छत्रपती शिवाजी महाराज १९ | Chhatrapati shivaji maharaj 19
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज १९ |
" आम्ही म्हणतोय अजून कोण म्हणेल ?"
" आम्हाला आपली आठवण येत होती की नव्हती हे फक्त
शंभू महादेवच सांगू शकेल. कारण केवढ्याचे फुल आधी शंभू महादेवाना अर्पण करून मग तुम्हाला खलीता लिहिला . मोगऱ्याचे फुल आधी त्याला अर्पण करून मग तुम्हाला खलीता लिहिला." त्यावर जिजाबाईंनी हर्षभराने स्मित हास्य केले.
पुढे
इतक्यात तेथे उमाबाई आणि सोयराबाई आल्या. त्यांना पाहून शहाजी राजे नि जिजाबाई शंभू महादेवाच्या पाया पडून
उठून उभे राहतात. तेव्हा सोयराबाई ने विचारले की, जाऊ बाई
आम्हाला इथं का आणलेत बरे ?" त्यावर उमाबाई म्हणाल्या,
" का म्हणजे ? देवाच्या पाया पडल्या नंतर थोरा मोठ्या च्या
पाया पडायचे असते." त्यावर सोयरा बाई उद्गारल्या की ती
रीत आपल्या काळात होती. आता कुठं आलीय रीत ? काय
सूनबाई तुम्हाला तरी आठवतेय का ?"
" अहो, जाऊ बाई त्या अजून लहान आहेत, शिवाय कुंकू
मोहीमे वर गेलय म्हटल्यावर चित्त थारेवर असेल तेव्हा ना ?"
असे म्हणताच सोयरा बाईंनी संधी साधली. त्यावर त्या म्हणाल्या
की ,चित्त थाऱ्या वर असल्या शिवाय का त्या इकडे तिकडे गेल्या ? आणि लहान कसल्या ? चांगली समज आहे, म्हणून तर त्या कुणा पुढे पण जाऊ शकल्या ना ? काय सूनबाई बरोबर ना ? शहाजी राजे ......पुढे बोलण्या अगोदरच
उमा बाईंनी मध्येच बोलून त्यांच्या वक्तव्य मध्येच खंडित करून
त्या म्हणाल्या," अहो, जाऊबाई त्या आपल्या स्वारीची आज्ञा
पाळत होत्या ना ? देव घरात जोडीने आले, शहाजी राजे
तुम्हाला काम असेल ना ?" शहाजी राजेंनी होकारार्थी मान
डोलावली नि त्या दोघांनी उमा बाईंचे चरण स्पर्श केले. तेव्हा
उमा बाईंनी त्यांना औक्षणवंत व्हा ! अंखंड यश मिळू दे. कीर्तिवंत व्हा ! " असे अनेक आशीर्वाद दिले. त्यानंतर त्या
दोघांनी सोयरा बाईचे चरण स्पर्श केले. तेव्हा त्या म्हणाल्या
की जाऊबाई ने सगळे आशीर्वाद दिल्याने माझ्या कडे आशीर्वाद
च उरला नाही. मी काही आशीर्वाद देत नाही जेवढे दिले आहेत
तेवढे मिळाले तरी पुरे आहेत. नाही का ? असे त्या म्हणाल्या.
त्यावर उमाबाई म्हणाल्या की जिजाबाई तुम्हीच आता तुमच्या
स्वारीचे पहा. काय ?" जिजाबाईंनी मुकाट्याने आपली मान
डोलावली. आणि ते दोघेही तिकडून निघून गेले.
मंबाजी राजे पंत आणि कारभारी या दोघांना ताकीद देतात की जो काय तुम्ही दोघांनी हिशोबात घोळ घातला आहे तो तुम्ही
दोघांनीच निस्तरायचा आहे, आमचं नाव कोठेही येता कामा
नये." असे सांगून निघून गेले. त्यानंतर मोहीमेत गेलेल्या
सर्व शिलेदारांना शहाजी राजेंनी मोहरा देवून त्यांचा सन्मान केला. ते शिलेदार जेव्हा जिजाबाईंचे चरण स्पर्श करतात तेव्हां जिजाबाईना जरा अवघडल्या सारखे होते. आणि त्या आपल्या सासूबाई जवळ तश्या बोलून पण दाखवतात. तेव्हा उमा बाई त्यांना म्हणाल्या की , ह्याची आता तुम्हाला सवय करून घ्यावी लागेल. " जिजाबाई कुणालाही जेवण केल्या शिवाय घरी पाठवत नाहीत. संभाजी राजे यादी नुसार प्रत्येकाला शहाजी राजे कडे पाठवत असतात. इतक्यात संभाजी राजे एका ला शहाजी राजे कडे घेऊन येतात की शहाजी राजेंना सांगतात की ह्यांची मागणी फार वेगळी आहे, ते तुम्ही पहा काय करायचं ते आम्ही पंगती कुठवर उठल्या त्या पाहून येतो. बाकीची यादी मंबाजी राजे पाहतील. असे सांगून संभाजी राजे तेथून निघून गेले. त्या शिलेदाराला शहाजी राजेंनी म्हटले की, काय पाहिजे ते मागा. तेव्हा तो शिलेदार म्हणाला की , आम्हाला फक्त मोठ्या आई साहेबांनी जेवायला वाढावे. आम्ही त्यांच्या हातचे जेवू इच्छितोय. तेव्हा शहाजी राजे आपल्या आऊ साहेबांकडे पाहतात. तेव्हा उमाबाई आपल्या नजरेने समती दर्शवितात. त्यानंतर तो शिलेदार उमा बाईना हात जोडून म्हणाला," आई साहेब आमची इच्छा पूर्ण करा." त्यावर उमा बाई म्हणाल्या की तुम्ही चला पुढे आम्ही आलोच." तेव्हा जिजाबाई उद्गारल्या की सासूबाई आम्हाला काहीच उमजत नाहीये." त्यावर उमा बाई म्हणाल्या," सबंध फक्त हिरे मानक्यानीच नाही तर मीठ भाकर ने सुध्दा जपता येतो. पण तशी मनात भावना असावी लागते. सर्व मंडळीने अगोदर आमच्या स्वारीना साथ दिली नि आता शहाजी राजेंना साथ देत आहेत." असे म्हणताच सोयरा बाईंनी आपलं नाक मुरडले. शहाजी राजांचा जखमी असलेला हात दुखत असतो हे जिजाबाईंना त्यांच्या हावभाव वरून ध्यानात आले .तसे त्यांनी गोदावरीला सांगितले की वैद्य बुवांना बोलवून आण." गोदावरी वैद्य बुवांना बोलवायला निघून गेली. सर्वांना त्यांचे इनाम देवून झाल्या नंतर शहाजी राजे आपल्या दालनात
जातात. इतक्यात गोदावरी वैद्य बुवांना घेऊन तेथे आली.
वैद्य बुवांनी त्यांची मलम पट्टी केली. तेव्हा शहाजी राजे
म्हणाले की, इतकासा तर घाव आहे त्याची तिची काळजी
घ्यायची ! तुम्हाला माहितेय हे घाव खरे तर घेऊन मिरवायचे
असतात. कारण आपल्या पराक्रमाचे ते प्रतिक असते."
" तुमच्या जखमाचा आम्हाला अभिमानच आहे, कारण त्या
परक्यानी केलेल्या जखमा आहेत. पण त्या सुलतानाच्या
जखमा आम्हाला सतत होतच आहेत त्याचं काय ?" तेव्हा
शहाजी राजे फार गोंधळून गेले त्यांना काही कळेना. की
जिजाबाईंना नेमके काय म्हणायचे आहे ते म्हणून ते उठून
उभे रहात म्हणाले ," परकियांचे घाव म्हणजे ?" तेव्हा
जिजाबाई म्हणाल्या की , सर्वजण परकियच तर आहेत , त्यात आपलं कोण आहे ? आमचे आबा साहेब म्हणाले की, एके काही इथं यादवांचे राज्य होतं, नंतर परकीय येथे आले नि त्यांनी आपले राज्य बळकावले. नि आपल्याच राज्यात आपल्याला चाकर बनविले. आपण जी चाकरी करतोय ती परकियांचीच तर आहे." त्यावर शहाजी राजे म्हणाले की, हो मान्य आहे की,
आम्ही परकियांची चाकरी करत आहोत, पण तुमचे आबा
साहेब पण तर परकीयांचीच चाकरी करत आहेत ना, आणि
यादवांचे राज्य का बुडले तर पराक्रम कमी पडला म्हणूनच ना ?
जोपर्यंत आपण पराक्रम करणार नाही तोपर्यंत परिस्थिती
बदलणार कशी ? " त्यावर जिजाबाई निरुत्तर झाल्या.
दुसऱ्या दिवशी संभाजी राजे आणि शहाजी राजे पंत आणि
कारभारी कडून सर्व हिशोब घेत असतात तेव्हा त्यांना कारभारात काहीतरी घोटाळा जाणवला.म्हणून शहाजी राजेंनी
विचारले की, आमच्या सोबत मोहीमे वर गेलेल्या शिलेदारांचां
पगार वेळेवर का दिला गेला नाही. त्याची ते यादी मागत असतात. पण कारभारी आकडे मोड करण्यात वेळ घालवत
असतात. ते पाहून शहाजी राजे चिडतात. ते म्हणाले की, आम्ही
मोहीमे वर गेल्यावर आमच्या सोबत जंग लढत असणाऱ्या
सैनिकांच्या घरच्यांना पगार देण्याची जबाबदारी आमची आहे.
इतक्यात तेथे मंबाजी राजे इकलाक खान ला घेऊन येतात. तसे
शहाजी राजांना आश्चर्य वाटते की इकलाक खान आपल्या
कडे का आला असावा असा प्रश्न तर पडतोच. पण त्याच
बरोबर इकलाक खान आल्या बद्दल ची वर्दी का दिली नाही,
नगारा का वाजला नाही, या विषयी चौकशी करतात. तेव्हा
संभाजी राजे माहिती देतात की इकलाक खान ला इथं येऊन
बरेच दिवस झालेत. शहाजी राजांना अजून एक धक्का बसला.
धक्का बसण्याचे कारण म्हणजे इकलाक खान आपल्या
वेरुळ मध्ये इतके दिवस मुक्काम करून राहिला आहे, त्याची आपणाला कोणीच कशी खबर दिली नाही. त्याबद्दल इकलाक
सांगतो की इथं अश्या बरचशा गोष्टी झाल्या आहेत त्या बद्दल
आपल्याला कल्पना नाहीये. पण वजीरे आलम ने आपल्याला
इथला कारभार पाहण्यासाठी पाठविले आहे. तेव्हा शहाजी
राजे म्हणाले," दादा साहेब इथं आपली माणसे कारभार
पाहायला असताना पाहुण्याची गरज काय ?" तेव्हा मंबाजी
राजे म्हणाले की, खान साहेब सुध्दा आमचे परिवारांचे आहेत
आम्ही त्यांना पाहुणे मानतच नाही." असे म्हणताच संभाजी
राजे चिडून म्हणाले ," मंबाजी राजे, काय बोलताय याचे भान
आहे का ? उगाच वाहत जाऊ नका." त्यावर इकलाक खान
उद्गारला की, वजीरे आलम का हुकुम था वेरुल में जाकर
वहां का कामकाज देखिए " शाहोजी राजे उद्गारले की उन्हे
बताइए की हम यहां का कारभार छोड़कर काशी मथुरा नहीं
गए है, और जब हम मोहिमे पर जायेंगे तो हमारे गैरमौजूदी में
यहां का कारभार देखने के लिए सक्षम है।" मंबाजी राजे बोले
की, बिल्कुल बिल्कुल ." असे बोलून मंबाजी राजे खानाच्या कानात कुजबुजत असतात की तुम्ही तर म्हणाले होते की शहाजी वर आम्ही मात करू, पण इथं शहाजी राजे तुम्हाला श्वास तरी घ्यायला देताहेत का ते पहा." मंबाजी राजें असे इकलाक खानाच्या कानात असे कुजबुजने संभाजी राजांना अजिबात आवडले नाही. त्यांनी मंबाजी राजेंना फटकारले ते म्हणाले की, सदरेवर चार माणसे बसलेली असताना एकमेकाच्या कानात कुजबुज ने म्हणजे इथल्या चार जणांचा अपमान आहे तेव्हा मंबाजी राजे जे काय बोलायचे ते स्पष्ट बोला." तेव्हा इकलाक उद्गारले," हम बताते है की शाहजी राजे जो कह रहे है वो एकदम दुरुस्त है, लेकिन वजीरे आलम के विरुद्ध बोलना हम मर्तबा नही रखते इसलिए बेहतर यह होगा कि यह बात आप खुद जाकर उन्हें बताए और हमे आजाद करे ।" लगेच मंबाजी राजे त्याला दुजोरा देत म्हणाले," हां योग्य प्रस्ताव आहे, असे आम्हाला ही वाटते." इकलाक उद्गारला की, अगर आप चाहे तो हम आपकी सिफारिश कर सकते है।" संभाजी राजे उद्गारले," वजीरे आलम हमे जानते भी है,और हमारी बात मानते भी है, इसलिए हमे आपकी सिफारस की जरूरत नहीं है। इतक्यात वजीरे आलम मलिक अंबर ने पाठविलेला दुत तेथे आला नि मलिक अंबर ने पाठविलेले फर्मान संभाजी राजेंच्या हातात दिले. संभाजी राजेंनी ते फर्मान वाचले नि सांगितले की वजीरे आलम ने आपल्याला दौलताबाद ला भेटायला बोलावलं आहे." तेव्हा शहाजी राजे म्हणाले की, मंबाजी राजे इकलाक खान ची पाहुणचार सुरू असू दे. पण कारभारात लक्ष घालायला अजिबात देवू नका. "
" मग ते इथ राहून करतील काय ?" असे मंबाजी ने विचारले. तेव्हा शहाजी राजे म्हणाले की, इथं मर्दानी खेळ आहेत की म्हणजे हरणाची शिकार खेळायला घेऊन जावे."असे बोलून संभाजी राजे कडे पाहत ते पुढे म्हणाले," चला दादा साहेब." असे बोलून जाता जाता कारभारी आणि पंत ह्यांना म्हणाले," तुमच्या कडे आता खूप वेळ आहे तेव्हा यादी तयार ठेवा. आम्ही पुढच्या वेळी यादी मागू तेव्हा ती अपुरी असता कामा नये." असे सांगून तेथून निघून गेले. त्यावर मंबाजी राजे म्हणाले," खान साहेब , शहाजी राजे आपणास हरणाची शिकार करायला सांगून गेलेत." त्यावर खान हसला नि म्हणाल्या ,
" हम ने शेरनी की शिकार की है तो हिरनी की
शिकार करने की क्या जरूरत है । " खान गोदावरी ला
उद्देशून बोलला, पण मंबाजी राजे ना वाटले की खान साहेब
आपल्या वहिनी साहेब बद्दल बोलत आहेत.आणि त्यांनी तसे
खान साहेब जवळ बोलून ही दाखविले. परंतु इकलाक खान
ने त्यावर आपली कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
हिराजी ने सरळ जिजाबाई ना साष्टांग नमस्कार घातला.
तेव्हा जिजाबाई त्यांना म्हणाल्या की, हे आपण काय करत
आहात, आम्हाला नमस्कार कशासाठी ?" त्यावर हिराजी
म्हणाला की, आम्ही मोहीमे वर असताना आपण माझ्या
आबा साहेबांना वाचविल्या बद्दल." त्यावर जिजाबाई उत्तरल्या
की ते आमचं कर्तव्यच होतं. बरं ते जाऊ दे, मला सांगा आमचे
स्वारी कुठं दिसलेत का ?" त्यावर हिराजी ने सांगितले हो
त्यांना संभाजी राजे सोबत आम्ही काही वेळा पूर्वी पाहिले
होते. आणि ते उद्या दौलताबादला जाणार आहेत."
" दौलताबादला कशासाठी ?" जिजाबाईंनी विचारले.
" वजीरे आलम मलिक अंबर ने फर्मान पाठविले आहे,
शहाजी राजेंना दौलताबादला येण्यासाठी !" हे ऐकून जिजाबाई
च्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. म्हणजे कशासाठी बोलविले असेल ? आमच्या विरुध्द तक्रार करायला ? छे
छे छे वजीरे आलम असं करणार नाही. मग कशासाठी
बोलविले असेल ? काही कळत नाही."
मंबाजी राजे शाहजी राजे येण्याची वाट पाहत असतात. पण
तेथे संभाजी राजे येतात नि त्यांना सरळ विचारतात की कुणाची
वाट पाहताहेत ? शहाजी राजेंची पण कशाकरता ? " तेव्हा
मंबाजी राजे सांगतात की वहिनी साहेब वजीरे आलमला
भेटून आल्यात हे शहाजी राजेंना ठाऊक नाहीये ते नंतर माहित
पडण्या पेक्षा आपणच सांगितलेले बरे नाही काय ?" त्यावर
संभाजी राजे म्हणाले," आणि सांगणार काय , वहिनी साहेब
तेथे काय सांगून आले आहेत, हे माहीत आहे का ? कुणाकडून
काही ऐकले आहे का ? नाही ना ? मग काय सांगणार आहात ? आणि समजा शहाजी राजांनी विचारले की ह्याला पुरावा काय ?
तर मग काय सांगणार ?" मंबाजी राजे उद्गारले," पुरावा तर
नाहीच आहे." संभाजी राजे म्हणाले," मग अशी अर्धवट माहिती गोळा करून उगाच नाही ते करायला जाऊ नका. आणि
हा सल्ला आता पुरताच नाहीत तर या पुढे ही कायम लक्षात
ठेवा. नाहीतर तोंडघशी पडाल. हे ध्यानात ठेवा. चला." संभाजी
राजे त्यांना स्वतः सोबत घेऊन जातात."
जिजाबाई शमशेर जवळ आपले मनोगत व्यक्त करत असतात
की स्वारी ना वजीरे आलम ने दौलताबादला बोलविले आहे.
वजीरे आलम आमच्या विरुध्द तक्रार तर करणार नाहीत ना ?
छे छे छे ! ते कशाला सांगतील ? उलट त्यांचीच चूक आहे. पण
मग स्वारी ना वजीरे आलम ने दौलताबादला कशाला बोलविले असेल ? काही कळत नाहीये. कदाचित ते स्वारीच सांगतील.
पण सांगतीलच हे कशावरून म्हणायचं ? कारण त्यांना
दौलताबादला बोलविले आहे, हे तरी त्यांनी आपल्याला कोठे
सांगितले आहे ? स्वारी आपल्यावर रागवले तर नसतील ना ?
रागावले ही असतील. कुणी नाही सांगावे ? आणि खरंच
रागावले असतील तर त्यांची समजूत कशी काढावी ? काय
सांगायचं त्यांना की आम्ही कशासाठी गेलो होतो तेथे ? आणि
आपण जरी सांगितले तरी ते त्यांना पटायला हवं ना ? खरंच
फार अवघड गोष्ट होऊन बसली आहे. काय करावं तेच कळत
नाहीये ? स्वारी आमच्यावर नाराज तर नसतील ना ? पण हे
कळणार कसं ? " हात जोडून पुढे म्हणाल्या," शंभू महादेवा
तुला तर माहित आहेच की आम्ही तिथं कोणत्या उद्देशाने
गेलो होतो ? ते चुकीचे नव्हतेच. पण हे स्वारी ना कसं समजवणार ? असं तर नाही ना की जो विचार आम्ही करतोय
तो चुकीचा आहे, म्हणजे तसं काही ही नाहीये. पण हे कळणार
कसं ? आता ते कळायला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे
स्वारी जोपर्यंत स्वतः येऊन आम्हाला काही सांगत नाहीत
तोपर्यंत आम्हाला काही ही कळणार नाही. पण तोपर्यंत धीर
कसा धरणार ? आता आम्ही लहान ही नाही लहान असतो
तर लगेच पळत जाता आलं असतं पण आम्ही मोठ्या झालो.
त्यामुळे जबाबदारी पण वाढली. पट्कन विचारू पण शकत
नाही.कारण प्रत्येक मोठ्या माणसांना प्रत्येक पाऊल विचार
पूर्वक उचलायचे असते. हे आम्ही विसरलोच.
दुसऱ्या दिवशी शहाजी राजे जिजाबाई सोबत बुध्दी बळ
खेळायला बसले. जिजाबाईच्या मनातले काल चे विचार
अजून मनात घोळतच होते. म्हणजे त्यांच्या अपेक्षेनुसार तसं
काहीही घडलं नाही. पण त्यांना शहाजी राजेच्या मनातले
काहीच कळले नव्हते. म्हणून त्या अर्धवट डाव सोडून जाऊ
लागल्या तर शहाजी राजे ने विचारले की अर्धवट डाव सोडून
कोठे चालला आहात ?" त्यावर जिजाबाई उद्गारल्या," नकोच
ती हार जित ?" लगेच शहाजी राजेंनी विचारले ," का बरं ?
मला वाटतं मागची आम्ही तुमच्यावर केलेली आठवली असेल."
" असे मुळीच नाहीये."
" मग काय झालं ते सांगाल तरी !"
" हार जीत मुळेच महाभारतात युद्ध झालं ना ."
" म्हणजे आपल्या दोघांत देखील भांडण होईल असे वाटतंय
का आपल्याला ?"
" नकोच ती विषाची परीक्षा."
" पण असं मनात का आलं ?"
" कालपासून दोन शब्द तरी स्वारी बोलली का आमच्याशी !"
" म्हणजे काल रात्रीचा वाद आम्ही मनात धरून ठेवलाय असं वाटतंय का आपल्याला ?" त्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी आपली नजर खाली झुकविली. तसे शहाजी राजे पुढे म्हणाले, अहो असं कसे आम्ही मनात धरून ठेवू ? आणि आधीच असे मनात धरून ठेवले तर कुबड नाही का येणार आमच्या पाठीला ?" असे म्हणताच जिजाबाईंनी आपली
खालची मान वर केली नि विचारले की, नक्की ना ?" शहाजी
राजेंनी हसून हो म्हंटले. तश्या त्या म्हणाल्या की , मग स्वारी
उद्या दौलताबाद ला जाणार आहे, हे आम्हाला दुसऱ्या व्यक्ती
कडून का समजलं ?" शहाजी राजे म्हणाले ," आम्ही
सांगणारच होतो, पण त्या आधी दुसऱ्यानेच कुणी व्यक्ती ने येऊन सांगितले तर त्यात आमची काही चूक आहे का ?" जिजाबाई उद्गारल्या , " बरोबर आहे तुमचं आमचंच चुकलं. आम्ही नको तो विचार केला मनात."
" आता गैरसमज दूर झाला ना मग या आता खेळायला. डाव पुन्हा मांडू !" जिजाबाई खेळायला बसल्या. कारण त्यांच्या मनावरील दडपण एकदम दूर झालं. पण तरी मनात अजून एक
शंका आहेच की, मग दौलताबाद वजीरे आलम ने कशाला
बोलविले. मनातील शंका दूर करण्याच्या उद्देशाने त्यांनी शहाजी
राजेंना प्रश्न केलाच. तेव्हा शाहजी राजेनी सांगीतले की विशेष
काही नाही. मोहीम फत्त झाल्यानंतर दौलताबादला जावेच
लागते. तसेच आम्ही उद्या ही जाणार आहोत. आणि हे काय
आम्ही पहिल्यांदाच जात नाहीये. तुम्हाला त्याचेच तर दडपण
आलं नाही ना ?" जिजाबाई उद्गारल्या," नाही नाही तसं काही
नाही." असे जिजाबाईंनी म्हटलं खरं पण त्यांच्या मनातील
भीती काही केल्या जात नव्हती.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा