छत्रपती शिवाजी महाराज २० | Chhatrapati Shivaji Maharaj 20
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज २० |
तेव्हा शाहजी राजेनी सांगीतले की विशेष काही नाही. मोहीम फत्त झाल्यानंतर दौलताबादला जावेच लागते. तसेच आम्ही उद्या ही जाणार आहोत. आणि हे काय आम्ही पहिल्यांदाच जात नाहीये. तुम्हाला त्याचेच तर दडपणन आलं नाही ना ?" जिजाबाई उद्गारल्या," नाही नाही तसं काही नाही." असे जिजाबाईंनी म्हटलं खरं पण त्यांच्या मनातील भीती काही केल्या जात नव्हती.
पुढे
मलिक अंबर बुध्दी बळाचा डाव एकटाच खेळत होता.
इतक्यात तेथे त्याचा मुलगा फतेह खान आला एकदम बेचैन
होता. मलिक अंबर आपल्या मुलाकडे न पाहताच विचारले," परेशान हो."
" कोई परेशानी नहीं."
" तो फिर यहां खड़े क्यों है ?"
" खड़े इसलिए है की हम आपसे पूछना चाहते है ।"
" क्या पूछना है, पूछिए ।"
" आपने क्या सोचा है ?"
" किस बारे में ?"
" शाहजी राजे आयेंगे तो ...?"
" अच्छा तो परेशानी की वजह यह है ।"
" हां अब बताए ना क्या सोचा है आपने."
" जब आयेंगे तो देख लो."
" हम अभी जानना चाहते है ।"
" बेटे एक ही बात को कितनी अहमियत देना चाहिए . यह
पहाचान लो, हम ऊस वाकयाको आचार की तरह देखते हैं
उसे उतना ही खाओ , रोटी, सब्जी, गोस्त से उसकी बराबरी
मत करो."
" ठीक है देखते है आप क्या करते है, और हम आपसे उम्मीद करते है की उनके सामने हमे जलील नहीं करेंगे ."
" हम भी आपसे यही उम्मीद करते है की आप उनके सामने अपना मुंह बंद रखेंगे ।.........बस देखते जाइए की हमारी चाल ऐसी होगी की वो दाव लगना छोड़ देंगे ।"
जिजाबाई फार मोठ्या चिंते मध्ये असतात. इतक्यात तेथे
शहाजी राजे येतात नि त्यांच्या खंद्याना पकडुन खाली बसवत
ते म्हणाले," आम्ही तुमच्या वक्तव्यावर पूर्ण विचार केला तेव्हा
आम्हाला तुमचं म्हणण पटलं." जिजाबाईंना एकदम आश्चर्य
वाटले की आपण काही सांगितले नाही आणि ह्यांना आपोआपच कसं कळले ? म्हणून त्या विचारतात ही तुम्हाला
कळलं कसं म्हणून ? परंतु शहाजी राजे ज्या विषयी बोलतात
तो विषय वेगळा असतो. म्हणजे जिजाबाई काल जे म्हणाल्या की ह्या जखमा परकियांसाठी खाल्ल्या आहेत तर त्या कशाला
छातीवर मिरवायच्या ? अगोदर आपले म्हणणे पटले नव्हते . पण आता पटले. तेव्हा जिजाबाईच्या सारे ध्यानात आले.
की आपण ज्या विषया बद्दल आहोत. तो विषय फार वेगळा आहे, आणि जिजाबाई ज्या प्रसंगा बद्दल आहेत तो प्रसंग
पण फार वेगळा आहे. खरे तर शहाजी राजेंना सत्य काय
आहे हे सांगायला हवं . पण तरी ही जिजाबाईंची ते सांगण्यास हिम्मत होत नाही की तुमचा समज चुकीचा आहे. सत्य फार वेगळे आहे. त्या शहाजी राजेंना सांगू इच्छित होत्या. आपण त्यांना न विचारता वजीरे आलम ना भेटून आलो म्हणून. पण त्यांना काही हिम्मत झाली नाही. म्हणून त्यांनी शहाजी पुढे दुसरी मागणी केली की आम्ही आपल्या सोबत दौलताबादला आले तर चालेल काय ?" तेव्हा शहाजी राजे म्हणाले," दरबारात कुलवत स्त्रिया कधी ही जात नाहीत." असे म्हटल्या मुळे जिजाबाई पुढे दुसरा मार्ग उरला नाही. त्यामुळेच आपण वजीरे आलम च्या दरबारात आपण जाऊन आलो ही सांगण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे झालं काय तर शहाजी राजे मलिक अंबरला भेटायला दौलताबादला गेले.
मलिक अंबर बुद्धिबळाचा खेळ खेळत होता . त्याचा
मुलगा फतेह खान आंत आला नि म्हणाला," उन्हे बुलाकर
आप उनकी खबरबात लेने वाले थे लेकिन आप उन्हे और
दस गांव की जागीर दे रहे है। ये देखिए मुंशी जिनी बादशहा
हजरत का शाही फरमान हमे देकर गए है।"
" जंग मैदान में उन्होंने फतेह हासिल की है तो इनाम देना बनता ही है , इसलिए हम उन्हे इनाम तो जरूर देगे.लेकिन..?"
" लेकिन क्या ?"
" कल जब वो आयेंगे तब उनका चेहरा देखना उनके चहरे
पर शर्म का नकाब अपने आप आएगा और वो उनके लिए
सब से बड़ी तौहीन होगी जो आज तक किसी ने नहीं देखी
होगी ।"
" अब्बाजान आप उन्हे जागीर बढ़ा के दे रहे है , तो फिर
तौहीन कैसी ?"
" हम उनको इनाम जरूर देंगे लेकिन यहां हम तीनो के बीच
दरबार में नहीं, अगर यही इनाम हम उन्हे दरबार में सबके
सामने देते तो उनके लिए बढी फर्क की बात होती."
" तो ये बात है ।"
" कुछ समझे."
" अभी बुलाते है. " असे फतेह खान शहाजी राजेंना बोलवायला बाहेर गेला." शाहजी राजे आंत आले तेव्हा वजिरे
आलम ने शहाजी राजांना बादशहा हजरत ने पाठविलेला
शाही फर्मान दिला. शहाजी राजेंनी ते वाचून पाहिले. त्यांना आनंद तर झाला. पण त्या पेक्षा मोठे आश्चर्य वाटले म्हणून त्यांनी त्याचे कारण विचारले. मोहीम फत्ते केली तर त्याचे इनाम भर दरबारात आणि सगळ्यांसमोर दिलं जातं. असे दोन किंवा तीन माणसा समोर दिले नाही. खरं तर हा त्यांचा अपमान होता.
पण त्यावेळी फतेह खान पटकन जे बोलून गेला त्यावरून शहाजी राजांच्या ध्यानात आल्या वाचून राहिले नाही की हे
मुद्दाम करण्यात आले आहेत. म्हणून शहाजी राजांनी वजीरे आलम मलिक अंबर शी त्या विषया बद्दल विचारणा केली असता मलिक अंबर , शहाणी राजांना जिजाबाई दरबारात येऊन गेल्याचे सांगितले. इतकंच नाहीतर त्या काय काय बोलून गेल्या ते पण सांगितले. ते ऐकून शहाजी राजांचा विश्वासच बसला नाही. अखेर मलिक अंबर ने सविस्तर माहिती देत म्हंटले की, आम्ही इकलाक खान ला महसूल का कमी भरला जातोय
याची चौकशी साठी वेरुळ पाठविले होते. सारा वसुली साठी नाही तर केवळ चौकशी साठी. परंतु आता आम्ही असा विचार केला आहे की शिक्का कट्यार इकलाक खान ला देवून सारा वसुली चे काम त्याच्या वर सोपविले जावे आणि आपण फक्त मोहीमे वर जावे आणि मोहीम फत्ते करावी. महसूल जमा करण्याचे काम इकलाक खान करील." पण शहाजी राजेंना ते मान्य झालं नाही त्यांनी वजीरे आलम मलिक अंबर ला आश्वासन दिले की सारा वसुली चे काम पूर्वी प्रमाणे व्यवस्थित पार पाडले जाईल.
शहाजी राजे दौलताबाद ला गेल्या नंतर जिजाबाईंनी आपलं मन शरीफ जी राजे यांच्या समोर मन मोकळं केलं. शरीफ जी राजांनी विचारलं की या संबंधी दादा साहेबांना माहित आहे का ? तेव्हा जिजाबाई की ह्या संबंधी स्वारी शी आपले बोलणे झाले नसल्याचे सांगतात. त्यावर शरीफ जी राजे म्हणाले, वहिनी साहेब फार मोठा घोटाळा झाला आहे, आता दौलता
बादला काय होईल हे आता सांगणे तरी कठीण आहे. आता
काय तो शंभू महादेवच यातून मार्ग काढतील." असे शाहजी
राजेंनी म्हटल्या मुळे जिजाबाई फारच अस्वस्थ झाल्या. त्या
शमशेरी जवळ आल्या आणि आपले मन व्यक्त करत म्हणाल्या की, आम्ही आमची घागर इथं रिकामी करतो. पण ती तुमच्या पर्यंत पोहोचत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाहीये.
आणि खरं सांगायचं तुमची आज्ञा घेऊनच आम्ही सर्वकाही करतो. शरीफ जी राजे म्हणाले की आम्ही तुम्हाला
सांगायला हवं होतं. पण ज्या क्षणी आम्हाला वाटलं की
तुम्हाला सांगायला हवं त्या क्षणी आम्ही इथं येऊन तुम्हाला
सांगितले. मंबाजी राजे म्हणाले की, तुम्ही वजीरे आलम ला
उत्तर द्या म्हणून. म्हणून मग सर्वात आधी आम्ही तुम्हालाच
तर येऊन सांगितले. आणि तुमची आज्ञा घेऊनच मग आम्ही
वजीरे आलम ला भेटायला गेलो ना ? मग आमचं काय
चुकलं ? आणि माझी खात्री आहे की तुम्ही दाखविलेली ही
वाट चुकीची असणार नाही. का तुम्हाला ही ती वाट चुकीची
वाटते. आता काय वाड्यात आम्हाला ऐकायची सवयच झाली
आहे, आपल्या गैरमौजुदी मध्ये आम्हाला ऐकावे लागतेच. आता
तुम्ही ही रागवाल. स्वारी ना होणाऱ्या जखमा पेक्षा आमच्या
मनावर होणारे घाव अधिक तीव्र आहेत हे कोणालाच कसे कळू
नयेत. स्वारी ना देखील.....
शहाजी राजे दौलताबाद वरून आले तसे आपल्या आऊ
साहेबांना भेटायला गेले. तेव्हा मार्गात जिजाबाई समोर आल्या. पण त्यांच्याशी काही न बोलता हातातील दहा गावांच्या मिळालेल्या जहागिरीचे फर्मान फेकून दिले नि सरळ पुढे निघून गेले. तेव्हा तेथे मंबाजी राजे आले आणि त्यांनी ते फर्मान उचलले नि वाचले.
शहाजी राजे आऊ साहेबांच्या दलना पाशी जाऊन
थांबले नि मोठ्याने म्हणाले की, आऊ साहेब आम्ही आलोत.
उमाबाई बाहेर आल्या. शहाजी राजांचा संतापलेला चेहरा
पाहून त्या म्हणाल्या की, भाळा वरचे गंध फुटावेत अश्या
भालावर आट्या पडल्या आहेत. या पूर्वी अश्या आट्या आम्ही पाहिलेल्या आम्हाला स्मरत नाहीत. तुमच्या आबा साहेबांच्या ही भाळा वर उमटलेल्या असायच्या. पण बोटांचे पेर मोडत मनात सरकपास करत नसतात ते. अश्या जखडत्या नजरेने आमच्या कडे पाहायचे कारण ? थांबा. बसा आधी. " असे बोलून त्यांनी प्रथम त्याला पाणी प्यायला दिले.नि म्हटले की,, पाणी प्या !" शहाजी राजांनी त्यांनी दिलेले पाणी पिऊन टाकले. तश्या त्या म्हणाल्या की, " आता बोला." तसे शहाजी राजे म्हणाले की, आऊ साहेब, जिजाबाई वजिरे आलम कडे गेल्या नि त्यांनाच अक्कल शिकवून घरी आल्या. ते तुम्हाला चाललं ? तुम्ही का अडविले नाही त्यांना ? आता ह्याचे किती भयंकर परिणाम भोगावे लागतील याची त्यांना कल्पना आहे का ?"
" त्यांचा इरादा चुकीचा नव्हता."
" नसेल चुकीचा. परंतु नको ते पाऊल उचलायचे नि सगळ्या
वर पाणी फिरवायचे कशासाठी ? तोडायला काय एका क्षणात
तोडायला जमते.पण तेच जोडायला किती कष्ट पडतात. हे त्यांना कळायला नको का ? कुळाची कीर्ती उंचावण्यासाठी आमचे कष्ट खर्ची पडावेत म्हणून आम्ही ही वाट धरली आहे ना, मग इथं आमचीच सख्खी माणसे आमच्या वाटेत आडवा बाण का घालतात." इतक्यात तेथे जिजाबाई म्हणाल्या," आम्ही आडवा बाण घातला नाहीये." असे म्हणताच शहाजी राजे उठून उभे रहात म्हणाले," वर्धी देवून रुजू व्हायचे असतं इतका साधा
शिष्टाचार पाळायचा नाहीये का ? इथं आम्ही आमच्या आऊ
साहेब सोबत बोलत आहोत, आम्हाला एकांत पाहिजे.निदान इथं तरी आमचा विरस करू नका.समजलं."
शहाजी राजे पंत आणि कारभारी यांना हिशोबाच्या याद्या
दाखवायला सांगितल्या. तेव्हा मंबाजी राजे म्हणाले की आपण
कशाला कष्ट घेताहेत आम्ही आहोत ना, सर्व हिशोब दाखवतो
की !" त्यावर शहाजी राजे म्हणाले की, आता आम्ही कुणावर
ही विश्वास ठेवू इच्छित नाही. तेव्हा सर्व याद्या आम्ही आमच्या
नजरे खालून घालणार." इतक्यात इकलाक खान आल्याची
वार्धी देवून गेला. आणि थोड्याच वेळात इकलाक खान हजर
झाला. आणि आसन ग्रहण करत म्हणाला की, शाहजी राजे
आपके गैरमौजुदी में यहां क्या क्या हुआ यह तो आपको पता
चल ही गया होगा ।" त्यावर शहाजी राजे काहीच बोलले नाहीत
पण मंबाजी राजे ने इकलाक खान ला शहाजी राजेंना दहा
गावाची जहागिरी मिळाल्याची खबर दिली. त्यावर इकलाक
खान म्हणाला ," दस गांव की जहागीर तो मिली लेकिन आपको पता है क्या उसका महसूल वसूल करने की जिम्मेदारी हमे मिली है, बहुत जल्द सिक्के और कट्यार हमारे पास पहुंच जायेंगे हे ऐकून मंबाजी राजे ना दुःख होण्या ऐवजी आनंदच झाला. ते म्हणाले काय सांगता खान साहेब, म्हणजे आता तुम्ही महसूल वसूल करणार आणि आम्ही तुमच्या हाताखाली काम करणार तसा आम्ही हिशोब चोख ठेवलाच आहे." हे वक्तव्य ऐकून शहाजी राजेंना राग आला ते म्हणाले," मंबाजी राजे अजुन शिक्के कट्यार आले नाहीत. तेव्हा जरा धीराने घ्या." असे बोलून तिरपा कटाक्ष इकलाक खान वर टाकून शहाजी राजे तेथून चालते झाले.
जिजाबाईंची समजूत त्यांची जाऊबाई घालत असतात की
इतका राग बरा नाही. इतक्यात तेथे शहाजी राजे येतात त्यांना
पाहून जाऊ बाई जाऊ लागतात .तश्या जिजाबाई त्यांना रोखतात. नि शहाजी राजांना त्यांचेच बोल त्यांना ऐकवतात.
की वर्दी दिल्या शिवाय कुणी कुणाकडे जायचे नाही मग आता
तुम्ही वर्दी दिली का ?" तेव्हा शहाजी राजे म्हणाले," वर्दी
कशासाठी ? हे आमचे दालन आहे ?" त्यावर जिजाबाई
म्हणाल्या की आपलं दालन...आम्ही ह्या वाड्याला आपले
दालनच मानतो तिथं यायला वर्दी ची गरज असते. इथं नाही
म्हणजे सोयी नुसार नियम पण बदलतात." जाऊबाई म्हणाल्या
की आता तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलायचे आम्ही येतो."
" नाही तुम्ही थांबा. आम्हाला तुमच्याशी एकांत शी काहीतरी
बोलायचे आहे."
" ठीक आहे, वहिनी साहेब तुम्ही थांबा. आम्ही तुमच्या
दालनात जाऊन येतो." असे बोलून शहाजी राजे निघून गेले.
" तुम्ही काहीतरी आम्हाला सांगणार होता."
" कोणाचे चूक नि कोणाचे बरोबर हे तुम्ही करता, हे नाही
करायचे. स्त्री ने च पडती बाजू घ्यायची असते. कदाचित तुम्हाला नाही पटणार हे, पण स्त्री नेच पडती बाजू घ्यायची असते आपण एकदा पडती बाजू घेतली ना मग बघा कसा चमत्कार होतो ते. माझं ऐका असा एकदा प्रयोग तर करून बघा."
शहाजी राजे संभाजी राजेंच्या दालनात गेले नि त्यांना सविस्तर
हकीगत सांगितली. त्यावर संभाजी राजे हसू लागले. ते पाहून
शहाजी राजे म्हणाले," दादा साहेब तुम्ही हसताय ?"
" शहाजी राजे तुमच्यावर हसत नाही मी. वहिनी साहेबांनी
बघा लगेच परतफेड केली. आणि तुम्हाला इथं यावे लागले. पण
आम्हाला आवडलं हे बरं का ? म्हणजे जिथल्या तिथं तुकडा
मोडला." असे म्हणून पुन्हा हसले. तसे शहाजी राजे म्हणाले,
" दादा साहेब तुम्हाला हे पटतंय का ?"
" हे बघा शहाजी राजे यात खोट काढू नका. आणि वहिनी
साहेबांना आपण ओळखत नाही का ? या पूर्वी त्या अश्या
वागल्या नाहीत का ? त्या अगदी मनात असेल ते बोलून टाकतात. मनात काही साठवून ठेवत नाही असे तुम्हीच त्यांचे
कौतुक करत नव्हता का ? मग आजच का तुम्हाला सर्व खटकतं ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले की, नाही बरोबर
दादा साहेब पण त्या आधी आम्ही तुम्हाला फार महत्वाचे सांगितले. त्याचं काय ? वजीरे आलम च्या दरबारात जाऊन
त्यांनाच आक्कल शिकविली त्याचं काय ? सारा वसुली पासून
इकलाक खान ला इथं पाठविले आणि त्या बद्दल सगळ्या
समोर ऐकवलं त्याचं काय ?" त्यावर संभाजी राजे म्हणाले,
शहाजी राजे, आम्हाला ना या सर्वापेक्षा युद्ध च बरं वाटतं.
कारण तिथं असे शब्दांचे खेळ होत नाहीत ना ? तिथं कसं तलवार उचलायची नि सपासप कापत सुटायचं. इथं सगळा घोळ होतोय बघा."
" का ? दादा साहेब मला सांगा, या पूर्वी असं कोण वागले
होते का ? आणि असे वागल्याने त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करायला नको का ?"
" शहाजी राजे तुम्ही सर्व गोष्टींचा एकत्र गुंता करताय."
" गुंता तर झालाच आहे दादा साहेब."
" जरा सबुरी ने घ्या. मग गुंता आपोआपच सुटेल."
" दादा साहेब इतकं सारे झाल्यावर सबुरीने कसं घ्यायचे ?"
" बघा. वहिनी साहेबांनी जे वजीरे आलम जे बोलले तो
एक भाग. आता एका स्त्री ने दरबारात जाऊन आपली बाजू
मांडणे हा दुसरा भाग. दुसरा भाग जरा चुकीचाच आहे, परंतु
पहिला भाग एकदम रास्त आहे, जरा सबुरीने घ्या."
" आता सबुरीने घेऊन काय होणार आहे ? हे व्हायचे होते
ते घडून गेले, आता फक्त परिणाम पहायचे."
" मला वाटतं तुम्ही एकदा वहिनी साहेबांशी शांत पने बोलून
घ्यावे."
" दादा साहेब काय बोलताय तुम्ही हे."
" मी सांगतोय ना ?"
" ठीक आहे." असे म्हणून तेथून निघाले.
जिजाबाई स्वतःशीच बोलत असतात की जाऊ बाई सारख्या
सारख्या सांगून गेल्या की पडतं घ्या म्हणून. चूक नसताना
का म्हणून पडतं घ्यायचे ? तर म्हणाल्या की चूक असो वा नसो
स्त्री नेच पडतं घ्यायचे असतं. मग ठीक आहे." इतक्यात
शहाजी राजे तेथे येतात तेव्हा शेवटचे वक्तव्य त्यांच्या कानावर
पडले. ते म्हणाले, आता शांत पने विचारतो की, कोणाला ही
न विचारता वजीरे आलम कडे गेलात नि दरबारात त्यांनाच
अक्कल शिकवून आलात." जिजाबाईनीं बोलण्याचा प्रयत्न
केला तर शहाजी राजे म्हणाले," आम्हाला सफाई नकोय. फक्त
हो किंवा नाही एवढ्यात जबाब द्या." त्यावर जिजाबाई म्हणाल्या की, नाही देत सफाई मग आम्ही बोलायचंच नाही का ?" शहाजी राजे म्हणाले," असं आम्ही म्हणाले आहे का ?"
" आम्ही वर्दी देवूनच आंत यायचे नि हो किंवा नाही इतका
जबाब द्यायचा. याचा काय बरं अर्थ होतो ?" त्यावर शहाजी
राजे काहीच बोलले नाहीत. तश्या त्या पुढे म्हणाल्या," जाऊ
बाई म्हणाल्या पडतं घ्यायचे. आम्ही पडतं घ्यायला पण तयार होतो ; पण या पुढे असेल चालणार असेल तर त्याला काय अर्थ आहे ? तुम्हीच सांगा ना ?" शहाजी राजे म्हणाले," जो प्रश्न
विचारला आहे, त्याचे उत्तर न देता भलतचं कीर्तन सुरू आहे."
" म्हणजे आम्ही तिथं गेलो त्याचा काहीच उपयोग नाही असं
म्हणा की !"
" हो तर चांगलं होतं म्हणून तर खुश होऊन वजी रे आलम ने
शिक्का कट्यार इकलाक खानाच्या नावाने येणार आहे, कारण
आम्ही सारा वसुली करू शकत नाही. आम्हाला म्हणाले की
तुम्ही मोहीम फतेह करा. सारा वसुलीचे काम इकलाख खान
करेल."
" पण लग्नाच्या वेळी आपण ठरवलं होतं ना की हे सगळं
बदलायचं हो ना ?"
" ते लहान पणीचे स्वप्न होतं हे मोठे पनीचे सत्य आहे."
" हो मान्य, पण आमचं ऐकून तर घ्याल."
" कशासाठी ? आम्हाला त्याचीगरज नाही." असे बोलून
उत्तराची अपेक्षा न करता शहाजी राजे थेट निघून गेले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा