम
पटले. तसे सगळ्यांनाच पटले म्हणा. फक्त सोयरा बाई नि
मंबाजी राजे सोडले तर ! त्यांना ते पटने शक्यच नव्हते. कारण
या सर्वस्वाला कारणीभूत तर ते दोघेच होते. कारण पगार जर
वेळेवर दिला गेला असता तर सारा पण वेळेवर भरला असता.
जिजाबाई एकदम विचारमग्न अवस्थे मध्ये उभ्या असतात.
त्यावेळी तेथे गोदा येते नि त्यांना काही प्रश्न विचारते पण
त्या तिच्याकडे न पाहताच उत्तरे देत असतात .म्हणून गोदा
चा असा समज झाला की आपलं काहीतरी चुकलं असावं
म्हणुच की काय त्या आपल्या कडे पाहत नाहीयेत.असा करून
त्यांनी आपल्या कडे न पाहण्याचे कारण विचारलं असता
जिजाबाई म्हणल्या की तुझं काही नाही चुकलं , खरं सांगायचं
म्हटलं तर आमचंच चुकलं. आम्हाला स्वारी एकच प्रश्न विचारतात की आम्ही वजीरे आलम कडे का गेलो ? आणि
आम्ही वजीरे आलम गेल्या मुळेच त्या इकलाक खान का
शिक्के कट्यार मिळणार आहे, मग ह्या सर्वाला आम्हीच
दोषी नाही का ?" त्यावर गोदा म्हणाली," नाही जिजा
आक्का त्याला आपण दोषी नाही तर आम्हीच दोषी आहोत."
असे बोलून गोदा तिकडून निघून गेली. जिजाबाईंची
तिच्याकडे पाठ असल्याने गोदा तिकडून गेल्याचे ध्यानात
नाही आले. ती तिथच आहे असा समज झाल्या मुळे जिजाबाई
म्हणाल्या," त्यात तुझा काय ...दोष म्हणतच मागे वळतात.
पण गोदाया ऐवजी शहाजी राजेंना पाहून त्या चापापतात.
त्यामुळे पुढचे स्वर तोंडातच विरले. आणि त्या ऐवजी त्यांनी
शहाजी राजेंना तिकडे काय ठराव झाला त्या विषयी चौकशी
केली; परंतु शहाजी राजांच्या मनात राग असल्याने त्यांनी
त्यांच्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर न देता चालते झाले.त्याचे
जिजाबाईंना फार वाईट वाटले.
सोयरा बाई आपल्या सूनबाईला म्हणाल्या," तुमचं जिजाबाई सारखे नाहीये. त्यांचे माहेर खूप श्रीमंत आहे, त्या माहेरी जाऊन राहतील. पण तुमचं काय ?" जाऊबाई न
समजून म्हणाल्या की, पण तुम्ही हे मला का सांगता ?
" ते या साठी सांगते की आपले कोण नि परके कोण हे
जरा ओळखायला शिका. नाहीतर आयुष्य भर हुजरेच करत
राहावे लागेल."
" मला यातले काहीच कळले नाही."
" तुम्ही अश्या कशा हो ? नाही म्हणजे तुम्हाला काहीच
कसं कळत नाहीये. आपले घरचे पुरुष युद्धात कामी आले
पण त्यांच्या घरचे पुरुषांवर एखादा तरी ओरखडा आला
आहे का अंगावर ? नाही का ? उद्या शिक्के खट्यार जाईल
कुणाच्या हातात मग मनसबदारी जाईल. मग येईल हातात
नागर त्याची तयारी आता पासून करून ठेवायला नको ?"
" पण आम्ही काहीच केलं नाही, तरी पण ?"
" असंच असतं करतं कोण नि भरतं कोण ?" असे त्या
मुद्दाम जिजाबाईंना ऐकवतात. पण जिजाबाई चुपचाप ऐकत
असतात. बोलत काहीच नाहीत.
शहाजी राजे आणि जिजाबाई यांच्या मध्ये वादविवाद सुरू
असतो. शहाजी राजांचे म्हणणे असते की वजीरे आलम कडे
जाणे तुम्हाला जरी गैर वाटले नाही तरी ते आमच्या दृष्टीने गैर
वाटते. कारण तुमच्या आबासाहेब म्हणजे बारा हजार मनसबदार २७ महालाचे मालक आहेत ते." जिजाबाई नाराज
झाल्या. त्या म्हणाल्या," आमच्या आबा साहेबांचा असा अवमान आम्हाला चालणार नाहीये." शहाजी राजे उत्तरले की
आम्ही त्यांचा अवमान करत नाही आणि करणार ही नाही.
आम्ही फक्त वास्तविकता काय आहे, हे सगण्याचा प्रयत्न
करतोय. मुख्यतः वजीरे आलम हा शब्द तुमच्या कानावर अनेक वेळा पडला असेल. म्हणून तुम्हाला त्याचं काही वाटत नसावं. पण आमचं तसं नाहीये. सामान्य माणसाला जशी वजीरे आलम
ची भीती वाटते. तेवढीच आम्हाला जरी वाटत नसली तरी ही
आमच्या मनात त्यांच्या बद्दल आदरच आहे. आमच्या आजोबांनी हाती नांगर धरून शमशेर चालविली. आमच्या आबा साहेबांनी आपल्या पराक्रमाने आपलं नाव मोठं केलं.आणि त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत."
" आम्हाला आता काही बोलायचंच नाहीये. कारण आपण
मागचं कुठलं तरी जुने पुराणे उकरून काढत आहात. त्याचा
आताच्या गोष्टींशी काय संबंध आहे ? उगाचच वाद घालायचा
म्हणजे ?"
" सबंध नाही कसा ? तुम्हाला जे सहजच प्राप्त झालं ते
आम्हाला फार कष्टाने मिळवावं लागलं. तुम्हाला जरी त्याचं
महत्व नसले तरी आमच्यासाठी ते फार मोलाचे आहे. चाकरी
करणे जरी तुम्हाला आवडत नसेल तरी ही चाकरी करायला
आम्हाला आवडते."
" आम्हाला आता कोणाशीच काही बोलायचे नाहीये."
" कसे बोलणार, उत्तर सापडत नाहीये ना ?"
" उत्तर आहे, पण विवाहाच्या वेळी दिलेली वचने आता स्वप्ना
सारखी वाटत असतील तर बोलण्यात काही अर्थच नाहीये ना ?"
" मागचं काढू नका.आता चाकरी करतोय ही मोलाची आहे
किंवा नाही तेवढं फक्त बोला."
" तुम्ही चाकरी करताय ही आमच्यासाठी मोलाची नाहीये. तर
दुःखाचे कारण आहे, पण हे सांगायचं कुणाला ?"
" तुम्ही सर्व एकत्र का करताय ? आम्ही चाकरी कायमचीच
करणार आहोत असे का वाटतंय तुम्हाला ? आमची काही स्वप्न
आहेत, पण तुम्हाला ती आम्ही का सांगायची ? कारण तुम्हाला
तर आमच्याशी बोलयचच नाहीये." असे म्हणून तेथून चालते झाले.
इकलाख खान सोबत मंबाजी राजे वार्तालाप करत असताना
काकी साहेब काय म्हणत होते ती सर्व माहिती इकलाख खान
ला पुरविली की असल मध्ये वजीरे आलम फक्त नाराज आहेत
असे काकी साहेबांचे म्हणणे आहे. वरून असे ही म्हणाले आम्हाला त्यातले फारसे कळत नाही म्हणा. पण आम्ही इतकं
नक्कीच सांगू शकतो की , शिक्के कट्यार कोणाकडे ही असू
दे आम्हाला काय हुकुमाची फक्त अमलबजावणी करायची
आहे, तुमच्या कडे शिक्के कट्यार असली तर तुमचा हुकूम
मानणार दादा साहेब आणि शहाजी राजे यांच्याकडे शिक्के
कट्यार असली तर त्यांचा हुकूम आम्ही मानणार, आम्ही काही
चुकीचे नाही ना बोललो ?" त्यावर ईकलाख म्हणाला," नाही
तुमच्या जागी दुसरा कुणी असता तर कदाचित आम्ही
मान्य ही केलं असतं परंतु आपल्याला पाहून असं वाटत नाही
की आपल्याला राजनीतीचा स्पर्श तरी झाला असेल हा. एकदम
बच्चा जैसा दिमाख हैं आपका, वरना यह बात हमारे सामने
कोई नही करता."
" फक्त सांभाळून घ्या."
" एक पते की बात बताता हूं की, आप जिसका ख्याल करोगे
वो भी उतना आपका खयाल करेगा ।"
" जरूर जरूर । जर आम्ही आपल्याला खुश ठेवले तर आपण आम्हाला खुश ठेवाल हाच त्याचा अर्थ आहे ना ?"
" अगदी बरोबर.आखिर खुशी का तो मामला है।"
गोदा तिथं आली जिथं हिराजी डोक्यावर पांघरूण
घेऊन झोपला होता . ती त्याला सोमाजी काका समजली नि
त्याला म्हणाली," सोमाजी काका ह्या इकलाक खान ला
मी काय आता जिता सोडत नाही, कारण त्याने माझ्या संसाराची तर फार वाट लागलीच. आमच्या धन्याच्या आबा
साहेबां चा मार वाचवण्यासाठी जिजा अक्का धाऊन गेल्या.
म्हणून तो आता जिजा अक्काच्या संसाराचा खेळ खंडोबा करायला निघालाय. त्या दोघांनी अबोला धरला. आता ते सारे
मलाच निस्तरायला हवं. बघते मी त्याच्या कडे.शिक्के कट्यार
कसे घेतोय तेच मला पहायचे आहे. " असे म्हणून गोदा त्वेषाने
तेथून निघून गेली. तसा झोपेचा सोंग करून राहिलेला
हिराजी उठला नि तिच्या मागोमाग गेला. गोदा ने कुणी आपल्याला ओळखू नये म्हणून तोंडावर कपडा बांधला नि
इकलाख खान ज्या दालनात थांबला होता तिथं ती गेली.
त्याला वाटलं आपल्याला हवी असलेली शिकार मिळाली.
असा विचार करून त्याच्या सोबत असलेल्या हशम्याना त्याने
तेथून जायला सांगितले. त्यानंतर लाडीने एकदम तो तिचा अगदी जवळ गेला. तशी गोदा पट्कन वळली नि इकलाख
खान वर वार केला. इकलाख खान एकदम बेसावध होता.
त्यामुळे तो स्वतःचा बचाव करू शकला नाही. परंतु लगेच
आपल्यावर वाऱ करणाऱ्या वर हल्ला करण्यासाठी तो आपल्या
तलवारी पाशी गेला. नि तलवार उचलली नि गोदा वर वार
करणार इतक्यात त्याच्या पाठीमागून येऊन हिराजी ने त्याला पकडले नि जोरदार धक्का दिला. तसा तो कोलमडून खाली पडला. तसा हिराजी तो जिवंत राहू नये म्हणून त्याच्यावर वार करणार होता पण इकलाख खान च्या ओरडण्याने हाश्मी धाऊन
आले. ते आले तर आपण त्यांच्या तावडीत सापडणार हे
लक्षात येताच हिराजी गोदा ला घेऊन तेथून पसार झाला.
हाश्मी तिथं पळत आले, परंतु रक्ताच्या थारोळ्यात इकलाख
खान ला पाहून वैद्य बुवांना बोलवण्यात आले. त्यांनी त्यांची
जखम बांधली. हा हा म्हणता सर्वत्र वार्ता पसरली की इकलाख
खान वर हल्ला झाला. कुणी केला हे समजले नाही. परंतु इकलाख जसा शुध्दीवर आला तसे त्याने सांगितले की आपल्यावर हल्ला करणारी व्यक्ती एक स्त्री होती. मग काय सर्वांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं होते आणि ते म्हणजे जिजाबाईचे. परंतु. जिजाबाई ने स्पष्ट शब्दात सांगितले की आपण इकलाख खान वर हल्ला केलेला नाहीये. पण विश्वास कोण आणि कसा धरणार ? मंबाजी राजे नि सोयरा बाई यांची तर खात्रीच होती की हे काम जिजाबाई व्यतिरिक्त अन्य कुणाचे
नाहीये. म्हणूनच की जिजाबाईंना बेल पत्र उचलून शंभू महादेवा
समोर शपथ घ्यायला लावली. आणि जिजाबाईंनी शंभू महादेवा
समोर शपथ घेऊन हे सिध्द केलं की इकलाख खानावर आपण
हल्ला केलेला नाहीये. उमा बाईना तर त्याची खात्री होतीच
जिजाबाई असं करणार नाहीत. शहाजी राजे पण खात्री होती
पण मनात एक शंका ही होती की जिजाबाई नाहीतर मग हे
कुणाचे धाडस असेल हे. पण राहून राहून त्यांना ही वाटत होते
की जिजाबाईंनी च केले असेल हे.म्हणूनच की काय त्यांनी
आपला विरोध दर्शविला नाही.त्याचेच वाईट वाटत होते जिजाबाईंना. तसे जिजाबाईंना ठाऊक होते की हे धाडस कुणी
केले आहे ? कारण गोदाने त्यांना सविस्तर सांगितले होते.
आणि जिजाबाईंनी तिला सांगितले होते की ही गोष्ट तू कोणा
जवळ बोलू नकोस. म्हणून ती ही गप्प होती.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा