बेवफा १२ | Unfaithful 12
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बेवफा १२ |
पुन्हा जर सुरभीच्या आसपास जरी दिसलास तर आपल्या पायावरून जाणार नाही घराला सरळ तिरडी वरून स्मशानात जाशील." असे बोलून त्यांनी मला सोडून दिले.
पुढे
प्रकाश
सुरभी च्या बॉडीगार्ड ने माझीही कंपलेट केली की मी सूर्भीच्या प्रियकराला भेटू दिले म्हणून. त्यामुळे सुरभीच्यां वडिलांनी म्हणजेच क्रांतीलाल शहा नि मला बोलावणे पाठविले. मी समजून गेलो की मला कशाला बोलविले असेल ते. मी गेलो त्यांच्या घरी तर त्यांनी मला भरपूर काही सूनविले. तेव्हा मी
त्यांना स्पष्ट शब्दात सांगून टाकले की जसे तुमच्या मुलीचे
महाराष्ट्रीयन मुलाशी प्रेम आहे तसेच माझे एका महाराष्ट्रीयन
मुलीवर प्रेम आहे, त्यामुळे मी तुमच्या मुलीचा पत्नी म्हणून
मी कदापि स्वीकार करणार नाही." तेव्हा ते रागवत म्हणाले,
" हे अगोदर सांगायचं नव्हतं का ?"
" मी सांगितले होते माझ्या वडिलांना परंतु माझे वडील ही
तुमच्या प्रमाणे पक्के बिजनेसमेन निघाले. त्यांनी फक्त व्यवहार पाहिला. आमच्या मनाचा कधी विचारच केला नाही. मग आम्ही का विचार करावा तुमच्या प्रतिष्ठेचा ? तुम्ही आम्हाला तुमची
मुलं म्हणून जबरदस्तीने लग्न करायला भाग पाडू शकता पण
प्रेम करायला जबरदस्ती नाही करू शकत कारण ते हृदयातून
असावे लागते." माझं वक्तव्य ऐकून त्यांनी लगेच माझ्या
वडिलांना फोन लावला त्यांच्या शी काय बोलणे झाले ते कळले
नाही. परंतु दोघांमध्ये बरेच काही तू तू मै झाले असावे.असा
माझा अंदाज आहे, बाकी खरे काय आहे ते देवच जाणे ! पण
वडील घरी आल्यावर मात्र माझे वडील माझ्यावर रागवत म्हणाले ," काय रे, काय केलेस तू ?" मला माहित होतं की
वडील कशाबद्दल बोलत आहेत ते, पण तरी देखील मला माहीत नसल्याचा आव आणत विचारले ," कशाबद्दल बोलत आहात आपण ?" तसे ते अधिकच चिडून हणाले की, तुला चांगलेच
माहितेय मी कशाबद्दल बोलत आहे ते. पण तरी देखील वेड
पांघरून पेड गावाला जायचं नाटक का करतो आहेस."
" बाबा, खरंच मला माहित नाही आपण कशाबद्दल बोलत
आहात ते." मी म्हटलं. तशी स्वयंपाक घरात काम करत असलेली आई म्हणजे बा बाहेर येत म्हणाली,' काय हो काय
झालं ? कशाला ओरडताय माझ्या मुलाला ?"
" वेड लागलय मला उगाचच बोलायला."
" अहो, पण असं केलं काय त्याने ते तर सांगाल."
" काय केलं ? काय नाही केलं ते विचार."
" पुन्हा तेच ......अहो मी काय विचारते नि तुम्ही काय उत्तर
देताय मला ?"
" तुझ्या सुनेचा जुना प्रियकर भेटायला आला होता तिला.
आणि ह्याने त्याला खुशाल भेटू दिलं सूनबाईला."
" अहो, पण त्यात चुकी कुणाची तुमचीच ना ?"
" माझी चुकी आणि ती कशी ?"
" तुम्हाला माहित होतं ना, की तिचं दुसऱ्या एका मुलावर
प्रेम आहे, पण तरी देखील तिला आपली सून करून घेतलात
ही तुमची चूक नव्हे काय ?"
"अग प्रेम केलं म्हणजे लग्न पण तिच्या सोबतच करायला
हवं , असं थोडेच आहे. आमचं पण लग्नापूर्वी एका मुलीवर
प्रेम होतं पण आमच्या बापाने तुझ्याशी आमचं लग्न करून
दिलं मग आम्ही राहिलो ना, तुझ्याशी एकनिष्ठ का गेलोय
आपल्या प्रेयसी कडे ?"
" आता गेलाय का नाही ते मी थोडीच पाहिलं."
" म्हणजे तुझा पण तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही असं म्हण
की !"
" असे मी म्हंटले का ? नाही ना ? उगाचच आपलं काही पण
बोलता."
" बरं ते राहू दे, तुझ्या मुलास नीट समजावून सांग, की एकदा
लग्न झाल्यावर लग्नाच्या बायकोशी एकनिष्ठ राहायचं असतं.
म्हणून लग्नापूर्वीचे प्रेम सगळं विसरायचं असतं. म्हणून सांगतोय
पुन्हा जर का तो भेटायला आला तर त्याला भेटू द्यायचे नाही."
असे म्हणून ते आपल्या खोलीत निघून गेले. मी मात्र त्यांच्या
पाठमोऱ्या आकृती कडे पाहतच राहिलो. आपल्या वडिलांचे
पण दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं पण आपल्या वडिलांनी आपल्या
बा शी लग्न केलं आणि आपल्या पहिल्या प्रेमाला विसरले.
ह्याला काय प्रेम म्हणायचं ? मला वाटतं की त्या मध्ये माझ्या बापाने बिझनेसच पाहिला असेल. नक्कीच बाच्या बाबाकडून
भरपूर सारा पैसा मिळाला असणार , पण मी असं होऊ देणार
नाही. पण त्यासाठी मला काहीतरी करायला हवं आहे, असं
हातावर हात घेऊन बसून चालणार नाही, पण करणार काय
आपण ? घरातून पळून गेलो तर ...? हो असेच करायला हवं
पण बापाला कळलं तर ? कसं कळेल ? आपण सांगायचं की
मित्रा सोबत पिकनिक ला चाललो म्हणून. पण आपला बाप आपल्या सांगण्यावर विश्वास ठेवील काय ? का नाही ठेवणार ?नाही म्हणजे हे आपलं मौज मजा करण्याचेच वय आहे ना ?
छे असं आपण म्हणतोय आपला बाप असं थोडीच म्हणणार
आहे ? मग काय करावं काहीच कळत नाहीये. आपण सुरभी
ला विश्वासात घेऊ नि तिच्या प्रियकराला ही हो असेच करतो
म्हणजे घेऊन निघायचं की आम्ही दोघंही हनिमूनला चाललोय
नि तिकडे आपल्या प्रेयसी ना पण बोलवून घेऊ. मग सुरभी
जाईल आपल्या प्रियकर सोबत आणि मी जाईन माझ्या प्रेयसी
सोबत परत घरी यायचंच नाही तर पळून जायचं दुसऱ्या शहरात. माझी ही योजना जेव्हा मी सुरभी ला ऐकवली तेव्हा ती चक्क नाही म्हणाली. म्हणते कशी की मी माझ्या आई वडिलांचा
विश्वासघात करणार नाही. मी तुमच्याशी लग्न केलेय तर
तुमचीच पत्नी बनून राहीन. मग तुम्ही माझा पत्नी म्हणून
स्वीकार करा अथवा करू नका. " खरे सांगू या वेळी मला सुरभीचां भयंकर राग आला कारण मी तिच्या नि माझ्या हिताचेच बोलत होतो ना, पण नाही पटले तिला. नाही पटले तर नाही जाऊ दे उडत पण मी नाही राहणार हिच्या सोबत. मी माझ्या प्रेयसीला घेऊन दूर कुठं तरी निघून जाईन. असा विचार करून मी मधूला फोन करून नेहमीच्या ठिकाणी भेटायच्या बोलविले. पण तिने चक्क नाही म्हणून सांगितले. म्हणाली माझ्या कडे वेळ नाहीये. खरे सांगायचे तर मला तिचा भयंकर राग आला मला नाही म्हणते म्हणजे काय ? मी थेट तिच्या घरी गेलो तर तिच्या आई ने मला तिला भेटू दिले नाही.म्हणाली," माझ्या मुलीचे एका चांगल्या मुलाशी लग्न ठरले आहे, तेव्हा आज पासून तू तिला भेटायचे नाहीस." तेव्हा मी म्हटलं की, पण तुम्ही असं कसं तिचं दुसऱ्या मुलाशी लग्न करू शकता ? नाही म्हणजे तिचं माझ्यावर प्रेम आहे."
" होतं आहे नाही ? तू लग्न केलेस ना, मग तिला नको का
करायला लग्न ? "
" पण मी अजून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला नाही."
" नाही केलास तर आता कर तीचा स्वीकार, कारण लग्न
एकदाच होतं नि एकाशीच होतं आणि ते तुझं झालेलं आहे.
तेव्हा आता माझ्या मुलीचा नाद सोड. आणखीन एक महत्वाचे
तू जर खरोखरच माझ्या मुलीशी प्रेम केलं असशील तर माझ्या
मुलीच्या सुखी संसारात विष कालविणार नाहीस." हे ऐकल्यावर
माझ्या कडे दुसरा पर्याय नव्हता. मी निमुटपणे घरी आलो नि
मधुला कायमचं विसरून जावे हाच निर्णय घेतला नि सुरभी ला
आपली पत्नी स्वीकारणे हाच एक पर्याय उरला होता माझ्या
कडे आणि सुरभी ला म्हटलं की तू माझ्याशी संसार करायला
तयार आहेस का ? कारण मधुला आजपासून मी कायम
अंतरलो. तेव्हा सुरभी ने मला विचारलं की असं काय घडलं
तुम्हां दोघांमध्ये ?" तेव्हा मी तिला घडलेली सारी हकीकत
ऐकवली. त्यावर ती म्हणाली," साऱ्याच गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडत नाही, परिस्थिती पुढे मनुष्याला शरणागती
पत्करावी च जशी आपल्या दोघांना पत्करावी लागत आहे.
कधी कधी माणसाला दुसऱ्यांच्या इच्छेखातर स्वतःच्या
इच्छा माराव्या लागतात. माणसांचे जीवन हे असेच आहे,
तुला सर्वच काही त्याच्या इच्छेनुसार मिळत नाही. हेच खरे !"
शेवटी मला सुरभी ला पत्नी म्हणून स्वीकार करावाच लागला.
ऋषी
सुरभी ने परिस्थितीशी तडजोड केली म्हणायची तर ! माणूस
परिस्थिती पुढे हतबल होतो हे खरे आहे, तो जे करू इच्छित
असतो तसे घडतच नाही मुळी ! हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
प्राचीला पत्नी म्हणून स्वीकार करण्यापलीकडे आता माझ्या पुढे दुसरा पर्याय देखील नाही. कारण त्या रात्री आम्हां दोघांमध्ये
जे काही घडलं त्यानंतर दुरारा पर्याय उरला नाही. म्हणून मी
निर्णय घेतला की प्राचीला आनंदाची बातमी देवू म्हणून मी तिला फोन केला आणि तिला विचारले की तू घरी कधी येणार
आहेस ?" त्यावर तिने मला विचारले," का बरं ? फार आठवण
येते आहे का माझी ?" मी म्हंटले," हो, फार आठवण येते आहे
तुझी ! कधी येणार आहेस बोल...का मी येऊ तुला न्यायला ?"
त्यावर प्राची म्हणाली की, तुम्ही आलेत तर बरेच आहे, आई
देखील खुश होईल ना ?" त्यावर मी म्हंटले की, ठीक आहे
मी येतो आज रात्री !" तेव्हा तिने विचारले की , रात्री का ?"
" त्या दिवशीची आठवण ताजी नको का करायला ?" मी
मुद्दाम म्हंटले." त्यावर ती चक्क लाजून म्हणाली," चल्ला
काहीतरीच तुमचं आपलं !"
" बरं बरं, मी आज रात्रीचा येत नाही उद्या सकाळी येतो."
" यायचे असेल तर येऊ शकता."
" नको.उद्या सकाळीच येईन म्हणून सांग मॉम ड्याडी ना."
" हो, सांगते."
" ठेवू फोन."
" हो ठेवा." असे बोलून फोन कट केला.
दुसऱ्या दिवशी मी आईला म्हंटले की आई, मी प्राची ला
आणायला तिच्या घरी चाललोय."
" का रे, इतक्या दिवसांनी ती आपल्या माहेरी गेली आहे,
राहू दे ना अजून काही दिवस."
" नाही.पण प्राचीच म्हणाली उद्या मला न्यायला या म्हणून."
" अच्छा म्हणून निघालास होय ?" आई ने मुद्दाम म्हंटले.
त्यावेळी मी चक्क लाजलो. तशी आई हसून म्हणाली," बरं बरं
जा घेऊन ये." तेव्हा गार्गी ने ऐकले ती माझी मस्करी करत
म्हणाली," वा दादा, तू तर छुपा रुस्तम निघालास.
हौले हौले हो गया है प्यार .......मुन्ना भाई लगे रहो !"
तसा मी म्हणालो," थांब तुला आता मी बघतो. उगागाच तिच्या
मागे लागल्या सारखे केले. त्यानंतर मी तिच्या माहेरी गेलो
नि तिला घरी घेऊन आलो. आणि काही दिवसानंतर गोड
बातमी मिळाली मी पप्पा बनणार या बातमी ने मी एकदम
खुश झालो.
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा