Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

 

रामायण -१
रामायण -१




           बाल काण्ड

      अनेक वाचकांची रिक्वेस्ट आली की मी रामायण वर
लिहावे. मूळ रामायण वाल्मिकी ऋषी ने लिहिले.त्यानंतर
सोळाव्या शतकात गोस्वामी तुलसीदास रामचरितमानस
हा हिंदी भाषेत ग्रंथ लिहिला. ग.दि. मांडगुळकर गीत रामायण म्हणून संपूर्ण रामायण काव्यात लिहिले. एकनाथ
महाराजांनी भावार्थ रामायण म्हणून काव्यात लिहिले.
त्यानंतर अनेक साहित्यकानी इतर सर्व भाषेत अनुवादित
केले.परंतु मराठीत कोणी लिहिले आहे किंवा नाही ते मात्र
माहीत नाही. तसे पाहायला गेले तर रामायणाची कथा आपल्या सर्वांना माहीत तर आहेच, पण तरी देखील पुन्हा
पुन्हा ती कथा वाचावी एवढी अविठ गोडी आहे या कथेत. पुस्तकरुपी कथा वाचायला सर्व वाचकांना  आवडते. मी ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय जमेल की नाही ते माहीत नाही. अर्थात मी लिहीत असलेले रामायण रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका रामायण या हिंदी मालिकेवर आधारित असणार आहे, त्याचे कारण असे की मी माझ्या वडिलांकडून बालपणी ऐकलेले रामायण नि दूरदर्शन पाहिलेले रामायण मध्ये भरपूर साम्यता आहे. म्हणून विचार
केला या मालिकेवर आधारित लिहावे. ही वाचकांनी नोंद घ्यावी. काही चुकलं तर अवश्य कमेंट करून सांगा.

    रामायण चे रचयीता वाल्मिकी ऋषी आहेत. आणि असे
ही सांगितले जाते की रामायण राम जन्माला येण्यापूर्वी
लिहिलं गेलंय. जसे की आपण एखादी कुटुंबावर आधारित नाटिका लिहितो. आणि ती नाटिका काही कलाकार स्टेजवर सादर करतात. अगदी तसेच भगवन्त श्रीरामानी ऋषी वाल्मिकी नि लिहिलेलं रामायण सत्यवात उतरविले असे म्हणता येईल. आता वाल्मिकी ऋषी विषयी थोडेसे माहिती करु , असं म्हणतात की वाल्मिकी ऋषी पूर्वी एक दरोडेखोर होते. म्हणजे वाटमारी करायचे.अर्थात त्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरू ला ते अडवायचे नि त्याच्या कडे जे काय सामुग्री असायची ती ते त्याच्या कडून काढून घेत नसेल तर त्या वाटसरू ला ठार मारत असत. त्यांचे पूर्वीचे नाव वाल्या कोळी असे होते. आता त्यांच्या विषयी मला माहित असलेली महिती ही मी बालपणी गोष्टींच्या पुस्तकात वाचलेली आणि माझ्या वडिलांकडून ही ऐकलेली माहिती अगदी मोजक्या शब्दात देतो. किंवा या पेक्षा वेगळी पण असू शकते.
      एके दिवशी त्या रस्त्याने देवर्षी नारदमुनी आले. ठरल्या
प्रेमाने वाल्या कोळ्याने त्याना अडविले. ते म्हणाले ," तुझ्याकडे जे काय असेल ते मला देऊन टाक."
     " नाही दिलं तर ?" देवर्षी नादमुनी नि विचारले.
    " तर ठार मारिन मी तुला."
    " पण माझ्याकडे तर नारायण या नामघोष शिवाय दुसरे
काही नाही."
     " मग तर तू मेला असे समज."
    " पण मी काय म्हणतो की मला मारून काय मिळेल तुला ?"
     " काहीच नाही. परंतु तुला दंड दिल्याचे समाधान मिळेल
मला."
     " वेडा आहेस तू ? असा कोणाचा जीव घेऊन स्वतःच्या
पापाचे ओझे कशासाठी जमा करतो आहेस ?"
     " कशासाठी म्हणजे ? माझ्या बायका मुलांसाठी करतोय."
    " अरे पण वेड्या तू केलेल्या पापाचा वाटा ते लोक घेणार
आहेत का ?"
    "  हो , निश्चितच घेतील."
    " हो का ? मग तू एक काम कर, असाच घरी जा नि आपल्या बायका मुलांना विचारून ये की तू केलेल्या पापाचे
भागीदार बनायला तयार आहेत की नाही. ते जर हो म्हणाले तर मी मरायला तयार आहे." देवर्षी नारद म्हणाले.
     वाल्या कोळी आपल्या घरी गेला नि आपल्या पत्नी ला
आणि मुलांना विचारून पाहिले. परंतु देवर्षीचे कथन सत्य
ठरले. पत्नी ने आणि मुलांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही
पाप करताय त्यात आम्ही भागीदार होणार नाही. तुम्ही
केलेले पाप तुम्हीच स्वीकारायचे आहे." वाल्या कोळी तसाच
पळत देवर्षी नारदमुनी कडे आला नि म्हणाला , " तुमची
वाणी सत्य ठरली. मी केलेल्या पापातील वाटा कोणीही घ्यायला तयार नाहीये. तेव्हा आता मी केलेल्या पापातून मुक्त कसा होऊ ? काहीतरी उपाय सांगा." देवर्षी नारद म्हणाले ," एक उपाय आहे, फार कठीण आहे तो उपाय ?"
    " उपाय कितीही कठीण असो करेन मी सांगा मला."
   तेव्हा देवर्षी नारदमुनी म्हणाले," तू राम नामाचा जप कर."
    " परंतु मला राम म्हणताच येणार नाही."
    " मग तू आतापर्यंत काय केलं ?"
    " मारा मारा च म्हणालो. देवर्षी नारदमुनी नि मनात विचार
केला की मारा या शब्दाचा उलट अर्थ रामा असा होतो. आणि मारा मारा असे सतत म्हटलं की त्याचा उच्चार रामा रामाच होतो. हे द्यानात येताच देवर्षी नारद म्हणाले ,' मग तू एक काम कर."
      " काय करू ते सांगा बरं ."
      " एका ठिकाणी बसून तू मारा मारा असे सतत म्हणत
रहा. हाच तुझा उद्धार होण्याचा मार्ग आहे. म्हणून आतापासून मारा मारा म्हणायला सुरुवात कर." असे  म्हणताच वाल्याकोळी ने आसन घेतले नि त्यावर  बसला नि मारा मारा चा जप सुरू केला. मारा मारा म्हणता म्हणता त्याच्या मुखातून रामा रामा हा शब्द उमटू लागला. देवर्षी नारद स्वतःशीच हसले नि त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला ध्यानस्थ केले. आणि स्वतः तेथून निघून गेले. वाल्या कोळी राम राम म्हणतच राहिला. हळूहळू त्याच्या सभोवती वाळवी ने वारूळ बनविले वाल्या लोकी वारुळाच्या आंत राम जप करत राहिला. बारा वर्षाच्या तपा नंतर देवर्षी नारद त्याच मार्गाने तेथे आले. पाहून पाहतात तर काय वाल्या कोळी कोठे दिसत नव्हता. परंतु कीटकांनि बांधलेल्या वारुळातून एक स्पष्टपणे राम नामाचा द्वनी सर्वत्र उमटत होता. तेव्हा देवर्षी नारदमुनीच्या ध्यानात आले त्यांनी वारूळ तोडले. तसे आंत मध्ये वाल्या कोळीचा  राम नामाचा जप सुरू होता. नारदमुनी नी त्यांच्या डोक्यावर आपला हात ठेवून त्यांना ध्यानातून बाहेर काढले. तेव्हा वाल्या कोळी म्हणाला ," देवर्षी तुम्ही आलात ते बरं झालं आता मला सांगा मी पुढे काय करू ?" तेव्हा देवर्षी नारद म्हणाले ," आता तू पूर्वीचा वाल्या कोळी राहिला नाहीस तर वाल्मिकी ऋषी झालास. म्हणून तू आज पासून
रामायण लिहायला घे आणि जे तू लिहिशील ते सत्य होईल.
असे सांगून देवर्षी नारद गुप्त झाले.

            रामायण

     लंकाधिपती रावण ने महादेव आणि ब्रह्मदेव कडून वरदान प्राप्त करून तिन्ही लोकांवर विजय मिळवून सर्व देवांना बंदीस्त केले होते. देव, राक्षस, गंधर्व, यक्ष, किन्नर , मानव सर्वांना सळो की पळो करून सोडले आहे. ब्रह्मदेव कडून वरदान प्राप्त असल्याने त्याला आता कोणाचीच भीती राहिलेली नव्हती. शेवटी ब्रह्म सहित  सर्व देव मिळून क्षीरसागर मध्ये शेष शैय्यार विराजमान असलेल्या विष्णू देवा कडे सर्वजण आपली तक्रार घेऊन गेले.  विष्णू देव शेषनाग वर पहुडले आहेत नि त्यांच्या चरणाशी लक्ष्मी देवी बसल्या आहेत. तेव्हा सर्वजण मिळून विष्णू देवाची आराधना करतात तेव्हा भगवंत डोळे उघडून त्या सर्वांकडे
पाहतात, ब्रम्हदेव कडे पाहत त्यांनी विचारले ," ब्रम्हदेव
काय समस्या आहे? " तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले ," सर्वेश्वर पापी
रावणाने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजविला आहे. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, मानव, ऋषीमुनी सर्वानाच त्याने वेठीला
धरले आहे, सर्व देवांना त्याने बंदीस्त करून कारागृहात
टाकले तेव्हा भगवंत आपण सर्वांची रक्षा करावी. त्यानंतर
इंद्रदेव म्हणाले ," ब्रम्हदेव आणि महादेव यांच्या कडून रावणाने वरदान प्राप्त करून घेतले नि आता इतका उल्मत्त झाला आहे की त्याला भय कशाचे ते राहिलेच नाहीये. कारण देव, गंधर्व , यक्ष, किन्नर यापैकी कोणीही त्याचा वध करू शकणार नाहीये.असे त्याने ब्रम्हदेवाकडून वरदान प्राप्त केले आहे." लगेच धर्ती माता पृथ्वी भगवंतांना म्हणाली ," आपण  साऱ्या सृष्टीचा भार माझ्यावर सोपविला आहे. परंतु पापी अत्याचारी रावणाने साऱ्या सजीवांना सळो की पळो करून सोडले आहे.तेव्हा लवकरच काहीतरी उपाय करा भगवंत नाहीतर माझा अंत निश्चितच आहे." त्याच वेळी महादेव म्हणाले," जेव्हा जेव्हा धर्तीवर पाप वाढते त्या त्या
वेळी त्या पापाचा विनाश करण्यासाठी आपल्याला पृथ्वीवर
अवतार घेणे आवश्यक आहे भगवंत कारण आपणच जगाचे तारणहार आहात सर्वेश्वर ! तेव्हा पुन्हा एकदा अवतार घेऊन सर्व प्राणिमात्रांची रक्षा करावी."  तेव्हा भगवंत विष्णू म्हणाले ," अहंकारी रावणाने एक चूक केली आहे, वरदान मागताना त्याने मनुष्य आणि वानर यांचा त्यात समावेश केला नाही, कारण तो वानर आणि मनुष्य या
प्राण्यांना तुच्छ प्राणी समजतो . म्हणून मी माझ्या कलागुणा साहित पृथ्वीवर मनुष्य रूपात अवतार घेणार आहे. अयोध्या चा राजा दशरथ याच्या पोटी जन्म घेऊन मी रावणाचा विनाश अवश्य करीन. आपण चिंता करू नका भगवंत ." असे विष्णू देवांनी महादेवना आश्वासन दिले. तेव्हा सर्व देव निश्चित मनाने माघारी परतले.

     ( आता प्रभू श्रीराम महाराज दशरथा च्या पोटी जन्माला
येणार हे निश्चितच झाले होते. परंतु कोणतीही गोष्ट अकारण
घडत नाही प्रत्येक गोष्टीला कारण हे असतेच म्हणजेच निमित्त हे असतेच असते. कसे ते पहा. )

     एके दिवशी अयोध्याचा राजा महाराज दशरथ शिकार करण्यासाठी वनात गेले होते. त्यांनी सारे जंगल पायाखाली तुडविले. परंतु त्यांना शिकार काही सापडली नाही. फिरता
फिरता त्यांचे पाय फार थकून गेले होते. शिवाय  संध्याकाळ ही झाली होती. त्यांच्या मनात एक विचार आला की आता घरी परतावे. परंतु लगेच दुसऱ्या क्षणी विचार बदलला की शिकार मिळाल्या शिवाय घरी परतायचे नाही. मग शरयू नदीच्या काठी आले. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला की जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी या नदीच्या काठी जरूर येतील. अर्थात  आपल्याला शिकार इथंच करता येईल. असा विचार करून नदी पासून थोडं दूर असलेल्या एका वडाच्या झाडावर चढून बसले. त्याना शब्दभेदी बाण सोडण्याची कला अवगत होती. म्हणून ते शिकारीची वाट पाहत झाडावरच लपून बसले. बराच उशीर झाला. आता
सर्वत्र अंधार दाटून आला होता. समोरचे काही दिसत नव्हते. त्याच वेळी -

     एक ब्राम्हण कुमार आपल्या अंध माता-पित्याना कावडीत घेऊन काशी तीर्थ यात्रेला त्याच रस्त्याने निघाला होता. त्याच्या त्या अंध माता-पित्याना फार तहान लागली होती. म्हणून ते आपल्या पुत्रास म्हणाले ," बाळ श्रावण आम्हाला फार तहान लागली आहे रे, जवळपास कुठं पाणी असेल तर बघ पाहू !"
    तेव्हा श्रावण बाळ म्हणाला ," ठीक आहे आई-बाबा मी
पाणी पाहतो बरं." असे म्हणून त्याने आपल्या खांद्यावर
घेतलेली कावढ उचलून खाली ठेवली. नि पाणी आणण्यासाठी एक घागर घेतली नि पाणीच्या शोधार्थ निघाला. थोडे अंतर चालून गेल्यानंतर जवळच एक नदी दिसली. श्रावण त्या नदीच्या काठावर गेला. पाणी भरण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु नदीचा काठ इतका उंच होता की त्याचा हात पाण्या पर्यंत पोहोचत नव्हता. म्हणून त्याने एक युक्ती केली. गळ्यातील जाणवे काढून त्याने दोरखंड प्रमाणे ते जाणवे त्या घागरिला बांधले नि पाण्यात सोडले. घागर
बुडतांना त्या पाण्याचा बुडबुड असा आवाज आला. तेव्हा थोड्याच अंतरावर झाडावर लपुन बसलेल्या महाराज
दशरथा ना वाटले की कोणीतरी प्राणी पाणी प्यायला नदीच्या काठावर आले आहे, असा विचार करून त्यांनी एक शब्दभेदी बाण सोडला. तो बाण वर्मी लागताच एक करुण किंकाळी फोडून ब्राम्हण कुमार जमिनीवर कोसळला. माणसाचा  आवाज ऐकून महाराज दशरथ फार घाबरले. ते मनात म्हणाले ," हा आवाज तर माणसाचा वाटतोय. माझा बाण चुकून कुण्या मनुष्याला तर लागला नाही ना ? असा विचार करून ते झटपट झाडावरून ते खाली उतरले नि पळतच आवाजाच्या दिशेने निघाले. नदीच्या काठी येऊन पाहतात तर एक ब्राम्हण कुमार जखमी होऊन पडला आहे. महाराज दशरथानी मारलेला शाब्दीभेदी बाण त्याच्या वर्मी लागला होता. महाराज दशरथानी त्याला विचारले," बाळ
   कोण आहेस तू ?" तो कुमार उद्गारला ," मी श्रावण
कुमार , मी माझ्या अंध माता-पित्याना कावडीत घेऊन
काशियात्रेला निघालो होतो, परंतु आता असं वाटतं की माझी ही इच्छा अपुरीच राहणार." तेव्हा महाराज दशरथ
म्हणाले ," अरे रे काय विपरीत घडलं हे माझ्या हातून." असे
म्हणून त्याच्या छातीत रुतलेला बाण पकडून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना श्रावण कुमार म्हणाला,
     " महाराज मी आता जगू शकणार नाही, माझा आता
अंतिम क्षण आला आहे, तेव्हा आपण एकच करा, हे पाणी
माझ्या आई-वडिलांना नेऊन पाजा. परंतु पाणी पिऊन होई
पर्यंत आपण स्वतःचे नाव सांगू नका. नाहीतर ते पाणी न
पिताच ते प्राण सोडतील." महाराज  दशरथानी ते मान्य
केलं." तसे श्रावण बाळ ने आपले प्राण सोडले. त्यानंतर
महाराज दशरथ ती पाण्याची घागर घेऊन श्रावण चे आई
वडील ज्या झाडाखाली बसले होते तेथे गेले. त्यांच्या
पावलांच्या आवाजाने श्रावण च्या आई-वडिलांना श्रावण
आला असे वाटून त्यांनी प्रेमाने बाळ श्रावण पाणी आणले
का रे ?" परंतु महाराज दशरथा ने हुं की चू न करता
पाण्याची घागर त्यांच्या तोंडा जवळ नेली. परंतु काही न
बोलल्यामुळे त्याना वाटले की बाळ श्रावण आपल्यावर
रुसला आहे. कदाचित पाणी आणण्यासाठी त्याला फार
कष्ट पडले असावेत. म्हणून तो आपल्याशी बोलत नाहीये
असा विचार करून त्याच्या माता-पित्यांनी विचारले ," बाळ श्रावण  तू बोलत का नाहीस ? " पण तरी महाराज दशरथा ने काहीच उत्तर दिले नाही. कारण आपण बोललो तर आपला आवाज ते ओळखतील नि आपल्या पुत्राची चौकशी करतील. आणि जर आपण त्याना सत्य घटना
सांगितली तर ते लगेच प्राण सोडतील. या भीतीने दशरथ
राजा काहीच उत्तर देत नव्हते. परंतु त्यामुळे श्रावण च्या
आई-वडिलांचा गैरसमज झाला. ते म्हणाले , " तू जर बोलत
नसशील तर तू आणलेले पाणी आम्ही पिणार नाही." अखेर
नाईलाजाने  दशरथ महाराजांनी आपली ओळख सांगितली.
तेव्हा श्रावण चे माता-पिता एकदम भावूक होत म्हणाले,
    " महाराज पाणी आणण्याचे आपण का कष्ट घेतलेत ?
आणि आमचा श्रावण बाळ कोठे आहे ?" तेव्हा दशरथ
महाराजांनी श्रावण बाळाच्या माता-पित्याना सत्य सांगून
टाकले. सत्य कळताच श्रावणा च्या मातेने तर आपला प्राण सोडला. तेव्हा चिडून श्रावण च्या पित्यांनी महाराज दशरथा ना शाप दिला की जसे आम्ही बाळ श्रावण म्हणत तडफडत तडपडत प्राण सोडत आहोत तसेच राजा तुही आपल्या पुत्राचे नाव घेत तडपडत प्राण सोडशील असा शाप दिला. त्यानंतर महाराज दशरथा ने त्या तिघांची चिता रचली नि त्या तिघांनाही अग्नि दिला. आणि जड अंतकरणाने ते अयोध्याला परतले. त्यानंतर त्यांनी ही गोष्ट आपल्या गुरूंना अर्थात महर्षी वशिष्ठाना सांगितली. तेव्हा महर्षी वशिष्ठ मनात समजून गेले की ज्या आर्थी त्या अंध ब्राह्मणांनी शाप दिला की तू सुध्दा आमच्या प्रमाणेच पुत्र वियोगाने तडपडून
मृत्युमुखी पडशील याचा अर्थ महाराज दशरथाना पुत्र प्राप्ती
निश्चितच होणार. असा विचार करून महर्षी वशिष्ठानी महाराज दशरथ यांना पुत्र कामेष्टी यज्ञ करायला सांगितले.



      अयोध्या राजा दशरथाला तीन राण्या होत्या. सर्वात मोठी कौशल्या, सुमित्रा आणि सर्वात धाकटी नि सर्वात
लाडकी राणी कैकेयी परंतु तिन्ही राण्यांच्या पोटी संतान
नव्हते. त्यामुळे महाराज दशरथ फार दुःखी होते. त्यांनी
नेहमी प्रमाणे सुर्यदेवाला वंदन केले. तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले," महाराज , सूर्यदेव उत्तरायण मध्ये प्रवेश करत
आहे, आज चा दिवस फार शुभ आहे आजच्या दिवशी
आपल्या कुलदेवतेचे पूजन करून जे काही मागाल ते प्राप्त
होईल." तेव्हा महाराज दशरथ म्हणाले ," गुरुदेव, ईश्वर कृपेने धन दौलत ऐश्वर्य सर्वकाही मिळाले आहे मला. फक्त
एकाच गोष्टीची कमतरता आहे आणि ती गोष्ट म्हणजे माझ्या पोटी कुणी संतान नाहीये. ज्या रघुकुळात महाराज भगीरथ , सत्यवादी हरिश्चंद्रा सारखे फार मोठे पराक्रमी राजा होऊन गेले. त्या रघुकुळात राजा  दशरथा नंतर रघुकुळाचे नाव सांगणारा कोणीच असणार नाही का ?" महाराणी कौशल्य उद्गारल्या," गुरुदेव आपण तर सर्वज्ञानि आहात, आपल्याला तर माहीतच असेलच की जोपर्यंत कोणत्याही स्त्रिला मातृत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत ती स्त्री स्वतःला संपूर्ण स्त्री समजत नाही." तश्या लगेच महाराणी कैकेयी उद्गारल्या," जर  पोटी संतान नसेल तर ह्या साऱ्या वैभवाला काहीही अर्थ नाहीये." तश्या महाराणी सुमित्रा उद्गारल्या ," गुरुदेव आपण तर सर्वकाही जाणता आपणास आम्ही काय सांगावे ?" तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले," महाराणी कौशल्या, महाराणी कैकेयी, नि महाराणी सुमित्रा अजिबात चिंता करू नका. तुमची कुलदेवता सूर्यदेव तुम्हां लोकांना कदापि निराश करणार नाहीये. पण त्यासाठी
तुम्हां लोकांना एक काम करावे लागेल."
     " कोणते काम गुरुदेव ?"
     " पुत्र कामेष्टी हा यज्ञ करावा लागेल."
     " मग करा ना वाट कोणाची पाहताय."
     " तो मी नाही करू शकणार यज्ञ ."
     " आपण नाही करणार मग दुसरा कोण करू शकतो तो यज्ञ ?"
     " अथर्ववेद पूर्ण ज्ञानी श्रुंगी ऋषीच हा यज्ञ करू
शकतात."
   " मग बोलवून घ्या ना त्याना." महाराणी कैकयी उद्गारली.
    तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले," नाही महाराणी त्याना
बोलविण्यासाठी स्वतः महाराजाना जावे लागेल."
     " ठीक आहे, मी स्वतः घेऊन येईन त्याना." तश्या महाराणी कैकेयी म्हणाल्या ," मग मी आजच आर्य सुमंत ला
आदेश देते की  हत्ती घेडे आणि पायदळ सैन्या तयार करून त्याने महाराजा  सोबत जावे."
    " नाही महाराणी कैकेयी ! तिथं आपले वैभव अथवा पराक्रम दाखवायला जायचं नाहीये. एका योगी जवळ काही मागण्यासाठी जायचं असेल तर मागणाऱ्यांकडे झोळी असायला पाहिजे. कारण दान झोळीतच घेणे योग्य असते. तिथं वैभव किंवा पराक्रम  दाखवायचा नाहीये. तेथे अहंकार घेऊन  गेलात तर तेथून अहंकारच घेऊन परत याल. म्हणून तिथे एक याचक बनून जायचं आहे."
     " अगदी बरोबर बोललात आपण गुरुदेव. मी याचकच
बनून जाणार आहे तिथं आणि त्याना नम्र विनंती करून सोबत घेऊन येतो इथं." महाराज दशरथ म्हणाले. तेव्हा
महर्षी वशिष्ठ म्हणाले ," तुमची मनोकामना पूर्ण होईल राजन. जा आणि लवकर या परत." त्यानंतर महाराज
दशरथ पायात वहाणा न घालता पायी चालत निघाले.
दरमजल दरमजल करत एकदाचे शृंगी ऋषींच्या आश्रम मध्ये पोहोचले. तेव्हा शृंगी ऋषींनी त्याना आपल्या कडे
येण्याचे कारण विचारले. तेव्हा महाराज दशरथानी सांगितले
की मी माझ्या गुरूच्या आदेशानुसार आपल्या पाशी आलोय. " त्यावर शृंगी ऋषी म्हणाले," ते ठीक आहे, परंतु
येण्याचे कारण नाही सांगितलेत." तेव्हा महाराज दशरथ
म्हणाले," मला आपल्या हातून पुत्र कामेष्टी यज्ञ करावयाचा
आहे, जर आपली काही हरकत नसेल तर आपण माझ्या
सोबत अयोध्येस चलावे." ऋषी शृंगीनि लगेच आपली संमत्ती दर्शविली. त्यानंतर लवकरच पुत्र कामेष्टी यज्ञाचे
आयोजन करण्यात आले. आणि यज्ञाला सुरुवात झाली.
अग्निदेव प्रसन्न होऊन अग्निकुंडातून स्वतः प्रसाद घेऊन
बाहेर आले नि महाराज दशरथाना म्हणाले ," हा प्रसाद आहे
आणि ह्या प्रसादाचे तिन्ही महाराणीनी भक्षण करावयाचे आहे. संतती प्राप्त होईल. मात्र एक गोष्ट ध्यानात असू दे की  प्रसादाचे  भक्षण विलंब न करता झाले पाहिजे, नाहीतर त्यात विघ्न येईल." असे बोलून अग्निदेव अदृष्य झाले. ठरल्या प्रमाणे त्या प्रसादाचे तीन समान भागात वाटप झाले. परंतु कौशल्या जेष्ठ महाराणी असल्याने प्रथम त्याना प्रसाद देण्यात आला. त्यानंतर सुमित्रा महाराणीस देण्यात आला नि शेवटी कैकेयी महाराणीस प्रसाद देण्यात आला. परंतु महाराणी कैकेयी ही महाराज दशरथांची सर्वात लाडकी राणी असल्याने पहिला मान आपल्याला मिळावा असे कैकेयी चे म्हणणे होते. परंतु गुरुदेव वशिष्ठांचे म्हणणे होते की महाराणी कौशल्या जेष्ठ असल्याने पहिला मान त्यांचाच आहे. महाराणी कैकेयी ला या गोष्टीचा राग आला. नि तिने प्रसाद घेतला नाही. विलंब झाल्याने ठरल्या प्रमाणे तेथे विघ्न आले. पवन देव एका पक्षाचे रूप घेऊन तेथे आले नि एक वाटा  आपल्या चोचीत उचलून घेऊन गेले. म्हणून मग तिन्ही राण्या आपण प्रसाद लवकर भक्षण केला नाहीतर अजून विघ्न
येऊ शकते म्हणून मग महाराणी कौशल्या आणि महाराणी कैकेयी  या दोघींनी आपल्या प्रसादातील अर्धा भाग काढून महाराणी सुमित्राला दिला. आणि मग तिन्ही महाराणीनी तो प्रसाद एकदम भक्षण केला.
    
      आपल्याला पुत्र व्हावा म्हणून वानरराज केसरीची पत्नी अंजनी तप करत बसली. ती महादेवाची आराधना करत होती. तेव्हा महादेव प्रसन्न झाले नि तिला म्हणाले," तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल." असे बोलून ते अदृष्य झाले. त्यानंतर थोड्या वेळाने  घारीचे रूप धारण केलेले पवन देव तेथे आले नि आपल्या चोचीत असलेला प्रसाद तिच्या ओंजळीत टाकला. तिने तो चटकन भक्षण केला. त्यानंतर नवं महिने पूर्ण होताच तिने एका बाळाला जन्म दिला. तोच बाळ पुढे मारुती नावाने प्रसिध्द झाला.

     अयोध्येस तिन्ही राण्या प्रसूत झाल्या. महाराणी कौशल्या हिला पुत्र झाला. दासींनी महाराज दशरथाना येऊन त्याची सूचना दिली. महाराज एकदम खुश झाले.
तेवढ्यात महाराणी कैकेयी ची दासी मंथरा हिने येऊन
महाराज दशरथ यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर
महाराणी सुमित्रा यांची दासी देखील बातमी घेऊन आल्या
की महाराणी सुमित्रा ला दोन पुत्र रत्न झाले. महाराज अत्यन्त खुश झाले नि त्यांनी खुशखबर देणाऱ्या दासींना
बक्षीस म्हणून आपल्या गळ्यातील मोत्यांचे हार दिले. त्यानंतर सर्व पुत्रांचे नामकरण केले गेले. महाराणी कौशल्या राणीच्या बाळाचे नाव श्रीराम ठेवण्यात आले. कैकेयी ला झालेल्या पुत्राचे नाव भरत ठेवण्यात आले नि महाराणी सुमित्रा ला दोन पुत्र झाले म्हणून तिच्या बाळांची नावे लक्ष्मण आणि शत्रुघ्न ठेवण्यात आले. त्यानंतर स्वर्ग लोकांमध्ये ब्रम्हदेव इतर देवांना म्हणाले की भगवंत नारायणानी अयोध्येस श्रीराम या नावाने अवतार घेतला आहे. आता तुम्ही लोकांनी सुध्दा वानर रूपाने जन्म घेऊन प्रभू श्रीरामाना मदत करावयाची आहे. तेव्हा सर्व देव लोकांनी आपली संमत्ती दर्शविली.

  क्रमशः 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.